महर्षी धोंडो केशव कर्वे यांची माहिती : Maharshi Dhondo Keshav Karve Information In Marathi – भारतरत्न महर्षी डॉ. धोंडो केशव कर्वे हे भारतीय इतिहासातील एक अलौकिक आणि विलक्षण असे व्यक्तिमत्व आहे, ज्यांनी स्त्री शिक्षण आणि सामाजिक सुधारणेसाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले. 1858 मध्ये जन्मलेल्या कर्वे यांनी भारतातील महिलांचा हक्क आणि स्त्री शिक्षणासाठी त्यांच्या काळातील सामाजिक बंधने झुगारून, अटल निर्धाराने भारतातील पहिले महिला विद्यापीठ, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाची स्थापना केली आणि असंख्य महिलांना उच्च शिक्षण घेण्याचा मार्ग मोकळा केला.
महर्षी कर्वे यांनी महिलांचा सामाजिक दर्जा उंचावण्यासाठी केलेले प्रयत्न आणि त्यांची वचनबद्धता शैक्षणिक क्षेत्राच्या पलीकडे विस्तारलेली आहे. त्यांनी अथकपणे सामाजिक समतेचा पुरस्कार केला आणि बालविवाह आणि पडदा प्रथेविरुद्ध लढा दिला. त्यांचा समजसुधारणेचा वारसा पुढील पिढ्यांना सदैव प्रेरणा देत आहे. त्यांचे जीवन म्हणजे,एका व्यक्तीची अदम्य इच्छाशक्ती, संपूर्ण समाजात परिवर्तन घडवून आणू शकते आणि सर्वांसाठी उज्वल, अधिक न्याय्य भविष्य कसे घडवू शकते याचे एक अतुलनीय उदाहरण आहे.
आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या बद्दल माहिती दिलेली आहे. ही माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत संपूर्ण वाचा.
महर्षी धोंडो केशव कर्वे यांची माहिती : Maharshi Dhondo Keshav Karve Information In Marathi
मूळ नाव | धोंडो केशव कर्वे |
टोपण नाव | अण्णासाहेब |
उपाधी | महर्षी कर्वे |
जन्म तारीख | १८ एप्रिल १८५८ |
जन्म स्थळ | शेरवली, रत्नागिरी जिल्हा, महाराष्ट्र |
मूळ गाव | मुरुड, रत्नागिरी जिल्हा |
आईचे नाव | लक्ष्मीबाई |
वडिलांचे नाव | केशवपंत बापूराव कर्वे |
पत्नीचे नाव | राधाबाई, गोदाबाई |
पुरस्कार | भारतरत्न, पद्मभूषण |
प्रसिद्धी | समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ |
कार्य | स्त्री शिक्षण व सामाजिक सुधारणा |
शिक्षण | बॅचलर (गणित) |
मिळालेल्या पदव्या | डी. लिट, एल्. एल्. डी. |
शाळा | एल्फिन्स्टन कॉलेज, मुंबई |
मृत्यू | ९ नोव्हेंबर १९६२ |
कोण होते महर्षी धोंडो केशव कर्वे ?
कोणतीही गोष्ट साध्य करायची असल्यास, त्याच्या मार्गामध्ये येणाऱ्या अडचणींना न घाबरता त्यासाठी कठोर परिश्रम करणे, अत्यंत गरजेचे असते. महर्षी कर्वे यांनी “इच्छा तेथे मार्ग” हा मंत्र सदैव जपला. महर्षी कर्वे यांच्या विद्यार्थी अवस्थेमधील एक प्रसंग अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.
ही घटना १८७५ दरम्यानची आहे. महर्षी कर्वे हे त्यावेळी वयाच्या सतराव्या वर्षाचे होते. त्या काळात मराठी मध्ये सहावीची परीक्षा बोर्डाकडून घेतली जात असायची. ते ज्या ठिकाणी राहत होते, त्या मुरुड गावामध्ये त्यांच्या परीक्षेचे केंद्र नव्हते. परीक्षा सुरू होण्याच्या अगोदर, चार दिवस आधी त्यांना परीक्षेमध्ये बसण्यासाठी साताऱ्याला जावे लागणार, ही बातमी समजली.
सातारा हे मुरुड पासून ११० मैल अंतरावर होते. त्या ठिकाणी जाण्याला कोणतेही वाहन नव्हते, पायी प्रवास करणे हाच एक मार्ग होता. रस्ता सुद्धा अतिशय खडतर होता. परंतु कर्वे यांनी जिद्दीने परीक्षेचे सामान स्वतः सोबत घेऊन, परीक्षेसाठी साताऱ्यामध्ये पोहोचले. मात्र त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर, बारीक व कमकुवत कर्वे यांना पाहून त्या ठिकाणांच्या परीक्षा समितीचे अध्यक्ष त्यांना म्हणाले, “तू १७ वर्षाचा आहेस, असे भासत नाही. त्यामुळे तुम्ही या परीक्षेला बसू शकत नाहीस”.
