सारनाथ मंदिर माहिती | Sarnath Temple Information In Marathi

सारनाथ मंदिर माहिती | Sarnath Temple Information In Marathi – भारतातील एक प्रसिद्ध प्राचीन बौद्धस्थळ म्हणून सारनाथला ओळखले जाते. सिंहमुद्रा आणि त्याखाली “सत्यमेव जयते” ही अक्षरे प्रत्येक भारतीयाला लहानपणापासूनच परिचयाची झालेली असतात. स्वतंत्र भारताची ही राजमुद्रा नाणी, नोटा पासून अगदी शालेय पुस्तके, सरकारी कचेरीपर्यंत सर्वत्र नजरेस पडत असते. ती रुबाबदार सिंहमुद्रा आणि त्याखाली अशोक चक्र मनात सहजगत्या देशाभिमान जागृत करून जाते. सम्राट अशोकाने स्थापित केलेल्या या स्तंभावरील हे स्तंभशीर्ष आहे. आणि त्याचा उगम उत्तर प्रदेशातील काशी जवळच्या सारनाथ येथील आहे, हे कळल्यावर साहजिकच सारनाथ बद्दल उत्सुकता दाटून येते.

Sarnath Temple Information In Marathi

Table of Contents

सारनाथ मंदिर माहिती | Sarnath Temple Information In Marathi

नाव –सारनाथ
समर्पित –भगवान बुद्ध
कोठे आहे –उत्तर प्रदेश, वाराणसी
नदी –गंगा आणि गोमती नदीचा संगम
जीर्णोद्धार –19 व्या शतकात
कोणी केला – ब्रिटिश पुरातत्व शास्त्रज्ञांनी

प्रस्तावना

हा मूळचा स्तंभशीर्ष सारनाथच्या पुरातत्त्व वस्तुसंग्रहालयात आजही ठेवलेला आहे. हे कळल्यावर काशी व सारनाथ यात्रेचे वेध लागतात. भारतातील, उत्तर प्रदेश राज्यातील, वाराणसी शहरापासून जवळपास १३ किलोमीटरच्या अंतरावर गंगा आणि गोमती नदीच्या संगमावर सारनाथ आहे. याच ठिकाणी गौतम बुद्धांनी सर्वप्रथम धम्माचे प्रशिक्षण दिले होते. या पवित्र स्थळाचा इतिहास आणि सारनाथची माहिती (Sarnath Mandir Information) आज आम्ही आपल्यापर्यंत घेऊन आलो आहोत.

वाराणसी हे भारतातील एक प्राचीन शहर आहे जे त्याच्या कालातीत सौंदर्यासाठी ओळखले जाते. भव्य घाट, प्राचीन मंदिरे आणि झिगझॅग लेन हे सर्व एकत्र येऊन विलोभनीय दृश्य निर्माण करतात. सूर्यास्त होताच, मंदिराच्या घंटांचा आवाज, उदबत्तीचा वास आणि गंगा नदीच्या काठावर तरंगणाऱ्या तेलाच्या दिव्यांच्या दर्शनाने हवा भरून जाते. असे म्हटले जाते की या पवित्र शहरात आध्यात्मिक शांती मिळते. या शहराने शतकानुशतके यात्रेकरूंना आकर्षित केले आहे यात आश्चर्य नाही.

भेट देण्याच्या अनेक ठिकाणांसोबतच वाराणसीच्या सौंदर्यात आणखी एक प्रसिद्ध ठिकाण म्हणजे सारनाथ. शहरापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या या ठिकाणाला खूप महत्त्व आहे तसेच डोळ्यांना आनंद देणारी दृश्ये आहेत. सारनाथ हे जगभरातील बौद्ध धर्मियांच्या चार महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांपैकी एक मानले जाते. बुद्धाच्या पहिल्या प्रवचनाचे ठिकाण म्हणून, इतिहासात याला अनन्यसाधारण स्थान आहे. सारनाथला भेट दिल्याशिवाय वाराणसीची यात्रा पूर्णपणे अपूर्ण असेल.

सारनाथ मंदिर नकाशा

सारनाथ मंदिर माहिती व्हिडिओ

सारनाथ मंदिर इतिहास

इसवी सन तीसऱ्या शतकापासून या ठिकाणी ऐतिहासिक उलथापालथ होत होती. मात्र सम्राट अशोकाने या जागेमध्ये विशेष रस घेऊन विशाल स्तूप सारख्या भव्य वास्तू बांधल्या त्यामुळे या स्थळाला अतिशय महत्त्व प्राप्त झाले. दहाव्या ते बाराव्या शतकामध्ये परकीय आक्रमणाच्या दीर्घ कालावधीत उत्तर प्रदेशातील अनेक शहरे नष्ट झाली होती. यामध्ये सारनाथ देखील उध्वस्त झाले होते. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यामध्ये काही ब्रिटिश पुरातत्व शास्त्रज्ञांनी सारनाथला असलेल्या ऐतिहासिक महत्वामुळे हे पुन्हा जतन केले. आणि बौद्ध धर्मासाठी सर्वात महत्त्वाचे तीर्थक्षेत्र म्हणून त्याचे स्थान पुन्हा मिळवले.

