इगतपुरी संपूर्ण माहिती मराठी : Igatpuri Information In Marathi : आत्ताच्या काळामध्ये प्रत्येक पर्यटन प्रेमीच्या मनात नवीन जागा एक्सप्लोर करणे व त्या ठिकाणील प्रेक्षणीय स्थळांचा अनुभव घेणे याकडे पसंती असते. आजच्या युगात ट्रॅव्हलिंग करणे हा प्रत्येक पर्यटन प्रेमीचा छंद आहे व पर्यटन प्रेमी हा त्यांचा छंद आवर्जून जोपासतो. तुम्हाला सुद्धा अशा प्रेक्षणीय स्थळांना भेट देण्याची जिज्ञासा मनामध्ये नक्कीच उत्पन्न होत, असेल बरोबर की नाही? तर आम्ही आमच्या लेखातून तुम्हाला Igatpuri hill station मधील काही प्रेक्षणीय, मजेशीर व पावसाळ्यामध्ये भेट देता येतील, अशी पर्यटन स्थळे यांची माहिती देणार आहोत.
इगतपुरी संपूर्ण माहिती मराठी : Igatpuri Information In Marathi
इगतपुरी हे महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्याचे ठिकाण आहे. येथे महिंद्रा आणि महिंद्राचा इंजिने बनवण्याचा कारखाना आहे. तसेच ध्यानाचे शिक्षण देणारे विपश्यना केंद्र देखील आहे. इगतपुरीची उंची साधारण १९०० फुट आहे. इगतपुरी हे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिदध झाले असून या परिसरातील धबधबे पावसाळ्यात पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात. हे घोटी येथील तांदूळ, मुरमुरे व भाजीपाला मिळण्याचे प्रसिद्ध ठिकाण आहे.
इगतपुरी माहिती कोष्टक
ठिकाण | इगतपुरी |
तालुका | इगतपुरी |
जिल्हा | नाशिक |
प्रसिद्धी | पर्यटन स्थळ |
पर्यटन प्रकार | थंड हवेचे ठिकाण |
आकर्षणे |
इगतपुरी नकाशा (Igatpuri Map)
मुख्य शहर ते इगतपुरी अंतर
मुंबई ते इगतपुरी अंतर :- मुंबईवरून इथे पोहोचण्यासाठी तुम्हाला साधारणतः १२० किलोमीटर अंतर पार करावे लागते. यासाठी तुम्हाला २ तास २० मिनिटे लागतात.
पुणे ते इगतपुरी अंतर :- पुण्यावरून इथे पोहोचण्यासाठी तुम्हाला साधारणतः २३८ किलोमीटर अंतर पार करावे लागते यासाठी तुम्हाला ४ तास ४० मिनिटे लागू शकतात.
इगतपुरीचा इतिहास (History Of Igatpuri)
- या ठिकाणाला जुन्या काळामध्ये एटूकपुरा या नावाने ओळखले जात असे.
- हे नाशिक जिल्ह्यामध्ये असून पौराणिक दृष्ट्या नाशिक महत्त्वपूर्ण स्थान आहे.
- असे म्हटले जाते की, भगवान रामाचा भाऊ लक्ष्मण याने रावणाची बहीण शूर्पणखा तिचे नाक ह्याच नाशिकच्या धरतीवर कापले होते. या पौराणिक कथेवरून या जिल्ह्याला नाशिक असे नाव पडले.
- विपश्यना इंटरनॅशनल अकॅडमी हे प्रसिद्ध मेडिटेशन केंद्र असून एस.एन.गोयंका यांनी हे मेडिटेशन केंद्र १९७६ मध्ये स्थापन करण्यासाठी या हिल स्टेशनची निवड केली.
इगतपुरी का प्रसिद्ध आहे ?(Why Igatpuri Hill Station is Famous?)
कॅम्पिंग, रिवर राफ्टिंग, प्राचीन किल्ल्यावर ट्रेक, नद्यांजवळ पिकनिक स्पॉट, प्राचीन मंदिरे इत्यादी गोष्टींचे एकत्रीकरण जर तुम्हाला अनुभवायचे असेल, तर हे योग्य ठिकाण आहे. या गोष्टींमुळे पर्यटक या शहराकडे आकर्षित होतात. अतिशय कमी कालावधीमध्ये हे शहर प्रसिद्ध झाले आहे. हे ठिकाण ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचे असून, या ठिकाणी गडकिल्ले, धबधबे तसेच इतर पर्यटन स्थळे यामुळे इगतपुरीच्या सौंदर्यामध्ये अजून वाढ झाली आहे. हे हिल स्टेशन एक्सप्लोर करताना तुम्हाला तुमच्या बजेटनुसार बजेट फ्रेंडली होम स्टे, हॉटेल्स शहरामध्ये उपलब्ध आहेत. या सर्व गोष्टींमुळे या हिल स्टेशनला महत्त्वपूर्ण हिल स्टेशन म्हणून प्रचिती मिळाली आहे.
