अब्राहम लिंकन बायोग्राफी मराठी | Abraham Lincoln Information In Marathi – अब्राहम लिंकन हे अमेरिकेमधील १६ वे राष्ट्राध्यक्ष होऊन गेले. त्यांनी त्यांच्या आयुष्यामधील “५ वर्ष” १८६१ ते १८६५ हा कार्यकाळ अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून भूषविला. अमेरिकेमधील लोकांना गुलामगिरी मधून त्यांनी मुक्त केले. जात-पंथ, गोरे-काळे यामध्ये त्यांनी अजिबात भेदभाव न करता सगळ्यांमध्ये समानतेची धारणा त्यांनी रुजवली.
अब्राहम लिंकन यांचा जन्म एका गरीब कुटुंबामध्ये, कृष्णवर्णीय परिवारामध्ये झाला. लिंकन ज्यावेळी अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून निवडून आलेत, त्यावेळी ते पहिले रिपब्लिकन होते. या अध्यक्षपदाच्या नियुक्तीपूर्वी, लिंकन हे वकील, इलिनॉय राज्याचे आमदार तसेच युएसए हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हचे सदस्य म्हणून कार्यरत होते.
लिंकन यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये हिमतीने व धाडसाने अमेरिकेच्या सर्वात मोठ्या लढाईमध्ये यश प्राप्त केले. ते एक प्रामाणिक व स्वच्छ मनाचे व्यक्तिमत्व होते, ज्यांनी कधीच कोणाला दुःख दिले नाही.
आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास या महान व्यक्तिमत्वाबद्दल या लेखाद्वारे माहिती दिली आहे. अब्राहम लिंकन यांची माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत संपूर्ण वाचा.
अब्राहम लिंकन बायोग्राफी | Abraham Lincoln Information In Marathi
मूळ नाव | अब्राहम थॉमस लिंकन |
जन्म तारीख | १२ फेब्रुवारी १८०९ |
जन्म स्थळ | होड्जेंविल्ले केंटुकी (अमेरिका) |
व्यवसाय | वकील |
राष्ट्रीयत्व | अमेरिकन |
ओळख | अमेरिकेचे 16 वे राष्ट्राध्यक्ष |
मृत्यू | १५ एप्रिल १८६५ |
कोण होते अब्राहम लिंकन ?
संपूर्ण जगामध्ये ज्यावेळी स्वातंत्र्य नव्हते, अशा काळात अमेरिकेतच नव्हे, तर जगभरामधील गुलामगिरी संपवण्यात अब्राहम लिंकन यांचे महत्त्वाचे योगदान आहे. अब्राहम लिंकन यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये प्रचंड संघर्ष करून, अमेरिकेला गुलामगिरी मधून मुक्त केले. त्यांच्या इतके महान कार्य हे फक्त अब्राहम लिंकनच करू शकतात. अब्राहम लिंकन हे युनायटेड स्टेट्सचे म्हणजेच अमेरिकेचे १६ वे राष्ट्राध्यक्ष होते. ज्यांनी दि.०४ मार्च १८६१ रोजी त्यांनी त्यांच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली.
अब्राहम लिंकन हे अमेरिकेचे १६ वे राष्ट्राध्यक्ष बनणारे, पहिले रिपब्लिकन होते. अमेरिकेमधील सर्वात लोकप्रिय अध्यक्षांपैकी एक म्हणून लिंकन यांच्याकडे पाहिले जाते. त्यांच्या प्रेरणादायी विचारांमुळे व त्यांच्या संघर्षमय जीवनासाठी त्यांची प्रचिती संपूर्ण विश्वात आहे. दि. १५ एप्रिल १८६५ रोजी लिंकन यांचे निधन झाले.
- नक्की वाचा 👉👉 सर्वपल्ली राधाकृष्णन माहिती मराठी
- नक्की वाचा 👉👉 डॉ. एपीजे अब्दुल कलाम माहिती मराठी
अब्राहम लिंकन यांचा जन्म व सुरुवातीचे जीवन
लिंकन यांचा जन्म दि. १२ फेब्रुवारी १८०९ रोजी अमेरिकेच्या केंटकी राज्यातील हार्डिंग काउंटिंग नावाच्या शहरांमध्ये झाला. अब्राहम लिंकन यांच्या वडिलांचे नाव थॉमस लिंकन, तर आईचे नाव नॅन्सी लिंकन असे होते. त्यांना एक मोठी बहीण सुद्धा होती. जिथे नाव सारा लिंकन असे होते. लिंकनच्या परिवाराची आर्थिक परिस्थिती ही हालाखीची होती. पूर्ण कुटुंब लाकडी घरामध्ये राहत असे. थॉमस लिंकन हे एक शेतकरी होते. तसेच ते सुतार म्हणून सुद्धा काम करत असत.