गेल्या काही वर्षांमध्ये या मंदिराचे जीर्णोद्धार झाले आहेत आणि सध्याची जी रचना आहे ती सातव्या शतकातील आहे. इसवी सन पूर्व ५३३ च्या काळापासून जवळपास ३०० वर्षापर्यंतचा इतिहास याबाबत कोणतेही पुरावे आढळून येत नाहीत. कारण या काळातील कोणतेही अवशेष केलेल्या उत्खननामध्ये सापडले नाहीत. सम्राट अशोकाच्या काळात सारनाथची समृद्धी आणि बौद्ध धर्माचा विकास दिसून येतो. सम्राट अशोकाने धर्मराजिका स्तूप, सिंह स्तंभ असे अनेक स्तूप बांधले.

त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांच्या कारकिर्दीत सारनाथला पुन्हा उतरती कळा लागली. पहिल्या शतकामध्ये उत्तर भारतातील कुशाण राज्याची स्थापना होऊन पुन्हा एकदा बौद्ध धर्माची प्रगती झाली. तसे कनिष्काच्या कारकिर्दीत देखील सारनाथ या ठिकाणी बोधिसत्वाची मूर्ती स्थापन केली होती. कनिष्काने आपल्या कारकिर्दीमध्ये सारनाथ सह भारताच्या अनेक भागांमध्ये विहार आणि स्तूपांची देखील स्थापना केली होती.

सारनाथ हे बौद्ध धर्माच्या प्रसारापूर्वी शिव पूजेचे केंद्र होते. सारनाथचा गुप्त काळ हा सर्वात वैभवशाली काळ होता. त्यावेळी मथुरा सहित संपूर्ण उत्तर भारतातील कलेचे सर्वात मोठे केंद्र हे सारनाथ होते. ह्युयन त्संग या चिनी प्रवासी ने अतिशय उत्कृष्टरित्या या सारनाथचे वर्णन केले आहे. सारनाथ येथील शेवटचे स्मारक हे १२ व्या शतकात बांधले गेले होते. गहढवाल घराण्याचा शासक गोविंद चरण याने स्वतःला बनारस, कनोज, अयोध्या यांचा राजा घोषित केले होते.

गोविंद चरण या राजाची राणी कुमारी देवी या बौद्ध होत्या. यांनी सारनाथ या ठिकाणी धर्मचक्र जिना विहार नावाचा एक मोठा मठ बांधला. सारनाथ या ठिकाणी चौखंडी स्तूप नावाचे एक स्मारक देखील आहे. हा विटांनी बनवलेला असून उंच असा आहे. आणि त्याचा बुरुज हा अष्टकोनी आहे. हा बुरुज पंधराशे मध्ये अकबराच्या दरबारातील सुभेदार राजा तोडरमल याचा मुलगा गोवर्धन यांनी बांधला होता.

वाचा काशी विश्वनाथ मंदिर माहिती मराठी 

सारनाथ या ठिकाणचे बौद्ध मंदिर स्तूप आणि विहार बांधण्याचे श्रेय मौर्य वंशाचा सम्राट अशोक आणि गुप्त राजवंश यांना जाते. सम्राट अशोकांनी सारनाथ मधील धर्मराजिका स्तूप, सिंह स्तंभ, अशोक स्तंभाची स्थापना केली. राजा कनिष्काने देखील बौद्ध धर्माला पुढे जाण्यास मदत केली. याच्याच काळात एका भिक्षूने बोधिसत्वाची मूर्ती बसवली होती.

सारनाथ स्तूप (sarnath stupa)

स्तूप या शब्दाचा अर्थ ढीग असा होतो. हा शब्द संस्कृत आणि पाली भाषेतून आलेला आहे. स्तूप म्हणजे एक गोलाकार रचना आहे. ही रचना फक्त बौद्ध धर्मातच आढळून येते. या स्तूपांचा उपयोग बौद्ध अवशेष आणि समाधी जतन करण्यासाठी केला जात असे.

