इलेक्ट्रिक दुकान कसे सुरू करावे? : Electrical Shop Business Information In Marathi

Electrical Shop Business Information In Marathi : इलेक्ट्रिक दुकान कसे सुरू करावे? – नमस्कार मित्रहो. जर आपण इलेक्ट्रिक मटेरियलच्या दुकानाविषयी माहिती जाणून घेण्यास इच्छुक असाल तर आपण योग्य ठिकाणी आला आहात. आजच्या लेखामध्ये आम्ही इलेक्ट्रिक साहित्य विक्रीच्या दुकानाबद्दल मार्गदर्शक तत्वे, दुकान सुरू करण्यासाठी आवश्यक गोष्टी, त्याचबरोबर यशस्वी इलेक्ट्रिक दुकान व्यवसाय चालवण्यासाठी लागणारी सर्व माहिती या ब्लॉगमध्ये देणार आहोत.

Table of Contents

इलेक्ट्रिक दुकान कसे सुरू करावे? : Electrical Shop Business Information In Marathi

आपण जर या क्षेत्रात नवीन असाल आणि तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करावयाचा असेल किंवा आपले असलेले दुकान आणखी चांगल्या प्रकारे चालवायचे असेल, तर हा लेख तुम्हाला अतिशय मौल्यवान माहिती देईल. या लेखामध्ये आम्ही अगदी लहान सहान गोष्टींचा तपशीलवार विचार करू. त्याचबरोबर धंद्याच्या वाढीसाठी कोणते उपाय करता येईल हेही सांगू.

इलेक्ट्रिक दुकान व्यवसाय सुरू करण्यासाठी काही महत्वपूर्ण टप्पे आपणास लक्षात घ्यावे लागतील. ते पुढीलप्रमाणे

Electrical Shop Business Information In Marathi
Electrical Shop Business Information In Marathi

इलेक्ट्रिक दुकान व्यवसायसाठी बाजाराचे संशोधन करणे

कोणताही शाश्वत व्यवसाय सुरू करण्यासाठी तसेच उत्पादन किंवा सेवेच्या मागणीचे प्राथमिक मूल्यांकन करणे अत्यंत गरजेचे आहे. योग्य प्रकारे बाजाराचा आढावा घेणे, मार्केट संशोधन करणे ही कोणत्याही यशस्वी व्यवसायाची पहिली पायरी असते. यासाठी आपल्याला वेगवेगळी सर्वेक्षणे आवश्यक असतील, आपल्या आजूबाजूच्या संभाव्यता आणि संधींचे स्पष्ट मूल्यांकन आणि त्याच मार्केट स्पेसमधील आधी असलेले स्पर्धक यांचा सखोल अभ्यास करावा. इलेक्ट्रिक दुकान व्यवसायात चांगला परिणाम मिळविण्यासाठी येथे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत जे तुम्ही बाजार संशोधनादरम्यान स्वतःला विचारू शकता:

विक्री पश्चात दुरुस्ती सेवांची मागणी आहे का?
सध्या उपलब्ध असलेल्या विद्युत सेवांमध्ये ग्राहकांना कोणत्या विसंगती आढळतात?
या क्षेत्रातील विविध उत्पादनांच्या मागणीची पातळी काय आहे?
या क्षेत्रात नवीन व्यवसायीकासाठी जागा आहे का?
तुमच्या व्यवसायाच्या दृष्टीने सामान्य ग्राहकांच्या भावना काय आहेत?

इलेक्ट्रिक दुकान व्यवसाय आराखडा तयार करणे

एकदा का आपल्याला वर दिलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे मिळाली, की आपण या बाजारपेठेत व्यवसाय करू शकतो की नाही हे आपण ठरवू शकतो. त्याशिवाय ही उत्तरे आपल्याला पुढील व्यवसायिक योजना विकसित करताना मार्गदर्शक ठरतात. आपली योग्य योजना आपल्या संभाव्य ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल असते. एक चांगली व्यवसाय योजना करणे फक्त पुरेसे नसते, तर ग्राहकांच्या गरजांची काळजी घेणे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे.

सर्वसमावेशक व्यवसाय योजना तयार करण्याच्या दृष्टीने खालील घटक महत्त्वाचे आहेत.

दुकानाचे नाव – आपल्याला इतर स्पर्धकांपेक्षा वेगळे दिसण्यासाठी दुकानाचे नाव सर्वसामान्यांना अपील होणारे असे निवडावे. इतर स्पर्धकांपेक्षा आपला वेगळे करण्यास हे नाव अतिशय महत्त्वाचे असते.

आपले दुकान सुरू करताना आपण उद्घाटनाची ऑफर देणारी सर्व उत्पादने आणि सेवा तसेच आपले धोरण याची यादी तयार करावी.

आपल्या स्टोअरला अतिरिक्त कर्मचाऱ्यांची गरज आहे की नाही याचा सुरुवातीलाच विचार करावा. जर कुशल कामगारांची गरज नसेल, तर सुरुवातीला इंटर्न नेमणे शहाणपणाचे ठरते.

