विनोबा भावे माहिती मराठी : Vinoba Bhave Information In Marathi

विनोबा भावे माहिती मराठी : Vinoba Bhave Information In Marathi – आचार्य विनोबा भावे हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यामधील महत्वाचे स्वातंत्रवीर होते. त्यांनी स्वातंत्र्यलढ्यामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले. मानवाधिकार व अहिंसेच्या रक्षणासाठी त्यांनी मनापासून कार्य केले. विनोबा भावे यांनी राष्ट्र उभारणीसाठी भूदान चळवळीमध्ये अग्रगण्य योगदान दिले आहे. हे त्यांचे योगदान देशासाठी अत्यंत महत्त्वाचे सिद्ध झाले.

महात्मा गांधी यांच्या अग्रगण्य शिष्यांपैकी विनोबा भावे हे एक नावाजलेले शिष्य होते. ज्यांनी महात्मा गांधींच्या मार्गाचे अनुसरण करून, अहिंसकरीत्या स्वातंत्र्यसंग्रामामध्ये योगदान देऊन, आपले जीवन राष्ट्र उभारणीसाठी समर्पित केले. आजच्या काळात मानवधर्माची शिकवण देणारे सत्पुरुष म्हणून विनोबा भावे यांना ओळखले जाते. विनोबा हे स्वातंत्र्यलढ्यातील अहिंसक मार्गाने गांधीजीच्या विचाराने प्रभावित होऊन कार्य करणारे सत्पुरूष होते.

आज आम्ही आपणास या थोर समाज सुधारक, क्रांतिकारक व लेखक विनोबा भावे यांच्या बद्दल माहिती दिलेली आहे. हा लेख जाणून घेण्यासाठी, माहिती शेवटपर्यंत संपूर्ण वाचा.

Table of Contents

विनोबा भावे माहिती मराठी : Vinoba Bhave Information In Marathi

मूळ नाव विनायक नरहर भावे
जन्म तारीख ११ सप्टेंबर, १८९५
जन्म स्थळ गागोडे, महाराष्ट्र, भारत
ओळख आचार्य विनोबा भावे
काम आध्यात्मिक नेता, सामाजिक कार्यकर्ता, लेखक
प्रमुख ग्रंथगीता वार्ता, स्वराज्य शास्त्र, गीता सार
पुरस्कार/सन्मानरामोन मॅगसेसे पुरस्कार, पद्मविभूषण, जमनालाल बाजाज पुरस्कार, गांधी शांति पुरस्कार, लेनिन शांति पुरस्कार
आश्रमपरमधाम, पवनार, महाराष्ट्र, भारत
प्रसिद्धिभूदान आंदोलन,
स्वतंत्रता सेनानी,
शिक्षण क्षेत्रात योगदान
मृत्यू १५ नोव्हेंबर, १९८२
मृत्यू स्थळ पवनार, महाराष्ट्र, भारत

कोण होते आचार्य विनोबा भावे ?

विनोबा भावे हे प्रमुख भारतीय सामाजिक कार्यकर्ते, आध्यात्मिक नेते, अहिंसावादी नेते, म्हणून ओळखले जातात. टिकाऊ आणि सामाजिक न्याय, भूदान चळवळ व अहिंसा या सर्व गोष्टींच्या समर्थनासाठी विनोबा नावाजले जातात. विनोबा भावे यांना गांधीजींचे आध्यात्मिक उत्तराधिकारी म्हणून ओळखले जाते.

