चिकन बिर्याणी रेसिपी मराठी | Tasty 31 Minute Chicken Biryani Recipe in Marathi

चिकन बिर्याणी रेसिपी मराठी | Chicken Biryani Recipe in Marathi – मित्रांनो आपण चिकन बिर्याणी रेसिपी मराठी शोधत असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. बिर्याणी म्हटली, की प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटते. बिर्याणी ही अनेक प्रकारे केली जाऊ शकते, परंतु फार कमी वेळात आणि घरच्या घरी उपलब्ध असलेल्या सामानामध्ये अतिशय चविष्ट अशा प्रकारची करता येणारी बिर्याणी म्हणजेच चिकन बिर्याणी.

Table of Contents

चिकन बिर्याणी रेसिपी मराठी – Chicken Biryani Recipe in Marathi

खाली दिलेल्या प्रत्येक स्टेप नुसार तुम्ही जर चिकन बिर्याणी कराल तर याची चव महिनोन महिने जिभेवर राहील याची खात्री आहे. तुमच्या घरी तुम्ही नक्की करून बघा. चला तर मग पाहूया चिकन बिर्याणी कशी बनवायची.

चिकन बिर्याणीचा इतिहास

प्रामुख्याने भात, मसाले व मांस वापरून बनवल्या जात असलेल्या बिर्याणीचे मूळ मध्ययुगात भारतावर राज्य करणाऱ्या मुस्लिम शासकांमध्ये आढळते. बिर्याणी हा फारसी भाषेपासून तयार झालेला एक उर्दू शब्द आहे .

चिकन वापरून बनवले गेलेली बिर्याणी भारताच्या अनेक भागात तेथील स्थानिक नावावरून ओळखली जाते म्हणजेच दिल्ली बिर्याणी, कोलकत्ता बिर्याणी, मलबार बिर्याणी, मालवणी बिर्याणी, हैदराबादी बिर्याणी इत्यादी. ह्या सर्व बिर्याणी मध्ये मूळ घटक सारखे असले तरी तांदळाचे प्रकार मसाल्यांचे मिश्रण आणि त्या त्या त्या भागातील वेगळेपण त्यामध्ये दिसून येते.

Chicken Biryani Recipe in Marathi
Chicken Biryani Recipe in Marathi

चिकन बिर्याणी खाण्याचे फायदे

चिकन मध्ये जास्त प्रमाणात प्रोटीन असते म्हणून जिम करणाऱ्या किंवा डायट करणाऱ्या लोकांना चिकन खाण्याचा सल्ला दिला जातो. प्रोटीन आपल्या स्नायूंना सामर्थ्य देते. ज्यांना शरीराची शक्ती वाढवायची आहे, त्यांनी चिकन खाणे आवश्यक आहे.

चिकन हे एक लीन मीट (soft meat) आहे ज्याचा अर्थ असा आहे की ज्यात जास्त प्रमाणात चरबी नसते म्हणून, नियमितपणे चिकन खाल्ल्यास निरोगी मार्गाने वजन कमी होण्यास मदत होते.
प्रथिनां व्यतिरिक्त चिकन मध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस चे प्रमाणही जास्त असते. ही दोन्ही खनिजे तुमची हाडे निरोगी ठेवण्यास मदत करतात चिकन नियमितपणे खाल्ल्याने संधिवात होण्याचा धोकाही कमी होतो.

चिकन मध्ये ट्रायटोफॅन आणि व्हिटॅमिन बी फाईव्ह चांगल्या प्रमाणात असते. त्यामुळे तणाव कमी होण्यास मदत होते. चिकन मॅग्नेशियम ने देखील संपृक्त आहे. एकंदरीत चिकन खाणे आपल्याला तणाव मुक्त आयुष्य जगण्यास मदत करते.

बिर्याणी बनवताना भात चिकन, तूप कांदा, टोमॅटो, पुदिना, कोथिंबीर, दही असे सगळे पदार्थ आपण वापरतो तसेच लवंग, दालचिनी, हळद, तमालपत्र सारखे औषधी मसाला वनस्पतींचाही वापर होतो.

यामुळे महिलांमधील हार्मोनल समस्यांवर नियंत्रण मिळवण्यास मदत होते. चिकन शरीरातील रोगप्रतिकारक पेशींमध्ये वाढ करण्यास मदत करते. चिकन खाण्यासाठी अधिक फायदेशीर आणि सर्दीवर मात करण्याचा उत्तम मार्ग मानला जातो.

Chicken Biryani Recipe in Marathi

चिकन बिर्याणी बनवताना कोणती काळजी घ्याल ?

