TOP 30 PLACES TO VISIT IN MONSOON IN MAHARASHTRA : PART 02 – मित्रहो आपण सर्वांनी पावसाळ्यातील, ३० अप्रतिम महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे भाग ०१ हा लेख वाचला असेलच. आज आम्ही आमच्या या दुसऱ्या लेखातून तुम्हाला मान्सून मध्ये महाराष्ट्रातील अजून कोणती पावसाळ्यात फिरण्याची ठिकाणे – सुंदर पर्यटन स्थळे आहेत, याची माहिती देत आहोत. या माहितीच्या मदतीने तुम्ही देखील या पावसाळ्यात थोडासा वेळ स्वतःसाठी काढून यापैकी काही ठिकाणी नक्की भेट देऊ शकाल. चला तर मित्रांनो, लगेच महाराष्ट्रातील TOP 30 PLACES TO VISIT IN MONSOON IN MAHARASHTRA PART 2 कोणती आहेत ते जाणून घेऊया.
पावसाळ्यात फिरण्याची ठिकाणे – PLACES TO VISIT IN MONSOON IN MAHARASHTRA
१६. कळसुबाई
महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर म्हणून ज्याची ओळख आहे ते म्हणजे कळसुबाई. कळसुबाईचे ट्रेकिंग हे एक लोकप्रिय ट्रेकिंग असून, पावसाळ्यात मुंबई जवळील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर असून, सह्याद्रीच्या पर्वतरांगेमध्ये वसलेले आहे. या शिखराची उंची ही १६४६ मीटर इतकी आहे. या शिखराची सुरुवात ही बारी गावाच्या पायथ्यापासून होते.
स्थान –
कळसुबाई, जिल्हा-नाशिक, महाराष्ट्र.
मुंबई ते कळसुबाई अंतर आणि आवश्यक कालावधी –
मुंबई ते कळसुबाई हे अंतर साधारणतः १६० किलोमीटर इतके आहे व प्रवासासाठी साधारणतः २ ते ३ तास लागू शकतात.
पुणे ते कळसुबाई अंतर आणि आवश्यक कालावधी –
पुणे ते कळसुबाई अंतर हे साधारणतः १८० किलोमीटर असून प्रवासासाठी अंदाजे 3 तास लागू शकतात.
कळसुबाई जवळ करण्यासारख्या गोष्टी-
- कळसुबाई ट्रेकिंग
- रतनगड किल्ला ट्रेकिंग
- भंडारदरा तलाव कॅम्पिंग
कळसुबाई जवळील प्रेक्षणीय स्थळे –
- रतनगड किल्ला
- भंडारदरा तलाव
- अमृतेश्वर मंदिर
- अम्ब्रेला धबधबा
- सांधण व्हॅली
कालावधी/ दिवस –
कळसुबाई शिखर चढण्यासाठी तुम्हाला एक दिवस पुरेसा आहे व त्या बाजूची इतर प्रेक्षणीय स्थळे फिरण्यासाठी तुम्हाला एक ते दोन दिवस लागू शकतात.
१७. दूरशेत
दूरशेत हे खोपोली मध्ये असून, सोशल मेडीयाच्या काळात अल्पावधीत लोकप्रिय झालेले पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणी असलेली प्रमुख आकर्षणे म्हणजे गरम पाण्याचे झरे, विलोभनीय डोंगररांगा, ओढे इत्यादी. दूरशेतला भेट दिल्यानंतर त्या ठिकाणी असणाऱ्या निसर्गाचे विलोभनीय दृश्य व शांततापूर्ण वातावरणामुळे मन तृप्त होते.
स्थान –
दूरशेत, खोपोली महाराष्ट्र.
मुंबई ते दूरशेत अंतर व आवश्यक कालावधी –
मुंबई ते दृश्य हे अंतर साधारणतः ७८ किलोमीटर इतके असून तुम्हाला दीड तास लागू शकतो.