सारनाथ परिसर वर्णन

 • रेल्वे स्टेशन पासून सारनाथ या ठिकाणी ऑटो किंवा कारने येऊ शकता.
 • येथे आल्यावर पार्किंगची देखील सुविधा आहे.
 • या ठिकाणच्या गेटमधून प्रवेश केल्यावर समोर गौतम बुद्धांची आणखी एक मूर्ती स्थापित केलेली दिसून येते. ज्याच्या मागे शेषनागाने बुद्धांवर सावली टाकली आहे.
 • याच मंदिराच्या आवारात लाफिंग बुद्ध ही आपल्याला दिसून येतात.
 • मंदिरातून पुढे गेल्यावर सारनाथ म्युझियम लागते. या ठिकाणी ऑनलाइन तिकिटाची व्यवस्था केली आहे.
 • या ठिकाणाहून पुढे गेल्यावर सारनाथ स्तूप आहे. यालाच धमक स्तूप असे म्हणतात. तसेच अशोक स्तंभ, मूलगंधा कुटी विहार,चौखंडी स्तूप हे देखील आढळून येतात.
 • येथील वातावरण अतिशय शांत आणि थंड असे आहे.

सारनाथ नावाचा अर्थ

सारनाथ बोधगयामध्ये एक असे ठिकाण आहे ज्याला डिअर पार्क मध्ये हरणांचे पार्क असे म्हणतात. या ठिकाणी गौतम बुद्ध आले होते. येथेच बोधिवृक्षाखाली गौतम बुद्धांनी ज्ञानप्राप्तीनंतर पहिला उपदेश केला होता. सारनाथ हे नाव सारंगनाथ किंवा मृग म्हणजेच हरीण देवावरून ठेवण्यात आले असावे असे सांगितले जाते.

सारनाथ मंदिर वैशिष्ट्य

 • उत्तर प्रदेश राज्यातील वाराणसी शहरामध्ये सारनाथ हे एक बौद्ध मंदिर आहे.
 • सारंगनाथ या भगवान महादेवाच्या मूर्तीच्या स्थापनेनंतर या ठिकाणाचे नाव सारनाथ पडले. या ठिकाणी दरवर्षी श्रावण महिन्यात यात्रा भरते.
 • सारनाथ या ठिकाणी सम्राट अशोकाने अनेक स्तूप, विहार तसेच मंदिर बांधले यामध्ये अशोक स्तंभाचा समावेश होतो, जे भारताचे राष्ट्रीय चिन्ह म्हणून ओळखले जाते.
 • सारनाथ हे बौद्ध धर्माच्या चार प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी म्हणजेच सारनाथ, लुंबिनी, बोधगया, कुशीनगर यापैकी एक आहे.

सारनाथचे प्राचीन नाव

सारनाथचे प्राचीन नाव इसीपतन आणि मृग देव असे होते. इसीपतन म्हणजे ऋषीपतन आणि मृगदेव म्हणजे मृगांचा देव या ठिकाणी मृगांचे जंगल होते. याचे वर्णन निग्रोधामिग्र जातकामध्ये केलेले आढळून येते.

सारनाथ हे नाव कसे पडले?

आज ज्या ठिकाणाला सारनाथ म्हणून ओळखले जाते त्या ठिकाणी फार पूर्वी घनदाट जंगल होते. अनेक प्राणी, पक्षी या जंगलात राहत होते. भगवान गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर त्यांनी या ठिकाणी पहिला उपदेश केला. त्यानंतर सम्राट अशोकाच्या काळामध्ये सारनाथ या ठिकाणी अनेक बांधकाम झाली. त्याने एक मोठा स्तंभही बांधला होता ज्यावर सिंह आणि धर्मचक्र बनवले होते. नंतर भारताने त्याचे राष्ट्रीय चिन्ह म्हणून स्वीकारले.

या ठिकाणी असणारा धार्मिक स्तूप पाहून सारनाथ किती प्राचीन आहे हे आपल्याला लक्षात येते. या ठिकाणीच असलेले सारंगनाथांची भगवान महादेवांची मूर्ती मृगडे या ठिकाणी स्थापन झाली होती. त्याच वेळेपासून या ठिकाणाला “सारनाथ” हे नाव पडले.

बोधिसत्वाच्या एका कथेनुसार जेव्हा एकदा एक राजा हरणाची शिकार करण्यासाठी जंगलात केला होता. तेव्हा हरणाच्या वेशात आलेल्या बोधिसत्वाने एका मादी हरणीचे प्राण वाचवले होते. ती गर्भवती होती जिला राजाला मारायचे होते. या कारणास्तव या जंगलाला सारंग किंवा सारनाथ असे म्हणतात.

दयानंद सहानी यांच्या मते, भगवान शंकराला पौराणिक साहित्य मध्ये सारनाथ असे संबोधण्यात आलेले आहे. तसेच या शहरांमध्ये भगवान शंकरांचे काशी विश्वनाथाचे ज्योतिर्लिंग देखील आहे. त्यामुळे हे स्थान शिवपुजेचे ठिकाण बनले होते. तसेच सारनाथ या ठिकाणी भगवान शंकरांचे सारंगनाथाचे मंदिर देखील आहे. म्हणून याला सारनाथ हे नाव पडले असावे.

