मुंशी प्रेमचंद माहिती मराठी | Munshi Premchand Information In Marathi

मुंशी प्रेमचंद माहिती मराठी | Munshi Premchand Information In Marathi – हिंदी ही सर्व भाषांपैकी एक सुंदर भाषा समजली जाते. जी संपूर्ण भारताची राष्ट्रभाषा म्हणून सुद्धा ओळखली जाते. हिंदी हा असा विषय आहे, जो प्रत्येकाला समजता येतो व बोलायला सुद्धा सोपी भाषा आहे. हिंदीला नवीन रूप व ओळख प्राप्त करून देणारे, अनेक लेखक होऊन गेले. त्या लेखकांमधील मुंशी प्रेमचंद यांची प्रतिमा ही तितकीच महत्त्वाची व प्रतिभाशाली आहे.

ज्यांनी हिंदी विषयाचा चेहरा फार बदलून टाकला. काळानुसार बदलणारे व हिंदी साहित्याला आधुनिक रूप प्रदान करणारे, प्रेमचंद हे एक प्रसिद्ध लेखक होते. मुंशी प्रेमचंद यांनी हिंदी भाषेतून, हिंदी साहित्य लोकांपर्यंत पोहोचवले. जे लोक कधीही विसरू शकत नाही. अत्यंत अवघड प्रसंगांना सामोरे जाऊन, मुंशी प्रेमचंद यांनी हिंदी सारख्या सुंदर विषयांमध्ये, स्वतःची छाप जगाच्या समोर उमटवली.

प्रेमचंद हे केवळ हिंदी लेखकच नव्हते, तर एक महान साहित्यिक, नाटककार व कादंबरीकार होते. त्यांच्याकडे अष्टपैलू प्रतिभा होती. त्यामुळे त्यांची ओळख ही प्रचंड होती. प्रेमचंद यांनी इ.स. १९१३ ते इ.स. १९३१ पर्यंत एकूण २२४ कथा, १०० लेख आणि १८ कादंबऱ्या लिहिल्या. त्यांची पहिली कादंबरी ‘असरारे महाबिद’ उर्दू भाषेत होती, तर त्यांची शेवटची कादंबरी ‘मंगलसूत्र’ अपुरी राहिली.

आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास या महान लेखक, कादंबरीकार व साहित्यिक यांच्याबद्दल माहिती दिलेली आहे. हा लेख जाणून घेण्यासाठी माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा.

Table of Contents

मुंशी प्रेमचंद माहिती मराठी | Munshi Premchand Information In Marathi

मूळ नाव धनपत राय
जन्म तारीख दि. ३१ जुलै १८८०
जन्म स्थळ वाराणसी
ओळख मुंशी प्रेमचंद
वडीलमुन्शी अजायबराय
आईआनंदी देवी
पत्नी राणी देवी, शिवराणी देवी 
अपत्येश्रीपत राय, अमृतराय व कमला देवी, चंद्रकांता आणि सरस्वती
राष्ट्रीयत्वभारतीय
प्रसिद्ध साहित्यकृतीगोदान, गबन
मृत्यूदि. ८ ऑक्टोबर १९३६

मुंशी प्रेमचंद यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वर्णन

 • कोण होते मुंशी प्रेमचंद
 • जीवन परिचय
 • शिक्षण
 • लग्न
 • कामाची शैली
 • प्रमुख कामांची नावे
 • मुंशी प्रेमचंद साहित्यिक लेखन
 • मुंशी प्रेमचंद यांच्या प्रमुख कथा कादंबरी लेखन
 • मृत्यू
 • प्रेरणादायी विचार
 • प्रसिद्ध कविता
 • मुंशी प्रेमचंद यांच्या बद्दल काही मनोरंजक तथ्ये
 • मुंशी प्रेमचंद बद्दल १० ओळी
Munshi Premchand Information In Marathi

कोण होते मुंशी प्रेमचंद ?

 • ज्यांचा जन्म, अतिशय गरीब कुटुंबामध्ये झाला, लहानपणापासूनच ज्यांनी प्रचंड बेताची परिस्थिती अनुभवली, जे एक सामान्य व्यक्ती होते. ज्यांनी त्यांच्या जीवन मूल्यांचा कधीही अनादर केला नाही, ज्यांनी समाजासाठी महत्त्वाचे कार्य केले, ज्या महान लेखकाने एका सामान्य व्यक्तीच्या समस्यांना, स्वतःच्या साहित्याद्वारे लोकांसमोर प्रकट केले, असे महान लेखककार, कथाकार, “मुंशी प्रेमचंद” होय.
 • प्रेमचंद हे शतकानुशतके दलित व गोरगरीब लोकांचा आवाज होते. पडद्याआड कैद असणाऱ्या व सतत अपमानित होणाऱ्या, असाह्य व अबला स्त्री जातीचे एक खंबीर वकील होते, जे गरीब व दलित लोकांच्या हितासाठी व कल्याणासाठी कार्य करणारे प्रचारक होते.
 • हिंदी साहित्य क्षेत्रामध्ये, प्रेमचंद यांचे एक महत्त्वाचे अग्रगण्य स्थान आहे. प्रेमचंद हे हिंदी साहित्यामधील एक असे रचनाकार आहेत, ज्यांनी हिंदी साहित्याची दिशा बदलवून टाकली. मुंशी प्रेमचंद यांच्या साहित्याच्या जोरावरती, आधुनिक साहित्याची इमारत उभी होऊ शकली. त्यामुळे प्रेमचंद यांचे हिंदी साहित्यातील योगदान हे अतुलनीय व अविस्मरणीय आहे.
Munshi Premchand