इगतपुरी पर्यटन व्हिडिओ (Igatpuri Tourism Video)
इगतपुरी येथे भेट कधी द्यावी? (When To Visit Igatpuri)
मित्रहो पावसाळ्यामध्ये फिरण्याची, निसर्ग एक्सप्लोर करण्याची ओढ ही प्रत्येक पर्यटन प्रेमींना असतेच. यासाठी आपण एका सुंदर, मनाला शांतता देणाऱ्या, जागेच्या शोधात असतो. हा शोध इथे भेट दिल्यानंतर नक्कीच पूर्ण होईल. हे शहर अतिशय थंड व पावसाळ्यामध्ये हिरव्यागार निसर्गाने नटलेले एक सुंदर हिल स्टेशन आहे. या परिसराला भेट देण्यासाठी तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत तुमच्या मित्र परिवारासोबत येऊ शकता. या ठिकाणी असणारे धबधबे, उत्तम रिसॉर्ट व हॉटेलची सुविधा त्याचप्रमाणे हिरवागार निसर्ग, प्राचीन मंदिरे, कॅम्पिंग, पिकनिक स्पॉट, आदींमुळे हे शहर सर्वगुणसंपन्न आहे.
इगतपुरी येथील संस्कृती
धर्म, समुदाय, परंपरा या सगळ्यांच्या एकत्रीकरणातून हे शहर किती सांस्कृतिक दृष्ट्या समृद्ध आहे, याची जाणीव होते. मकर संक्रांति आणि काजवा महोत्सव हे येथील स्थानिक संस्कृती आणि परंपरेची झलक देतात.
इगतपुरी येथे करण्यासारख्या गोष्टी (Things To Do At Igatpuri)
इगतपुरी कॅम्पिंग आणि इगतपुरी ट्रेक (Igatpuri Camping And Igatpuri Trek)
कॅम्पिंग करण्याची इच्छा ही प्रत्येकाच्या मनात नक्कीच असते. ही इच्छा पूर्ण करण्यासाठी कॅम्पिंग साठी योग्य ते ठिकाण शोधले जाते. हे एक कॅम्पिंगसाठी प्रसिद्ध व सुंदर स्थळ आहे. निसर्गाच्या सानिध्यात राहून हिरवाईने वेढलेल्या टेकड्या, तसेच पश्चिम घाटांमधील खोल दऱ्या व नैसर्गिक सौंदर्यता अनुभवण्याचा सर्वोत्तम मार्ग कॅम्पिंग द्वारे तुम्ही अनुभवू शकता.
- त्रिंगलवाडी किल्ला ट्रेक
- देवकुंड कॅम्पिंग आणि ट्रेक
- कळसुबाई ट्रेक
- हरिहार किल्ला ट्रेक
- सांधण व्हॅली ट्रेक
- रतनगड ट्रेक
बोटिंग, लेक राफ्टिंग (Boating At Igatpuri)
इथे पावसाळ्यात तसेच हिवाळ्यात फिरणे अतिशय सुंदर असते. येथील धबधबे, जलाशय आणि नद्यांमध्ये आपण बोटिंग, लेक राफ्टिंग, कायाकिंग ऍक्टिव्हिटी इत्यादी करू शकतो. मित्रहो परिवारासोबत, मित्रमंडळींसोबत व आपल्या प्रियजनांसोबत जर तुम्हाला तुमचा महत्त्वाचा वेळ घालवायचा असल्यास या ठिकाणी तुम्ही निसर्गाच्या सानिध्यामध्ये व नैसर्गिक सौंदर्य अनुभव आणि पिकनिकची मजा घेऊ शकता. या प्रकारांसाठी खालील ठिकाणे आहेत.