सारनाथ या ठिकाणी जाण्यासाठी महत्वपूर्ण गोष्टी

 • सारनाथ हे आपल्या कुटुंबासमवेत फिरण्यासाठी ते एक सर्वोत्तम ठिकाण आहे.
 • सारनाथ या ठिकाणी महात्मा गौतम बुद्धांच्या मूर्ती अशोक स्तंभ तसेच सारनाथ संबंधी पुस्तके मिळणारी अनेक दुकाने या ठिकाणी आपल्या पहावयास मिळतात.
 • सारंगनाथ मंदिर आणि अशोक स्तंभ, चौखंडी स्तूप, आध्यात्मिक ज्ञानाची बाग आणि मूलगंधा कुटी विहार ही सारनाथ मधील इतर प्रेक्षणीय ठिकाणे सुद्धा पाहू शकता.
 • धमेख स्तूप हे ठिकाण आहे जिथे बुद्ध यांनी पहिला उपदेश दिला होता. सारनाथचे हे मुख्य आकर्षण आहे.
 • काही स्मारकांची तिकिटे ही भारतीय पुरातत्व सर्वेक्षण किंवा ऑनलाईन बुक करू शकता.
 • स्मारकात जाण्यासाठी तिकीट आवश्यक आहे.
 • सारनाथ या ठिकाणी स्थानिक संग्रहालय शुक्रवारी बंद असते. त्यामुळे शुक्रवारी या ठिकाणाला भेट देऊ नये.
 • उद्यानामध्ये दररोज संध्याकाळी एक नेत्र दीपक साऊंड लाईट शो आयोजित केला जातो. बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या आवाजात बुद्धांच्या जीवनाची आणि शिकवणीची कथा या ठिकाणी सांगितली जाते.
 • सारनाथ या ठिकाणी जाण्यासाठी उन्हाळ्यामध्ये न जाता हिवाळ्यामध्ये प्रवास करू शकता.
 • सारनाथ येथील प्राणी संग्रहालयाची भेट घेण्यासाठी प्रति व्यक्ती दहा रुपये शुल्क आकारले जाते.
Sarnath stupa Information In Marathi

सारनाथ मंदिराची वास्तुकला (architecture of sarnath mandir)

गुप्त स्थापत्य शैलीमध्ये बांधलेले हे मंदिर त्याच्या कोरीव काम आणि गुंतागुंतीच्या कलाकृतींसाठी प्रसिद्ध आहे. हे मंदिर म्हणजे एक भारतीय स्थापत्य शैलीचे उत्तम उदाहरण आहे. या मंदिरामध्ये बौद्धदेवतांच्या गुंतागुंतीच्या कोरीवकामाने झाकलेला एक उंच शिखरा बघण्यासारखा आहे. या मंदिरामध्ये एक प्रशस्त मंडप आणि गाभारा देखील आहे. जिथे भगवान बुद्धांचे अवशेष ठेवलेले आहेत. या मंदिरामध्ये इतर बौद्ध देवतांना समर्पित अनेक छोटी छोटी मंदिरे देखील आहे.

स्तुपांवरील दगडी कोरीव काम, शिलालेख, शिल्पे त्या काळातील कारागिरांची कला दर्शवतात.सुरुवातीलाच उजव्या हाताला महाबोधी सोसायटी ऑफ इंडियाची इमारत दिसते. तिच्या प्रांगणातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा गुडघे टेकलेला पुतळा लक्ष वेधून घेतो. डावीकडे बौद्ध विहाराची आकर्षक वास्तू रचना दिसते. पुढे गेल्यावर मुख्य प्रवेशद्वाराच्या आत पायऱ्या चढून गेल्यावर टोकाला मूलगंधा कुटी विहार ही वैशिष्ट्यपूर्ण शैली बांधलेली देखणी वास्तू दिसते.

१९३१ मध्ये जगाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या आर्थिक मदतीच्या सहाय्याने हे सुरेख लेणी साकारली आहे. मुलायम चुनारच्या दगडात घडविलेल्या या मंदिराला माफक कोरीव काम व छोट्या मनोऱ्यानी शोभा आणली आहे. एका बाजूने रुंद छोट्या घडीच्या पायऱ्या व तीन बाजूने हिरवळ, निरव शांतता यामुळे मन प्रसन्न होते. आतील भव्य कक्षा, मधोमध पद्मासनात बसलेली बुद्धाची भव्य सोनेरी मूर्ती आहे. मूर्तीच्या चेहऱ्यावर शांत प्रसन्न भाव मोहित करून टाकतात. जपानी चित्रकार कोसेट्स नोसू यांनी भिंतीवर रेखलेली रंगीत चित्रे आणि म्युरल बुद्धाचा जीवनपट कलात्मक रित्या साकार करतात.