१८११ मध्ये लिंकन घरापासून लांब १३ किलोमीटर अंतरावर राहू लागले. ज्या ठिकाणी ते शेतीसाठी योग्य कामे करत असत. परंतु जमिनीच्या वादामुळे, अब्राहम लिंकन यांना ती जागा सोडून स्थलांतरित व्हावे लागले. यानंतर १८१६ मध्ये लिंकनचे कुटुंब भारतामधील एका नदीच्या काठावर स्थायिक झाले. त्या ठिकाणी घनदाट जंगलामध्ये शेती करून उपजीविका करू लागले.
अब्राहम लिंकन यांचे शिक्षण
लिंकन हे वयाच्या सहाव्या वर्षी शाळेमध्ये शिकण्यासाठी जाऊ लागले. ते अभ्यासामध्ये प्रचंड हुशार होते. परंतु त्यांना काम करायला अजिबात आवडत नसे, त्यामुळे शेजारील मुलं त्यांना आळशी म्हणत. घरची परिस्थिती हालाखीची असल्याकारणामुळे, लिंकन यांना वडिलांसोबत शेतामध्ये मदत करावी लागत असे. त्यांच्या वडिलांनासुद्धा लिंकनने अभ्यास करावा असे कधी वाटलेच नाही.
त्यामुळे अब्राहमला काही दिवसांमध्येच शालेय शिक्षण सोडावे लागले. प्राथमिक शिक्षण हे अब्राहमने कोणत्याही शाळेपेक्षा प्रवासी शिक्षकाकडून घेतले. त्यामुळे लिंकन यांना फार कमी वेळामध्ये खूप काही शिकता आले नाही, त्या काळात ते इतरांकडून पुस्तके उधार घेऊन वेळ मिळेल तेव्हा अभ्यास करत असत.
लिंकन यांची कौटुंबिक माहिती
नाव | अब्राहम लिंकन |
आईचे नाव | नॅन्सी |
वडिलांचे नाव | थॉमस लिंकन |
पत्नी | मेरी टॉड |
अपत्य | रॉबर्ट, एडवर्ड, विली आणि टेड |
अब्राहम आणि सावत्र आई
दि. ०५ ऑक्टोंबर १८१८ हा दिवस लिंकन यांच्या आयुष्यामधील खूप कठीण काळ होता. त्यावेळी त्यांच्या आईने अखेरचा श्वास घेतला. त्या वेळी अब्राहम लिंकनचे वय हे अवघे नऊ वर्ष होते. तेव्हा त्याने त्यांची आई गमावली. आईच्या मृत्यूनंतर घरची संपूर्ण जबाबदारी अब्राहमची बहिण सारा लिंकन हिच्यावर आली. त्यावेळी साराचे वय हे अवघ्या अकरा वर्षाचे होते.
घरची हलाखीची परिस्थिती पाहून, लिंकन यांचे वडील थॉमस लिंकन याने एका वर्षानंतर सेरा बुश जॉन्स्टन या तीन मुलांच्या विधवेबरोबर दुसरे लग्न केले. सेरा हिने अब्राहम व बहीण सारा लिंकनला अगदी सख्या आईसारखे प्रेम दिले व शिक्षणात सुद्धा तिने त्यांना पूर्ण मदत केली.
अब्राहम यांना सावत्र आईचा प्रचंड आदर होता. अब्राहम ज्यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले, त्यावेळी त्यांनी एका मुलाखतीमध्ये म्हटले की, आज मी जो काही आहे, त्याचे संपूर्ण श्रेय मी माझ्या आईला देतो.
लिंकनची वकिली आणि अभ्यास
- १८३० मध्ये अब्राहम लिंकन यांनी त्यांच्या कुटुंबासमवेत मॅकॉन काऊंटी मध्ये राहण्यासाठी गेले. त्यावेळी अब्राहम चे वय हे २२ वर्ष होते. त्या ठिकाणी जाऊन, त्यांनी मजूर म्हणून काम केले. अब्राहम लिंकन यांच्या शरीराची बांधणी ही, अतिशय मजबूत होती. त्यावेळी त्यांनी वॉचमन, दुकानदार, इत्यादी. लहान-मोठ्या नोकऱ्या केल्या. त्यांनी शेवटी स्वतःचे जनरल स्टोअर उघडले. हे सर्व काही वर्षे चालूच होते. १८३७ मध्ये अब्राहम लिंकन यांनी राजकारणामध्ये पहिले पाऊल टाकले. तेव्हा त्यांनी व्हिग पक्षाचा नेता बनण्यास स्वीकृती दर्शविली व अब्राहम लिंकन यांनी अनेक निवडणुका लढवल्या. मात्र आर्थिक विकासाचा अभाव व गरिबीमुळे न्याय न मिळाल्यामुळे, त्यांनी वकिली होण्याचा निर्णय घेतला व कायद्याचा अभ्यास चालू केला.
