गोपाळ कृष्ण गोखले यांची माहिती Gopal Krishna Gokhale Information In Marathi

भारत जगातली सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आहे. भारत देशाने दाखवून दिले की, वेगवेगळ्या धर्माचे, संस्कृतीतले आणि वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक एकोप्यानं राहू शकतात आणि त्यांना हवं तसं जगण्याचं आणि विचारांचा स्वातंत्र्य यांचा उपभोग घेऊ शकतात.

हे स्वातंत्र्य म्हणजे ज्यांनी इतिहास बदलून दाखवला आणि आजचा भारत घडवला अश्या असामान्य भारतीयांच्या प्रयत्नांचे फलित आहे. असेच एक अलौकिक भारतीय गोपाळ कृष्ण गोखले.

आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास गोपाळ कृष्ण गोखले यांच्याबद्दल माहिती दिली आहे. हि माहिती जाणून घेण्यासाठी खालील लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

Table of Contents

गोपाळ कृष्ण गोखले यांची माहिती | Gopal Krishna Gokhale Information In Marathi

नावगोपाळ कृष्ण गोखले
जन्म तारीख दि. ०९  मे १८६६ रोजी
जन्म स्थळ रत्नागिरीतील कोथरूड
आईचे नाव वालुबाई गोखले
वडिलांचे नाव कृष्णराव गोखले
पदवी१८८४ मध्ये एल्फिन्स्टन कॉलेजमधून पदवी 
राष्ट्रीयत्व भारतीय
व्यवसायप्राध्यापक आणि राजकारणी
गुरु न्यायमूर्ती रानडे
वैवाहिक स्थिती विवाहित
लग्न तारीख पहिले लग्न – १८८० मध्ये.
दुसरे लग्न – १८८७ मध्ये.
संघटनाइंडियन नॅशनल काँग्रेस, डेक्कन एज्युकेशन सोसायटी
उल्लेखनीय कामेभारतीय शिक्षण व्यवस्थेच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले 
संस्थापकभारतीय समाजसेवक
मृत्यू दि. १९ फेब्रुवारी १९१५

गोपाळ कृष्ण गोखले यांचा जन्म आणि शिक्षण

१८५७ च्या उठावामुळे देश पेटून उठला. प्रत्येक देशवासीयाचे हृदय देशभक्तीने उचंबळून आले आणि प्रत्येक जण जमेल त्या मार्गाने प्रतिकार करू लागले. अशा भारावलेल्या वातावरणात दि. ०९  मे १८६६ रोजी रत्नागिरीतील कोथरूड येथे गोखलेंचा गरीब ब्राम्हण कुटुंबात जन्म झाला.

वडिलांच्या अकाली निधनानंतर त्यांचे थोरले बंधू गोविंद यांनी स्वतःचे शिक्षण बाजूला ठेवून छोट्या गोपाळचे शिक्षण पूर्ण केलं. त्यांच्या त्यागामुळे भारताला एक थोर देशभक्त आणि विद्वान संसदपटू नेता मिळाला. त्यांनी कॉलेजमधून पदवी मिळवली ती देखील अगदी लहान वयातच, म्हणजे अठराव्या वर्षी.

 Gopal Krishna Gokhale Information In Marathi

त्यानंतर काही काळ पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये त्यांनी शिकवलं आणि लगेच फर्गुसन कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून त्यांची नियुक्ती झाली. तेव्हा त्याचं वय २० वर्ष होतं.

गोखल्यांच शिक्षण झाल्यावर, ते सुरुवातीला लोकमान्य टिळकांच्या विचारांनी भारावून जाऊन त्यांनी पुण्यात नवीन सार्वजनिक सभेची स्थापन केली.

तिथे ते पहिल्यांदा टिळकांच्या प्रत्यक्ष संपर्कात आले आणि पुढे जसजसे त्यांचे विचार परिपक्व होत गेले ते टिळकांपासून हळूहळू टिळकांपासून दुरावले आणि गोपाळ गणेश आगरकरांकडे ओढले गेले. पुढे आगरकरांनी त्यांचा परिचय करून दिला त्यांचे गुरूतुल्य महादेव गोविंद रानडे यांच्यासोबत.

गोपाळ कृष्ण गोखले यांच्यावर न्यायमूर्ती रानडे यांचा प्रभाव

त्या काळातल्या न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे अनेक सामाजिक आणि राजकीय चळवळीचे पडद्याआडुन सूत्रसंचालन करत असत. ते सरकारी नोकरीत असल्यामुळे उघडपणे काही करू शकत नव्हते आणि म्हणून ते मागे राहून चळवळीचे नेतृत्व करायचे.