पुणे ते दूरशेत अंतर व आवश्यक कालावधी –
पुण्यावरून दूर शेत ला जाण्यासाठी साधारणतः १०० किलोमीटर एवढे अंतर पार करावे लागते यासाठी तुम्हाला १ तास ५० मिनिटे लागू शकतात.
दूरशेतावर करण्यासारख्या गोष्टी –
- ट्रेकिंग
- फॉरेस्ट ट्रेल
- नाईट सफारी
- पाली फोर्ट ट्रेकिंग
दूरशेत जवळील प्रेक्षणीय स्थळे –
- पाली किल्ला
- पाली गणपती मंदिर
- महाड गणपती मंदिर
- नारायण धाम मंदिर
कालावधी /दिवस –
दूरशेत पर्यटन स्थळाची सफर करण्यासाठी साधारणतः तुम्हाला एक ते दोन दिवस आवश्यक आहेत.
१८. रंधा धबधबा
रंधा हा धबधबा अहमदनगर जिल्ह्यामध्ये असून भंडारदरा-राजूर रस्त्यावर स्थित आहे.
स्थान –
रंधा धबधबा, अहमदनगर जिल्हा, महाराष्ट्र.
मुंबई ते रंधा धबधबा अंतर व आवश्यक कालावधी –
मुंबई ते रंदा धबधबा जाण्यासाठी तुम्हाला साधारणतः १७८ किलोमीटर अंतर पार करावे लागेल. त्यासाठी तुम्हाला दोन तास लागू शकतात.
पुणे ते रंधा धबधबा अंतर व आवश्यक कालावधी –
पुणे ते रंधा धबधबा जाण्यासाठी साधारणतः तुम्हाला १५६ किलोमीटर एवढे अंतर पार करावे लागते. या प्रवासासाठी तुम्हाला अंदाजे तीन तास आवश्यक आहे.
रंधा धबधबा जवळ करण्यासारख्या गोष्टी –
- विश्रामगड किल्ला ट्रेकिंग
- रंधा धबधबा ट्रेकिंग
- रतनगड किल्ला ट्रेकिंग
- कॅम्पिंग
- फोटोशूट
रंधा धबधबा जवळील प्रेक्षणीय स्थळे –
- भंडारदरा हिल स्टेशन
- अम्ब्रेला धबधबा
- अमृतेश्वर मंदिर
- हरिश्चंद्रेश्वर मंदिर
- कुलंग किल्ला
कालावधी /दिवस –
रंधा धबधबा व त्या जवळील प्रेक्षणीय स्थळे एक्सप्लोर करण्यासाठी तुम्हाला साधारणतः तीन ते चार दिवस लागू शकतात.
१९. कसारा घाट
हा घाट साहसी निसर्ग प्रेमींसाठी लोकप्रिय आहे. कसारा घाटच्या टेकड्यांमध्ये तुम्ही एका लहानशा ट्रेकचा आनंद निश्चितच घेऊ शकता. या टेकड्यांच्या माध्यमाने तुम्ही घाटाच्या जवळ असणाऱ्या नैसर्गिक सौंदर्याचे प्रतिक असणाऱ्या धबधब्यांपर्यंत जाण्याचा मार्ग देखील या घाटातून शोधू शकता. हा घाट हिवाळ्यामध्ये धुक्याने झाकला जातो व हे ठिकाण पृथ्वीवर असलेले एक स्वर्गच भासते.
स्थान –
कसारा घाट, इगतपुरी, महाराष्ट्र
मुंबई ते कसारा घाट अंतर व आवश्यक कालावधी –
मुंबई ते कसारा घाट हे अंतर साधारणतः १०८ किलोमीटर असून यासाठी साधारणतः २ तास लागू शकतात.
पुणे ते कसारा घाट अंतर व आवश्यक कालावधी –
पुणे ते कसारा घाट हे अंतर साधारणतः २२२ किलोमीटर असून यासाठी तुम्हाला ४ तास लागू शकतात.