आपली आर्थिक परिस्थिती जाणून घ्यावी. हे अगदी प्राथमिक सल्ल्यासारखे वाटले, तरीही कदाचित सर्वात महत्त्वाचे आहे. कमी जोखीम घेऊन सुरुवातीला व्यवसाय सुरू करावा आणि नंतर व्यवसाय वाढवत जावा.

आपल्याकडील असलेल्या खेळत्या भांडवलाची आधीच व्यवस्था करावी. नंतरच्या काळात कठीण प्रसंग टाळण्यासाठी आपल्याकडे योग्य ते भांडवल असल्याची खात्री करावी. आपल्या व्यवसायाचा आकार ठरवून घ्यावा, जेणेकरून किती जागेत आपण व्यवसाय करू आणि त्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त किती खर्च करावा लागेल, याचा आपल्याला अंदाज बांधता येतो.

इलेक्ट्रिक दुकान कसे सुरू करावे
इलेक्ट्रिक दुकान व्यवसाय

इलेक्ट्रिक दुकान व्यवसाय परवाना आणि कायदेशीर बाबी

कोणताही व्यवसाय सुरू करण्याच्या नियमाप्रमाणे, इलेक्ट्रिकल शॉपमध्ये आपल्याला विविध कायदेशीर आणि परवानाविषयक बाबींवर काम करावे लागेल. या गोष्टींसाठी चांगल्या वकिलाची नियुक्ती करणे खूप महत्त्वाचे आहे कारण स्वत: विविध कायदेशीर प्रक्रियेतून जाणे खूप कठीण असू शकते. या प्रवासादरम्यान तुम्हाला ज्या विविध कायदेशीर आणि परवाना प्रक्रियांचा सामना करावा लागणार आहे त्या खालीलप्रमाणे असू शकतात:

कायदेशीर बाबीइलेक्ट्रिक दुकान व्यवसाय परवाना
नियमांची माहिती घेणे इलेक्ट्रिक दुकान व्यवसाय परवाना
तुमच्या व्यवसायाची नोंदणी करणेइलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर परवाना
दायित्व विमाइलेक्ट्रिकल पर्यवेक्षक आणि वायरमन परवाना
अतिरिक्त परवानग्याविशेष वायरमन परवाना

इलेक्ट्रिक दुकान व्यवसायसाठी योग्य जागेची निवड करणे

आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि धंद्याला सुरुवातीपासून बळकटी देण्यासाठी दुकान योग्य ठिकाणी असणे सगळ्यात महत्त्वाचे आहे. आपल्या आजूबाजूला असणारी लोकवस्ती, बांधकामाच्या जागा, नवीन होणारी गृहसंकुल, यांचा विचार करून त्याचबरोबर इलेक्ट्रिशियन, कॉन्ट्रॅक्टर्स आणि बाजार यांचा विचार करून आपण आपली योग्य जागा निवडू शकतो. त्याचबरोबर या क्षेत्रातील असलेली स्पर्धा आणि आधी असलेले दुकाने यांचाही विचार करावा लागतो. स्थानिक बाजारपेठेत उपलब्ध असलेली जागा तोलून मापून घेणे अत्यावश्यक ठरते

  • निवडलेली जागा ग्राहकांना सहज दिसणे योग्य असावी.
  • निवडलेल्या जागेच्या आजूबाजूला पार्किंगची सोय असावी.
  • निवडलेल्या जागेच्या जवळपास ग्राहकांची वर्दळ असावी.
  • निवडलेली जागा रहदारीची असावी दुकान शक्यतो रस्त्याच्या जवळ असावी.

इलेक्ट्रिक दुकान कसे सुरू करावे याचा व्हिडिओ

इलेक्ट्रिक दुकान व्यवसायसाठी स्टॉक विकत घेणे

इलेक्ट्रिक दुकान व्यवसायसाठी दुकानात स्टॉक भरताना सुरुवातीपासून अतिशय चांगल्या प्रतीचा आणि उच्च दर्जाचा विद्युत साहित्याचा स्टॉक जवळ ठेवावा. छोट्या छोट्या ग्राहकांच्या गरजा समजून घेऊन, त्यांना दररोजच्या काळात लागणारा स्टॉक जास्त प्रमाणात ठेवावा. जेणेकरून ही गिऱ्हाईक पुढे आपल्याला धंद्याला बळकटी देतील. सध्या चालू असलेले मार्केट ट्रेंड, ग्राहकांचे प्राधान्य आणि ग्राहकांच्या गरजा यांचे विश्लेषण करावे.