ते पुण्यावर अक्षरशः राज्य करीत होते आणि गोखले न्यायमूर्ती रानडे यांच्या तालमीत तयार झाले असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. ते गोखलेंच्या सुरुवातीच्या जडणघडणीच्या काळात फार महत्त्वाचे ठरले.

सामाजिक आणि आर्थिक प्रश्नांबद्दलची गोखलेंची जी मतं तयार झाली, त्याच्या प्रभावाखाली न्यायमूर्ती रानडे आणि गोखले यांच्यामध्ये एक गुरु शिष्य नाते निर्माण झाले.

त्यांचा मुख्य विचार हा होता की, आर्थिक सामाजिक आणि राजकीय सुधारणा एकत्रच होणे आवश्यक आहे. त्यात कमी – जास्त महत्त्वाचे असे वर्गीकरण होऊ शकतं, पण आधी या प्रकारच्या सुधारणा करून घेऊ, तोपर्यंत दुसऱ्याना मागे ठेवणे, असं करून चालणार नाही.

आर्थिक, सामाजिक आणि राजकीय सुधारणांचा एकमेकांशी असलेला संबंध ते रानडेंकडून शिकले.

 Gopal Krishna Gokhale

गोपाळ कृष्ण गोखले एक अर्थकारणी म्हणून

दादाभाई नौरोजीनी एक पुस्तक लिहिलं होतं, द ड्रेन थेअरी अँड ब्रिटिश रुल इन इंडिया. त्यात त्यांनी असं मत मांडलं होतं की, ब्रिटिश सरकार भारतीयांवर फार मोठं करांचे ओझं लादत आहे.

त्यापुढे जाऊन गोखल्याने त्या करांचे वर्गीकरण करून, त्यांची आकडेवारी तयार केली आणि हे सगळं त्यांनी वेल्बी कमिशन समोर मांडले आणि त्यात गोखलेनी स्पष्टपणे दाखवून दिलं की, ब्रिटिश राज्यकर्ते भारतीय जनतेच्या डोक्यावर दर साल २० कोटी रुपयांचा कर लादत आहे.

१८९७ साली हि फार मोठी रक्कम होती. गोखलेंना अर्थशास्त्राचे शिक्षण नव्हतं, तरी रावबहादूर जोशी आणि न्यायमूर्ती रानडे यांच्या मदतीने त्यांनी द ग्रेट ड्रेन थेअरी सिद्ध करून दाखवली. असं करणारे पहिले भारतीय अर्थतज्ञ होते. परंतु वेल्बी कमिशन समोर दिलेल्या साक्षीने त्यांनी जी अतुलनीय कामगिरी करून दाखवली त्याचं समाधान अल्पजीवी ठरलं.

भारतात प्लेगची साथ सुरू झाली होती, पुणे हा तिचा केंद्रबिंदू होता. ब्रिटिश सरकारने साथीचा प्रसार रोखण्यासाठी कठोर पावले उचलली. समाजाला ते रुचलं नाही. ब्रिटिश सैनिकांनी महिलांना हाताने धरून घराबाहेर काढणं, हा स्त्रियांचा अपमान समजला गेला. गोखलेंना लंडनमध्ये या सगळ्या बातम्या मिळाल्यावर, ते स्त्रियांचा अशा प्रकारे विनयभंग करणाऱ्यांविषयी त्यांनी मँचेस्टर गार्डनला दिलेल्या मुलाखतीत संताप व्यक्त केला.

सगळं प्रकरण गोखलेंवरच फिरलं. गोंधळलेल्या गोखलेंनी न्यायमूर्ती रानडेंचा सल्ला मागितला. रानडेंनी त्यांना रीतसर माफीनामा द्यायला सांगितलं.

समाजाच्या सर्व थरातील लोकांनी गोखलेंवर टीका केली. पण या कलेषकारक घटनेपासून, गोखलेंनी धडा घेतला. त्यानंतर हातात भक्कम पुरावा असल्याशिवाय ते कधीच कुठल्या घटनेबद्दल बोलले नाहीत.

गोपाळ कृष्ण गोखले एक राजकारणी म्हणून

न्यायमूर्ती रानडे यांनी सार्वजनिक सभेची स्थापना केली आणि ती ब्रिटिश सरकार व जनता या मधला दुवा ठरला. टिळकांना सार्वजनिक सभा हातात घ्यायची होती, त्यासाठी ते निवडणुकीला उभे राहिले आणि निवडणुकीमध्ये रानडे आणि गोखलेंच पॅनल हरलं.

आता टिळकांनी सार्वजनिक सभेच्या माध्यमातून आपलं जहाल राजकारण सुरू केलं. त्यामुळे ब्रिटिश सरकार व सार्वजनिक सभा यांचे संबंध बिघडले आणि तिथून पुढे ब्रिटिश सरकारने सार्वजनिक सभेला आपला मित्र मानणे बंद केल.