- १८४४ मध्ये लिंकन यांनी विल्यम हरंडन यांच्याकडून वकिलीचे प्रशिक्षण घेतले व काही काळानंतर बाकीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर, ते वकील झाले. वकिली मधून त्यांना तितकेसे पैसे प्राप्त होत नव्हते. परंतु, या व्यवसायातून त्यांना मानसिक शांती व समाधान प्राप्त झाले. ज्या समाधानासमोर त्यांना संपत्तीची हाव नव्हती. ते त्यांच्या कामामध्ये अत्यंत प्रामाणिक होते.
- वकिलीचा व्यवसाय करताना, अब्राहम लिंकन यांनी गरीब लोकांकडून जास्त पैसे घेतले नाही. एकदा एका केस मध्ये, त्यांचा क्लायंटने त्यांना २५००० डॉलर्स दिले, पण लिंकन यांनी १०००० डॉलर्स परत केले. त्यांनी केस फक्त पंधरा हजार डॉलरची आहे, असे सांगितले.
- तसेच एकदा एका महिलेने केस जिंकल्यानंतर, तिच्या वकीलने तिच्याकडून जास्त पैसे घेतले. परंतु, अब्राहम यांनी ते पैसे त्या महिलेस परत करण्यास सांगितले. या उदाहरणावरून असे दिसून येते की, अब्राहम लिंकन हे एक प्रामाणिक व प्रेमळ व्यक्तिमत्व होते. लिंकन असे म्हणतात, “जेव्हा कोणी चांगले करतो. तेव्हा त्याला चांगले वाटते आणि जेव्हा कोणी वाईट करतो तेव्हा त्याला वाईट वाटते.”
अब्राहम यांची राजकीय कारकीर्द
१८३७ मध्ये अब्राहम यांनी राजकारणामध्ये पाऊल टाकले. यानंतर त्यांनी पुन्हा १८५४ मध्ये राजकारणात प्रवेश केला. राजकारणामध्ये त्यांनी अनेक निवडणूका लढवल्या. त्यावेळी लिंकन व्हिग पार्टी सोबत निवडणुका लढवत होते. परंतु काही काळानंतर हा पक्ष संपुष्टात आला. १८५६ मध्ये न्यू रिपब्लिकन चे सदस्यत्व अब्राहम लिंकन यांनी भूषवले. या नव्या पक्षामध्ये लिंकन हे अत्यंत सक्षम नेते असल्याचे त्यांनी सिद्ध केले. त्यामुळे ते उपराष्ट्रपती पदासाठी उभे राहिले, परंतु त्यांना फारच कमी मते प्राप्त झाली. त्यामुळे निवडणुकांमध्ये त्यांचा पराभव झाला.
लिंकन यांचे व्यक्तिमत्व लोकांना प्रचंड भावले, याचे कारण, लिंकन यांनी देशामधील गुलामगिरीची प्रथा संपवण्यासाठी प्रचंड संघर्ष केला. ते एका भाषणामध्ये असे म्हणाले की, “राष्ट्राचे विभाजन होऊ शकत नाही. कोणीही गुलामी मध्ये राहणार नाही. सर्व एकत्र राहतील.” लिंकन यांचे हे भाषण एकून त्यांची अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवड करण्यात आली.
लिंकन यांची लव्ह स्टोरी
वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी अब्राहम एका मुलीच्या प्रेमामध्ये पडले. ज्या मुलीचे नाव Ann Rutledge असे होते. परंतु दुर्दैवाने काही दिवसांनी त्यांची मैत्रीण गंभीर आजारामुळे मरण पावली.
रुटलेजच्या मृत्यूनंतर एक वर्षानंतर, लिंकनने मेरी ओवेन्ससोबत अर्धहृदयी प्रेमसंबंध सुरू केले, ज्याने शेवटी असा निष्कर्ष काढला की, लिंकन “स्त्रींच्या आनंदाची साखळी बनवणाऱ्या छोट्याशा दुव्यांमध्ये कमतरता आहे.” म्हणून तिने त्याचा प्रस्ताव नाकारला.
