हरिहरेश्वर माहिती मराठी : HARIHARESHWAR INFORMATION IN MARATHI

HARIHARESHWAR INFORMATION IN MARATHI | हरिहरेश्वर माहिती मराठी – दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असणारे, “श्री क्षेत्र हरिहरेश्वर” हे कोकणातील एक निसर्गरम्य व पवित्र तीर्थस्थान आहे. अगस्ती मुनींनी स्थापिलेले, अतिप्राचीन दगडी कलाकृतीने नटलेले, टेकड्यांनी वेढलेले, माडबागा व वनश्रीने समृद्ध, गायत्री व सावित्री नद्यांच्या संगम स्थानी उभारलेले, अतिशय देखणे व सुंदर मंदिर आहे.

Table of Contents

हरिहरेश्वर माहिती मराठी : HARIHARESHWAR INFORMATION IN MARATHI

ठिकाणहरिहरेश्वर समुद्रकिनारा
स्थान श्री क्षेत्र हरिहरेश्वर
मंदिर –भागवान शंकर
जिल्हा –रायगड
अंतर –मुंबई 230 किलोमीटर
पुणे 180 किलोमीटरवर
जीर्णोद्धार इसवी सन 1723
जवळील प्रेक्षणीय स्थळेबागमंडला बीच, बाणकोट किल्ला, हरिहरेश्वर बीच, काळभैरव मंदिर

श्री क्षेत्र हरिहरेश्वर मंदिर माहिती प्रस्तावना (Harihareshwar Mandir Information In Marathi)

पुराणातही पांडवांनी “श्री क्षेत्र हरिहरेश्वर” मंदिराला भेट दिल्याचा उल्लेख आहे. तसेच हरिहरेश्वर हे पेशव्यांचे कुलदैवत होते. इसवी सन १७२३ साली श्रीमंत पहिले बाजीराव पेशवे, यांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केला होता. हरिहरेश्वर, काळभैरव, योगेश्वरी, सिद्धिविनायक व हनुमान अशा चार मंदिरांच्या दर्शनानंतर विष्णुपद, गायत्री तीर्थ, वक्रतीर्थ, सूर्यतीर्थ, यज्ञकुंड अशी अनेक ठिकाण हरिहरेश्वरमध्ये पाहण्यासारखी आहेत.

त्यानंतर जवळच पसरलेला समुद्रकिनारा, पर्यटकांचे लक्ष वेधून घेतो. समुद्रातील लाटांचे विहंगम दृश्य खूपच सुंदर आहे. पक्षांची सदाबहार गाणी, सभोवताली विस्तारलेली वनराई, मनाला सुखावून जाते. आयुष्यातील सर्व काळजी या पवित्रस्थानी भेट दिल्यावर आपोआप नाहीशी होते.

आज आम्ही आमच्या हरिहरेश्वर या लेखातून आपणास हरिहरेश्वर मंदिर, व त्या जवळील प्रेक्षणीय स्थळांबद्दल माहिती दिली आहे. चला तर पाहू “श्री क्षेत्र हरिहरेश्वर”.

हरीहरेश्वर मंदिर नकाशा

हरिहरेश्वर मंदिर माहिती मराठी (Harihareshwar Temple Information In Marathi)

आपण कोकणपट्टीतील एक निसर्गरम्य असे, पवित्र तीर्थस्थान असलेल्या हरिहरेश्वर मंदिराबद्दल जाणून घेणार आहोत.

‘दक्षिण काशी’ पैकी एक म्हणून ओळखले जाणारे, हरिहरेश्वर मंदिर हे एक प्राचीन मंदिर आहे, जे भगवान शिवाचे पवित्र आहे. हरिहरेश्वराच्या उत्तरेकडील किनार्‍याकडे असलेले हे मंदिर नैसर्गिक सौंदर्य आणि आध्यात्मिक संवर्धनाचे एक मेळ आहे. त्या मंदिराला धार्मिकदृष्ट्या आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाबळेश्वर येथे उगम पावणारी पवित्र सावित्री नदी, हरिहरेश्वर येथे अरबी समुद्रात विलीन होते. हरिहरेश्वर मंदिराला ‘देवघर’ किंवा ‘देवाचे घर’ असेही म्हणतात.