अशा रीतीने भारतातले राजकीय पुढारी जहाल आणि मवाळ अशा दोन गटात विभागले गेले. त्यांचे ध्येय एकच होतं, पण ते गाठण्याचे मार्ग आणि भूमिका भिन्न होत्या.

आधी सामाजिक सुधारणा करा आणि मग राजकीय सुधारणा, किंबहुना राजकीय स्वातंत्र्याची मागणी करण्याआधी समाजात एक राजकीय संस्कृतीचा पाया घातला गेला पाहिजे. लोकमान्य टिळकांचा दृष्टिकोन याच्याबरोबर उलटा होता.

ते म्हणायचे पहिल्यांदा आपण स्वतंत्र होऊया, मग आमचे भारतीय ठरवतील समाजात कोणत्या सुधारणा करायला हव्यात, त्यांचा पाया काय असावा आणि शेवट काय असावा.

गोपाळ कृष्ण गोखले एक बहुआयामी कार्यकर्ता

फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकवत असतानाच गोखले आगरकरांच्या सुधारकसाठी लिहीत होते. सार्वजनिक सभेचे आणि काँग्रेसचेही काम करत होते.

पुढे जेव्हा टिळक आगरकरांचे मतभेद शिगेला पोहचले आणि टिळकांनी ८० पानी राजीनामा डेक्कन एज्युकेशन सोसायटीकडे पाठवला, तेव्हा त्यात त्यांनी गोखलेंच्या या अनेक काम करण्याचा न विसरता उल्लेख केलेला होता.

त्यामुळे दुखावलेले गोखले सोसायटी सोडायला निघाले होते, पण इतर सदस्यांनी त्यांना रोखलं. कारण सोसायटी अजून प्राथमिक अवस्थेत होती. गोखलेंनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीकरता निधी जमवण्याची जबाबदारी उचलली.

या कामासाठी त्यांनी पारशी उद्योगपतींबरोबरचे आपले स्नेह संबंध वापरले, आजही दिमाखात उभ्या असलेल्या फर्ग्युसन कॉलेजच्या या सुंदर व्हिक्टोरिया इमारती गोखलेंच्या भगीरथ प्रयत्नांची साक्ष देत आहेत. १९०१ साली भारतातल्या मवाळ राजकीय चळवळीचे नेतृत्व गोखलेंकडे आलं. तसंच ब्रिटिश सरकारच्या कायदेमंडळातही त्यांची निवड झाली.

जीवनात ताटातूट ही दुःखदायकच असते, पण जिथे खोल काळजातल्या भावना गुंतलेल्या असतात आणि तरीही निरोप घेण्याची गरज निर्माण होते, तिथे माणसाला नाईलाजाने नको असलेल्या प्रसंगातून जावेच लागते.

मी हे सगळं सोडून जात आहे, ते सार्वजनिक जीवनाच्या वादळी तळमळत्या समुद्रावर स्वार होण्याकरिता. कारण माझ्या आतला आवाज मला हे पाऊल टाकायला भाग पाडतोय, पण मित्रांनो माझ्यावर विश्वास ठेवा मी हे करतो आहे ते शुद्ध कर्तव्य भावनेने – गोपाळकृष्ण गोखले.

गोपाळ कृष्ण गोखले एक जनतेचा आवाज

फर्गुसन कॉलेजचा राजीनामा दिल्यानंतर गोखले भारतीय जनतेचे प्रश्न ब्रिटिश कायदेमंडळासमोर मांडण्यासाठी सज्ज झाले.

गोखलेंच्या सर्वव्यापी अशा लोकांच्या काळजीच वैशिष्ट्य असं होतं की ते, एखाद्या प्रश्नाकडे फक्त ब्रिटिशांचाच लक्ष न वेधता, भारतातली जनता, इथले विद्वान, इथल्या राज्यकारभाराची धोरण ठरवणारे, सगळ्यांच्याच नजरेला आणून देत की, ब्रिटिश सरकारच्या अधिपत्याखाली भारतीय जनतेची कशी पिळवणूक होते.

पहिली गोष्ट, या ब्रिटिश साम्राज्यामध्ये भारतीय जनतेचे स्थान काय आहे ? दुसरं आम्हाला माणुसकीची, न्यायाची आणि कदाचित हळूहळू समतेची सुद्धा वागणूक मिळावी याची जबाबदारी ब्रिटिश सरकारवर आहे. रानडे, नौरोजी किंवा इतर समकालीनांच्याप्रमाणेच गोखलेंच्या विवंचणानासुद्धा एकाच दिशेने जात होती ती म्हणजे भारत एक स्वतंत्र देश कसा होईल ? जिथे आपण आपलं आर्थिक धोरण ठरवू.

