लोकमान्य टिळक यांची संपूर्ण माहिती | Lokmanya Tilak Information In Marathi

Lokmanya Tilak Information In Marathi | लोकमान्य टिळक यांचे जीवनचरित्र -आपल्या भारत देशामध्ये विविध समाज सुधारक व थोर नेते होऊन गेले, ज्यानी आपल्या भारत देशाचा स्वातंत्र्यासाठी व इंग्रजांच्या गुलामगिरीतून वाचवण्यासाठी, अथक प्रयत्न करून स्वतःच्या प्राण्याचे बलिदान दिले. या सर्व नेत्यांच्या अतोनात कष्टांना व त्यांनी केलेल्या बलिदानांना कोटी कोटी प्रणाम.

या थोर नेत्यांपैकी महत्त्वाचे व्यक्तिमत्व म्हणजे “लोकमान्य टिळक”. यांचे पूर्ण नाव बाल गंगाधर टिळक असे होते. ज्यांना “भारतीय राष्ट्रीय चळवळीचे जनक” म्हणून सुद्धा ओळखले जाते. लोकमान्य टिळक यांचा भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये एक मौलाचा वाटा आहे.

इंग्रजांच्या चुकीच्या वागणुकीविरुद्ध व गुलामगिरी विरोधात, लोकमान्य टिळक यांचे विचार हे खूपच आक्रमक होते. त्यामुळे भारत देशातील रहिवाशांनी, लोकमान्य म्हणून बाळ गंगाधर टिळक यांना पदवी बहाल केली होती.

आजच्या लेखाद्वारे, आम्ही आपणास भारताच्या याच क्रांतिकारी पुत्राबद्दल तुम्हाला माहिती देणार आहोत, ज्याचं नाव आहे लोकमान्य. हा लेख तुम्ही सविस्तर वाचा.

Table of Contents

लोकमान्य टिळक यांची माहिती मराठी | Lokmanya Tilak Information In Marathi

स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, आणि तो मी मिळवणारच ! रांगड्या व्यक्तिमत्त्वाचे लोकमान्य टिळक यांनी केलेली ही सिंहगर्जना अजूनही, प्रत्येकाच्या मनात अभिमानाने झळकत आहे. लोकमान्य टिळक पेशाने वकील, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ता, भारतीय क्रांतिकारी व भारतीय स्वतंत्र सेनानी सुद्धा होते.

लोकमान्य टिळक जीवन परिचय

नाव केशव गंगाधर टिळक
टोपणनाव बाळ
पदवी लोकमान्य
जन्मस्थळचिखलगाव, तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी
वडिलांचे नावगंगाधरपंत
आईचे नावपार्वतीबाई
शिक्षण१८७६ बी.ए (गणित) प्रथम श्रेणीत उत्तीर्ण १८७९ मध्ये प्रथम श्रेणीत उत्तीर्ण
पत्नीचे नावसत्यभामाबाई
मुलांची नावेरमाबाई, पार्वती बाई, विश्वनाथ, रामभाऊ, श्रीधर
मृत्यू१ ऑगस्ट १९२०

लोकमान्य टिळक यांचा जन्म आणि सुरुवातीचे जीवन

लोकमान्य टिळक यांचा जन्म २३ जुलै १८५६ रोजी महाराष्ट्र राज्यामधील, रत्नागिरी जिल्ह्यातील, चिखली या गावी, एका ब्राह्मण कुटुंबामध्ये झाला होता. त्यांचे मूळ गाव कोकणातील चिखली हे होते. टिळकांचे वडील शाळेमध्ये शिक्षक म्हणून, कार्यरत होते व टिळकांच्या वडिलांना म्हणजेच गंगाधरपंत यांना संस्कृतचे चांगले ज्ञान होते.

Lokmanya Tilak Information In Marathi

टिळकांच्या आईचे नाव पार्वतीबाई होते. वडिलांच्या शिक्षकी बदलीनंतर त्यांचे कुटुंब हे पुण्यामध्ये स्थलांतरीत झाले. त्यावेळी लोकमान्य टिळक यांचा विवाह १८७१ साली सत्यभामा यांच्याशी झाला. टिळकांचे वय १६ वर्ष असताना, त्यांच्या वडिलांचे निधन झाले.

नक्की वाचा –भगतसिंग माहिती मराठी 

लोकमान्य टिळकांचा विवाह

बाळ गंगाधर टिळक हायस्कूल पूर्ण करून कॉलेज सुरू करण्याच्या तयारीत होते, त्याच वेळी त्यांचे लग्न १८७१ साली झाले. त्यांच्या पत्नीचे नाव सत्यभामा होते आणि त्यांचे लग्न झाले तेव्हा ती फक्त 10 वर्षांची होती. लग्न झाल्यानंतर त्यांनी आपले शिक्षण चालू ठेवले आणि पदवी आणि पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले, त्यानंतर त्यांनी कायद्याची पदवी देखील पूर्ण केली.

लोकमान्य टिळक यांचे शिक्षण

बाळ गंगाधर टिळक हे त्यांच्या काळातील उच्च शिक्षित लोकांपैकी एक होते. तो 10 वर्षांचा असताना त्याच्या वडिलांची पुण्यात बदली झाली. शक्य तितके शिकण्याचा टिळकांचा निर्धार होता. बाळ गंगाधर टिळकांनी पुण्यातील कुलार शाळेत शिक्षण घेतले, जिथे त्यांनी मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली. त्यानंतर, त्यांनी त्यांचे शिक्षण पुणेस्थित पूना शाळेत सुरू ठेवले, जिथे त्यांना उत्तम शिक्षकांनी शिकवले.

टिळकांचे सुरुवातीचे शिक्षण खूप चांगले झाले आणि ते बालपणीच कुशल विद्वान बनले. पटकन शिकण्याची आणि अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याच्या त्यांच्या अपवादात्मक क्षमतेमुळे ते समवयस्कांमध्ये आदरणीय बनले. आईचे निधन झाल्यावर टिळकांना लवकर मोठे होऊन स्वतःची काळजी घ्यावी लागली.

गणित आणि संस्कृत या दोन विषयांमध्ये लोकमान्य टिळक नेहमी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होत असत. 1877 साली त्यांनी बी ए चे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर 1879 मध्ये त्यांनी एलएलबी चे शिक्षण पूर्ण केले आणि वयाच्या 23 व्या वर्षी ते वकील झाले.

Lokmanya Tilak

लहानपणी टिळकांना शिकण्याची खूप हौस होती आणि त्यांना अभ्यासात खूप रस होता. तथापि, जेव्हा त्यांची आई मरण पावली, तेव्हा त्यांना जबाबदऱ्या अंगावर घेऊन स्वत: ला सांभाळावे लागले. 16 वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर, बाळ गंगाधर टिळक यांनी डेक्कन कॉलेजमधून बीए प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केले. बीए केल्यानंतर कायद्याचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुण्यातच एका शाळेत गणिताच्या शिक्षकाची नोकरी स्वीकारली.