प्राचीन मंदिराच्या आत ‘लिंग’ आहे. मध्ययुगीन काळात मंदिराच्या उभारणीत पेशव्यांनी हातभार लावला. मध्ययुगीन कालखंडाच्या उत्तरार्धात बांधले गेले असे मानले जाते, मंदिराचे मुख्य देवता पेशव्यांच्या ‘कुलदैवत’ होते, जे महान मराठा साम्राज्याचे पंतप्रधान होते. मंदिराभोवतीचा ‘प्रदक्षिणा मार्ग’ चंद्रराव मोरे यांनी बांधला. 1674 मध्येही छत्रपती शिवाजी महाराजांनी हरिहरेश्वर मंदिराला भेट दिली आहे. नंतर, आगीत जवळजवळ उद्ध्वस्त झाल्यानंतर बाजीराव पेशवे प्रथम यांनी 1723 मध्ये मंदिराचा संपूर्ण जीर्णोद्धार केला.

मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात शिव, पार्वती, विष्णू आणि ब्रह्मदेवाच्या लिंगाच्या आकाराच्या मूर्ती आहेत. मंदिराच्या अगदी जवळ, आणखी दोन मंदिरे आहेत – भगवान कालभैरव आणि देवी योगेश्वरी, ज्यांना देखील भेट दिली पाहिजे. याशिवाय, पर्यटक हिम्मतगड किल्ल्याला भेट देऊ शकतात, जेथे फेरीने पोहोचता येते.

दुसऱ्या बाजूला नयनरम्य निळा समुद्र, व रुपेरी वाळूने आकर्षित करणारा अमर्याद समुद्रकिनारा, तसेच नारळीच्या बागांच्या साक्षीने आणि डोंगररांगांच्या कुशीत वसलेले श्री क्षेत्र हरिहरेश्वर हे एक पवित्र  तीर्थस्थान आहे.

Harihareshwar Temple

हरिहरेश्वर मंदिर इतिहास (Harihareshwar Temple History)

  • कालभैरव, योगेश्वरी, सिद्धिविनायक व हनुमान हि समुद्रकिनारी असणारी चार मंदिरांच्या दर्शनानंतर विष्णुपद, गायत्री तीर्थ, वक्रतीर्थ, सूर्यतिर्थ अशी अनेक ठिकाणे आहेत. कर्नाटकातील गोकर्ण ते ठाणे जिल्ह्यातील ५०० मैलाच दक्षिणोत्तर अंतर व ४८ मैल रुंद एवढा प्रचंड परिसर हा श्री हरिहरेश्वरचा परिसर मानण्यात येतो.
  • या हरिहरेश्वर क्षेत्राच्या दक्षिण दिशेला व उत्तर दिशेला बारा ज्योतिर्लिंग स्थानी आहे. देशात एकूण १०८ तीर्थस्थाने असली तरी, प्रमुख हरिहरेश्वर आहे असे मानले जाते. आणि हरिहरेश्वर महापवित्र क्षेत्र असा उल्लेख श्री हरिहरेश्वर महात्म्य पोथी मध्ये आहे.
  • हरिहर नावाच्या पश्चिमाभिमुख असलेल्या देवात हरी स्वरूप व हरस्वरूप या दोन्हींचा संगम झाला आहे. रायगड जिल्ह्यात असलेले हे श्री क्षेत्र हरिहरेश्वर हे स्थान दक्षिणकाशी म्हणून प्रसिद्ध आहे. हरिहरेश्वरला भारतातील एक महत्त्वाचे तीर्थस्थान मानले जाते.
  • हरिहरेश्वर हे गाव ब्रह्मगिरी, विष्णुगिरी, शिवगिरी, व पार्वती या चार टेकड्यांच्या कुशीत आहे. गावाच्या उत्तरेकडे हरिहरेश्वराचे देऊळ आहे.
  • या क्षेत्रात भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळाला असल्याचे मानले जाते. त्यामुळे याचा संदर्भ देवघर किंवा देवाचे निवासस्थान असाही दिला जातो.
  • श्री हरीहरेश्वर हे शिवस्थान पेशव्यांचे कुलदैवत आहे. येथे असलेली काळभैरव आणि श्री योगेश्वरी यांची देवळे देखील महत्त्वाच्या स्थानी आहेत.
  • श्री हरीहरेश्वर मंदिरे बरेच जुने आहे. ते शिवकालीन असावे असा अंदाज आहे. परंतु, बांधकामाचा निश्चित कालखंड सांगता येत नाही.
  • पहिल्या बाजीरावाने या मंदिराचा जिर्णोधार १७२३ मध्ये केल्याचे पुरावे आहेत. येथील सर्व देवळांना खास कोकणी पद्धतीची उतरती चप्री आहे. हरिहरेश्वर क्षेत्रातील सर्वात महत्त्वाचे देऊळ काळाभैरवाचे आहे.

