बिरसा मुंडा माहिती मराठी Birsa Munda Information In Marathi

भारताला स्वातंत्र्य मिळून देण्यासाठी अनेक शूरवीरांनी आपल्या प्राणांचा त्याग केला, त्यातीलच एक क्रांतिकारक म्हणजे धरती आबा म्हणजेच बिरसा मुंडा.

बिरसा यांना देवाचा दर्जा दिला गेला आहे. आदिवासी समाजात आजही त्यांची पूजा केली जाते, आणि देश त्यांची जयंती जनजाती गौरव दिवस म्हणून साजरी करतो.

पाणी, जंगल आणि भूमीसाठीची लढाई शतकांहून जुनी आहे. या लढाईत शेकडो आले आणि गेले, परंतु हा लढा आजही कायम आहे. आज आपण वीर आणि बंडखोर नेत्याबद्दल बोलत आहोत, ज्याच्या एका आदेशावर शेकडो लोक जमले आणि त्यांनी इंग्रजांना खाली गुडघे टेकायला भाग पाडले व इंग्रजांवर वार केले.

आम्ही बोलत आहोत, आदिवासी क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांच्या बद्दल, जे आदिवासी नेते आणि लोकनायक होते. बिरसा यांचे पूर्ण नाव बिरसा सुगना मुंडा. यांचा जन्म दि.15 नोव्हेंबर १८७५ मध्ये झाला. त्यांचे जन्मस्थान उलीहातू रांची आणि त्यांचा मृत्यू हा दि. ०९ जून १९०० मध्ये झाला.

आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास बिरसा यांच्याबद्दल माहिती दिली आहे. हि माहिती व हा लेख जाणून घेण्यासाठी शेवट पर्यंत नक्की वाचा.

Table of Contents

बिरसा मुंडा माहिती मराठी Birsa Munda Information In Marathi

नाव बिरसा मुंडा
ओळख आदिवासी क्रांतिकारी
जन्म तारीख दि. १५ नोव्हेंबर १८७५
जन्म स्थळ रांची जिल्ह्यातील उलीहातू गावात
आईचे नाव कर्मी हातू मुंडा
वडिलांचे नाव सगुणा मुंडा
वैवाहिक स्थिती अविवाहित
मृत्यू ९ जून १९००

बिरसा मुंडा कोण होते ?

ब्रिटिशाविरुद्धच्या स्वातंत्र्यलढ्यात मुंडाची महत्त्वपूर्ण भूमिका होती. हा जननायक मुंडा जातीचा होता. सध्याच्या भारतात रांची आणि सिंह भूमीचे आदिवासी मुंडाला बिरसा भगवान म्हणून ओळखतात.

Birsa Munda Information In Marathi

आदिवासी जमातीवर होत असलेल्या इंग्रजांच्या दडपणाविरुद्ध, बिरसा मुंडा यांनी जो लढा लढविला, त्यामुळे त्यांना हा मान मिळाला आहे. १९ व्या शतकात बिरसा मुंडा भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासातील एक महत्त्वाचे लोकनेते म्हणून उदयास आले.

हे सुद्धा वाचा –

आदिवासींना लाभलेल्या त्यांच्या भूमी युद्धाचा वारसा शतकोंशतके प्राचीन आहे. मुंडा आदिवासींच्या नेतृत्वात १९ व्या शतकातील बंडखोर नायक बिरसा यांनी महान अशी एक चळवळ उभी केली. या चळवळीला उलगुलान असे म्हणतात.

बिरसा मुंडा यांची वैयक्तिक माहिती

बिरसा यांचा जन्म रांची जिल्ह्यातील उलीहातू गावात १५ नोव्हेंबर १८७५ रोजी झाला होता. त्यांची मुंडा जाती बिरहकुल कुटुंबातील होती. मुंडा प्रथेनुसार त्याचे नाव बिरसा ठेवले गेले.