नक्की वाचा 👉👉 महर्षी धोंडो केशव कर्वे यांची माहिती

नक्की वाचा 👉👉पंडित जवाहरलाल नेहरू माहिती मराठी

आचार्य विनोबा भावे यांचा जन्म आणि शिक्षण

Vinoba Bhave Information In Marathi
  • विनोबा यांचे पूर्ण नाव विनायक नरहर भावे असे होते. त्यांचा जन्म दि. ११ सप्टेंबर १८९५ रोजी महाराष्ट्रामधील रायगड जिल्ह्यातील गागोडे या गावामध्ये झाला. त्यांच्या वडिलांचे नाव नरहरी शंभूराव भावे होते. ते व्यवसायाने विणकर होते व विठ्ठलाचे परमभक्त होते. विनोबा यांच्या आईचे नाव रुक्मिणी देवी. ह्या एक धर्माभिमानी हिंदू स्त्री होत्या. ज्यांनी त्यांच्या मुलांना अहिंसा व करुण्याच्या तत्त्वांचे पालन करण्यास उत्तम मार्गदर्शन दिले. विनोबा यांना चार भावंडे होती त्यामध्ये ते सगळ्यात मोठे होते.
  • विनोबा यांना अगदी लहान वयामध्ये, त्यांच्या आईने श्रीमद भागवतगीते सारख्या प्रचंड ग्रंथाचे वाचन करून, त्यामधील महत्त्वाचे सार समजावून सांगितले. भगवद्गीतेच्या ज्ञानाचा भावेंवर प्रचंड प्रभाव पडला. त्याच काळामध्ये स्थापन झालेल्या बनारस हिंदू विद्यापीठामध्ये महात्मा गांधींनी अतिशय उत्तमरीत्या भाषण केले. त्या भाषणाचे काही भाग वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झाले. ते वाचून विनोबा यांच्यावर प्रचंड प्रभाव पडला.
  • विनोबा यांचे प्राथमिक शिक्षण त्यांच्या मूळ गावी म्हणजेच गागोडे गावामध्ये झाले. ते एक अत्यंत हुशार विद्यार्थी होते. त्यांनी जगाबद्दल व तेथील लोकांबद्दल जाणून घेण्यास प्रचंड उत्सुकता दाखवली. प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर, विनोबा भावे यांनी त्यांच्या गावापासून लांब असणाऱ्या ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या पेण या ठिकाणी हायस्कूलमध्ये दाखला घेतला. त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती तितकीशी चांगली नसल्यामुळे, त्यांना अवघ्या दोन वर्षांमध्येच शाळा सोडून घरी बसावे लागले.
  • १९१६ मध्ये विनोबा महात्मा गांधींच्या मार्गदर्शनाखाली, असहकार चळवळीमध्ये सक्रियरित्या सहभागी झाले. अहिंसा व सामाजिक ज्ञानाच्या तत्त्वाशी मनापासून, वचनबद्ध होऊन त्यांनी काम करण्यास सुरुवात केली व हा त्यांच्या आयुष्यामधील महत्त्वाचा भाग होता.

आचार्य विनोबा भावे कौटुंबिक माहिती

नाव आचार्य विनोबा भावे
आईचे नाव रुक्मिणी देवी
वडिलांचे नाव  नरहरी शंभु राव
भावंडे बाळकृष्ण, शिवाजी, दत्तात्रेय

आचार्य विनोबा यांची कौटुंबिक पार्श्वभूमी

पाच मुलांच्या कुटुंबातील विनोबा हे दुसरे अपत्य होते. त्यांचे बंधू बालकृष्ण हे एक विद्वान आणि प्रतिभाशाली लेखक होते. तसेच त्यांचे धाकटे भाऊ शिवाजी हे देखील एक सामाजिक कार्यकर्ते आणि लेखक होते. आचार्य भावेंच्या बहिणी म्हणजेच माणिक आणि राधा या दोघीही अध्यात्मिक आणि सामाजिक कार्यात गुंतलेल्या होत्या.

महात्मा गांधींच्या आश्रमातील विनोबा भावे

  • आचार्य विनोबा यांच्यावर महात्मा गांधींच्या विचारांचा प्रचंड प्रभाव होता. गांधीजींच्या सत्य आणि अहिंसावादी विचाराने आचार्य प्रचंड प्रभावित होते. महात्मा गांधींच्या आश्रमामध्ये, होणाऱ्या सर्व कार्यक्रमांमध्ये ते आवडीने भाग घेत. या कामांच्या दरम्याने, अभ्यास, सामाजिक अवचेतनांशी संबंधित इतर कार्य, महात्मा गांधींच्या सहवासामध्ये राहून त्यांनी केली. त्याचप्रमाणे त्यांनी खादीच्या कपड्यांचा प्रचार सुद्धा केला. जो प्रचार स्वदेशी चळवळीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरला. यासोबतच भावे यांनी मुलांना शिक्षण देण्याबाबत व त्यांच्या सभोवतालची स्वच्छता राखण्याबाबत ठिकठिकाणी लोकांना जागरूक करण्याचा प्रयत्न केला.
  • दि. ०८ एप्रिल १९३१ मध्ये महात्मा गांधींच्या आदेशावरून, विनोबा यांनी महाराष्ट्रामधील वर्धा या गावी जाऊन वर्धा मध्ये गांधीजींच्या आश्रमात त्यांचा कारभार पाहिला. १९२३ मध्ये “महाराष्ट्र धर्म” नावाचे मासिक प्रकाशित करण्यास भावे यांनी सुरुवात केली. या मासिकामध्ये त्यांनी वेदांताचे महत्त्व व उपयुक्तता यावर निबंध लिहिले. नंतर हे निबंध लोकांना आवडू लागले व मासिकाचे रूपांतर साप्ताहिक मध्ये झाले.
  • लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी, मासिक महत्त्वाची भूमिका बजावत होते. आचार्य भावे यांनी सुरू केलेले हे मासिक तीन वर्ष प्रकाशित होत राहिले. १९२५ मध्ये विनोबा यांची मेहनत व त्यांनी केलेले उपक्रम पाहून महात्मा गांधींनी त्यांना केरळमधील बायकोन या छोट्याशा गावी जनकल्याणासाठी पाठवले. हरिजनांना मंदिरामध्ये जाण्यास त्या ठिकाणी बंदी होती. ही बंदी हटवून, समाजामध्ये समानतेची भावना निर्माण करण्याची जबाबदारी, महात्मा गांधी यांनी विनोबा भावे यांच्यावर सोपवली व विनोबा यांनी ती अत्यंत उत्तमरीत्या बजावली.
विनोबा भावे