हरिहरेश्वरची आख्यायिका (Harihareshwar Mandir Story)

याची एक आख्यायिका अशी आहे की, बळीराजाकडून तीन पावले भूमि घेताना, वामनाने ठेवलेले दुसरे पाऊल हरिहरेश्वर पासून सुरू झाले.

  • सर्वसाधारणपणे प्रथम काळाभैरवाचे दर्शन, नंतर हरिहरेश्वराचे दर्शन करून, परत काळाभैरवाचे दर्शन घ्यावे, अशी प्रथा येथे आहे.
  • या क्षेत्रात चार टेकड्या आहेत. त्यांच्यासारखी रचना हरिहरेश्वरच्या लिंगावर दिसून येते. या दोन्ही देवळात दर्शन घेतल्यावर कराव्या लागणाऱ्या प्रदर्शनेचा मार्ग डोंगर आणि समुद्राजवळच्या, खडकावरून जातो.
  • या मार्गावरील दीडशे पायऱ्या खाली उतरून त्या डोंगराचे प्रदक्षिणा केली जाते. या संपूर्ण प्रदक्षिणेचे अंतर एक कोस असल्याने तिला “कोसाची” प्रदक्षिणा असे म्हणतात. या मार्गातून दिसणारा समुद्र आणि तिथले सृष्टी सौंदर्य डोळ्याचे पारणे फेडणारे आहे.
  • या क्षेत्राला नयनरम्य समुद्रकिनारा लाभला आहे. येथे फेसाळणाऱ्या समुद्राच्या लाटा आणि त्या लाटांचा नाद आपल्या कानात घुमू लागतो. त्या लाटांची लय आपल्या तरंगातून दिसून येते. या सागराचे संगीत ऐकताना एकदम शांत वाटतं.

मुख्य शहर ते हरिहरेश्वर मंदिर अंतर व त्यासाठी लागणारा कालावधी

मुंबई ते हरिहरेश्वर – मुंबई ते हरिहरेश्वर हे अंतर साधारणतः २३० किलोमीटर एवढे असून, प्रवासासाठी अंदाजे चार तास लागू शकतात.

पुणे ते हरिहरेश्वर अंतर – पुणे ते हरिहरेश्वर हे अंतर साधारणतः १८० किलोमीटर एवढे असून, प्रवासासाठी तीन ते चार तास लागू शकतात.

पर्यटन कालावधी – हरिहरेश्वर व त्या जवळील प्रेक्षणीय स्थळे एक्सप्लोर करण्यासाठी, अंदाजे तुम्हाला दोन ते तीन दिवस लागू शकतात.

हरीहरेश्वर व्हिडिओ

हरिहरेश्वर जवळील प्रेक्षणीय स्थळे

हरिहरेश्वर बीच (Harihareshwar Beach Information In Marathi)

  • सुंदर सफेद व फेसाळ लाटांचा निळसर समुद्र व संध्याकाळच्या वेळेचा सूर्यास्त व सकाळच्या वेळेचा सूर्योदय यांचे प्रत्यक्षात दर्शन घ्यायचे असल्यास नक्कीच तुम्ही हरिहरेश्वर समुद्रकिनारा भेट द्यावी. हा समुद्र त्याच्या नावाप्रमाणेच अतिशय स्वच्छ व सुंदर आहे.
  • या समुद्रामध्ये विविध प्रकारचे वॉटर स्पोर्ट ऍक्टिव्हिटीज देखील केले जातात. जसे स्पीड बोट राईड किंवा वॉटर स्कूटर राईटचा आनंद घेऊ शकता.
  • हरिहरेश्वर समुद्रकिनारा हा प्रदूषणमुक्त तुमच्या कुटुंबासह त्या मित्रपरिवारांसह वेळ घालवण्यासाठी एक आदर्श ठिकाण आहे. या समुद्रकिनाऱ्याजवळ असणाऱ्या हरिहर टेकडीमुळे या समुद्रकिनाऱ्याला एक वेगळेच आकर्षण आहे.

