सानिया मिर्झा माहिती मराठी | Sania Mirza Information In Marathi – सानिया मिर्झा भारतामध्ये सर्वात प्रसिद्ध व यशस्वी महिला टेनिसपटू आहे. तिने आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पदके स्वतःच्या नावे करून घेतली. सानियाने देश व परदेशामध्ये भारताचे स्थान उंचावले आहे. तिने एकेरी तसेच दुहेरी या दोन्ही टेनिस खेळामध्ये, जगामधील सर्वोत्तम खेळाडू म्हणून स्थान प्राप्त केले आहे. सानियाने एकेरी व दुहेरी टेनिस स्पर्धा जिंकल्या व टेनिस मध्ये प्रसिद्धी प्राप्त केली. टेनिस मध्ये प्रसिद्धी मिळवण्यासोबतच, तिने ग्लॅमरच्या जगामध्ये सुद्धा लोकप्रियता प्राप्त केली आहे. अनेक टीव्ही सिरीयल मध्ये तसेच जाहिरातीमध्ये तिने छोटे छोटे रोल्स केले आहेत.
आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास प्रसिद्ध टेनिसपटू सानिया मिर्झा हिच्याबद्दल माहिती दिलेली आहे. हा लेख तुम्ही शेवटपर्यंत संपूर्ण वाचा.
सानिया मिर्झा माहिती मराठी | Sania Mirza Information In Marathi
नाव | सानिया मिर्झा मलिक |
जन्म तारीख | १५ नोव्हेंबर १९८६ |
जन्म स्थळ | मुंबई, महाराष्ट्र, भारत |
टोपणनाव | सानिया |
प्रसिद्धी | टेनिसपटू |
नागरिकत्व | भारतीय |
स्थनिक | हैदराबाद |
शाळा | एन. एस. आर. स्कूल, हैदराबाद |
कॉलेज | सेंट मेरी कॉलेज, हैदराबाद |
धर्म | मुस्लीम |
शैक्षणिक पात्रता | पदवीधर |
वैवाहिक स्थिती | विवाहित |
लग्नाची तारीख | १२ एप्रिल २०१० |
विवाह स्थान | ताज कृष्णा होटल, हैदराबाद |
सानिया मिर्झा हीचा जन्म शिक्षण आणि कौटुंबिक माहिती
सानिया मिर्झा हिचा जन्म १५ नोव्हेंबर १९८६ मध्ये मुंबईत झाला. सानिया मिर्झाच्या जन्मानंतर तिचे वडील इमरान मिर्झा यांना त्यांच्या कामामुळे, त्यांची जागा बदलावी लागली. त्यामुळे सानियाचे शालेय शिक्षण हैदराबाद मध्ये पूर्ण झाले. सानियाचे वडील मिस्टर इमरान मिर्झा हे स्पोर्ट्स पत्रकार होते, नंतर त्यांनी प्रिंटिंगचा स्वतःचा व्यवसाय सुरू केला व यानंतर ते निर्माता बनले. तर आई नसीमा मिर्झा या मुद्रण उद्योगांमध्ये काम करत होत्या.
सानियाने तिथे सुरुवातीचे शिक्षण हैदराबाद येथील नस्सर स्कूल मधून पूर्ण केले. त्यानंतर वडिलांनी सानियाला अवघ्या सहा वर्षाची असताना हैदराबादच्या निजाम क्लब मध्ये दाखला मिळवून दिला. अगदी लहान वयामुळे तिला क्लबच्या प्रशिक्षणाने मार्गदर्शन देण्यास नकार दिला. तिच्या वडिलांच्या सांगण्यावरून, आठवडाभर सानिया टेनिस खेळल्यानंतर, प्रशिक्षकाने सानियाच्या पालकांना बोलून सानियाच्या टेनिस कौशल्याची मन भरून प्रशंशा केली आणि तिला प्रशिक्षण देण्यास सुद्धा मंजुरी दर्शविली.