बाल गंगाधर टिळक यांची शिक्षक म्हणून भूमिका

शिक्षण संपल्यानंतर लोकमान्य टिळक हे पुणे येथील एका खासगी शाळेत गणित व इंग्रजीचे शिक्षक म्हणून रुजू झाले. त्याच वेळी, त्यांचे विचार शाळेतील इतर शिक्षक आणि अधिकाऱ्यांशी जुळले नाहीत म्हणूनच झालेल्या मतभेदांमुळे त्यांनी 1880 मध्ये शाळेत शिकवणे सोडले.

ब्रिटीशांच्या तुलनेत भारतीय विद्यार्थ्यांवरील दुहेरी वागणुकीचा त्यांनी तीव्र विरोध केला आणि भारतीय संस्कृती आणि आदर्शांविषयी जागरूकता पसरविली. बाल गंगाधर टिळक (लोकमान्य टिळक) यांनी देखील ब्रिटिश शिक्षण प्रणालीवर टीका केली.

लोकमान्य टिळकांचे सामाजिक कार्य

लोकमान्य टिळकांनी त्यांचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर, पुणे या ठिकाणी एका खाजगी शाळेमध्ये शिक्षकाची भूमिका निभवली. त्यामध्ये ते गणित व इंग्रजी विषयाचे शिक्षक होते. परंतु त्यांचे विचार व त्यांची मते शाळेतील इतर शिक्षक व अधिकाऱ्यांशी कधीच जुळले नाहीत. कारण, इतर शिक्षक हे भारतीय विद्यार्थ्यांना दुहेरी वागणूक देत असत. व या मतभेदामुळे लोकमान्य टिळक यांनी १८८० मध्ये त्यांच्या शिक्षकी पदवीचा राजीनामा दिला.

Lokmanya Tilak Information In Marathi

गणेशोत्सव आणि शिवजंयतीची सुरुवात

बाळ गंगाधर टिळक हे सर्व हिंदू लोकांनी एकत्र यावे आणि संघटीत राहावे म्हणून त्यांनी शिवजयंती आणि १८९३ मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरवात केली. आजही आपण हे दोन्ही सण मोठ्या थाटामाटात साजरे करतो. हिंदू सण एकत्र येऊन साजरे करण्यामागे सर्व लोकांनी एकत्र राहण्याची भावना राहावी आणि इंग्रजांच्या विरुद्ध लढण्यासाठी लोकांमध्ये एकोपा राहावा हा उद्देश त्यांच्या डोळ्यासमोर होता.

परदेशी वस्तुवर बहिष्कार

स्वदेशी / भारतीय वस्तू वापरण्यावर टिळकांचा जोर होता. ते म्हणत असत, आपला पैसा आपल्याच देशात राहिला पाहिजे. म्हणून विदेशी वस्तूंचा त्यांनी बहिष्कार केला. त्याचबरोबर विदेशी कपड्यांची होळी त्यांनी केली. जेणेकरून आपल्या देशातील लोक आपल्याच देशातील वस्तू आणि कपड्यांचा वापर करतील.

न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना

आपल्या देशातील सर्व मुलांना स्वस्तात आणि चांगले शिक्षण मिळावे म्हणून त्यांनी शिक्षण समितीची स्थापना केली. १ जानेवारी १८८० रोजी आपल्या महाविद्यालयीन मित्रांसमवेत लोकमान्य टिळकानी पुणे येथे न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. विष्णुशास्त्री चिपळूणकर, वामन शिवराम आपटे, गोपाळ गणेश आगरकर इत्यादीचा समावेश या स्थापनेमध्ये होता.

केसरी आणि मराठा वृत्तपत्र

१८८१ मध्ये विष्णुशात्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक, वामन शिवराम आपटे, डॉ. गद्रे आणि आगरकर याच्या सहमतीने एक पत्रक सुरु केले. त्याला नंतर केसरी असे नाव दिले. या वृत्तपत्राद्वारे राज्यकर्त्यांवर जहाल टीका करत असत. त्या काळात भरपूर वृत्तपत्रे प्रसारित होत असत. पण त्याच्या समोर ध्येय न्हवते.

इसवी सन १८८१ रोजी लोकमान्य टिळकांनी, भारतीय जनता व त्यांची समस्या जाणून घेत व त्यांच्यामध्ये स्वतःच्या अधिकारांची जाणीव निर्माण व्हावी व जनतेने स्वतःच्या हक्कासाठी लढा द्यावा, या उद्देशाने बाळ गंगाधर टिळक यांनी मराठी भाषेत “केसरी” तसेच इंग्रजी भाषेमध्ये “मराठा” या दोन वृत्तपत्रांची सुरुवात केली व ही दोन्हीही वृत्तपत्रे लोकांमध्ये लोकप्रिय झाली.

केसरी हे मराठी वृत्तपत्र आणि पुढे जाऊन मराठा हे वृत्तपत्र इंग्लिश मध्ये प्रसारित करण्यात आले. मराठा हे वृत्तपत्र हे सुशीक्षित वर्गासाठी होते. मराठा या वृत्तपत्रांमधून महाराष्ट्राबाहेरील लोकांना आणि तरुणांना प्रभावित करण्याचे काम करत असत. दोन्ही वर्तमानपत्रातून राजकीय आणि सामाजिक घडामोडीवर प्रखर विचार मांडले जात होते.

दुष्काळ आणि प्लेग

१८८६ साली लोकमान्य टिळक यांच्या वैयक्तिक आणि सामाजिक जीवनात संघर्ष सुरु होता. अश्यावेळी त्यांचे अनेक सहकाऱ्यांचा मृत्यू झाला आणि अनेक नवीन सहकारीसुद्धा भेटले. कलकत्ता, मुंबईच्या पाठोपाठ हा संसर्गजन्य रोग पुण्यात देखील दाखल झाला. उंदीर मेल्याप्रमाणे पटापट लोक मरु लागले. तेव्हाच्या ब्रिटीश सरकारने युद्धपातळीवर तयारी सुरु केली. केवळ अलंकारिक अर्थाने नव्हे तर पुण्याच्या कलेक्टरला लष्करी अधिकार दिले. त्यांनतर लोकमान्य टिळक सामाजिक कामात खूप मग्न झाले होते.

