डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांची माहिती : Sarvepalli Radhakrishnan Information In Marathi

डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांची माहिती : Sarvepalli Radhakrishnan Information In Marathi – स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती व दुसरे राष्ट्रपती म्हणून ज्यांची ओळख आहे, ते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे नाव भारतीय इतिहासाच्या पानांमध्ये सुवर्ण अक्षरांनी कोरले गेले आहे. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना तत्त्वज्ञानाचे प्रचंड ज्ञान होते. त्यांनी भारतीय तत्त्वज्ञानामध्ये पाश्चात्य विचारांचा परिचय करून दिला. राधाकृष्णन हे एक प्रसिद्ध शिक्षक म्हणून कार्यरत होते, म्हणून त्यांच्या स्मरणार्थ पाच सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून संपूर्ण भारतामध्ये साजरा केला जातो.

विसाव्या शतकामधील विद्वानांमध्ये डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे नाव अग्रगण्य आहे. त्यांना पाश्चात्य शिक्षणापासून लांब होऊन, देशात हिंदुत्वाचा प्रसार करायचा होता. राधाकृष्णन यांनी भारतामध्ये हिंदू धर्माचा प्रसार करण्याचा अतोनात प्रयत्न केला.

त्यांना हिंदू व पाश्चात या दोन्ही संस्कृतीचे ज्ञान भारतीय जनतेला द्यायचे होते. देशाच्या आर्थिक व्यवस्थेमध्ये व शिक्षणाच्या बाबतीत शिक्षकांचे योगदान हे सर्वात मोठे असते. त्यामुळे देशाच्या उन्नतीसाठी सर्वोत्कृष्ट विचार हे शिक्षकांमध्ये असायलाच हवे, असे राधाकृष्णन सर्वपल्ली यांचे ठाम मत होते.

आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनाचा परिचय दिला आहे. अत्यंत बुद्धिमान आणि ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व, सुविख्यात भारतीय तत्त्वज्ञ, भारताचे दुसरे राष्ट्रपती, साधी राहणी उच्च विचारसरणी, अष्टपैलू जीवनाचे दर्शन घडविणारे एक आदर्श शिक्षक, उत्कृष्ट लेखक, उत्कृष्ट तत्त्वज्ञानी, उत्तम वक्ते, उत्तम प्रशासक, पारदर्शी व्यक्तित्व, थोर वेदांती पंडित, अशा थोर व्यक्तीचा परिचय करून घेणे यासारखी भाग्याची गोष्ट दुसरी कोणतीही नाही. हा लेख तुम्ही शेवटपर्यंत सविस्तर वाचा.

Table of Contents

डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांची माहिती | Sarvepalli Radhakrishnan Information In Marathi

पूर्ण नाव डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन
जन्म तारीख ५ सप्टेंबर १८८८
जन्म ठिकाण तिरुमणी
आईचे नाव सीताम्मा
वडिलांचे नाव सर्वपल्ली विरास्वामी
पत्नीचे नाव शिवकामू
अपत्य ५ मुली, १ मुलगा
जातब्राह्मण
ओळख भारताचे पहिले उपराष्ट्रपती
भारताचे दुसरे राष्ट्रपती
मृत्यू१७ एप्रिल १९७५
मृत्यू स्थानचेन्नई

डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म आणि प्रारंभिक जीवन

डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म ०५ सप्टेंबर १८८८ मध्ये तमिळनाडू मधील तिरूमणी या एका लहानशा ब्राम्हण कुटुंबामध्ये झाला. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या वडिलांचे नाव सर्वपल्ली वीरस्वामी होते. त्यांच्या आईचे नाव सीतम्मा होते. राधाकृष्णन यांचा परिवार हा तितकाचा श्रीमंत नव्हता, परंतु त्यांचे कुटुंब फार विद्वान होते. राधाकृष्णन यांच्या वडिलांवर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी होती.

Sarvepalli Radhakrishnan Information In Marathi

डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे शिक्षण

डॉक्टर राधाकृष्णन यांचे लहानपण तिरुमणी या तमिळनाडूमधील एका छोट्याशा गावामध्येच गेले. तेथूनच त्यांनी त्यांच्या प्राथमिक शिक्षणाला सुरुवात केली. पुढच्या उच्च शिक्षणासाठी त्यांचे वडील सर्वपल्ली वीरस्वामी यांनी डॉक्टर राधाकृष्णन यांना तिरुपती येथील लुथेरण मिशन स्कूल या ख्रिश्चन मिशनरी संस्थेमध्ये दाखला करून दिला.

