डॉ तात्याराव लहाने माहिती मराठी : Dr Tatyarao Lahane Information In Marathi – भारतातील प्रसिद्ध नेत्रचिकित्सक डॉक्टर तात्याराव लहाने यांना भारत सरकारने २००८ मध्ये भारतामधील चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणून प्रसिद्ध असणारा “पद्यश्री” पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. डॉक्टर लहाने यांनी ग्रँट मेडिकल कॉलेज आणि जे जे हॉस्पिटल्स मुंबईचे डीन म्हणून काम केले. डॉक्टर लहाने यांनी ०१ लाख ६२ हजार पेक्षा अधिक मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून, जागतिक विक्रम नोंदवला आहे.
आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास प्रसिद्ध व भारतातील नावाजलेले नेत्रचिकित्सक डॉक्टर तात्याराव लहाने यांच्या बद्दल माहिती दिली आहे. ही माहिती जाणून घेण्यासाठी, हा लेख शेवटपर्यंत वाचा.
डॉ तात्याराव लहाने यांची माहिती : Dr Tatyarao Lahane Information In Marathi
मूळ नाव | डॉ. तात्याराव लहाने |
जन्म तारीख | १२ फेब्रुवारी १९५७ |
जन्म स्थळ | माकेगाव, लातूर, महाराष्ट्र, भारत |
आईचे नाव | अंजनाबाई लहाने |
वडिलांचे नाव | पुंडलिकराव लहाने |
शिक्षण | एम.बी.बी.एस. इन ऑप्थल्मॉलॉजी. |
ओळख | मोतीबिंदू शस्त्रक्रियेचा जागतिक विक्रम |
प्रसिद्ध कामे | बिनाटाक्याच्या नेत्र शस्त्रक्रिया |
ख्याती | सुमारे १,६३,००० यशस्वी नेत्र शस्त्रक्रिया, कधीकधी यासाठी १८ ते २३ तास काम |
संस्था | ग्रँट मेडिकल कॉलेज आणि सर जे जे ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स मुंबई |
व्यवसाय | नेत्ररोग स्पेशालीस्ट |
पुरस्कार | पद्यश्री |
कोण आहेत डॉक्टर तात्याराव लहाने ?
- डॉक्टर लहाने हे भारतामधील प्रसिद्ध नेत्र चिकित्सक म्हणजेच डोळ्याचे स्पेशालिस्ट डॉक्टर म्हणून नावाजले जातात. डॉक्टर तात्याराव लहाने हे एक नेत्र तज्ञ डॉक्टर म्हणून संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये नावाजले आहेत. अंध लोकांना दृष्टी देण्यासाठी, डॉक्टर तात्याराव लहाने अनेक वर्ष काम करत होते.
- डॉ लहाने यांनी ३६ वर्षाच्या त्यांच्या शासकीय सेवेनंतर, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचलनाच्या संचालक पदावरून निवृत्ती घेतली. डॉ. तात्याराव लहाने यांनी केलेल्या आरोग्य सेवेतील योगदानाबद्दल देशामध्ये त्यांचे नाव मोठ्या आदराने घेतले जाते. त्यांनी केलेल्या अतोनात मेहनतीसाठी, भारत सरकारने त्यांना “पद्यश्री” पुरस्कार देऊन सन्मानित केले.
- डॉक्टर तात्याराव असे म्हणतात की, “मी संचालक पदावरून निवृत्त होत आहे, परंतु येणाऱ्या पुढील काळामध्ये माझे अंधत्व नियंत्रणाचे आणि शस्त्रक्रियेचे काम हे असेच नेहमी चालू राहील. डॉक्टर म्हणाले की, “३६ वर्षाच्या कालावधीमध्ये, मला हजारो सवंगडी प्राप्त झाले व त्यांच्या रूपात मला विविध मदत देखील प्राप्त झाली. मी अशा सर्व लोकांचा मनापासून ऋणी आहे. त्या सर्व लोकांचे निस्वार्थी प्रेम मिळवणारा मी एक अतिशय भाग्यवान डॉक्टर म्हणून स्वतःला समजतो. अजून तात्याराव म्हणतात की, “आपले प्रेम हे नेहमी माझ्यावर कायम ठेवावे, अशीच आपल्याकडे मी प्रार्थना करतो.