यानंतर सानियाचे टेनिस खेळामध्ये शिक्षण सुरू झाले. तिचे पहिले गुरू हे टेनिसपटू “महेश भूपती” होते. त्यांनी सानियाला टेनिसचे प्राथमिक शिक्षण दिले. त्यानंतर सानियाने सिकंदराबाद येथील “सेनेट टेनिस अकादमी” मधून प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली व नंतर ती अमेरिकेला गेली. आणि तिथल्या “एस टेनिस अकादमी” मध्ये तिने दाखला घेतला.
- नक्की वाचा 👉👉 विराट कोहली माहिती मराठी
- नक्की वाचा 👉👉 23 विराट कोहलीबद्दल माहीत नसलेल्या गोष्टी
सानिया मिर्झा यांची कौटुंबिक माहीती
खेळाडू | सानिया मिर्झा |
आई | नसीमा मिर्झा |
वडील | इम्रान मिर्झा |
बहिण | अनम मिर्झा |
पती | शोएब मलिक |
सानिया मिर्झा आणि शोएब मलिक प्रेम आणि वैवाहिक जीवन
- सानिया मिर्झा व शोएब मलिक यांची पहिली भेट ऑस्ट्रेलियामध्ये झाली. त्यांची भेट ही योगायोग नसून, शोएबने घडवून आणलेले एक नियोजन होते. ज्यामध्ये शोएब सानियाला ऑस्ट्रेलियामध्ये भेटला. सानिया त्या काळात एकदा ऑस्ट्रेलियामधील एका रेस्टॉरंटमध्ये गेली असताना, शोएबच्या टीममधील एका सदस्याने शोएबला फोनवरून याची कल्पना दिली. त्यानंतर शोएब रेस्टॉरंटमध्ये आला व त्यानंतर तो सानियाला भेटला.
- सानिया व शोएब जेव्हा वेगवेगळ्या देशांमध्ये खेळायचे, तेव्हाही ते एकमेकांना भेटायचे. शोएबचा साधेपणा सानियाला प्रचंड भावला. शोएबमध्ये स्वतःच्या ओळखीचा व नावाचा अभिमान अजिबात नव्हता. शोएब पाकिस्तान क्रिकेट संघाचा विद्यमान सदस्य व माजी कर्णधार होता. सानिया व शोएबमध्ये मैत्रीचे चांगले संबंध निर्माण झाले. त्यानंतर सानियाची आई शोएबला भेटली. त्यानंतर त्यांच्या परिवाराला शोएब प्रचंड आवडला. परंतु, तो भारतीय नसून पाकिस्तानचा नागरिक आहे, यावरून राजकीय वाद निर्माण होऊ शकतो, अशी भीती सानियाच्या परिवारास वाटली.
- लग्नाआधी सानियाने शोएबला विचारले की, लग्नानंतर टेनिस खेळण्यावर शोएबच्या कुटुंबाला काही आक्षेप असेल का ? यावर चर्चा केली. शोएबचे कुटुंब हे मान्य करतील की नाही, याची चिंता सानियाला वाटत होती. कारण सानियाला टेनिस खेळण्यासाठी विविध देशांमध्ये अनेक महिने फिरावे लागते. यानंतर सानियाला समजले की, शोएबच्या आईलासुद्धा सानिया फार आवडते. व तिला सानियाचा प्रचंड अभिमान आहे. ते दोघेसुद्धा खेळाडू असल्याने, त्यांच्या कुटुंबांनी त्यांना प्रचंड पाठिंबा व मदत दिली.
- लग्नाअगोदर सानिया व शोएब यांना धर्म आणि समाजामध्ये अनेक वादांना सामोरे जावे लागले. लग्नाच्या वेळी दोन्ही घरच्यांना खूप काळजी होती. लग्न होणार की नाही ? असा प्रश्न त्यांना पडला. सानियाच्या परिवारास लग्नाची तारीख पुढे ढकलण्यास सल्ला देण्यात आला होता. मात्र शोएबला हे मान्य नव्हते. जोपर्यंत सानियाशी लग्न करणार नाही, तोपर्यंत इथून कुठेही जाणार नसल्याचे, शोएबने सांगितले.