ज्या ठिकाणी १८९६ ते १९०० या काळात त्यांनी त्यांचे शिक्षण पूर्ण केले. १९०० मध्ये सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी वेल्लोर कॉलेजमधून शिक्षण ग्रहण केले. त्यानंतर मद्रासच्या मद्रास ख्रिश्चन कॉलेजमधून त्यांनी उच्च शिक्षण घेतले. ते लहानपणापासूनच अतिशय हुशार व तीक्ष्ण बुद्धीचे होते.

Sarvepalli Radhakrishnan

१९०४ मध्ये राधाकृष्णन यांनी कला शाखेची परीक्षा प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण केली. त्याच दरम्याने त्यांनी मानसशास्त्र, इतिहास आणि गणित या विषयांमध्ये विशेष पदवी प्राप्त केली. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी १९०६ च्या दरम्याने तत्त्वज्ञानामध्ये काम केले. राधाकृष्णन यांना आयुष्यभर शैक्षणिक क्षेत्रामध्ये शिष्यवृत्ती मिळत राहिल्या, कारण त्यांनी अतोनात कष्ट करून शिक्षण ग्रहण केले होते.

डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे वैयक्तिक जीवन

१९०३ च्या दरम्याने राधाकृष्णन यांचे त्यांच्या लांबच्या बहिणीशी शिवकामुशी लग्न झाले. लग्नाच्या वेळी त्यांचे वय हे अवघे सोळा वर्ष व पत्नीचे वय हे फक्त दहा वर्ष होते. त्यांची पत्नी शिवकामू ही अशिक्षित होती, परंतु तिची तेलुगु भाषेवर प्रचंड पकड होते. १९०८ मध्ये डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांना प्रथम मुलगी झाली. १९५६ च्या दरम्यान शिवकामू यांचे निधन झाले.

डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या करियरची सुरुवात

१९०९ च्या दरम्यान राधाकृष्णन यांना मद्रास प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये तत्वज्ञान विषयाचे शिक्षक नियुक्त करण्यात आले. १९१६ च्या दरम्यान मद्रास प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये तत्त्वज्ञानाचे सहाय्यक प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले. १९१८ मध्ये त्यांची मैसूर विद्यापीठामध्ये तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून नियुक्ती करण्यात आली. यानंतर इंग्लंडमधील ऑक्सफर्ड विद्यापीठांमध्ये राधाकृष्णन यांनी भारतीय तत्त्वज्ञानाचे शिक्षक म्हणून काम पाहिले.

डॉक्टर राधाकृष्णन यांनी शिक्षणाला पहिले स्थान दिले, त्यामुळे ते प्रचंड विद्वान बनले. शिक्षणाकडे असलेला त्यांचा दृष्टिकोण व कल हा राधाकृष्णन यांना अतिशय कणखर व्यक्तिमत्व बनण्यास मदत करत होता. काहीतरी नवनवीन शिकण्याची उत्सुकता त्यांच्यामध्ये नेहमीच असायची.

ज्या विद्यालयामधून त्यांनी एम.ए चे शिक्षण प्राप्त केले, त्याच महाविद्यालयांमध्ये सर्वपल्ली राधाकृष्णन यांना कुलगुरू हे स्थान देण्यात आले. डॉक्टर राधाकृष्णन यांनी एका वर्षामध्ये महाविद्यालयाचे कुलगुरू हे स्थान या काळात त्यांनी तत्त्वज्ञानावर अनेक पुस्तके सुद्धा प्रकाशित केली.

सर्वपल्ली राधाकृष्णन – बनारस विश्वविद्यालयाचे कुलपती

डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन ऑक्सफर्ड विद्यापीठात असताना पंडित मदन मोहन मालवीय म्हणजेच एक स्वतंत्र सैनिक आणि एक आदर्श शिक्षण तज्ञ असलेले असे यांचे लक्ष डॉक्टर राधाकृष्णन यांच्याकडे गेले. त्यांनी राधाकृष्णन यांची बनारस विश्व हिंदू विद्यापीठाचे कुलपती म्हणून नेमणूक केली.

Sarvepalli Radhakrishnan

कुलपती म्हणून त्यांनी बरीच वर्षे पद सांभाळले. हे पद सांभाळताना त्यांनी त्या विद्यापीठाची प्रगती देखील घडवून आणली. त्या विद्यापीठांमध्ये नगरपालिका, पोहण्याचे तलाव, पाण्याच्या सोयी, दवाखाने यासारख्या सुखसोई निर्माण केल्या. डॉक्टर जयंत नारळीकर यांच्यासारखे अनेक नामवंत तसेच जागतिक कीर्तीचे विद्यार्थी देखील तयार केले.