त्यांचे वय सतरा वर्ष आहे, हे सिद्ध करण्याची सुद्धा त्यांना संधी मिळाली नाही. एवढा मोठा प्रवास करूनही, महर्षी कर्वे यांना परीक्षेमध्ये बसू न दिल्याने, त्या गोष्टीबाबत डगमगले नाही. हताश झाले नाहीत, तर पुढच्या वेळी त्यांनी कोल्हापूरमधून बोर्डाची परीक्षा उत्तीर्ण केली.
- नक्की वाचा 👉👉 अण्णाभाऊ साठे माहिती मराठी
- नक्की वाचा 👉👉 राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची माहिती
महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा जन्म
महर्षी कर्वे यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यामधील मुरुड या छोट्याशा गावामध्ये दिनांक १८ एप्रिल १८५८ रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव केशवपंत कर्वे व आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते. कर्वे यांच्या आई-बाबांची मिळकत अतिशय कमी होती. त्यामुळे कर्वे यांना त्यांचे बालपण अतिशय गरीबीमध्ये घालवावे लागले.
केशवपंतांना तीन मुले होती – धोंडो पंत, त्याचा मोठा भाऊ भिकाजी आणि धाकटी बहीण अंबाताई. धोंडो पंतांचे आई-वडील स्वभावाने धार्मिक होते. घरात रोज पूजा आणि गायन होते. धोंडो पंत लहानपणीही ‘शिवलीलामृत’ आणि ‘गुरुचरित्रे’ या धार्मिक ग्रंथांचे वाचन करत असत.
धोंडो केशव कर्वे यांची स्वाभिमानी आई
अत्यंत गरिबीतही कर्वे कुटुंबाने स्वाभिमानाचा त्याग केला नाही. एका प्रसंगी बडोद्याच्या महाराजांनी अनेक गावांतील ब्राह्मणांना गायी भेट म्हणून दिल्या. प्रत्येक ब्राह्मणाला दहा रुपयांची भेटही देण्यात आली. शिकाजीने आईला विचारले: “आई, बडोद्याचे महाराज प्रत्येक ब्राह्मणाला दहा रुपये भेट देत आहेत. मी पण जाऊन पैसे आणू का?”
लक्ष्मीबाई म्हणाल्या: “तुम्ही भेटवस्तू शोधणाऱ्या कुटुंबात जन्मलेले नाही! तुमच्या पूर्वजांमध्ये अनेक विद्वान पुरुष होते, परंतु त्यांनी कधीही कोणाची भेट स्वीकारली नाही. बडोद्याचा हा महाराजा तुमच्या पूर्वजांना पैसे देणाऱ्या व्यक्तींचा वंशज आहे. आताही त्यांनी आमच्या कुटुंबाचे लाखो रुपये देणे बाकी आहे. अशा व्यक्तींकडून भेटवस्तू स्वीकारण्याचे स्वप्नही पाहू नका.” धोंडो पंतांच्या आईने आपल्या मुलांना शिकवलेला हा स्वाभिमानाचा धडा होता.
महर्षी कर्वे यांचे शिक्षण
महर्षी कर्वे यांचे प्राथमिक शालेय शिक्षण हे रत्नागिरी जिल्ह्यामधील त्यांच्या छोट्याशा गावी मुरुड या ठिकाणीच पूर्ण झाले. यानंतर सातारा ठिकाणी त्यांनी दोन वर्ष उच्च शिक्षण घेतल्यानंतर, मुंबईमधील रॉबर्ट मनी स्कूलमध्ये दाखला घेतला. यानंतर ते १८८४ च्या दरम्याने बी.ए. ची परीक्षा मुंबई विद्यापीठामधून गणित विषयामध्ये उत्तीर्ण झाले.
महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा विवाह
महर्षी कर्वे यांचा विवाह वयाच्या पंधराव्या वर्षी राधाबाई यांच्या सोबत झाला. बी.ए.चे ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर, महर्षी कर्वे यांची पत्नी व मुलगा त्यांच्यासोबत एकत्र राहू लागले.
महर्षी धोंडो केशव कर्वे यांची नोकरी
बी.ए मधुन ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर, महर्षी कर्वे यांनी शिक्षक म्हणून काम करायला सुरुवात केली. शाळेमधील त्यांच्या या पदाव्यतिरिक्त महर्षी इतर वेगवेगळ्या शाळांमध्ये सुद्धा अर्धावेळ शिक्षक म्हणून शिकवत असत.