हे वाचा –

मुंशी प्रेमचंद यांचा जन्म आणि प्रारंभिक जीवन

 • प्रेमचंद यांचा जन्म दि. ३१ जुलै १८८० रोजी बनारस येथील लम्ही या एका छोट्याशा गावात झाला. प्रेमचंद हे एका गरीब व सामान्य कुटुंबामध्ये जन्मले. त्यांचे आजोबा गुर सहाय राय हे पटवारी होते. तर वडील अजयब राय हे पोस्टमास्टर होते.
 • बालपणापासूनच मुंशी यांचे आयुष्य खूप संघर्षामधून गेले. प्रेमचंद हे अवघ्या आठ वर्षाचे असतानाच प्रेमचंद यांच्या आईचे गंभीर आजारामुळे, निधन झाले. लहान वयातच आईच्या निधनामुळे, प्रेमचंद यांना बालपणापासूनच आई-वडिलांचे प्रेम प्राप्त झाले नाही. प्रेमचंद यांच्या वडिलांच्या सरकारी नोकरीमुळे प्रेमचंद व त्याचे वडील हे गोरखपूरला स्थलांतरित झाले. काही काळानंतर वडिलांनी दुसरे लग्न केले. सावत्र आईने प्रेमचंद यांना कधीच मनापासून माया दिली नाही.
Munshi Premchand
 • लहानपणापासूनच प्रेमचंद यांना हिंदी विषयामध्ये प्रचंड ओढ होती. त्यामुळे त्यांनी हिंदी विषयामध्ये अभ्यास करण्यास सुरुवात केली. छोट्या कादंबऱ्यापासून त्यांनी हिंदी विषयाला ओळख निर्माण करून देण्याची पाऊल उचलली. त्यांच्या आवडीनुसार ते छोट्या कादंबऱ्या वाचत असत, वाचनाची आवड असल्याकारणाने, त्यांनी पुस्तकांच्या घाऊक विक्रेत्याकडे काम करायला सुद्धा सुरुवात केली, जेणेकरून त्यांचा संपूर्ण दिवस पुस्तक वाचण्यात जाईल.
 • मुंशी हे अतिशय साधे व निरागस स्वभावाचे होते. त्यांनी कधीही कोणाशीच विनाकारण वाद घातला नाही. इतरांच्या मदतीसाठी ते नेहमी हजर असायचे. देवावर त्यांची प्रचंड श्रद्धा होती. घरामध्ये आर्थिक परिस्थिती ही बिकट असल्याकारणाने, सुरुवातीला वकिलांची महिना पाच रुपये पगारावर मुंशी प्रेमचंद यांनी नोकरी केली. हळूहळू प्रेमचंद यांनी प्रत्येक विषयामध्ये प्राविण्यता प्राप्त केली. त्याचा त्यांना फायदा झाला की, भविष्यामध्ये त्यांना चांगली नोकरी प्राप्त झाली व मिशनरी शाळेचे प्राचार्य म्हणून मुंशी प्रेमचंद यांची नियुक्ती करण्यात आली. प्रत्येक प्रकारचा संघर्ष प्रेमचंद यांनी हसत हसत स्वीकारला.

मुंशी प्रेमचंद यांचे शिक्षण

 • वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी प्रेमचंद यांनी त्यांचे प्राथमिक शालेय शिक्षण त्यांच्या मूळ गावी बनारस येथील लम्ही या ठिकाणी एका लहानशा मदरशातून पूर्ण केले. मदरशात राहून त्यांनी हिंदीसह उर्दू व इंग्रजी भाषेचे ज्ञान सुद्धा ग्रहण केले. हे करतेवेळी, त्यांनी हळूहळू स्वतःच्या बळावर स्वतःचे शिक्षण सुरू करण्यास सुरुवात केली. पुढील पदवीच्या अभ्यासासाठी, बनारस येथील महाविद्यालयामध्ये त्यांनी दाखला घेतला.
 • परंतु घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याकारणाने, प्रेमचंद यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागले. कसेबसे त्यांनी मोठ्या कष्टाने मॅट्रिक परीक्षा पास केली. १८९१ मध्ये मुंशी प्रेमचंद हे पुन्हा बी.ए ची पदवी प्राप्त करण्यासाठी अभ्यास करू लागले व ते बी.ए उत्तीर्ण झाले.