- भावली धरण
- अशोका धबधबा
- वैतरणा धरण
- गिरीसागर धबधबा
- तळेगाव तलाव
२१ इगतपुरी पर्यटन स्थळे (21 Places To Visit In Igatpuri)
१. कसारा घाट (Kasara Ghat In Igatpuri)
हे ठिकाण येथील आकर्षक ठिकाणांपैकी एक आहे. हे ठिकाण महाराष्ट्रातील मुंबई-नाशिक या महामार्गावर आहे. मुंबईहून नाशिकला जात असताना हा घाट पाहायला मिळतो. या घाटातून एक रेल्वे मार्ग जातो, जो येथे येणाऱ्या पर्यटकांना आकर्षित करतो.
- अंतर – १९ किलोमीटर
- पर्यटन हंगाम – पावसाळा, हिवाळा
२. कॅमल व्हॅली पॉईंट (Camel Valley Point In Igatpuri)
कॅमल व्हॅली पॉईंट शहराच्या सुंदर ठिकाणांपैकी एक आहे. कारण पावसाळ्यात या ठिकाणचे वातावरण हे हिरवेगार असते. या ठिकाणाहून धबधबे देखील वाहत असतात. पावसाळ्यात संपूर्ण धुक्याच्या वातावरणाने हे ठिकाण भरून गेलेले असते.
- अंतर – ०५ किलोमीटर
- पर्यटन हंगाम – पावसाळा, हिवाळा
३. भावली धरण – गिरीसागर धबधबा (Girisagar Waterfall & Bhavali Dam)
भावली धरण हे या हिल स्टेशन जवळील आकर्षक पर्यटन स्थान आहे. हे एक विशाल धरण आहे. भावली धरणाच्या जवळपासचे निसर्गरम्य नैसर्गिक वैभव पाहण्यासाठी बरेच लोक या ठिकाणी येत असतात. त्याचबरोबर धरणाच्या मागे साठवलेले पाणी हे जवळपासच्या पिकांना सिंचनासाठी आणि पिण्यासाठी वापरले जाते.
- अंतर – १० किलोमीटर
- पर्यटन हंगाम – पावसाळा, हिवाळा
४. जगातीक, इगतपुरी विपश्यना केंद्र – म्यानमार गेट (Igatpuri Vipassana Kendra)
इगतपुरी रेल्वे स्थानकापासून दोन किलोमीटर अंतरावर जगप्रसिद्ध विपश्यना इंटरनॅशनल अकादमी हे ध्यान केंद्र आहे. ह्याला धम्मगिरी ध्यान केंद्र म्हणूनही ओळखले जाते. जगातील सर्वात मोठ्या ध्यान केंद्रांपैकी एक, असे याला मानले जाते.
इसवी सन १९७६ मध्ये या धम्मगिरी ध्यान केंद्राची स्थापना केली गेली. बौद्ध धम्मामध्ये २५०० वर्षांपूर्वी ज्या ध्यानतंत्र्याचा वापर केला होता, ती ध्यान साधना या केंद्रात शिकवली जाते. विपश्यना ही ध्यान धारणेची प्रक्रिया असून यामध्ये आत्मशुद्धी केली जाते. श्वासोच्छ्वासावर नियंत्रण ठेवून, मन एकाग्र करून त्याचा उपयोग शरीर आणि मनाच्या शुद्धतेसाठी केला जातो जात-पात धर्मवीरहित कोणीही येथे ध्यानधारणेत सहभागी होऊन, अहंकारहीन जीवन, मानसिक शुद्धीकरण, शारीरिक आणि मानसिक शांती अनुभवण्यासाठी हे ध्यानतंत्र आत्मसात करू शकतो
हे विपश्यना केंद्र जागतिक विपश्यना संस्थेचे मुख्यालय आहे. याचे प्रवेशद्वार, म्यानमार गेट म्हणून ओळखले जाते. येथे एकावेळी सहाशे पेक्षा जास्त साधक ध्यानधारणा करू शकतात. हा अभ्यासक्रम जवळपास दहा दिवसाचा असतो. जगभरातून साधक इथे येऊन ध्यान धारणेची पद्धत शिकून घेतात.
या दहा दिवसांमध्ये इथे संपूर्ण मौन पाळावे लागते. इथे राहिल्यानंतर त्या दहा दिवसात आपला बाह्य जगाशी कोणताही संपर्क राहत नाही. आपल्या सोबत असलेल्या सहभागींशी बोलणे सुद्धा टाळावे लागते. ध्यान करणे भोजन आणि निवासेवस्था ही विनामूल्य आहे.