१८९१ च्या दरम्यान एका प्रसिद्ध व्यक्तीच्या सल्ल्यानुसार, महर्षी कर्वे यांना पुण्याच्या प्रसिद्ध फर्ग्युसन कॉलेजमध्ये व्याख्याता म्हणून निवडले. कर्वे यांनी २३ वर्ष उत्तम कार्य करून दाखवले व मुलांच्या उज्वल भविष्यासाठी मदत केली. त्यांच्या प्रतिभाशाली व्यक्तिमत्त्वामुळे व प्रचंड मेहनतीमुळे त्यांना “डेक्कन एज्युकेशन कमिटी” मध्ये संपूर्ण जीवन सदस्य म्हणून नियुक्त केले.
महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्यावरील प्रभाव
उपजतच समजसेवेचा पिंड असलेले महर्षी धोंडो केशव कर्वे हे अनिष्ट रूढी परांपरांनी गांजलेला समाज पाहून दुःखी होत. त्यातच १८९१ मध्ये जेव्हा ते देशभक्त आणि समाजसेवक गोपाळकृष्ण गोखले, दादाभाई नौरोजी आणि महादेव गोविंद रानडे या समाजसुधारकांना भेटले तेव्हा त्यांच्या नैतिक स्वभावामुळे ते प्रभावित झाले आणि त्यांनी आपले जीवन इतरांच्या सेवेसाठी समर्पित करण्याचा निर्णय घेतला.
त्यांना पंडिता रमाबाई, विष्णुशास्त्री चिपळूणकर आणि ईश्वरचंद्र विद्यासागर यांसारख्या राज्यकर्त्यांकडून महिला सक्षमीकरणासाठी मोहिमेची प्रेरणा मिळाली.
महर्षी धोंडो केशव कर्वे यांची समाजसेवा
महर्षी कर्वे यांना समाजसेवेची प्रचंड आवड होती. त्यांच्या याच आवडी मुळे त्यांनी त्यांच्या थोडक्या पगारामध्ये सुद्धा मराठा हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून काम करण्यास मान्यता दिली. एकदा मुंबईमध्ये त्यांच्या पत्नीची प्रकृती बिघडू लागली, त्यामुळे त्यांनी त्यांच्या पत्नीला गावी पाठवले. १८९१ मध्ये त्यांना पत्नीच्या निधनाचे पत्र प्राप्त झाले. त्या दुःखापोटी त्यांना रात्रभर झोप तर लागली नाही, मात्र कर्तव्य बजावण्यामध्ये त्यांनी कोणतीही कसूर केली नाही. आणि स्वतः शिक्षक म्हणून कारकीर्द चालूच ठेवली.
यांच्या पत्नीच्या स्मृती प्रित्यर्थ त्यांनी मुरुड निधीला पाचशे रुपये जमा केले, त्या पाचशे रुपयांमध्ये पत्नीच्या नावाने मुलांना शिष्यवृत्ती प्राप्त व्हावी, ह्या उद्देशाने त्यांनी केलेला हा छोटासा प्रयत्न होता. १८९१ च्या दरम्यान गोपाळ कृष्ण गोखले यांच्याकडून कर्वे यांना निमंत्रण प्राप्त झाल्यानंतर, ते पुण्यामध्ये प्रसिद्ध फर्ग्युसन महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून नियुक्त झाले. त्या ठिकाणी त्यांनी २३ वर्ष आपली सेवा दिली. पुण्यामध्ये राहून त्यांनी शिक्षणाच्या क्षेत्रात अग्रगण्य कार्य केले आहे.
महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे कार्य – महिला सबलिकरण
1893 मध्ये, त्यांनी ‘विधवा-विवाहोत्तेजक मंडळी’ची स्थापना केली, ज्याने विधवा पुनर्विवाहाला प्रोत्साहन दिले आणि त्यांच्या अनाथ मुलांची काळजी घेतली.
1895 मध्ये विधवा-विवाह-प्रतिबंध-निवारक मंडळीचे नाव बदलून विधवा-विवाह-प्रतिबंध-निवारक मंडळी असे करण्यात आले. (विधवांच्या विवाहातील अडथळे दूर करणारी संस्था).
1896 मध्ये, त्यांनी “हिंदू विधवा होम असोसिएशन” (ज्याला हिंदू विधवा होम किंवा विधवा होम असोसिएशन असेही म्हटले जाते), हिंगणे, महाराष्ट्र येथे विधवांसाठी एक निवारा आणि शाळा स्थापन केली.
विधवा पुनर्विवाह आणि शिक्षणाला पाठिंबा दिल्याबद्दल त्याला पुण्यातील सनातनी ब्राह्मण समाजातून बहिष्कृत करण्यात आल्याने त्याने दुर्गम स्थान निवडले.
महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे विधवा विवाह समर्थन
मुंबईमध्ये शिक्षण प्राप्त करताना, महर्षी कर्वे विधवा पुनर्विवाह समर्थक बनले. त्या काळामध्ये विधवांची अतिशय दयनीय अवस्था केली जात असे. विधवांना केस काढून टाकावे लागत, लाल कपडे परिधान करावे लागायचे आणि घरामध्ये कोंडून राहावे लागे.