मुंशी प्रेमचंद यांचा विवाह

 • प्रेमचंद बालपणापासूनच आर्थिक परिस्थितीचा सामना करत होते. कुटुंबाकडून प्रेमचंद यांचे कधीही लाड केले गेले नाही किंवा त्यांचा कोणताही हट्ट आर्थिक परिस्थितीच्या कारणामुळे पुरवला गेला नाही. जुन्या चालीरीती व वडिलांच्या दबावामुळे मुंशी प्रेमचंद यांनी अगदी लहान वयामध्ये म्हणजे वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी लग्न केले.
 • प्रेमचंदजींचा विवाह त्यांच्या संमतीशिवाय व त्यांना न विचारता अतिशय भांडखोर व रागीट स्वभावाच्या मुलीशी करून देण्यात आला. ही मुलगी श्रीमंत घरातील असल्याकारणाने, वडिलांनी कुठलाही मागचा पुढचा विचार न करता प्रेमचंद यांचा विवाह तिच्याशी लावून दिला.
 • मुंशीजींच्या लग्नानंतर काही दिवसांनीच वडिलांचा सुद्धा मृत्यू झाला. वडिलांच्या मृत्यूनंतर प्रेमचंदवर संपूर्ण कुटुंबांचा भार पडला. एक वेळ अशी आली होती की, काम करूनही घरच्या गरजा व घर चालवण्यासाठी आवश्यक पैसा प्रेमचंद कमवू शकत नव्हते, त्यामुळे त्यांना त्यांची मौल्यवान मालमत्ता विकावी लागली.
 • अगदी लहान वयात आयुष्यामध्ये अनेक संघर्ष पाहून, प्रेमचंद न डगमगता पुढे चालतच राहिले. त्यानंतर पुढे मुंशी प्रेमचंद यांच्या पहिल्या पत्नीशी त्यांचे संबंध काही चांगले जमले नाही. त्यामुळे त्यांनी तिच्याशी घटस्फोट घेतला व काही काळ लोटल्यानंतर, वयाच्या २५ व्या वर्षी एका विधवा स्त्रीशी मुंशी प्रेमचंद यांनी स्वतःच्या आवडीने दुसरे लग्न केले. प्रेमचंदजिनी जिच्याशी दुसरे लग्न केले, हे लग्न यशस्वी झाले.

मुंशी प्रेमचंद यांची कार्यशैली

 • मुंशी प्रेमचंद हे बालपणापासूनच अतिशय हुशार व कुशाग्र बुद्धीचे होते. त्यांनी अनेक संकटांना धारिष्टपणे सामोरे जाऊन, शेवटच्या क्षणापर्यंत संकटांना सामोरे जात न डगमगता तोंड दिले. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी देशाच्या हितासाठी काही ना काही कार्य केले. त्यांचे हिंदी साहित्य, कादंबऱ्या व नाटक सुद्धा प्रसिद्ध आहे. त्यांनी हिंदीमध्येच नव्हे, तर उर्दूमध्ये सुद्धा योगदान दिले आहे.
 • बनारस मधील त्यांचे मूळ गाव लम्ही सोडल्यानंतर वडिलांच्या सरकारी नोकरीमुळे, त्यांना कानपूरमध्ये स्थलांतरित व्हावे लागले. त्या ठिकाणी ते चार वर्ष राहिलेत. त्या ठिकाणी राहून मुंशी प्रेमचंद यांची एका मासिकाच्या संपादकाशी भेट झाली व त्यांनी त्यांचे अनेक लेख व कथा प्रकाशित केल्या. त्यादरम्यान मुंशी प्रेमचंद यांनी स्वातंत्र्य चळवळीसाठी आणि कवितासुद्धा लिहिल्या.
 • काही काळाने प्रेमचंद यांच्या कविता, लेखक, कथा, इत्यादी. लोकांमध्ये लोकप्रिय होऊ लागल्या. त्यामुळे त्यांची यशाकडे वाटचाल सुरू झाली. यानंतर मुंशी प्रेमचंद गोरखपूरला आले. येथेही एका मागोमाग एक त्यांच्या साहित्याचे प्रकाशन होत राहिले. त्यादरम्यान मुंशी प्रेमचंद यांची महात्मा गांधींची भेट झाली व महात्मा गांधींच्या आंदोलनामध्ये प्रेमचंद यांनी सक्रियरित्या सहभाग दर्शवला. त्यांच्या काही कादंबऱ्या हिंदी तर काही उर्दूमध्ये प्रकाशित करण्यात आल्या.
 • १९२१ मध्ये त्यांच्या मुंशी प्रेमचंद यांनी स्वतःच्या पत्नीशी, व्यक्तिगत मत घेऊन बनारसला येऊन सरकारी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला व स्वतःच्या आवडीनुसार त्यांनी लेखनावर जास्त भर दिला. काही काळानंतर त्यांच्या लेखनाच्या आवडीमध्ये काळानुसार नवा बदल घडून आणण्यासाठी, त्यांनी चित्रपट सृष्टीमध्ये नशीब आजमावण्याचा आग्रह धरला व त्यांनी मुंबई गाठली.
 • काही चित्रपटांच्या स्क्रिप्ट सुद्धा प्रेमचंद यांनी लिहिल्या. परंतु नशिबाने त्यांना चित्रपटसृष्टीमध्ये साथ दिली नाही. त्यामुळे मुंशी प्रेमचंद यांना प्रचंड नुकसानीचा सामना करावा लागला. शेवटी मुंशी प्रेमचंद यांनी मन बदलून, मुंबई सोडण्याचा निर्णय घेतला व पुन्हा बनारसला आले. अशाप्रकारे त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत जीवनात सर्वतोपरी प्रयत्न केले.
मुंशी प्रेमचंद

