चिंचोटी धबधबा माहिती मराठी | CHINCHOTI WATERFALL INFORMATION IN MARATHI – पावसाळ्यात निसर्गाच्या सानिध्यात गेल्यावर तुम्ही सगळे विसरून जाता. कारण पावसाचे बारीक थेंब, मातीचा सुगंध आणि आजूबाजूला असणारी हिरवळ आपल्याला मोहून टाकते. अशाच निसर्गाच्या कुशीमध्ये वसलेल्या एका सुंदर धबधब्याबद्दल, आम्ही आपणास माहिती देणार आहोत तो म्हणजे चिंचोटी धबधबा.
चिंचोटी धबधबा माहिती मराठी | CHINCHOTI WATERFALL INFORMATION IN MARATHI
मित्रहो आम्ही आमच्या लेखातून आज आपणास चिंचोटी धबधबा व त्या बाजूस असणाऱ्या विविध प्रेक्षणीय स्थळांची माहिती देत आहोत, हा लेख तुम्ही नक्की वाचा.
प्रस्तावना
हा धबधबा पालघर जिल्ह्यातील, वसई तालुक्यामध्ये असलेला अविस्मरणीय व अलौकिक धबधबा आहे. या ठिकाणी मुंबईकर व इतर लोक सुट्टीच्या दिवसात ट्रेकिंगचा अनुभव घेण्यासाठी व पावसातली धमाल मस्ती करण्यासाठी भेट देत असतात. या ठिकाणी असणारे तुंगारेश्वर वन्यजीवन अभयारण्य हे देखील तितकेच प्रसिद्ध असल्यामुळे, या ठिकाणी लुप्त झालेल्या विविध प्रजातींचे संवर्धन केले जाते. त्यामुळे इथे आपणास वन्यजीवन व त्याबद्दल माहिती देखील घेता येते.
चिंचोटी धबधबा नकाशा
चिंचोटी धबधबा ट्रेक (chinchoti waterfall trek)
चिंचोटी धबधबा ट्रेक करण्यासाठी आपल्याला कामण गावापासून सुरुवात करावी लागते. हे ट्रेकच्या पायथ्याशी असलेले गाव आहे. हा महाराष्ट्रातील अविश्वसनीय ट्रेकिंग ट्रेल्सपैकी एक आहे. चिंचोटी धबधबा मुंबई अहमदाबाद मार्गावर असून धबधब्यापासून जाणाऱ्या दोन वेगवेगळ्या जंगलांमधून जातो. हा ट्रेक चढण्यासाठी पायथ्याच्या गावापासून साधारणतः आपल्याला २ ते ३ तास लागतात. ट्रेकिंग करण्याची आवड असणाऱ्या लोकांसाठी हा ट्रेक अतिशय सोपा व ज्यांना ट्रेकिंग करणे तितकेसे जमत नाही त्यासाठी मध्यम अडचणीचा आहे.
चिंचोटी धबधबा ट्रेक स्थान
वसई – भिवंडी मार्गावरील कामण गाव, म्हणजेच चिंचोटी फाटा इथून ट्रेक सुरु करण्याचे उत्तम व सोयीचे आहे. हे गाव राष्ट्रीय महामार्ग अर्थात मुंबई – अहमदाबाद महामार्ग पासून सुमारे २ ते ३ किलोमीटर अंतरावर आहे.
ट्रेकला जाण्यासाठी रेल्वेच्या वेळा
- सकाळी ६.२१ चर्चगेट ते विरार
- सकाळी ६.३१ मुंबई सेंट्रल
- सकाळी ६.३८ दादर
- सकाळी ६.४३ बांद्रा
- सकाळी ६.५१ अंधेरी
- सकाळी ७.०६ बोरिवली
- सकाळी ७.२६ नायगाव
जाण्यापूर्वी त्या ठिकाणची पूर्व माहिती
- ट्रेकिंगच्यावेळी तुम्ही नायगाव स्टेशनला उतरून कामण गावापासून ते chinchoti waterfall पर्यंत प्रवास करू शकता.