सारनाथ मंदिराचे धार्मिक महत्त्व

असे मानले जाते की, गौतम बुद्धांनी ज्ञान प्राप्तीनंतर पहिला उपदेश सारनाथ या ठिकाणी केला होता त्यामुळे बौद्ध धर्मीयांसाठी हे सारनाथ मंदिर अतिशय महत्त्वाचे असते. अनेक बौद्ध लोक या ठिकाणी पूजा करण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी या मंदिराला भेट देतात.

सारनाथ मंदिराबाबत तथ्य

 • सारनाथ याचा अर्थ हरिणांचा देव.
 • उत्तर प्रदेशातील गंगा गोमती नद्यांच्या संगमाजवळ हे सारनाथ मंदिर आहे.
 • बोधगया या ठिकाणी ज्ञान प्राप्त केल्यानंतर भगवान बुद्धांनी सर्वप्रथम सारनाथ या ठिकाणी उपदेश केला.
 • किंवदंतीच्या नुसार भगवान बुद्धांनी आपल्या अनुयायांना शिक्षा देण्यासाठी या ठिकाणी सुरू केले होते.
 • सारनाथ येथील डियर पार्क या ठिकाणी गौतम बुद्धांनी बौद्ध धर्माची घोषणा केली.

सारनाथ येथील उत्खनन

सन १८१५ मध्ये जनरल कर्नल कॉलिंग मॅकेन्झी यांनी सारनाथ या ठिकाणी सर्वप्रथम उत्खनन केले. या उत्खननाच्या वेळी ते भारतीय पुरातत्व विभागाचे जनक अलेक्झांडर कनिंग हॅम यांच्यासोबत होते. या उत्खननाच्या वेळी त्यांना एक पेटी मिळाली. ज्यामध्ये एक स्मृतीचिन्ह होते. ही पेटी त्या काळातील मजुरांची असावी तसेच या पेटीमध्ये हाडे, सोन्या चांदीचे दागिने, मोती आणि माणिक असलेल्या वाळूच्या दगडाच्या गोलाकार पेटीमध्ये संगमरवरी एक दंडगोलाकार पेटी होती.

कनिंग हॅम यांनी ही पेटी एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालला भेट दिली. सारनाथ या ठिकाणचे शेवटचे उत्खनन साधारणपणे १९२१-२२ च्या दरम्यान दयाराम सहानी यांनी केले होते. या वेळेच्या उत्खननामध्ये त्यांना शिल्प, दगडी छत्र्या आणि इतर गोष्टी सापडल्या. ज्या सारनाथ संग्रहालयामध्ये ठेवण्यात आलेले आहेत. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने मूळ जागेची प्रतिकृती या ठिकाणी बसवली आहे. ज्यामुळे शेकडो वर्षांपूर्वी हे ठिकाण कसे दिसत असावे याची आपल्याला कल्पना येते.

सारनाथ – वाराणसी कोठे आहे? आणि कसे पोहोचायचे?

भारतातील उत्तर प्रदेश राज्यातील वाराणसी शहरापासून १३ किलोमीटर अंतरावर गंगा आणि गोमती नदीच्या संगमावर सारनाथ मंदिर आहे.

या ठिकाणी जाण्यासाठी तुम्ही विमान, बस, ट्रेन किंवा खाजगी वाहनाने जाऊ शकतात.

विमान

सारनाथ या ठिकाणाहून सर्वात जवळचे विमानतळ हे वाराणसी आहे. बाबतपुर वाराणसी वरून सारनाथ जवळपास ३० किलोमीटरच्या अंतरावर आहे. या ठिकाणावरून तुम्ही बस, ऑटो किंवा टॅक्सीने येऊ शकतात.

ट्रेन

सारनाथ पासून जवळचे रेल्वे स्टेशन हे वाराणसी आहे. वाराणसी रेल्वे स्टेशन एक महत्त्वाचे रेल्वे स्टेशन आहे, जिथून वेगवेगळ्या शहरांमध्ये जाण्यासाठी ट्रेन सुविधा उपलब्ध आहेत. वाराणसी रेल्वे स्टेशनवरून येण्यासाठी बस, टॅक्सी किंवा ऑटोने येऊ शकतात.

बस

वाराणसी हे शहर लखनऊ, बरेली, कानपूर, इलाहाबाद, आग्रा आणि मथुरा यासारख्या प्रमुख शहरांना जोडले गेले असल्यामुळे या ठिकाणाहून सारनाथ जवळपास दहा किलोमीटरच्या अंतरावर आहे. या ठिकाणाहून तुम्ही सारनाथ या ठिकाणी येण्यासाठी ऑटो किंवा टॅक्सीने येऊ शकता.