मुंशी प्रेमचंद यांचा मृत्यू

प्रेमचंद यांनी शेवटच्या श्वासापर्यंत संघर्ष केला. त्यांनी हिंदी साहित्यामध्ये अमुलाग्र योगदान दिले. अशा महान लेखकाचा दि. ०८ ऑक्टोंबर १९३६ मध्ये मृत्यू झाला.

मुंशी प्रेमचंदजींच्या महत्वाच्या साहित्य निर्मितीची नावे

प्रेमचंद यांनी हिंदी साहित्यामध्ये महत्त्वाचे काम केले. कथा, कादंबरी, नाटक, इत्यादी. कलाकृती प्रेमचंद यांनी स्वतः लिहिल्या. ज्या आपण बालपणापासून हिंदीत वाचत आलेलो आहे. तसेच त्यांच्या अनेक कादंबऱ्या, कविता, कथा, हिंदी लेख, नाटक, इत्यादी. लोकप्रिय आहेत. मुंशी प्रेमचंद यांची गबाण, कफन, गोदान, इत्यादी. असंख्य कलाकृती प्रसिध्द आहे.

मुंशी प्रेमचंद यांचे साहित्यिक लेखन

 • १९०७ पासून प्रेमचंद यांनी उर्दूमध्ये लेखन करण्यास सुरुवात केली.
 • “संसार का अनमोल रत्न” ही मुंशी प्रेमचंद यांची पहिली उर्दू कथा आहे. जी १९०७ मध्ये प्रकाशित झाली.

मुंशी प्रेमचंद यांच्या प्रमुख कथा कादंबरी लेखन

कथासंग्रह  

 • मानसरोवर ( आठखंड) तीनशे पेक्षा जास्त कथा लेखन
 • ‘समरयात्रा’
 • नवनिधि’
 • प्रेम-प्रतिमा’
 • ‘प्रेम-पचीसी’
 • ‘प्रेमपूर्णिमा’
 • ‘सप्‍त सरोज’
 • ‘प्रेम-द्वादशी’
 • प्रेमचंदजींची लोकप्रिय कथा

लेख संग्रह

 • कुछ विचार

नाटक  

 • संग्राम – १९२३,
 • प्रेम की वेदी – १९३३
 • कर्बला – १९२४

अनुवाद

प्रेमचंद एक यशस्वी अनुवादकसुद्धा होते. दुसऱ्या भाषांच्या ज्या लेखकांनी त्यांना प्रभावित केले त्यांच्या कृतींचा त्यांनी पुढे जाऊन अनुवादपण केला. टॉलस्‍टॉयच्या कथा (१९२३), गाल्‍सवर्दीच्या हड़ताल (१९३०), चॉंदी की डिबिया (१९३१) आणि न्‍याय (१९३१) या नावांनी अनुवाद केले.

त्यांनी रतननाथ सरशार यांची उर्दू कादंबरी ‘फसान-ए-आजाद’चा हिंदी अनुवाद ‘आजाद’ नावाने केला. हा अनुवाद खूप गाजला. सुखदास, सृष्टि का आरम्भ, पिता के पत्र पुत्री के नाम, अहंकार यासारख्या साहित्याचा अनुवाद केला.

लेख/निबंध

 • हिंदी-उर्दू की एकता
 • कहानी कला (तीन भाग)
 • अमृतराय द्वारा संपादित ‘प्रेमचंद : विविध प्रसंग’ (तीन भाग). वास्‍तविक पाहता हे प्रेमचंदांच्या लेखांचे संकलन आहे. प्रेमचंदा़चे लेख ‘कुछ विचार’ या शीर्षकाखालीही छापले आहेत.
 • उपन्‍यास
 • जीवन में साहित्‍य का स्‍थान
 • स्वराज के फायदे
 • पुराना जमाना नया जमाना
 • कुछ विचार
 • साहित्‍य का उद्देश्‍य
 • महाजनी सभ्‍यता

प्रमुख कादंबरी

 • सेवा सदन – १९१८
 • कर्मभूमि १९३२
 • रंगभूमि (१९२५)
 • कायाकल्प – १९२६
 • निर्मला (१९२५)
 • प्रेमाश्रम  – १९२२
 • गोदान
 • ‘हमखुर्मा व हमसवाब’. हिचे हिंदी रूपांतरण ‘प्रेमा’ नावाने १९०७ मध्ये