- बीड जिल्ह्यामध्ये अधिव्याख्याता म्हणून १९९५ साली डॉक्टर तात्याराव लहाने शासकीय सेवेमध्ये कार्यरत झाले. महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यामधील ग्रामीण भागातील अंधत्व आलेल्या व्यक्तींना दृष्टी देण्याचे महत्त्वाचे काम डॉ लहाने यांनी ८ वर्षापर्यंत केले. त्यानंतर धुळे जिल्ह्यामधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये त्यांनी सेवा दिली. यानंतर डॉक्टर लहाने मुंबई मधील जे जे रुग्णालयामध्ये १९९४ मध्ये कार्यरत झाले.
- जे जे रुग्णालयामधील मारुती शेलार व डॉक्टर रागिनी पारेख यांच्या समवेत ६७ जणांच्या मदतीने ग्रामीण दुर्गम भागामध्ये शिबिरे आयोजित करण्याचे महत्त्वाचे कार्य डॉक्टर लहाने यांनी २५ वर्ष केले. जे जे रुग्णालयामध्ये डॉक्टर तात्याराव लहाने अधिष्ठाता कार्यरत असतानासुद्धा, रुग्णालयामध्ये गरजू रुग्णांसाठी कार्यालयीन इमारत आणि धर्मशाळा बांधण्यात आल्या. त्यासोबतच डॉक्टर लहाने यांच्या काळामध्ये अकराशे खाटांचे सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल मंजूर करून घेतले असून, त्याचे कामही सुरू करण्यात आले.
- डॉक्टर लहाने यांना पद्यश्री पुरस्कारांसह इतर पाचशेपेक्षा अधिक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. तात्याराव लहाने यांनी त्यांच्या सेवानिवृत्ती वेळी असे म्हटले की, नेत्र रुग्णालयाच्या शस्त्रक्रियेचे माझे कार्य करण्यासाठी, मला अधिक वेळ मिळेल आणि याचा मला खूप आनंद आहे.
- नक्की वाचा 👉👉 बाबा आमटे माहिती मराठी
- नक्की वाचा 👉👉अण्णाभाऊ साठे माहिती मराठी
डॉ. तात्याराव लहाने यांचे प्रारंभिक जीवन आणि शिक्षण
डॉक्टर लहाने यांचा जन्म दि. १२ फेब्रुवारी १९५७ रोजी महाराष्ट्रामध्ये लातूर जिल्ह्यातील माकेगाव या छोट्याश्या ठिकाणी झाला. डॉक्टर लहाने यांच्या वडिलांचे नाव पुंडलिकराव लहाने, तर आईचे नाव अंजनाबाई लहाने असे होते.
तात्याराव लहाने हे एक प्रसिद्ध डॉक्टर असून, नेत्र तज्ञ म्हणून संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये प्रसिद्ध आहेत. डॉक्टर लहाने यांनी एम.बी.बी.एस. इन ऑप्थल्मॉलॉजी मध्ये त्यांचे शिक्षण पूर्ण केले. डॉक्टर तात्याराव लहाने यांनी त्यांच्या जीवनाची ३६ वर्षे स्वतःच्या शासकीय सेवेसाठी समर्पित केली.
डॉ. तात्याराव लहाने यांचे शिक्षण
- डॉक्टर लहाने यांनी दि. १७ मे १९८५ रोजी बीड जिल्ह्यामधील, अंबाजोगाई या ठिकाणी स्वामी रामनंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयांमधून, एक वैद्यकीय अधिकारी आणि सहयोगी प्राध्यापक म्हणून स्वतःच्या करिअरची सुरुवात केली.