कसारा घाट जवळ करण्यासारख्या गोष्टी –
- कसारा घाट ट्रेकिंग
- विहिगाव धबधबा ट्रेकिंग
- कॅमल व्हॅली
- अशोका धबधबा
- त्रिंगलवाडी किल्ला ट्रेक
कसारा घाट जवळील प्रेक्षणीय स्थळे –
- विपश्यना इंटरनॅशनल अकॅडमी
- म्यानमार गेट
- इगतपुरी कॅम्पिंग
- भावली धरण
- कुलंग किल्ला
कालावधी/ दिवस –
कसारा घाटा जवळील प्रेक्षणीय स्थळे एक्सप्लोर करण्यासाठी साधारणतः तुम्हाला तीन ते चार दिवस लागू शकतात.
२०. इगतपुरी
इगतपुरी हे ठिकाण महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय पावसाळी पर्यटन स्थळ आहे. इगतपुरी हे महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील एक तालुक्याचे ठिकाण आहे. इगतपुरी हे हिल स्टेशन असल्याने हे महाराष्ट्रातील बऱ्याच पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. या पर्यटनाच्या परिसरात अनेक सुंदर पर्यटन स्थळे आहेत, जीपर्यटकांचे लक्ष वेधून घेतात. महाराष्ट्रातील बरेच निसर्गप्रेमी पर्यटक आवर्जून या ठिकाणाला भेट देण्यासाठी येत असतात.
स्थान –
इगतपुरी, जिल्हा-नाशिक, महाराष्ट्र.
मुंबई ते इगतपुरी अंतर व आवश्यक वेळ –
मुंबई वरून इगतपुरी ला जाण्यासाठी तुम्हाला साधारणतः १२० किलोमीटर अंतर पार करावे लागते यासाठी तुम्हाला २ तास २० मिनिटे लागतात.
पुणे ते इगतपुरी अंतर व आवश्यक वेळ –
पुण्यावरून इगतपुरी ला जाण्यासाठी तुम्हाला साधारणतः २३८ किलोमीटर अंतर पार करावे लागते यासाठी तुम्हाला ४ तास ४० मिनिटे लागू शकतात.
इगतपुरी जवळ करण्यासारख्या गोष्टी –
- इगतपुरी कॅम्पिंग
- कळसुबाई ट्रेकिंग
- कळसुबाई कॅम्पिंग
- हरिहर किल्ला ट्रेकिंग
- तळेगाव तलाव कॅम्पिंग
इगतपुरी जवळील प्रेक्षणीय स्थळे –
- कसारा घाट
- कॅमल व्हॅली पॉईंट
- भावली धरण
- म्यानमार गेट
- सांधण व्हॅली
- विहिगाव धबधबा
- त्रिंगलवाडी किल्ला
- कळसुबाई शिखर
- घाटनदेवी मंदिर
- इगतपुरी
कालावधी /दिवस –
इगतपुरी व इगतपुरी जवळील पर्यटन स्थळे पाहण्यासाठी तुम्हाला साधारणतः तीन ते चार दिवस आवश्यक आहेत.
२१. सिंहगड किल्ला
सिंहगड हा किल्ला पुणे जिल्ह्यात असून, या किल्ल्याची बांधणी ही शत्रूंपासून नैसर्गिक संरक्षण देण्याच्या धोरणात्मकदृष्ट्या केली होती. सिंहगड या किल्ल्यावरून तुम्ही राजगड, पुरंदर, तोरणा इत्यादी प्राचीन किल्ले पाहू शकता.
स्थान –
सिंहगड किल्ला, पुणे, महाराष्ट्र.
मुंबई ते सिंहगड किल्ला अंतर व आवश्यक कालावधी –
मुंबई ते सिंहगड किल्ला हे अंतर साधारणतः १७७ किलोमीटर असून यासाठी अंदाजे २ तास ३० मिनिटे लागतात.