बिरसाच्या वडीलांचे नाव सुगना मुंडा आणि आईचे नाव करीम हातू होते. बिरसा मुंडाच्या जन्मानंतर त्यांचे कुटुंब रोजगाराच्या शोधात उलीहातू येथून कुरुंबण्यात स्थायिक झाले. जिथे ते शेतात काम करून आपले जीवन जगत, मग त्यांचे कुटुंब पुन्हा कामाच्या शोधात बाम्बाला गेले. त्यांना बासरी वाजवण्याची आवड होती. इंग्रजांविरोधात बंड पुकारणारे बिरसा अगदीच किरकोळ अंगकाठीचे होते. त्यांची उंची फक्त 5 फूट 4 इंच होती.

त्यामुळे त्यांचे बालपण येथून तेथून प्रवासातच गेले. जरी बिरसा यांचे कुटुंब वारंवार फिरायचे, त्यांना राहण्याची निश्चित स्थान नव्हते, परंतु बिरसा यांनी आपले बहुतांश बालपण चल्कड मध्ये घालवले होते.

Birsa Munda

बांबूच्या झोपडीत वाढलेला बिरसा लहानपणापासूनच आपल्या मित्रासह वाळूच्या ढिगात खेळायचा आणि थोडं मोठे झाल्यावर त्याला जंगलात मेंढर चारण्यासाठी जावं लागत असे.

बिरसा मुंडा यांचे शिक्षण

बिरसा यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खराब झाल्यामुळे, त्यांना त्यांच्या मामाच्या गावी पाठविण्यात आले. ते दोन वर्षे तिथे राहिले आणि सुरुवातीचे प्राथमिक शिक्षण त्यांनी येथून घेतल.

लहानपणापासूनच बिरसा अभ्यासामध्ये खूप हुशार होता, म्हणून त्याने शाळा चालवणारे गुरु जयपाल नाग यांच्याकडून शिक्षण घेतले. त्यानंतर त्याला जर्मन मिशन स्कूलमध्ये प्रवेश घेण्यास सांगितले, परंतु त्यावेळी ख्रिश्चन शाळेत प्रवेश मिळविण्यासाठी, ख्रिश्चन धर्म स्वीकारणे आवश्यक होते, म्हणून बिरसा यांना आपला धर्म बदलावा लागला.

तथापि काही वर्षानंतर बिरसा मुंडेनी ख्रिश्चन शाळा सोडली, कारण त्या शाळेत आदिवासी संस्कृतीची खिल्ली उडवली जायची. जे मुंडा यांना अजिबात आवडत नसे.

बिरसा मुंडा यांचा उलगुलान विद्रोह

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात इंग्रजी कंपनीने भारताच्या दोन तृतीयांश भागावर कब्जा केला. आणि ही मालिका अजूनही सुरू होती, एकोणिसाव्या शतकानंतर त्यांनी रियासी भारतातील काही भाग ताब्यात घेतला होता.

छोटा नागपूर, बिरसाचा परिसर आणि आदिवासी त्यांचे हक्क हिसकावून घेण्यासाठी वनीकरण कायद्यासह इतरही अनेक कायदे लागू केले गेले, आणि पाहता पाहता आदिवासींचे सर्व हक्क काढून घेण्यात आले.  

आदिवासी लोकांना जंगलात मेंढराना चरण्यासाठी नेता येत नव्हते, जंगलातून लाकडे गोळा करता येत नव्हती, त्यामुळे या लोकांना आपलं दैनंदिन जीवन जगण्यात बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागत असे, त्याच वेळी इंग्रजांनी जंगलाच्या बाहेर सीमांवर बाहेरील लोकांची वस्ती करण्यास सुरुवात केली,

मुंडा लोक ती जमीन आपली सामान्य मालमत्ता म्हणत असताना, त्या बाह्यवस्थेतील लोकांना ब्रिटिशांनी त्या जागेची मालकी दिली. त्यामुळे आदिवासींमध्ये असंतोष निर्माण झाला आणि याच असंतोषाचा चळवळीमध्ये रूपांतर झालं आणि याचं नेतृत्व क्रांतीसुर्य मुंडा यांनी केलं.