प्रेमचंद आणि सिनेमा

 • हिंदी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय लेखकांपैकी एक म्हणून प्रेमचंद यांचे नाव घेतले जाते. त्यांच्या मृत्यूनंतर दोन वर्षांनी सुब्रमण्यम यांनी 1938 मध्ये सेवा सदन या त्यांच्या कादंबरीवर आधारित चित्रपट बनवला होता. यामध्ये सुब्बू लक्ष्मी यांनी प्रमुख भूमिका केली.
 • प्रेमचंद यांच्या काही कथांवर इतर चित्रपट देखील बनवले गेले. सत्यजित रे यांचा शतरंज के खिलाडी.
 • प्रेमचंद यांनी मजदूर या चित्रपटासाठी संवाद लिहिले.
 • मजदूर या चित्रपटात एका देशभक्त प्रेमी गिरणी मालकाची कथा होती. हा चित्रपट पंजाब, दिल्ली, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश मध्ये प्रदर्शित करण्यात आला.
 • या चित्रपटामुळे कामगारांवर इतका परिणाम झाला की, त्यासाठी पोलिसांना पाचरण करावे लागले. त्यानंतर भारत सरकारने या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घातली.
 • या चित्रपटात प्रेमचंद यांनी छोटीशी भूमिका पार पाडली.

मुंशी प्रेमचंद प्रसिद्ध कथा

 • ‘ठाकुर का कुऑं’
 • ‘पूस की रात’
 • ईदगाह
 • ‘दूध का दाम’
 • ‘गुल्‍ली डंडा’
 • ‘सद्गति’
 • दो बैलो कि कहाणी
 • ‘मंत्र’
 • रामलीला
 • पंच परमेश्‍वर’
 • बडा भाई
 • ‘बूढ़ी काकी’
 • नशा
 • ‘विध्‍वंस’
 • ‘तावान’

प्रेमचंद यांच्या सन्मानार्थ पुरस्कार

 • मुन्शी प्रेमचंद यांच्या स्मरणार्थ भारतीय टपाल विभागाने 31 जुलै 1980 रोजी त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त 30 पैशांचे टपाल तिकीट प्रसारित केले.
 • ज्या शाळेमध्ये प्रेमचंद शिक्षक होते, म्हणजेच गोरखपूर या ठिकाणी प्रेमचंद साहित्य संस्थेची स्थापना करण्यात आली आहे.
 • प्रेमचंद यांच्या पत्नी शिवराणी देवी यांनी “प्रेमचंद घर मे” या नावाने त्यांचे चरित्र लिहिले आहे.
 • त्यांचा मुलगा अमृतराय याने आपल्या वडिलांचे चरित्र “कलाम का शिपाई” या नावाने लिहिले आहे.
 • त्यांनी लिहिलेल्या सर्व पुस्तकांच्या उर्दू आणि इंग्रजीत आवृत्ती प्रकाशित झाल्या नसून, त्यांच्या कथा चिनी, रशियन यासारख्या परदेशी भाषांमध्ये देखील लोकप्रिय झाल्या.

मुंशी प्रेमचंद यांचे प्रेरणादायी विचार

MUNSHI PREMCHAND THOUGHTS
 • आशा उत्साह की जननी है |आशा मे तेज है, बल है, जीवन है, आशा ही संसार की संचालक शक्ती है |
 • आत्मसन्मान की रक्षा हमारा सबसे पहला धर्म और अधिकार है |
 • आकाश मे उडने वाले पंछी को भी अपना घर याद होता है|
 • निराशा संभव को असंभव बना देती है |
 • कुल की प्रतिष्ठा भी सद व्यवहार और विनम्रता से होती है | हेकडी और रौब दिखाने से नही  |
 • सोने और खाने का नाम जिंदगी नही है, आगे बढते रहने की लगन का नाम ही जिंदगी है |
 • स्वार्थ मे मनुष्य बावला हो जाता है
MUNSHI PREMCHAND THOUGHTS
 • प्रेम एक बीज है | जो एक बार जमकर फिर बडी मुश्किल से उखडता है |
 • क्रोध मौन सहन नही कर सकता है मौन के आगे क्रोध कि शक्ती असफल हो जाती है |
 • गलती करना उतना गलत नही, जितना उसे दोहराना है |
 • अधिकार मे स्वयं एक आनंद है, जो उपयोगिता की परवा नही करता |
 • वास्तविक सुख दुसरो को सुख देने मे है, उनका सुख छिनने मे नही |
 • विपत्ती से बढकर अनुभव सिखाने वाला कोई विद्यालय आज तक नही खुला |
 • सिर्फ उसी को अपनी संपत्ती समझो, जिसे तुमने मेहनत से कमाया है|
MUNSHI PREMCHAND THOUGHTS
 • अन्याय का सहयोग देना, अन्याय करने के समान है |
 • आत्मसन्मान की रक्षा करना हमारा सबसे पहला धर्म है |
 • क्रोध से मनुष्य अपने मन की बात नही कहता, वह केवल दुसरो का दिल दुखाना चाहता है |
 • ध्यान खोकर यदि हम अपनी आत्मा को पा सके, तो कोई महंगा सौदा नहीं हैं |
 • आदमी का सबसे बडा शत्रू उसका अहंकार है |
 • दौलत मन आदमी को जो सन्मान मिलता है | वह उसका नही उसकी दौलत का सन्मान है |
 • न्याय और नीती सब लक्ष्मी के ही खिलोने है | इन्हे वह जैसे चाहती है नचाती है |
 • संतान वह सबसे कठीण परीक्षा है, जो ईश्वर ने मनुष्य को परखने के लिए गढी है |
 • आलोचना और दुसरो की बुराई या करने मे बहुत फरक है | आलोचना करीब लाती है, और बुराई दूर करती है |
 • कार्य कुशल व्यक्ति की सभी जगह जरुरत पडती है |
 • विलासिओ द्वारा देश का उद्धार नही हो सकता | उसके लिए सच्चा त्यागी होना पडेगा |
 • घर सेवा की सीडी का पहला दंडा है | इसे छोडकर तुम ऊपर नही जा सकते |