पुणे ते सिंहगड किल्ला अंतर व आवश्यक कालावधी –
पुण्यापासून सिंहगडा किल्ला ३५ किलोमीटर इतक्या अंतरावर असून साधारणतः तुम्हाला एक तास लागू शकतो.
सिंहगड जवळील प्रेक्षणीय स्थळे –
- राजगड किल्ला
- राजीव गांधी झूलॉजिकल पार्क
- तोरणा किल्ला
कालावधी /दिवस –
सिंहगड किल्ला व त्या जवळील प्रेक्षणीय स्थळे व ट्रेकिंग करण्यासाठी तुम्हाला साधारणतः एक ते दोन दिवस आवश्यक आहेत.
२२. दिवेआगर-श्रीवर्धन
दिवेआगर-श्रीवर्धन हा सुंदर परिसर तुम्हाला तुमची सुट्टी घालवण्यासाठी शांतता व निसर्गरम्य परिसराचा अनुभव घेण्यासाठी दिवेआगर-श्रीवर्धन हा नक्कीच योग्य पर्याय आहे. श्रीवर्धन हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील असून, महाराष्ट्रातील लोणावळा डोंगरांमध्ये वसलेला आहे. खंडाळा चा घाट सुरू होताना राजमाची नावाचा पॉईंट आहे येथून समोरच्याच शिखरावर राजमाची किल्ला आहे. राजमाचीच्या दोन बालेकिल्ल्यांपैकी सर्वात उंच बालेकिल्ला म्हणजे किल्ला श्रीवर्धन .
स्थान –
दिवेआगर -श्रीवर्धन, रायगड जिल्हा, महाराष्ट्र.
मुंबई ते दिवेआगर श्रीवर्धन बीच अंतर आवश्यक कालावधी –
मुंबई ते दिवेआगर श्रीवर्धन बीच हे अंतर साधारणतः १७१ किलोमीटर असून यासाठी तुम्हाला तीन तास लागू शकतात.
पुणे ते श्रीवर्धन दिवेआगर अंतर व आवश्यक कालावधी –
पुणे ते दिवेआगर श्रीवर्धन अंतर हे साधारणतः १८५ किलोमीटर एवढे असून यासाठी तुम्हाला साधारणतः तीन तास लागू शकतात.
दिवेआगर श्रीवर्धन जवळ करण्यासारख्या गोष्ट –
- बीच वॉकिंग
- फणसाड पक्षी अभयारण्य
- श्रीवर्धन किल्ला ट्रेकिंग
- मुरुड जंजिरा किल्ला ट्रेकिंग
दिवेआगर श्रीवर्धन जवळील प्रेक्षणीय स्थळे –
- फणसाड वन्यजीव अभयारण्य
- हरीहरेश्वर बीच
- कोंडीवली बीच
- बाणकोट किल्ला
- मुरुड जंजिरा किल्ला
- पेशवे स्मारक
- आरवी बीच
- दिवेआगर बीच
- श्रीवर्धन बीच
- हरिहरेश्वर मंदिर
कालावधी /दिवस –
दिवेआगर श्रीवर्धन हे ठिकाण एक्सप्लोर करण्यासाठी साधारणतः तुम्हाला ३ ते ४ दिवस लागू शकतात.
२३. तापोळा
महाबळेश्वर या सुंदर हिल स्टेशन मध्ये वसलेले तापोळा हे पावसाळ्यातील भेट देणाऱ्या प्रेक्षणीय स्थळांपैकी एक आहे. महाबळेश्वर हा प्रदेश पावसाळ्यामध्ये परिपूर्ण निसर्गाचा आनंद देतो. तापोळा हे महाबळेश्वर मधील एक अप्रतिम सौंदर्याचे सर्वोत्तम उदाहरण असून या ठिकाणी घनदाट जंगले, पर्वत अत्यंत मोहक आहेत.
स्थान –
तापोळा,महाबळेश्वर, महाराष्ट्र.