पुराणातील गोष्टींचे पालन करणाऱ्या विचारांना महर्षी कर्वे यांनी प्रचंड विरोध केला. परंतु कर्वे यांनी हा विरोध झुगारून पुनर्विवाहाचे समर्थन केले. कर्वे यांनी धैर्याने आपले नातेवाईक आणि मित्रांना सांगितले: “मी विधुर आहे. मला दुसरी बायको करायची असेल तर मी विधवेशी लग्न करेन.
नरहरी पंतांचे वडील बाळकृष्ण जोशी यांना जेव्हा हा निर्णय कळला तेव्हा ते म्हणाले, “तुम्ही फक्त विधवेशीच लग्न करायचे ठरवले असेल तर माझी मुलगी गोदुबाई हिच्याशी लग्न का नाही करत?”
पंडिता रमाबाई संचालित शारदा सदनात विधवा गोदुबाई होत्या. त्या कर्वेंचे स्मरणीय मित्र नरहरी पंत यांच्या बहीण होत्या. कर्वे यांनी ही सूचना मान्य केली. कर्वे आणि गोदुबाई यांचा विवाह पुण्यात ११ मार्च १८९३ रोजी धार्मिक विधींनुसार झाला. लग्नानंतर कर्वे यांनी आपल्या पत्नीचे नाव आनंदीबाई ठेवले. विधवा गोदुबाई सुखाने धन्य आनंदीबाई झाल्या.
या लग्नामुळे, त्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. मुरुड मधील लोकांनी त्यांच्यावर, सामाजिक बहिष्कार सुद्धा टाकला. त्यांच्या मोठ्या भावांना बजावून सांगितले की, महर्षी कर्वे त्यांच्या बायकोला घरामध्ये घेऊ नये, परंतु महर्षी कर्वे यांनी प्रचंड त्रास सहन करून, पुनर्विवाह कार्य चालूच ठेवले. यासाठी त्यांनी त्यांच्या मित्रांच्या मदतीने विधवा पुनर्विवाह संघाची स्थापना केली व या संघाच्या मदतीने जनमतावर प्रभाव टाकण्यास सुरुवात केली.
अनाथ बालिकाश्रम असोसिएशनची स्थापना
पुनर्विवाहाला चालना देऊन विधवांच्या बाबतीत प्रश्न सुटणार नाही, हे महर्षी कर्वे यांना कळले. काही विधवांना पुन्हा लग्न करणे मान्य नव्हते, त्यांना शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहून, सन्मानाने जीवन जगायचे होते. या गोष्टीची जाणीव ठेवून, महर्षी कर्वे यांनी १८९६ मध्ये “अनाथ बालिकाश्रम असोसिएशनची” स्थापना केली.
विविध स्तरावरून निधी गोळा करण्यास महर्षी कर्वे यांनी सुरुवात केली. अडीच महिन्याच्या प्रवासा नंतर ३२०० रुपये त्यांनी जमा केले. त्यावेळी ही रक्कम सगळ्यात मोठी गोष्ट होती. यासाठी त्यांनी स्वतःहून या असोसिएशनच्या स्थापनेसाठी हजार रुपये दिले. हिंगणे या छोट्याशा ठिकाणी घर बांधून, अनाथ बालिकाश्रम याची कर्वेनी स्थापना केली.
त्यावेळी आश्रमामध्ये आठ विधवा व दोन अविवाहित मुली राहत होत्या. महर्षी कर्वे कॉलेजमध्ये शिक्षण शिकवून झाल्यानंतर, दुपारच्या वेळेस जेवण करून तसेच लगेच हिंगणेला बालिकाश्रम मध्ये जायचे. तिथल्या मुलींना सकाळी व संध्याकाळी शिक्षण देऊन ते सकाळी पुण्याला परत यायचे. अशा रितीने त्यांनी त्यांचे कार्य चालूच ठेवले.
महिला शाळेची स्थापना
शिक्षणाद्वारे महिलांचे सबलीकरण करण्यासाठी महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था स्थापन केली. या संस्थेला १२३ वर्षांचा इतिहास आहे.
महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी त्यावेळी पुणे शहराजवळ असलेल्या हिंगणे या खेड्यात १४ जून १८९६ रोजी विधवा स्त्रियांना राहण्यासाठी विधवाश्रमाची स्थापना केली होती. तसेच त्यांनी शिकून आत्मनिर्भर बनावे यासाठी तेथे एक शाळादेखील चालू केली. याच विधवाश्रमाचे नामकरण पुढे ‘हिंगणे स्त्री शिक्षण संस्था’ आणि शाळेचे ‘महिलाश्रम हायस्कूल’ असे करण्यात आले.