वायरिंग, स्विचेस, ट्यूब, आऊटलेट सर्किट ब्रेकर्स, विविध प्रकारच्या लाइटिंग या विद्युत सामग्रीचा साठा आपल्याकडे ठेवावा. ग्राहकांची गरज आणि विक्रीचा डाटा याचे दर आठवड्याला पुनरावलोकन करावे. त्याप्रमाणे आपल्याकडे स्टॉक पातळी अपडेट करावी. शक्य असल्यास स्टॉक साठी वेगळी वही किंवा सॉफ्टवेअर ठेवावे, जेणेकरून आपल्याकडे जास्त खपणारा माल आपण पहिल्या काही दिवसात ओळखू शकतो.

दुकानाची रचना कशी असावी ?

कोणत्याही दुकान बाहेरून आकर्षक असेल, तर साहजिकच नवीन ग्राहक तिकडे येण्यास उत्सुक असतो.

आपल्या दुकानातील सामानाची मांडणी व्यवस्थित करावी. सर्व इलेक्ट्रिकल सामान त्यांच्या कॅटेगरी प्रमाणे वेगवेगळे मांडून ठेवावे. जेणेकरून ग्राहकांना देताना वेळ लागणार नाही.

उच्च मार्जिनच्या वस्तू गिऱ्हाईकांच्या डोळ्यासमोरच्या पातळीवर ठेवाव्यात किंवा प्रवेशद्वारासमोर मांडून ठेवाव्यात. जेणेकरून जास्त फायदा असलेल्या वस्तू ग्राहकांचे लक्ष वेधून घेतील.

काही ऑफर सुरू करायचे असतील तर त्याचे होर्डिंग किंवा माहिती दुकानाच्या समोरच दिसावी. गिऱ्हाईकांना समजण्यास साध्या सोप्या इलेक्ट्रिकल वस्तू या समोरच्या डिस्प्लेवर ठेवाव्यात.

वेगवेगळ्या ब्रँडच्या वस्तू असल्यास अतिउत्तम जेणेकरून ग्राहकांना त्यातील चांगला ब्रँड किंवा त्यांच्या आवडीचा ब्रँड निवडण्यास सोपे पडते आणि याची ते जाहिरातही करतात.

दुकानात एकावेळी आठ ते दहा गिऱ्हाईकांना उभे राहण्यापूर्ती जागा असावी. त्याचबरोबर डिस्प्ले काउंटरही ऐसपैस असावा.

ग्राहक घेतलेले उत्पादनांची चाचणी करू शकतील किंवा त्याबद्दल बोलू शकतील अशी जागा तयार करावी. ग्राहकांचा चांगला अनुभव हा आपले विक्री वाढवण्यास कारणीभूत ठरतो

सामानाच्या विक्रीचे किंमत धोरण ठरवणे

इलेक्ट्रिक दुकान व्यवसायात स्पर्धात्मक प्रतिनिधी राहून नफा मिळवण्यासाठी काही ठराविक किंमत धोरण निश्चित करणे गरजेचे असते. यामध्ये दुकानातील उत्पादनांची किंमत, बाजारातील मागणी, प्रतिस्पर्धी दुकानदारांच्या किमती या सर्वांचा विचार करावा लागतो. आपण आपल्याला मिळणाऱ्या टक्केवारीचा विचार करून किती टक्केवारी मध्ये व्यवस्थित धंदा करता येईल, हे ठरवून त्याप्रमाणे मार्जिन निश्चित करावे. आणि त्यानंतर त्या वस्तूंची विक्री करण्याचा प्रयत्न करावा.

स्पर्धात्मक किमतीमध्ये आपले प्रतिस्पर्धी काय किंमत देत आहेत, त्याबरोबरच टॅक्स आणि इतर गोष्टी समाविष्ट करून उच्च गुणवत्तेची वस्तू आपण गिऱ्हाईकांना किती किमतीला देऊ शकतो, याचा सारासार विचार करून किमतीचे धोरण ठरवावे. दर महिन्याला किमतीच्या धोरणाचे पुनरावलोकन आणि विश्लेषण करावे. पुरवठादरांचा खर्च, ग्राहकांचे फीडबॅक आणि बाजारातील ट्रेंड या तीनही गोष्टींचे स्पर्धात्मक रित्या विश्लेषण करून आवश्यकतेनुसार किमती ठरवाव्यात.

इलेक्ट्रिक दुकान व्यवसायाचे मार्केटिंग आणि जाहिरात

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि आपल्याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी मार्केटिंग आणि जाहिरात करण्याचे धोरण अवलंबणे अतिशय गरजेचे आहे. या मार्केटिंगमध्ये सध्या आपण पारंपारिक आणि डिजिटल दोन्ही प्रकारचे मार्केटिंग करू शकतो. आपली उत्पादने आणि त्यांची माहिती सांगणारे बॅनर, बोर्ड किंवा नवीन दुकानासाठी असलेल्या ऑफर यांची व्यवस्थित आणि आकर्षक होर्डिंग तयार करून घ्यावीत.