त्यांनतर घराची जबाबदारी आणि कौटुंबिक व्यवहार त्यांनी आपल्या बहिणीच्या मुलाकडे दिली. लोकमान्य टिळक हे मुंबई कायदेमंडळ मध्ये होते. रँडने तातडीने पुण्याची सूत्रे आपल्या हाती घेतली. गावाबाहेर मुळामुठाच्या संगमाजवळ एक प्लेगचे इस्पितळ उघडण्यात आले. शिवाय विलीगीकरणासाठी वेगळी छावणी उघडण्यात आली. लेफ्टनंट ओवेन याला रुग्ण छावणीची जबाबदारी देण्यात आली.

दुष्काळ आणि प्लेगचा कहर महाराष्ट्रावर होता. सतत दुष्काळ पडत असल्याने लोकांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत चालले होते.१८७६ पेक्षा १८९६ चा दुष्काळ खूप भयानक होता. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे तेव्हा मुंबई कायदेमंडळाचे सदस्य होते. पुण्यातील लोकांचा पुढारी व एक जबाबदार पत्रकार या नात्याने टिळकांनी प्लेग विरुद्धच्या लढाईत उडी घेतली. आपल्या वर्तमानपत्रातून रोगासंबंधी लोकशिक्षण देण्यास सुरवात केली.

सामान्य लोकांपर्यंत अधिकाधिक सुविधा पोहचण्याची जबाबदारी त्यावेळच्या सरकार ने घेतली. सरकारने फॅमिन रिलीफ कोड अंमलात आणला. हा फॅमिन रिलीफ कोड लोकांना समजावा म्हणून या कोडचे भाषांतर करून दिले. हे भाषांतर त्यांनी केसरी वृत्तपत्रकात केले. लोकांनी “कर्ज काढून कर भरू नये ” असे आवाहन लोकांना केले. अश्या प्रकारे दुष्काळाशी मात करण्यासाठी टिळकांनी खूप संघर्ष केला. टिळकांनी केलेल्या या संघर्षाचे चांगले परिणाम दिसून आले.

याचदरम्यान मुंबई आणि पुणे येथे प्लेगची साथ खूप भयानक साथ आली. प्लेग हा साथीचा रोग असल्याने तो खूप वेगाने पसरत चालला होता. सरकारने दिलेल्या औषधांचा परिमाण त्या रोगापेक्षा जास्त भयंकर होत चालला होता. साथीच्या रोगामुळे सामान्य लोकांना दूर केलं जात असे आणि तेथील इस्पितळामध्ये इलाज देखील सरळ केला जात नसे.

या त्रासाला कंटाळून टिळकांनी जनतेची मदत घेऊन एका इस्पितळाची स्थापना केली. इथे लोकांना वागणूक देखील देत असल्याने जनता देखील तिथेच जाऊ लागली. टिळक स्वतः इस्पितळाकडे लक्ष देत असत. त्या इस्पितळाचे पुढे नाव हिंदू प्लेग हॉस्पिटल असे ठेवण्यात आले. टिळकांनी दुःख निवारण समितीची स्थापना केली. रुग्णांनी पळून जाऊ नये म्हणून लष्कर ठेवण्यात आले.

फर्ग्युसन महाविद्यालयाची स्थापना

1885 मध्ये ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’च्या अधिपत्याखाली ‘फर्ग्युसन कॉलेज’ची स्थापना झाली आणि सर्व आजीव सदस्यांनी या कॉलेजमध्ये 20 वर्षे प्राध्यापक म्हणून काम करण्याचे मान्य केले. सोसायटीच्या संस्था लवकरच समृद्ध झाल्या. त्यांनी ‘गद्रेवाडा’ आणि ‘कबुतरखाना क्रीडांगण’ विकत घेतले.

सर जेम्स फर्ग्युसनच्या सरकारने दिलेल्या वचनानुसार लॉर्ड रेने नंतर नानावाडा सोसायटीच्या ताब्यात दिला. सोसायटीने चतुःश्रृंगीजवळ कॉलेजसाठी भव्य इमारत बांधली. तथापि, टिळकांचा शाळा-महाविद्यालयाशी असलेला संबंध 1890 मध्ये संपुष्टात आला.

लोकमान्य टिळक

डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना

भारतातील विद्यार्थ्यांमध्ये आपल्या भारत देशाविषयी आपल्या राष्ट्रवादी शिक्षणाची प्रेरणा निर्माण करण्यासाठी, तसेच भारत देशातील तरुणांना उच्च दर्जाचे शिक्षण प्राप्त होण्यासाठी, शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी, लोकमान्य टिळक व त्यांचे महाविद्यालयीन इतर सहकारी, थोर समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर आणि व विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी दिनांक २४ ऑक्टोबर १८८४ मध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली.

या सोसायटीमध्ये भारतीय विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणवत्तेमध्ये वाढ करण्यासाठी व त्यांना उच्च दर्जाचे शिक्षण देण्यासाठी सुरुवात झाली. १८८५ मध्ये या सोसायटीने माध्यमिक शिक्षणासाठी विविध नवीन इंग्रजी स्कूल, व उच्च शिक्षणासाठी फर्ग्युसन कॉलेज यांची स्थापना केली. व यामुळे देशातील विद्यार्थ्यांना शिक्षण व प्रेरणा मिळू लागली.

टिळक आणि आगरकर यांच्यातील मतभेद

1888 मध्ये टिळक आणि आगरकर यांच्यात सामाजिक आणि धार्मिक प्रश्नांवर मतभेद सुरू झाले. यामुळे ‘श्री आगरकर’ यांनी केसरी य वृत्तपत्राच्या संपादकपदाचा राजीनामा दिला आणि स्वतःचे वृत्तपत्र सुधारक प्रकाशित करण्यास सुरुवात केली. त्याचवेळी शाळा-कॉलेज आणि वृत्तपत्रांची विभागणीहि झाली, त्यानुसार ‘आर्यभूषण प्रेस’ आणि दोन वृत्तपत्रे लोकमान्य टिळक, प्रा. केळकर आणि एच.एन. गोखले याना देण्यात आली. प्रा. केळकर यांना दोन्ही वृत्तपत्रांचे संपादक करण्यात आले.

प्रा. केळकर हे वर्षअखेरपर्यंतच मराठाचे संपादक राहिले, पण लवकरच प्रा. केळकरांना वृत्तपत्राशी असलेला संबंध पूर्णपणे संपवावा लागला. त्यानंतर टिळक दोन्ही पेपरचे संपादक झाले. प्रेस आणि वृत्तपत्रे यांचीही विभागणी झाली. टिळक ‘केसरी’ आणि ‘मराठा’ वृत्तपत्रांचे एकमेव मालक आणि संपादक झाले. प्रो. केळकर आणि श्री गोखले हे ‘आर्यभूषण प्रेस’चे मालक होते. टिळकांनी केसरीचा ताबा घेतल्यानंतर त्याची ग्राहकसंख्या झपाट्याने वाढली. तेव्हा देशातील इतर वृत्तपत्रांपेक्षा त्याचा ग्राहकसंख्या कितीतरी अधिक होता.