- यावर सानियाचे आई वडील नाराज झाले. इस्लाममध्ये लग्नाअगोदर वर वधूच्या घरी राहत नाही. परंतु शोएब सानियाच्या घरी थांबला. यावरून अनेक वाद निर्माण झाले. सानिया मिर्झाच्या घराबाहेर मीडिया व न्यूज चैनलवाले लक्ष ठेवून होते. या भीतीने सानियाच्या कुटुंबांनी संपूर्ण घर बंद करून घेतले. प्रसार माध्यमांच्या नजरेतून शोएबला वाचवून, शोएबला एका हॉटेलमध्ये नेण्यात आले व त्यांची समस्या दूर झाली. अशा अनेक अडचणी असून सुद्धा दोघांनी दि. १२ एप्रिल २०१० रोजी लग्न केले.
सानिया मिर्झा हिचे वर्णन
वजन | किलोग्रॅममध्ये – ५७ किलो पाउंडमध्ये – १२६ ibs |
उंची | मीटरमध्ये सेंटीमीटर – १६६ सेमी मीटरमध्ये – १.६६ मी ५’ ६” फुट |
डोळ्यांचा रंग | गडद तपकिरी |
केसांचा रंग | गडद तपकिरी |
शारीरिक स्वरूप | ३६-२६-३६ |
सानिया मिर्झा – अफेअर आणि चर्चा
शाहिद कपूर
सानिया मिर्झा व शाहिद कपूर यांच्या नात्याबद्दल अनेक गोष्टी बोलल्या जात होत्या. सानिया मिर्झा व शाहिद कपूरबद्दल अशा अफवा आहे की, त्यांचे नाते फार कमी काळासाठी टिकले.
सोहराब मिर्झा
सानिया व सोहराब लहानपणाचे मित्र होते. त्यांच्यामधील नाते हे तणावामुळे जास्त काळ टिकू शकले नाही. यामुळे सानिया व सोहराब या दोघांनी मिळून आपण एकमेकांसाठी बनलेले नाहीत, असे ठरवून वेगळे होण्याचा निर्णय घेतला.
सानिया मिर्झा यांची कारकीर्द
- सानिया मिर्झा ही एक आंतरराष्ट्रीय टेनिसपटू आहे. व भारताची नंबर वन टेनिस खेळाडू म्हणून सानियाकडे पाहिले जाते.
- सानिया आणि तिच्या कारकर्दीमध्ये सहा ग्रँडस्लॅम मिळवले आहेत. तसेच मिर्झाने एकेरी व दुहेरी या दोन्ही स्पर्धेमध्ये पहिले स्थान प्राप्त केले आहे.
- २००५ मध्ये सानियाने टेनिस ग्रँडस्लॅम स्पर्धेची तिसरी आणि चौथी फेरी गाठून सानियाने टेनिस विश्वात इतिहास रचला.
- सानियाने वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षीपासून, टेनिसचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. सुरुवातीला तिच्या वडिलांनी तिला टेनिसचे प्रशिक्षण दिले.
- २००२ मध्ये सानिया, लिएंडर पेससह आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये मिश्र दुहेरी खेळात पदक जिंकण्यास पात्र ठरली.
- सानियाने देश विदेशांमधून टेनिसचे प्रशिक्षण घेतले. व स्वतःची कला पुढे नेण्यासाठी प्रयत्न केला. प्रारंभिक काळ हा अतिशय अवघड होता. सानियाला प्रारंभिक टेनिस मार्गदर्शन महेश भूपती यांनी दिले.
- सानियाने तिची पहिली आंतरराष्ट्रीय स्पर्धा १९९९ मध्ये जकार्ता या ठिकाणी जागतिक ज्युनिअर चॅम्पियनशिपमध्ये खेळली. व भारताचे प्रतिनिधित्व केले.