बाजाराच्या ठिकाणी, त्याशिवाय गर्दीच्या ठिकाणी, बस स्टॉप, रिक्षा स्टॅन्ड, कन्स्ट्रक्शन साईट, कॉन्ट्रॅक्टर्स, गृहनिवासी संकुले यांच्यासमोर सहज दिसण्यायोग्य ही होर्डिंग लावावीत. जेणेकरून ग्राहकांना त्या दुकानाबद्दल कुतुहल निर्माण होईल.

सध्याच्या दिवसात आपल्या आजूबाजूच्या मंडळींचे फेसबुक ग्रुप, व्हाट्सअप ग्रुप तयार करून त्या ग्रुपवर सुद्धा ही माहिती टाकावी. जेणेकरून लोकल एरियामध्ये आपली व्यवस्थित जाहिरात होऊ शकते. स्थानिक वर्तमात्रातून फ्लायर्स, व्यापारी मासिकामध्ये जाहिराती देणे, छोट्या मोठ्या उद्योग संबंधित कार्यक्रमांमध्ये शोमध्ये उपस्थित राहणे, तिथे बॅनर देणे, छोट्या मोठ्या पातळीवरील स्पर्धांना स्पॉन्सर करणे या पारंपरिक पद्धतींचा आपण विचार करू शकतो.

मार्केटिंग आणि जाहिरातीच्या काही उपाययोजना खालील –

पारंपारिक मार्केटिंग – इलेक्ट्रिक दुकान व्यवसायचे बॅनर, बोर्ड, आकर्षक होर्डिंग, वर्तमात्रातून फ्लायर्स, मासिकामध्ये जाहिराती, स्पॉन्सर करणे

डिजिटल मार्केटिंग – इलेक्ट्रिक दुकान व्यवसायची वेबसाइट, फेसबूक, अॅप तयार करणे, गूगल जाहिरात

प्रमाणे कोणताही धंदा हा वर्ड ऑफ माऊथ मार्केटिंग जास्त जोरात चालतो. त्यामुळे ग्राहकांना अतिशय चांगली सर्विस देण्याचा प्रयत्न करावा, कारण सुरुवातीला आलेले गिऱ्हाईक वारंवार येणे, ही धंद्यातील यशाची गुरुकिल्ली आहे. आपल्या दुकानावर येणाऱ्या पैकी किती टक्के गिऱ्हाईक पुढच्या वेळी पुन्हा येते, हे पाहणे अतिशय महत्त्वाचे ठरते

पुरवठादार किंवा सप्लायर बरोबर चांगले संबंध निर्माण करणे

दर्जेदार विद्युत सामग्रीचा पुरवठा करणारे पुरवठादार आपल्याला स्थिर ठेवावे लागतात. यासाठी त्यांच्याबरोबर चांगले व्यावहारिक संबंध निर्माण करून ठेवावे. पुरवठादारांची व्यवहारातील सचोटी, उत्पादनाची गुणवत्ता, किंमत आणि सप्लायची वेळ या सर्व गोष्टी विचारात घ्याव्यात. पुरवठादारांबरोबर योग्य किमतीसाठी वाटाघाटी कराव्या लागतात. या काही वेळा त्रासदायक ठरतात. त्यामुळे कोणताही व्यवहार ठरवण्यापूर्वी मुक्त संभाषण होणे गरजेचे असते. जास्तीत जास्त वोल्युम घेतल्यानंतर जास्त डिस्काउंट मिळण्याच्या संभावना जास्त असतात. त्यामुळे दीर्घकालीन भागीदारी प्रस्थापित करावी आणि अतिशय कमी किमतीमध्ये माल घेण्याचा प्रयत्न करावा.

उत्कृष्ट ग्राहक सेवा देणे

ग्राहक टिकवून ठेवण्यासाठी आणि आपली सकारात्मक इमेज तयार करण्यासाठी सर्वोत्कृष्ट सेवा देणे गरजेचे आहे. आपण आपल्या ग्राहकांना विकत असलेल्या सामानाबद्दल त्यांना प्रशिक्षित करावे. ग्राहकांना अचूक माहिती द्यावी, आणि कोणत्या वस्तू कशा हाताळाव्या याबद्दलही माहिती द्यावी. जेणेकरून त्या वस्तू नीट वापरल्या जातील आणि काही चूक झाल्यास त्याची आपणास माहिती कळेल. वैयक्तिकरित्या फोनवर किंवा व्हाट्सअप द्वारे आपण ग्राहकांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकतो.

सतत चांगला सेवाभाव आणि चांगली सर्विस, त्याचबरोबर योग्य किंमत दिल्यास गिऱ्हाईके वारंवार दुकानात येऊ शकतात. सर्व उत्पादनांची वॉरंटी, दुरुस्ती सेवा आणि विक्री पश्चात दुरुस्ती सेवा याबद्दल अतिशय जास्त काळजी घ्यावी. यामुळे ग्राहकांमध्ये दीर्घकालीन चांगले संबंध निर्माण होतात आणि ग्राहक आपल्या वस्तूंची इतरांकडे शिफारस करतात. त्यामुळे व्यवसाय वाढीसाठी प्रोत्साहन मिळते.