- १९९३ ते १९९४ मध्ये डॉक्टर तात्याराव यांनी धुळे जिल्ह्यामध्ये शासकीय रुग्णालयामध्ये सेवा दिली. डॉक्टर लहाने यांनी नेत्ररोग तज्ञ म्हणून, आरोग्य क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर व्याख्याने दिली. आणि राज्यामधील अतिशय दुर्गम ग्रामीण भागामध्ये व आदिवासी क्षेत्रात त्यांनी नेत्र उपचार शिबिरांमध्ये अग्रगण्य कार्य केले.
- डॉक्टर लहाने यांनी जे जे हॉस्पिटलमध्ये डी.एन म्हणून पदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी रुग्णालयामधील तात्याराव लहाने हे डी.एन नेत्र रोग विभागाचे प्रमुख होते. डॉक्टर लहाने यांनी नेत्ररोग तज्ञ म्हणून संपूर्ण भारत देशामध्ये आणि जे जे रुग्णालयामध्ये अनेक मोतीबिंदूचे शिबिरे आयोजित केली आणि २००७ मध्ये डॉक्टर लहाने यांनी ०१ लाख ६२ हजार मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करून, जागतिक विक्रम नोंदवला.
- तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी डॉक्टर लहाने यांची प्रशंक्षा करून, त्यांना आदर दिला. डॉक्टर तात्याराव लहाने यांना जे जे रुग्णालयाचे नेत्र विभागाचे आधुनिकीकरण करण्याचे श्रेय दिले जाते.
डॉ. तात्याराव लहाने यांचे करिअर
- डॉक्टर लहाने यांनी १९८१ मध्ये मराठवाडा विद्यापीठामधून मेडिकल मध्ये पदवी प्राप्त केली.
- डॉक्टर लहाने यांनी १९८५ मध्ये एम.बी.बी.एस इन ऑप्थल्मॉलॉजी पदवी प्राप्त केली.
- यानंतर १९९४ मध्ये डॉक्टर लहाने, जे जे रुग्णालयामधून नेत्रचिकित्सका विभाग प्रमुख म्हणून कार्यरत होते.
- २००४ च्या दरम्यान डॉक्टर तात्याराव जे जे हॉस्पिटल मध्ये रेटिना विभागाची सुरुवात केली.
- २००७ मध्ये डॉक्टर तात्याराव लहाने यांनी मोतीबिंदूवरील एक लाखापेक्षा जास्त यशस्वी शस्त्रक्रिया पूर्ण केल्या.
- डॉक्टर लहाने यांना २००८ मध्ये भारत सरकारने भारताच्या चौथ्या स्थानावर असणारा पद्यश्री पुरस्कार देऊन सन्मानित केले.
- डॉक्टर लहाने यांनी २०१० मध्ये जे जे रुग्णालयाचे अधिष्ठाता म्हणून कार्य केले.
डॉ. तात्याराव लहाने यांना मिळालेले पुरस्कार
- डॉक्टर लहाने यांना “उत्कर्ष कृतज्ञता पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच इतर “लातूर गौरव पुरस्कार”, “जीवनगौरव पुरस्कार” यांसारखे विविध पुरस्कार देऊन सन्मानित केले.
- डॉक्टर लहाने यांना २००८ मध्ये भारत सरकाने “पद्यश्री” पुरस्कार देऊन सन्मानित केले.
- १८ फेब्रुवारी २०११ मध्ये भरलेल्या, समाज प्रबोधन मराठी साहित्य संमेलनामध्ये नेत्र तज्ञ डॉक्टर तात्याराव लहाने यांना “स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार” प्रदान केला गेला.
- २०२० च्या दरम्याने डॉक्टर लहाने यांना “छत्रपती शाहू पुरस्कार” देऊन गौरविले.
डॉ. तात्याराव लहाने यांच्या बद्दल मनोरंजक तथ्ये
- डॉक्टर लहाने हे एक जगप्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ आहेत.
- वैद्यकीय क्षेत्रामध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यामध्ये डॉक्टर लहाने यांचा हातखंडा आहे.