बिरसा ऐन तारुण्याच्या काळात ब्रिटिश मिशनरी आणि बाहेरील लोकांविरुद्धच्या चळवळीचा एक भाग बनले. १८९५ मध्ये बिरसा मुंडा यांनी घोषित केले की, आम्ही ब्रिटिश शासन प्रणाली विरुद्ध बंडखोरी जाहीर करतो आणि ब्रिटिश नियम कधीच पाळणार नाही, हे गोरे लोक, आमच्या देशात तुम्ही काय करता ?

छोटा नागपूर हे शतकानूशतक आमची आहे आणि आपण ते आमच्यापासून दूर जाऊ देऊ शकत नाही, म्हणून आपल्या देशात परत जाणे चांगले, नाहीतर तुमचे मृतदेह पाडले जातील, यानंतर त्या डोंगरावर पाहता पाहता हजारो लोक जमा झाली.

त्यानंतर इंग्रजांनी त्याला अटक केली, पण हजारीबाग मध्यवर्ती कारागृहात, दोन वर्षाच्या शिक्षेमुळे मुंडाची कीर्ती आणखी वाढली.

१८९८ मध्ये त्याच्या सुटकेनंतर मुंडा यांनी ब्रिटिश राणीचा पुतळा जाळण्याचा आदेश दिला आणि पुढच्या वर्षी म्हणजेच १८९९ मध्ये त्यांनी आणि त्यांच्या प्रियजनांनी असेच केले, ज्यामुळे ब्रिटिश त्रस्त झाले.

बिरसा मुंडा यांचा अविस्मरणीय प्रसंग

क्रांती आणि आदिवासींच्या हक्कासाठी लढताना पत्करलेल्या इंग्रजांविरुद्ध सशस्त्र क्रांती आणि आदिवासींच्या हक्कासाठी लढताना, पत्करलेल्या हुतात्म्याने बिरसा यांना भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात अजरामर करून ठेवले.

बिरसा या नावाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. दि. १५ नोव्हेंबर १८७५ रोजी झारखंड मधील उलीहातून या खेडेगावात जन्मलेल्या बिरसा मुंडा यांनी आपले गुरु जयपाल नाग यांच्याकडून प्राथमिक शिक्षण घेतलं होतं.

त्यानंतर जर्मन मिशनरी शाळेत प्रवेश मिळवण्यासाठी त्यांनी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला, पण काही काळातच या शाळेत आदिवासी संस्कृतीची उडवली जाणारी खिल्ली बघून, संतापलेल्या बिरसा यांनी त्या विरोधात बंडाची भाषा बोलायला सुरुवात केल्याने, त्यांना या शाळेतून काढून टाकण्यात आलं.

त्यानंतर बिरसा छोटा नागपूर परिसरात ब्रिटिशांविरोधातील सरदार आंदोलनाच्या संपर्कात आले आणि ब्रिटिशांनी १८८२ साली  बनवलेल्या वन कायद्याचा त्यांनी प्रखर विरोध केला.

बिरसांच्या वाढत्या विरोधामुळे १८९५ साली  सर्वप्रथम त्यांना अटक करण्यात आली. दोन वर्ष त्यांनी तुरुंगात घालवली, आदिवासी समाज बिरसा यांना देवाचा अवतार का म्हणू लागला तर, ब्रिटिशा विरोधात संघर्ष सुरू असतानाच जमीनदारांकडून देखील आदिवासींना दिलेली क्रूर वागणूक बघून, बिरसांच्या मनात जमीनदारांविरोधात विद्रोह तयार झाला होता.