टिळक यांच्यावरील राजद्रोहाचे आरोप

टिळकांवर ब्रिटीश भारतीय सरकारने तीन वेळा देशद्रोहाचा खटला चालवला आणि प्रत्येक प्रकरणात ते दोषी ठरले पण शेवटी त्यांची निर्दोष मुक्तता झाली. इतर राजकीय खटल्यांमध्ये, 1897, 1909 आणि 1916 मध्ये टिळकांवर देशद्रोहाचा खटला चालवण्यात आला. 1897 मध्ये, शासनाच्या विरोधात असंतोष पसरवल्याबद्दल त्यांना 18 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली.

1916 मध्ये, जेव्हा टिळकांवर तिसर्‍यांदा स्वराज्यावर केलेल्या भाषणांमुळे देशद्रोहाचा आरोप लावण्यात आला, तेव्हा जिना पुन्हा त्यांचे वकील होते आणि यावेळी त्यांना या खटल्यातून निर्दोष सोडण्यात आले.

1909 मध्ये, त्याच्यावर पुन्हा देशद्रोह आणि भारतीय आणि ब्रिटीश यांच्यातील वांशिक वैमनस्य वाढवण्याचा आरोप लावण्यात आला. मुहम्मद अली जिना हे मुंबईचे वकील टिळकांच्या बचावासाठी या प्रत्येक खटल्यात हजर झाले, परंतु त्यांना निर्दोष सोडण्यात यश आले नाही.

लोकमान्य टिळकांचे राजकीय जीवन

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

सन १८९० रोजी बाळ गंगाधर टिळक यांनी, राजकीय जीवनामध्ये प्रवेश केला. त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये, त्यांचे राजकीय जीवन सुरू केले. काँग्रेसची स्थापना २८ डिसेंबर १८८५ मध्ये ब्रिटिशांच्या काळी झाली. यानंतर त्याने स्वराज्य पक्षाविषयी पक्षाच्या उदारमतवादी विचारांचा तीव्र निषेध करण्यास सुरुवात केली. यावेळी लोकमान्य म्हणाले, ब्रिटिश सरकारच्या विरोधात साधी चळवळ करणे व्यर्थ आहे, त्यानंतर पक्षाने लोकमान्य टिळकांना त्यावेळी काँग्रेसचे प्रमुख नेते गोपाळ कृष्ण गोखले यांच्या विरोधात मतदानाला उभे केले.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या घटनेनुसार, एक संसदीय लोकशाही असलेले समाजवादी राष्ट्र जिथे संधी तसेच राजकीय, आर्थिक आणि सामाजिक हक्कांत समानता व जागतिक शांततेचे उद्दीष्ट आहे, अशा भारतीय नागरिकांचे आणि भारतीय प्रशासनाची शांततापूर्वक आणि घटनात्मक मार्गाने प्रगती व कल्याण करणे हा सदर पक्षाचा उद्देश आहे.

लोकमान्य टिळकांना स्वराज्य प्रस्थापित करण्यासाठी, व इंग्रजांना भारत देशातून पळून लावण्यासाठी, जोरदार बंड करायचे होते. त्याच वेळची संधी साधत त्यानी, स्वदेशी चळवळीस व बंगालच्या फाळणीच्या वेळी ब्रिटिश वस्तूवर बहिष्कार घालण्याचे निर्धारित केले. काँग्रेस पक्ष व लोकमान्य यांच्यातील, विचारसरणीतील मतभेदांमुळे काँग्रेसची चरणपंथी बींग म्हणून मान्यता मिळाली. याच सुमारास लोकमान्य यांना बंगालचे राष्ट्रवादी बिपिन चंद्र पाल व पंजाबचे लाला लजपत राय यांनी सुद्धा पाठिंबा दिला.

त्यावेळी या तिघांना लाल, बाल, पाल, म्हणून लोकांमध्ये प्रसिद्धी मिळाली. १९०७ च्या काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये, काँग्रेस पक्षाच्या उदारमतवादी व चरणपंथी गटात वाद निर्माण झाल्यामुळे काँग्रेस दोन स्वतंत्र गटांमध्ये विभागले गेले.

लखनौ करार  

इ. स. १९१६ मध्ये लोकमान्य टिळक आणि बॅरिस्टर जीना यांच्यात लखनौ करार झाला. या कराराने हिंदू – मुस्लिम ऐक्याचा नवा मार्ग दाखवून दिला. टिळकांनी सांस्कृतिक राष्ट्र्वादाचा पुरस्कार केला असला तरी इंग्रजी सत्तेच्या विरोधात संघर्ष करण्यासाठी हिंदू व मुस्लिम यांनी एकत्र आले पाहिजे असे लोकमान्य टिळकांनी म्हटले होते.

लखनौ कराराने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधील दोन प्रमुख गटांमधील सौहार्दपूर्ण नातेसंबंध स्थापित केले.उग्रवादी गट, लाला लजपत राय, बाल गंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र पाल यांच्या नेतृत्वाखाली गरम दल किंवा गरम गट म्हणून ओळखले जाते.,आणि मध्यम गट,गोपाळ कृष्ण गोखले यांच्या नेतृत्वाखाली नरम दल म्हणून ओळखले जातात.

भारतीय राष्ट्रवादाचे पुरस्कर्ते

टिळक हे कट्टर राष्ट्रवादी असल्याने त्यांना भारतातील इंग्रजी सत्तेचे अस्तित्व मान्य नव्हते. टिळकांचा इंग्रजांच्या न्यायबुद्धीवर मुळीच विश्वास नव्हता. मवाळ नेत्यांच्या अर्ज – विनंतीच्या मार्गाने भारतीयांच्या पदरात काहीही पडणार नाही असे टिळकांचे स्पष्ट मत होते. लोकमान्य टिळक हे भारतीय राष्ट्रवादाचे खंदे पुरस्कर्ते होते. पुरातन वैदिक धर्म व भारताचा गौरवशाली इतिहास हे भारतीय राष्ट्रवादाचे  प्रमुख आधार होत. असे त्यांचे मत होते. 

देशाला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी देशातील प्रत्येक व्यक्तीला  इंग्रजांशी दोन हात करण्याची तयारी ठेवली पाहिजे, असे टिळकांना वाटत होते. टिळकांच्या या जहालवादी विचारामुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मध्ये मवाळ व जहाल असे दोन गट पडले. आणि जहाल गटाचे नेतृत्व लोकमान्यांकडे आले.