- अंतर – ०१ किलोमीटर
- पर्यटन हंगाम – वर्षभर
५. विहीगाव धबधबा – इगतपुरी धबधबा (Vihigaon Waterfall – Igatpuri Waterfall)
विहीगाव धबधबा हा दोन पर्वताच्या मध्यभागी असलेला खोल कोसळणारा अप्रतिम जलप्रपात आहे. हे एक महत्त्वाचे पर्यटन स्थळ आहे. सप्टेंबर ते फेब्रुवारी दरम्यान बरेच पर्यटक या ठिकाणी येत असतात. हे महाराष्ट्राच्या ठाणे जिल्ह्यातील विहिगाव या गावात आहे. हा एक हंगामी धबधबा आहे. विहीगाव धबधबा हा मुंबई आणि नाशिक मधील एक लोकप्रिय ठिकाण आहे. या धबधब्याच्या जवळपासचा परिसर हा अगदी रमणीय आणि मनमोहक आहे.
- अंतर – १३ किलोमीटर
- पर्यटन हंगाम – पावसाळा, हिवाळा
६. त्रिंगलवाडी किल्ला (Tringalwadi Fort )
त्रिंगलवाडी किल्ला हा किल्ला नाशिक जिल्ह्यातील, इगतपुरी तालुक्यातील त्रिंगलवाडी गावात आहे. हे ठिकाण येथील लोकप्रिय पर्यटना स्थान पैकी एक आहे. हा किल्ला ३२३८ फूट इतक्या उंचीवर वसलेला आहे. हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील किल्ला असून तो ट्रेकिंग च्या दृष्टीने चढाई करण्यासाठी सोपा समजला जातो. या किल्ल्याची निर्मिती दहाव्या शतकात झाली असावी. महाराष्ट्रातील बरेच पर्यटक व इतिहास प्रेमी या किल्ल्याला भेट देण्यासाठी येत असतात.
- अंतर – १० किलोमीटर
- पर्यटन हंगाम – वर्षभर
७. कळसुबाई शिखर (Kalsubai Shikhar)
कळसुबाई शिखर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. कळसुबाईचे ट्रेकिंग हे एक लोकप्रिय ट्रेकिंग असून पावसाळ्यात हा मुंबई जवळील एक प्रसिद्ध विकेंड गेटवे आहे. कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर असून सह्याद्रीच्या पर्वतरांगेमध्ये वसलेले आहे. या शिखराची उंची ही १६४६ मीटर इतकी आहे. या शिखराची सुरुवात ही बारी गावाच्या पायथ्यापासून होते.
- अंतर – ३२ किलोमीटर
- पर्यटन हंगाम – वर्षभर
८. कावनई किल्ला (Kavnai Fort)
कावनई किल्ला हा नाशिक मधील एक छोटा किल्ला असून घोटी या गावापासून पश्चिमेला सात किलोमीटर वर आहे. हा किल्ला गिरीदुर्ग असून सोप्या चढाईचा असल्यामुळे, ट्रेकिंग साठी सुद्धा योग्य आहे.