अब्राहम लिंकन यांचे लग्न आणि मुले
Ann Rutledge हिच्या मृत्यूनंतर आणि मेरी ओवेल्स हिने त्यांचा लग्नाचा प्रस्ताव नाकारल्यानंतर लिंकनच्या आयुष्यातील पहिले आणि एकमेव खरे प्रेम होते, मेरी टोड. ती उत्साही, चपळ आणि सुशिक्षित होती. एका केंटकी कुटुंबातून आली होती. तिचे नातेवाईक हे शहरातील सामाजिक अभिजात वर्गातील होते.
त्यांच्यापैकीच काहींनी अब्राहम सोबतच्या सहवासाबद्दल शंका निर्माण केली आणि तो तिला आनंदी करू शकेल की नाही, असे तिच्या मनात निर्माण करून दिले. तरीही दोघांमध्ये समेट होऊन चार नोव्हेंबर 1842 रोजी त्यांनी लग्न केले. लग्नानंतर त्यांना चार मुले झाली.
- रॉबर्ट लिंकन – एक ऑगस्ट 1843 ते 26 जुलै 1926
- एडवर्ड बेकर लिंकन – 10 मार्च १८४६ ते 1 फेब्रुवारी 1850
- विल्यम लिंकन – 21 डिसेंबर 1850 ते 20 फेब्रुवारी 1862
- थॉमस लिंकन – 4 एप्रिल 1853 ते 16 जुलै १८७१
लिंकनचा अखेरचा वंशज म्हणजेच त्यांचा पणतू रॉबर्ट बेकवीथ हा 24 डिसेंबर 1985 रोजी मरण पावला.
लिंकन यांचे करियर आणि जीवन संघर्ष
अब्राहमच्या वडिलांना अब्राहमने अभ्यास करावा असे वाटत नव्हते. त्यामुळे, स्वतःचा उदार निर्वाह करण्यासाठी अब्राहम लिंकन यांनी शेतीसोबत बोटी चालवण्याचा व्यवसाय सुद्धा चालू केला. सामानाचे दळणवळण करून घेण्यासाठी त्यांनी बोटीचा व्यवसाय चालू केला होता. तसेच ते लोकांच्या शेतामध्ये सुद्धा काम करायला जात असत.
काही काळानंतर अब्राहम यांनी एक जनरल स्टोअर मध्ये नोकरी केली. त्या ठिकाणी लिंकन यांना अभ्यासासाठी थोडा वेळ मिळत असे. तेथे राहूनच लिंकन यांनी कोणत्याही प्रकारचे महाविद्यालयीन शिक्षण न घेता, स्वतः कायद्याचे शिक्षण सुरू केले. कायद्याचे शिक्षण घेत असते वेळी, त्यांना समजले की नदीच्या पलीकडे असलेल्या गावामध्ये एक निवृत्त न्यायाधीश राहत आहेत व त्यांच्याजवळ कायद्याची पुस्तके वाचण्यासाठी त्यांना मिळू शकतात.
लिंकन यांना पुस्तके वाचण्यासाठी काम करावे लागले
लिंकन यांनी त्या न्यायाधीशाला भेटण्याचा व त्यांच्या जवळील असलेल्या कायद्याची पुस्तके वाचण्याचा निर्णय घेतला. त्या दिवसांमध्ये कडाक्याची थंडी होती. परंतु अब्राहम यांनी शिक्षणाच्या काळजीपोटी कोणतीही काळजी न करता स्वतःची बोट त्या बर्फाळ नदी मधून गावा पलीकडे नेण्यास सुरुवात केली.
थोडा अंतरावर गेल्यावर, बर्फाच्या तुकड्यांना त्यांची बोट आदळली व ती बोट तिथेच तुटली. परंतु अब्राहम यांनी हार न मानता नदी ओलांडून न्यायाधीशाच्या, घरी पोहोचले व त्या न्यायाधीशांकडून त्यांची कायद्याची पुस्तके वाचण्याची त्यांनी विनंती केली.
अब्राहम यांचे समर्पण पाहून, न्यायाधीशाने त्यांना सर्व पुस्तके वाचण्याची परवानगी दिली. त्यावेळी न्यायाधीशांच्या घरी काम करणारा नोकर, हा रजेवर असल्या कारणाने, अब्राहम यांना न्यायाधीश आणि स्वतःच्या घरी राहण्यास व काम करण्यास सांगितले. अब्राहम अतिशय आनंदीत झाले. अब्राहम त्या निवृत्त न्यायाधीशाचे आवश्यक तेवढे काम करीत, त्या बदल्यात अब्राहम त्यांची आवडीची पुस्तके वाचत असत.
अब्राहम लिंकन यांचे अपयश
- ०५ ऑक्टोंबर १८१८ हा दिवस लिंकन यांच्या आयुष्यामधील खूप कठीण काळ होता. त्यावेळी त्यांच्या आईने अखेरचा श्वास घेतला. त्या वेळी अब्राहम लिंकनचे वय हे अवघे नऊ वर्ष होते.