मुंबई ते तापोळा अंतर व लागणारा कालावधी –
मुंबईवरून तापोळ्याला जाण्यासाठी साधारणतः २२७ किलोमीटर अंतर पार करावे लागते व यासाठी साधारणतः ६ तास लागतात
पुणे ते तापोळा अंतर व कालावधी –
पुण्यावरून तापोळ्याला जाण्यासाठी साधारणतः १३४ किलोमीटर अंतर पार करावे लागते तर यासाठी तुम्हाला ३ तास २० मिनिटे एवढे अंतर पार करावे लागते.
तापोळा जवळ करण्यासारख्या गोष्टी-
- हाय किंग
- ट्रेकिंग
- कॅम्पिंग
- टूर्स अँड साईटसिंगग
- डे ट्रिप्स
- कल्चरल अँड थीम टूर
तापोळा जवळील प्रेक्षणीय स्थळे –
- महाबळेश्वर हिल स्टेशन
- कृष्णाबाई मंदिर
- महाबळेश्वर मंदिर
- एलिफंट हेड पॉईंट
- श्री पंचगंगा मंदिर
- प्रतापगड किल्ला
- वेण्णा तलाव
- विल्सन पॉईंट
कालावधी /दिवस –
महाबळेश्वर मधील तापोळा फिरण्यासाठी तुम्हाला साधारणतः दोन ते तीन दिवस लागू शकतात.
२४. लवासा
महाराष्ट्रामध्ये असून देखील जर तुम्हाला विदेशी शहरांमध्ये फिरण्याची मजा घ्यायची असेल, तर लवासा हा एक उत्तम पर्याय आहे. पावसाळ्यात भेट देण्याच्या सर्वोत्तम ठिकाणांपैकी लवासा हे एक सुंदर निसर्गरम्य, नयनरम्य विलोभनीय प्रेक्षणीय स्थळ आहे.
स्थान –
लवासा, पुणे, महाराष्ट्र.
मुंबई ते लवासा अंतर व आवश्यक कालावधी –
मुंबईवरून लावासा आणि त्यांनी साधारणतः १८८ किलोमीटर एवढे असून यासाठी आवश्यक तो कालावधी ४तास ३० मिनिटे लागतात.
पुणे ते लवासा टाईम आवश्यक कालावधी –
पुण्यावरून लवासाला जाण्यासाठी साधारणतः ५७ किलोमीटर एवढे अंतर पार करावे लागते यासाठी साधारणतः २ तास २० मिनिटे लागतात.
लवासा जवळ करण्यासारख्या गोष्टी –
- तामघर धरण कॅम्पिंग
- लवासा नेचर ट्रेल
लवासा जवळील प्रेक्षणीय स्थळे –
- लेकशोअर वॉटर स्पोर्ट
- तिकोना किल्ला
- घनगड किल्ला
- ताम्हिणी घाट
- मुळशी तलाव
- मुठा नदी
कालावधी/ दिवस –
लवासा या ठिकाणी प्रेक्षणीय स्थळे बघण्यासाठी तुम्हाला साधारणतः एक ते दोन दिवस लागू शकतात.
२५. कोलाड
तुम्ही तुमची पावसाळी सहल मजेदार व सहासी बनवण्यास उत्सुक असालच नाही का? अशावेळी तुम्ही पावसाळ्यातील सर्वोत्तम ठिकाण शोधत असाल तर महाराष्ट्रातील सुंदर विकेंड डेस्टिनेशन म्हणून कोलाडकडे पाहिले जाते. फोटोशूट साठी, राहण्याची तसेच उत्साही एडवेंचर्स ऍक्टिव्हिटीसाठी, विविध प्रकारच्या सोयी उपलब्ध आहेत. या ठिकाणी वाईट वॉटर राफ्टींग सर्वात प्रसिद्ध खेळ आहे.
स्थान –
कोलाड, रायगड, महाराष्ट्र.