- आर्थिक अडचण असल्याकारणाने, वैद्यकीय शिक्षण घेत असताना आर्थिक गरजा पूर्ण करण्याकरिता उपगृहामध्ये डॉक्टर लहाने काम करीत असत. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, हे काम करतेवेळी त्यांच्या जेवणाचे सुद्धा पैसे प्राप्त होत व थोड्या पैशांची बचत सुद्धा होत असत.
- डॉक्टर लहाने मुंबईमध्ये जे जे रुग्णालयामध्ये नेत्र विभागाचे प्रमुख आहेत.
- डॉक्टर लहाने यांनी आतापर्यंत सुमारे ०१ लाख ६२ हजार यशस्वी शस्त्रक्रिया करून जागतिक विक्रम केला.
- शस्त्रक्रियेच्या सेवेसाठी डॉक्टर लहाने १८ ते २३ तास सुद्धा काम करत असत.
- अगदी लहान वयामध्ये, डॉक्टर लहाने यांच्या दोन्ही किडण्या खराब झाल्याचे निदान डॉक्टरांनी सांगितले. त्यावर डॉ. लहाने यांच्या मातोश्री अंजनाबाई लहाने, यांनी आपली एक किडणी दान केली. आज पर्यंत त्या एका किडनीवर डॉक्टर लहाने यांच्या आयुष्याचा दिनक्रम चालू आहे.
- डॉक्टर लहाने यांनी अतिशय हलाखीच्या परिस्थितीमध्ये शिक्षण घेतले आहे. त्यांनी अनेक लक्षावधी रुग्णांवर नेत्र रोग ऑपरेशन शस्त्रक्रिया अतिशय यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत.
डॉ. तात्याराव लहाने थोडक्यात माहिती
- १९८१ : मराठवाडा विद्यापीठातून मेडिसिनमधील पदवी प्राप्त.
- १९८५ : एम.बी.बी.एस. इन ऑप्थल्मॉलॉजी.
- १९९४ : जे.जे.रुग्णालय – नेत्रशल्यचिकित्सा विभागप्रमुख.
- २००४ : “जे. जे.’त रेटिना विभागाची सुरुवात.
- २००७ : मोतीबिंदूवरील एक लाखावी यशस्वी शस्त्रक्रिया.
- २००८ : पद्मश्री पुरस्काराने सन्मानित.
- २०१० : जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता
डॉ. तात्याराव लहाने यांचा राजीनामा
मोतीबिंदू शस्त्रक्रियांचे अनेक विक्रम आपल्या नावावर करत सगळ्यांच्या परिचयाचे झालेले डॉ. लहाने हे एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. डॉ. लहानेंशी संबंधित वाद सुरू झाला, तो जे. जे. रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी केलेल्या आरोप आणि तक्रारींपासून.
मुंबईस्थित जे. जे. रुग्णालय हे महाराष्ट्रातील नामांकित सरकारी रुग्णालय आहे. राज्यभरातून रुग्ण इथे उपचारासाठी येतात. गेल्या काही दिवसांपासून नेत्रविकार विभागात काम करणाऱ्या 28 निवासी डाॅक्टरांनी डाॅ. लहाने यांच्यासह इतर वरिष्ठ डाॅक्टरांविरोधात तक्रारी केल्या.
“नेत्रविकार विभागात डॉक्टर, प्राध्यापक, विभाग प्रमुख हे विद्यार्थ्यांना त्रास देत असून त्यामुळे शैक्षणिक नुकसान होत आहे, विद्यार्थ्यांची होणारी पिळवणूक थांबवावी,” अशी मागणी करत निवासी डॉक्टरांनी ‘काम बंद’ आंदोलन सुरु केलं.
जेजे रुग्णालयातील नेत्रशल्यचिकित्स विभागातील डॉक्टर, प्राध्यापक आणि विभाग प्रमुख विद्यार्थ्यांना त्रास देतात त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप करण्यात आला होता.
या आरोपानंतर डॉ. लहाने, डॉ. रागिणी पारेख यांच्यासह 9 डॉक्टरांनी तडकाफडकी राजीनामे टाकले होते. याप्रकरणावर तात्याराव लहाने यांनी पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडत त्यांच्यावर करण्यात आलेले आरोप फेटाळून लावले होते. यानंतर सराकरने त्यांनी दिलेला राजीनामा मंजूर केला होता.