बिरसा मुंडा

त्यामुळे त्यांनी जमीनदारांविरोधातही आपला आवाज बुलंद केला होता. आदिवासींच्या नैसर्गिक संपत्तीवर पहिला अधिकार त्यांचाच असल्याचं, त्यांनी ठासून सांगितलं आणि तो मिळवण्यासाठी संघर्ष करण्याची प्रेरणा सुद्धा त्यांनी आदिवासींना दिली.

शिवाय बिरसा यांनी लोकांचे प्रबोधन करायला ही सुरुवात केली. त्यांच्या अनुयायांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढायला लागल्यानंतर, त्यांनी धर्माची आपली व्याख्या केली आणि त्यातूनच दिर साहेब पंथाची सुरुवात झाली.

साथीच्या रोगाच्या काळात त्यांनी गावोगाव फिरून लोकांची सेवा केली, त्यामुळेच लोकांमध्ये त्यांच्याबद्दलची श्रद्धा वाढायला लागली. असेही सांगितलं जातं की, १८९५ साली काही अलौकिक घटना घडल्या आणि त्यामुळे आदिवासी लोक त्यांना देवाचा अवतार म्हणायला लागले.

बिरसा यांनी आदिवासींचे धर्मांतर मोठ्या प्रमाणात थांबवलं आणि आदिवासी संस्कृती आणि परंपरांचे जतन करण्याची शिकवणूक आदिवासींना दिली.

त्यानंतर बिरसा यांनी आपल्या अनुयायांना इंग्रजांविरोधात बंड करण्याचा आव्हान केलं, त्यांच्याच नेतृत्वाखाली इंग्रजांविरोधातला आवाज बुलंद करण्यात आला. बिरसानी आपल्या अनुयायांना घेऊन ब्रिटिशांच्या विरोधात उभारलेल्या या आंदोलनाला उलगुलन म्हणून ओळखले जाते.

दि. २४ डिसेंबर १८९९ रोजी त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध सशस्त्र बंड केला आपल्या साथीदारांना घेऊन त्यांनी धनुष्यबाणाने इंग्रज पोलीस चौक्यांना आग लावायला सुरुवात केली. समोरून इंग्रजांनी त्यांच्यावर गोळीबाराचा वर्षाव केला, यांच्या साथीदारांमध्ये घनघोर लढाई झाली. अनेक लोक मारले गेले

त्यांच्यासोबत अजून जवळपास ५०० अनुयायांना देखील अटक झाली. जेलमध्ये असताना ब्रिटिशांनी बिरसा यांना प्रचंड यातना दिल्या, पण त्यांनी ब्रिटिशांसमोर झुकायला स्पष्ट नकार दिला.

१९०० रोजी रांची मध्येच वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला.प्लेग या रोगामुळे बिरसाचा मृत्यू झाल्याचे सांगितलं, मात्र अनेक जण ब्रिटिशांनी त्यांची हत्या केल्याचाही दावा करतात.

बिरसा मुंडा यांचा मृत्यू

बिरसाने इंग्रजाविरुद्ध बंड पुकारले. बाण, कुऱ्हाड आणि गुल्हेर घेऊन मुंडे यांनी इंग्रजांवर हल्ला केला, आणि त्याची मालमत्ता जाळली आणि बरेच इंग्रज पोलीस ठार केले.

प्रथम या युद्धात ब्रिटिश सैन्य हरली, परंतु नंतर त्या भागातील अनेक आदिवासी नेत्यांना अटक करण्यात आली, त्यामुळे उलगुलन म्हणून ओळखले जाणारे हे बंड फार काळ टिकू शकले नाही. ब्रिटिशांनी चळवळीला जोरदार चिरडली.

आणि दि. ०३ फेब्रुवारी १९०० रोजी मुंडा यांना चक्रधरपुर येथून अटक केली गेली आणि त्याच्या एका वर्षानंतर ती तुरुंगात प्लेगच्या आजाराने मरण पावले. असे पण म्हटले जाते की, त्यांना इंग्रजांनी विष दिले होते. मात्र त्यांच्या निधनानंतर सरकारचे रांची विमानतळ आणि तुरुंगाला त्याचे नाव दिले.