कामगार प्रशिक्षण आणि सांभाळणे

आपल्या दुकानातील कर्मचार्‍यांचे कार्यक्षम व्यवस्थापन सुरळीत कामकाज होण्यासाठी अतिशय आवश्यक असते. आपण यासाठी सक्षम कर्मचार्‍यांची नियुक्ती आणि प्रशिक्षण करणे, कामाचे योग्य वेळापत्रक तयार करणे, टीमवर्कला चालना देणे आणि त्यांच्या कामाचे मूल्यमापन करणे यासारखे विषय समाविष्ट करू शकतो.

नवीन तंत्रज्ञान आत्मसात करणे

आपल्या इलेक्ट्रिक साहित्य विक्रीच्या दुकानात नवीन तंत्रज्ञानाचा समावेश केल्यास आपण व्यवसाय व्यवस्थित सुधारू शकतो.

ग्राहकांना अत्युच्च खरेदी अनुभव देण्यासाठी प्वाइंट ऑफ सेल ही सिस्टीम वापरून आपण दररोजच्या व्यवहारांचे संचालन करू शकतो.

रोजच्या रोज विक्री अहवाल तयार करणे, त्यासोबत इनवर्ड आऊटवर्ड रजिस्टर सांभाळणे, व्यवसायाची रियल टाईम ग्रोथ पाहणे, स्टॉक पातळीचा आढावा घेणे, पुनर्विक्री वस्तूंची लिस्ट तयार करणे, ग्राहकांच्या समस्या सोडवण्याचा चार्ट तयार करणे या सर्व गोष्टी नवीन टेक्नॉलॉजी वापरल्यास अतिशय सोप्या होतात.

यासोबतच आपण आपल्या व्यवसायासाठी वेबसाइट अथवा अॅप निर्माण केल्यास त्याद्वारे जाहिरात, विक्री आणि विक्री पश्चात सेवा देणे सोपे होते.

ॲक्टिव्ह डिस्प्ले एप्लीकेशन, ऑनलाइन कॅटलॉग या तंत्रज्ञानाचा वापर करून आपण जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचू शकतो किंवा दुकानात न येता सुद्धा त्यांना आपल्याकडे उपलब्ध असलेले इलेक्ट्रिक साहित्य दाखवू शकतो.

व्यवसायाचे आर्थिक नियोजन

कोणताही व्यवसाय करताना आर्थिक नियोजन अतिशय गरजेचे असते. नवीन असल्यास सुरुवातीचे काही महिने किंवा वर्ष व्यवसायातील फायदे समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. जेणेकरून आपल्याला अनाठायी होणारा खर्च वाचवण्यास किंवा कमी करण्यास मदत मिळू शकेल. त्याचबरोबर नवीन गोष्टी किंवा व्यर्थ खर्च कमी करण्याचा प्रयत्न करावा. नवीन सुधारणा करताना सखोल विचार करावा.

स्वतःचा ब्रँड तयार करणे

कोणताही व्यवसाय करताना आपला ब्रँड तयार करावा नंतर आपला ब्रँड आपली ग्रोथ करू शकतो. इलेक्ट्रिक सामानाचे दुकान सुरू केल्यानंतर आपला ब्रँड निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावा. जेणेकरून ग्राहकांचा जास्तीत जास्त ओढा या दुकानाकडे होऊ शकेल. ब्रँड तयार करताना खात्रीशीर सेवा, दर्जेदार उत्पादने आणि त्यांच्या गरजेप्रमाणे माल व प्रामाणिक व्यवहार यांची गरज पडते. कोणतीही गिऱ्हाईक हे प्रथमतः दुकानात आल्यानंतर त्यांच्या मनाप्रमाणे, गरजेप्रमाणे गुणवत्ता पूर्ण माल देणे अतिशय गरजेचे आहे, याची काळजी घेऊन ग्राहक विश्वास संपादन करावा. आपल्या कामगिरीचे पुनरावलोकन करावे.

व्यवसाय आणि बाजारपेठ वाढवणे

एकदा का इलेक्ट्रिक वस्तूंचे दुकान सुरू झाले, की नवीन संधीचा फायदा घेण्यासाठी आणि बाजारपेठ वाढवण्यासाठी विचार करू शकतो. या व्यवसायाचा विचार वाढीचा विचार करताना काळजीपूर्वक नियोजन, जोखीमचे मूल्यांकन, आव्हानात्मक निर्णय घेणे गरजेचे ठरते. व्यवसाय विस्तारासाठी काही गोष्टी महत्त्वाच्या ठरतात

बाजार संशोधन करणे – आपला व्यवसाय वाढू लागल्यानंतर आपण कोणत्या क्षेत्रामध्ये आणखी हा व्यवसाय वाढू शकतो याचा शोध घेण्याचा प्रयत्न करावा. त्याचबरोबर मोठी कॉन्ट्रॅक्ट, गृह संकुले, बांधकाम व्यवसाय यांच्याशी संबंध सुधारावेत जेणेकरून त्यांच्या मोठ्या ऑर्डर आपण एका वेळी घेऊ शकतो.