मुन्शी प्रेमचंद यांच्या जीवनातील रंजक कथा

मुन्शी प्रेमचंद यांच्या कार्याबद्दल बरेच लिहिले गेले आहे. परंतु त्यांच्या जीवनातील अशा काही मनोरंजक गोष्टी त्यांच्या पत्नी शिवरायांनी देवी यांनी त्यांच्या “प्रेमचंद घर मे” या पुस्तकात सांगितल्या आहेत.

हिंदू सभेचे लोक संतप्त झाले

मुंशी प्रेमचंद यांनी एक लेख लिहिला होता. त्या लेखावर हिंदू सभेचे लोक संतप्त झाले होते. यावर त्यांच्या पत्नी शिवराणी देवी यांनी त्यांना विचारले की, तुम्ही असे का लिहिता? की, तुमच्या लेखनावर लोक चिडतात आणि तुमचे शत्रू होतात.

त्यावर ते म्हणाले की, जनता आणि सरकार लेखकाला गुलाम मानतात. सर्वांच्या इच्छेने लिहायला गेले, तर तो लेखक कसा काय होऊ शकतो? आणि आपल्या मर्जीने लिहायला गेले, तर सरकार तुरुंगात टाकते, जीवे मारण्याच्या धमक्या देते. यामुळे लेखकाने घाबरून लिहायचे थांबवावे का? असे उत्तर दिले.

एका मुलाचे कान कापले

मुंशी प्रेमचंद शेजारच्या काही मुलांसोबत लहानपणी न्हावी – न्हावी असा खेळ खेळत होते. या खेळामध्ये मुंशी प्रेमचंद हे न्हावी बनले होते. आणि मुलांचे केस कापण्याची स्टाईल करत होते. अशी स्टाईल करत असताना चुकून एका मुलाचा कान त्यांच्याकडून कापला गेला होता.

अंधश्रद्धेच्या विरोधात लढा

ज्यावेळी काही विषयांवर देवाचे नाव घेतले जायचे, त्यावेळी ते म्हणायचे की, देव हे मनाचे भूत आहे. हे स्वावलंबी माणसाचे जग आहे. अंधश्रद्धेला बळी पडून आपली बुद्धी नष्ट होते. यावर त्यांच्या पत्नी म्हणायच्या की, गांधीजी रात्रंदिवस देवाचा जयघोष करत असतात ते कसे?

यावर प्रेमचंद म्हणायचे की, ते एक फक्त प्रतीक आहे. जनता अजूनही जागृत झालेली नाही. हे गांधीजींना माहित आहे. त्यामुळे लोक,शतकानूशतके देवावर विश्वास ठेवत आहेत. आणि अचानक आपले विचार ते बदलू शकत नाही किंवा अचानक देवापासून त्यांना वेगळे देखील करू शकत नाही.

ज्यावेळी पोलीस अधिकाऱ्याला राग आला

मुंशी प्रेमचंद हे शिक्षण विभागाचे उपनिरीक्षक होते. एक दिवस एक इन्स्पेक्टर शाळेची पाहणी करायला आले होते. प्रेमचंद यांनी त्यांना शाळा दाखवली. दुसऱ्या दिवशी प्रेमचंद शाळेत न जाता घरी वर्तमानपत्र वाचत बसले होते. त्याचवेळी इन्स्पेक्टरची गाडी त्यांच्यासमोरून गेली. इन्स्पेक्टरची अशी अपेक्षा होती की, प्रेमचंद आपल्या खुर्चीवरून उठून त्यांना नमस्कार करतील, परंतु ते खुर्चीवरून हलले नाहीत.

यामुळे इन्स्पेक्टर नाराज झाले. आणि त्यांनी प्रेमचंद यांना बोलावण्यासाठी पाठवले. त्या इन्स्पेक्टरने अशी तक्रार केली की, ज्यावेळी एखादा अधिकारी तुमच्या दारातून जातो, तेव्हा तुम्ही त्यांना सलाम सुद्धा करत नाही. यावरून तुम्ही गर्विष्ठ असल्याचे दिसून येते. यावर प्रेमचंद म्हणाले की, मी शाळेत असताना सेवक असतो आणि ज्यावेळी मी घरी असतो, तेव्हा घरचा राजा असतो.