मुख्य शहर ते सारनाथ मंदिर अंतर

 • बरेली ते वाराणसी अंतर ५८० किलोमीटर
 • कानपूर ते वाराणसी अंतर ३४० किलोमीटर
 • इलाहाबाद ते वाराणसी अंतर १२० किलोमीटर
 • आग्रा ते वाराणसी अंतर ६४५ किलोमीटर
 • मथुरा ते वाराणसी अंतर ७०६ किलोमीटर

सारनाथ या ठिकाणी जाण्यासाठी प्रवेश शुल्क आणि वेळ

 • सारनाथ या ठिकाणी जाण्यासाठी भारतीयांना मंदिरामध्ये जाण्यासाठी कोणताही प्रवेश शुल्क नाही. आणि म्युझियम साठी पन्नास रुपये प्रति व्यक्ती आकारले जातात. तर परदेशी लोकांसाठी शंभर रुपये प्रति व्यक्ती आकारले जातात.
 • सारनाथ म्युझियम हे शुक्रवारी बंद असते. आणि इतर दिवशी सकाळी नऊ पासून संध्याकाळी पाच पर्यंत चालू असते.
 • सारनाथ या ठिकाणी जाण्यासाठी ऑक्टोबर ते मार्च हा कालावधी सर्वोत्तम असतो. कारण उन्हाळ्यामध्ये या ठिकाणी उष्णतेचे प्रमाण जास्त असते.

सारनाथ जवळील पर्यटन स्थळे

धामेख स्तूप (dhamekh stupa)

हा एक गोलाकार स्तूप असून त्याची उंची ९३ फूट आहे. या स्तूपावर अनेक सुंदर अशी कोरीव शिल्पे करण्यात आलेली आहेत. त्यावर फुले, पाणी आणि स्वस्तिक सारख्या इतर गोष्टी देखील पडल्या आहेत. धर्म मेक्ष या संस्कृत शब्दापासून “धामेख” असे नाव या स्तूपाला पडले आहे. गुप्त काळातील कारागिरांनी सुंदर कलाकृती बनवल्या आहेत. त्यामुळे हा स्तूप गुप्तकाळात पूर्ण झाला असावा असे समजले जाते. मात्र या स्तूपाचा पाया सम्राट अशोकाने घातला होता.

सारनाथ बौद्ध मंदिर

या मंदिरामध्ये भगवान गौतम बुद्ध आणि त्यांची विविध प्रकारची चित्रे दिसून येतात. हे एक प्राचीन असे मंदिर आहे. या ठिकाणी प्रवेश करण्यापूर्वी चप्पल,पर्स, बेल्ट यासारख्या चामडयाच्या वस्तू बाहेर काढून ठेवावे लागतात. तरच तुम्हाला आत प्रवेश मिळू शकतो. हे मंदिर धार्मिक स्तूपाजवळ सर्वात मोठ्या वटवृक्षाजवळ आहे. या वटवृक्षाजवळ महात्मा बुद्धांचा आणखी एक पुतळा आपल्याला पाहण्यास मिळतो.

चौखंडी स्तूप

उत्तर प्रदेश मधील पवित्र तीर्थस्थाने आणि पर्यटकांच्या पसंतीचे असे हे चौखंडी स्तूप अतिशय प्रसिद्ध आहेत. हे तेच ठिकाण आहे जिथे गौतम बुद्धांनी पाच अनुयायांना घेऊन आपले उपदेश सुरू केले, शिकवण सुरू केली होती.

सारनाथ मधील वास्तुशिल्पंपैकी एक असणारा असा हा स्तूप म्हणजे चौकोन दिसतो याच ठिकाणी भगवान बुद्धांनी सर्वप्रथम आपल्या पहिल्या पाच शिष्यांना उपदेश केला होता.

सन पंधराशे मध्ये अकबराच्या दरबारातील राजा तोडरमल याचा मुलगा गोवर्धन यांनी या चौकडी स्तूपाच्या काही भागांची पुनर्बांधणी केली होती.

काही ऐतिहासिक संदर्भानुसार मुघल राजवंश असलेल्या हुमायूननी शत्रूंपासून सुटका करून घेण्यासाठी या ठिकाणी एक रात्र काढली होती. त्याच्या स्मरणार्थ हुमायूननी हा बुरूज बांधला होता.

सन १८३६ मध्ये कॅनिंग हॅम यांनी चौखंडी स्तूपामध्ये ठेवलेल्या थडग्यांचा शोध लावला होता.