चिकन बिर्याणी रेसिपी साठी भात बनवताना तांदूळ छान स्वच्छ धुवून अर्धा तास भिजवून ठेवावा. म्हणजे भात छान फुलून येईल भात शिजवताना पाण्यात लिंबू पिळावा जेणेकरून भात पांढरा शुभ्र दिसेल. चिकन  भात आणि कांदा समप्रमाणात घेतल्यास बिर्याणी चविष्ट होते. भात शिजताना तुपाचा वापर करावा जेणेकरून भात मोकळा होतो.

बिर्याणी बनविण्याच्या आधी चिकन साधारण एक ते दोन तास मॅरीनेट करून ठेवले पाहिजे ज्यामुळे चिकनला छान चव येते.

तळण्यासाठीचा लागणाऱ्या कांद्याला मीठ लावून मग तळावा जेणेकरून कांदा कुरकुरीत होतो.
सुरुवातीला चिकन आणि भात अर्धा कच्चा शिजवावा त्यानंतर तो मंद गॅसवर शिजवावा जेणेकरून छान चव येईल आणि व्यवस्थित एकजीव होईल.

चिकन बिर्याणी साठी लागणारे साहित्य

चिकन बिर्याणी साहित्य

अर्धा किलो बासमती तांदूळ
अर्धा किलो किलो चिकन
7 कांदे
3 टोमॅटो
2 टी स्पून तिखट
अर्धा टी स्पून हळद
पाच ते सहा हिरवी वेलची
दोन ते तीन मसाला वेलची
दोन ते तीन तमालपत्र
तीन ते चार दगडफूल
सात ते आठ लवंग
चवीनुसार मीठ
चिमूटभर साखर
15 ते 20 काजूचे तुकडे
5 ते 10 बेदाणे
एक वाटी तूप
दोन चमचे आले पेस्ट
दोन चमचे लसूण पेस्ट
दोन चमचे हिरव्या मिरचीची पेस्ट
दोन ते तीन दालचिनीचे तुकडे
1 वाटी आंबट दही
चिमूटभर केशर
तळण्यासाठी तेल
आवश्यकतेनुसार गरम पाणी

Chicken Biryani Recipe in Marathi

बिर्याणी मसाला कसा बनवावा

2 तुकडे दालचिनी, चार लवंगा, पाच ते सहा हिरवी वेलची, दोन मसाला वेलची, 10 काळीमिरी, एक टीस्पून खसखस पाव टीस्पून शहाजिरे दोन दगडफूल आधी हे सर्व मसाले मंद गॅसवर भाजून घ्यावेत. त्यानंतर पंधरा ते वीस लसूण पाकळ्या, आले, चार ते पाच ओल्या मिरच्या, थोडी कोथिंबीर, पुदिना, एक टोमॅटो एक कांदा हे सगळे बारीक मिक्सरला वाटून घेणे.

चिकन मॅरीनेशन

अर्धा किलो चिकनचे तुकडे धूवून घ्या ते एका भांड्यात काढा त्याला हळद चवीपुरते मीठ , आलं लसूण पेस्ट एक चमचा लिंबाचा रस तसेच एक वाटी दही तसेच एक चमचा धने जिरे पावडर आपण जो बनवून घेतला होता तो बिर्याणी मसाला दोन चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर दोन-चार पुदिन्याची पाने आणि दोन-चार हिरव्या मिरच्या टाकून मिश्रण एकजीव करून घेणे. हे एकजीव केलेले मिश्रण साधारण दोन ते चार तासासाठी मॅरीनेट करण्यासाठी ठेवणे.

चिकन ग्रेव्ही कशी बनवावी

एका मोठा टोप मंद आचेवर ठेवून त्यात तूप गरम करून घ्या. मग त्यात लवंग, तेजपत्ता, शहाजिरे, 4 वेलची दालचीनी आणि लाल तिखट टाकुन 1 मिनिट भाजून घ्यावे

मग बारीक चिरलेला कांदा टाकून सोनेरी होईपर्यंत परतून घ्यावा
मग त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकुन ते मिश्रण परतून घेऊन थोडी मिरची पावडर, धणे पावडर, मीठ, टोमॅटो प्यूरी, मॅरीनेट केलेले चिकन आणि दही टाका.
त्यात असलेले चिकन चे 12- 15 मोठे मध्यम प्रमाणात शिजवून घ्या

तळलेला कांदा कसा तयार करावा

चिरलेल्या उभ्या कांद्यामध्ये थोडे मीठ घालावे जेणेकरून कांदा कुरकुरीत होण्यास मदत होते
एका कढईत तेल तापायला ठेवावे त्यामध्ये चिरलेला उभा कांदा लालसर परतून घ्यावा व काढून ठेवावा .