- नायगाव धाब्यावर तुम्हाला नाश्त्याची सोय उपलब्ध आहे, त्याचप्रमाणे तुम्ही संध्याकाळची चहा तसेच जेवण सुद्धा नायगाव धाब्यावर करू शकता.
सोबत घ्यावयाच्या वस्तू
- १) मुबलक पाणी तसेच प्रकाशासाठी बॅटरी सोबत ठेवावी. त्याचप्रमाणे टोपी व पावसाच्या वेळी जर तुम्ही ट्रेकिंग करत असाल तर रेनकोट सोबत ठेवावा.
- २) त्या ठिकाणी विविध दृश्य व वन्यजीवन पशुपक्षी यांचे फोटो कॅप्चर करण्यासाठी कॅमेरा,व मोबाईल फोन सोबत ठेवावा.
- ३) ट्रेकिंग करताना थकायला होते, त्यावेळी आपल्या सोबत एनर्जी येण्यासाठी ग्लुकोंडी पावडर, ओ.आर.एस सोबत ठेवावे, त्याचप्रमाणे खाण्यासाठी बिस्किट्स, केक्स, चॉकलेट्स सोबत ठेवावे. जेणेकरून भूक लागल्यास तुम्ही ते खाऊ शकता.
- ४) ट्रेकिंग करतेवेळी धबधब्यातील पाण्यात भिजण्याचा मोह कोणालाच आवरत नाही, त्यावेळी आपल्या सोबत ज्यादा टॉवेल, नॅपकिन्स व कपड्यांची जोडी ठेवावी.
- ५) कोणत्याही ठिकाणी फिरायला जातेवेळी त्या ठिकाणच्या जागेची स्वच्छता बाळगणे ही आपली जबाबदारी असते, त्यामुळे आपण ज्या गोष्टी खातो, त्यामुळे त्या ठिकाणी पर्यावरणाचा कोणत्याही प्रकारे गैरवापर होणार नाही, याची दक्षता आपणच घ्यायची असते. म्हणून सोबत एक कचरा टाकण्यासाठी पिशवी, पेपर्स ठेवावे.
- ६) ट्रेकिंग करतेवेळी काही इजा झाल्यास आपल्यासोबत फर्स्ट एड बॉक्स म्हणजेच मेडिकल किट त्यामध्ये काही (अँटीसेप्टिक्स, बँडेज, डेटॉल, कॉटन) असणे गरजेचे आहे.
- ७) ट्रेकिंग करतेवेळी कमीत कमी एक ते दोन वैयक्तिक ओळखीचे काही पुरावे सोबत ठेवावे. जेणेकरून ट्रेकिंगच्या वेळी काही अडचणी आल्यास याचा उपयोग करता येईल.
- ८) हे सर्व सामान सोबत बाळगण्यासाठी एक योग्य प्रकारची बॅग सोबत घ्यावी, जेणेकरून तुम्ही योग्यरीत्या व सोयीस्कर रित्या ट्रेकिंग करू शकता.
ट्रेक करतेवेळी करावयाच्या गोष्टी
- १.तुम्ही ज्या ठिकाणी ट्रेकिंगसाठी जात आहात त्या ठिकाणचा योग्य तो नकाशा सोबत ठेवावा.
- २.ट्रेकिंग करतेवेळी योग्य ते हवामान बघूनच ट्रेकिंग करावे.
- ३.मित्रमंडळी किंवा परिवारासोबत ट्रेकिंग करण्यास जावे.
- ४.मुबलक प्रमाणात पाणी व खाण्याचे पदार्थ सोबत ठेवावे.
- ५.ट्रेकिंग करतेवेळी दोन ट्रेकिंग पोल्स सोबत ठेवावेत.
- ६.सुरक्षिततेचा विचार करून स्वतःसोबत शिट्टी बाळगावी जेणेकरून ट्रेकिंग करतेवेळी तुम्ही चुकल्यास तुमच्या इतर साथीदारांना शिट्टीच्या आवाजाने तुमच्या मदतीस बोलवण्यास मदत होईल.
- ७.स्वतः सोबत मेडिकल किट्स ठेवावे. जेणेकरून काही इजा झाल्यास याचा तुम्ही योग्य तो वापर करू शकाल.