बंगालच्या फाळणीविरुद्ध चळवळ

लॉड कर्झन याने इ. स. १९०५ मध्ये बंगालची फाळणी केली. या फाळणीविरुद्ध संपूर्ण देशात आंदोलनाचा जो भडका उडाला त्याचे नेतृत्व लोकमान्य टिळक, लाला लजपतराय, बिपिनचंद्र पाल यांनी केले.  त्याचवेळी या तिघांना ‘लाल-बाल-पाल’ म्हणून प्रसिध्दी मिळाली. या चळवळीतुन टिळकांचे नेतृत्व राष्ट्रीय स्तरावर प्रस्थापित झाले. या फाळणी विरुद्ध त्यांनी देशभर जबरदस्त प्रचार केला. व इंग्रजी सत्तेचे खरे रूप भारतीय लोकांपुढे मांडले. 

अशाप्रकारे टिळकांनी परकीय सत्तेच्या विरोधात जनजागृती घडवून आणण्याचे अत्यंत मोलाचे कार्य केले. याच काळात लोकमान्य टिळकांनी स्वदेशी, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण व स्वराज्य या चतुःसूत्री कार्यक्रमाचा पुरस्कार केला. ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच’ अशी सिंहगर्जना करून लोकमान्य टिळकांनी स्वराज्याचा मंत्र सामान्य जनतेच्या हृदयापर्यत पोहोचविला.

होम रुल लीगची स्थापना

1915 मध्ये तुरूंगवासाची शिक्षा भोगल्यानंतर, लोकमान्य टिळक जेव्हा भारतात परत आले, तेव्हा त्यांना लक्षात आले की पहिल्या महायुद्धामुळे राजकीय परिस्थिती वेगाने बदलत होती, तर त्यांच्या सुटकेमुळे लोकमान्य टिळकांच्या चाहत्यांना आनंद झाला. आणि लोकांनी एकत्र येऊन त्यांच्या सुटकेचा आनंद साजरा केला.

आयर्लंडमध्ये होमरुल चळवळ जोरात चालली होती, मग अशा प्रकारची चळवळ भारतात का होऊ नये अशी कल्पना १९१५ साली डॉ. अँनी बेजंट यांनी मांडली. पहिली होमरूल चळवळ टिळकांनी बेळगाव येथे स्थापन केली.

यानंतर लोकमान्य टिळकांनी पुन्हा कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आणि आपल्या साथीदारांसोबत पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेत त्यांनी 28 एप्रिल, 1916 रोजी संपूर्ण भारतभर होम रूल लीगमध्ये एनी बेसेंट, मुहम्मद अली जिन्नहा, युसूफ बैप्टिस्टा यांच्याशी करार केला. होमरूल चळवळीसाठी उर्वरित भारत हा डॉ.ॲनी बेझंट यांच्याकडे सोपवण्यात आला होता. स्वराज्य आणि प्रशासकीय सुधारणांसह भाषिक प्रांतांची स्थापना करण्याची मागणी केली.

लोकमान्य टिळकांचे महत्वपुर्ण कार्य

  • 1880 साली पुण्यात न्यु इंग्लिश हायस्कुल ची स्थापना केली.
  • 1881 साली जनजागृतीकरता ’केसरी’ व ’मराठा’ अशी वृत्तपत्र सुरू केली. आगरकर केसरीचे तर टिळक मराठा चे संपादक झाले.
  • हिंदी भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा मिळायला हवा याकरीता सर्वात आधी पुढाकार टिळकांनीच घेतला होता.
  • 1884 साली पुण्यात डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली.
  • 1885 साली पुणे येथेच फग्र्युसन काॅलेज सुरू केले.
  • टिळक ’लाल बाल पाल’ या त्रैमुर्ती मधील एक होते.
  • लोकांमध्ये एकतेची भावना निर्माण व्हावी या हेतुने सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिव जयंती उत्सवाला सुरूवात केली.
  • 1895 ला टिळकांची मुंबई प्रांत विनियमन बोर्ड चे सभासद म्हणुन निवड झाली.
  • 1897 राजद्रोहाचा आरोप लावुन टिळकांना दिड वर्षांची कैद झाली त्यावेळेस टिळकांनी आपल्या बचावात जे भाषण दिले ते तब्बल 4 दिवस आणि 21 तास चालले.
  • 1903 मधे ’दि अर्टिक होम इन द वेदाज’ या पुस्तकाचे प्रकाशन केले.
  • 1907 साली भारतीय राष्ट्रीय काॅंग्रेस चे सुरत येथे अधिवेशन झाले. त्यात जहाल आणि मवाळ या दोन समुहांचा संघर्ष फार वाढला. परिणामी मवाळ समुहाने जहाल समुहाला काॅंग्रेस संघटनेमधुन काढुन टाकले. जहाल समुहाचे नेर्तृत्व लोकमान्य टिळकांकडे होते.
  • टिळकांना भारतिय असंतोषाचे जनक म्हंटले गेले आहे.
  • 1908 मध्ये टिळकांवर राजद्रोहाचा खटला चालला त्यात त्यांना सहा वर्षांची शिक्षा झाली. टिळकांना ब्रम्हदेशात मंडालेच्या कारागृहात पाठविले. तेथे टिळकांनी ’गितारहस्य’ नावाचा अतुलनीय असा ग्रंथ लिहीला.
  • 1916 साली त्यांनी डाॅ. एनी बेसेन्ट यांच्या सहकार्याने ’होमरूल लीग’ संघटनेची स्थापना केली. होमरूल म्हणजे आपल्या राज्याचे प्रशासन आपण करावयाचे यालाच ’स्वशासन’ देखील म्हणतात.

लोकमान्य टिळकांचे तुरुंगातील जीवन

लोकमान्य टिळक ब्रिटिश सरकारच्या गुलामगिरीला कडाडून विरोध करत असत. व त्यांनी स्थापन केलेल्या केसरी व मराठा वर्तमानपत्राद्वारे ब्रिटिशांविरुद्ध लेख लिहत. या लेखाच्या प्रेरणेमुळे चाफेकर बंधूंनी २२ जून १८९७ रोजी कमिशनर “रेड ओरो लेफ्टडिनेंटचा” खून केला. रेंड ओरोचा खून झाल्यामुळे, लोकमान्य टिळकांवर ब्रिटिशांनी खूनाचा आरोप केला. यामुळे देशद्रोहाचा खटला लोकमान्य टिळकांवर चालवण्यात आला. व लोकमान्य टिळकांना सहा वर्ष हद्दपार, अशी शिक्षा ब्रिटिश सरकारने सुनावली.

