गोपाळ गणेश आगरकर माहिती मराठी | Gopal Ganesh Agarkar Information In Marathi

गोपाळ गणेश आगरकर माहिती मराठी | Gopal Ganesh Agarkar Information In Marathi – भारत भूमीवर अधर्म, अनीती, अनाचाराचे काळे मेघ ज्या ज्या वेळी दाटून येतात, त्या त्या वेळी युगपुरुष जन्माला येतात आणि गीतेमधील हे वचन सार्थ ठरवतात. स्वातंत्र्यपूर्व काळात जेव्हा समाज, पारतंत्र्य आणि जाचक रूढी परंपरांच्या श्रृंखलात बद्ध होता, तेव्हा अनेक समाज धोरणांनी समाजाला या काचणाऱ्या बंधनातून मुक्त करण्यासाठी, आयुष्य वेचलं.

स्वांत सुखाय जगण्याचा विचारही न करता, देशासाठी जीवन समर्पित केलं. यातील सर्वात अग्रणी नाव होतं, “गोपाळ गणेश आगरकर”. हे महान समाज सुधारक, पत्रकार, शिक्षण तज्ञ, युगप्रवर्तक, होते. गोपाळ गणेश आगरकर यांनी अवघ्या ३९ वर्षांच्या अल्पायुषी जीवनात तत्कालीन कर्मठ समाज आणि अनिष्ट रूढी परंपरांविरुद्ध त्यांनी रणशिंग फुंकले. त्यांचा कठोर जीवनसंघर्ष, पुरोगामी आधुनिक समाजाची पायाभरणी करणारा ठरला.

आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास गोपाळ गणेश आगरकर या थोर समाजसुधारकाबद्दल माहिती दिली आहे, हि माहिती जाणून घेण्यासाठी खालील दिलेली माहिती सविस्तर वाचा.

Table of Contents

गोपाळ गणेश आगरकर माहिती मराठी | Gopal Ganesh Agarkar Information In Marathi

पूर्ण नाव गोपाळ गणेश आगरकर
जन्म तारीख १४ जुलै १८५६
जन्म स्थळ टेंभू, कऱ्हाड, सातारा
प्रसिद्धी समाज सुधारक, पत्रकार, शिक्षण तज्ञ, युगप्रवर्तक
आईचे नाव सरस्वती
वडिलांचे नाव गणेशपंत
पत्नीचे नाव यशोदाबाई
अपत्येयशवंत, माधव, व २ मुली
शिक्षण१८७५ मध्ये मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण.
१८७८ मध्ये बी.ए.ची परीक्षा उत्तीर्ण.
१८८० मध्ये त्यांनी एमएची पदवी पूर्ण केली.
पुस्तकेविकार विलिसट, डोंगरी कारागृहात १०१ दिवस
मृत्यू१७ जून १८९५

कोण होते गोपाळ गणेश आगरकर ?

अवघ्या ३९ वर्षांच्या आयुष्यात, गोपाळ गणेश आगरकरांनी संपूर्ण महाराष्ट्र ढवळून टाकला आणि येणाऱ्या प्रत्येक पिढ्यांना देखील त्यांनी त्यांच्या तळपत्या लेखणीने, विचार करायला भाग पाडलं. आज कालच्या कोणत्याही नेत्याचे भाषण घ्या, त्याची सुरुवात पुरोगामी महाराष्ट्र या दोन शब्दांपासूनच होते. आणि समाज सुधारक आणि विचारवंतांच्या, अथक प्रयत्नामुळे मराठी समाज हा प्रबोधनाच्या वाटेवर आला. त्यापैकी एक “गोपाळ गणेश आगरकर” होते.

Gopal Ganesh Agarkar Information In Marathi

ज्या समाजाच्या उद्धाराची तळमळ त्यांच्या प्रत्येक कृतीतच नाही तर, श्वासाश्वासात होती, त्या समाजाकडून काढण्यात आलेली प्रेतयात्रा त्यांना जिवंतपणीच पहावी लागली होती. त्यांनी आणि टिळकांनी मिळून न्यू इंग्लिश स्कूल शाळा काढली होती, टिळकांनी सुरू केलेल्या केसरीचे पहिले संपादक गोपाळ गणेश आगरकर करत होते.