त्यांचे एक चित्र भारतीय संसदेतही बसविण्यात आले आहे. बिहार, ओरिसा, झारखंड, छत्तीसगड, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्राच्या आदिवासी भागात मुंडाची देवाप्रमाणे पूजा केली जाते आणि त्यांच्या बलिदानाचे स्मरण केले जाते.

बिरसा मुंडा यांचे योगदान

  • बिरसा यांनी आपल्या नैसर्गिक हक्कांसाठी प्रचंड संघर्ष केला. त्यांचा हा संघर्ष आदिवासींच्या सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय बदलांची प्रक्रिया होती. बिरसा मुंडांनी बुद्ध कधीच वाचले नाही, परंतु बुद्धांची शिकवण व तत्वज्ञान याची छबी मुंडांमध्ये प्रखरतेने जाणवते. त्यांनी महात्मा फुले, कबीर यांच्या बद्दल कधीही वाचले नाही, परंतु सामाजिक व वैज्ञानिकतेचे ते प्रसारक होते.
  • समाज बदलाचा मुंडा यांचा विद्रोह हा एक आदिवासींच्या पूर्ण स्वातंत्र्याचा विद्रोह होता.
  • मुंडा यांच्या २५ वर्षाच्या अल्प जीवन कालावधीमध्ये, त्यांनी आदिवासींमध्ये भारत व भारतीय संस्कृतीच्या प्रतीची प्रेरणा जागवली, ती अविश्वसनीय व अमूल्य आहे.
  • आज सुद्धा झारखंड, बिहार, पश्चिम बंगाल, ओरिसा, मध्यप्रदेश, मधील आदिवासी जमाती बिरसा मुंडा यांना त्यांचे आराध्य दैवत मानते.
  • मुंडांच्या आंदोलनामुळेच इसवी सन १९०० मध्ये भारत सरकारने छोटा नागपूर क्षेत्रामध्ये जमीन सुधारणा विषयक कायदे सुरू केले. तसेच बिरसा मुंडा यांच्या अतुलनीय योगदानामुळे, मुंडा आदिवासी शिक्षण, विज्ञान, खेळ, राजकारणाच्या विविध क्षेत्रांमध्ये उंच भरारी घेतली.
  • मुंडा यांच्या अविश्वसनीय कार्यासाठी बिरसा मुंडा आदिवासी जन नायक हा किताब जनतेने समर्पित केला.

बिरसा मुंडा यांची जयंती

बिरसा यांची जयंती दि. १५ नोव्हेंबर रोजी विशेषतः कर्नाटकातील कोडागु जिल्ह्यात साजरी केली जाते. झारखंडची राजधानी असलेल्या कोडागु रांची येथे त्यांच्या समाधी स्थळावर बरेच कार्यक्रम साजरे केले जातात.

बिरसा मुंडा

बिरसा मुंडा वारसा

त्यांच्या स्मरणार्थ रांचीतील बिरसा मुंडा मध्यवर्ती कारागृह आणि बिरसा मुंडा विमानतळ आहे. त्यांच्या नावावर बरीच संस्था, अनेक विद्यापीठे आणि अनेक इन्स्टिट्यूशन स्थापन केले आहेत.

बिरसा मुंडा यांच्या जीवनावर आधारित चित्रपट

२००८ मध्ये बिरसा यांच्या जीवनावर आधारित हिंदी चित्रपट गांधीं से पहिले गांधी, इकबाल दुरान यांच्या दिग्दर्शनाखाली बनला होता. ज्याला कादंबरी पुरस्कारही मिळाला होता.

२००४ मध्ये उलगुलन एक क्रांती हा दुसरा हिंदी चित्रपट बनला, ज्यामध्ये पाचशे बिरसा अनुयायांचा समावेश होता.