डॉ. तात्याराव लहाने महत्त्वपूर्ण गोष्टी
पद्मश्री डॉक्टर लहाने यांना तात्या या नावाने जास्त ओळखले जाते. आपल्या देशात असे अनेक लोक आहेत, ज्यांना डॉक्टर तात्याराव लहाने हे वैद्यकीय शिक्षण आणि औषध विभागाचे संचालक संचालक आहेत. हे राज्यातील सर्वोच्च पद आहे, हे माहीत नाही. लातूर जिल्ह्यातील माकेगाव रेणापूर या छोट्याशा गावातून सुरू झालेल्या त्यांचा प्रवास मुंबई पर्यंत येऊन संपला.
बाबा आमटे यांच्या आनंदवनांशी ते जोडले गेले. कारण बाबा आमटे यांनी त्यांना वरोरा या ठिकाणी येण्यासाठी बोलावले. तसेच कुष्ठरोगी रुग्णांची दृष्टी पुनरसंचयीत केली. यातील बहुतेक रुग्ण दृष्टीहीन होते. या आवाहनाला डॉक्टर लहाने यांनी प्रतिसाद दिला आणि त्यांच्या सहकार्या डॉक्टर रागिणी पारेख यांच्यासह वरोरा या ठिकाणी ते दरवर्षी मोफत नेत्र शस्त्रक्रिया करत असत.
बाबा आमटे गेल्यानंतरही तात्यांनी ही प्रथा सुरू ठेवली. लहान वयात त्यांना किडणीच्या आजाराला सामोरे जावे लागले.
डॉक्टर लहाने यांना त्यांच्या कुटुंबाकडून खूप प्रेम मिळाले. घरची परिस्थिती गरीब असतानाही समाजसेवा करण्याचे इच्छेने त्यांनी आपण डॉक्टर होण्याचे ध्येय जोपासले. या त्यांच्या प्रवासामध्ये त्यांना त्यांच्या आई-वडिलांची साथ मिळाली.
लहान वयातच डॉक्टर लहाने यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या. त्यावेळी डॉक्टरांनी डॉक्टर लहाने यांना सांगितले की, तुम्ही सहा महिन्यातच मरणार आहात. परंतु काही दिवसांनी तेच डॉक्टर किडनी प्रत्यारोपणाचा उपाय त्यांच्यापर्यंत घेऊन आले. आणि डॉक्टर लहाने यांच्या आई अंजनाबाई यांनी त्यांना एक किडनी दान केली.
आईच्या शरीरातून किडनी काढल्यानंतर डॉक्टरांनी तिला 166 टाके टाकून ओपनिंग बंद केली. तिला खूप वेदना होत होत्या, पण आयसीयू मध्ये असलेल्या तिच्या मुलाची तिला जास्त काळजी होती. ज्यावेळी आपल्या मुलाची भेट घेतली आणि जेव्हा डॉक्टर लहाने यांनी तिला आयसीयू मधून पहिले, तेव्हा ती तिच्या वेदना विसरली. या घटनेमुळे डॉक्टर लहाने यांचा समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून गेला. आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत समाजाची सेवा करण्याचे त्यांनी ठरवले.
जे जे हॉस्पिटल मध्ये वैद्यकीय सेवा करताना त्यांच्या शिक्षिकेने त्यांना इंग्रजी भाषेची त्यांची अवस्था लक्षात घेतली. त्यांनी डॉक्टर लहाने यांना कोचिंगला जाऊन इंग्रजी शिकायला सांगितले त्यावेळी ते 40 वर्षांचे होते. खाजगी इंग्रजी वर्गामध्ये इंग्रजी शिकण्याचा त्यांनी निर्णय घेतला.