ही वस्तू चौकोनी आकाराची असून पक्क्या विटांनी बनवलेली तीन मजली इमारत अशी आहे.

सारनाथ अशोक स्तंभ (सारनाथ स्तंभ) ashok stambh sarnath-

भारताचे राष्ट्रीय प्रतीक असलेले आणि सम्राट अशोकाचे सारनाथ मधील यात्रेचे (sarnath ashok stambh) हे एक प्रतीक आहे. अशोक स्तंभ हे एक दगडांपासून निर्माण केलेली अतिशय प्रभावशाली अशी संरचना आहे. या स्तंभाळा sarnath pillar असेही संबोधले जाते.

अशोक स्तंभाच्या स्थापनेच्या वेळी त्याची उंची जवळपास ५५ फूट इतकी होती. परंतु आता ती जवळपास सात फूट नऊ इंची कमी झालेली आढळून येते.

या स्तंभाचा वरचा भाग हा सारनाथ संग्रहालयामध्ये ठेवण्यात आलेला आहे. तसेच या स्तंभावर तीन लेख कोरण्यात आलेले आहेत आणि ते वेगवेगळ्या काळातील दिसून येतात.

थाई मंदिर सारनाथ

सारनाथ मधील एक प्रसिद्ध असे आकर्षण आहे. याची वास्तूकला आपल्याला आकर्षित करते. सुंदर अशा बागबगीचामध्ये हे मंदिर बनवले आहे.

मूलगंधा कुटी विहार

 • धर्मराजिका स्तुपाच्या उत्तरेस असलेला हा स्तूप गुप्त काळात बांधला होता.
 • या कुटी विहारावर अतिशय उत्कृष्टपणे कोरीव काम करण्यात आलेले दिसून येते.
 • याला एक मुख्य दरवाजा आणि तीन इतर दरवाजे असे चार प्रवेशद्वार आहेत.
 • परंतु या मंदिराच्या भिंती कमकुवत झाल्यामुळे दक्षिण दिशेचे तीनही दरवाजे सुरक्षिततेसाठी बंद करण्यात आलेले आहेत.

तीबत्ती मंदिर

या मंदिरामध्ये शाक्यमुनी बुद्ध यांची मूर्ती आहे. या मंदिरात थायलंड, चीन आणि जपान मधील तीर्थयात्री आणि बौद्ध विद्वान येतात.

धर्मराजिका स्तूप

हा स्तूप सम्राट अशोकाने बांधला या स्तूपाची उंची ४४ फूट तीन इंच अशी होती. परंतु भारतावर वारंवार झालेल्या हल्ल्यामध्ये सारनाथ मंदिर देखिल उध्वस्त झाले आणि त्या त्या वेळी भारतीय राजांनी हे मंदिर आणि येथील वास्तु पुन्हा बांधली होती.

सारनाथ म्युझियम

१९१० मध्ये स्थापन केलेले हे पुरातत्व संग्रहालय तिसऱ्या शतकापासून बाराव्या शतकापर्यंतच्या कलाकृत्यांचे आणि संग्रहांचे प्रदर्शन करते. सारनाथ चा पुरातन काळापासून असलेला निसर्गरम्य परिसर आज डियर पार्क म्हणूनही ओळखला जातो. येथील घनदाट वृक्षराजीतून मोरांच्या केका आणि इतर पक्षी गणांचे मधूर कुंजन कानावर पडत असते. आणि परिसराच्या मधोमध एक हरणांचे, वनगायींचे बेटही निर्माण केलेले आहे.

सारनाथ प्राणी संग्रहालय

नीलगाय,हरीण,मगर, बाजरी पक्षी, लाल मुनिया पक्षी, झेब्रा, कोनुर पक्षी, पोरक्यूपाईन, बगळा, रंगीबेरंगी मासे, करकोचा यासारखे प्राणी यामध्ये आढळून येतात

सारनाथ येथील प्रसिद्ध खाद्यपदार्थ

वाराणसीच्या संस्कृतीमध्ये खाद्यपदार्थ महत्त्वाची भूमिका बजावते. या ठिकाणी गरमागरम कचोरी, ताजे पान, मिठाई हे प्रसिद्ध पदार्थ आहेत. शाकाहारी भारतीय आणि चायनीज पासून ते अगदी इटालियन पदार्थांपर्यंत अनेक रेस्टॉरंट या ठिकाणी उपलब्ध आहेत. घाटावर लाकडाच्या आगीवर शिजवलेला पिझ्झा देखील या ठिकाणी खाण्यास मिळतो.