- लिंकन 31 व्या वर्षी ते Business मध्ये fail झाले.
- 32 व्या वर्षी ते state legislator चे निवडणुक हरले.
- 33 व्या वर्षी त्यांनी नवे business try केलं, आणि परत त्यात fail झाले.
- 35 व्या वर्षी त्यांचा प्रेयसीचे निधन झाले.
- 36 व्या वर्षी त्यांचं nervous break-down झालं.
- 43 व्या वर्षी त्यांनी अमेरिकन कांग्रेस साठी निवडणूक लढवल पण त्यातही त्यांचा पराभव झाला.
- 48 व्या वर्षी त्यांनी परत त्याच पदासाठी निवडणूक लढवून पुनप्रयत्न केला त्या वेळीही त्यांना पराभवच आला.
- 55 व्या वर्षी त्यांनी Senate साठी निवडणूक लढवली परत त्यात देखील पराभव.
- 56 वर्षी त्यांनी अमेरिकेच्या Vice President पदासाठी निवडणूक लढवली आणि तेही हरले.
- या नंतर परत senate साठी झालेल्या निवडणूकीत देखील त्यांचा पराभव झाला.
- एवढे अपयश सहन करून सामान्य मानूस निराश होऊन प्रयत्नच करणे सोडून दिले असते. पण लिंकन या असामान्य माणसाने परत एकदा प्रयत्न करायचे ठरवले.
- 1860 मध्ये झालेल्या अमेरिकन president पदासाठी त्यांनी पुन निवडणूक लढवली आणि या वेळी मात्र त्यांना यश मिळालं.
- जवळपास 30 वर्षे फक्त आणि फक्त अपयश झेलून वयाचा 59 व्या वर्षी अब्राहम लिंकन हे अमेरिकेचे 16 वे राष्ट्रपती बनले.
अब्राहम लिंकन – अमेरिकेचे १६ राष्ट्राध्यक्ष
१९६० मध्ये लिंकन यांना अमेरिकेचे सोळावे राष्ट्राध्यक्ष म्हणून नियुक्त केले गेले. राष्ट्राध्यक्ष म्हणून अमेरिकेला गुलामगिरीच्या प्रथेमधून मुक्त करण्यासाठी अब्राहम यांनी संघर्ष केला. दक्षिणेकडील आणि उत्तरेकडील राज्यांमध्ये, गुलामगिरीची प्रथा ही चालूच होती. दक्षिणेकडील राज्यांमधील गोरे रहिवाशी उत्तरेकडे राज्यातील रहिवाशांना शेतीसाठी बोलवत व त्यांना गुलामासारखे राबवत. म्हणून, लिंकन यांनी ही प्रथा संपवण्याचा निर्णय घेतला.
दि. ०१ फेब्रुवारी १८६१ मध्ये ते फ्लोरिडा, अलाबामा, जॉर्जियाना, इत्यादी. आपापसामधून वेगळे झाले व त्यांच्यामध्ये गृहयुद्ध सुरू झाले. अब्राहम लिंकन यांनी देशासाठी निर्मूलनवादी चळवळीचे नेतृत्व करण्याचे वचन दिले व या वचनामध्ये ते यशस्वी सुद्धा झाले. शेवटी १८६३ मध्ये गुलामगिरीच्या मुक्तीची घोषणा करण्यात आली आणि गुलामांच्या स्वातंत्र्यासाठी कागदपत्रे राज्यांमध्ये बनवण्यात आली. परंतु मिसुरी, कॅन्सस, नेब्रासका येथील गुलामांना कायदेशीर निर्बंधामुळे स्वातंत्र्य प्राप्त झाले नाही.
अब्राहम लिंकन आणि गृहयुद्ध
अमेरिकेमध्ये उत्तरेकडील राज्ये व दक्षिणेकडील राज्यांमध्ये गृहयुद्ध सुरू झाले. हे युद्ध गुलामगिरीची प्रथा संपुष्टात आणण्यासाठी चालू होते. दक्षिणेकडे राज्यामधील गोऱ्या लोक, उत्तरेकडील राज्यामधील कृष्णवनीय लोकांना शेतीसाठी बोलवून, अतिशय गुलामासारखे काम करून घेत असत.
दक्षिणेकडील राज्याला स्वतःचा एक स्वतंत्र देश निर्माण करायचा होता. तर उत्तरेकडील राज्याला गुलामी संपवून एकजुटीने राहण्याची इच्छा होती. या दोन्ही राज्यांमध्ये गृहयुद्ध सुरू झाले. १९६१ ते १९६५ पर्यंत हे गृहयुद्ध सुरू होते. या युद्धामध्ये उत्तरेकडील राज्य जिंकले.