स्वामी विवेकानंद व वीर सावरकर यांचा प्रभाव

डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी स्वामी विवेकानंद व स्वातंत्र्यवीर सावरकर यांना आपले आदर्श मानले. त्यांच्या विचारांनी व कर्तुत्वाने प्रभावित होऊन, डॉक्टर राधाकृष्णन यांनी त्यांचा अतिशय सखोलरीत्या अभ्यास केला. डॉक्टर राधाकृष्णन यांनी आपल्या लेखनामध्ये व भाषणांमधून संपूर्ण जगाला भारतीय तत्त्वज्ञानाची ओळख करून देण्यात सुद्धा अतोनात प्रयत्न केला.

डॉक्टर राधाकृष्णन यांचा राजकारणामध्ये प्रवेश

१९४७ मध्ये भारत देश हा ब्रिटिश सरकारच्या गुलामगिरी मधून मुक्त झाला व भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाले. त्यावेळी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी, राधाकृष्णन यांना सोव्हीयत युनियन सोबत विशेष राजदूत म्हणून राजनैतिक काम पाहण्याची विनंती केली.

नेहरूजींचे शब्द मानून डॉक्टर राधाकृष्णन यांनी १९४७ ते १९४९ या दरम्यान संविधान सभेचे सदस्य बनून महत्त्वाची कामे केली. संसदेमध्ये सर्वांनी त्यांच्या कार्याचे व वागण्याचे मनापासून कौतुक केले. त्यांच्या यशस्वी शैक्षणिक कामानंतर, त्यांनी राजकारणामध्ये त्यांचे पाऊल टाकले.

dr Sarvepalli Radhakrishnan

१३ मे १९५२ ते १३ मे १९६२ च्या दरम्याने डॉक्टर राधाकृष्णन यांनी देशाचे उपराष्ट्रपती म्हणून कामकाज पाहिले. तर १३ मे १९६२ मध्ये डॉक्टर राधाकृष्णन हे भारताचे राष्ट्रपती नियुक्त झाले. राजेंद्र प्रसाद यांच्या तुलनेमध्ये त्यांचा कार्यकाळ हा आव्हानाने भरलेला होता. कारण, त्यावेळी भारताचे चीन व पाकिस्तानसोबत युद्ध चालू होते.

ज्यामध्ये चीन सोबत भारताला पराभवाचा सामना सुद्धा करावा लागत होता. तर, दुसरीकडे दोन पंतप्रधानांचे त्याच कार्य काळामध्ये निधन झाले. डॉक्टर राधाकृष्ण सर्वपल्ली यांच्या सहकाऱ्यांना त्यांच्यासोबत वाद करण्यापेक्षा त्यांच्या कामाबद्दल अधिक आदर निर्माण झाला होता.

डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती पद

आपला भारत देश स्वतंत्र होण्यासाठी अनेक देशभक्त आणि क्रांतिकारकांनी आपला प्राण पणाला लावला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन 15 ऑगस्ट 1947 साली भारत स्वतंत्र झाला. हा दिवस म्हणजेच भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेला. आपला भारत स्वतंत्र झाला असला तरी आपला कायदा तयार व्हायचा होता. 26 जानेवारी 1950 रोजी भारताची नवीन राज्यघटना अमलात आणली गेली.

ही राज्यघटना तयार करण्याची जबाबदारी त्यावेळेसचे कायदेमंत्री बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर होती. त्यांनी अहोरात्र कष्ट करून, अभ्यास करून आपल्या देशाची राज्यघटना लिहिली. या घटना समितीचे अध्यक्षस्थानी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची नियुक्ती झाली होती. आणि भारत हा स्वतंत्र व सार्वभौम व लोक तांत्रिक गणराज्य आहे असे घोषित करण्यात आले होते.

हे प्रजासत्ताक राज्य 26 जानेवारी 1950 रोजी अस्तित्वात आले. त्यावेळी पासून गव्हर्नर जनरलच्या अधिकाराचा शेवट होऊन ती जागा स्वतंत्र भारताच्या अध्यक्षांनी घेतली. या अध्यक्षपदाला राष्ट्रपती हे नाव प्राप्त झाले. या घटना समितीचे काम काळ संपताच डॉक्टर राधाकृष्णन यांची भारताची राजदूत म्हणून नेमणूक करण्यात आली.