- २००५ मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत सानियाने पहिल्या आणि दुसऱ्या फेरीत Petra Mandula आणि सिंडी वॉटसन यांचा पराभव केला.
- २००३ साली विम्बल्डन चॅम्पियनशिप गर्ल्स दुहेरीचे विजेतेपद सानियाने जिंकून, २००३ च्या दरम्यान सानियाने यु.एस ओपन गर्ल्स दुहेरी मध्ये उपांत्य फेरी गाठली.
- २०१३ मध्ये सानिया व अमेरिकन बेथानी मॅटेक-सँड्स यांनी दुबई ड्युटी फ्री टेनिस चॅम्पियनशिप जिंकून, यश प्राप्त केले. परंतु त्यांना ग्रँडस्लॅम मिळाले नाही. यानंतर सानियाने कारा ब्लॅक या दुसऱ्या जोडीदारासोबत, टेनिस खेळ जिंकून स्पर्धेमध्ये स्वतःचे स्थान पटकावले.
- सानियाचे यश दिवसेंदिवस वाढत चालले होते. २००३ मध्ये सानियाने चार सुवर्ण पदके, स्वतःच्या नावे करून घेतली. व त्यानंतर लगेचच २००४ मध्ये तिने 6 ITF एकेरी विजेतेपद पटकावले.
- पेस सोबत आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये भाग घेऊन, तिने कांस्यपदक जिंकले व यानंतर तिने तेरा वर्षीय रशियन खेळाडू अलिसा क्लेबनोव्हासह दुहेरीच्या ज्युनिअर स्पर्धेत ग्रेड स्लॅम विजेतेपद पटकावले.
- २००६ मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन मध्ये दुहेरी स्पर्धेचे विजेतेपद जिंकले, त्यानंतर दुबई टेनिस चॅम्पियनशिप मध्ये सानिया खेळली व मार्टिना हिंगेसकडून तिला हार पत्करावी लागली.
- मिश्र दुहेरी स्पर्धेमध्ये सुवर्णपदक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये महिला एकेरी आणि सांघिक स्पर्धेत रौप्य पदक सानियाने पटकावले.
- २०११ मध्ये एकेरी स्पर्धेमध्ये सानियाने तितकीशी प्रेक्षणीय कामगिरी केली नसल्याकारणाने, सानियाला पहिल्या फेरी मधूनच हार पत्करावी लागली. त्यामुळे तिने दुहेरीच्या स्पर्धेमध्ये अधिक लक्ष देऊन, खेळ खेळला व २०११ मध्ये फ्रेंच ओपन मध्ये अंतिम फेरी गाठली.
- २००७ हे वर्ष सानियाच्या कारकर्दी मधील सुवर्ण वर्ष ठरले. त्यावेळी तिने एकेरी क्रमवारी मध्ये जागतिक क्रमवारीत २७ व्या स्थानावर स्वतःचे स्थान निर्माण केले व २००७ मध्ये चार दुहेरीचे विजेतेपद पटकावले.
- २०१८ मध्ये सानियाच्या गुडघ्यामध्ये दुखापती झाल्याकारणाने, ती ऑस्ट्रेलियन ओपन मध्ये सहभागी होऊ शकली नाही.
- २००८ मध्ये टेनिस खेळतेवेळी सानियाच्या मनगटामध्ये दुखापती झाल्यामुळे, तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. ज्यामुळे ती खेळू शकली नाही व फ्रेंच ओपन आणि ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेमधून तिला बाहेर पडावे लागले. बीजिंग ऑलिंपिक मधून सुद्धा ती बाहेर पडली. यानंतर २००९ मध्ये ती पुन्हा खेळामध्ये रुजू झाली व ऑस्ट्रेलियन ओपन मध्ये महेश भूपतीसह मिश्र दुहेरी मध्ये तिने पहिले ग्रँड स्लॅम जिंकले.