गृहयुद्ध फक्त गुलामगिरी संपवण्याच्या हेतूने झाले असले तरी, या युद्धाचे कारण वेगवेगळ्या विचारसरणीच्या विरोधांवर आधारित होते. दक्षिणेकडे राज्यांना सतराव्या- अठराव्या शतकामधुन शेती करण्यासाठी आलेल्या गुलामांना कायमस्वरूपी गुलाम बनवून काम करून घ्यायचे होते, तर उत्तरेकडील राज्यांनी १८०१ मध्ये गुलामगिरीच्या प्रथेविरुद्ध कायदे निर्माण करायचे होते.
लिंकनच्या हत्येने अमेरिका हादरली
दि.१४ एप्रिल १८६५ हा दिवस, या दिवशी गृहयुद्ध संपल्याच्या निमित्ताने गुड फ्रायडे साजरा करण्यात आला. यावेळी अमेरिकेचे सोळावे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन वॉशिंग्टन डीसी येथील फोर्ड थियटर मध्ये गेले होते. त्यावेळी अभिनेता जॉन विलकलिज बूथने लिंकनवर गोळी झाडली. जॉनला वाटले की, अब्राहम लिंकन हे दक्षिण राज्याला मदत करत आहे. या कारणास्तव त्याने अब्राहम लिंकन वर गोळी झाडून त्यांची हत्या केली.
अब्राहम लिंकन यांचे निधन
अब्राहम लिंकन यांच्यावर जॉन बुध याने दि. १४ एप्रिल १८६५ रोजी गोळी झाडली. त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच दि. १५ एप्रिल १८६५ रोजी सकाळी अब्राहम लिंकन यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या ५६ व्या वर्षी आब्राहम लिंकन यांनी जगाचा निरोप घेतला.
अब्राहम लिंकन – द व्हॅम्पायर हंटर
अब्राहम लिंकन यांच्या जीवनावर आधारित व्हॅम्पायर हंटर नावाचा चित्रपट आला होता. हा चित्रपट काल्पनिक होता. व्हॅम्पायर म्हणजे वटवाघुळांचा राजा किंवा वटवाघूळ. असे म्हटले जाते की, अब्राहम लिंकन यांनी लिहिलेल्या कादंबरीवर आधारित हा चित्रपट बनवला गेला आहे. या चित्रपटांमध्ये अब्राहम लिंकन व्हॅम्पायरशी लढताना दाखवले आहे.
अब्राहम लिंकन यांच्यावरील मराठी पुस्तके
- गुलामगिरी मुक्त देशाचे स्वप्न पाहणारा अब्राहम लिंकन – जानवी बिदनुर
- अब्राहम लिंकन – ज्योत्स्ना चांदगुडे
- अब्राहम लिंकन – भा रा भागवत
- अब्राहम लिंकनच्या छान छान गोष्टी – बाबुराव शिंदे
- अब्राहम लिंकन – प्रदीप पंडित
- फाळणी टाळणारा महापुरुष अब्राहम लिंकन – वि ग कानिटकर
- अब्राहम लिंकन – लक्ष्मण सूर्यभान
- अब्राहम लिंकन चरित्र – बा ग पवार
- अब्राहम लिंकन – विजया ब्राह्मणकर
- अब्राहम लिंकन – स्मिता लिमये
- अब्राहम लिंकन – विनायक डंके
अब्राहम लिंकनचे मौल्यवान विचार
- आपले शत्रू ज्याचे शत्रू असतील तोच आपला खरा मित्र होय.
- स्त्री एक अशी गोष्ट आहे. ज्याला मी घाबरतो हे माहीती असून की ती मला काही इजा करणार नाही.
- लोकशाही म्हणजे लोकांनी, लोकांसाठी, लोकांनीच बनवलेल सरकार होय.
- मी आज जेही आहे किंवा होण्यासाठी आशावादी आहे त्याच श्रेय फक्त आईलाच देईन.
- नेहमी लक्षात ठेवा. तुमचे यशस्वी होण्याचे संकल्प हे कोणत्या ही इतर संकल्पा पेक्षा अधिक महत्वपुर्ण आहे.
- शत्रुना मित्र बनवुन, मी माझे शत्रु कमी किंवा नष्ट करत नाहीये का ?
- जर शांती हवी असेल तर प्रसिद्धि पासुन दूर रहा.
- जर कोणी मला झाड तोडायला 6 तास दिले तर त्यातले 4 तास मी कुऱ्हाडीला धार लावण्यासाठी खर्च करेन.