समाजाचा मोठा भाग असलेल्या, परंतू त्या काळात दुर्लक्षिलेल्या स्त्रीवर्गाची उन्नती, उद्धार आणि साक्षरता ही उद्दिष्टे डोळ्यांसमोर ठेवून या संस्थेची स्थापना करण्यात आली होती. त्यांनी १८९३ साली विधवा पुनर्विवाह संस्थेचीदेखील स्थापना केली आणि डॉ. आर. जी. भांडारकर यांची संस्थेच्या अध्यक्षपदी नेमणूक केली. विधवा शिक्षणासंबंधित कार्याच्या आद्य प्रणेत्या पंडिता रमाबाई यांच्याकडून प्रेरणा घेऊन या संस्था स्थापन करण्यात आल्या. त्याच वर्षी कर्वे यांनी, अकाली विधवा झालेल्या गरीब व गरजू हिंदू मुलींच्या शिक्षणासाठी आणि पुनर्वसनासाठी ‘अनाथ बालिकाश्रम’ संस्थेचीही स्थापना केली.
दि. ०४ मार्च १९०७ मध्ये महर्षी कर्वे यांनी महिला शाळेची स्थापना केली. सुरुवातीला या शाळेमध्ये फक्त सहा विद्यार्थ्यांनी होत्या. यानंतर १९११ मध्ये महिला शाळेची एक हक्काची इमारत बांधून तयार झाली. व प्राध्यापक महर्षी कर्वे यांचे अजून एक पाहिलेले स्वप्न पूर्ण झाले. १९१४ च्या दरम्यान कर्वे महाविद्यालय मधून निवृत्त झाले व त्याच्या पुढच्याच वर्षी म्हणजे १९१५ ला त्यांच्या आयुष्याला एक नवे वळण प्राप्त झाले.
काशीचे बाबू शिवप्रसाद गुप्ता जपानला गेले होते व तेथील महिला विद्यापीठाने ते अतिशय प्रभावी झाले होते. या विद्यापीठासंबंधीची काही पुस्तिका महर्षी कर्वे यांच्याकडे त्यांनी पाठवली. त्याच वर्षी डिसेंबरच्या काळात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाबरोबर, राष्ट्रीय सामाजिक परिषदेचे अधिवेशन सुद्धा मुंबईमध्ये पार पडणार होते. महर्षी कर्वे यांची अध्यक्षपदी नियुक्ती झाली. त्या पुस्तिकेतून प्रेरणा प्राप्त करून, महर्षी कर्वे यांनी महाराष्ट्रामधील महिला विद्यापीठ ह्या त्यांच्या अध्यक्ष भाषणांमधून, मुख्य विषय लोकांपर्यंत पोहोचवला.
आपल्या भाषणामध्ये, त्यांनी दोन गोष्टीवर मुख्यत्वे भर दिला. एक म्हणजे मातृभाषेतून शिक्षण प्रभावितपणे दिले जाऊ शकते, व दुसरे म्हणजे राष्ट्रीय आणि सामाजिक व्यवस्थेमध्ये स्त्रियांचे कार्यक्षेत्र हे पुरुषांपेक्षा थोडे वेगळे असते, व त्यामुळे स्त्रियांना विविध प्रकारचे शिक्षण मिळालेच पाहिजे मात्र इच्छा असलेल्या महिला पुरुषाप्रमाणे शिक्षण सुद्धा घेऊ शकतात. त्यांच्या या कल्पनेवर अतिशय मनोरंजक चर्चा सुरू झाली.
पुण्यामध्ये आल्यानंतर त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांशी चर्चा केल्या, काही जणांनी महर्षी कर्वे यांना प्रोत्साहन दिले. तर काहींना थोडा वेळ थांबायचे होते. महात्मा गांधी यांनी महिला विद्यापीठ स्थापन करण्याच्या आणि मातृभाषेतून शिक्षण देण्याच्या कल्पनेचे मनापासून स्वागत केले. त्यानंतर ५७ वर्षीय महर्षी कर्वे या योजनेसाठी मनापासून कष्ट करू लागले.
अविवाहित मुली आणि बालिकाश्रमातील मुलींना शिक्षण देण्यासाठी कर्वे यांनी १९०७ साली महिला विद्यालयाची स्थापना केली. आश्रम स्थापन केला, सुरुवाती विद्यार्थिनींची संख्या थोडी होती. पुढे ही संख्या वाढत जाऊन त्याचे रुपांतर निवासी शाळेत झाले. या संस्थेसाठी लागणारी जागा स्व. रावबहादूर गणेश गोविंद गोखले यांनी भेट म्हणून दिली होती. महर्षी कर्वे यांचे असे म्हणणे होते की, मुलींसाठीच्या शाळांची संख्या अगदीच कमी आहे, अशा शाळांची संख्या वाढून प्रत्येक मुलीला शिक्षणाची सहज संधी उपलब्ध झाली नाही, तर समाजाची प्रगती होणार नाही.