विनोबा भावे यांना अटक

  • विनोबा यांच्या काळामध्ये म्हणजेच देश स्वतंत्र होण्याआधी,भारत देशावर ब्रिटिश सरकारचे राज्य होते. एकीकडे महात्मा गांधी लोकांना जागृत करण्यामध्ये व्यस्त होते तर दुसरीकडे देशाला ब्रिटिश राजवटीमधून मुक्त करण्याची जबाबदारी ही माय भूमीच्या पुत्रांवर होती. महात्मा गांधींच्या दोन्ही कार्यामध्ये आचार्य विनोबा भावे सुद्धा मनापासून भागीदार होते. देशांमध्ये ब्रिटिश सरकारच्या विरोधामध्ये आवाज उठवण्यासाठी कोणालाही स्वातंत्र्य नव्हते.
  • या भयंकर काळामध्ये स्वातंत्र्याची मागणी करणे, हे प्रचंड कठीण कार्य होते. परंतु महात्मा गांधी यांच्या सहकार्याने विनोबा यांनी अहिंसक वाटचाल सुरू ठेवली. याच काळात १९२० ते १९३० च्या दरम्याने आचार्यांनी जनजागृतीच्या कार्यामुळे, ब्रिटिश सरकारच्या तावडीत सापडून त्यांना अनेकदा अटक सुद्धा झाली.
  • या अटकेला व ब्रिटिश सरकारला विनोबा अजिबात घाबरले नाही. त्यांनी १९४० मध्ये पाच वर्ष तुरुंगवास भोगला. भावे यांना अटक करण्याचे कारण म्हणजे, ब्रिटिश सरकार विरुद्धची त्यांनी सुरू केलेली अहिंसक चळवळ. त्यांनी या गोष्टीला न घाबरता, न डगमगता, तुरुंगामध्ये अभ्यास व लेखन करण्याला सुरुवात केली. तुरुंगामध्ये असतानाच त्यांनी “इशावास्यवृत्ती” व “स्थितप्रज्ञा दर्शन” ही दोन पुस्तके लिहिली.
  • तुरुंगामध्ये असताना विनोबा यांनी दक्षिण भारतामधील चार भाषा शिकून, “लोकनगरी” नावाची लिपी बनवली. तुरुंगामध्ये असतानाच आचार्य भावे यांनी भगवद्गीतेचा मराठी भाषेमध्ये अनुवाद केला व संपूर्ण अनुवाद कारागृहामध्ये राहणाऱ्या इतर सर्व कायद्यांमध्ये प्रसारित करण्यास सुरुवात केली. हा अनुवाद नंतर “टॉक्स ऑन द गीता” या नावाने प्रकाशित करण्यात आला. ज्याचा इतर अनेक भाषांमध्ये सुद्धा अनुवाद केला गेला.
  • तुरुंगामधून बाहेर आल्यानंतर, आचार्य भावे यांनी अतिशय आत्मविश्वासाने “सविनय कायदेभंग चळवळ” मध्ये प्रमुख भूमिका बजावली. इतकी कामे पूर्ण करू सुद्धा सर्वसामान्यांमध्ये आचार्य भावे हे तितकेचे प्रसिद्ध झाले नाहीत. लोकांमध्ये त्यांची ओळख ही १९४० मध्ये वाढू लागली व महात्मा गांधींनी विनोबा यांना नवीन अहिंसक चळवळीमध्ये सहभागी म्हणून निवडले.
आचार्य विनोबा भावे

आचार्य विनोबा भावे यांचे विचार

आचार्य विनोबा भावे
  • कोणत्याही कामाची चांगली तयारी केल्याशिवाय त्या कामाला आरंभ न करणे आणि सुरु केलेले काम पूर्ण करूनच हातावेगळे करणे हे बुद्धीचे चांगले लक्षण आहे.
  • ईश्वर गरीब मनुष्याला गरीब ठेवून त्याच्यात हिम्मत आहे कि नाही ह्याची कसोटी घेत असतो.
  • दोन धर्मामध्ये कधीच संघर्ष होत नाही, सर्व धर्मांचा अधर्माबरोबर संघर्ष होत असतो.
  • प्रेम करणे हि एक कला आहे, पण प्रेम टिकवणे हि एक साधना आहे.
  • प्रेमाशिवाय सेवा व्यर्थ आहे, प्रेम नसताना जर कोणी सेवा करीत असेल, तर तो व्यापार आहे असे समजावे.
  • ईश्वर गरीब मनुष्याला गरीब ठेवून त्याच्यात हिम्मत आहे कि नाही ह्याची कसोटी घेत असतो.
  • विद्येचे चांगले फळ म्हणजे उत्तम चारित्र्य आणि सदाचार.
  • विचारांचा चिराग विझला, तर आचार आंधळा बनेल.
  • यशस्वी शिक्षण हा यशस्वी जीवनाचा पाया आहे.