- अंतर – १५ किलोमीटर
- पर्यटन हंगाम – वर्षभर
९. घाटनदेवी मंदिर (Ghatandevi Temple in igatpuri)
घाटनदेवी मंदिर हे इगतपुरी मधील रेल्वे स्टेशन जवळ असलेले महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. ही देवी इथे असलेल्या घाटांची राखणदार असल्याचे मानले जाते. भव्य दरीमध्ये असलेले हे विलक्षण मंदिर अतिशय सुंदर असून येथील वातावरण प्रसन्न असते. मंदिरातील शांत आणि प्रसन्न वातावरण अलौकिक शांततेची अनुभूती देते
- अंतर – ०७ किलोमीटर
- पर्यटन हंगाम – वर्षभर
१०. कुलंग गड (Kulang Fort)
कुलंगगड हा इगतपुरी मध्ये असलेला महाराष्ट्र राज्यातील सर्वात जास्त उंचीवरचा किल्ला म्हणून ओळखला जातो. या किल्ल्याचे शिखर जवळपास ४८०० फूट उंचीवर आहे किल्ल्यावरून आपल्याला आजूबाजूच्या दऱ्यांचे निसर्गरम्य दृश्य दिसते. या किल्ल्यावरून नाणेघाट, धाकोबा आणि कळसुबाई शिखरे दिसतात. अजूनही किल्ल्यावर जुने अवशेष शिल्लक आहेत. किल्ल्याच्या प्रवेशद्वारापाशी एक मोठी गुहा आणि पाण्याची टाकी आहे. दगडामध्ये कोरलेल्या पायऱ्यांवरून चढून आपल्याला किल्ल्यापर्यंत पोहोचता येते
- अंतर – १५ किलोमीटर
- पर्यटन हंगाम – वर्षभर
११. सांधण व्हॅली (Sandhan Valley)
महाराष्ट्राचे ग्रँड कॅनियन म्हणून ओळखली जाणारी सांधण व्हॅली ही भंडारदऱ्या जवळ येते. इगतपुरी मध्ये फिरण्याच्या सर्वोत्तम ठिकाणांपैकी सांधण व्हॅली ही एक आहे. ट्रेकिंगसाठी आणि रोजच्या जीवनाच्या रहाटगाड्यातून बाहेर पडणाऱ्यांसाठी सांधण व्हॅली हा एक अप्रतिम ट्रेक आहे. ही व्हॅली अंदाजे दोन किलोमीटर लांब असून या दरीला सावलीची दरी असेही म्हटले जाते. या दरीच्या आजूबाजूला अलंग, मलंग, कुलंग, मदन, आजोबा, रतनगड अशा पर्वतरांगा आहेत
- अंतर – ६० किलोमीटर
- पर्यटन हंगाम – पावसाळा, हिवाळा
१२. वैतरणा धरण (Vaitarana Dam)
इगतपुरी मधील वैतरणा नदीवर बांधलेले वैतरणा धरण हे येथील प्रमुख आकर्षणापैकी एक आहे. १९५० च्या सुमारास हे धरण बांधले गेले. मुंबई आणि उपनगरातील रहिवाशांसाठी हे धरण म्हणजे पाण्याचा तसेच विजेचा मुख्य स्रोत आहे .पश्चिम घाटात असलेले हे धरण कॅम्पिंग आणि वॉटर ऍक्टिव्हिटी साठी सुद्धा प्रसिद्ध आहे
- अंतर – ३१ किलोमीटर
- पर्यटन हंगाम – वर्षभर
१३. अमृतेश्ववर मंदिर (Amruteshwar Temple)
इगतपुरी मध्ये फिरण्यासारखी काही धार्मिक स्थळे आहेत त्यामध्ये अमृतेश्ववर मंदिर अवर्णनीय आहे. इसवी सनाच्या नवव्या शतकात शिलाहार शासकांनी हे मंदिर बांधले. भगवान शंकर यांचे हे मंदिर आणि वास्तुकला अप्रतिम आहे.
- अंतर – ५८ किलोमीटर
- पर्यटन हंगाम – वर्षभर
१४. दारणा धरण (Darna Dam)
इगतपुरी मध्ये असलेले हे आणखी एक धरण पिकनिक स्पॉट म्हणून अल्पावधीत लोकप्रिय झाले आहे. ब्रिटिश शासनाने इसवी सन 1916 सली दारणा नदीवर हे भव्य धरण बांधले. या धरणाच्या आजूबाजूचा हिरवागार परिसर पावसाळ्यात आपल्याला मंत्रमुग्ध करतो.
- अंतर – ३० किलोमीटर
- पर्यटन हंगाम – पावसाळा, हिवाळा
१५. तळेगाव तलाव (Talegaon Lake)
इगतपुरी मध्ये संध्याकाळचा निवांत फेरफटका मारण्यासाठी तळेगाव तलाव अप्रतिम आहे. सायंकाळच्या वेळी येथील नजारा अतिशय सुंदर दिसतो. मित्रांसोबत, कुटुंबासोबत किंवा एकट्याने आनंदाची आणि शांततेची अनुभूती घेण्यासाठी इथे नक्कीच भेट द्यावी.
- अंतर – ०४ किलोमीटर
- पर्यटन हंगाम – पावसाळा, हिवाळा
१६. माळशेज घाट (Malshej Ghat )
उंच उंच शिखरांवरून कोसळणाऱ्या जलप्रपाताच्या धारा, मुसळधार पाऊस, हिरवळीचा हिरवागार गालिचा, धुक्याची दाट गर्दी, नागमोडी वळणे घेत हिरवाईतून जाणारे डांबरी रस्ते हे सर्व अनुभवायचं असेल तर माळशेज घाटाशिवाय दुसरा पर्याय नाही. पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेल्या माळशेज घाट पावसाळ्यात अधिकच खुलून दिसतो.