सहा महिन्याच्या आत मध्ये विद्यापीठाच्या सेनेची निवड करण्यात आली व त्यासाठी त्यांची पहिली बैठक ०३ आणि ०४ जून १९१६ च्या दरम्याने पुण्यामध्ये भरवण्यात आली. त्याच महिन्याच्या अखेरीस महिलाश्रम हिंगणेच्या सहा विद्यार्थिनींनी प्रवेश परीक्षा देऊन, त्यामधील चार विद्यार्थिनी परीक्षेमध्ये यशस्वी झाल्या.
कर्वे यांनी १९५० साली आपल्या पत्नीच्या स्मरणार्थ आनंदीबाई कर्वे प्राथमिक शाळा या नावाची शाळादेखील सुरू केली. पार्वतीबाई आठवले , काशीबाई देवधर , वेणूबाई नामजोशी आणि अशा अनेक सुशिक्षित महिलांनी स्वेच्छेने आश्रमासाठी काम केले. अनेक तरुण विधवा तेथे शिकून स्वावलंबी झाल्या.
आजघडीला या संस्थेअंतर्गत ६० शैक्षणिक आणि इतर संस्था कार्यरत आहेत. या संस्थेचा विस्तार पुणे, सातारा, वाई, रत्नागिरी, नागपूर, कामशेत आणि वसई असा संपूर्ण महाराष्ट्रभर पसरला आहे. या सर्व शिक्षणसंस्था केवळ महिला आणि मुलींसाठी आहेत. संस्थेच्या निव्वळ हिंगणे येथील आवारातच २६ वेगवेगळ्या संस्था, तसेच वसतिगृहे, पाळणाघरे, शाळा आणि व्यायामशाळेचा समावेश आहे.
महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा जगप्रवास
१९२९ मध्ये महर्षी कर्वे यांनी युरोप, अमेरिका आणि आशिया खंडातील अनेक देशांना भेटी दिल्या. या दौऱ्यात त्यांनी एलसिनोर येथील शिक्षणावरील आंतरराष्ट्रीय परिषदेला हजेरी लावली. बर्लिनमध्ये त्यांनी जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ आइनस्टाईन यांच्याशी शिक्षणाविषयी विचारांची देवाणघेवाण केली . जपानमध्ये त्यांनी महिला विद्यापीठाला भेट दिली. आणि सर्व वेळ त्यांच्या संस्थांसाठी निधी गोळा करण्याचे काम चालू होते. त्या दौऱ्यात त्यांच्या प्रवासाचा सर्व खर्च भागवल्यानंतर त्यांच्या संस्थांकडे सुमारे पंधरा हजार रुपये शिल्लक होते.
त्यानी आफ्रिकन खंडातील देशांचा दौरा करून आपल्या संस्थांसाठी चौतीस हजार रुपये जमा केले.
ऐंशीव्या वर्षी एक नवा उपक्रम कर्वे परदेश दौऱ्यावरून परतल्यानंतर तीन-चार वर्षांतच ठाकरसे ट्रस्टने महिला विद्यापीठाचे व्यवस्थापन हाती घेतले. कर्वेंना पुरेशी फुरसत होती. ते तेव्हा अठ्ठ्याहत्तर वर्षांचा होता ज्या वयात माणूस विश्रांती घेतो. पण कर्वे यांचा जनसेवेचा उत्साह कमी झाला नव्हता. मुलांच्या शिक्षणाकडे त्यांनी लक्ष वळवले. महाराष्ट्रातील असंख्य गावांमध्ये प्राथमिक शाळा नव्हत्या. गावोगावी शाळा सुरू करण्यासाठी संघटित प्रयत्न करण्याचा त्यांनी निर्धार केला. यासाठी त्यांनी ‘प्राथमिक एज्युकेशन सोसायटी’ची स्थापना केली.
1948 मध्ये सरकारने स्वतः शाळा ताब्यात घेईपर्यंत कर्वे शाळा चालवत होते.
स्त्री-पुरुष असा भेद नाही; सर्व समान आहेत. कर्वेंना ही वृत्ती सर्व लोकांमध्ये रुजवायची होती. म्हणून त्यांनी ‘सोसायटी फॉर द प्रमोशन ऑफ इक्वॅलिटी’ सुरू केली. तेंव्हा ते छप्पन वर्षांचे होते. सर्व मानवांच्या समानतेचा धडा घराघरात पोहोचवण्यासाठी कर्वे यांनी देशभर दौरे केले.
एस.एन.डी.टी विद्यापीठाची स्थापना
श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ (एसएनडीटी विद्यापीठ) हे भारतातील एक महिला विद्यापीठ असून याची स्थापना महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी केली. हे भारतातील पहिले महिला विद्यापीठ आहे. एसएनडीटीची स्थापना मूलतः पुण्यातली असली तरी त्याचे स्थलांतर मुंबईस होऊन तिथेच खऱ्या विस्ताराला सुरुवात झाली. या विद्यापीठाशी संबंधित सगळी महाविद्यालये ‘एसएनडीटी कॉलेज’ म्हणून ओळखली जाऊ लागली.