पण टिळक म्हणायचे की, “आधी स्वातंत्र्य पाहिजे, सामाजिक सुधारणा नंतर करू”. पण आगरकर म्हणायचे, “आधी सुधारणा करू” मग त्यांनी केसरी सोडला आणि सुधारक काढलं. आगरकर हे फक्त समाज सुधारकच नव्हते तर, भारतात त्यावेळी निर्माण झालेल्या मोर्चा उदारमतवादी बुद्धीप्रमाणे, विचारवंतांपैकी एक होते.

गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म व प्रारंभिक जीवन

महाराष्ट्रातील सातारा जिल्हातील, कऱ्हाड तालुक्यातील टेंभू हे त्यांचं जन्मगाव. या चिमुकल्या गावातल्या एका कौलारू घरात, दि. १४ जुलै १८५६ रोजी गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म झाला. आणि या वास्तुत एका गौरवशाली युगपर्वाचा आरंभ झाला. आगरकरांच्या वडिलांचे नाव गणेशपंत आणि आईचे नाव सरस्वती.

घरची परिस्थिती अत्यंत बेताची होती. टेंभू या जन्मगावी शाळा नसल्यामुळे, आगरकरांना वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी घरापासून दूर राहून कऱ्हाडला शिक्षणासाठी राहावे लागले. गोपाळ रावांनी कऱ्हाड येथे अवघ्या बारा रुपये पगारावर, मुंसकाच्या कचेरीत उमेदवारी पत्करली. याच काळात एका निबंध स्पर्धेत अप्रतिम निबंध लिहून, बक्षीस देखील मिळवले.

गोपाळ गणेश आगरकर यांचे शिक्षण आणि संघर्ष

 • कऱ्हाडचे मुंसक नागपूरकर, यांनी या मुलाची तीक्ष्ण बुद्धी आणि शिक्षणाची आवड अचूक ओळखली. त्यांनी आगरकरांच्या हातात पाऊणशे रुपये ठेवले. सोळा वर्षाच्या या कणखर मुलाने, हे पैसे घेऊन दीडशे मैलाचा पायी प्रवास करत शिक्षणासाठी कऱ्हाड वरून रत्नागिरी गाठल.
 • मात्र रत्नागिरीत उच्चशिक्षित काकांच्या घरी, खूप कटू अनुभव आले. कदाचित त्यामुळेच पुढील काळात सामाजिक अन्यायाविरुद्ध, लिहिताना त्यांची लेखणी धारदार झाली असावी. गोपाळराव कऱ्हाडला परतले. तिथे त्यांनी एका दवाखान्यात कंपाउंडरची नोकरी केली. मात्र एकदा तिथे प्रेतांची चिरफाड पाहणे असह्य झाल्याने, त्यांनी तीही नोकरी सोडली आणि शिक्षणासाठी ते मामाच्या घरी अकोल्याला आले.
 • अकोल्याच्या शाळेत असताना एकदा त्यांना घर कामामुळे, शाळेत येण्यास उशीर झाला. तेव्हा शिक्षकांनी त्यांना विचारले, “तुमच्या हातून शाळेत वेळेवर येणे जमत नाही, तर बाकी काय जमणार तुम्हाला ? यावर गोपाळराव बाणीदारपणे उत्तरले, “आपल्यासारखा एम.ए होईल, तरच नावाचा आगरकर”.
 • १८७५ साली गोपाळराव मॅट्रिक उतीर्ण झाले. आता एम.ए होण्याची प्रतिज्ञा पूर्ण करायची, तर पुण्याला कॉलेजला दाखल होणे, क्रमप्राप्त होते. पण पैशांची सोय कशी करायची, परंतु त्यांचा ठाम निग्रह पाहून, त्यांच्या शिक्षकांनी साठ रुपये वर्गणी जमवली, ती रक्कम घेऊन त्यांनी पुण्याला कॉलेजात प्रवेश मिळाला. आता एक प्रश्न होता, कॉलेजची फी आणि राहणे यासाठी दरमहा २५ रुपये खर्चाची तडजोड कशी करायची ? बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी हा प्रश्न सहज सोडवला.
 • “वऱ्हाड समाचार” या वृत्तपत्रात लेख लिहून, त्यांना दरमहा पाच रुपये मिळू लागले. निबंध स्पर्धांमधून बक्षीस मिळवून, रंगमंचासाठी नाटके लिहून, ते खर्चाची तरतूद करत. शिवाय त्यांनी “ज्युनिअर स्कॉलरशिप” सुद्धा मिळवली. तरीसुद्धा एकच सदरा रातोरात वाळवून, घालण्यात काटकसरीच जीवन त्यांना जगावं लागत होतं.
 • परिणामी, तरुण वयात त्यांची प्रकृती खालावू लागली. त्यांना दम्याचा विकार सुरु झाला. १८७८ मध्ये आगरकरांनी तत्त्वज्ञान आणि इतिहास हे विषय घेतले होते. यासाठी त्यांनी ग्रंथसंपदेचा अभ्यास केला.