त्यावेळी त्यांनी खऱ्या अर्थाने राजकारणात लक्ष घालण्यास सुरुवात केली. त्यांनी ती जबाबदारी अत्यंत समर्थपणे पार पाडली. तसेच भारत आणि रशिया यांच्यातील मैत्रीचे संबंध त्यांनी दृढ केले. आपल्या भारतीय धर्माची शान वाढवली. डॉक्टर राधाकृष्णन रशियाहून भारतात परतल्यानंतर राज्यघटनेच्या आदेशानुसार डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी स्वतंत्र भारताचे राष्ट्रपती व डॉक्टर राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती म्हणून नेमण्यात आले.

उपराष्ट्रपती पदाचा श्री गणेशा झाल्यानंतर जगभर दौरे सुरू झाले. व्याख्याने गाजू लागली. डॉक्टर राधाकृष्णन यांनी जर्मनी, बेल्जियम, हंगेरी, अमेरिका, रशिया, बल्गेरिया, चीन, आफ्रिका, मंगोलिया यासारख्या देशांमध्ये त्यांनी भेटी दिल्या. भारताचे आणि जगाचे सांस्कृतिक संबंध दृढ करण्याची जबाबदारी मोठ्या कौशल्याने आणि समर्थपणे त्यांनी पार पाडली.

सर्वपल्ली राधाकृष्णन आणि भारतरत्न

जागतिक कीर्ती मिळवणारे थोर तत्वज्ञ, महान पंडित, श्रेष्ठ विचारवंत, दीर्घ अनुभवी शिक्षण तज्ञ, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी आपल्या भारतभूमीची बहुमोल सेवा केली. त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपल्या भारत सरकारने त्यांना 1955 साली भारतरत्न हा सर्वोच्च मानाचा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला.

यानंतर ज्यावेळी राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे दोन आठवड्यांकरता रशियाच्या दौऱ्यावर गेले असता त्यांच्या जागी डॉक्टर राधाकृष्णन यांची हंगामी राष्ट्रपती म्हणून नेमणूक करण्यात आली. त्यानंतर ज्यावेळी राजेंद्र प्रसाद भारतात परतले, त्यावेळी त्यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे विश्रांतीसाठी आपली राष्ट्रपतीपदाची सूत्रे त्यांनी डॉक्टर राधाकृष्णन यांच्याकडे सोपवून राष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर उपराष्ट्रपती म्हणून डॉक्टर झाकीर हुसेन यांची निवड करण्यात आली.

डॉक्टर राधाकृष्णन यांची राष्ट्रपती कारकीर्द

13 मे 1962 रोजी डॉक्टर राधाकृष्णन यांनी राष्ट्रपती पदाची सूत्रे हाती घेतली. त्यानंतर मद्रास या ठिकाणी त्यांचा मोठ्या प्रमाणात सत्कार करण्यात आला. त्या सत्कारांमध्ये बोलताना ते म्हणाले की, जगात ज्ञान आणि विज्ञान झपाट्याने वाढत चालले आहे, पण ज्ञानाबरोबर सौजन्याची वाढ होत गेली नाही, तर तारक ज्ञान मारक ठरते. राष्ट्रपती म्हणून त्यांची कारकीर्द खूपच गाजली.

त्यांनी आपले जीवन, धर्म आणि तत्वज्ञान यांच्या अभ्यासात आणि चिंतनात घालवली. जवळपास संपूर्ण जगभर त्यांनी भ्रमंती केली आणि आपल्या देशाचे नाव संपूर्ण जगामध्ये उज्वल केले. त्यांचे वक्तृत्व अत्यंत प्रभावी इंग्रजी भाषेवर असलेली त्यांचे कमालीचे प्रभुत्व तत्वज्ञान हा वक्तृत्वाचा गाभा व त्याच्या भोवती असलेली राजकारणाची गुंफण ते करीत असत. त्यामुळे त्यांच्या वक्तृत्वाची छाप कोठेही भाषण करताना पडत असे. डॉक्टर राधाकृष्णन राष्ट्रपती पदावर आले आणि त्यानंतर आपल्या देशाच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये भर पडली.

सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे पुरस्कार आणि सन्मान

१९३१नाइट बॅचलर/सर पदवी
१९३८ ब्रिटिश अकादमीचे फेलो
१९५४ जर्मन “ऑर्डर पोर ले मेरिट फॉर आर्ट्स अँड सायन्सेस
१९५४भारतरत्न
१९६१ जर्मन पुस्तक व्यापाराचा शांतता पुरस्कार
१९६२जन्मदिन ५ सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो
१९६३ब्रिटीश ऑर्डर ऑफ मेरिट
१९६८साहित्य अकादमी फेलोशिप, डॉ. राधाकृष्णन यांना मिळालेली पहिली व्यक्ती होती
१९७५टेम्प्लेटन पुरस्कार (मरणोत्तर)
१९८९ ऑक्सफर्ड विद्यापीठाने त्यांच्या नावाने शिष्यवृत्ती सुरू केली

डॉक्टर राधाकृष्णन यांची ग्रंथसंपदा

  • पौर्वात्य आणि पाश्चिमात्य धर्म
  • परम पूज्य महात्मा गांधी
  • आजचा आवश्यक नवा धर्म
  • अर्वाचीन तत्त्वज्ञानात धर्माचे स्थान
  • भगवद्गीतेवर भाष्य
  • भगवान बुद्ध आणि त्यांचे धम्मपद
  • तत्त्वज्ञानाची जीवनविषयक मते
  • भारतीय तत्त्वज्ञान भाग पहिला
  • भारतीय तत्त्वज्ञान भाग दुसरा
  • अर्वाचीन भारतीय तत्त्वज्ञान
  • प्रमुख उपनिषदे व त्यांचे तत्त्वज्ञान
  • धर्म आणि समाज
  • जागतिक तत्त्वज्ञानाचा इतिहास
  • पौर्वात्य धर्म आणि पाश्चात्य शास्त्रे
  • आजचा आवश्यक नवा धर्म

डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची पुस्तके

राधाकृष्णन यांनी अनेक लेखने केली. ज्यामध्ये त्यांनी इंग्रजी भाषेमध्ये ६० पेक्षा अधिक पुस्तके लिहिली आहेत. राधाकृष्णन हे एक महान तत्त्वज्ञ व लेखक देखील होते. त्यांनी लिहिलेली पुस्तके खालील प्रमाणे –

  • तरुण लोकांकडून
  • प्रेरणा माणूस
  • स्वातंत्र्य आणि संस्कृती
  • उपनिषदांचा संदेश
  • भारत आणि चीन
  • भारत आणि जग
  • भारताचा आत्मा
  • भारतीय संस्कृतीचे काही विचार
  • भारतीय तत्वज्ञान १
  • भारतीय तत्वज्ञान 2
  • गौतम बुद्ध जीवन आणि तत्वज्ञान

डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची उपलब्धी

  • सर्वपल्ली राधाकृष्णन यांना १९३१ ते १९३६ पर्यंत आंध्र विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून नियुक्त करण्यात आले.
  • १९३६ ते १९५२ च्या काळात डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण ऑक्सफर्ड विद्यापीठाचे प्राचार्य म्हणून काम करत होते.
  • १९४६ मध्ये सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी युनेस्को मध्ये भारतीय प्रतिनिधी म्हणून स्वतःची उपस्थिती नोंदवली.
  • डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन १९३९ ते १९४८ या दरम्यान बनारस हिंदू विद्यापीठाचे कुलपती म्हणून काम पाहत होते.
  • १९५३ ते १९६२ च्या दरम्यान सर्वपल्ली राधाकृष्णन दिल्ली विद्यापीठाचे कुलपती होते.
  • डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस “शिक्षकदिन”
  • आई-वडिलांनंतर संस्कार देण्याचे आणि मुलांना घडवण्याचे काम जर कोण करत असेल, तर ते गुरु, शिक्षक, हे असतात. पाच सप्टेंबर हा दिवस महान व्यक्तिमत्व व आपल्या देशाचे राष्ट्रपती व उपराष्ट्रपती असणारे  सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस हा भारतामध्ये “शिक्षक दिन” म्हणून साजरा केला जातो.

डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची कथा

डॉक्टर राधाकृष्णन भारतातीलच नव्हे तर, जगातील एक नामवंत शिक्षक आणि प्राध्यापक होते. भारतातील अनेक विद्यापीठांच्या बरोबर परदेशातील त्यांनी काही विद्यापीठांच्या मध्ये ज्ञानदानाचे पवित्र असं कार्य केलं होतं.

आणि या कार्यामुळेच पूर्ण जगामध्ये त्यांच्या विद्वत्तेबद्दल, त्यांच्या विनयतेबद्दल, त्यांच्या शालिनीतेबद्दल, सगळ्यांच्या मनामध्ये आदर आणि प्रेम आहे. डॉक्टर राधाकृष्णन यांच्यामधील विनम्रता, त्यांचे ज्ञान, त्यांची विद्वत्ता, याबद्दल भारतातील लोकांच्या बरोबरच पाश्याच लोकांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल प्रचंड आदर आढळतो.