ट्रेक करतेवेळी कोणत्या गोष्टी करू नयेत
- १.ट्रेकिंगला जातेवेळी एकट्याने कधीच ट्रेकिंग करू नये.
- २.ज्या ठिकाणी आपण ट्रेकिंगला जात आहोत त्या ठिकाणी पर्यावरणाचा गैरवापर होणार नाही याची दक्षता घ्यावी.
- ३.खाल्लेल्या गोष्टी व पाण्याच्या बॉटल्स यांचा कचरा पर्यावरणामध्ये फेकू नये.
- ४.सिगारेट किंवा इतर आगीच्या वस्तू पर्यावरणामध्ये फेकू नयेत.
स्वतःच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून खालील मुद्द्यांचा काळजीपूर्वक वापर करावा
- १.सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून वैयक्तिक हँगआऊट साठी ट्रेकिंग सुरक्षित नाही.
- २.जर तुम्ही ट्रेकिंग करत असाल तर समूहामध्ये राहून ट्रेकिंग करा, ज्यांना दम्याचा जास्त त्रास होत असेल त्यांनी व लहान मुलांना शक्यतो ट्रेकिंग करण्यासाठी टाळा.
- ३.ट्रेकिंग करतेवेळी त्या ठिकाणी कोणतीही पोलीस सुरक्षा उपलब्ध नसते व जीवरक्षक सुविधा देखील उपलब्ध नसते, त्यामुळे स्वतःची काळजी स्वतः घेणे व सुरक्षित रित्या ट्रेकिंग करणे याची गरज आहे.
पावसात तळकोकणातील अलौकिक सौन्दर्य – आंबोली
वसई धबधबा चिंचोटी माहिती व्हिडिओ
चिंचोटी मधील प्रेक्षणीय स्थळे (Places To Visit At Chinchoti)
१) चिंचोटी धबधबा वसई (Chinchoti Waterfall Vasai)
पालघर जिल्ह्यातील, वसई तालुक्यातील चिंचोटी धबधबा अप्रतिम ट्रेकिंग ट्रेल्सपैकी एक आहे. हा मुंबई अहमदाबाद मार्गावर असलेला ट्रेक असून, हा मार्ग सुंदर व हिरवळीच्या जंगलांमधून जातो. या धबधब्याच्या जवळ दोन जंगल मार्ग आहेत. चिंचोटी धबधबा पावसाळ्याच्या काळात साधारणतः ११० ते १५० फूट उंचीचा मुख्य धबधबा जोरदार वेगाने वाहत असतो. पावसाळ्याच्या काळात चिंचोटी धबधब्याचे सौंदर्य हे खुलून आलेले असते. यावेळी तुम्ही या ठिकाणी नक्की भेट देऊ शकता.
२) तुंगारेश्वर मंदिर (Tungareshwar Mandir)
मुंबई शहरामधील पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यामध्ये तुंगारेश्वर शिव मंदिर आहे. असे म्हणतात की विमलासुर नावाच्या राक्षसाने शिवशंभू शंकराचे शिवलिंग तुंगार पर्वतावर स्थापन केल्यामुळे, या मंदिराला तुंगारेश्वर मंदिर अशी प्रचिती मिळाली.
हा परिसर अतिशय निसर्गरम्य व सुंदर असा आहे. तुंगारेश्वर प्रवेशद्वाराच्या तीन ते चार किलोमीटर अंतरावर तुंगारेश्वर मंदिर स्थापित आहे. भक्त जणांसाठी सकाळी पाच ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत हे मंदिर उघडे असते. शिव शंभू शंकरांचे हे तुंगार पर्वतावरील प्रसिद्ध मंदिर असल्याने महाशिवरात्रीच्या दिवशी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी असून, उत्सव साजरा केला जातो. मंदिराच्या बाजूला असलेले रामकुंड तसेच, खोडियार माताजी या देवीचे छोटे मंदिर इत्यादी प्रेक्षणीय स्थळे देखील आहेत.