गोपाळ गणेश आगरकर वैयक्तिक जीवन

१८७७ मध्ये गोपाळ गणेश आगरकरयांचे यशोदाबाई यांच्या सोबत लग्न झाले. त्यांना यशवंत, माधव, व २ मुली एवढी अपत्ये होती.

गोपाळ गणेश आगरकर

गोपाळ गणेश आगरकर यांची समाजसेवा

 • ग्रंथसंपदेच्या विचारांनी ते प्रभावित झाले. कॉलेजच्या काळात त्यांनी हिंदुस्तानचा इतिहास बारकाईने वाचला होता. त्यामुळे त्यांना देशाच्या अवंतीची कारणे जाणवत होती. त्यावर त्यांचे विचार मंथन चालू होते.
 • पदवी प्राप्त झाली, आता आपला मोठा मुलगा पगारदार होईल, आणि आपली विपन्नावस्था संपेल, अशी आशा त्यांच्या आईला वाटू लागली. आगरकरांनी त्यांना एका पत्रातून स्पष्टपणे कळवले, “आई, मी स्पष्ट सांगतो की, मी विशेष संपत्तीची हाव न करता, फक्त पोटापुरता पैसा कमवेन आणि सर्व वेळ समाजहितासाठीच खर्च करेन.”
 • आगरकरांच्या हाती असलेलं लेखणीच अस्त्र वापरून त्यांनी हिंदू धर्मातील अनिष्ट रीतीवर प्रहार करण्यास त्यांनी सुरुवात केली. समाजात अज्ञान, दारिद्र्य, विषमता, यांचे प्रमाण किती भयावह आहे, याची एव्हाना त्यांना पूर्ण कल्पना आली होती. म्हणूनच, देशहितार्थ आयुष्य वेचण्याचा त्यांनी पण घेतला.

गोपाळ गणेश आगरकर व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक

कॉलेजच्या काळातच आगरकरांना बाळ गंगाधर टिळकांसारखा मित्र मिळाला. दोघांच्या मनातली देश प्रेमाची तळमळ हा मैत्रीचा समान धागा होता. शिक्षण प्रसाराशिवाय आपल्या देशाला उर्जितावस्था येणार नाही, यावर उभयतांचे एक मत होते.

गोपाळ गणेश आगरकर व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक

न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना

स्वदेश छात्रतेजाचे आणि राष्ट्रवादीचे शिक्षण देणारी, शिक्षण संस्था काढण्याचे, “विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी” निश्चित केले. त्यामुळे टिळक व आगरकरांना शिक्षण क्षेत्राचा मार्ग सापडला. तिघांच्या उत्कट ऊर्जेतून, दि.०१ जानेवारी १८८० रोजी पुण्यात मोरोबा दादांच्या वाड्यात, “न्यू इंग्लिश स्कूलची” स्थापना झाली. पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूल मधील इतिहास विषयाचे अध्यापक योगेश पाटील सांगतात, आगरकर व टिळक या दोघांच्या मनामध्ये विचार चाललेला होता.

देशासाठी आपल्या काहीतरी केलं पाहिजे, देशाला घडवण्यासाठी, वाढवण्यासाठी, आपल्या काहीतरी घडवलं पाहिजे. आणि या प्रयत्नांमध्ये असतानाच, त्यांच्या एक महत्त्वाची गोष्ट निदर्शनात आली ती म्हणजेच शिक्षणामुळे देश बदलू शकतो.

आगरकरांनी “केसरी”, “मराठा”, सारख्या वृत्तपत्रातून सामाजिक, राजकीय आणि आर्थिक क्षेत्रातील नवे आधुनिक विचार महाराष्ट्रातील वाचकांसमोर ठेवले आणि वाचकांना सुधारणा संमुख केले.