- तुम्ही उद्याची जबाबदारी आज टाळून सुटू शकत नाही.
- जवळजवळ सर्व पुरुष प्रतिकूल स्थितीत उभे राहू शकतात, परंतु जर तुम्हाला एखाद्या माणसाच्या चारित्र्याची परीक्षा घ्यायची असेल तर त्याला शक्ती द्या.
- प्रतीक्षा करणाऱ्यांकडे गोष्टी येऊ शकतात, परंतु घाई करणाऱ्यांकडे फक्त उरलेल्या गोष्टी असतात.
- आपण आपले पाय योग्य ठिकाणी ठेवले असल्याची खात्री करा, नंतर खंबीरपणे उभे रहा.
- शत्रूचा नाश करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्याला मित्र बनवणे.
- एक तरुण व्यक्तीला जीवनात पुढे जायचे असेल,तर प्रत्येक बाजुने त्याला स्वतःचा विकास करावा लागेल. आपल्याला कोणी मागे खेचेल का? हा विचार त्याच्या मनामध्ये येता कामा नये.
- जगातील कुठल्याही माणसांजवळ ऐवढी स्मरण शक्ती नाही की तो एक यशस्वी “खोट बोलणारा माणूस” बनेल.
- मी जिंकण्यासाठी बांधील नाही. पण मी चांगल आणि वाईट होण्यासाठी बांधील आहे.
- आपण काही वेळ लोकांना मूर्ख करू शकता, परंतु आपण सर्व वेळ लोकांना मूर्ख करू शकत नाही.
- बहुतेक लोक आनंदी असतात कारण ते त्यांचे मन तसे बनवतात.
- चारित्र्य हे झाडासारखे असते आणि प्रतिष्ठा सावलीसारखी असते. सावली, ज्याचा आपण विचार करतो, परंतु झाड हे वास्तविक आहे.
अब्राहम लिंकनचे हेडमास्तरांस पत्र – अब्राहम लिंकन पत्र मराठी
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचे सोळावे राष्ट्राध्यक्ष आणि उत्तम विचारवंत अब्राहम लिंकन होते. अब्राहम लिंकन यांची बरीच पत्र प्रसिद्ध आहेत, मात्र त्यांनी लेकाच्या शाळेच्या पहिल्या दिवशी हेडमास्तरांना पत्र लिहिलं होते. ते खालीलप्रमाणे –
प्रिय गुरुजी,
सगळीच माणसे न्यायप्रिय नसतात, नसतात सगळीच सत्यनिष्ठ, हे शिकेलच माझा मुलगा कधी ना कधी, मात्र त्याला हे देखील शिकवा – जगात प्रत्येक बदमाषगकणिक असतो एक साधुचरित पुरुषोत्तमही, स्वार्थी राजकारणी असतात. जगात तसे असतात, अवघं आयुष्य समर्पित करणारे नेतेही असतात, टपलेले वैरी तसे जपणारे मित्रही!
मला माहीत आहे. सगळ्या गोष्टी झटपट नाही शिकवता येत… तरीही जमलं तर त्याच्या मनावर ठसवा, घाम गाळून कमावलेला एकच छदाम आयत्या मिळालेल्या घबाडापेक्षा मौल्यवान आहे. हार कशी स्वीकारावी ते त्याला शिकवा, आणि शिकवा विजयाचा आनंद संयमांन घ्यायला !
तुमच्यात शक्ती असली तर त्याला द्वेषमत्सरापासून दूर रहायला शिकवा, शिकवा त्याला, आपला हर्ष संयमानं व्यक्त करायला. गुंडाना भीत जाऊ नको म्हणावं, त्यांना नमवणं सर्वांत सोपं असतं!
जमेल तेवढं दाखवीत चला त्याला ग्रंथभांडाराचं अद्भुत वैभव मात्र त्याबरोबरच, मिळू दे त्याच्या मनाला निवांतपणा सृष्टीचे शाश्वत सौंदर्य अनुभवायला. पाहू दे त्याला पक्ष्यांची अस्मान भरारी… सोनेरी उन्हात भिरभिरणारे भ्रमर… आणि हिरव्यागार डोंगर उतारावर डुलणारी चिमुकली फुलं!
शाळेत त्याला हा धडा मिळू दे, फसवून मिळालेल्या यशापेक्षा सरळ आलेले अपयश श्रेयस्कर आहे. आपल्या कल्पना, आपले विचार यांच्यावर दृढ विश्वास ठेवायला हवा त्याने बेहेत्तर आहे सर्वांनी त्याला चूक ठरवलं तरी!