विनोबा भावे यांचे सामाजिक आणि धार्मिक कार्य

आचार्य भावे यांना त्यांच्या आईने लहानपणीच भगवद्गीता व त्यामधील सार यांचे उत्तम महत्त्व समजावले. काही काळाने महात्मा गांधींच्या विचारांनी प्रभावित होऊन, विनोबा हे अहिंसकरीत्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाले. आचार्य भावे यांनी गरीब व श्रीमंत असा कोणताही भेदभाव केला नाही. त्यामुळे त्यांनी जनसामान्यांमध्ये जागृती केली. जर ब्रिटिश राजवट संपवायची असेल तर, सर्वांनी जात-पात विसरून एकत्र येणे अत्यंत गरजेचे आहे. यानंतर विनोबा यांनी चळवळीमध्ये एक महत्त्वाचा पाया रचला. यामध्ये असे दिसून येते की, विनोबा भावे यांचे हृदय हे किती चांगले व त्यागाने भरलेले होते.

आचार्य विनोबा भावे

विनोबा भावे यांची भूदान चळवळ

दि. १८ एप्रिल १९५१ मध्ये भारत ब्रिटिश राजवटी पासून स्वतंत्र झाला होता. परंतु अजूनही समाजामधील बेड्या तशाच होत्या. ज्या लवकरात लवकर तोडणे अत्यंत महत्त्वाचे होते. इंग्रजांनी भारताला जाताना अशा प्रकारे कमकुवत केले होते की, अनेक लोक प्रचंड प्रमाणात गरिबीमध्ये राहू लागले. ज्यांच्याकडे स्वतःची राहायला जागाही नव्हती. ८० हरिजन कुटुंबांना आचार्य भावे यांनी भेटून, त्यांचे म्हणणे ऐकून घेतले व त्यांना या गोष्टीचे अत्यंत दुःख झाले.

विनोबा यांनी सुरू केलेल्या, भूदान चळवळी मधून, गरीब लोकांना मदत करण्याची मनापासून इच्छा होती त्यांनी त्या चळवळीद्वारे प्रथम आपली जमीन दान केली व नंतर भारताच्या विविध भागांमध्ये फिरून लोकांना त्यांच्या जमिनीचा लहानसा भाग गरीब कुटुंबासाठी दान करण्यास सांगितले. आचार्य आचार्य भावे यांच्या त्याग आणि समर्पणाने अनेक लोक प्रभावित होऊन, भूदान चळवळीमध्ये सक्रियरित्या सहभागी झाले. भूदान चळवळीमध्ये विनोबा भावे यांनी त्यांच्या आयुष्यामधील तेरा वर्षे समर्पित केली.

भूदान चळवळीचे महत्त्व काय ?

आचार्य भावे यांनी १८५१ मध्ये भूदान चळवळीला सुरुवात केली. भूदान चळवळीचे काही महत्त्वाचे मुद्दे खालील प्रमाणे –

१) जमीन वितरण

भूदान चळवळीमुळे, लाखो एकर जमीन भूमिहीन गरिबांना वितरित करण्यात आली. ज्यामुळे ग्रामीण भागामध्ये भूमी नसलेल्या व गरीब माणसांमध्ये समस्या दूर करण्यास मदत प्राप्त झाली.

२) अहिंसक सामाजिक बदल

भूदान चळवळ, अहिंसा व ऐच्छिक कृतीच्या तत्त्वावर आधारित होती. ज्यामुळे भारतामध्ये अहिंसा व सामाजिक बदलांच्या संस्कृतीला उत्तमरीत्या चालना मिळण्यास मदत झाली.

३) ग्रामीण गरिबांचे सक्षमीकरण

भूदान चळवळीमुळे, ग्रामीण भागातील गरिबांना जमीन व इतर संसाधनांमध्ये प्रवेश देऊन, त्यांचे सक्षमीकरण करण्यास सुरुवात केली. त्यामुळे ग्रामीण भागातील लोक, स्वावलंबी बनण्यास व त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत झाली.

४) इतर चळवळीवर प्रभाव

भूदान चळवळीमुळे कोलंबिया, ब्राझील व इतर देशांवर मोठा प्रभाव पडला. त्याचा मुख्य उद्देश भूमिहीनता आणि असामानतेच्या समस्या यावर लक्ष केंद्रित करणे हा होता.