हे पण वाचा :-🙏मार्लेश्वर मंदिर संगमेश्वर 🙏
३) जीवदानी देवी मंदिर (Jivdani Devi Mandir)
मुंबई शहरामधील विरार या शहरातील माता जीवदानी मंदिर हे जीवदानी टेकडीवरील, अति प्राचीन व प्रसिद्ध मंदिर आहे. हे मंदिर अतिशय प्रसिद्ध असून मोठ्या प्रमाणात भाविक मातेच्या दर्शनासाठी येत असतात. या ठिकाणी खोदकामाच्या वेळी तटबंदीच्या आत काही प्राचीन लेण्या व प्राचीन टाक्या आढळून आल्यात. माता जीवदानी मातेची मूर्ती ही सुंदर पांढऱ्या संगमरवरी दगडाची असून मूर्तीला एक अलौकिक सौंदर्य आहे व या ठिकाणी हजारो पर्यटक भेट देतात.
४) चंडिका देवी मंदिर (Chandika Devi Temple)
चंडिका देवी मंदिर, हे वसई आणि नायगाव येथील चंद्र गावातील एक प्रसिद्ध मंदिर असून या मंदिराची उंची ही समुद्रपाटी पासून साधारणतः ४०० ते ५०० फूट एवढी उंच आहे. असे म्हणतात की, हे मंदिर पांडवकालीन असून प्रचंड दगडी गुहेमध्ये या मंदिराची रचना केली गेली आहे. या मंदिरामध्ये प्रतिवर्षी विविध सामाजिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रम साजरे केले जातात. चैत्र महिन्यामध्ये येणारी नवरात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणे साजरी केली जाऊन. या उत्सवात भाविकांची हजारोंनी गर्दी असते. हे मंदिर टेकडीवर वसले असल्याकारणाने तुम्हाला साधारणतः २०० ते ३०० पायऱ्या चढून मंदिरापर्यंत जाता येते.
५) लोढा धाम (Lodha Dham)
लोढा धाम पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील मुंबई शहरातील अप्रतिम मंदिर आहे. हे मंदिर अतिशय सुंदर आणि शांत जैन मंदिर आहे. लोढा धाममध्ये राहण्याची तसेच जेवण खाण्याचे उत्तम सोय असून, त्यांच्याकडे धर्म तसेच इतर गोष्टींबद्दल वाचन करण्यासाठी एक स्वतंत्र ग्रंथालय आहे.
६) तुंगारेश्वर अभयारण्य (Tungareshwar Wildlife Sanctuary)
तुंगारेश्वर वन्यजीवन अभयारण्य हा प्रदेश जैवविविधतेने समृद्ध व प्रसिद्ध आहे. या ठिकाणी बिबट्या, हरीण, लंगुर, जंगली डुकरे, ब्लॅक हेअर, क्रेस्टेड सर्प, गरुड, जंगली घुबडे असे विविध पक्षी व प्राणी आढळून येतात. हे वन्य जीवन निसर्गप्रेमी व वन्य जीवन प्रेमींसाठी एक महत्त्वाचे व सुंदर स्थान आहे. ज्या प्रजाती लुप्त होण्याच्या मार्गावरती आहेत, अशा प्रजातींचे जतन करून या ठिकाणी, या प्रजातींचे संवर्धन केले जाते.
७) वसईचा किल्ला (Vasai Fort)
पालघर जिल्ह्यातील वसई हा तालुका त्याच्या विविध प्रेक्षणीय स्थळांमुळे प्रसिद्ध आहे. त्यापैकी एक म्हणजे वसईचा किल्ला. वसई हे पूर्वी पोर्तुगीज व इंग्रजी यांचे मुख्य नौदल तळ आणि जहाज बांधणीचे प्रमुख केंद्रस्थान होते. त्यामुळे या ठिकाणी १५३६ मध्ये पोर्तुगीजांनी सुमारे १०० एकरावर हा किल्ला बांधला. मराठ्यांनी १७३९ मध्ये या किल्ल्याचा ताबा स्वतःकडे घेतला. परंतु १८०२ मध्ये झालेल्या अँग्लो – मराठा युद्धानंतर हा किल्ला ब्रिटिशांनी पुन्हा हा त्यांच्या ताब्यात घेतला. भारतामध्ये असणाऱ्या विविध व वैविध्यपूर्ण इतिहासाचा हा किल्ला साक्षीदार आहे.