आगरकरांचे “सुधारक” वृतपत्र

आगरकरांनी सुधारक वृत्तपत्रातून आपले विचार मुक्तपणे मांडू लागले. त्यातील एका लेखात ते म्हणतात, “दुष्ट आचारांचे, निर्मूलन सदाचाराचा प्रसार, ज्ञानवृद्धी, सत्य संशोधन आणि भूतदयेचा विचार इत्यादी. सुखाची वृद्धी करणाऱ्या गोष्टिंचा विचार केल्या खेरीज होत नाही. वैचारिक वाद हे समाजाच्या जिवंतपणाचे लक्षण आहे. १८८८ मध्ये “सुधारक” वृत्तपत्रातून आगरकरांनी वेळोवेळी स्त्रियांचे केशवपन, बालविवाहाची अनिष्ट प्रथा, घटस्फोटाची स्त्रियांना मुभा, अशा विषयांवर आपले बंडखोर विचार मांडले. हळूहळू हे विचार तत्कालीन समाजाच्या समोर मांडले गेले.

टिळक आगरकर वाद

 • गोपाळ गणेश आगरकर यांनी संपूर्ण आयुष्य समाजकार्यासाठी खर्च केले. टिळक आणि आगरकर यांच्यामध्ये वैचारिक मतभेद झाले आणि आगरकरांनी “केसरी” वृत्तपत्राचा राजीनामा दिला. तर मुंबई प्रांताचे कौन्सिल मन बहिराम मलबारी यांनी १८८४ मध्ये हे बिल मांडलं होतं व १८९१ ला हे बिल मंजूर झालं. मुलींच्या लग्नाचे वय वाढवून, बारा करावं, अशी तरतूद या बिलात होती. या बिलाला सनातनी आणि रुढीवादी लोकांनी तीव्र विरोध केला होता. लोकमान्य टिळक या बिलाच्या विरोधात होते, तर आगरकर या बिलाच्या बाजूने होते. आगरकर म्हणाले होते, “जर असं कोणी म्हणत असेल की, सामाजिक सुधारणा या आमच्या आम्ही करू, ब्रिटिशांच्या राज्यात नको, तर त्या लोकांनी हे दाखवून द्यावे की, आतापर्यंत त्यांनी कोणत्या सुधारणा घडवून आणल्या.
 • लोकमान्यची आणि आगरकरांची ध्येय एकच असल्याने दोघे एकत्र आले. आगरकर अतिशय म्हणजे जहाल सुधारक. त्या उलट केसरीचे बाकीचे सभासद. त्यामुळे केसरीसाठी लिहिताना, आगरकरांची जराशी कुचंबणा होत असे. तरीही सगळे जण उत्साहाने काम करत. पण होळकरांच्या एका निरोपामुळे, दोघेही अतिशय दुरावले.
 • ते असं –  इंदूरचे महाराज श्रीमंत शिवाजी महाराज होळकर, हे लोकहितासाठी, मराठीच्या उन्नतीसाठी, झटणाऱ्या संस्थांना आणि व्यक्तींना वेळोवेळी सहाय्यक करत असे. इसवी सन १८८८ च्या डिसेंबर मध्ये, त्यांनी स्थानिक वृत्तपत्रांचे संपादक आणि सार्वजनिक कार्यकर्ते, यांची दरबारी प्रथेनुसार शेलापागोटे देऊन सत्कार समारंभ घडवून आणला. तर टिळक आगरकरांनाही आमंत्रण होते, त्या दिवशी दोघे गेले नाहीत. म्हणून दुसऱ्या दिवशी आपल्या कार्यकत्याला पाठवून त्या दोघांना बंगल्यावर बोलावलं, त्याप्रमाणे हे दोघे गेले.
 • महाराजांनी दोघांना शेलापागोटे देऊन सत्कार केला आणि सातशे रुपये  दिले. लोकमान्य यांना ते पैसे दोघांच्यातच वाटून घेणे, प्रशस्त वाटलं नाही म्हणून ते पैसे डेक्कन एज्युकेशनच्या सर्व सभासदांमध्ये वाटण्याची महाराजांची अनुमती मागितली. महाराजांनी त्यास संमती पण दिली. पण दुसऱ्या दिवशी सकाळीच त्यांनी आपला विचार बदलला. आगरकरांना त्या रकमेपैकी चारशे रुपये द्यावेत आणि बाकी तीनशे रुपये सर्व सभासदांमध्ये वाटून घ्यावेत, असा निरोप पाठवाला. आगरकर वादाच हे मूळ बीज त्यातून, कटूतेचा वृक्ष फोफावला. जन्माचा दुरावा आला. या सर्वाचा परिणाम म्हणजे, सोसायटीच्या सर्व सभासदांमध्ये वादंग वाजला आणि लोकमान्यांना सोसायटी सोडावी लागली.