सारनाथ जवळील प्रसिद्ध हॉटेल्स

सारनाथ या ठिकाणी संपूर्ण जगभरातून पर्यटन येत असतात त्यामुळे त्यांच्या राहण्याच्या सोयीसाठी एसी, नॉनव्हेसी रूम या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्यापैकी काही प्रसिद्ध हॉटेल्स खालील प्रमाणे –

 • मयूर पेइंग गेस्ट हाऊस
 • मोहित पेइंग गेस्ट हाऊस
 • ट्रिबो ट्रेंड लिटिल बुद्ध
 • हॉटेल बुद्ध पार्क
 • सृष्टी शेल्टर
 • विपश्यना गेस्ट हाऊस

सारनाथ जवळील इतर प्रेक्षणीय ठिकाणे

जर तुम्ही सारनाथला आलात तर सारनाथपासून जवळपास १० किलोमीटर अंतरावर बनारसचे भव्य मंदिर आहे, जिथे तुम्हाला अनेक मंदिरे आणि घाटांना भेट देण्याचा आनंदही मिळेल. काही प्रमुख पर्यटन स्थळे खालील प्रमाणे –

 • काशी विश्वनाथ मंदिर – ०८ किलोमीटर
 • मणिकर्णिका घाट – ९ किलोमीटर
 • दशाश्वमेध घाट – ०८ किलोमीटर
 • दुर्गा मंदिर वाराणसी – १० किलोमीटर
 • अस्सी घाट – १२ किलोमीटर
 • गंगा आरती – ०८ किलोमीटर

सारनाथ मंदिर येथे साजरे केले जाणारे उत्सव

सारनाथ या ठिकाणी बुद्धांचा आशीर्वाद घेण्यासाठी तसेच येथील स्तूप पाहण्यासाठी संपूर्ण जगभरातून लाखो पर्यटक या ठिकाणी येत असतात. या ठिकाणी बौद्ध पौर्णिमा, महाशिवरात्री यासारखे सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात.

बुद्ध पौर्णिमा

येथे साजरी केली जाणारी बुद्ध पौर्णिमा ही गौतम बुद्धांचा जन्म, ज्ञान आणि मोक्ष म्हणून साजरी केली जाते. या दिवसात गरिबांसाठी मोफत वैद्यकीय शिबिरे घेतली जातात. संपूर्ण दिवसभर प्रार्थना चालू असते. संध्याकाळच्या वेळात बोधिवृक्ष आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणी दिवे लावले जातात. त्याचप्रमाणे मेणबत्त्या, फुले, धुप दाखवून स्तोत्रे म्हणून तसेच शाकाहारी पदार्थांचा नैवेद्य दाखवून या ठिकाणी बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाते.

महाशिवरात्र

सारनाथ ठिकाणी सारंगनाथाचे भगवान शंकराचे मंदिर असल्यामुळे या ठिकाणी महाशिवरात्र देखील मोठ्या धामधूमीत उत्साहात साजरी केली जाते. संपूर्ण मंदिर फुलांनी, दिव्यांनी सजवले जाते. या दिवशी मंदिरामध्ये मंत्र उच्चार ध्यानधारणा केली जाते.

FAQ

सारनाथ कोठे आहे?

सारनाथ मंदिर उत्तर प्रदेशमधील गंगा आणि गोमती नद्यांच्या संगमाजवळ वाराणसीच्या दहा किलोमीटर उत्तर पूर्वेस आहे.

सारनाथ म्हणजे काय?

सारनाथ या ठिकाणी डिअर पार्क आहे. त्यामुळे मृगांची देवता म्हणून सारनाथ हे नाव मिळाले.

सारनाथ स्तूप कोणी बांधला?

सारनाथ स्तूप सम्राट अशोक यांनी बांधला.

सारनाथ हे पवित्र स्थान का आहे?

वाराणसी प्रमाणे सारनाथ हे बुद्धाच्या अनेक कृत्यामुळे, उपासनेमुळे तसेच भूतकाळातील बुद्धांच्या जीवनात केलेल्या अनेक कर्तृत्वामुळे पवित्र आहे.

सारनाथ भेटीचा वेळ कोणता आहे?

सारनाथ शुक्रवार वगळता सर्व दिवस सकाळी नऊ ते सायंकाळी पाच पर्यंत उघडे असते.

सारनाथ ला भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ कोणता आहे

सारनाथला भेट देण्यासाठी हिवाळ्यामध्ये म्हणजेच साधारणपणे नोव्हेंबर पासून फेब्रुवारी पर्यंत या ठिकाणी भेट देऊ शकता.

निष्कर्ष

मित्रांनो, सारनाथ मंदिर बाबत आम्ही आमच्या या लेखाद्वारे संपूर्ण माहिती देण्याचा छोटासा प्रयत्न केले आहे. आपल्याला हा लेख कसा वाटला? कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. पुन्हा भेटू असाच एक नवीन विषय घेऊन.

तोपर्यंत नमस्कार.

Leave a comment