गोखलेंच्या सर्व भाषणातून आणि लेखनामधून सातत्याने एकच मुद्दा समोर येतो तो म्हणजे, ब्रिटिशांच्या सामाजिक आणि आर्थिक धोरणाचे घातक परिणाम आपल्या देशावर कसे होतात ? भारताची आर्थिक व्यवस्था अशा पद्धतीने हाताळली जात आहे की, पैशांचा वापर करताना भारतीय जनतेच्या हितापेक्षा इतर मुद्द्यांना प्राधान्य दिलं तरी चालेल. ही स्थिति बदलण्याची गोखलेंची इच्छाशक्ती जबरदस्त होती, हे ब्रिटिशांना माहीत होतं.

गोखले जेव्हा संसदेत बोलायचे, एखाद्या कमिशन समोर साक्ष द्यायचे, त्यावेळी त्यांचा निर्भीडपणा आणि ताकद ब्रिटिशांनी अनुभवली होती. ते स्वतःचा मुद्दा इतक्या मजबुतीने मांडायचे की, त्यांना कधीही एकही अपशब्द बोलण्याची गरज वाटली नाही. माझ्या पाहण्यातली ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा एखाद्या कायदेशीर कलमाला या भारत देशातल्या सर्व वर्गातून, सर्व प्रांतातून, एकमताने एकजुटीने विरोध करण्यात आला.

ब्रिटिश सरकारला गोखाल्यांबद्द्ल आदर होता. याचं कारण, ते उघडपणे बोलायचे. ते अंतर्बाह्य सुसंस्कृत होते. अशा प्रकारची माणसं आता फारशी पाहायला मिळत नाही. ब्रिटिश सरकारला त्यांच्याविषयी वाटणारा आदरभाव व्यक्त झाला तो, लॉर्ड कर्झन या सर्वात कर्मठ आणि दुर्दशा व्हाईसरॉयने, गोखलेंच नाव कंपनियन ऑफ इंडियन एम्पायर या सन्मानाकरता सुचवलं त्यावेळी, ही सन्मानदर्शक पदवी त्यांना १९०४ मध्ये बहाल करण्यात आली.

गोपाळ कृष्ण गोखले एक सर्वश्रेष्ठ विरोधी पक्षनेता

गोपाळ गोखले अगदी स्पष्टपणे त्यांचे मुद्दे आणि आकडेवारी मंडळापुढे मांडत आणि सुबोधपणे आपला मुद्दा पटवून देत असत. आजही आपल्याला इतके सुबोध, अर्थतज्ञ विशेष आढळून येत नाहीत.

ब्रिटनमध्ये नेमकं काय घडतंय, याची जाणीव त्यांना असायची. त्याच्या बरोबर विरुद्ध धोरण भारतामध्ये राबवले जात आहे, हे अचूकपणे उघड करून, ते ब्रिटिश सरकारचे दुटप्पी वागणं उघड करीत असत.गोखले यांच्या मते, इंग्लंडच्या ब्रिटिश सरकारच्या अंतरीत विशाल भूदल आणि नाविक दल तसेच परराष्ट्र व्यवहार, तर त्यांचा संपूर्ण पृथ्वीच्या पाठीवर सामावलेला असून ही, त्यांना त्यांचा कायदा तोकडा आहे, असं कधीही जाणवलं नाही.

त्यामानाने भारताचा विस्तार अगदी छोटा आणि व्याप मर्यादित आहे तरीही, त्यांना इथला कायदा इतका कडक करण्याची गरज का भासली, याचं स्पष्टीकरण मला वाटतं अगदी सोपं आहे,  वृत्तपत्रांनी सरकारला कितीही अडचणीत आणणारी गुपिते उघडी केली तरी, सरकार त्यांना हात लावणार नाही आणि वृत्तपत्र म्हणजे फक्त एक उद्योग म्हणून, त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं आणि त्यांना सोडून दिले.

अर्थात सरकारच्या अधिकाऱ्यांना काही सीमा चाखलेला नाही, त्यामुळे सातत्याने दडपशाहीचे कायदे केले जात आहे. ब्रिटिश सरकार इंग्लंडमध्ये करत असलेला राज्यकारभार आणि भारतात चालवलेला राज्यकारभार यांच्या गाभ्यातच फरक आहे, हे स्पष्ट करण्यासाठी एवढा एक मुद्दा देखील पुरेसा आहे.

गोखले म्हणाले, खर्चापेक्षा उत्पन्न जास्त आहे, ह्याची दोन कारणे आहेत, एक तर त्यावेळी देशात आर्थिक मंदी होती आणि दुसरे म्हणजे १९३६  सालानंतर केन्सने आपल्याला शिकवल्यामुळे, आता आपल्याला माहिती झाले की, देश मंदीतून जात असताना अंदाजपत्रकात शिल्लक असायलाच नको.