डिसेंबर, इ.स. १९१५ साली धोंडो केशव कर्वे यांनी इंडियन सोशल काँग्रेसच्या अध्यक्षीय भाषणातून महिला विद्यापीठाची कल्पना सर्वप्रथम मांडली. ३ जून, इ.स. १९१६ रोजी विद्यापीठाची औपचारिक स्थापना झाली. पाच विद्यार्थिनींचा पहिला वर्ग ५ जुलै, इ.स. १९१६ रोजी सुरू होऊन विद्यापीठाच्या कामाला आरंभ झाला. इ.स. १९१६ साली या विद्यापीठाची स्थापना भारतवर्षीय महिला विद्यापीठ (इंडियन विमेन्स युनिव्हर्सिटी) या नावाने झाली. मुंबईचे प्रसिद्ध उद्योगपती सर विठ्ठलदास ठाकरसींनी या विद्यापीठाला १५ लाख रुपयांची देणगी दिल्यानंतर विद्यापीठाला त्यांच्या आईचे नाव देण्यात आले. १९२० साली विद्यापीठाचे नाव “श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ” असे झाले.
त्या काळामध्ये महर्षी कर्वे यांचे वय अवघे सत्तर वर्ष होते. परंतु, तरीही त्यांनी हार न मानता म्हातारपणीच्या काळामध्ये सुद्धा विद्यापीठाच्या निधीसाठी युरोप अमेरिका तसेच आफ्रिकेमध्ये दौरा केला.
विद्यापीठातर्फे सुरुवातीला जी.ए. आणि पी.ए. अशा दोन पदव्या दिल्या जात असत. इ.स. १९५१ साली या विद्यापीठाला महाराष्ट्र सरकारची मान्यता मिळाली. इ.स. १९९४च्या महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यात एक वेगळे कलम (क्रमांक १०५) केवळ श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठासाठी आहे. या विद्यापीठास महाराष्ट्रात तसेच इतर कोणत्याही राज्यात आणि केंद्रशासित प्रदेशात महाविद्यालये संलग्नित करता येतात.
महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण समितीची स्थापना
महाराष्ट्रामध्ये स्त्री शिक्षणाचा मोठ्या प्रमाणावर महर्षी कर्वे यांनी प्रचार सुरू केला. महर्षी कर्वे यांचे वय आता ७८ वर्षे झाले होते. परंतु, त्यांना विश्रांती घेण्याऐवजी देशाच्या सेवेसाठी व स्त्री शिक्षणासाठी झटत राहायचे होते. यासाठी त्यांनी त्यांच्या गावामध्ये शिक्षणाचा प्रसार करण्यास सुरुवात केली. यादरम्याने १९३६ मध्ये महर्षी कर्वे यांनी “महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण समितीची” स्थापना केली.
ज्या गावांमध्ये शाळा उपलब्ध नाहीत व मुलांना शिक्षण घेणे शक्य नाही अशा गावांमध्ये लोकांना शिक्षण प्रदान करण्यासाठी, त्यांनी शाळा उघडणे हा मुख्य उद्देश बनवला. त्यावेळी त्यांनी स्वतःची एक शाळा उघडली व त्यांच्या मासिक ७० रुपये पेन्शन मधून पंधरा रुपये या शाळेला देण्यास त्यांनी सुरुवात केली. हळूहळू अशा चाळीस शाळा महर्षी कर्वे यांनी सुरू केल्या.
स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर, महर्षी कर्वे यांनी राज्य सरकारच्या ताब्यामध्ये हे काम सोपवले. महर्षी कर्वे यांनी त्यांनी स्थापन केलेल्या संस्थांसाठी लाखो रुपये जमा केले.
महर्षी धोंडो केशव कर्वे यांना मिळालेले पुरस्कार
- महर्षी कर्वे यांची कीर्ती संपूर्ण देशभर पसरली. १९४२ मध्ये वाराणसी हिंदू विद्यापीठाने महर्षी कर्वे यांना “डी. लिट.” पदवी देऊन सन्मानित केले.
- १९५१ मध्ये पुणे विद्यापीठाने त्यांना “डि. लीट” हा सन्मान दिला.
- १९५४ मध्ये महर्षी कर्वे यांना महिला विद्यापीठाने “डि. लीट” ही पदवी देऊन गौरविले.
- १९५५ च्या दरम्यान भारत सरकारने महर्षी कर्वे यांना “पद्म विभूषण” पुरस्कार देऊन सन्मानित केले.
- १९५७ च्या दरम्यान महर्षी कर्वे यांनी शंभर वर्ष पूर्ण केली. त्यानंतर त्यांना मुंबई विद्यापीठाने “एल् एल् डी ” ही पदवी देऊन सन्मानित केले.