बागमंडला बीच – Bhagamandala Harihareshwar

हरिहरेश्वर जवळील हे एक प्रेक्षणीय स्थळांपैकी प्रसिद्ध स्थळ असून, हरिहरेश्वर पासून काही मीटर अंतरावर वसलेले एक छोटेसे गाव आहे. बागमांडला बीच हा बीच हरिहरेश्वर जवळील एक अतिशय स्वच्छ आणि निर्जन समुद्रकिनारा आहे. या बीचवर असणारी पांढरी शुभ्र वाळू आणि किनाऱ्यावर असणारे स्वच्छ पाणी, पाहून मन अगदी थक्क होऊन जाईल. हे एक प्रसिद्ध सुंदर व नैसर्गिक दृष्ट्या सुंदर ठिकाण असून पर्यटकांच्या आकर्षणाचे प्रमुख केंद्र आहे.

बाणकोट किल्ला

(हरिहरेश्वर मराठी माहिती) बागमंडला या ठिकाणी असलेला बाणकोट किल्ला, हरिहरेश्वर पासून काही मीटर अंतरावर असून, हा किल्ला ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचा आहे. या ठिकाणी असणारे हिरवेगार जंगल, अतिशय विलोभनीय आहे. स्थानिक व पर्यटक बागमंडला खाडीतून बोटीने बाणकोट किल्ल्यावर जातात.

गणेश गल्ली

  • हरिहरेश्वर मंदिराच्या पाठच्या बाजूने जाणारी गणेश गल्ली हा एक छोटासा रस्ता असून, साधारणता याला शंभर ते दीडशे पायऱ्या आहेत. दोन पर्वतांच्या मध्ये असलेला हा एक अरुंद कालवा आहे. गणेश गल्लीच्या शेवटी गणपतीची मूर्ती आहे.
  • ही मूर्ती या ठिकाणी सापडली म्हणून, या गल्लीला गणेश गल्ली असे नाव देण्यात आले. हे एक पवित्र व आध्यात्मिक स्थान समजले जाते. जे सुमारे ३० फूट एवढे पाण्याखाली आहे. भरतीच्या किंवा ओहोटीच्या वेळी या ठिकाणचे गणपतीची मूर्ती स्पष्टपणे दिसते असे समजले जाते.

कालभैरव मंदिर

  • हरिहरेश्वर मधील कालभैरव मंदिर हे एक प्रसिद्ध व प्राचीन मंदिर असून, वर्षभरात या मंदिराला भेट देण्यासाठी हजारो भाविक येत असतात. हे मंदिर भगवान शिवशंभु यांचे आहे. येथे सापडलेल्या बऱ्याच मुर्त्यांपैकी काळभैरव यांची मूर्ती देखील आहे.
  • या मंदिराची वास्तू अतिशय सुंदर व जवळच योगेश्वरी मंदिर ज्याला दक्षिण काशी या नावाने नावाजले जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी या ठिकाणी भगवान शंकरांचा आशीर्वाद घेण्यासाठी लांबचा पल्ला गाठून भाविक हजारोंनी भेट देतात.

सोमजाई माता मंदिर

  • हे ठिकाण हरिहरेश्वर जवळील प्रसिद्ध धार्मिक ठिकाण आहे. सोमजाई देवीचे मंदिर हे अगदी प्राचीन मंदिर आहे. या मंदिराची स्थापना ही अगस्त मुनींनी केली आहे, असे म्हटले जाते. शहराच्या मध्य भागामध्ये तांबडी या टेकडीच्या पायथ्याशी हे मंदिर वसलेले आहे.
  • नक्षीदार लाकडी काम येते येणाऱ्या पर्यटना आकर्षित करत असते. जवळजवळ अडीचशे वर्षांपूर्वी पेशव्यांनी या मंदिराचा जिर्णोधार केला होता.