बिरसा मुंडा यांच्याबद्दल १० ओळी

  • यांचा जन्म दि.१५ नोव्हेंबर १८७५ रोजी मुंडा जमाती झारखंड मधील उलीहातू गावी झाला.
  • त्यांना बासरी वाजवण्याची आवड होती.
  • इंग्रजांविरुद्ध बंड पुकारणारे, बिरसा अगदीच किरकोळ अंग काठीचे होते, त्यांची उंची फक्त पाच फूट चार इंच होती. वयाची पंचविशी सुद्धा गाठली नव्हती, तेव्हा त्यांनी हा लढा उभारला.
  • बिरसा यांचं प्राथमिक शिक्षण जयपाल नाग यांच्या देखरेखित झालं.
  • एका जर्मन मिशनरी शाळेत प्रवेश घेण्यासाठी, त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. पण इंग्रजांनी आदिवासींच्या धर्मांतराची मोहीम आखली हे समजल्यावर, त्यांनी ख्रिश्चन धर्म सोडला आणि बिरसा हा नवा धर्म स्थापन केला.
  • मुंडा आणि इतर जमातीचे लोक या धर्माचे पालन करू लागले. इंग्रजांच्या धर्मांतर धोरणाला त्यांनी एक प्रकारे आव्हानच दिले होते.
  • मुंडा यांनी आपल्या लोकांना सरकार दरबारी कोणताही कर न भरण्याचे आदेश दिले.
  • १९ व्या शतकाच्या अखेरीस ब्रिटिशांच्या धोरणाने आदिवासींची पारंपारिक भूमी व्यवस्था मोडकळी झाली होती. सावकारांनी त्यांच्या जमिनीवर अतिक्रमण सुरू केलं होतं, आदिवासींना जंगलातील संसाधने वापरण्यास प्रतिबंध करण्यात आला होता, याच विरोधात मुंडा यांनी उलगुलान चळवळ सुरू केली.
  • बिरसा हे त्यावेळी मुंडा राज्य स्थापनेसाठी, प्रेरक भाषण द्यायचे. बिरसा त्यांच्या भाषणात म्हणायचे, घाबरू नका. माझं साम्राज्य सुरू झाले, सरकारचे राज्य संपले, जे लोक आडवे येथील, त्यांना रस्त्यातून दूर करा. त्यांनी पोलीस स्टेशन आणि जमीनदारांच्या मालमत्तेवर हल्ले करण्यास सुरुवात केली.
  • अनेक ठिकाणची ब्रिटिश झेंडे म्हणजेच युनियन जॅक उतरून, मुंडा राज्याचे प्रतीक असलेले पांढरे झेंडे लावण्यात आले. त्याकाळी इंग्रज सरकारने बिरसा यांची माहिती देणाऱ्याला पाचशे रुपयांचा बक्षीस जाहीर केलं होतं.
  • ही रक्कम त्याकाळी खूप होती. बिरसा यांना पोलिसांनी १८९५ साली पकडून दोन वर्षाची शिक्षा केली. पुढे तुरुंगात सुटून आल्यावर ते भूमिगत झाले आणि इंग्रजांविरुद्ध गुप्त कारवाया करू लागले.
  • बिरसांचा संघर्ष १९०० साल उजेडे पर्यंत छोटा नागपूरच्या साडेपाचशे चौरस किलोमीटरवर पसरला होता. आदिवासींचे बंड एवढ्या मोठ्या प्रमाणात पसरलं होतं की, रांचीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सैन्याकडे मदत मागितली.
  • डोंबारी टेकडीवर आदिवासी आणि इंग्रज सैन्यात तुंबळ युद्ध झालं. सैनिकांना पाहताच आदिवासींनी धनुष्यबाण आणि तलवारी चालवायला सुरुवात केली. इंग्रजांनी त्यांना शस्त्र खाली ठेवण्यास सांगितले, बंदुक्यांच्या गोळ्या झाडण्यात आल्या, पण त्याचा काही एक परिणाम झाला नाही. उलट आदिवासींनी मोठमोठ्याने ओरडून या गोळीबाराला प्रत्युत्तर दिले.
  • ब्रिटिश सैन्याने जमावावर गोळीबार करायला सुरुवात केली. या हल्ल्यात शेकडो आदिवासी मारले गेले. आणि टेकडीवर मृतदेहांचा खच पडला होता, गोळीबारानंतर ब्रिटिश सैनिकांनी आदिवासींचे मृतदेह दाऱ्यांमध्ये फेकून दिले.
  • या हल्ल्यादरम्यान बिरसा तिथून निसटण्यात यशस्वी झाले. या हल्ल्यात सुमारे चारशे आदिवासी मारले गेले, ०३ मार्चला इंग्रजांनी चक्रधरपुर जवळील एका गावाला वेढा दिला. तेव्हाच एसपीच्या नजरेस एक झोपडी पडली. एसपीने आपल्या बंदुकीने त्या झोपडीचा दरवाजा उघडला आत मध्ये बिरसा मुंडा मांडी घालून बसले होते. काहीही न बोलता ते तिथून उठले आणि बेड्या घालण्यासाठी तयार झाले.
  • बिरसा अटक झाल्याचे लोकांना कळवू नये, म्हणून पर्यायी मार्गाने त्यांना रांचीला नेण्यात आलं. पण रांचीला पोहोचतात हजारोंचा समुदाय त्यांना बघण्यासाठी आला होता. सुनावणीच्या दिवशी बिरसांना बेड्या घालूनच, न्यायालयात हजर करण्यात आले. बेदम मारहाण झाल्याचं स्पष्ट दिसत होतं, पण वाघाच्या चालीने चालणाऱ्या बिरसांच्या चेहऱ्यावर वेदनेचा लवलेशही नव्हता. बिरसांना तुरुंगात एकांत वासात ठेवण्यात आले. तुरुंगवासात असतानाच एके दिवशी बिरसांना खूप ताप चढला.