 • हा निरोप गेल्याबरोबर, लोकमान्यांनी पत्र लिहिलं आणि विचारलं की, तुम्ही सातशे रुपये शैक्षणिक कार्यासाठी आणि सभासदांनी त्यासाठी केलेल्या त्यागासाठी दिले आहेत, असे म्हटले होते. म्हणून मी ते आमच्या सर्व सभासदांमध्ये वाटून घेतले, त्यासाठी आता पुढे काय करावं ते आम्हाला कळवा. त्या पत्राची दुसरी कॉपी त्यांनी आगरकरांना लिहिली, आणि त्यांची त्यावर अनुमती मागितली. त्यावर आगरकरांनी लोकमान्य खरमरीत पत्र लिहिलं आणि त्यात आणखी ज्या घटना घडल्या होत्या, त्यांचा त्यात उल्लेख केला.
 • ती घटना म्हणजे होळकर महाराजांच्या बंगल्यावर, सकाळी जाऊन आल्यावर आगरकरांना कळलं की, महाराजांकडून एक माणूस आला होता आणि पुण्यातल्या सर्व लेखकांची नावे त्यांनी मागितली. विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या लेखकांची पुस्तकं वाटावीत, असा महाराजांचं मानस होता. मग आगरकरांनी गुप्त्यांना एक चिठ्ठी पाठवून, स्वतःची वाक्य मीमांसा आणि विकार विलिसट ही दोन पुस्तकं घ्याल का? अशी विचारणा केली.
 • तुमच्या पाचशे प्रति घ्यायला, महाराज उत्सुक आहेत असं गुप्तांचा निरोप आला. तेव्हा आगरकरांनी त्या प्रति महाराजांकडे पाठवल्या. त्या दोन्ही पुस्तकांचे बिल चारशे रुपये झालं होतं, म्हणून महाराजांनी टिळकांना चारशे रुपये आगरकरांना द्यावेत असे कळवलं होतं. हा व्यवहार लोकमान्य यांना माहीत नसल्यामुळे, लोकमान्य सातशे रुपये सर्वांमध्ये वाटून घेण्याचे ठरले आणि महाराजांचा त्याबद्दल सल्ला मागितला.
 • आगरकर त्यामुळे खवळले आणि त्यांनी अत्यंत गोचरं पत्र लोकमान्य यांना लिहिलं – त्यात त्यांनी लिहीले, “तुम्हाला तुमच्या पुढे कोणी गेलेले आवडत नाही, तुम्हीच महाराजांना चारशे रुपये वेगळे द्यायची चिठ्ठी लिहायला हवी होती, मला हे चारशे रुपये जन्मभर होणार नाहीत, हे चांगलं माहित आहे. पण मी तुमच्यासारखा श्रीमंत नाही. मला त्या पैशातून माझ्या आई-वडिलांना काशी यात्रा घडवायची होती, तुम्हाला उत्तम आरोग्य लाभले, पण मला नाही. मला पैसे मिळू नयेत अशीच तुमची इच्छा असलेली मला दिसते आहे. अशा कडवट मजकूराचे पत्र लिहिलं आणि हे माझं तुम्हाला लिहिलेले शेवटचे पत्र असेल, हेही जाहीर करून पत्र संपवल. या भांडणातही त्यांचे तरुणपणीचे दिवस आणि त्याच्या आठवणी सुक्तपणे दडलेल्या होत्या. त्या दोघांची शाळेत शिकवण्याची पद्धत अगदी वेगळी होती, आगरकरांनी लिहिलं, “शाळेत सुद्धा तुम्ही वर्गावर वेळेवर जात नव्हता.
 • लोकमान्यांनी पुढच्या पत्रात उत्तर दिलं, “तुम्ही शिकवताना इकडच्या तिकडच्या भाकड कथा रंगवत सांगत बसतात. माझा पाऊण तास काय आणि तुमचा एक तास काय, शिकवणीच्या दृष्टीने दोन्ही सारखंच. ही भांडण आगरकरांच्या शेवटपर्यंत चालूच राहिली. आगरकरांनी मतभेदांमुळे शाळा सोडली आणि एक वर्षानंतर आपलं स्वतःचा “सुधारक” चालू केला. सडेतोड लेखनासाठी, सुधारक प्रसिद्ध झाले. लोकमान्य यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटी मतभेदांमुळे पुढे सोडली, पैशाच्या दृष्टीने धोरण ठरवण्याच्या दृष्टीने १८९१ मध्ये केसरी आणि मराठाची मालकी मरेपर्यंत स्वतःकडे ठेवली.