१९०८ ते १९१४ च्या दरम्यान, त्यांना बर्माच्या मंडाले तुरुंगामध्ये ठेवण्यात आले असतानाही, लोकमान्य टिळकांनी त्यांचे लिखाण थांबवले नाही. तुरुंगात त्यांनी “गीता रहस्य” हे पुस्तक लिहिले. त्यावेळेस टिळकांच्या या क्रांतिकारक रौद्ररूपामुळे, इंग्रज घाबरून गेले. इंग्रजांनी मराठा व केसरी या वृत्तपत्रांचे प्रकाशन थांबवण्याचा प्रयत्नही केला होता, परंतु लोकमान्य टिळकांची लोकप्रियता लोकांमध्ये इतकी वाढली होती की, लोकांमध्ये स्वराज्य मिळण्याची इच्छा निर्माण झाली होती. त्यामुळे इंग्रजना सुद्धा आक्रमक विचाराच्या स्वतंत्र सेनेसमोर मान खाली घालावी लागली.

टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती साजरी करण्यास सुरुवात केली

परकीय कल्पना आणि प्रथा यांचे अंध अनुकरण नवीन पिढीमध्ये अधार्मिकता निर्माण करत आहे आणि भारतीय तरुणांच्या चारित्र्यावर घातक परिणाम होत आहे. जुन्या परंपरा आणि उत्सवांमुळे लोकांमध्ये नवी जाणीव निर्माण होत होती. जुनी धार्मिक पूजा, गणपती-पूजा आणि शिवरायांच्या जीवनाशी संबंधित घटनांवरील सणांचे साजरीकरण ही त्याची सर्वात स्पष्ट उदाहरणे होती.

टिळकांचा असा विश्वास होता की जर परिस्थिती अशीच बिघडू दिली तर शेवटी नैतिक दिवाळखोरीची स्थिती निर्माण होईल ज्यातून कोणतेही राष्ट्र सावरणार नाही. टिळकांच्या मते, भारतीय तरुणांना स्वावलंबी आणि अधिक ऊर्जावान बनवण्यासाठी त्यांना प्रशिक्षित केले पाहिजे. त्यांना त्यांच्या धर्माचा आणि पूर्वजांचा अधिक आदर करायला शिकवले पाहिजे. या दोन्ही चळवळींशी टिळकांचे नाव घट्ट जोडलेले आहे. टिळकांचा ठाम विश्वास होता की जुन्या देवतांची आणि राष्ट्रीय नेत्यांची निरोगी पूजा लोकांमध्ये खरी राष्ट्रवाद आणि देशभक्तीची भावना विकसित करेल.

लोकमान्य टिळकांचा मृत्यू

०१ ऑगस्ट १९२० रोजी लोकमान्य टिळकांनी जगाचा निरोप घेतला. जालियनवाला बाग हत्याकांडाच्या घटनेचा लोकमान्य टिळकांच्या मनावर घोर परिणाम झाला होता. त्यामुळे त्यांचे स्वास्थ्य ढासळू लागले, व लोकमान्य टिळकांना मधुमेहाचा त्रास सुरू झाला. या त्रासाने लोकमान्यांनी त्यांचे प्राण सोडले. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण देशांमध्ये काळे डोंगर पसरले. व अशा रीतीने सूर्यासारखे प्रखर व्यक्तिमत्व जगाचा निरोप घेऊन निघाले.

लोकमान्य टिळकांनी लिहिलेली पुस्तके

लोकमान्य टिळक हे महान क्रांतिकारी समाजसुधारक शिक्षक वकील तर होतेच पण ते एक मोठे लेखक देखील होते जेव्हा त्यांना खुदीराम बोस आणि प्रफुल्ल चाकी यांच्या हत्येचा निषेध करण्यात आला होता. त्यांच्या मासिकात बातमी छापल्याच्या निषेधार्थ, लोकमान्य टिळक मंडाले तुरुंगात असताना त्यांना ब्रिटिश मंडाले तुरुंगात बंद करण्यात आले, त्यावेळी त्यांनी 400 पानांचे पुस्तक लिहिले. भगवान श्रीकृष्णांनी श्रीमद भागवत गीतेतील कर्मयोगाचे स्पष्टीकरण या पुस्तकात लिहिले आहे.हे पुस्तक पुढे अनेक लोकांमध्ये लोकप्रिय झाले.बाळ गंगाधर टिळकांनी अनेक पुस्तके लिहिली जसे की

  • श्रीमद्भागवत गीता रहस्य
  • आर्क्टिक वेदांचे घर
  • जीवन नीतिशास्त्र आणि धर्माचे हिंदू तत्वज्ञान
  • वैदिक कालगणना आणि वेदांग ज्योतिष
  • ओरियन
  • श्यामजी कृष्ण वर्मा

लोकमान्य टिळक १० ओळीत मराठी निबंध

  • बाल गंगाधर टिळकांचा जन्म २३ जुलै १८५६ रोजी महाराष्ट्राच्या रत्नागिरीतील चिखली गावात झाला.
  • टिळकांना भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे जनक म्हणून ओळखले जाते.
  • १९०६ मध्ये टिळकांवर राजद्रोहाचा आरोप लावून ब्रिटिशांनी त्यांना अटक केली.
  • टिळकांचे राजकीय उद्दीष्ट म्हणजे लोकांसाठी स्वावलंबन आणि स्वराज्य मिळवणे किंवा स्वराज्य मिळवणे हे होते.
  • त्यांनी लोकांना एकत्र आणून त्यांना स्वातंत्र्याबद्दल प्रोत्साहीत करण्यासाठी गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सवाची सुरुवात केली.
  • त्यांनी स्वदेशी आणि देशभरात मोठ्या प्रमाणावर परदेशी वस्तूंवर बहिष्कार घालण्यात सहभाग घेतला होता.
  • मंडालेच्या या कारावासात त्यांनी गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला.
  • टिळकांनी लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी ‘केसरी’ आणि ‘मराठा’ ही वृत्तपत्रे प्रकाशित केली.
  • १९१४ मध्ये कारावासातून सुटका झाल्यानंतर त्यांनी अनेक सामाजिक कार्ये केली.
  • शेवटी वयाच्या ६४ व्या वर्षी १ ऑगस्ट १९२० रोजी टिळकांना वीरमरण आले.

लोकमान्य टिळक स्मारक

पुण्यात टिळक स्मारक मंदिर नावाचे नाट्यगृह त्यांच्या सन्मानार्थ स्मारक म्हणून उभारण्यात आले आहे, पुण्यातील टिळक रस्त्यावर ही वास्तू उभी आहे. टिळक स्मारक मंदिर म्हणजे पुण्यातील राजकीय, धार्मिक, शैक्षणिक आणि सामाजिक चळवळीचे माहेरघरच आहे. स्मारकाचे बांधकाम १७७२ – १७७६ या सालांदरम्यान पुरे झाले. बांधकामास सुमारे ४५ लाख इतका खर्च आला. गोपाळराव देऊसकरांनी घडवलेला टिळकांचा पुतळा आणि रंगवलेली भित्तिचित्रे हे या स्मारकाचे वैशिष्ट्य आहे. याशिवाय 2007 मध्ये भारत सरकारने त्यांच्या स्मारकात एक नाणे जारी केले. यासोबतच लोकमान्य एक युगपुरुष या नावाने त्याच्यावर एक चित्रपट तयार करण्यात आला आहे.