- यानंतर सानियाला २०१५ मध्ये महिला दुहेरी स्पर्धेत तिचा पहिला ग्रँड स्लॅम प्राप्त झाला. २०१६ दरम्याने सानियाने हिंगिस हिच्या जोडीने ऑस्ट्रेलियन ओपन महिला दुहेरीची चॅम्पियनशिप पटकावली.
- २०१५ मध्ये सानियाने मयामी ओपन जिंकली.
- सानिया व कारा २०१४ मध्ये यूएसए ओपनच्या उपांत्य फेरीपर्यंत पोहोचल्या. ब्रूनो सोरेससह मिश्र दुहेरीचे विजेतेपद सानियाने पटकावले यानंतर इंटरनॅशनल प्रीमियम टेनिस लीगमध्ये सानियाने भाग घेऊन ती लिग जिंकली.
सानिया मिर्झा याना मिळालेले पुरस्कार व यश
२००३ | विम्बल्डन चॅम्पियनशिप गर्ल्स दुहेरीचे विजेतेपद जिंकले |
२००४ | आशिया टेनिस स्पर्धेत उपविजेती |
२००४ | भारत सरकारच्या “अर्जुन पुरस्काराने” सन्मानित. |
२००५ | यूएस ओपनमध्ये ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या चौथ्या फेरीत पोहोचणारी सानिया पहिली महिला खेळाडू होती. सानियाने ऑस्ट्रेलियन ओपनची तिसरी फेरी गाठली. WTA एकेरी मिळवणारी सानिया पहिली महिला होती. |
२००६ | भारत सरकाने पद्यश्री पुरस्कार देऊन सन्मानित केले. |
२००६ | दोहा आशिया क्रीडा स्पर्धेत सानियाने महिलांच्या एकमेव गटात रौप्यपदक जिंकले. मिश्र दुहेरी प्रकारात लिएंडर पेससोबत खेळून सुवर्णपदक जिंकले. |
२००७ | सानियाने US ओपनमध्ये महेश भूपतीसह मिश्र दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीची तिसरी फेरी गाठली. |
२००८ | एमजीआर एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट युनिव्हर्सिटी, चेन्नई यांनी सानियाला डॉक्टर ऑफ लेटर्स ही पदवी प्रदान केली. सानिया होबार्टच्या उपांत्यपूर्व फेरीत सहाव्या क्रमांकावर पोहोचली होती. |
२००९ | ऑस्ट्रेलिया ओपनच्या मिश्र दुहेरी स्पर्धेत महेश भूपतीसह सानियाने पहिले ग्रँडस्लॅम विजेतेपद मिळवले. |
२०१४ | तेलंगणा सरकारने सानियाची तेलंगणा राज्याची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून निवड केली. |
२०१५ | राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार |
२०१६ | भारतीय प्रजासत्ताकातर्फे तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान “पद्मभूषण” प्राप्त |
याशिवाय, सानियाला विविध खेळांमध्ये २ सुवर्ण, ३ कांस्य आणि 3 रौप्य पदके मिळाली आहेत, ही पदके अनुक्रमे २००२, २००६, २०१० आणि २०१४ मध्ये मिळाली होती. याशिवाय २०१० च्या राष्ट्रकुल स्पर्धेत सानियाने महिला एकेरीत रौप्यपदक आणि महिला दुहेरीत कांस्यपदक पटकावले होते.