गोपाळ आगरकरांचे शैक्षणिक कार्य

फर्ग्युसन कॉलेजची स्थापना

डेक्कन एज्युकेशन सोसायटीमार्फत पुण्यामध्ये 2 जानेवारी 1885 रोजी फर्ग्युसन कॉलेज सुरू करण्यात आली या कॉलेजचे पहिले प्राचार्य म्हणून वामन शिवराम आपटे यांची नेमणूक करण्यात आली.

न्यू इंग्लिश स्कूल ची स्थापना

लोकमान्य टिळक व विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्या मदतीने आगरकरांनी पुणे या ठिकाणी एक जानेवारी 1880 रोजी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली.

डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना

लोकमान्य टिळक विष्णुशास्त्री चिपळूणकर आणि गोपाळ गणेश आगरकर यांनी संयुक्तरीत्या पुणे या ठिकाणी 24 ऑक्टोबर १८८४ रोजी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली.

गोपाळ गणेश आगरकर यांचे सामाजिक कार्य

 • महाराष्ट्राला तर्कशुद्ध समाज सुधारण्याची शिकवण आगरकरांनी दिली.
 • जिवंतपणी स्वतःची प्रेतयात्रा पहाणारे समाजसुधारक म्हणून आगरकर यांचे नाव घेतले जाते.
 • जनरल रँड च्या अत्याचारा विरोधात आपल्या वृत्तपत्रांमध्ये आगरकरांनी अत्यंत प्रखर टीका केली होती.
 • हिंदुस्तान मधील दारिद्र्याबद्दल आगरकरांना विशेष चीर आणि दुःख होते आपल्या हक्कासाठी संघटित होऊन संपाचे हत्यार कामगारांनी उचलावे हे त्यांचे प्रखर मत होते.
 • टिळक व आगरकर यांनी आपले संपूर्ण आयुष्य राष्ट्राला समर्पित करण्याची प्रतिज्ञा पुण्यामधील बंडगार्डन या भागात घेतली होती.
 • लोकमान्य टिळक व आगरकर यांच्यामध्ये सामाजिक सुधारणा अगोदर की राष्ट्रीय सुधारणा अगोदर करावी यावरून 1886 मध्ये मतभेद निर्माण झाले.
 • महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या पुनर्विवाहाला सन 893 मध्ये आगरकरांनी पाठिंबा दिला होता व ते या लग्न समारंभाला स्वतः हजर होते याच वर्षी विधवा विवाह उत्तेजक मंडळी या नावाने धोंडो केशव कर्वे यांनी संस्था सुरू केली.
 • इंदोरचे संस्थानिक शिवाजीराव होळकर यांनी आगरकरांना महिना पाचशे रुपये वेतन देण्याचे ठरविले परंतु आगरकरांनी ते स्वतःहून नाकारले होते.
 • शुद्ध बुद्धिवाद समता व्यक्तिस्वातंत्र्य व मानवतावाद ही आगरकर यांच्या स्वभावाची चतुसूत्री म्हणून ओळखली जाते.
 • विष्णुशास्त्री चिपळूणकर व आगरकर हे मराठीतील पहिले दोन श्रेष्ठ निबंधकार आहेत असे वि स खांडेकर यांचे मत होते.
 • समाजवादी सुधारणा मधील जहालवादी नेते म्हणून आगरकर यांना ओळखले जाते.
 • मूर्ती पूजा प्राणी हत्या प्रेतसंस्कार यावर आगरकरांनी मोठ्या प्रमाणात टीका केली होती.
 • बालविवाह सतीची चाल केशव पण इत्यादी विषयी ब्रिटिश सरकारने कायदे करावे असा गोपाळ गणेश आगरकर यांनी आग्रह धरला होता.
 • शनिदेव हा साडेसातीचा देव आहे ही कल्पना खोटी आहे असे त्यांनी समाजात सांगितले.
 • बालिका विवाह तसेच धन्य धर्मांतरास विरोध यावर आगरकरांनी कठोर टीका केली होती.