एक ब्रिटिश अधिकारी होता, ज्याला डॉक्टर राधाकृष्णन यांच्या विषयी प्रचंड आदर व प्रेम होते. पण त्या ब्रिटिशा अधिकारला स्वतः ब्रिटिश असण्याचा, ब्रिटिश संस्कृतीचा, आणि ब्रिटिशांच्या ज्ञानाबद्दल थोडासा अहंकार जास्त होता.

त्याच भे ब्रिटिश अधिकाऱ्यांने एक दिवस डॉक्टर राधाकृष्णन यांना घरी पाहुणचारासाठी बोलवलं डॉक्टर राधाकृष्णन यांनी त्या ब्रिटिश अधिकाऱ्याचे निमंत्रण स्वीकारलं व त्यांचा पाहुणचार स्वीकारण्यासाठी त्यांच्या घरी गेले. त्या ब्रिटिशा अधिकाऱ्यांने डॉक्टर राधाकृष्णन यांचा घरामध्ये योग्य ते स्वागत केलं. गप्पा सुरू झाल्या, आणि गप्पाच्या ओघांमध्ये तो ब्रिटिशा अधिकारी एकदा विनोदी शैलीमध्ये मिश्किलपणे म्हणाला की, माफ करा डॉक्टर राधाकृष्णन पण, परमेश्वराचं आम्हा इंग्रज लोकांच्यावर जरा जास्तच प्रेम आहे.

डॉक्टर राधाकृष्ण म्हणाले ते कसं काय बरं ? त्यावर ब्रिटीश अधिकारी म्हणाला, हेच पहा ना की, परमेश्वराच आमच्यावर जास्त प्रेम आहे म्हणून, परमेश्वराने आम्हा ब्रिटिश लोकांना अतिशय गोरं व देखणं बनवलं आणि तुम्हा भारतीयांच्यावर थोडसं प्रेम कमी असल्यामुळे, तुम्हाला थोडसं सावळ.

अधिकाऱ्याचं हे विनोदी बोलणं म्हणजे थोडस टीकापर होतं, पण राधाकृष्णन यांनी लगेच त्याला उत्तर दिलं नाही. ते शांतपणे त्याकडे पाहिले व मंद हसत म्हणाले, तुमचा काहीतरी गोंधळ होतोय. परमेश्वराचं तुमच्यावर नाही तर भारतीय लोकांच्यावर जरा जास्त प्रेम आहे. त्यावर तो ब्रिटिश अधिकारी गोंधळला. तो म्हणाला ते कसं काय बरं ? राधाकृष्णन शांतपणे म्हणाले की, ज्या वेळेला परमेश्वराने ही सृष्टी निर्माण केली. त्यावेळी तो स्वयंपाक घरामध्ये काम करत होता.

स्वयंपाक करत असताना, ज्या भाकरी थोड्याशा अपरिपक्व्व राहिल्या किंवा कच्चा राहिल्या, त्या भाकरी म्हणजे तुम्ही ब्रिटिश लोक आहात आणि ज्या भाकरी चांगल्या भाजल्या गेल्या, ज्या भाकरी पूर्ण परिपक्व झाल्या, त्या म्हणजे आम्ही भारतीय लोक आहोत. म्हणून आम्ही थोडेसे सावळे आहोत. आणि तुम्ही थोडेसे गोरे आहोत. म्हणून परमेश्वराचं तुमच्यापेक्षा भारतीय लोकांवर जास्त प्रेम आहे.

डॉक्टर राधाकृष्णन यांनी दिलेले हे उत्तर ऐकून, तो ब्रिटिश अधिकारी खूप प्रभावित झाला. भाकरीच्या दाखल्याद्वारे, इतक छान स्पष्टीकरण राधाकृष्णन यांनी दिल्याबद्दल, राधाकृष्णन यांच्या बद्दलचा आदर त्याच्या मनामध्ये आणखी वाढला आणि त्यानंतर त्यांचा गप्पा सुरू राहिल्या.

डॉक्टर राधाकृष्णन यांच्या आयुष्यात घडलेला हा छोटा प्रसंग आपल्याला सांगतो कि, आपल्याकडे किती ज्ञान आहे किंवा आपण किती विद्वान आहोत, याची खरी ओळख होत असते ते अडचणीच्या किंवा कठीण प्रसंगांमध्ये. अडचणीच्या किंवा कठीण प्रसंगांमध्ये आपण त्याला कशा पद्धतीने तोंड देतो आणि समोरच्याला न दुखावता एखादा मुद्दा आपण कशा पद्धतीने पटवून देतो, ही खरीत्या ज्ञानी माणसाची किंवा विद्वान माणसाची ओळख असते.