सानिया मिर्झा यांची संपत्ती
नेट वर्थ | $८ दशलक्ष |
घर | हैदराबाद, तेलंगणा, भारत |
सानिया मिर्झा यांच्या आवडीनिवडी
अभिनेता | सलमान खान अर्जुन रामपाल अक्षय कुमार |
अभिनेत्री | काजोल करीना कपूर |
आवडता खेळाडू | स्टेफी ग्रेफ |
खाद्यपदार्थ | हैदराबादी बिर्याणी |
फिल्म ( Film ) | कभी ख़ुशी कभी गम क़यामत से कायामत तक फूल और काटें मोहरा मैंने प्यार किया कुछ कुछ होता है |
खेळ | टेनिस |
आवड | घरी राहणे, फिल्म बघणे, नेट सर्च |
ड्रेस ( Dress ) | सलवार आणि जीन्स |
नावड | सफरचंद आणि केळे खाणे |
आवडीचे ठिकाण | लंडन पॅरिस थायलंड |
रंग | काळा, लाल आणि निळा |
कार संग्रह | फिएट पालियो (सचिन तेंदुलकर द्वारा हस्ताक्षरित) टोयोटा सुप्रा बीएमडब्ल्यू पोर्श रेंज रोवर |
सानिया मिर्झा बद्दल मनोरंजक तथ्ये
- मिस्टर बद्रीनाथ हे सानिया से फिजिओथेरपिस्ट आहेत.
- २०१३ मध्ये सानियाची दक्षिण आशियाची गुड विल अँबेसिडर म्हणून निवड करण्यात आली.
- सानियाला कोणतेही व्यसन नसून, ती स्मोकिंग करत नाही. व दारूचे सेवन सुद्धा करत नाही.
- दहा लाख अमेरिकन डॉलर जिंकणारी, सानिया मिर्झा ही पहिली महिला टेनिसपटू आहे.
- २०१० मध्ये सानियाच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे, तिला गुगलवर सर्वाधिक सर्च केले गेले.
- सानियाला स्वतःची टेनिस अकादमी उघडायची आहे, तिच्या यशाचे सर्व श्रेय ती तिचे आई-वडील गुरु व देवांना समर्पित करते.
- सानियाला “कभी खुशी कभी गम” हा चित्रपट प्रचंड आवडतो. जो तिने तीस वेळा पाहिला आहे.
- तब्बल ५० महिला टेनिसपटूंच्या यादीमध्ये, स्वतःचे स्थान निर्माण करणे व तीन ते चार वर्षे स्वतःचे स्थान कायम बनवून ठेवणे, हे खरे सानियाचे यश आहे.
- कनिष्ठ खेळाडू म्हणून १० एकेरी व १३ दुहेरी विजेतेपद पटकावले आहेत.
- सानिया मिर्झा मलिक हिला ऑक्टोंबर २०१८ मध्ये पहिले अपत्य झाले.
- आजपर्यंत सानियाने ३५ देशांमध्ये प्रवास केला आहे.
- WTA विजेतेपद प्राप्त करणारी सानिया ही पहिली महिला खेळाडू आहे. २००३ ते २०१३ पर्यंत सानिया भारताची नंबर वन खेळाडू म्हणून संबोधली जाते.
- सानिया म्हणते की, “आपण कधीही जिंकण्याची किंवा हरण्याची चिंता करू नये, आपण कठोर परिश्रम केले पाहिजे की, यश आपोआप मिळते.
सानिया मिर्झा यांच्यावरील पुस्तके
- सानिया मिर्झाने ‘Race against Odds’ ही इंग्रजी आत्मकथा लिहिली आहे. सचिन वाघमारे यांनी या आत्मकथेचा ‘आव्हानांवर मात’ या नावाचा मराठी अनुवाद केला आहे.
सानिया मिर्झाशी संबंधित काही वाद
सानिया मिर्झा तिच्या आयुष्याच्या प्रवासामध्ये विविध वादांनी घेरलेली आहे. जेव्हापासून सानिया टेनिस स्टार बनली व प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचली, तेव्हापासून तिला अनेक समस्या आणि वादांना सामोरे जावे लागले.
शॉर्ट स्कर्टचा वाद
सानिया मिर्झा ही मुस्लिम धर्मीय असून, तिने मुस्लिम धर्माची प्रथा पाळावी. परंतु टेनिस खेळताना सानियाने परिधान केलेल्या, शॉर्टस्कर्टवर काही मुस्लिम धार्मिक संघटनांनी आक्षेप घेतला. मुस्लिम समाजामधील लोकांचा असा विश्वास आहे की, टेनिस पोशाख मुस्लिम धर्मात येत नाही. परंतु, जामियात-उल्लेमा-ए-हिंद यांनी सांगितले की कोणालाही अशा खेळण्यावर बंदी घालू शकत नाहीत.