आगरकरांची पुस्तके

 • भारताचे थोर समाज सुधारक गोपाळ गणेश आगरकर, यांनी त्यांचे चरित्र हे “फुटके नशीब” या पुस्तकांमध्ये रेखाटले आहे.
 • याशिवाय त्यांनी विकार विलिसट, डोंगरी कारागृहाचे १०१ दिवस, इत्यादी पुस्तके लिहिली.
 • १९८२  मध्ये समाजाच्या हक्कासाठी आवाज उठवणारे, थोर व्यक्तिमत्व गोपाळ गणेश आगरकर यांच्यावर कोल्हापूरच्या एका दिवानावर टिपणी केल्याबद्दल, मानहानीचा खटला सुद्धा दाखल करण्यात आला व त्यामुळे गोपाळ गणेश आगरकर यांना डोंगरी कारागृहामध्ये ठेवण्यात आले.
 • १०१ दिवसांचा त्यांनी तुरुंगवास भोगला. त्या काळामध्ये आगरकर यांनी शेक्सपियरच्या “हॅम्लेट” या नाटकाचा मराठीमध्ये अनुवाद केला जो विकार विलिसट या नावाने प्रसिद्ध झाला.

गोपाळ गणेश आगरकर संस्था

गोपाळ गणेश आगरकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आचार्य अत्रे यांनी पुण्यात इ.स. १९३४ साली आगरकर हायस्कूल ही मुलींची शाळा स्थापन केली.

गोपाळ गणेश आगरकर यांचे साहित्य

 • गोपाळ गणेश आगरकर यांनी आणि इतर लेखकांनी त्यांच्यावर लिहिलेली पुस्तके –
 • गोपाळ गणेश आगरकर यांचे चरित्र (प्रा. अविनाश कोल्हे)
 • आगरकर दर्शन – ऑडिओ पुस्तक
 • ’विकार विलसित’ हे शेक्सपियरच्या हॅम्लेटचे मराठी भाषांतर : लेखक गो. ग. आगरकर.
 • आगरकर-वाङ्मय. खंड १ ते ३. (संपादक : म. गं. नातू. दि. य. देशपांडे)
 • गोपाळ गणेश आगरकर. लेखक, संपादक – प्रा. ग.प्र. प्रधान.
 • वाक्यमीमांसा आणि वाक्यांचें पृथक्करण (लेखक गो.ग. आगरकर)
 • आगरकर विचार (लेखक : अशोक चौसाळकर, तानाजी ठोंबरे, डाॅ. भा.ल. भोळे)
 • ‘गुलामांची राष्ट्र’हा लेख। गुलामगिरीचे शस्त्र (गो ग आगरकर)
 • वाक्य विश्लेषण’ हा व्याकरण ग्रंथ (लेखक गो.ग. आगरकर)
 • आगरकर व्यक्ती आणि विचार (लेखक वि.स. खांडेकर)
 • सुधारकातील निवडक निबंध’ लेखक गो.ग. आगरकर
 • आगरकरांचे राजकीय विचार (अशोक चौसाळकर, २००५)गोपाळ गणेश आगरकर – निवडक लेखसंग्रह. लेखक गो. ग. आगरकर. प्रकाशक : प्रतिमा प्रकाशन
 • श्रेष्ठ समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर, लेखिका : कुसुम बेदरकर; प्रकाशक : अस्मिता प्रकाशन(पुणे); प्रकाशन तिथी : नोव्हेंबर २००९
 • टिळक आगरकरांचे राजकीय विचार (संपादक : अशोक चौसाळकर)(२००८)
 • द्रष्टा (आगरकरांच्या आयुष्यावर व समाजकार्यावर लिहिलेले नाटक, लेखिका – माधुरी आठवले)
 • डोंगरीच्या तुरुंगांतील आमचे १०१ दिवस (लेखक गो.ग. आगरकर)
 • टिळक आणि आगरकर (नाटक). लेखक – विश्राम बेडेकर

गोपाळ गणेश आगरकर पुरस्कार

 • महाराष्ट्र संपादक परिषद ही संस्था, आदर्श पत्रकारितेसाठी गो.ग. आगरकर पुरस्कार देते. २०१२साली हा पुरस्कार महेश म्हात्रे यांना मिळाला होता.
 • महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे ’सुधारक’कार गोपाळ गणेश आगरकर या नावाचा पुरस्कार दिला जातो. इ.स. २०१० मध्ये हा पुरस्कार डॉ. श्रीराम लागू यांना, तर २०१२ साली मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे सक्रिय कार्यकर्ते श्री. सय्यदभाई यांना देण्यात आला.