प्रेमचंद आणि दारू

माधुरी या कार्यालयाची काही पुस्तके मंडळाने मंजूर करावीत, यासाठी 1924 मध्ये प्रेमचंद प्रयाग या ठिकाणी बेदार साहेबांना भेटायला गेले होते. ते साहेब स्वतः मोठे दारुडे होते. ते स्वतः देखील प्यायला बसले आणि प्रेमचंद यांना देखील दारू पाजली. यामुळे त्यादिवशी घरी येण्यास प्रेमचंद यांना उशीर झाला.

दुसऱ्या दिवशी त्यांच्या पत्नीने त्यांना सांगितले की, पुन्हा दारूच्या नशेत घरी आलात, तर मी दरवाजा उघडणार नाही. त्यावेळी त्यांनी आपल्या पत्नीला आश्वासन दिले की, पुन्हा दारू पिणार नाही. परंतु दुसऱ्या वेळी देखील ते दारू पिऊन आले. त्यावेळी त्यांच्या पत्नीने दरवाजा उघडला नाही. त्यानंतर त्यांनी कधीही दारू प्यायली नाही.

मुंशी प्रेमचंद यांच्या प्रसिद्ध कविता

ख्वाहिशे

ख्वाहिश नहीं मुझे,
मशहूर होने की,
आप मुझे पहचानते हो,
बस इतना ही काफी है,
अच्छे ने अच्छा,
और बुरे ने बुरा जाना मुझे,
क्योंकि जिसको जितनी जरूरत थी,
उसने उतना ही पहचाना मुझे,
जिंदगी की फलसफा भी,
कितनी अजीब है,
श्यामे कटती नहीं,
और साल गुजरते चले जा रहे हैं,
एक अजीब सी,
दौड़ है ये ज़िंदगी,
जीत जाओ तो कई,
अपने पीछे छूट जाते हैं,
और हार जाओ तो,
अपने ही पीछे छोड़ जाते हैं,
बैठ जाता हूं,
मिट्टी पर अक्सर,
क्योंकि मुझे अपनी,
औकात अच्छी लगती है |

हिंदू और मुसलमान

मंदिर में दान खाकर,
चिड़िया मस्जिद में पानी पीती है,
सुनने में आता है राधा की चुनरीया,
कोई सलमा बेगम सीति है,
एक रफी साहब थे जो,
मैसेज रघुपति राघव राजा राम गाते थे,
और था एक प्रेमचंद जो बच्चों को,
ईदगाह सुनाता था,
कभी कन्हैया की लीला गाता,
रसखान सुनाई देता है,
बाकियों को दीखते होंगे हिंदू और मुसलमान,
मुझे तो हर जीव में भीतर एक भोला इंसान दीखता है |

कर्मभूमी

अब क्रांति में ही,
देश का उद्धार है,
ऐसी क्रांति,
जो सर्वव्यापक हो,
जो जीवन के,
मिथ्य आदर्शों का,
हूट सिद्धांतों और परीपाटियो का,
अनंत कर दे,
जो एक नए युग का प्रवतर्क हो,
एक नई सृष्टि खड़ी कर दें,
जो मनुष्य को,
धन और धर्म के,
आधार पर टिकने वाले,
राज्यों के पंजे से मुक्त कर दे|

जीवन का रहस्य

उंगलिया हर किसी पर ऐसे ना उठाया करो,
उड़ाने से पहले खुद पैसे कमाया करो,
जिंदगी का तातपर्य क्या है?
एक दिन खुद ही समझ जाओगे…
बारिशों में पतंगो को हवा लगवाया करो,
दोस्तों से मुलाकात पर,
हस्सी के ठहाके लगाया करो,
पुरे दिन मस्ती और,
घूमने के बाद, श्याम में तुम,
कुछ फकीरो को,
अन खिलाया करो…
अपने साथ जमीन को बांधकर ,
आसमानों का भी लूप उठाया करो,
आने मंजिल है बड़ी,
कही धुर हिअ खड़ी,
इसलिए ऐरे गेरे लोगो को,
मुंह मत लगाया करो |

मोहब्बत रूह कि गीजा है

मोहब्बत रूह की भूख है,
और सारी परेशानियां,
इस भूख के ना मिटने पर ही,
पैदा होती है,
एक कवी हमें,
मोह्हबत के हसीं पल,
और उसके परम आनंद का बता सकता है,
जो और भूख,
पैदा करता है,
और कवी के मीठे शब्दों से,
हमारी रूह जगमगा उठती है |