मुंबई ते कोलाड अंतर व आवश्यक कालावधी –
मुंबई ते कोलाड हे अंतर साधारणतः १२० km एवढे असून प्रवासाठी साधारणतः १.५ ते २ तास लागू शकतात.
पुणे ते कोलाड अंतर व आवश्यक कालावधी –
पुणे ते कोलाड हे अंतर साधारणतः ११० km एवढे असून प्रवासाठी साधारणतः ३ तास लागू शकतात.
कोलाड जवळ करण्याच्या गोष्टी –
- व्हाईट वॉटर राफ्टींग
- झिप लाईंग
- ट्रेकिंग
- फोटोशूट
- कॅम्पिंग
कोलाड जवळील प्रेक्षणीय स्थळे –
- सुरगड फोर्ट
- सुरगड
- ताम्हिणी घाट
- कुंडलिका नदी
- कोलाड बंजी जम्पिंग
कालावधी /दिवस –
कोलाड जवळील प्रेक्षणीय स्थळांना भेट देण्यासाठी तुम्हाला साधारणतः एक ते दोन दिवस पुरेसे आहे.
२६. जव्हार
जव्हार हे हिल स्टेशन ठाणे जिल्ह्यातील एक महत्त्वपूर्ण पर्यटन ठिकाण आहे. हा प्रदेश दऱ्याखोऱ्यांनी घनदाट जंगलांनी व त्याच्या विलोभनीय हवामानाने प्रसिद्ध असून, महाराष्ट्रामधील इतर हिल स्टेशनच्या तुलनेमध्ये जव्हार हिल स्टेशन एक अद्भुत प्रकारचा आनंद देते.
स्थान –
जव्हार, ठाणे जिल्हा, महाराष्ट्र.
मुंबई ते जव्हार अंतर व आवश्यक कालावधी –
मुंबई ते जव्हार हे अंतर साधारणतः १५० किलोमीटर इतके असून प्रवासासाठी साधारणतः तुम्हाला दोन ते तीन तास लागू शकतात.
पुणे ते जव्हार अंतर व आवश्यक कालावधी –
पुणे ते जव्हार हे अंतर साधारणतः २५० किलोमीटर इतके असून यासाठी तुम्हाला पाच तास लागू शकतात.
जव्हार जवळ करण्यासारख्या गोष्टी –
- फोटोशूट
- धबधबा धबधबा ट्रेकिंग
- शॉपिंग
- बोटिंग
- भोपालगड किल्ला ट्रेकिंग
जव्हार जवळील प्रेक्षणीय स्थळे –
- भोपाल गड किल्ला
- सनसेट पॉईंट
- हनुमान पॉईंट
- जय विलास पॅलेस
कालावधी /दिवस –
जव्हार व त्या ठिकाणी प्रेक्षणीय स्थळे एक्सप्लोर करण्यासाठी साधारणतः तुम्हाला दोन ते तीन दिवस लागू शकतात.
२७. रायगड
रायगड हा किल्ला महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यामध्ये असून, हा सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेला एक ऐतिहासिक व प्राचीन किल्ला आहे. या किल्ल्याची समुद्रपाटी पासूनची उंची सुमारे ८२० मीटर इतकी असून, महाराष्ट्र साम्राज्यातील इतिहासामध्ये याची एक खास ओळख आहे . राजे शिवाजी यांचा राज्याभिषेक सोहळा देखील याच रायगड किल्ल्यावरती झाला आहे. या किल्ल्याचे प्राचीन नाव हे रायरी असे होते. व ते पुढे बदलून महाराजांनी रायगड असे ठेवले.
स्थान –
रायगड, महाराष्ट्र.
मुंबई ते रायगड अंतर व आवश्यक कालावधी –
मुंबई ते रायगड हे अंतर साधारणतः १०० किलोमीटर एवढे असून साधारणतः तुम्हाला दोन तास लागू शकतात.
पुणे ते रायगड अंतर व आवश्यक कालावधी –
पुणे ते रायगड हे अंतर साधारणतः १४३ किलोमीटर असून यासाठी तुम्हाला २ ते २.५ तास लागू शकतात.