बिर्याणी मसाला

बिर्याणी करण्याच्या आधी सर्वप्रथम आपण अर्धा किलो बासमती तांदूळ स्वच्छ धुऊन एका भांड्यामध्ये तांदूळ निथळत ठेवावा.

एका टोपामध्ये अंदाजे भात शिजण्यासाठी लागणारे पाणी उकळविण्यासाठी ठेवणे
पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात तीन-चार काळी मिरी एक दोन मसाला वेलची एक दोन दालचिनीचे तुकडे चार-पाच लवंगा दोन चार तमालपत्रे तसेच दोन-चार हिरवी मिरची ,दोन ते तीन चमचे तूप, चवीपुरते मीठ घालावे त्यानंतर धुऊन ठेवलेले बासमती तांदूळ त्यामध्ये घालावे आता हा भात अर्धा कच्चा शिजवून घ्यावा. (पूर्ण शिजवू नये)

यानंतर भारतातील पूर्ण पाणी गाळून टाकून पसरट भांड्यामध्ये हा भात मोकळा करण्यासाठी ठेवून द्यावा. आपल्याला बिर्याणी मध्ये रंग घालायचे असल्यास पांढरा भात बाजूला काढून बाकीच्या भाताला आपल्याकडे असणारे रंग लावून ठेवावे.

चिकन बिर्याणीचे थर

सर्वप्रथम एक मोठा टॉप घ्यावा त्या टोपामध्ये तळात बटाट्याच्या स्लाईस काढून लावून घ्याव्या जेणेकरून बिर्याणी करपणार नाही.
त्यानंतर आपण जो भात मोकळा करण्यासाठी ठेवला होता त्यातील अर्धा भात आपण त्या टोपामध्ये पसरवून घ्यावा.

त्यानंतर चिकनची जी आपण ग्रेव्ही केली होती त्यातील अर्धी ग्रेवी या भातावर पसरवून घ्यावी
आता यावर बारीक चिरलेली कोथिंबीर काजूचे तळलेले तुकडे तळलेला कांदा पुदिना आणि केशर मिक्स केलेले दूध दोन ते चार चमचे घालावे.
यावर दोन ते चार चमचे तूप पसरवून घ्यावे.

यानंतर राहिलेला पांढरा भात या थरावर पुन्हा पसरावा त्यानंतर राहिलेली चिकनची ग्रेव्ही घालून घ्यावी
आता आपण त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर तळलेला कांदा तसेच काजूचे तळलेले तुकडे पुदिन्याची पाने आणि केशर मिक्स केलेले दूध घालून घ्यावे त्यानंतर दोन ते चार चमचे तुपाचा शिडकाव करावा.

आता या टोपाचे झाकण बंद करून त्यावर मळलेली कणिक लावून बंद करून घ्यावे जेणेकरून हवा बाहेर जाता नये.

दुसऱ्या गॅसवर एक तवा गरम करून घ्यावा.
त्यानंतर हा बिर्याणीचा तयार केलेला टोप त्या तव्यावर ठेवावा आणि मंद गॅसवर दहा ते पंधरा मिनिटे शिजू द्यावे.(आपण बिर्याणीचा तो तव्यावर ठेवल्यामुळे बिर्याणी करपण्याची शक्यता कमी असते.)

दहा ते पंधरा मिनिटे शिजल्यावर गॅस बंद करावा पाच ते दहा मिनिटांनी टोपा वरील झाकण काढून टाकावे.(ज्यांना बिर्याणी मिक्स करून खायची असेल त्यांनी ती मिक्स केली तरी हरकत नाही)
सर्विंग प्लेटमध्ये बिर्याणी काढल्यानंतर त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर तसेच तळलेला कांदा पुदिना आणि वर लिंबाची फोड ठेवावी म्हणजे दिसायला सुद्धा ती आकर्षक वाटेल.

चिकन बिर्याणीला दम कसा द्याल ?

भात आणि चिकन ग्रेवी तयार झाल्यानंतर एका मोठ्या टोपात भात आणि चिकनचा थर लावून झाल्यानंतर टोपावर झाकण ठेवावे त्यानंतर कणीक मळून ते मळलेले पीठ भांड्याच्या कडेला लावून टोप बंद करावा जेणेकरून त्या टोपातील हवा बाहेर जाणार नाही. दुसऱ्या गॅसवर तवा गरम करून त्या तव्यावर तयार बिर्याणी चा टोप ठेवावा म्हणजे बिर्याणी करपणार नाही आणि छान वाफेवर शिजली जाईल.