मुंशी प्रेमचंद यांच्या बद्दल काही मनोरंजक तथ्ये

 • मुंशी प्रेमचंद यांचा विवाह, वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी झाला.
 • प्रेमचंद जेव्हा सोळा वर्षाचे होते, तेव्हा १८९७ मध्ये प्रेमचंद यांचे वडील निधन पावले. त्यामुळे प्रेमचंद यांच्या खांद्यावर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आली.
 • मुंशी प्रेमचंद यांच्या कुटुंबामध्ये दोन सावत्र भाऊ, सावत्र आई व त्यांची पत्नी होती.
 • मुंशी प्रेमचंद यांनी शिक्षणाची आवड कधीच सोडली नाही, अतिशय कठीण प्रसंगांमध्ये सुद्धा ते शिकण्यासाठी पाच मैल दूर पायी चालत जात असत.
 • उदरनिर्वाहसाठी, मुंशी प्रेमचंद यांनी एका वकिलाच्या मुलाला पाच रुपये महिन्याचा पगारावर ट्युशन शिकवण्यास सुरुवात केली.
 • १९८८ मध्ये मुंशी प्रेमचंद्र यांनी बनारस येथील, क्वीन्स, कॉलेजमध्ये दाखला घेतला व ते द्वितीय श्रेणी मध्ये मॅट्रिक परीक्षा पास झाले.

मुंशी प्रेमचंद यांच्या बद्दल दहा ओळी

 • मुंशी प्रेमचंद हिंदी व उर्दू या भाषेतील सर्वात लोकप्रिय लेखक व कथाकार म्हणून ओळखले जातात.
 • मुंशी प्रेमचंद यांचे मूळ नाव धनपत राय श्रीवास्तव होते.
 • मुंशी प्रेमचंद यांचा जन्म दि. ३१ जुलै १८८० झाला
 • वाराणसी जिल्ह्यातील लम्ही या छोट्याशा गावामध्ये मुंशी प्रेमचंद यांचे बालपण गेले.
 • मुंशी प्रेमचंद यांच्या आईचे नाव आनंदी देवी व वडिलांचे नाव मुंशी अजायबराय होते.
 • सुरुवातीच्या काळात प्रेमचंद, “नवाब राय” या नावाने उर्दू भाषेमध्ये लेखन करत असत.
 • मुंशी प्रेमचंद यांची पहिली रचना ही प्रकाशित होऊ शकली नाही, जिच्याबद्दल मुंशी प्रेमचंद यांनी पहिली रचना नावाच्या एका लेखांमध्ये वर्णन केले आहे.
 • मुंशी प्रेमचंद यांनी जवळपास ३०० कथा लिहिल्या आहेत.
 • रंगभूमी या लेखनासाठी, मुंशी प्रेमचंद यांना मंगला प्रसाद पारितोषिक देऊन सन्मानित केले गेले.
 • दीर्घ आजारामुळे मुंशी प्रेमचंद यांचा दिनांक ०८ ऑक्टोबर १९३६ मध्ये मृत्यू झाला.

मुंशी प्रेमचंद यांच्याबद्दल व्हिडीओ

FAQ

प्रेमचंद का प्रसिद्ध आहेत?

ज्यांनी हिंदी विषयाचा चेहरा फार बदलून टाकला. काळानुसार बदलणारे व हिंदी साहित्याला आधुनिक रूप प्रदान करणारे, मुंशी प्रेमचंद हे एक प्रसिद्ध लेखक होते. मुंशी प्रेमचंद यांनी हिंदी भाषेतून, हिंदी साहित्य लोकांपर्यंत पोहोचवले. जे लोक कधीही विसरू शकत नाही. अत्यंत अवघड प्रसंगांना सामोरे जाऊन, मुंशी प्रेमचंद यांनी हिंदी सारख्या सुंदर विषयांमध्ये, स्वतःची छाप जगाच्या समोर उमटवली.

मुंशी प्रेमचंद यांचा जन्म कधी झाला ?

मुंशी प्रेमचंद यांचा जन्म दि. ३१ जुलै १८८० रोजी बनारस येथील लम्ही या एका छोट्याशा गावात झाला. प्रेमचंद हे एका गरीब व सामान्य कुटुंबामध्ये जन्मले.

मुंशी प्रेमचंद यांचा मृत्यू कधी झाला ?

मुंशी रामचंद यांनी शेवटच्या श्वासापर्यंत संघर्ष केला. त्यांनी हिंदी साहित्यामध्ये अमुलाग्र योगदान दिले. अशा महान लेखकाचा दि. ०८ ऑक्टोंबर १९३६ मध्ये मृत्यू झाला.

मुंशी प्रेमचंद यांच्या आईचे नाव काय होते ?

मुंशी प्रेमचंद यांच्या आईचे नाव आनंदी देवी असे होते.

प्रारंभिक काळात प्रेमचंद कोणत्या नावाने उर्दू मध्ये लेखन करत ?

सुरुवातीच्या काळात प्रेमचंद, “नवाब राय” या नावाने उर्दू भाषेमध्ये लेखन करत असत.

मुंशी प्रेमचंद यांचे मूळ नाव काय ?

मुंशी प्रेमचंद यांचे मूळ नाव धनपत राय श्रीवास्तव होते.

निष्कर्ष

मित्रहो, आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणस मुंशी प्रेमचंद यांच्या बद्दल माहिती दिली आहे, हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. हा लेख आवडल्यास तुम्ही तुमच्या इतर मित्रपरिवारांसोबत नक्की शेयर करा.

Leave a comment