गोपाळ गणेश आगरकर यांचा मृत्यू

भारतातील समाजसेवेमध्ये महत्त्वाचे व अमुलाग्र योगदान देणारे आगरकर यांना घर आणि समाजकार्य दोन्ही सांभाळताना, अपरिमित कष्ट सोसावे लागले. सातत्याच्या परिश्रमाने त्यांचे शरीर लवकर थकले, त्यात त्यांना दम्याचा विकार होता. या दगदगीमुळे त्यांनी वयाच्या ३९ व्या वर्षी म्हणजे दि. १७ जून १८९५ ला जगाचा निरोप घेतला.

आपल्या आयुष्याच्या शेवटच्या काळामध्ये आगरकर हे फर्गुसन कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत होते त्यांनी त्यांच्या अल्प आयुष्यामध्ये महाराष्ट्रातील लोकांमध्ये शिक्षणाचा व मानवी मूल्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार केला गोपाळ गणेश आगरकर हे उत्तम सुधारक व लोकांच्या सेवेसाठी तत्पर असणारे महान नेते होते.

गोपाळ गणेश आगरकरांबद्द्ल थोडक्यात माहिती

 • गोपाळ गणेश आगरकर हे महाराष्ट्रातील एक समाज सुधारक पत्रकार व शिक्षण तज्ञ होते.
 • त्यांचा जन्म १४ जुलै १८५६ साली टेंभू या सातारा जिल्ह्यातील गावी झाला.
 • आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासात, सामाजिक जागृतीत आगरकर यांचे योगदान मोलाचे आहे.
 • सामाजिक स्त्री-पुरुष समानता आणि विज्ञाननिष्ठा ही त्यांची जीवनमूल्य होती.
 • आगरकर व टिळक यांनी १८८१ मध्ये मराठा आणि केसरी ही वृत्तपत्रे सुरू केली.
 • पुण्यात डेक्कन एज्युकेशन सोसायटी स्थापन करण्यात त्यांचा देखील सहभाग होता.
 • १८८८ साली त्यांनी सुधारक हे वृत्तपत्र सुरू केले.
 • आगरकर हे भौतिकता, बुद्धीप्रामाण्यता व्यक्ती स्वातंत्र्य या तत्त्वांना प्रमाण मानून, समाजसुधारणा करणारे समाज प्रबोधक होते.
 • अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे, सुधारक गोपाळ गणेश आगरकर या नावाचा पुरस्कार दिला जातो.
 • दि. १७ जून १८९५ रोजी पुण्यात त्यांचा मृत्यू झाला.

FAQ

१. आगरकर यांचे पूर्ण नाव काय?

महाराष्ट्रातील सातारा जिल्हातील, कऱ्हाड तालुक्यातील टेंभू हे त्यांचं जन्मगाव. या चिमुकल्या गावातल्या एका कौलारू घरात, दि. १४  जुलै १८५६  रोजी गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म झाला.

२. सुधारक या वृत्तपत्राचे संपादक कोण होते?

गोपाळ गणेश आगरकर हे सुधारक वृत्तपत्राचे संपादक होते. त्यांनी “सुधारक” वृत्तपत्रातून आगरकरांनी वेळोवेळी स्त्रियांचे केशवपन, बालविवाहाची अनिष्ट प्रथा, घटस्फोटाची स्त्रियांना मुभा, अशा विषयांवर आपले बंडखोर विचार मांडले. हळूहळू हे विचार तत्कालीन समाजाच्या समोर मांडले गेले.

३. 1888 मध्ये गोपाळ गणेश आगरकर यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले?

1888 मध्ये गोपाळ गणेश आगरकर यांनी सुधारक हे वृत्तपत्र चालू केले.

४. आगरकर यांचा मृत्यू कधी झाला?

भारतातील समाजसेवेमध्ये महत्त्वाचे व अमुलाग्र योगदान देणारे आगरकर यांना घरी आणि समाजकार्य दोन्ही सांभाळताना, अपरिमित कष्ट सोसावे लागले. सातत्याच्या परिश्रमाने त्यांचे शरीर लवकर थकले, त्यात त्यांना दम्याचा विकार होता. या दगदगीमुळे त्यांनी वयाच्या ३९ व्या वर्षी म्हणजे दि. १७ जून १८९५ ला जगाचा निरोप घेतला.

निष्कर्ष

मित्रहो, आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास गोपाळ गणेश आगरकर यांच्या बद्दल माहिती दिली आहे. हा लेख तुम्हाला कसा वाटला, हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. लेख आवडल्यास तुमच्या इतर मित्रपरिवारांसोबत नक्की शेयर करा. धन्यवाद.

Leave a comment