दही कांदा रायता कसे तयार करावे ?

साहित्य 

1 मोठा कांदा
2 मध्यम वाटी जाड दही
3 पुदिना
1-2 हिरव्या मिरच्या
मीठ
साखर
जिरे पावडर

दही कांदा रायता कसे करावे ?

कांदा रायता रेसिपी बनवायला सुरुवात करण्यासाठी, कांदे बारीक चिरून घ्या. आणि हिरवी मिरची, पुदिना आणि कोथिंबीर चिरून घ्या.

एका मिक्सिंग बाऊलमध्ये चिरलेला कांदा, दही, मीठ आणि जिरे पावडर घाला आणि गुळगुळीत होईपर्यंत चांगले फेटून घ्या.

ते सर्व एकजीव होण्यासाठी थोडेसे पाणी घाला आणि हिरव्या मिरच्या, पुदिना आणि चिरलेली कोथिंबीर घाला.
एकत्र करण्यासाठी चांगले मिसळा. सर्व्हिंग बाऊलमध्ये हलवा आणि सर्व्ह करा.

हे पण वाचा 👉कोरफडीचे फायदे – कोरफडीचे उपयोग

चिकन बिर्याणी सर्व्ह कशी करावी ?

चिकन बिर्याणी एक गरम गरम एका प्लेटमध्ये काढून त्यावर तूप घाला व त्यानंतर त्यावर बारीक चिरलेला पुदिना आणि कोथिंबीर घालावी तसेच तळलेला कांदा आणि तळलेले काजूगरही घालावे जेणेकरून बिर्याणीला छान चव येईल आणि आकर्षकही दिसेल.

आपली मनपसंत गरमागरम बिर्याणी खाण्यासाठी तयार आहे.

व्हिडिओ

झटपट चिकन दम बिर्याणी बनवण्यासाठी आपण हा व्हिडिओ पाहू शकता

FAQ

बिर्याणी बनवण्याची प्रक्रिया काय आहे?

उकळते पाणी एका भांड्यात घ्यावे, त्यात धुतलेले तांदूळ घालून 5 मिनिटे उकळवून पाणी काढून टाकावे. चिकनची जाड ग्रेव्ही तयार करून त्याचे भाताबरोबर थर लावावेत. तळलेला कांदा, कोथिंबीर, काजू वगैरे घालून सजवा. याला थोडा वेळ दम द्या. गरमागरम सर्व्ह करा.

बिर्याणी चिकन बरोबर काय सर्व्ह करावे?

बिर्याणीबरोबर सर्व्ह करण्यासाठी सर्वोत्तम साइड डिश म्हणजे दही कांदा रायता, चिकन रस्सा आणि पापड. आपण चटणी, लोणचे, कोशिंबीर सुद्धा देऊ शकतो.

१ किलो बिर्याणी म्हणजे काय?

1 कि.ग्रॅ. बिर्याणी म्हणजे जवळपास १ किलो तांदूळ आणि १ किलो चिकन किंवा मटण एकत्र घेऊन बनवलेली बिर्याणी. ही बिर्याणी साधारणतः ६ ते ८ व्यक्तींना पुरते.

बिर्याणी शिजवल्यानंतर मीठ कसे कमी करावे?

अतिरिक्त मीठ काढून टाकण्यासाठी तयार केलेल्या बिर्याणी मध्ये एक ते दोन चमचे दही घालून थोडा वेळ शिजवा. आपण जर 2 चमचे दूध घातले तर केवळ अतिरिक्त मीठ कमी होत नाही तर डिशची चव सुधारू शकते. डिशमध्ये बटाट्याची कापे उकडून घालावी आणि सर्व्ह करण्यापूर्वी काढून टाकावी.कांद्याचे काही तुकडे, कच्चे कांदे किंवा तळलेले कांदे घालू शकता.

निष्कर्ष

मित्रहो, झटपट चिकन बिर्याणी घरच्या घरी कशी बनवावी – chicken biryani recipe marathi madhe – याची साधी आणि सोपी पद्धत आम्ही आपल्याला इथे सांगितलेली आहे. ही रेसिपी आपल्याला आवडली असल्यास, कमेंट करून नक्की कळवा.

धन्यवाद..

1 thought on “चिकन बिर्याणी रेसिपी मराठी | Tasty 31 Minute Chicken Biryani Recipe in Marathi”

Leave a comment