८) मुंबईमधील एलिफंटा लेण्या (Elephanta Caves)
मुंबई शहरातील एलिफंटा लेण्या या दगडी शिल्पांमध्ये कोरलेल्या असून, या बौद्ध कल्पना आणि प्रतिमा शास्त्र यांचे एकत्रीकरण दर्शवतात. या गुहा या घन बेसॉल्ट खडकापासून खोदल्या गेलेल्या आहेत. या ठिकाणी विविध प्रकारच्या सुंदर बौद्ध लेण्यांचा संच आढळून येतो. भारतीय पुरातत्त्व संरक्षण – औरंगाबाद सर्कल एलिफंटा गुहांची देखरेख व व्यवस्थापन करते.
९) रानगाव बीच (Rangaon Beach)
रानगाव बीच हा वसई तालुक्यातील पर्यावरणास योग्य व स्वच्छ नीटनेटका समुद्रकिनारा आहे. या समुद्रकिनाऱ्याच्या बाजूला सुरूच्या झाडांची गर्दी असल्यामुळे, समुद्र किनाऱ्यावरील शांतता अनुभवायला येणाऱ्या पर्यटकांसाठी हा एक उत्तम व सोयीचा पर्याय आहे. रोजच्या दगदगीच्या व धावपळीच्या जीवनातून थोडासा वेळ काढून या ठिकाणी तुम्ही नक्की मनाला शांती अनुभवासाठी येऊ शकता. मित्र परिवारांसह किंवा फॅमिली सोबत एका दिवसाच्या सहलीसाठी, फिरण्यासाठी व सूर्यास्ताचा आनंद घेण्यासाठी हे एक उत्तम स्थान आहे.
१०) पेल्हार धरण (Pelhar Dam)
पेल्हार धरण हे वसई विरार प्रदेशातील एक सुंदर असे धरण असून, या शहरांना पाणीपुरवठा करण्याच्या केंद्रांचा हे एक भाग आहे. या धरणाची बांधणी ही १९७५ साली करण्यात आली. या धरणाची रचना ही अशी आहे की जर तुम्ही वरून पाहिल्यास हा जलाशय तुम्हाला हृदयाच्या आकाराचे दिसते.
भेट देण्यासाठी तुम्ही कुठे राहावे ?
१) गोल्डन chariot वसई हॉटेल
हे हॉटेल धबधब्यापासून साधारणतः १.४ किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे. या हॉटेलमध्ये तुम्हाला नाश्त्याची व जेवणाची उत्तम सोय असून, विविध प्रकारच्या सोयी सुविधा देखील उपलब्ध आहेत. हे हॉटेल वातानुकूलित आहे. त्याचबरोबर या ठिकाणी वाय-फाय, फ्री पार्किंग, स्विमिंग पूल इत्यादी विविध सोयी सुविधा आहेत.
२) सेव्हन इलेव्हन हॉटेल आणि क्लब
धबधब्यापासून हे हॉटेल १२.७ किलोमीटर एवढे अंतरावर आहे. हॉटेल अतिशय सुंदर व नीटनेटके असून हॉटेलमध्ये विविध प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध आहे. यामध्ये तुम्हाला ब्रेकफास्ट, फ्री वाय-फाय, फ्री पार्किंग, पूलची सुविधा उपलब्ध आहे.
३) रॉयल होमटेल सूट
हे हॉटेल धबधब्यापासून साधारणतः १६.१ किलोमीटर एवढे अंतरावर आहे. या हॉटेलमध्ये तुम्हाला फ्री पार्किंग, पूल, फ्री वाय-फाय, जिम, कॉन्फरन्स फॅसिलिटी, इत्यादी सुविधा उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे रूम हे वातानुकूलित असून पुरेसा डायनिंग एरिया, एक मिनी बार आहे.