रायगड जवळ करण्यासारख्या गोष्टी –
- रायगड किल्ला ट्रेकिंग
- पक्षी व वन्यजीव निरीक्षण
- रायगड म्युझियम
- कॅम्पिंग
- बोटिंग
रायगड जवळील प्रेक्षणीय स्थळे –
- कोंढाणे लेणी
- रायगड किल्ला
- फणसाड अभयारण्य
- पिसरनाथ महादेव मंदिर
- वर्सोली बीच
- श्री जगदीश्वर मंदिर
- इमॅजिका
कालावधी /दिवस –
रायगड किल्ला व त्या ठिकाणी प्रेक्षणीय स्थळे एक्सप्लोर करण्यासाठी साधारणतः तुम्हाला तीन ते चार दिवस लागू शकतात.
२८. कोयना वन्यजीवन अभयारण्य
महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील कोयना वन्यजीव अभयारण्य हे एक नैसर्गिक जागतिक वारसा स्थळ असून, हे वन्यजीव अभयारण्य सातारा व महाराष्ट्र जिल्ह्यातील महत्त्वाचे पक्षी अभयारण्य म्हणून नियुक्त केले आहे.
स्थान –
कोयना वन्यजीव, अभयारण्य,सातारा, महाराष्ट्र.
मुंबई ते कोयना वन्यजीव अभयारण्य अंतर व आवश्यक कालावधी –
मुंबई ते कोयना वन्यजीव अभयारण्य हे साधारणतः २७५ किलोमीटर एवढे असून प्रवासासाठी तुम्हाला पाच तास लागू शकतात.
पुणे ते कोयना वन्यजीव अभयारण्य अंतर व आवश्यक कालावधी –
पुणे ते कोयना वन्यजीव अभयारण्य हे अंतर साधारणतः १५० किलोमीटर इतके असून यासाठी तुम्हाला ३ तास ५० मिनिटे लागू शकतात.
कोयना वन्यजीव अभयारण्य येथे करण्यासारख्या गोष्टी –
- पक्षी निरीक्षण
- फोटोशूट
- शिवसागर स्कूटर बोट राईड
- साईट सिइग
कोयना वन्यजीव अभयारण्या जवळील प्रेक्षणीय स्थळे –
- शिवसागर
- कोयना वन्यजीव अभयारण्य
- ठोसेघर धबधबा
- कास तलाव
- लॉडवीक पॉईंट
कालावधी /दिवस –
कोयना वन्यजीव अभयारण्य व सातारा मधील इतर प्रेक्षणीय स्थळे एक्सप्लोर करण्यासाठी साधारणतः तुम्हाला तीन ते चार दिवस लागू शकतात.
२९. अलिबाग
महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील अलिबाग हे ठिकाण सुंदर आणि समृद्ध समुद्रकिनारा असलेले पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते. अलिबाग मधील समुद्रकिनाऱ्यामुळे हे महाराष्ट्रातील पिकनिक स्पॉट बनलेले आहे. येथील स्वच्छ समुद्रकिनारा, तसेच कोरलाई किल्ल्याची ट्रेकिंग ही पावसाळ्यात भेट देण्याची सर्वोत्तम ठिकाण आहेत. कोरलाई किल्ला अलिबाग पासून साधारणतः १ तासावर आहे.
स्थान –
अलिबाग, जिल्हा-रायगड, राज्य-महाराष्ट्र.
मुंबई ते अलिबाग अंतर व आवश्यक कालावधी –
मुंबई ते अलिबाग हे अंतर साधारणतः ९६ किलोमीटर असून यासाठी साधारणतः २ तास ४५ मिनिटे लागतात.
पुणे ते अलिबाग अंतर व आवश्यक कालावधी –
पुणे ते अलिबाग हे अंतर साधारणतः १४३ किलोमीटर एवढे असून पुणे ते अलिबाग यासाठी तुम्हाला साडेतीन तास लागू शकतात.