- अंतर – ८५ किलोमीटर
- पर्यटन हंगाम – पावसाळा, हिवाळा
१७. औंढा किल्ला नाशिक (Aundha Fort Nashik)
सह्याद्री पर्वतरांगांमध्ये ४३०० फूट उंचीवर असलेला औंढा किल्ला ट्रेकिंग साठी अप्रतिम ठिकाण आहे. कडवा आणि गिरवाडी गावातून हा ट्रेक सुरू करता येतो. सोशल मीडियामुळे औंढा ट्रेक हळूहळू पर्यटकांचे आकर्षण बनू लागले आहे. हा ट्रेक थोडासा अवघड असून माथ्यावरून पट्टा किल्ला, म्हसोबा पर्वत, आड किल्ला ही प्रसिद्ध ठिकाणे आपल्याला पाहता येतात.
- अंतर – ४५ किलोमीटर
- पर्यटन हंगाम – वर्षभर
१८. मानस मंदिर शहापूर (Manas Mandir Shahapur)
हे जैन मंदिर इगतपुरी पासून साधारण ५० किलोमीटर अंतरावर असून यांचे बांधकाम वाखाणण्याजोगे आहे. जैन धर्मीय लोकांचे श्रद्धास्थान असलेले मानस मंदिर एकदा पाहण्यास आणि येथील शांतता अनुभवण्यास नक्कीच योग्य आहे.
- अंतर – ५० किलोमीटर
- पर्यटन हंगाम – वर्षभर
१९. करोली घाट (Karoli ghat)
इगतपुरी मध्ये असलेला करोली घाट हा पावसामध्ये इथे असणारे धबधबे, घनदाट जंगल आणि छोट्या छोट्या ओढ्यांमुळे अतिशय विलोभनीय वाटतो. करोली घाट हा हौशी ट्रेकर्ससाठी पावसातील आवडीचे ठिकाण आहे
- अंतर – ६० किलोमीटर
- पर्यटन हंगाम – पावसाळा, हिवाळा
२०. भातसा रिव्हर व्हॅली (Bhatsa River Valley)
इगतपुरी मधील सुंदर ठिकाणांपैकी एक आहे. पावसाळ्यात या ठिकाणचे वातावरण हे हिरवेगार आणि अप्रतिम असते. या ठिकाणाहून छोटे छोटे धबधबे देखील वाहत असतात. पावसाळ्यात संपूर्ण धुक्याच्या वातावरणाने हे ठिकाण भारून गेलेले असते.
- अंतर – ६० किलोमीटर
- पर्यटन हंगाम – पावसाळा, हिवाळा
२१. कानिफनाथ मंदिर इगतपुरी (Kanifnath Nath Mandir Igatpuri)
हे हिंदू धर्मीय गोसावी मंदिर असून इथे दत्तजयंती, गुरुपौर्णिमा हे उत्सव साजरे केले जातात. ही जागा अतिषय शांतता देते आणि मनाला नवी उभारी देते.
- अंतर – ०२ किलोमीटर
- पर्यटन हंगाम – वर्षभर
इगतपुरी पासून जवळ असलेली पर्यटन स्थळे
१. त्रिंबकेश्वर ज्योतिर्लिंग
- अंतर – ०५ किलोमीटर
- पर्यटन हंगाम – वर्षभर
२. भंडारदरा
- अंतर – ०५ किलोमीटर
- पर्यटन हंगाम – वर्षभर
३. लोणावळा
- अंतर – ०५ किलोमीटर
- पर्यटन हंगाम – पावसाळा, हिवाळा
४. शिर्डी
- अंतर – ०५ किलोमीटर
- पर्यटन हंगाम – वर्षभर
हिल स्टेशनला भेट देण्यासाठी उत्तम कालावधी (Best Time To Visit Igatpuri )
आपल्याला हिरवागार निसर्ग, धबधबे पहायचे असतील आणि पावसात ट्रेकिंगला जायचे असल्यास ऑगस्ट ते नोवेंबर हा कालावधी सर्वोत्तम आहे.
हिवाळ्यात शहराला भेट देण्यासाठी डिसेंबर,जानेवारी आणि फेब्रुवारी हे सर्वोत्तम महिने आहेत .