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे एक महान क्रांतिकारक आणि राष्ट्रवादी नेते होते ज्यांनी आपल्या क्रांतिकारक विचारांच्या माध्यमातून लोकांमध्ये स्वराज्य मिळविण्याची इच्छाच जागृत केली नाही तर समाजातील सर्व दुष्परिणामांना दूर करून आणि लोकांना एकतेने बांधून, गणेशोत्सव, शिवजयंती आणि इतर कार्यक्रमही सुरू झाले. लोकमान्य टिळक यांनी देशासाठी केलेले बलिदान व त्याग कधीच विसरता येणार नाहीत. हे राष्ट्र त्यांच्या कृतज्ञतेसाठी नेहमी ऋणी असेल. अशा महान माणसाचा जन्म भारतात होणे ही अभिमानाची बाब आहे.

लाल बाल पाल

लाला लजपतराय ,बाळ गंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र पाल हे ब्रिटिशांविरुद्ध एकमेकांशी विचाराने जवळ आले होते. त्यांचे विचार ब्रिटिशांना देशातून परतावून लावणे हा उद्देश होता. या लाल बाल पाल यांचे विचार एकमेकांशी मिळतेजुळते असल्यामुळे या तिन्ही जणांना लाल बाल पाल  असेच संबोधले जात होते.

या त्रिमूर्तींनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे राजकीय समीकरणे बदलले. लाल बाल पाल यांनी बंगालच्या फाळणीच्या विरोधात देशभरातील भारतीयांना एकत्र केले आणि बंगालमध्ये सुरू झालेली निदर्शने, संप आणि ब्रिटीश वस्तूंवर बहिष्कार राजाच्या विरोधात व्यापक निषेध म्हणून लवकरच इतर प्रदेशांमध्ये पसरला.

जहाल आणि मवाळ गट

इंग्रजांना भारतातून हाकलून लावण्यासाठी जहाल आणि मवाळवादी असे दोन गट निर्माण झाले होते. मवाळवादी गट हा इंग्रजांना अर्ज, विनंती करून आपल्या देशाची खरी परिस्थिती सांगून आमच्या देशातून निघून जावे आणि आम्हाला स्वातंत्र्य द्यावे अशी विनंती करणारे मवाळवादी होते.ब्रिटिशांच्या मार्जित राहून आपल्या सनदशीर मागण्या सुधारणा आपल्या पदरात पडून घ्याव्यात अशी या गटाची भूमिका होती. या मवाळ गटामध्ये नामदार गोखले आणि महात्मा गांधी यांचा समावेश होता. दोन्ही पक्षाचे अंतिम ध्येय एकच होते.

जहालवादी यांची भूमिका अशी होती की इंग्रज हे भारतातून सहजासहजी जाणार नाहीत. त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर द्यावे. म्हणून त्यांना प्रतिकार करावा आणि या देशातून त्यांना सळो की पळो  करून, त्यांना येथून हाकलून लावणे असाच पर्याय दिसतो. तसेच जहालवादी गटाचे असे मत होते की स्वतंत्र देशातील सनदशीर चळवळ आणि परतंत्र देशातील चळवळ यामध्ये खूप फरक आहे.

स्वतंत्र देशात सनदशीर चळवळीकडे राज्यकर्ते लक्ष देतात पण भारतासारख्या परतंत्र देशात अजिबात लक्ष देत नाहीत. म्हणूनच सशस्त्र प्रतिकाराची वेळ घडवून आणणे हेच या गटाचे ध्येय होते. म्हणून जहालवादी  आणि मवाळवादी असे दोन गट तयार झाले होते. टिळक हे एक जहालवादी गटातील अग्रगण्य असे नेतृत्व करणारे महत्त्वाचे नेते होते.

लोकमान्य टिळक यांचे पुतळे

महाराष्ट्रात लोकमान्य टिळकांचे बरेच पुतळे आहेत, त्या पुतळ्यापैकी काहींना विशेष इतिहास आहे. टिळकांचे पुतळे असलेल्या काही शहरांची आणि तेथील लोकमान्य टिळकांच्या काही पुतळ्यांची यादी पुढे दिली आहे :-

  • निगडी (पुणे)
  • मुंबई (गिरगांव चौपाटी) : हा टिळकांचा पहिला पुतळा – टिळकांच्या हयातीतच शिल्पकार रघुनाथ फडके यांनी टिळकांना समोर बसवून बनवला.
  • रत्नागिरी – टिळकांच्या राहत्या घराच्या केलेल्या स्मारकात
  • इचलकरंजी राजवाडा चौक टिळक रोड
  • सोलापूर टिळक चौकात शाम सारंग यांनी तयार केलेला पुर्णाकृती पुतळा आहे.
  • तळोदा – नंदुरबार
  • अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांसोबत लोकमान्य टिळकांचा देखील पुतळा उभारण्यात येणार आहे.
  • खामगाव बुलढाणा
  • नागपूर
  • बार्शी भाजी मंडई
  • नवी दिल्ली महाराष्ट्र सदन
  • पुणे भाजी मंडई – फुले मार्केट – रे मार्केट
  • टिळक स्मारक मंदिर, केसरी वाडा गायकवाड वाडा
  • बोरिवली मुंबई

लोकमान्य टिळक यांच्यावरील चित्रपट

  • “लोकमान्य : एक युगपुरुष” (दिग्दर्शक – ओम राऊत, टिळकांच्या भूमिकेत सुबोध भावे) – इ.स. २०१५.