बिरसा मुंडा यांचा सन्मान

  • मुंडा यांनीही आपण सर्वशक्तिमान देवाचे प्रतिनिधी असल्याचा दावा केला.
  • त्यांनी हिंदू धर्माच्या तत्त्वांचा पुरस्कार केला.
  • त्यांनी ख्रिस्ती झालेल्या आदिवासींना तसे करण्याचा सल्ला दिला.
  • त्यांनी एका देवाची कल्पना स्वीकारली आणि त्यांच्या पूर्वीच्या विश्वास प्रणालीकडे परत गेले.
  • अखेरीस ते त्या आदिवासी सदस्यांना देवाच्या रूपात प्रकट झाले. ज्याने त्यांना मान्यता दिली.

बिरसा मुंडा यांच्या बद्दल काही मनोरंजक तथ्ये

  • मुंडा यांना आजही आदिवासी लोक धरती बाबा म्हणून त्यांचे पूजन केले जाते.
  • ०९ जून १९०० रोजी बिरसा मुंडा यांचे तुरुंगामध्ये निधन झाले. परंतु त्यांचे निधन हे इंग्रजांनी केलेल्या विषबाधे मधून झाले असे लोकांचे म्हणणे आहे.
  • जमीनदारी व्यवस्थेसमोरील संघर्षा बरोबर जंगल जमिनीची लढाई सुद्धा बिरसा मुंडा यांनी लढली.
  • उलीहाटू या रांची जिल्ह्यातील छोट्याशा गावामध्ये आदिवासी कुटुंबात बिरसा यांचा जन्म झाला.
  • ब्रिटिशां बरोबरच बिरसा यांनी सावकार व जमीनदारांसोबत सुद्धा लोक जमावाने युद्ध पुकारले.

बिरसा मुंडा यांचा व्हिडिओ

FAQ

१. बिरसा मुंडा यांचे योगदान काय होते?