- १९५८ मध्ये भारताच्या राष्ट्रपतींनी महर्षी कर्वे यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान पुरस्कार “भारतरत्न” देऊन सन्मानित केले.
- त्यांच्या सन्मानार्थ, पुण्यातील कर्वेनगरचे नाव त्यांच्या नावावर ठेवण्यात आले आणि मुंबई (बॉम्बे) येथील क्वीन्स रोडचे नाव महर्षी कर्वे रोड असे ठेवण्यात आले.
- त्यांच्या जन्मशताब्दीच्या स्मरणार्थ 1958 मध्ये भारत सरकारने तिकीट जारी केले होते. स्वतंत्र भारतात पहिल्यांदाच या तिकिटांमध्ये जिवंत व्यक्ती दाखवण्यात आली होती.
महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्याबद्दल माहितीपट आणि चित्रपट
1972 मध्ये प्रकाशित झालेले वसंत कानेटकर लिखित हिमालयाची सावली हे नाटक कर्वे यांच्या जीवनावर आधारित आहे. या नाटकातील नानासाहेब भानूचे पात्र हे 19 व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि 20 व्या शतकाच्या सुरुवातीच्या कर्वे आणि इतर मराठी समाजसुधारकांवर आधारित एक संमिश्र पात्र आहे.
द स्टोरी ऑफ डॉ. कर्वे हा नील गोखले आणि राम गबाले यांनी दिग्दर्शित केलेला 1958 चा माहितीपट आहे . भारत सरकारच्या फिल्म्स डिव्हिजनने त्याची निर्मिती केली होती .
कर्वे यांचे पुत्र रघुनाथ यांच्या जीवनावर आधारित अमोल पालेकर यांचा 2001 चा ध्यासपर्व हा चित्रपट देखील कर्वे कुटुंब आणि त्यांच्या सामाजिक सुधारणा प्रकल्पांचे चित्रण करतो.
तालुका दापोली या संशोधनावर आधारित उपक्रमाने 2017 मध्ये महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या जीवनावर माहितीपट बनवला.
महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे विचार
“सामाजिक मतभेद दूर करण्यासाठी आणि सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी धैर्याने पुढे जा.”
“जर स्वराज्य संकल्पना कल्याणकारी राज्याकडे नेणारी असेल, तर त्याचा एक ‘मंत्र’ आहे – एक मंत्र जो आपल्या प्राचीन लेखनात घोषित केलेला आहे, तो मंत्र म्हणजे सर्वांच्या भल्याचा विचार करणे.
“जिथे इच्छा आहे तेथे मार्ग आहे ”
“महिलांच्या उद्धारा शिवाय समाजाची उन्नती शक्य नाही.”
महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा मृत्यू
दिनांक ०९ नोव्हेंबर १९६२ रोजी वयाच्या तब्बल १०४ व्या वर्षी भारताच्या महान समाजसुधारकाने अखेरचा श्वास घेतला.
FAQ
१. महर्षी कर्वे यांच्या पहिल्या पत्नीचे नाव काय?
महर्षी कर्वे यांचा विवाह वयाच्या पंधराव्या वर्षी राधाबाई यांच्या सोबत झाला. बी.ए.चे ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर, महर्षी कर्वे यांची पत्नी व मुलगा त्यांच्यासोबत एकत्र राहू लागले.एकदा मुंबईमध्ये राधाबाईची प्रकृती बिघडू लागली, त्यामुळे त्यांनी त्यांच्या पत्नीला गावी पाठवले. १८९१मध्ये त्यांना पत्नीच्या निधनाचे पत्र प्राप्त झाले.
२. अनाथ बालिकाश्रम ची स्थापना कधी झाली?
विधवांना पुन्हा लग्न करणे मान्य नव्हते, त्यांना शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहून, सन्मानाने जीवन जगायचे होते. या गोष्टीची जाणीव ठेवून, महर्षी कर्वे यांनी १८९६ मध्ये “अनाथ बालिकाश्रम असोसिएशनची” स्थापना केली.
महर्षी कर्वे यांनी कोणत्या विद्यापीठाची स्थापना केली
श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ (एसएनडीटी विद्यापीठ) हे भारतातील एक महिला विद्यापीठ असून याची स्थापना महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी केली. हे भारतातील पहिले महिला विद्यापीठ आहे. एसएनडीटीची स्थापना मूलतः पुण्यातली असली तरी त्याचे स्थलांतर मुंबईस होऊन तिथेच खऱ्या विस्ताराला सुरुवात झाली. या विद्यापीठाशी संबंधित सगळी महाविद्यालये ‘एसएनडीटी कॉलेज’ म्हणून ओळखली जाऊ लागली.
निष्कर्ष
मित्रहो आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास महान समाजसुधारक महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या बद्दल माहिती दिली आहे. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. लेख आवडल्यास तुमच्या इतर मित्रपरिवारांसोबत नक्की शेयर करा. धन्यवाद.