डॉक्टर राधाकृष्णन यांनी ब्रिटिशा अधिकाऱ्याला अतिशय विनम्रपणे आणि सहजपणे आपला मुद्दा व्यवस्थित पटवून दिला आणि तो किती चुकीचा हेही दाखवून दिल. आपल्या आयुष्यामध्ये अशे अनेक प्रसंग येत असतात, त्या अशा वेळेला आपल्याकडच्या ज्ञानाचा आणि विद्वत्त्याचा उपयोग करून, अतिशय विनम्रपणे आणि सहनशीलतेने जर आपण समोरच्या व्यक्तीला न दुखावता त्याच्या प्रश्नांचे योग्य उत्तर देऊन, जर आपलं म्हणणं योग्य करून दाखवलं, तर आपल्यामध्ये कोणतेही मतभेद राहणार नाहीत किंवा कुणालाही आपण दुखावणार नाही.

डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा विद्यार्थ्यांना संदेश

  • ज्ञान व विज्ञान या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तुम्ही जितके जास्त स्वतःला नियंत्रित कराल, तितकेच तुमचे जीवन अधिक आनंदी होईल.
  • सर्वपल्ली राधाकृष्ण यांनी असे म्हटले आहे की, ज्ञान ही सर्वात मोठी संपत्ती आहे. जी कोणी कधीही चोरी  शकत नाही, म्हणून तुम्ही संपत्तीच्या रूपामध्ये ज्ञान जमा करण्यास शिकले पाहिजे.
  • जीवनातील आनंद स्वातंत्र्यातून प्राप्त होतो सर्वात मोठे स्वातंत्र्य म्हणजे, तुमच्या विचारांचे स्वातंत्र्य. कोणत्याही परिस्थितीमध्ये किंवा जीवनाच्या कोणत्याही टप्प्यावर, तुम्हाला तुमच्या अनुभवाच्या आणि ज्ञानाच्या आधारे विचार स्वातंत्र्य प्राप्त होते.
  • एखाद्या परिस्थितीमध्ये तुम्हाला जितका जास्त अनुभव किंवा ज्ञान मिळेल, तितके जास्त स्वातंत्र्य तुम्हाला त्या परिस्थितीमधून मिळेल. जीवनामधील प्रत्येक परिस्थितीमध्ये, आनंदी राहायचे असल्यास, सर्वोत्तम जीवन प्राप्त करायचे असल्यास, तर तुमचा अनुभव आणि ज्ञान यामध्ये वाढ करणे गरजेचे आहे.

डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे शैक्षणिक विचार

  • जर आपण जगाच्या इतिहासाकडे बारकाईने पाहिलं तर, आपल्या लक्षात येते की, खरी सभ्यता ही ज्याच्याकडे स्वतःचा विचार करण्याची क्षमता आहे. जे वेळ आणि अवकाशाच्या खोलात शिरतात व आपल्या ज्ञानाचा उपयोग लोकांच्या समस्या निवारणासाठी करतात.
  • शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या मनात तथ्य रुजवणारा नसतो, तर एक चांगला शिक्षक हा तो असतो, जो मुलांना येणाऱ्या आव्हानांसाठी सक्षम बनवतो.
  • पुस्तक हे एक माध्यम आहे, ज्याचा वापर करून तुम्ही विविध संस्कृतीमध्ये घडू शकता.
  • विचार स्वातंत्र्य असल्याशिवाय, कोणतेही स्वातंत्र्य हे पूर्ण स्वातंत्र्य नसते. कोणत्याही परिस्थितीमध्ये विचार स्वातंत्र्य तुम्हाला तुमच्या ज्ञानाच्या किंवा अनुभवाच्या आधारे प्राप्त होते. जीवनामध्ये तुम्ही जितके ज्ञान ग्रहण कराल, तितके अधिक स्वातंत्र्य तुम्हाला प्राप्त होईल.

डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे निधन

राधाकृष्णन यांचे दि. १७ एप्रिल १९७५ मध्ये हृदयविकारामुळे निधन झाले. त्यांचे शैक्षणिक क्षेत्रामध्ये योगदान हे नेहमी स्मरणात राहील, त्यांनी केलेल्या शैक्षणिक क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानामुळे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस अर्थात ५ सप्टेंबर हा दिवस “शिक्षक दिन” म्हणून साजरा केला जातो.