इगतपुरी येथे कसे जाल ? (How To Reach Igatpuri)
रस्ता मार्ग – मुंबई,पुणे तसेच महाराष्ट्र बाहेरील पर्यटकांसाठी हे हिल स्टेशन हे एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. इथे येण्यासाठी जर तुम्ही रस्ता मार्ग निवडला असाल, तर तुमच्या वैयक्तिक वाहनाने किंवा बसने तुम्ही जाऊ शकता.
रेल्वे मार्ग – इगतपुरी रेल्वे स्थानकावर उतरून तुम्ही कॅब किंवा ऑटो बुक करून इगतपुरी एक्सप्लोर करू शकता.
विमान मार्ग – इथे सध्या तरी विमानतळ उपलब्ध नाही. परंतु जवळच नाशिक हे विमानतळ आहे. हे इगतपुरी पासून साधारणतः ५८ किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे. जर तुम्ही मुंबई किंवा पुणे या ठिकाणहून विमान मार्गाने भेट देत असाल, तर मुंबई एअरपोर्ट व पुणे एअरपोर्ट वरून तुम्ही इगतपुरीला भेट देऊ शकता.
इगतपुरी येथे राहण्याची सोय
१.द डब्ल्यू लेक रिसॉर्ट
हे रिसॉर्ट इगतपुरी मध्ये असून या ठिकाणी तुम्हाला एसी व नॉन एसी रूम उपलब्ध आहेत. त्याचबरोबर स्विमिंग पूल, विनामूल्य ब्रेकफास्ट, विनामूल्य वायफाय, वातानुकूलित रूम्स इत्यादी सोयी सुविधा पुरविल्या जातात. त्याचबरोबर क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, एनएफसी मोबाईल पेमेंट, कॅश इत्यादी पेमेंटच्या सुविधा उपलब्ध आहेत.
२.रेन फॉरेस्ट रिसॉर्ट आणि स्पा
हे रिसॉर्ट इगतपुरी मध्ये असून या ठिकाणी तुम्हाला स्विमिंग पूल, स्पा सुविधा, विनामूल्य पार्किंग, विनामूल्य नाश्ता, विनामूल्य वायफाय इत्यादी सोयी सुविधा उपलब्ध आहेत. तसेच ऍक्टिव्हिटी साठी गेम रूम सुद्धा उपलब्ध आहे.
३.ट्रॉपिकल रिट्रीट लक्झरी रिसॉर्ट आणि स्पा
हे रिसॉर्ट इगतपुरी पिंपरी रोड, रामनगर या ठिकाणी असून, भावली धबधब्यापासून साधारणतः ५ किलोमीटर तर म्यानमार गेट पासून साधारणतः ६ किलोमीटर व त्रिंगलवाडी किल्ल्यापासून १५ किलोमीटर अंतरावर आहे. या रिसॉर्ट मध्ये वाय-फाय ची सुविधा असून तुम्हाला स्विमिंग पूल फ्री पार्किंग नाष्टा इत्यादी सोयी सुविधा सुद्धा पुरवल्या जातात.
४.हॉटेल ग्रँड परिवार
हे हॉटेल नाशिक एक्सप्रेस रोडवर, इगतपुरी या ठिकाणी असून, या ठिकाणी तुम्हाला विनामूल्य पार्किंगची, सुविधा विनामूल्य वायफायची सुविधा, वातानाकुलीत रूम, पूल इत्यादी सोयी सुविधा उपलब्ध आहेत. तसेच तुम्ही या ठिकाणी क्रेडिट कार्डने अथवा डेबिट कार्डने किंवा कॅश देऊन पेमेंट करू शकता, ऍक्टिव्हिटी साठी तुम्हाला या ठिकाणी गेम रूम्स व शॉपिंग इत्यादी उपलब्ध करून दिले जाते.
५. मानस लाइफस्टाइल रिसॉर्ट इगतपुरी (MANAS RESORT IGATPURI)
हे रिसॉर्ट तळेगाव तालुका इगतपुरी महाराष्ट्र मध्ये असून, मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग लगत चार हेक्टर पेक्षा जास्त हिरव्यागार जमिनीवर व इगतपुरी रेल्वे स्थानकापासून साधारणतः पाच किलोमीटर तर अशोका धबधब्यापासून साधारणतः ११ किलोमीटर अंतरावर MANAS RESORT IGATPURI आहे. या ठिकाणी तुम्हाला फ्री वायफाय, फ्री पार्किंग, फ्री नाष्टा, स्विमिंग पूल इत्यादी सोयी सुविधा पुरवल्या जातात. त्याचप्रमाणे तुम्ही क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा कॅशने या हॉटेलचे पेमेंट करू शकता. हॉर्स रायडिंग, गेम्स रूम, नाईट क्लब, टेनिस इत्यादी ऍक्टिव्हिटीज देखील या रिसॉर्ट मध्ये उपलब्ध आहेत.