टिळकांवर लिहिलेली पुस्तके

  • लोकमान्य टिळक दर्शन, लेखक : भालचंद्र दत्तात्रेय खेर
  • टिळकांची पत्रे, संपादक : एम. धोंडोपंत विद्वांस
  • लोकमान्यांची सिंहगर्जना, लेखक गिरीश दाबके
  • लाल,बाल,पाल लेख लेखक इंद्रजित नाझरे
  • लोकमान्य व लोकराजा लेख लेखक इंद्रजित नाझरे
  • अग्रलेखास्त्र – लेखक शिरीष कुलकर्णी ,लोकव्रत प्रकाशन, पुणे लोकमान्य टिळक यांच्या केसरी या वृत्तपत्रातील अग्रलेखांचा चिकित्सक अभ्यास
  • लोकमान्य ते महात्मा लेखक सदानंद मोरे
  • “दुर्दम्य” नावाची चरित्रात्मक कादंबरी प्रा.गंगाधर गाडगीळ
  • टिळक आणि आगरकर – तीन अंकी नाटक, लेखक विश्राम बेडेकर
  • मंडालेचा राजबंदी, लेखक अरविन्द गोखले
  • टिळक भारत, लेखक शि.ल. करंदीकर
  • लोकमान्य टिळक चरित्र व आठवणी (भाग १ ते ६), लेखक प्रा. वामन शिवराम आपटे
  • लोकमान्य टिळक, लेखक पु . ग. सहस्त्रबुद्धे
  • लोकमान्य टिळक यांचे चरित्र (३ खंड), लेखक न. चि. केळकर

लोकमान्य टिळकांशी संबंधित तथ्यांची यादी

  • टिळकांनी भारतात स्वदेशी चळवळ सुरू केली आणि तिला चालना देण्यासाठी जमशेदजी टाटा यांच्यासमवेत टिळकांनी बॉम्बे स्वदेशी स्टोअर्सची स्थापना केली.
  • त्यांच्या प्रकाशनात द आर्क्टिक होम इन द वेद (१९०३) समाविष्ट आहेत. जे आर्यांचे मूळ आणि श्रीमद भगवत गीता रहस्य (1915) चे प्रतिनिधित्व करते.
  • टिळकांनी १८७९ मध्ये सरकारी लॉ कॉलेज, मुंबई येथून कायद्याची पदवी प्राप्त केली.
  • भारत सरकारने २००७ मध्ये टिळकांच्या १५० व्या जयंतीनिमित्त एक नाणे सादर केले. इतकेच नाही तर ओम राऊत यांनी लोकमान्य: एक युग पुरुष हा चित्रपट दिग्दर्शित केला जो २ जानेवारी २०१५ रोजी प्रदर्शित झाला.
  • टिळकांनी इंग्रजांनी भारतातील शिक्षण पद्धतीवर जोरदार टीका केली, म्हणून त्यांनी भारतीय विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रवादी शिक्षणाची प्रेरणा देण्याच्या उद्देशाने गोपाळ गणेश आगरकर आणि विष्णूशास्त्री चिपळूणकर यांच्यासोबत डेक्कन एज्युकेशनल सोसायटी सुरू केली.
  • टिळकांनी अँनी बेझंट, जोसेफ बाप्टिस्टा आणि मुहम्मद अली जिना यांच्यासमवेत १९१६ मध्ये ऑल इंडिया होम रूल लीगची स्थापना केली. त्याच वर्षी, त्यांनी जिनांसोबत लखनौ करार केला, ज्याने राष्ट्रवादी संघर्षात हिंदू-मुस्लिम ऐक्यासाठी तरतूद केली.
  • टिळकांनी मराठीतील ‘केसरी’ आणि इंग्रजीत ‘मराठा ’ ही दोन वृत्तपत्रे काढली. दोन्ही वृत्तपत्रांनी राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या कारणाचा सक्रियपणे प्रचार केला आणि भारतीयांना स्वावलंबी होण्यासाठी जागरूक करण्यावर भर दिला.
  • त्यांनी दोन महत्त्वाचे सण सुरू केले. १८९५ मध्ये शिवाजी जयंती आणि १८९३ मध्ये गणेशोत्सव. कारण भगवान गणेशाची सर्व हिंदूंनी पूजा केली आणि शिवाजी कारण ते पहिले हिंदू शासक होते ज्यांनी भारतातील मुस्लिम सत्तेविरुद्ध लढा दिला आणि १७ व्या शतकात मराठा साम्राज्याची स्थापना केली.

लोकमान्य टिळकांच्या प्रसिद्ध अग्रलेखांची यादी

टिळकांनी १८८१ ते १९२० या चाळीस वर्षांच्या काळात एकूण ५१३ अग्रलेख लिहिले, त्यापैकी काही प्रसिद्ध अग्रलेख खालीलप्रमाणे

  • हे आमचे गुरूच नव्हेत
  • टिळक सुटले पुढे काय
  • सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय
  • प्रिन्सिपॉल, शिशुपाल की पशुपाल
  • टोणग्याचे आचळ
  • बादशहा ब्राह्मण
  • उजाडले पण सूर्य कुठे आहे

प्रश्न

लोकमान्य टिळकांना लोकमान्य का म्हणतात?

लोकमान्य टिळकांना “लोकमान्य” ही पदवी बहाल करण्यात आली, ज्याचा अर्थ “लोकांनी त्यांचा (नेता म्हणून) स्वीकार केला” असा होतो. कारण ते अन्यायाविरुद्ध, गुलामगिरीविरुद्ध पेटून उठून आपली ज्वलंत लेखणी आणि विचारांद्वारे जनतेला स्वराज्याचे बाळकडू पाजणारे, सार्वजनिक उत्सवांच्या माध्यमातून समाजामध्ये एकात्मतेची भावना निर्माण करणारे महान स्वातंत्र्यसेनानी तसेच “स्वराज्य हा माझा जन्म सिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच.” असे म्हणणारे टिळक हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे पहिले नेते होते. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्यांना “भारतीय असंतोषाचे जनक” म्हटले.

लोकमान्य टिळकांची मंडालेच्या तुरुंगातून सुटका किती साली झाली?

म्यानमारच्या तुरुंगात कैद झालेले पहिले भारतीय नेते लोकमान्य टिळक होते. टिळकांची 1914 साली मंडालेमधून सुटका झाली आणि त्यानंतर ते पुण्यात परतले तेव्हा पुण्यात मोठा जल्लोष साजरा करण्यात आला होता

लोकमान्य टिळकांना भारतीय अशांततेचे जनक कोण म्हणाले?

व्हॅलेंटाइन चिरोल या प्रख्यात ब्रिटिश पत्रकाराने बाळ गंगाधर टिळकांना “भारतीय अशांततेचे जनक” ही पदवी दिली.

लोकमान्य टिळक यांचे राजकीय गुरू कोण?

मौलाना शौकत अली यांना ‘टिळक आपले राजकीय गुरु’ असल्याचे सांगत असत.

लोकमान्य टिळकांचा जन्म किती साली झाला?

लोकमान्य टिळकांचा जन्म 23 जुलै 1856 चिखलगांव ता. दापोली जि. रत्नागिरी या ठिकाणी झाला.

निष्कर्ष

मित्रहो, या आजच्या लेखा द्वारे आम्ही आपणास टिळकांच्या जीवनाबद्दल माहिती सांगितली आहे. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. लेख आवडल्यास तुमच्या इतर मित्रपरिवारांसोबत नक्की शेयर करा. धन्यवाद.

Leave a comment