५) वारसा

भूदान चळवळ हि विनोबा भावे व भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा एक महत्त्वाचा वारसा राहिला आहे. जगभरामधील लोकांना न्याय व समाजासाठी कार्य करण्यासाठी प्रेरणा प्राप्त झाली.

विनोबा भावे यांचे ब्रह्मविद्या मंदिर

  • आचार्य विनोबा यांनी स्थापन केलेल्या, अनेक आश्रमांपैकी ब्रह्मविद्या मंदिर हा एक आश्रम होता. हा आश्रम विनोबा यांनी खास महिलांसाठी बांधला होता. ज्या ठिकाणी महिला त्यांचे स्वतःचे आयुष्य अगदी सहजरीत्या जगू शकतात. या आश्रमा मधील लोक एकत्र येऊन, उपजीविकेसाठी शेती करत असत. शेती करतेवेळी महात्मा गांधीजींच्या अन्न उत्पादनाच्या नियमाकडे लक्ष देत असत. हे नियम सामाजिक न्याय व टिकाऊपणाबद्दल बोलत होते.
  • आचार्य भावे व महात्मा गांधी यांच्याप्रमाणे त्या आश्रमात राहणाऱ्या लोकांची ही श्रीमद भागवत गीतेवर प्रचंड श्रद्धा होती. या आश्रमामधील लोक सकाळीच उठून, झाडलोट करून, उपनिषदांचे पठण करत, प्रार्थना करायचे. त्या ठिकाणी दुपारच्या वेळी विष्णू सहस्त्रनाम आणि सायंकाळी भगवद्गीतेचे पठण केले जात असे.
  • या आश्रमामध्ये २५ महिला होत्या. नंतर आचार्य भावे यांनी या आश्रमात पुरुषांनाही काम करण्याची परवानगी प्रदान केले. १९५९ मध्ये आश्रमाची स्थापना झाल्याने, आश्रमाला प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागले. ब्रम्ह विद्या मंदिर या आश्रमाची स्थापना महाराष्ट्रामधील पवनार या ठिकाणी झाली.

विनोबा भावे यांचे साहित्य

  • आचार्य भावे यांच्या घरच्या आर्थिक अडचणीमुळे त्यांना अवघ्या दोन वर्षांमध्ये महाविद्यालयीन शिक्षण सोडावे लागले असे असले तरी, त्यांच्यामध्ये शिक्षणाची आवड ही नेहमीच होती. त्यामुळे त्यांनी त्यांच्या ज्ञानाच्या जोरावर, अनेक महत्त्वाची पुस्तके प्रकाशित केली. ज्याचे वाचन करून, जनसामान्यांना सहजपणे ज्ञान प्राप्त झाले. यासोबतच त्यांनी अनुवादक म्हणून सुद्धा काम केले. त्यांनी श्रीमद भागवतगीतेचे मराठीमध्ये अनुवाद केले. ज्याच्या मदतीने संस्कृत दीर्घकाळ सामान्य लोकांमध्ये टिकून राहिले.
  • याशिवाय आचार्य भावे यांनी मराठी, गुजराती, उर्दू, हिंदी, इत्यादी भाषेचे उत्तम ज्ञान संपादित केले. विनोबा भावे हे उत्तम समाजसुधारक होते. आचार्य यांना कन्नड भाषेची लिपी ही अतिशय सुरेख वाटली. आचार्य विनोबा यांच्यामते कन्नड भाषेची लिपी ही जगामधील सर्व लिपींची मुख्य राणी आहे.
  • आचार्य भावे यांनी त्यांच्या जीवन कार्यामध्ये अनेक कलाकृती रचल्या. त्यांनी त्यांच्या लेखनामध्ये श्रीमद् भागवतगीता, शंकराचार्य, बायबल, कुराण, इत्यादी धार्मिक पुस्तकांचे अनुवाद केले. या कामाशिवाय त्यांनी अनेक मराठी संतांची, शिकवण सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवली.
  • श्रीमद्भगवद्गीतेचा मराठी भाषेमध्ये आचार्य भावे यांनी अनुवाद केला. भारतामधील झारखंड या ठिकाणी विनोबा यांच्या नावाने एक विद्यापीठ सुद्धा स्थापन करण्यात आले आहे.