आर्थिक मंदी असूनही, अंदाजपत्रकात शिल्लक दाखवली जाते आणि त्यामुळे त्यांनी सांगितलं की, हे स्वतःची पाठ थोपटून घेणे, सर्वस्वी चुकीच आहे. मंदीच्या काळात गोखलेंनी काही असं स्पष्टपणे तोटा भरून निघाला पाहिजे, असं सांगितलं नाही, पण ते म्हणाले की, एक तर खर्च वाढवा, नाही तर कर कमी करा. कोटी रुपयांची, स्वतःच्या इतिहासात न घडलेली घटना, दारिद्र्यात दिसत असलेली जनता आणि भरून वाहणारी तिजोरी, हा विरोधाभास म्हणजेच स्पष्ट पुरावा आहे की, सरकारी कर हे प्रमाणाबाहेर वाढलेले आहेत.

आणि ते हे कर कमी करू शकत असताना, भारत हा एक गरीब देश आहे आणि त्याची गरीबी दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि म्हणून त्याची अर्थव्यवस्था ठरवताना या सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याला नेहमी केंद्रस्थानी ठेवलं गेलं पाहिजे, हे आवश्यक आहे. शिक्षणावर जास्त खर्च केला पाहिजे, म्हणजे सक्तीचं मोफत शिक्षण सगळ्यांना मिळालं पाहिजे. ही कल्पना सर्वात प्रथम गोखल्याने मांडली आणि ती आता जवळजवळ शंभर वर्षांनंतर, भारत सरकारने राईट टू एज्युकेशन च्या रूपाने शिक्षणाचा समावेश मूलभूत हक्कात करून प्रत्यक्षामध्ये उतरवले.

गोखल्यांचे असं होतं की, ते नुसते टॅक्सेस कमी करा किंवा खर्च वाढवा असं सांगून ते थांबत नसत, त्यासाठीचे ठोस उपायही सुचवत असत. म्हणजे त्यांचा प्रत्येक प्रस्ताव हा प्रश्नावरचे पक्के उपाय घेऊनच अवतरत असे.

गोपाळ कृष्ण गोखले एक प्रगतिशील उदारमतवादी म्हणून

स्त्री शिक्षण आणि आंतरजातीय विवाह ज्या काळात समाजात वर्ज्य होते, त्या काळात गोखलेंनी त्यांच्या दोन्ही मुलींना पदव्युत्तर शिक्षण तर दिलच, पण त्यांच्या एका मुलीचा आंतरजातीय विवाहसुद्धा केला. त्यांचे गुरु न्यायमूर्ती रानडे यांच्याप्रमाणेच गोखलेंनी धार्मिक प्रश्न राजकारणात कधीही येऊ दिलं नाही. त्यांची पहिल्यापासूनच अशी धारणा होती की, कोणत्याही कारणाने जर सामाजिक एक रुपयाला धक्का लागला, तर आज ना उद्या भारतीयांना ते घातक ठरू शकते.

समाजाच्या एकोप्यावर त्यांचा ठाम विश्वास होता, तोच विचार वारसा गांधींनी पुढे अमलात आणला. अर्थात त्यांच्या पद्धतीने जाती धर्माच्या बंधनात न अडकता, निश्चित देशसेवा या विचारावर गोखलेंची गूढ श्रद्धा होती. त्यातूनच त्यांनी सर्विस ऑफ इंडिया सोसायटी सुरू केली. यातील सर्व सदस्यांचा एकच धर्म होता, देशसेवा. माझा देश हाच माझ्या मनात नेहमी अग्रक्रम आहे. की त्यात कोणता हि व्यक्तिगत स्वार्थ शोधणार नाही, सर्वात महत्त्वाची शपथ म्हणजे, की मी माझ्या व माझ्या कुटुंबीयांसाठी कोणत्याही पैसा, उद्योग धंदा, या मार्केटमधून कमवणार नाही.

जे काही सर्विस ऑफ इंडिया सोसायटी मला मानधन देईल, त्या मानधनावरतीच मी माझं आयुष्याची गुजराण करेल आणि जे काही सर्वसामान्य सोसायटीतून जे मला मानधन मिळेल, त्याच्यावरती मी खुश राहीन. देशाची सेवा करणे, हा गोपाळ गोखले यांचा धर्म होता. कसलाही भेद न मानता, मी माझ्या मातृभूमीची सेवा करणार, त्यामुळे कठीण प्रसंगाच्या काळामध्ये सर्वांसाठी इंडिया सोसायटीने पुष्कळ समाज कल्याणाची कामे केली.