अलिबाग मध्ये करण्यासारख्या गोष्टी –
- कोरलाई किल्ल्याची ट्रेकिंग
- सॅंड बाईक
- कोलाबा किल्ला ट्रेकिंग
अलिबाग जवळील प्रेक्षणीय स्थळे :-
- खांदेरी किल्ला
- मांडवा बीच
- ब्रह्मकुंड
- मुरुड बीच
- कनकेश्वर वन
- किहीम बीच
- नागोवा बीच
- कुलाबा किल्ला
- अलिबाग बीच
- मुरुड जंजिरा किल्ला
कालावधी/ दिवस –
संपूर्ण अलिबागाचे दर्शन घेण्यासाठी व त्या ठिकाणी फिरण्यासाठी तुम्हाला साधारणतः २ ते ३ दिवस आवश्यक आहेत.
३०. हरिहरेश्वर
श्री क्षेत्र हरिहरेश्वर हे कोकणातील एक निसर्गरम्य व पवित्र तीर्थस्थान आहे. अगस्ती म्हणून स्थापलेले अति प्राचीन दगडी कलाकृतीने नटलेले, ब्रम्हा, विष्णू, शिवपार्वती इत्यादी टेकड्यांनी वेढलेले, नारळ बाग व वनश्रेणी समृद्ध गायत्री व सावित्री नद्यांच्या संगम स्थानी उभारलेले, अतिशय देखणे व सुंदर मंदिर पुराणातही पांडवांनी या मंदिरात भेट दिल्याचा उल्लेख आहे. तसेच हरिहरेश्वर हे पेशव्यांचे कुलदैवत होते इसवी सन १७२३ साली श्रीमंत पहिले बाजीराव पेशवे यांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केला होता. हरिहरेश्वर, काळभैरव योगेश्वरी, सिद्धिविनायक, व हनुमान अशा चार मंदिरांच्या दर्शनानंतर विष्णुपद -गायत्री तीर्थ- वक्रतीर्थ -सूर्यतीर्थ यज्ञकुंड अशी अनेक ठिकाणी पाहण्यासारखे आहेत.
स्थान –
हरिहरेश्वर, जिल्हा-रायगड महाराष्ट्र,
मुंबई ते हरिहरेश्वर अंतर व आवश्यक कालावधी-
मुंबई ते हरिहरेश्वर हे अंतर साधारणतः २१० किलोमीटर असून यासाठी तुम्हाला ४ तास ३० मिनिटे लागू शकतात.
पुणे ते हरिहरेश्वर अंतर व लागणारा कालावधी –
पुणे ते हरिहरेश्वर अंतर हे साधारणतः १८० किलोमीटर असून यासाठी तुम्हाला ४ तास एवढा कालावधी लागू शकतो.
हरिहरेश्वर मध्ये करण्यासारख्या गोष्टी –
- शॉपिंग
- बोटिंग
- हरिहरेश्वर बीच एक्सप्लोर
हरिहरेश्वर जवळील प्रेक्षणीय स्थळे –
- हरिहरेश्वर बीच
- गणेश गल्ली
- कालभैरव मंदिर
- दिवेआगर बीच
- श्रीवर्धन बीच
- सोमजादेवी मंदिर
कालावधी/दिवस –
हरिहरेश्वर एक्सप्लोर करण्यासाठी तुम्हाला साधारणतः २ ते ३ दिवस लागू शकतात.
निष्कर्ष
आम्ही आमच्या लेखातून आपणास महाराष्ट्रातील पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या ३० PLACES TO VISIT IN MONSOON IN MAHARASHTRA part 02 पैकी १५ पर्यटन स्थळांची माहिती दिलेली आहे. इतर १५ ठिकाणांच्या माहिती साठी पावसात महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे भाग ०१ नक्की वाचा व कमेंट करून आम्हास नक्की कळवा.
धन्यवाद .