विनोबा भावे पुस्तके

  • साम्य सूत्र वृत्ती
  • अष्टदशी
  • गीताई
  • जीवनदृष्टी
  • ईशा वस्य वृत्ती
  • स्थितप्रज्ञदर्शन
  • साम्य सूत्रे
  • मधुकर
  • गुरुबोध सार
  • गीताई चिंतनिका
  • गीता प्रवचने
  • मनुशासनम
  • विचार पोथी
  • भागवत धर्म सार
  • उपनिषदांचे अभ्यास
  • लोक नीती

आचार्य विनोबा भावेंची ग्रंथ संपदा

  • ऋग्वेद्सार
  • वेदान्तसुध
  • ईशावास्यवृत्ती
  • भागवतधर्मप्रसार
  • गुरूबोधसार

विनोबा भावे यांचे चरित्र ग्रंथ

  • विनोबांचे धर्मसंकीर्तन
  • आमचे विनोबा
  • साम्ययोगी विनोबा
  • गांधी विनोबा आणि जयप्रकाश
  • विनोबा सारस्वत
  • दर्शन विनोबांचे
  • महाराष्ट्राचे शिल्पकार विनोबा भावे
  • ब्रह्मर्शी विनोबा

आचार्य विनोबा यांच्या बद्दल मनोरंजक तथ्ये

  • आचार्य भावे यांनी भारतामधील मुख्य हिंदू धर्मग्रंथ श्रीमद भगवद्गीता या ग्रंथाचे मराठीमध्ये भाषांतर केले व त्याचे नाव गीताई म्हणून ठेवले.
  • आचार्य भावे यांना १९८३ मध्ये त्यांच्या मरणोत्तर भारत सरकारने भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार “भारतरत्न” देऊन सन्मानित केले.
  • इंदिरा गांधी यांनी लादलेल्या आणीबाणीचे विनोबा भावे यांनी समर्थन केले.
  • विनोबा भावे यांच्यावर महात्मा गांधींचा मुख्य प्रभाव होता. गांधीजींच्या समतेच्या तत्त्वाचे भावे प्रमुख समर्थक होते.
  • आचार्य भावे यांच्या प्रमुख साहित्यकृतीमध्ये गीता प्रवचन, तिसरी शक्ती, स्वराज्य शास्त्र, इत्यादी गोष्टींचा समावेश होता.
  • आचार्य विनोबा भावे हे अहिंसावादी होते.

विनोबा भावे यांचा सन्मान व पुरस्कार

  • १९५८ मध्ये विनोबा भावे यांना समुदाय नेतृत्वासाठी आंतरराष्ट्रीय “रॅमन मॅगसेसे पुरस्कार” देऊन गौरवीत करण्यात आले.
  • १८८३ मध्ये भावे यांना त्यांच्या मरणोत्तर भारत सरकारने भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार “भारतरत्न” देऊन सन्मानित केले.
  • १८८३ मध्ये भारत सरकारने विनोबा यांना त्यांच्या समाजामधील प्रमुख योगदानाबद्दल “पद्यविभूषण” हा पुरस्कार देऊन सन्मानित केले.
  • १९७५ मध्ये विनोबा यांना त्यांनी केलेल्या ग्रामीण विकास व सामाजिक न्यायामधील योगदानाबद्दल “जमनालाल बजाज पुरस्कार” देऊन गौरवित करण्यात आले.
  • १८८३ मध्ये विनोबा भावे यांना त्यांच्या मरणोत्तर “टेम्पलटन पुरस्कार” देऊन सन्मानित केले गेले.
  • विनोबा यांना “गांधी शांतता पुरस्कार” व “लेनिन शांतता पुरस्कार” सह इतर विविध पुरस्कारांनी गौरवित केले गेले.

विनोबा भावे स्मृतीस्थळे आणि संस्था

विनोबा आश्रम

महाराष्ट्रातील पवनार या ठिकाणी विनोबा आश्रम आहे. विनोबा भावे यांनी 1951 मध्ये स्थापन केलेल्या या आश्रमाला एक अध्यात्मिक आणि शैक्षणिक केंद्र म्हणून पाहिले जाते. हा आश्रम पर्यावरण संवर्धन शिक्षण आणि सामाजिक न्याय यांना प्रोत्साहन देतो.

विनोबा सेवा प्रतिष्ठान

विनोबा सेवा प्रतिष्ठान ही एक ना नफा णां तोटा अशी संस्था आहे. या संस्थेची स्थापना विनोबा भावे यांच्या शिष्याने 1975 मध्ये त्यांच्या तत्त्वांना आणि कल्पनांना चालना देण्यासाठी केली होती. ही संस्था आरोग्य ग्रामीण विकासावर तसेच शिक्षणावर केंद्रित वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम राबवते.

भूदान ग्रामदान मंडळ

1952 मध्ये भूमिहीन शेतकऱ्यांना श्रीमंत जमीन मालकांनी दान केलेल्या जमिनीच्या वितरणावर देखरेख करण्यासाठी भूदान ग्रामदान मंडळाची स्थापना विनोबा भावे यांनी केली. आज भारतातील विविध राज्यांमध्ये हे मंडळ कार्यरत आहे. हे मंडळ म्हणजेच विनोबा भावे यांच्या वारशाचा एक महत्त्वाचा भाग समजला जातो.