इगतपुरी हे शहर कसे एक्सप्लोर कराल ?
हे शहर एक्सप्लोर करण्यासाठी तुम्ही खालील पर्यायांचा वापर करू शकता
- कॅब किंवा ऑटो बुक करून तुम्ही हे शहर एक्सप्लोर करू शकता. जर तुम्ही एका दिवसासाठी ऑटो किंवा कॅब बुक केल्यास एका दिवसा मागे साधारणतः तुम्हाला २००० रुपयांपर्यंत खर्च येऊ शकतो.
- जर तुमचे बजेट हे जास्त असल्यास तुम्ही टॅक्सी किंवा कार बुक करून, शहराचा आनंद घेऊ शकता. यासाठी तुम्हाला साधारणतः २००० ते ३००० पर्यंत एका दिवसासाठीचा खर्च येऊ शकतो.
- हे शहर एक्सप्लोर करण्यासाठी, तुमच्या वैयक्तिक बाईकने किंवा स्कुटीने तुम्ही हे शहर एक्सप्लोर करू शकताजर तुम्हाला बाईक किंवा स्कुटी भाड्याने हवी असल्यास, ती सुविधा उपलब्ध आहे. तुम्ही योग्य ती रक्कम देऊन स्कुटी किंवा बाईक भाड्याने घेऊन हे शहर एक्सप्लोर करू शकता.
FAQ
इगतपुरी हिल स्टेशनला भेट देण्यासाठी सर्वोत्तम महिना कोणता?
आपल्याला पावसाळ्यातील हिरवागार निसर्ग, अप्रतिम धबधबे पहायचे असतील आणि ट्रेकिंगला जायचे असल्यास ऑगस्ट ते नोव्हेंबर हा कालावधी सर्वोत्तम आहे.
हिवाळ्यात इगतपुरी हिल स्टेशनला भेट देण्यासाठी डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी हे सर्वोत्तम महिने आहेत.
इगतपुरी या हिल स्टेशनला भेट देण्यासाठी तुम्हाला किती दिवस आवश्यक आहेत ?
इगतपुरी हे अतिशय सुंदर व हिरवाईने नटलेले हिल स्टेशन असून या ठिकाणी प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी तुम्हाला साधारणतः दोन ते तीन दिवस आवश्यक आहेत.
इगतपुरीला भेट देण्यासाठी सर्वात जवळचे रेल्वे स्थानक कोणते?
इगतपुरी हिल स्टेशन मधील प्रेक्षणीय स्थळे न्याहाळण्यासाठी इगतपुरी रेल्वे स्थानक हे जवळचे रेल्वे स्थानक आहे. इथून तुम्ही कॅब किंवा ऑटो बुक करून इगतपुरी हिल स्टेशन फिरू शकता.
मुंबई पासून इगतपुरी हिल स्टेशन किती किलोमीटर अंतरावर आहे?
मुंबई पासून इगतपुरी हिल स्टेशन हे साधारणतः १२० किलोमीटर अंतरावर आहे . यासाठी तुम्हाला २ तास २० मिनिटे लागू शकतात.
इगतपुरी शहर का प्रसिद्ध आहे?
इगतपुरी हे नाशिक जिल्ह्यातील सुंदर हिल स्टेशन आहे व या ठिकाणी असणारे धबधबे, तलाव,पिकनिक स्पॉट, प्रेक्षणीय स्थळे यामुळे इगतपुरी हे शहर एक सर्वोत्तम हिल स्टेशन पैकी एक हिल स्टेशन आहे.
निष्कर्ष
आम्ही आमच्या लेखातून इगतपुरी हिल स्टेशन, त्या जवळील प्रेक्षणीय स्थळे, करण्यासारख्या गोष्टी आदींची माहिती दिली आहे, हा लेख तुम्ही नक्की वाचा आणि कमेंट करून आम्हास नक्की कळवा.
धन्यवाद.