पूर्ण भारतभर सर्व राज्यांमध्ये नैसर्गिक आपत्तींच्या वेळी पीडितांना मदत देण्याचे काम केलं, शिक्षणाचा प्रसार केला. यामध्ये देशातल्या सगळ्या मागासलेल्या भागात सोसायटीनं काम केलं, भारतातली ही पहिली सेवाभावी संस्था, जी इंग्रजांनी चालवलेली नव्हती. कुठल्याही धर्माशी बांधलेली नव्हती. आर्य समाज, रामकृष्ण मिशन, जेजुरी जमात, या सुद्धा सेवाभावी संस्था आहेत. गरिबांसाठी काम करतात. त्यांची गरिबी दुःख दूर करण्याचा प्रयत्न करतात. पण या सगळ्या कोणत्या ना कोणत्या धर्माशीच निगडीत आहे. सर्विस ऑफ इंडिया सोसायटी सुरू करून, गोखले यांनी एक नवी परंपरा सुरू केली.

गोपाळ कृष्ण गोखले एक राजकारणपटू म्हणून

१९०६ साली काँग्रेसच्या अध्यक्षपदी गोखलेंची निवड झाली. त्यांच्या अध्यक्षीय भाषणात, धर्मावर आधारलेल्या बंगालच्या फाळणीचा त्यांनी तीव्र निषेध केला. गोखले हे कायदेमंडळाचे सदस्य होते. संसद सदस्यांबरोबर, अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याबरोबर जो राजकीय सुधारणांचा मसुदा प्रसिद्ध आहे, त्यात खरं म्हणजे आणखी एक नाव जोडायला पाहिजे होतं,

गोपाळ कृष्ण गोखले यांचे आणि या मसुद्यानुसार भारताला मर्यादित का होईना, राजकीय हक्क मिळाले आणि याचे सगळे श्रेय गोखले यांच्याकडे जाते. देशसेवा आणि भारतीयांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणे, हा गोखलेंचा जणू धर्मच झालेला होता. आणि तो त्यांनी अत्यंत निष्ठेने पाळला. यालाच आज आपण राजकारणाचं आध्यात्मिकीकरण म्हणतो.

गोपाळ कृष्ण गोखले आणि गांधी युती

१८९६ मध्ये गोखलेंच्या दक्षिण आफ्रिकेतल्या चळवळीला पाठिंबा मिळवण्याकरता, गांधी भारतात आले, तेव्हा त्यांनी अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्या.

गांधीजींना चिंता होती की, माझ्या पद्धतीने मला साथ देणारा माणूस कोण शोधावा ? आणि याचे उत्तर त्यांना, गोखलेंच्या रूपाने सापडलं आणि त्यांनी गोखल्यांना आपला गुरु मानलं. आणि मग सहाजिकच वारसा असा चालत आला. गोखले हे उत्तुंग व्यक्तिमत्व त्यामानाने गांधी हे परदेशात चळवळ चालवणारे वकील. भारतातले लोक त्यांना फारसे ओळखत नव्हते, गोखल्यांमुळे भारतातल्या लोकांना गांधी माहिती झाले.

ते सांगायचे की, गांधी हे एक महान नेते आहेत. त्यांना दूरदृष्टी आहे. जर ते भारतात परत आले तर, तेच स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व करतील. गोखले यांनी असं म्हणणं म्हणजे, गांधींबद्दल हमीपत्र होतं.

गोपाळ कृष्ण गोखले

गोपाळ कृष्ण गोखले एक विश्वसनीय आंतरराष्ट्रीय नेता

बांधील मजूर पद्धतीच्या विरोधात लढत असताना, गांधींचं आणि गोखल्यांचं नातं धूळ झालं आणि ते सर्व खंडांमध्ये पसरलं आणि जगामध्ये जिथे जिथे अशा प्रकारचे अत्याचार होत होते, त्या सर्वांना गोखले पितृतुल्य वाटू लागले.

त्यांनी पत्र लिहून आणि वेगवेगळ्या माध्यमातून, गोखल्यांशी संपर्क साधून, स्वतःला मदत करण्याची विनंती करायला सुरुवात केली. सगळे देश असो मॉरिशियस, दक्षिण आफ्रिका, गिनी, सगळेजण गोखलेंकडे मदत करणारा त्राता म्हणून पाहू लागले. गोखले हे अर्थतज्ञ होतेच आणि त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय पातळीवरचे नेतेही.

एवढ्या उच्च पातळीवर पोहोचलेले ते पहिले भारतीय होते. अर्थात त्यानंतर गांधीजी आणि इतर अनेक नेत्यांनी तो मान मिळवला. गोखले हे नुसते आकड्यांचा खेळ करीत, नफा तोटा शिल्लक यांची जुळणी करणारे किंवा अंदाजपत्रक सादर करणारे अर्थतज्ञ नव्हते, ते देशातले सुरुवातीच्या काळातले मानवतावादी अर्थतज्ञ होते. त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा करांच्या आकारणीकडे लक्षवेधले.