लक्ष्मीनारायण मंदिर

हरिहरेश्वर जवळील लक्ष्मीनारायण हे मंदिर शिल्पकलेचा एक अप्रतिम नमुना आहे. हे मंदिर भगवान विष्णूला समर्पित आहे. या मंदिरामध्ये असणारी भगवान विष्णूची मूर्ती ही शिल्पाकृती आहे. काळा पाषाणात कोरलेली दक्षिण भारतीय शैलीची ही मूर्ती शिलाहार काळातील असावी, असे म्हटले जाते. हरिहरेश्वरला भेट देणारे अनेक पर्यटक या ठिकाणी येत असतात.

हरिहरेश्वर जवळ करण्यासारख्या गोष्टी (Things to do in Harihareshwar)

  • हरिहरेश्वर या ठिकाणी असणाऱ्या विविध प्रेक्षणीय स्थळांपैकी हरिहरेश्वर मध्ये असणारी प्राचीन मंदिरे देखील खूप महत्वाची आहे. या ठिकाणी तुम्ही काळभैरव मंदिर, हरिहरेश्वर मंदिर, यज्ञेश्वर मंदिर यांसारख्या विविध प्राचीन मंदिरांना भेट देऊ शकता.
  • हरिहरेश्वरला लाभलेला हरिहरेश्वर बीच अतिशय सुंदर व स्वच्छ बीच आहे. या बीचवर तुम्ही सुट्टीच्या दिवशी वेळ घालवू शकता. व समुद्रकिनारी राहून सूर्यास्त व सूर्योदयाची चित्त थरारक दृश्य अनुभवू शकतात.

हरिहरेश्वरला कसे जावे ?(How To Reach Harihareshwar)

हरिहरेश्वरला जाण्यासाठी तुम्ही खालील तीन पर्यायांचा वापर करू शकता .

हवाई मार्ग – हरिहरेश्वर मध्ये कोणतेही विमानतळ नाही. मुंबईवरून जर तुम्ही हरिहरेश्वरला भेट देत असाल, तर “छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ” हे जवळचे विमानतळ असून हे साधारणतः २०२ किलोमीटर इतक्या अंतरावर आहे. पुण्यावरून जर तुम्ही हरिहरेश्वर या प्रेक्षणीय स्थळाला भेट देत असाल, तर “पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ” हे जवळील विमानतळ आहे.

रेल्वे मार्ग – हरिहरेश्वर या ठिकाणी कोणतेही रेल्वे स्थानक नाही. परंतु माणगाव हे हरिहरेश्वर जवळील सर्वात जवळचे रेल्वे स्थानक आहे. माणगावला उतरून तुम्ही ऑटो बुक करून हरिहरेश्वरला जाऊ शकता.

रस्ते मार्ग – हरिहरेश्वरला जाण्यासाठी तुम्ही तुमच्या स्वतःच्या गाडीने किंवा ऑटोने किंवा टॅक्सीने जाऊ शकता. त्याचप्रमाणे तुम्ही राज्य परिवहन मंडळाच्या बसेसने देखील हरिहरेश्वरला भेट देऊ शकता.

Harihareshwar beach

हरिहरेश्वरला भेट देण्यासाठी सर्वोत्तम महिना कोणता? (Best Time To Visit Harihareshwar)

  • हरिहरेश्वर हे आध्यात्मिक दृष्ट्या प्रसिद्ध असणारे, शिवशंभू यांना समर्पित असलेले तीर्थक्षेत्र आहे. जे “दक्षिण काशी” म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी भेट देण्यासाठी डिसेंबर ते फेब्रुवारी हा सर्वोत्तम महिना समजला जातो. या वेळी हरिहरेश्वरला मोठ्या प्रमाणात गर्दी असते .
  • फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत किंवा मार्चच्या सुरुवातीला असणाऱ्या महाशिवरात्रीसाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी असते. आवर्जून मोठ्या प्रमाणात भक्तगण हरिहरेश्वर या पवित्र स्थानी भेट देण्यासाठी येत असतात.

हरिहरेश्वर मध्ये राहण्याची सुविधा

  • हरिहरेश्वर मध्ये राहण्याची उत्तम सोय आहे. येथे “महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाचे विश्राम गृह” आहे. येथे पर्यटकांना सर्व सोयी मिळतील.
  • हरिहरेश्वर मंदिराचाच भक्तनिवास आहे.
  • हरिहरेश्वरमध्ये खाजगी हॉटेल ही बरीच आहेत.
  • घरगुती राहण्याची अगदी स्वस्तात सोयही येथे होते. त्यामुळे कोकणी पाहुणचार कसा असतो त्याचा अनुभवही घेता येतो.