मोठ्या ऑर्डर घेणे – मोठ्या ऑर्डर अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला मार्जिन देतात त्याचप्रमाणे धंद्याचा ओव्हरऑल टर्नओव्हर वाढवतात.

वैविध्यपूर्ण ऑफर – ग्राहकांना वैविध्यपूर्ण ऑफर द्याव्या. ग्राहक हा राजा असतो आणि प्रत्येक वेळी तो वेगवेगळ्या ऑफरच्या शोधात असतो. त्यामुळे इलेक्ट्रिकल टूल, सेफ्टी गिअर, होम ऑटोमेशन डिव्हायसेस यासारखी उत्पादने आपल्या दुकानांमध्ये समाविष्ट करून घ्यावी. इतर दुकानांपेक्षा काही वेगळ्या नावीन्यपूर्ण वस्तू आपल्याकडे ठेवाव्यात आणि त्यांवर ऑफर चालू करता येतील, जेणेकरून ग्राहकांना आकर्षित करता येईल.

धोरणात्मक भागीदारी – इलेक्ट्रिक समाजाचे दुकान व्यवस्थित चालू झाल्या नंतर आपण आपल्यासोबत काही बांधकाम व्यवस्थित इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर्स यांना या व्यवसायात छान भागीदार करून घेऊ शकतो आणि त्यांच्या इन्व्हेस्टमेंट मुळे आपण व्यवसाय वाढी करू शकतो.

आर्थिक समस्या नियोजन

कोणताही व्यवसाय किंवा धंदा म्हटलं की त्यात चढ-उतार येतात. अशावेळी दर महिन्याला आपल्या मासिक कामगिरीचे पुनर्मूल्यांकन करणे गरजेचे ठरते. बाजारातील ट्रेंड प्रमाणे विक्रीमध्ये चढ उतार होण्याची शक्यता असते. त्या परिस्थितीचा किंवा सीजन आणि ऑफ सीझन यांचा विचार करून आपली रणनीती तयार करावी. विक्री कमी किंवा बाजार मंद असल्यास वेगवेगळ्या ऑफर्स सुरू कराव्यात.

विद्युत कंत्राटदाराचा परवानासाठी लागणारी कागदपत्रे (Paperwork For  electrical contractors license)

विद्युत कंत्राटदाराचा परवाना – electrical contractors license – तयार करण्यासाठी खालील कागदपत्रे लागतात

Paperwork For  electrical contractors license याप्रमाणे

  1. चालक परवाना Driving License 
  2. आधार कार्ड Aadhar Card
  3. फोटो ओळख पुरावा Photo Identity Proof 
  4. कामाच्या अनुभवाचे दस्तऐवजीकरण Documentation of work experience 
  5. EHT/ LT/ HT इंस्टॉलेशनमध्ये केलेल्या कामाचे प्रमाणपत्र Certificate of work done in EHT/ LT/ HT installation 
  6. मेमोरँडम आणि असोसिएशनचे लेख Memorandum and Articles of Association 
  7. विहित रक्कम असलेला स्व-संबोधित लिफाफा A self-addressed envelope containing the prescribed amount 
  8. परवानाधारक अभियांत्रिकीसाठी वैध पर्यवेक्षकाचा परवाना Valid supervisor’s license for a licensed engineering 
  9. शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र Copies of educational qualification

इलेक्ट्रिक दुकान सुरू करण्यासाठी अंदाजे खर्च

आम्ही या ब्लॉग मध्ये पाच लाख रुपये खर्चात इलेक्ट्रिक वस्तु विक्री दुकान कसे सुरू करावयाचा एक ढोबळ अंदाज देत आहोत. हा अंदाज स्थळसापेक्ष वेगवेगळा असू शकतो. तरी वाचकांनी आपली सारासार बुद्धी वापरुन पैसे खर्च करावे.

दुकान सेट करणे (अंदाजे रुपये 2,00,000)

भाडे आणि सुरक्षा ठेव: – ही रक्कम दुकानाचे स्थान आणि आकार यावर अवलंबून असते. बजेटचा महत्त्वपूर्ण भाग पहिल्या काही महिन्यांचे भाडे आणि सुरक्षा ठेव भरण्यासाठी खर्च होऊ शकतो.

फर्निचर आणि फिक्स्चर:- काउंटर, टेबल, खुर्च्या आणि फंक्शनल शॉप सेटअपसाठी तसेच कॅश रजिस्टर, रॅक्क्स , बॉक्स यांसारखे आवश्यक फर्निचर खरेदी करा.