४) सागर संगम हॉटेल
सागर संगम हॉटेल हे चिंचोटी धबधब्यापासून साधारणतः १४.८ किलोमीटर एवढे अंतरावर आहे. तुम्ही जर तुमच्या बजेटनुसार सुंदर व बजेट फ्रेंडली हॉटेल बघत असाल, तर सागर संगम हॉटेल योग्य ऑप्शन आहे. या हॉटेलमध्ये रूम हे वातानुकूलित आहे. या ठिकाणी तुम्हाला बाहेरच्या बाजूला स्विमिंग पूल, फ्री ब्रेकफास्ट, एअरपोर्ट ट्रान्सपोर्टेशन, फ्री वाय-फाय तसेच जर तुमच्याकडे पाळीव प्राणी असल्यास आणण्यासाठी सुद्धा हे हॉटेल परवानगी देते.
५) जीसीसी हॉटेल आणि क्लब
जीसीसी हॉटेल आणि क्लब चिंचोटी धबधब्यापासून साधारणतः १३.८ किलोमीटर अंतरावर आहे. हे हॉटेल ३ स्टार असून, एक लक्झरीस व ५ एकरामध्ये पसरलेले एक सुंदर हॉटेल आहे. या ठिकाणी विविध प्रकारचे खेळ, फिटनेस व बिजनेस फॅसिलिटी यांसाठी गेम रूम व कॉन्फरन्स रूम, फ्री वाय-फाय जिम.इत्यादी सुविधा उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे तुम्हाला फ्री ब्रेकफास्ट, फ्री पार्किंग एरिया व वातानुकूलित असलेले रूम पुरवले जातात.
६) हॉटेल मेराकी
हॉटेल मेराकी हे धबधब्यापासून साधारणतः १४.७ किलोमीटर अंतरावर आहे. हॉटेलमध्ये तुम्हाला फ्री पार्किंग, नाश्ता तसेच फ्री वाय-फाय सुविधा उपलब्ध आहे.
७) द मेरियाड
द मेरियाड हे हॉटेल धबधब्यापासून साधारणतः १३.७ किलोमीटर अंतरावर आहे. हे हॉटेल मुंबईमध्ये स्थित असून, लक्झरी सुविधा तुम्हाला तुमच्या बजेट प्रमाणे उपलब्ध होतील. त्याचप्रमाणे या ठिकाणी तुम्हाला फ्री पार्किंग, फ्री वाय-फाय, फ्री ब्रेकफास्ट इत्यादी सोयी सुविधा उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे प्रत्येक रूम वातानुकूलित आहे.
धबधब्याला भेट देण्यासाठी उत्तम वेळ (Best Time To Visit Chinchoti Waterfall)
धबधब्याला भेट देण्यासाठी उत्तम काळ हा मान्सून आहे. यादरम्याने पडणाऱ्या पावसामुळे या ठिकाणी धबधब्याचे रूप हे विलोभनीय व खूपच मनमोहक असते. परंतु जुलै ते सप्टेंबर हा योग्य काळ राहील चिंचोटी धबधब्याला भेट देण्यासाठी.
धबधब्याला भेट देताना महत्त्वाच्या टिप्स
अ) कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत
- १)अति पावसाळ्यामध्ये चिंचोटी धबधब्याला व ट्रेकिंग साठी भेट देणे टाळलं पाहिजे.
- २)जर तुम्ही ट्रेकिंगसाठी चिंचोटी धबधब्याला भेट दिली आहात, तर अति पावसात संध्याकाळच्या ५ ते ६ नंतर थांबू नये.
आ) चिंचोटी धबधब्याला भेट देतेवेळी कोणते कपडे घालावेत
- १)हलके व पूर्ण झाकलेले कपडे घालावे. जेणेकरून त्या ठिकाणी कोणत्याही गोष्टींचा परिणाम तुमच्या शरीरावर होणार नाही व शरीरावर इजा होणार नाही.
- २)ट्रेकिंग करतेवेळी चप्पलचा वापर टाळावा व चांगल्या बुटांचा वापर करावा.
- ३)पावसाळ्याच्या काळात जर तुम्ही ट्रेकिंग करत असाल तर रेनकोट सोबत ठेवावा.