त्याला सांगा, त्यांन भल्यांशी भलाईनं वागावं, आणि टग्यांना अद्दल घडवावी. त्याला हे पुरेपूर समजवा, की करावी कमाल कमाई त्याने ताकद आणि अक्कल विकून… पण कधीही विक्रय करू नये हृदयाचा आणि आत्म्याचा! धिक्कार करणार्यांच्या झुंडी आल्या तर कानाडोळा करायला शिकवा त्याला आणि ठसवा त्याच्या मनावर सत्य व न्यायासाठी पाय रोवून लढत रहा.
त्याला ममतेने वागवा पण लाडावून ठेवू नका. आणि हेही त्याला सांगा, ऐकावं जनांचं, अगदी सर्वांत…. पण गाळून घ्यावं ते सत्याच्या चाळणीतून आणि फोलपट टाकून निकं सत्व तेवढं स्वीकारावं.
आगती तावून सुलाखून निघाल्याशिवाय लोखंडाचं कणखर पोलाद होत नसतं. त्याच्या अंगी बाणवा, अधीर व्हायचं धैर्य, अन् धरला पाहिजे धीर त्यांन जर गाजवायचं असेल शौर्य!
आणखीही एक सांगत रहा त्याला, आपला दृढ विश्वास पाहिजे आपल्यावर तरच जडेल उदात्त श्रद्धा मानवजातीवर जमलं तर त्याच्या मनावर बिंबवा-हसत रहावं उरातलं दु:ख दाबून, आणि म्हणावं त्याला, आसू ढाळायची लाज वाटू देऊ नको त्याला शिकवा, तुच्छतावाद्यांना तुच्छ मानायला, अन चाटुगिरीपासून सावध रहायला. माफ करा गुरुजी! मी फार बोलतो आहे, खूप काही मागतो आहे… पण पहा… जमेल तेवढं अवश्य कराच!
माझा मुलगा भलताच गोड छोकरा आहे हो तो!!!
अब्राहम लिंकन माहिती व्हिडीओ
FAQ
१. अब्राहम लिंकन काळा होता का?
अब्राहम लिंक यांचा जन्म एका गरीब कुटुंबामध्ये, कृष्णवर्णीय परिवारामध्ये झाला.अमेरिकेमधील लोकांना गुलामगिरी मधून त्यांनी मुक्त केले. जात-पंत, गोरे-काळे, यामध्ये त्यांनी अजिबात भेदभाव न करता सगळ्यांमध्ये समानतेची धारणा त्यांनी रुजवली.
२. अमेरिकेचे १६ राष्ट्राध्यक्ष कोण आहेत?
१९६० मध्ये अब्राहम लिंकन यांना अमेरिकेचे सोळावे राष्ट्राध्यक्ष म्हणून नियुक्त केले गेले. राष्ट्राध्यक्ष म्हणून अमेरिकेला गुलामगिरीच्या प्रथेमधून मुक्त करण्यासाठी अब्राहम यांनी संघर्ष केला.
3. अब्राहम लिंकनचे सुरुवातीचे आयुष्य कसे होते?
१८११ मध्ये अब्राहम लिंकन घरापासून लांब १३ किलोमीटर अंतरावर राहू लागले. ज्या ठिकाणी ते शेतीसाठी योग्य कामे करत असत. परंतु जमिनीच्या वादामुळे, अब्राहम लिंकन यांना ती जागा सोडून स्थलांतरित व्हावे लागले. यानंतर १८१६ मध्ये लिंकनचे कुटुंब भारतामधील एका नदीच्या काठावर स्थायिक झाले. त्या ठिकाणी घनदाट जंगलामध्ये शेती करून उपजीविका करू लागले.
४. लिंकनला गुलामांना मुक्त करायचे होते का?
राष्ट्राध्यक्ष म्हणून अमेरिकेला गुलामगिरीच्या प्रथेमधून मुक्त करण्यासाठी अब्राहम यांनी संघर्ष केला. दक्षिणेकडील आणि उत्तरेकडील राज्यांमध्ये, गुलामगिरीची प्रथा ही चालूच होती. दक्षिणेकडील राज्यांमधील गोरे रहिवाशी उत्तरेकडे राज्यातील रहिवाशांना शेतीसाठी बोलवत व त्यांना गुलामासारखे राबवत. म्हणून, अब्राहम लिंकन यांनी ही प्रथा संपवण्याचा निर्णय घेतला.
निष्कर्ष
मित्रहो, आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणस अब्राहम लिंकन यांच्या बद्दल माहिती दिली आहे. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा लेख आवडल्यास तुमच्या इतर मित्रपरिवारांसोबत नक्की शेयर करा. धन्यवाद.