ब्रिटिशाविरुद्धच्या स्वातंत्र्यलढ्यात बिरसा मुंडाची महत्त्वपूर्ण भूमिका होती. हा जननायक मुंडा जातीचा होता. सध्याच्या भारतात रांची आणि सिंह भूमीचे आदिवासी बिरसा मुंडाला बिरसा भगवान म्हणून ओळखतात. आदिवासी जमाती वर होत असलेल्या इंग्रजांच्या दडपणाविरुद्ध, बिरसा मुंडा यांनी जो लढा लढविला, त्यामुळे त्यांना हा मान मिळाला आहे. १९ व्या शतकात बिरसा मुंडा भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासातील एक महत्त्वाचे लोकनेते म्हणून उदयास आले.

२. बिरसा मुंडा यांचा मृत्यू कसा झाला?

दि. ०३ फेब्रुवारी १९०० रोजी बिरसा मुंडा यांना चक्रधरपुर येथून अटक केली गेली आणि त्याच्या एका वर्षानंतर ती तुरुंगात प्लेगच्या आजाराने मरण पावले. असे पण म्हटले जाते की, त्यांना इंग्रजांनी विष दिले होते.

३. बिरसा मुंडा यांचा जन्म कधी झाला ?

बिरसा मुंडा यांचा जन्म रांची जिल्ह्यातील उलीहातू गावात १५ नोव्हेंबर १८७५ रोजी झाला होता. त्यांची मुंडा जाती बिरहकुल कुटुंबातील होती. मुंडा प्रथेनुसार त्याचे नाव बिरसा ठेवले गेले.

४. बिरसा मुंडा यांची शिकवण काय ?

बिरसा यांनी आदिवासींचे धर्मांतर मोठ्या प्रमाणात थांबवलं आणि आदिवासी संस्कृती आणि परंपरांचे जतन करण्याची शिकवणूक आदिवासींना दिली.

५. बिरसा मुंडा यांना किती वर्षाचे आयुष्य लाभले ?

बिरसा मुंडा यांच्या २५ वर्षाच्या अल्प जीवन कालावधीमध्ये, त्यांनी आदिवासींमध्ये भारत व भारतीय संस्कृतीच्या प्रतीची प्रेरणा जागवली, ती अविश्वसनीय व अमूल्य आहे.

६. बिरसा मुंडा का प्रसिद्ध आहेत ?

भारताला स्वातंत्र्य मिळून देण्यासाठी अनेक शूरवीरांनी आपल्या प्राणांचा त्याग केला, त्यातीलच एक क्रांतिकारक म्हणजे धरती आबा म्हणजेच बिरसा मुंडा. बिरसा मुंडा यांना देवाचा दर्जा दिला गेला आहे. आदिवासी समाजात आजही त्यांची पूजा केली जाते, आणि देश त्यांची जयंती जनजाती गौरव दिवस म्हणून साजरी करतो.

निष्कर्ष

मित्रहो, आजच्या लेखा द्वारे आम्ही आपणास क्रांतिकारी बिरसा मुंडा यांच्या बद्दल माहिती दिली आहे. बिरसा मुंडा एक भारतीय आदिवासी क्रांतिकारक होते. ते आदिवासी समाजाचे वीर नायक होते.

१९ व्या शतकातील शेवटच्या वर्षात मुंडा जमातीच्या आदिवासी द्वारा इंग्रज सरकार विरुद्ध, जन आंदोलन केली, त्याचे नेतृत्व बिरसा मुंडा यांनी केले होते. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात या आदिवासींच्या संग्रामास इतिहासात मोठे स्थान प्राप्त करून देण्याचे श्रेय बिरसा मुंडा यांनाच जाते.

हा लेख तुम्हाला कसा वाटला, हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. लेख आवडल्यास तुमच्या इतर मित्र परीवारांसोबत नक्की शेयर करा. धन्यवाद.

Leave a comment