हरिहरेश्वर मधील हवामान

पावसाळा – हरिहरेश्वरमध्ये मुख्य ऋतू हा पावसाळा मानला जातो. त्याला लाभलेल्या किनारपट्टीमुळे या ठिकाणी जास्त पाऊस पडतो. हरिहरेश्वरला पावसाळ्याच्या काळात हवामान हे दमट व उबदार असते. तापमान हे साधारणतः ३० अंश सेल्सियस पर्यंत पोहोचते.

उन्हाळा – हरिहरेश्वर मध्ये उन्हाळ्यात गरम व दमट हवामान असते. यावेळी तापमान हे ४०°अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचते.

हिवाळा – इतर दोन्ही ऋतूंच्या तुलनेमध्ये हिवाळ्यात हरिहरेश्वर मध्ये तापमान हे सौम्य असून, सुमारे २८ अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचते.

हरिहरेश्वर जवळील सोयीसुविधा

  • हरिहरेश्वर या ठिकाणी प्रेक्षणीय स्थळे एक्सप्लोर करण्यासाठी, हरिहरेश्वर मध्ये तुमच्या बजेटनुसार उत्तम निवास पर्याय उपलब्ध आहेत, जसे की हॉटेल्स, रिसॉर्ट इत्यादी.
  • हरिहरेश्वर पासून ग्रामीण तसेच खाजगी रुग्णालय साधारणतः ३.३ किलोमीटर अंतरावर आहेत.
  • हरिहरेश्वरला सर्वात जवळचे पोस्ट ऑफिस हे बागमंडला या छोट्याशा गावामध्ये असून, हे ऑफिस साधारणतः ३.६ किलोमीटर अंतरावर आहे.
  • अत्यावश्यक कामासाठी हरिहरेश्वर मध्ये पोलीस स्टेशन मंदिरापासून साधारणतः ०.९ किलोमीटर अंतरावर आहे.

हरिहरेश्वर जवळ राहण्याची सोय

हरिहरेश्वर मंदिर तसेच, हरिहरेश्वर जवळ प्रेक्षणीय स्थळे एक्सप्लोर करण्यासाठी, तुम्हाला तुमच्या बजेटनुसार योग्य हॉटेल्स व रिसॉर्ट हरिहरेश्वर मध्ये उपलब्ध आहेत. त्यापैकीच काही हॉटेल्स व रिसॉर्ट खालील प्रमाणे –

  • १. हरिहरेश्वर बीच रिसॉर्ट
  • २. हरिहरेश्वर ओम श्री फॅमिली होम स्टे
  • ३. गोकुळ पर्यटक निवास
  • ४. हॉटेल आशीर्वाद
  • ५. हरिहरेश्वर विश्रांती रेसिडेन्सी
  • ६. रॉयल ग्रीन रिसॉर्ट, हरिहरेश्वर
  • ७. शिवसागर रेस्टॉरंट अँड होम स्टे
  • ८. हरिहरेश्वर श्रिया ऍग्रो टुरिझम
  • ९. जैन होम स्टे
  • १०. ओम साई गार्डन रेस्टॉरंट

FAQ

हरिहरेश्वर हे ठिकाण कुठे आहे?

हरिहरेश्वर हे महाराष्ट्राच्या कोकण भागातील रायगड जिल्ह्यातील एक किनारपट्टी आहे जीच्या एका बाजूला सह्याद्री पर्वत आणि दुसऱ्या बाजूला अरबी समुद्र आहे. हे अलिबाग शहराच्या दक्षिणेस ८१ किमी अंतरावर असून मुंबईपासून १९२ किमी दूर आणि पुण्यापासून १७५ किमी दूर आहे

हरिहरेश्वर ला काय आहे?

दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असणारे, “श्री क्षेत्र हरिहरेश्वर” हे कोकणातील एक निसर्गरम्य व पवित्र तीर्थस्थान आहे. अगस्ती मुनींनी स्थापिलेले, अतिप्राचीन दगडी कलाकृतीने नटलेले, टेकड्यांनी वेढलेले, माडबागा व वनश्रीने समृद्ध, गायत्री व सावित्री नद्यांच्या संगम स्थानी उभारलेले, अतिशय देखणे व सुंदर मंदिर आहे. हरिहरेश्वर त्याच्या सुंदर समुद्रकिनाऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे, जे एक आदर्श वीकेंड स्थळ आहे.

मुंबईहून हरिहरेश्वरला ट्रेनने कसे जायचे?

हरिहरेश्वरला सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन माणगाव (हरिहरेश्वर पासून 57 किमी) आहे आणि ते पुणे आणि मुंबईशी चांगले जोडलेले आहे.  माणगावला उतरून तुम्ही ऑटो बुक करून हरिहरेश्वरला जाऊ शकता.

हरिहरेश्वर मंदिर कोणी बांधले?

हरिहरेश्वर हे पेशव्यांचे कुलदैवत होते. इसवी सन १७२३ साली श्रीमंत पहिले बाजीराव पेशवे, यांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केला होता. हरिहरेश्वर, काळभैरव, योगेश्वरी, सिद्धिविनायक व हनुमान अशा चार मंदिरांच्या दर्शनानंतर विष्णुपद, गायत्री तीर्थ, वक्रतीर्थ, सूर्यतीर्थ, यज्ञकुंड अशी अनेक ठिकाण हरिहरेश्वरमध्ये पाहण्यासारखी आहेत.

हरिहरेश्वर जवळ तुम्ही कोणत्या गोष्टी करू शकता?

हरिहरेश्वर या ठिकाणी असणाऱ्या विविध प्रेक्षणीय स्थळांपैकी हरिहरेश्वर मध्ये असणारी प्राचीन मंदिरे देखील खूप महत्वाची आहे. या ठिकाणी तुम्ही काळभैरव मंदिर, हरिहरेश्वर मंदिर, यज्ञेश्वर मंदिर यांसारख्या विविध प्राचीन मंदिरांना भेट देऊ शकता. तसेच हरिहरेश्वरला लाभलेला हरिहरेश्वर बीच अतिशय सुंदर व स्वच्छ बीच आहे. या बीचवर तुम्ही सुट्टीच्या दिवशी वेळ घालवू शकता. व समुद्रकिनारी राहून सूर्यास्त व सूर्योदयाची चित्त थरारक दृश्य अनुभवू शकतात.

हरिहरेश्वर या प्रेक्षणीय स्थळाला भेट देण्यासाठी सर्वोत्तम कालावधी कोणता ?

हरिहरेश्वर या प्रेक्षणीय स्थळाला भेट देण्यासाठी डिसेंबर ते फेब्रुवारी हा सर्वोत्तम महिना समजला जातो. या वेळी हरिहरेश्वरला मोठ्या प्रमाणात गर्दी असते . फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत किंवा मार्चच्या सुरुवातीला असणाऱ्या महाशिवरात्रीसाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी असते.

हरिहरेश्वरमध्ये राहण्याची सोय उपलब्ध आहे का?

हरिहरेश्वर मध्ये राहण्याची उत्तम सोय आहे. येथे “महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाचे विश्राम गृह” आहे. येथे पर्यटकांना सर्व सोयी मिळतील.
हरिहरेश्वरमध्ये मंदिराचाच भक्तनिवास आहे.
हरिहरेश्वरमध्ये खाजगी हॉटेलही बरीच आहेत.
घरगुती राहण्याची अगदी स्वस्तात सोयही येथे होते. त्यामुळे कोकणी पाहुणचार कसा असतो त्याचा अनुभवही घेता येतो.

निष्कर्ष

आम्ही आमच्या आजच्या HARIHARESHWAR INFORMATION IN MARATHI या लेखाद्वारे हरीहरेश्वर जवळील प्रेक्षणीय स्थळांबद्दल माहिती, तसेच भेट देण्यासाठी उत्तम महिना, हवामान, हरिहरेश्वर मंदिराबद्दल माहिती दिली आहे.

हा लेख हरिहरेश्वर मंदिर माहिती मराठी, तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून, आम्हाला नक्की कळवा. व लेख आवडल्यास आपल्या मित्रापारीवारांसोबत नक्की शेयर करा.

धन्यवाद.

Leave a comment