विनोबा भावे विद्यापीठ

झारखंडच्या राज्य सरकारने 1992 मध्ये विनोबा भावे यांच्या सन्मानार्थ हजारीबाग या ठिकाणी विनोबा भावे विद्यापीठाची स्थापना केली. विविध विषयांमधील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम उपलब्ध करण्याचे काम हे विद्यापीठ करते.

विनोबा कुटीर

विनोबा भावे यांच्या जीवन आणि कार्याला वाहिलेले महाराष्ट्रातील पवनार या ठिकाणी संग्रहालय आणि ग्रंथालय म्हणून विनोबा कुटीर ओळखले जाते. या संग्रहालयात विनोबा भावे यांच्या वैयक्तिक वस्तू, छायाचित्रे, पुस्तके तसेच त्यांची पत्रे यांचा समावेश आहे.

विनोबा भावे यांचे कार्य

भूदान चळवळ

1950 च्या दशकामध्ये विनोबा भावे यांनी भूदान चळवळ म्हणजेच जमीन भेट सुरू केली. यामध्ये त्यांनी श्रीमंत जमीन मालकांना त्यांच्या जमिनी त्यांच्या इच्छेनुसार भूमीहीन आणि गरिबांना दान करण्याचे आवाहन केले. या चळवळीला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळाला. आणि बरीच वर्षे दुर्लक्षित राहिलेल्या लोकांना जमिनीचे वाटप करण्यास मदत झाली.

सर्वोदय चळवळ

सर्वोदय चळवळीतील एक प्रमुख व्यक्तिमत्व म्हणून विनोबा यांचे नाव घेतले जाते. ज्यांनी गरीब आणि उपेक्षितांचे कल्याण करण्याचा प्रयत्न केला. तसेच सामाजिक न्याय आणि आर्थिक समानता प्राप्त करण्याचे साधन म्हणून अहिंसा स्वयंपूर्णता आणि विकेंद्रीत शासनाच्या तत्त्वांवर जोर दिला.

अध्यात्मिक नेतृत्व

सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये अध्यात्मिक मूल्यांचे महत्त्व सांगणारे अध्यात्मिक नेते म्हणून विनोबा भावे यांच्याकडे पाहिले जाते. त्यांच्यावर महात्मा गांधींच्या शिकवणींचा प्रभाव होता. अहिंसा आणि सामाजिक न्यायाचा वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न विनोबा भावे यांनी केला.

अहिंसा

सामाजिक आणि राजकीय बदल साध्य करण्यासाठी आयुष्याच्या शक्तीवर त्यांनी विश्वास ठेवून अन्याय आणि अत्याचाराला आव्हान देण्याचे साधन म्हणून, प्रतिकार आणि सविनय कायदेभंगाची सुरुवात केली.