ते म्हणाले, आपण दोन प्रकारचे कर पहिल्यांदा कमी करायला हवे, मिठावरचा कर कमी झाला पाहिजे. या देशातला गरीब माणूस हा मिठ भाकरीवर जगतो. त्यामुळे मिठावर सगळ्यात जास्त कर लावू नये.

गोपाळ कृष्ण गोखले एक अविश्रांत पुरस्कर्ता

प्रसार माध्यमांचा महत्व लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी देशभर फिरून सभांमधून, संमेलनांमधून, भाषण देऊन, त्यांनी लाखो हृदयांना स्पर्श केला.

दुसरा माध्यम म्हणजे वृत्तपत्र. वृत्तपत्राचे संपादक यांनी जशी जशी त्यांची चळवळ वाढू लागली, तसं तसं स्वतःचं एक वृत्तपत्र असला पाहिजे, या विचारातून त्यांनी पुण्यातून ज्ञान प्रकाश अलाहाबादमधून निघणार एक उर्दू वृत्तपत्र प्रकशित केले आणि इतर अनेक छोट्या छोट्या गोष्टी मधून, त्यांनी आपले विचार पसरवायला सुरुवात केली.

त्यानंतर १९१२ मध्ये ते दक्षिण आफ्रिकेत गांधींना भेटले. तिथे त्यांच्यासोबत राहिले आणि परत आल्यावर त्यांनी मुंबईत भाषण दिले. ज्या पद्धतीने गांधींनी आपल्या चळवळीचे नेतृत्व केलं, त्यावरून ते महान दृष्टीचे आहेत. कारण त्यांनी सामान्य माणसांना समर्थ बनवलं, म्हणजे याचा अर्थ गोखले गांधींची प्रतिमा घडवत होते.

त्या काळात गांधींना कोणी ओळखत नव्हतं, पण गोखले स्वतःचं नाव, प्रतिष्ठा, अधिकार, वापरून त्यांना पाठिंबा देत होते. जेव्हा १९१५ साली गांधी भारतात परतले, त्यावेळी सुद्धा राजकीय आणि तात्विक सल्ले तर नेहमीच दिले. त्या व्यतिरिक्त त्यांनी देशवासीयांना गांधींची चांगली ओळख करून दिली. गोखले गांधीजंचे वर्णन करत राहिले, नेता म्हणून, कार्यकर्ता म्हणून, गांधी कसे विलक्षण आहेत, हे सांगत राहिले. त्या अर्थाने गोखलेंनी गांधींचे नाव घराघरात पोहोचवलं.

गोपाळ कृष्ण गोखले यांचा मृत्यू

दक्षिण आफ्रिकेतून परत आल्यानंतर, भारताची प्रांतवार रचना याविषयीचा आराखडा तयार करण्याच्या कामाला गोखले लागले. पण त्यांची प्रकृती तितकीशी साथ देत नव्हती. गांधीजींना गोखल्यांच्या तब्येतीची काळजी वाटत असे. कारण गोखल्यांचं वजन जरा जास्त होतं. त्यांना मधुमेह होता, प्रकृती बरी नसायची. गांधी त्यांना सांगायचे, तुम्ही जास्त व्यायाम केला पाहिजे, विशिष्ट प्रकारचे अन्न खाल्लं पाहिजे, इतका जास्त प्रवास करत जाऊ नका, खूप जास्त कामाचा ताण घेऊ नका,

अखेर गांधीजींना जी भीती होती, तेच घडलं. दि. १९ फेब्रुवारी १९१५ रोजी वयाच्या ४९ व्या वर्षी गोखलेंच निधन झाले.

महाराष्ट्राचा हिरा आणि कामगारांचा युवराज, आज चिरनिद्रा घेण्यासाठी विसावलाय, त्यांचं तुम्ही सर्वांनीच अनुकरण करणे योग्य ठरेल. त्यांच्या विरुद्ध विचार प्रणाली असणाऱ्यांकडून सुद्धा, त्यांच्याबद्दल इतका आदरभाव व्यक्त करण्यात आला.

खरोखर गोखलेंच्या अनुयायांनी त्यांचं अनुकरण केलं. त्यांचे सर्वात परिचित शिष्य गांधीजी. त्यांनी स्वातंत्र्य चळवळीकरता आपला स्वतंत्र मार्ग तयार केला. पण साधनसूचिता, समता, राजकारणातील नैतिकता, ही गोखलेंची मूल्य आणि तत्व गांधींना सदैव वाट दाखवत राहिली.