इ) धबधब्याला भेट देण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स
- १)जास्त व अति पावसामध्ये धबधब्याला भेट देण्यास टाळावे.
- २)अति पावसात धबधब्याच्या पाण्यामध्ये उतरण्यास टाळावे.
- ३)हवामानाचा अंदाज घेत व त्या ठिकाणचा नकाशा सोबत ठेवावा व धबधब्याला व तिकडील ट्रेकिंगला भेट द्यावी.
चिंचोटी धबधब्याला कसे जाल ? (How To Reach Chinchoti Waterfall)
बस – चिंचोटी धबधब्याला भेट देण्यासाठी तुम्ही बस हा पर्याय निवडू शकता. यासाठी जर तुम्ही वसई वरून गेलात, तर तुम्हाला ५३ मिनिटे, नायगाव वरून बसने गेलात तर ५६ मिनिटे, तसेच विरार वरून तुम्हाला ६५ मिनिटे, एवढं अंतर पार करावे लागते.
रेल्वे – चिंचोटी धबधब्याला रेल्वे मार्गाने जाण्यासाठी तुम्हाला नायगाव रेल्वे स्टेशनला जावे लागेल. तिथून तुम्ही साधारणतः ७४ मिनिटे अंतर पार करून चिंचोटी धबधब्यावर पोहोचू शकता. तसेच वसई रोड रेल्वे स्टेशन वरून तुम्हाला ८० मिनिटे लागतील. जर तुम्ही विरार रेल्वे स्टेशन वरून चिंचोटी धबधब्यावर जात असाल, तर तुम्हाला साधारणतः ८१ मिनिट लागतील.
विमान – मुंबईमधील सर्वोत्तम जवळचे विमानतळ, छत्रपती शिवाजी टर्मिनस हे आहे. हे विमानतळ जवळ जवळ सर्व शहरांशी जोडलेले असून, या विमानतळावर उतरून तुम्ही नायगाव वसई-विरार रेल्वे स्टेशन वरून तिथून चिंचोटी धबधब्याला भेट देऊ शकता.
FAQ
चिंचोटी धबधबा कुठे आहे ?
पालघर जिल्ह्यातील, वसई तालुक्यामध्ये चिंचोटी धबधबा आहे.
चिंचोटी धबधब्यात जवळील आकर्षक व प्रेक्षणीय स्थळे कोणती?
तुंगारेश्वर शिवमंदिर.
वसई किल्ला.
तुंगारेश्वर वन्यजीवन अभयारण्य.
रानगाव बीच.
मुंबईमधील एलिफंट लेण्या.
चिंचोटी धबधब्याचा ट्रेक हा कोणत्या गावाच्या पायथ्यापासून सुरू होतो ?
चिंचोटी धबधब्याचा ट्रेक हा कामण गावाच्या पायथ्यापासून सुरू होतो.
चिंचोटी धबधब्याला भेट देण्यासाठी तुम्ही कसे जाल ?
चिंचोटी धबधब्याला भेट देण्यासाठी तुम्ही बसने किंवा रेल्वेने जाऊ शकता. सगळ्यात जवळचे रेल्वे स्थानक तुम्हाला वसई किंवा नायगाव हे आहे. इथून उतरून तुम्ही ऑटोने सातवली गावापर्यंत जाऊन तिथून शेअर ऑटो घेऊन, चिंचोटी धबधब्यापर्यंत जाऊ शकता
कोणत्या कालावधीमध्ये तुम्ही चिंचोटी धबधब्याला भेट देऊ शकता ?
मान्सूनचा अर्थात पावसाळ्यामध्ये तुम्ही चिंचोटी धबधब्याला भेट देऊ शकता. यावेळी या धबधब्याचे रूप हे मोहक व विलोभनीय असते.
निष्कर्ष
मित्रहो आम्ही आमच्या चिंचोटी धबधबा या लेखातून चिंचोटी धबधब्याची व ट्रेकिंगची तसेच तेथिल प्रेक्षणीय स्थळांची माहिती दिली आहे. हा लेख तुम्ही नक्की वाचा आणि कसा वाटला, हे कमेंट करून आम्हास नक्की कळवा.
धन्यवाद.