विनोबा भावे यांच्या आयुष्याचा थोडक्यात आढावा

  • विनोबा भावे यांचे पूर्ण नाव विनायक नरहर भावे असे होते. त्यांचा जन्म दि. ११ सप्टेंबर १८९५ रोजी महाराष्ट्रामधील रायगड जिल्ह्यातील गागोडे या गावामध्ये झाला.
  • १९१३ बडोदा येथे मॅट्रीकची परीक्षा उत्तीर्ण
  • १९१४ बडोदा कॉलेजात विद्यार्थी मंडळाची स्थापना.
  • ७ जून १९१६ कोचरब येथील सत्याग्रहाश्रमात गांधीजीशी विनोबाची पहिली भेट.
  • ८ एप्रिल १९२१ वर्धा आश्रमाचे संचालक म्हणून नेमणुक.
  • जानेवारी १९२३ महाराष्ट्र धर्म मासिक सुरु.
  • १३ एप्रिल १९२३ नागपूर – झेंडा सत्याग्रहात सहभाग.
  • १८ जून १९२४ महाराष्ट्र धर्म मासिकाचे साप्ताहिकात रुपांतर.
  • १९३१ आईच्या इच्छापूर्तीसाठी भगवत गितेचे अध्ययन करुन ‘गीताई’ हे समश्लोकी मराठीत भाषांतर.
  • १९ फेब्रुवारी १९३२ धुळे तुरुंगात १८ व्याख्याने
  • १९ जून १९३२ गिता प्रवचन म्हणून प्रसिद्ध झाली.
  • १४ जुलै १९३२ गीताईच्या पहिल्या आवृत्तीचे धुळे जेलमध्ये प्रकाशन.
  • ६ मे १९३२ वर्ध्याजवळ ग्रामसेवा मंडळाची (गोपुरची) स्थापना.
  • २ ऑक्टोबर १९३६ फैजपूर येथिल राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनात मुहूर्तमेढ विनोबाच्या हस्ते.
  • १९३६ महारोगी सेवा मंडळाची स्थापना वर्धा येथे.
  • २० ऑक्टोबर १९४० गांधीच्या वैयक्तीक सत्याग्रह आंदोलनातील पहिले वैयक्तीक सत्याग्रही विनोबा भावे.
  • ऑगस्ट १९४२ चले जाव चळवळी दरम्यान विनोबांना अटक.
  • वेल्लोरे तुरुंगात विनोबांनी १०८ दिवस प्रवचने दिली, ती वेल्लोर प्रवचने म्हणून विनोबा साहित्य खंड ५ मध्ये प्रसिद्ध.
  • शिवणी तुरुंगात गीतेवर १८ प्रवचने दिली ती स्थितप्रत दर्शन या नावाने प्रसिद्ध आहे.
  • १८ एप्रिल १९५१ भूदान चळवळ – सब भूमी गोपाल की – तेलंगणातील नालगोंडा जिल्ह्यातील पोचमपल्ली गावातून चळवळ प्रारंभ.
  • याच गावातील श्री. रामचंद्र रेड्डी यांनी आपली १०० एकर जमीन दान देऊन भूदान चळवळीचा प्रारंभ केला.
  • ११ जुलै १९५७ केरळ येथे शांति सेना स्थापन केली.
  • पहिले सेनापती म्हणुन केलप्पनजी यांची निवड विनोबांनी केली.
  • १९५८ रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय.
  • १५ ऑगस्ट १९६० इंदूर येथे सर्वोदय कार्यकर्त्यासाठी विसर्जन आश्रमाची स्थापना.
  • ५ मार्च १९६२ भारत-चीन सिमेवरील नेफा येथे मैत्री आश्रमाची स्थापना.
  • ८ मार्च १९६६ बिहारमधील कहलगाव येथे आचार्य कुलाची स्थापना.
  • ७ जून १९६६ सूक्ष्म कर्मयोगाचा प्रारंभ (पवनार आश्रम)
  • १९७५ वर्धा येथील पवनार गावात परमधाम आश्रमाची स्थापना.
  • ११ सप्टेंबर १९७६ गोहत्या विरोधात आमरण उपोषणाची घोषणा.
  • १५ नोव्हेंबर १९८२ वयाच्या ८७ व्या वर्षी वर्धा येथील पवनार आश्रमात सकाळी ९:३० वा. ब्रह्मनिर्वाण
  • १९८३ भारत सरकारकडून मरणोत्तर भारतरत्न.

विनोबा भावे यांचे निधन

आचार्य विनोबा भावे यांनी आपल्या आयुष्यामधील शेवटचे दिवस हे त्यांनी स्थापन केलेल्या ब्रह्मविद्या मंदिर आश्रमामध्ये व्यतीत केले. त्यांच्या शेवटच्या क्षणी जैन धर्माच्या मान्यतेनुसार, त्यांनी समाधी हा मार्ग स्वीकारला व अन्न, पाणी सर्वकाही त्यागले. विनोबा भावे यांचे दि. १५ नोव्हेंबर १९८२ मध्ये निधन झाले.

FAQ

१. विनोबा भावे यांचे पूर्ण नाव काय होते?

विनोबा भावे यांचे पूर्ण नाव विनायक नरहर भावे असे होते. त्यांचा जन्म दि. ११ सप्टेंबर १८९५ रोजी महाराष्ट्रामधील रायगड जिल्ह्यातील गागोडे या गावामध्ये झाला.

२. विनोबा भावे महात्मा गांधींसोबत काय जगले?

आचार्य विनोबा भावे यांच्यावर महात्मा गांधींच्या विचारांचा प्रचंड प्रभाव होता. गांधीजींच्या सत्य आणि अहिंसावादी विचाराने आचार्य प्रचंड प्रभावित होते. महात्मा गांधींच्या आश्रमामध्ये, होणाऱ्या सर्व कार्यक्रमांमध्ये ते आवडीने भाग घेत. या कामांच्या दरम्याने, अभ्यास, सामाजिक अवचेतनांशी संबंधित इतर कार्य, महात्मा गांधींच्या सहवासामध्ये राहून त्यांनी केली. त्याचप्रमाणे त्यांनी खादीच्या कपड्यांचा प्रचार सुद्धा केला. जो प्रचार स्वदेशी चळवळीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरला.

३. विनोबा भावे यांचा मृत्यू कधी झाला ?

आचार्य विनोबा भावे यांनी आपल्या आयुष्यामधील शेवटचे दिवस हे त्यांनी स्थापन केलेल्या ब्रह्मविद्या मंदिर आश्रमामध्ये व्यतीत केले. विनोबा भावे यांचे दि. १५ नोव्हेंबर १९८२ मध्ये निधन झाले.

निष्कर्ष

मित्रहो, आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणस महान समाजसुधारक, लेखक, अहिंसावादी स्वत्रंतसैनिक आचार्य विनोबा भावे यांच्या बद्दल माहिती दिली आहे. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. लेख आवडल्यास तुमच्या इतर मित्रपरिवारासोबत नक्की शेयर करा. धन्यवाद.

Leave a comment