त्यांनी सुरू केलेल्या सर्व शिक्षण संस्थांतून, त्यांच्या प्रोत्साहनातून स्थापन झालेल्या विविध संस्थांमधून, हक्काने मोफत शिक्षण घेणाऱ्या देशभरातल्या बालकांच्या निर्भर हास्यातून, सदशीर मार्गाने चालवल्या जाणाऱ्या सामाजिक चळवळींमध्ये, देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी झटणाऱ्या भारतीयांच्या अस्तित्वातून, देश कार्यासाठी स्वतःला झोकून देणाऱ्या, नागरिकांच्या अस्मितेतून, महात्माजींचे गुरु, गोपाळ कृष्ण गोखले आजही जिवंत आहेत.

गोपाळ कृष्ण गोखले यांच्यासंबंधी पुस्तके

  • महात्मा गोपाळ कृष्ण गोखले (चरित्र, मूळ आसामी, लेखक – डॉ. सूर्यकुमार भुयां)
  • नामदार गोखल्यांचं शहाणपण (नरेंद्र चपळगावकर)
  • भारत के अमर चरित्र : गोपाळ कृष्ण गोखले (हिंदी लेखक – नेमिशरण मित्तल)
  • नामदार गोखल्यांचा भारत सेवक समाज (नरेंद्र चपळगावकर)
  • गोखले : नवदर्शन (मु.गो. देशपांडे)

गोपाळ कृष्ण गोखले यांच्यासंबंधी चित्रपट

  • गोपाल कृष्ण (हिंदी) (१९१५) (गोपाल कृष्ण गोखल्यांवरील कृष्ण-धवल मूकपट) (भूमिका : गोपाळ कृष्ण गोखले स्वतः); दिग्दर्शक आर. नटराज मुदलियार)

गोपाळ कृष्ण गोखले यांच्यासंबंधी संस्था

‘गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पाॅलिटिक्स ॲन्ड इकाॅनाॅमिक्स’ नावाची संस्था नामदार गोखले यांच्या स्मरणार्थ पुणे शहरात स्थापन करण्यात आली आहे.

आसामी इतिहासकार डॉ. सूर्यकुमार भुयां यांनी १९१६-१७ या काळात आसामी भाषेत लिहिलेल्या गोखले यांच्या निधनानंतर त्यांच्या पहिल्या चरित्राचे मराठी भाषांतर ९४ वर्षांनी म्हणजे २०११ साली मराठीत आले. हे भाषांतर विद्या शर्मा यांनी केले आहे.

गोपाळ कृष्ण गोखले यांचा व्हिडिओ

FAQ

१. गोपाळ कृष्ण गोखले यांचा जन्म कधी झाला ?

दि. ०९  मे १८६६ रोजी रत्नागिरीतील कोथरूड येथे गोपाळ कृष्ण गोखलेंचा, गरीब ब्राम्हण कुटुंबात जन्म झाला.

२. गोपाळ कृष्ण गोखले यांचे गुरु कोण ?

आगरकरांनी गोखले यांचा परिचय करून दिला त्यांचे गुरूतुल्य महादेव गोविंद रानडे यांच्यासोबत.सामाजिक आणि आर्थिक प्रश्नांबद्दलची गोखलेंची जी मतं तयार झालीं त्याच्या प्रभावाखाली न्यायमूर्ती रानडे आणि गोखले यांच्यामध्ये एक गुरु शिष्य नाते निर्माण झाले.

३. गोपाळ कृष्ण गोखले यांचा मृत्यू कधी झाला ?

दि. १९ फेब्रुवारी १९१५ रोजी वयाच्या ४९ व्या वर्षी गोखलेंच निधन झाले.

४. कोण होते गोपाळ कृष्ण गोखले ?

भारत जगातली सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आहे. भारत देशाने दाखवून दिले की, वेगवेगळ्या धर्माचे, संस्कृतीतले आणि वेगवेगळ्या भाषा बोलणारे, लोक एकोप्यानं राहू शकतात आणि त्यांना हवं तसं जगण्याचं आणि विचारांचा स्वातंत्र्य उपभोग होऊ शकतात. हे स्वातंत्र्य म्हणजे, काही असामान्य भारतीयांच्या प्रयत्नांचा, ज्यांनी इतिहास बदलून दाखवला आणि आजचा भारत घडवला. असेच एक अलौकिक भारतीय गोपाळ कृष्ण गोखले.

निष्कर्ष

मित्रहो, आजच्या लेखा द्वारे आम्ही आपणास गोपाळ कृष्ण गोखले यांच्या बद्दल माहिती दिली आहे. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. लेख आवडल्यास तुमच्या इतर मित्रपरीवारांसोबत नक्की शेयर करा. धन्यवाद.

Leave a comment