या दिवशी देशांमधील प्रसिद्ध व उत्कृष्ट शिक्षकांना त्यांच्या अमूल्य कार्यासाठी पुरस्कार दिले जातात. राधाकृष्णन यांच्या मृत्यूनंतर १९७५ च्या दरम्याने यूएस सरकारने टेम्पलटन पुरस्काराने त्यांना गौरवीत केले. जे धर्माच्या क्षेत्रामध्ये प्रगतीसाठी दिले जाते. हा पुरस्कार प्राप्त करणारे ते पहिले भारतीय व्यक्ती होते.

डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन शिक्षक दिन

आई-वडिलांनंतर संस्कार देण्याचे आणि मुलांना घडवण्याचे काम जर कोण करत असेल तर, ते गुरु शिक्षक हे असतात. पाच सप्टेंबर हा दिवस महान व्यक्तिमत्व व आपल्या देशाचे राष्ट्रपती व उपराष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस हा भारतामध्ये शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.

डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या बद्दल दहा ओळी

  • आपल्या देशाला अनेक महान पुरुषांचा सहवास लाभला आहे. त्यापैकी एक म्हणजे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन.
  • डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे एक महान तत्त्वज्ञान, विचारवंत, शिक्षण, तज्ञ, आदर्श शिक्षक व भारताचे दुसरे राष्ट्रपती होते.
  • डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या आईचे नाव सीताम्मा व वडिलांचे नाव सर्वपल्ली विरास्वामी हे होते.
  • डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी मद्रास क्वेश्चन कॉलेजमधून स्वतःचे पदवीचे शिक्षण पूर्ण केले.
  • शिक्षण पूर्ण केल्यानंतर, राधाकृष्णन यांनी देशांमधील विविध विद्यापीठांमध्ये प्राध्यापक म्हणून सेवा कार्य पूर्ण केले.
  • इसवी सन १९५४ मध्ये भारत सरकारने डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांना देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न देऊन सन्मानित केले.
  • राधाकृष्णन यांनी स्वतःच्या जीवनामध्ये चाळीस वर्ष शिक्षण क्षेत्रासाठी समर्पित केली.
  • सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ०५ सप्टेंबर हा दिवस भारतामध्ये शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.
  • दिनांक १७ एप्रिल १९७५ रोजी राधाकृष्णन यांनी अखेरचा श्वास घेतला.
  • डॉक्टर राधाकृष्णन हे जरी देहाने जगामध्ये नसले तरी त्यांचे विचार हे अमर आहेत.
  • सन १९३१ ते १९३९ च्या दरम्यान राष्ट्रसंघामध्ये भारत देशाचे प्रतिनिधित्व केले.
  • डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे शिक्षणावर कट्टर विश्वास ठेवणाऱ्या अनेक सुप्रसिद्ध विद्वान आणि आदर्श शिक्षक होते.
  • सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे अध्यापन या व्यवसायावर मनापासून प्रेम होते. भारत देशाचे भविष्य घडवण्यात त्यांनी शिक्षक म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली.

FAQ

१. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे पूर्ण नाव काय?

डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म ०५ सप्टेंबर १८८८ मध्ये तमिळनाडू मधील तिरूमणी या एका लहानशा ब्राम्हण कुटुंबामध्ये झाला. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या वडिलांचे नाव सर्वपल्ली वीरस्वामी होते.

२. राधाकृष्णन यांना भारतरत्न कोणत्या वर्षी मिळाला?

इसवी सन १९५४ मध्ये भारत सरकारने डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांना देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न देऊन सन्मानित केले.

३. डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन शिक्षक होते का?

आई-वडिलांनंतर संस्कार देण्याचे आणि मुलांना घडवण्याचे काम जर कोण करत असेल तर, ते गुरु शिक्षक हे असतात. पाच सप्टेंबर हा दिवस महान व्यक्तिमत्व व आपल्या देशाचे राष्ट्रपती व उपराष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस हा भारतामध्ये शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.

४. ५ सप्टेंबर हा कोणाचा वाढदिवस आहे?

सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ०५ सप्टेंबर हा दिवस भारतामध्ये शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.

निष्कर्ष

मित्रहो, आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या यांच्या बद्दल माहिती दिली आहे. हा लेख तुम्हाला कसा वाटला, हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. लेख आवडल्यास तुमच्या इतर मित्रपरिवारांसोबत नक्की शेयर करा. धन्यवाद.

Leave a comment