नवीन भाषा शिकण्याची प्रबळ इच्छाशक्तीने त्यांनी त्या इंग्रजी वर्गात जाण्यास सुरुवात केली. याचा फायदा त्यांना अनेक देशांना भेट देताना झाला. 2010 मध्ये ग्रँट मेडिकल कॉलेज आणि सर जमशेदजी म्हणजेच जे जे हॉस्पिटलचे ते डीन बनले, डीन म्हणून त्यांनी बाहेरील पेशंट विभागाचे आधुनिकरण केले.
डॉ. तात्याराव लहाने यांच्या जीवनावर आधारित चित्रपट
डॉक्टर तात्याराव लहाने यांच्या जीवनावर आधारित “डॉक्टर तात्या लहाने अंगार” हा चित्रपट काढण्यात आला आहे. या चित्रपटांमध्ये डॉक्टर तात्याराव लहाने यांच्या जन्मापासून, ते त्यांना पद्यश्री हा भारताचा चौथा सर्वोच्च पुरस्कार प्राप्त होण्या पर्यंतचा प्रवास चित्रित केला गेला आहे. या चित्रपटाची निर्मिती व दिग्दर्शन विराग मधुमालती वानखेडे यांनी केले आहे.
डॉ. लहानेंचा ध्यास, कष्ट, संघर्ष व त्यांच्या आईची त्यांना मिळालेली साथ एकूणच त्यांच्या आयुष्यातील घडलेल्या घटना इतरांसाठी प्रेरणादायी ठरणाऱ्या आहेत. डॉ. तात्या लहाने यांची ही “बायोपिक” आजच्या तरुणाईसाठी नक्कीच मार्गदर्शक ठरणार आहे.
डॉ. तात्याराव लहाने माहिती मराठी FAQ
१. डॉ. तात्याराव लहाने यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला ?
डॉक्टर तात्याराव लहाने यांचा जन्म दि. १२ फेब्रुवारी १९५७ रोजी महाराष्ट्रामध्ये लातूर जिल्ह्यातील माकेगाव या छोट्याश्या ठिकाणी झाला.
२. डॉ. तात्याराव लहाने कोण आहेत?
डॉक्टर तात्याराव लहाने हे भारतामधील प्रसिद्ध नेत्र चिकित्सक म्हणजेच डोळ्याचे स्पेशालिस्ट डॉक्टर म्हणून नावाजले जातात. अंध लोकांना दृष्टी देण्यासाठी, डॉक्टर तात्याराव लहाने अनेक वर्ष काम करत आहेत.
३. डॉ. तात्याराव लहाने यांचे शिक्षण काय झाले आहे?
डॉक्टर तात्याराव लहाने यांनी १९८१ मध्ये मराठवाडा विद्यापीठामधून मेडिकल मध्ये पदवी प्राप्त केली. डॉक्टर तात्याराव लहाने यांनी १९८५ मध्ये एम.बी.बी.एस इन ऑप्थल्मॉलॉजी पदवी प्राप्त केली.
४. डॉ. तात्याराव लहाने यांच्या आईचे नाव काय आहे?
डॉक्टर तात्याराव लहाने यांच्या वडिलांचे नाव पुंडलिकराव लहाने, तर आईचे नाव अंजनाबाई लहाने असे होते.
५. डॉ. तात्याराव लहाने यांना कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे ?
डॉक्टर तात्याराव लहाने यांना २००८ मध्ये भारत सरकारने भारताच्या चौथ्या स्थानावर असणारा पद्यश्री पुरस्कार देऊन सन्मानित केले.
निष्कर्ष
मित्रहो, आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणस भारतामधील प्रसिद्ध नेत्र रोग स्पेशालीस्ट व पद्मश्री विजेते डॉक्टर तात्याराव लहाने यांच्या बद्दल माहिती दिली आहे. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. लेख आवडल्यास तुमच्या इतर मित्रपरिवारांसोबत नक्की शेयर करा. धन्यवाद.
Hello,
Wondering if you accept guest posts or link inserts on existing posts on marathizatka.com?
How much would you charge for this?
Justin
If you’d like to unsubscribe click the following link.
https://mailerking.xyz/optout/?site=marathizatka.com