नूतनीकरण आणि आतील भाग: – ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी तसेच त्यांना उभे राहण्यासाठी स्टँडिंग एरिया, पेंटिंग, लाइटिंग फिक्स्चर, शेल्व्हिंग युनिट्स आणि डिस्प्ले यासारख्या मूलभूत नूतनीकरणासाठी पैसे खर्च होतात .

प्रारंभिक इन्व्हेंटरी (अंदाजे INR 1,50,000)

स्टॉक खरेदी करणे : – वायरिंग, स्विचेस, आऊटलेट्स, सर्किट ब्रेकर्स, लाइटिंग फिक्स्चर आणि इतर आवश्यक वस्तूंसह विविध प्रकारच्या इलेक्ट्रिकल सामग्री मिळविण्यासाठी बजेटचा एक महत्त्वपूर्ण भाग खर्च होतो.

तंत्रज्ञान आणि पॉइंट-ऑफ-सेल सिस्टम (अंदाजे INR 50,000): – विक्री व्यवहार सुव्यवस्थित करण्यासाठी, इन्व्हेंटरी व्यवस्थापित करण्यासाठी आणि विक्री अहवाल तयार करण्यासाठी विश्वासार्ह पॉइंट-ऑफ-सेल (POS) प्रणालीमध्ये गुंतवणूक करता येते. हे तंत्रज्ञान आपल्याला विक्री, इन्व्हेंटरी आणि ग्राहक डेटा कार्यक्षमतेने ट्रॅक करण्यात मदत करते.

जाहिरात (अंदाजे INR 40,000)

डिजिटल मार्केटिंग: – ब्रँड जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेबसाइट डेव्हलपमेंट, सोशल मीडिया प्रमोशन आणि ऑनलाइन जाहिरातींसह ऑनलाइन मार्केटिंग यासाठी एक महत्त्वपूर्ण भाग खर्च होतो.

प्रिंट मीडिया: – स्थानिक ग्राहकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचण्यासाठी फ्लायर्स, ब्रोशर किंवा वर्तमानपत्रातील जाहिरातींचे वितरण करण्यासाठी बजेटचा एक भाग खर्च होतो

कर्मचारी आणि प्रशिक्षण (अंदाजे INR 60,000)

कर्मचारी नियुक्त करा: ग्राहकांना मदत करण्यासाठी आणि दैनंदिन कामकाज करण्यासाठी सेल्स असोसिएट्स किंवा सपोर्ट कर्मचार्‍यांसह कर्मचारी नियुक्त करण्यासाठी आणि प्रशिक्षण देण्यासाठी निधी बाजूला ठेवावा लागतो.
खर्च (अंदाजे 30,000 रुपये)

परवाने आणि परवाने: स्थानिक प्राधिकरणांच्या आवश्यकतेनुसार आवश्यक व्यवसाय परवाने आणि परवानग्या मिळवण्याशी संबंधित खर्चाचा विचार करा.

विमा: संभाव्य जोखमींपासून संरक्षण करण्यासाठी मूलभूत व्यवसाय विमा संरक्षणासाठी काही निधीचे खर्च होतो.

आकस्मिक निधी (अंदाजे 15,000 रुपये)

तुमच्या व्यवसायाच्या सुरुवातीच्या टप्प्यात उद्भवू शकणारे अनपेक्षित खर्च किंवा आपत्कालीन परिस्थिती कव्हर करण्यासाठी आकस्मिक निधी असणे आवश्यक असते.

प्रश्नोत्तरे

इलेक्ट्रिकल व्यवसायांना ग्राहक कसे मिळतात?

तुमच्या इलेक्ट्रिकल व्यवसायाकडे अधिक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एक ठोस मार्केटिंग धोरण तयार करणे ही यशाची गुरुकिल्ली आहे. डिजिटल मार्केटिंग वाढवणे, ग्राहकांची प्रोफाइल तयार करणे आणि योग्य जाहिरातींद्वारे त्यांच्यापर्यंत पोहोचणे यामुळे जास्तीत जास्त ग्राहक आणण्यास मदत होऊ शकते. त्याचबरोबर आलेल्या ग्राहकांना चांगला आणि दर्जेदार माल देणे, विक्रीपाश्चात सेवा देणे हे मार्ग आहेत.

इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्ट कसे जिंकता येते?

इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्ट जिंकणे म्हणजे बिडिंग प्रक्रिया पूर्णपणे शिकून घेणे. कॉंट्रॅक्ट घेण्यासाठी आवेदन करताना तुम्ही सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक तपासणे, वेळेवर व्यवस्थापन माहिती प्रदान करणे, योग्य बजेट राखणे, तुमची मान्यता अद्ययावत करणे इत्यादी गोष्टी सुनिश्चित करू शकता.

तुमचा स्वतःचा इलेक्ट्रिकल व्यवसाय सुरू करणे कठीण आहे का?