राष्ट्रध्वजाचा अपमान
२००८ मध्ये एका कार्यक्रमाच्या दरम्यान, राष्ट्रध्वजावर पाऊल ठेवल्याबद्दल मुख्य न्याय दंडाधिकारी यांनी अपमान प्रतिबंधक कायदा १९७१ च्या कलम दोन अन्वये सानिया मिर्झा हिच्यावर गुन्हा दाखल केला होता.
सानिया यांना धमकीचे फोन
२००८ मध्ये मोहम्मद अश्रफ या २८ वर्षीय सिविल इंजिनियरच्या विद्यार्थ्याने सानियाला सोहराब मिर्झासोबत फोनवर धमकी दिली. या धमकीबद्दल त्याला अटकसुद्धा करण्यात आली होती. सानियाच्या घरी जाऊन अश्रफने प्रचंड त्रास दिला होता. सानियाच्या वडिलांना साखरपुडा तोडण्याची धमकी दिली. अश्रफ म्हणाला की, तो सानियावर प्रेम करतो, त्यामुळे हे नाते तोडावे.
शिधापत्रिकेवरून वाद
आरोग्य लाभ, आरोग्य विमा, उच्च अनुदान, सामाजिक सुरक्षा व तांदूळ, केवळ दोन रुपये किलो दराने देण्यात येणाऱ्या पांढऱ्या रेशन कार्डवर सानिया मिर्झाचे छायाचित्र होते. व ही अतिशय वादग्रस्त बाब ठरली होती.
पाकिस्तानची सून
शोएब मलिक या पाकिस्तानी खेळाडूसोबत लग्न केल्यानंतर, सानिया मिर्झा भारताची स्थानिक नागरिक बनल्याच्या प्रश्नावरून विविध वाद निर्माण झाले. तेलंगणा राज्यामधील एका राजकारण्याने राज्यसभेत सानियाला पाकिस्तानी सून म्हटल्याने, अनेक दिवस हा वाद सुरू होता.
सानिया मिर्झा ब्रँड अॅम्बेसेडर
टेनिस स्टार सानिया मिर्झा टेनिस प्रीमियर लीगमध्ये बेंगळुरू स्पार्टन्सची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून सामील झाली आहे . हा कार्यक्रम १३ डिसेंबर २०२१ मध्ये मुंबईत खेळवला गेला.
तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी उद्योगपतींसोबत संवाद सत्रात सानियाला नियुक्ती पत्र आणि १ कोटी रुपयांचा धनादेश सादर केला.
२२ जुलै २०१४ रोजी भारताच्या या पहिल्या क्रमांकाच्या महिला टेनिसपटूला नव्याने स्थापन झालेल्या तेलंगणा राज्याची ब्रँड अॅम्बेसेडर बनवण्यात आले.
सानिया मिर्झा यांची निवृत्ती
२०१३ मध्ये सानिया मिर्झाला झालेल्या दुखापतीमुळे व दुहेरीवर लक्ष केंद्रित करण्याच्या इच्छेमुळे, टेनिसच्या एकेरी स्पर्धांमध्ये सेवानिवृत्ती घेण्याचा निर्णय सानियाने जाहीर केला. तिने २०१७ मध्ये स्वतःचा मुलगा इझानला जन्म देण्यासाठी खेळात भाग घेणे बंद केले.
सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांच्या घटस्फोटाची बातमी
पाकिस्तानी मीडिया रिपोर्टरनुसार, शोएब आणि सानिया यांच्यातील नाते संपल्याची बातमी समोर आली. दोघेही त्यांचे नाते संपवण्यासाठी कायदेशीर प्रक्रियेची वाट पाहत आहेत, असे सांगण्यात आले. असे देखील सांगण्यात आले की, शोएब मलिकचे नाव आयेशा उमर या पाकिस्तानी मॉडेलसोबत जोडले गेले होते. पण सानिया मिर्झा व शोएब यांनी घटस्फोटाची अधिकृत घोषणा अजूनही केलेली नाही.
सानिया मिर्झा यांच्याबद्दल ताज्या बातम्या
जानेवारी २०२२ मध्ये सानिया मिर्झाने घोषणा केली की, ती लवकरच सेवानिवृत्त होणार आहे. २०२२ मध्ये खेळला गेलेला, टेनिसचा सामना सानियाचा शेवटचा सामना होता.
सानिया मिर्झा यांच्याबद्दल 10 ओळी
- सानियाने फार कमी वेळात यश मिळवले.
- सानिया मिर्झा ही अत्यंत लोकप्रिय टेनिसपटू असून ती जगभरात ओळखली जाते.
- सानिया मिर्झाने 2003 साली विम्बल्डन ज्युनियरचे विजेतेपद पटकावले होते.
- सानिया मिर्झाने 2004 मध्ये तिचे पहिले WTA विजेतेपद जिंकले.
- 2005 मध्ये, सानिया मिर्झाने सेरेना विल्यम्स विरुद्ध स्पर्धा केली होती, परंतु ती दिग्गजाकडून हरली होती.
- तिचे नाव VTTA वेबसाइटवर 2006 मधील सर्वात लोकप्रिय खेळाडू म्हणून नोंदविले आहे.
- तिने 2008 पर्यंत 12 एकेरी विजेतेपदावर दावा केला होता.
- सानिया मैदानावर कधीच घाबरत नाही आणि खेळात तिचे कौशल्य दाखवून देण्यात कोणताही संकोच दाखवत नाही.
- सानिया मिर्झाने मारिया शारापोव्हाविरुद्धही स्पर्धा खेळली आहे.
- सानिया मिर्झाने टेनिसमधील सर्व भारतीय महिलांच्या टेनिस कामगिरीवर मात केली.
- सानिया मिर्झाला पूर्णवेळ प्रशिक्षक आहे जो तिच्यासोबत प्रवास करतो.
- सानिया मिर्झा फ्रेंच ओपनच्या कामगिरीच्या रेकॉर्डद्वारे ग्रँड स्लॅममध्ये प्रवेश करणारी पहिली भारतीय महिला होती.
- क्रिकेटर शोएब अख्तरसोबत लग्न केल्यानंतर सानिया मिर्झा काही काळ प्लेइंग कोर्टवर गेली होती.
- सानिया मिर्झाने अनेक महत्त्वाच्या प्रोडक्टच्या जाहिरातींवर काम केले आहे. या उत्पादनांच्या जाहिरातीसाठी तिचे शुल्क जास्त आहे आणि ते सुमारे दीड कोटी इतके आहे.
सानिया मिर्झा माहिती व्हिडीओ
FAQ
१. अर्जुन पुरस्काराने सन्मानित होणारी पहिली महिला टेनिसपटू कोण ?
सानिया मिर्झा अर्जुन पुरस्काराने सन्मानित होणारी पहिली महिला टेनिसपटू आहे. २०१५ राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, २०१६ तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान “पद्मभूषण” इत्यादी पुरस्काराने सानिया मिर्झाला सन्मानित केले गेले.
२. सानिया मिर्झाचा जन्म कधी झाला ?
सानिया मिर्झा हिचा जन्म १५ नोव्हेंबर १९८६ मध्ये मुंबईत झाला.
निष्कर्ष
मित्रहो, आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणस भारतीय प्रसिद्ध टेनिसपटू सानिया मिर्झा हिच्या बद्दल माहिती दिली आहे. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला कळवा, लेख आवडल्यास तुमच्या इतर मित्रपरिवारांसोबत नक्की शेयर करा. धन्यवाद.