तुमचा इलेक्ट्रिकल व्यवसाय सुरू करणे हे जास्त कठीण नसले तरी त्यासाठी या क्षेत्राचे आपल्याला सखोल ज्ञान आणि सातत्य आवश्यक आहे. आपण जर या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये नवीन असलो तर अशा परिस्थितीत, हा व्यवसाय सांभाळणे कठीण वाटू शकतो, परंतु या क्षेत्रातील अनुभवी व्यक्तीसाठी, इलेक्ट्रिकल व्यवसाय सुरू करून चालवणे तुलनेने सोपे असू शकते. असे म्हटले जाते की, अनुभवासाठी थोडावेळ दिल्यास तुम्ही निश्चितपणे स्वतःला या प्रक्रियेशी परिचित करू शकता आणि यशस्वी व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत घेऊ शकता.

मी माझा इलेक्ट्रिकल व्यवसाय कसा यशस्वी करू शकतो?

तुमचा इलेक्ट्रिकल व्यवसाय करण्‍यासाठी थोडी धैर्य, चिकाटी आणि दृढनिश्चय आवश्यक असतो. कोणत्याही समस्यांचे निराकरण करण्यासाठी तुम्हाला तुमच्या स्टोअरच्या कामाचे वेळोवेळी नियमितपणे मूल्यांकन करावे लागेल, वाढत्या डिजिटायझेशनचा फायदा घेऊन तुम्हाला शक्य तितक्या ऑपरेशन्स स्वयंचलित कराव्या लागतील आणि तुमची मार्केटिंग योजना सतत अपडेट करून तुमची व्याप्ती वाढवावी लागेल आणि ऑनलाइन पोर्टल, वेबसाइट तयार करून ग्राहकांकडून जास्तीत जास्त सहभाग मिळवावा लागेल.

इलेक्ट्रिकल दुकान सुरू करण्यासाठी किती पैसे लागतील?

भारतात इलेक्ट्रिकल शॉप सुरू करण्यासाठी साररसी कमीत कमी ३ लाख रुपये ते ५० लाख रुपये एवढा खर्च अपेक्षित आहे. दुकानही जागा शहरी भागात निवडल्यास रक्कम अधिक असते, तर गांव पातळीवर खर्च खूपच कमी असतो. एकूण रक्कम ही ठिकाण, खरेदी, सेट अप, बांधकाम, अश्या विविध घटकांवर अवलंबून असते.

इलेक्ट्रिशियन व्यवसाय सुरू करू शकतो का?

होय, तुम्ही इलेक्ट्रिशियन व्यवसाय सुरू करू शकता, कारण तुमचे स्वतःचे स्टोअर सुरू करण्यासाठी तुमच्याकडे कोणतीही शैक्षणिक पात्रता असणे गरजेचे नाही. मात्र इलेक्ट्रिशियन्सना या क्षेत्रातील सखोल ज्ञान असल्यामुळे त्यांना इलेक्ट्रिकल व्यवसाय यशस्वीपणे चालवण्याची जास्त संधी असते.

विद्युत साहित्य विक्री व्यवसाय फायदेशीर आहे का?

होय, विद्युत साहित्य विक्री आणि सेवा हा एक अत्यंत किफायतशीर आणि फायदेशीर व्यवसाय आहे. झपाट्याने विस्तारत असलेल्या तांत्रिक युगात नवीनतम उपकरणांसह, इलेक्ट्रिकल व्यवसाय हा या क्षेत्रातील व्यावसायिक मागणीचा मुख्य भाग बनतो. उपकरणांची मागणी सर्वकाळ वाढतच आहे आणि विशेषत: या डिजिटल युगात या विद्युत उपकरणांना नियमित सर्व्हिसिंगची आवश्यकता असल्याने, इलेक्ट्रिकल व्यवसाय चालवण्यामुळे सेवा प्रकारातून अजून उत्पन्न कामविता येते. वैयक्तिक विद्युत साहित्य विक्री स्टोअरचा नफा मागणी, व्यवस्थापन, सेवा अश्या विविध घटकांवर अवलंबून असतो. कार्यक्षम ऑपरेशन आणि व्यवस्थापन धोरण रखल्यास तुमचा इलेक्ट्रिकल व्यवसाय अतिशय फायदेशीर होऊ शकतो. विद्युत साहित्य विक्री व्यवसाय करा आणि भरघोस नफा मिळवा.

निष्कर्ष

मित्रहो आज आम्ही Electrical Shop Business Information या लेखद्वारे आपल्याला इलेक्ट्रिक दुकान कसे सुरू करावे? यांची सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. या व्यवसायात पुढे अनेक संधी आहेत. तरी युवा वर्गाने या व्यवसायातील सखोल महिती, अभ्यास आणि अनुभव घेतल्यास स्वयंपूर्ण होण्यास मदत होईल. आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. अधिक माहिती आणि रोजच्या अपडेट साठी whatsapp ग्रुप जॉईन करा. धन्यवाद .

नक्की वाचा

Leave a comment