लाल बहादूर शास्त्री संपूर्ण माहिती : Lal Bahadur Shastri Information In Marathi – लालबहादूर शास्त्री हे स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान होते. त्यांना भारतीय इतिहासात महत्वपूर्ण स्थान आहे. त्यांच्या अंगी असलेल्या साधेपणा, समर्पण आणि प्रामाणिकपणा या विशेष गुणांमुळे त्यांनी भारताचे पंतप्रधानपद भूषविले.
शास्त्रीजीनी स्वतंत्र भारताच्या सार्थक विकासासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे भारतीय समाजाला एक सर्वसमावेशक आणि योग्य नेतृत्व दिले. त्यांच्या प्रधानमंत्रीपदाच्या कार्यकालात, 1965 मध्ये भारत-पाकिस्तान युद्ध झाले. त्यांच्या दृढ आणि निर्णयक नेतृत्वाने भारताला या युद्धात विजय मिळाला.
लाल बहादुर शास्त्री यांनी ‘जय जवान, जय किसान‘ या घोषणेतून भारताच्या जनतेला एक आवाज आणि दिशा दिली. त्यांच्या व्यक्तव्यातून त्यांनी भारतीय सेनेची आणि शेतकऱ्यांची देशाच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका आहे असे स्पष्ट केले.
लाल बहादूर शास्त्री संपूर्ण माहिती मराठी : Lal Bahadur Shastri Information In Marathi
पूर्ण नाव | लाल बहादूर शारदाप्रसाद श्रीवास्तव |
जन्मतारीख | ०२ ऑक्टोबर १९०४ |
जन्मस्थळ | उत्तर प्रदेशातील मुघलसराई |
आईचे नाव | राम दुलारी देवी |
वडिलांचे नाव | मुंशी शारदा प्रसाद श्रीवास्तव |
पत्नीचे नाव | ललिता देवी |
पक्ष | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस |
स्मारक | विजय घाट |
पुरस्कार | भारत रत्न |
अपत्य | 4 मुलगे , 2 मुली |
ओळख | मॅन ऑफ पीस |
मृत्यू | ११ जानेवारी १९६६ |
लाल बहादूर शास्त्री जन्म आणि कुटुंबाची माहिती
लालबहादूर शास्त्री यांचा जन्म बनारस जवळील मुघलसराई या गावी ०२ ऑक्टोबर १९०४ साली झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शारदा प्रसाद व आईचे नाव रामदुलारी देवी होत. त्यांचे मूळ आडनाव श्रीवास्तव हे होते. लालबहादूर शास्त्री यांचे वडील शारदा प्रसाद हे प्राथमिक शिक्षक होते. परंतु लालबहादूर शास्त्री दीड वर्षाचे असताना, त्यांच्या वडिलांचे निधन झाले. अत्यंत दुःखद परिस्थितीचा सामना करत, त्यांनी आपली मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली.
हे पण वाचा 👇
- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे जीवनचरित्र
- महात्मा गांधी जयंती निमित्त मराठी भाषण
- रवींद्रनाथ टागोर यांची संपूर्ण माहिती
लालबहादूर शास्त्री यांची माहिती आणि शिक्षण
लालबहादूर शास्त्री यांचे लहानपण त्यांचे आजोळ मिर्झापूर येथे गेले. आर्थिक व इतर अनेक अडचणींच्या कारणांनी लाल बहादूर शास्त्री यांचे बालपण हे अतिशय कठीण प्रसंगातून गेले. त्यांच्या गावांमधील शाळा खूप चांगली नव्हती, तरी ते परिश्रम करून शाळेमध्ये शिकायला जात असत. त्यामुळे त्यांनी प्राथमिक शिक्षण देखील त्यांच्या गावामध्येच केले यानंतर त्यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण करून माध्यमिक शिक्षण घेण्याकरिता वाराणसीला आपल्या काकांकडे राहायला गेले. वाराणसी मध्ये त्यांना नीलकामेश्वर प्रसाद नावाचे एक गुरुजी भेटले, त्यांच्या मार्गदर्शनाखाली लाल बहादूर शास्त्री यांनी काशी विद्यापीठामधून त्यांचे पदवीचे शिक्षण पूर्ण केले.
नक्की वाचा👉साने गुरुजी माहिती मराठी
लाल बहादूर शास्त्री यांचा विवाह
इसवी सन १९२७ मध्ये लालबहादूर शास्त्री यांचा विवाह ललिता देवी यांच्यासोबत संपन्न झाला. त्यांचे राहणीमान अत्यंत साधे होते. विचारसरणी उच्च होती. आपली कामे ते दोघे स्वतः करत असत. याद्वारे त्यांना सहा अपत्य होती.
लाल बहादूर शास्त्री यांचे शास्त्री नाव कसे पडले ?
इसवी सन १९२५ मध्ये काशी विद्यापीठाने लाल बहादूर शास्त्री यांना शास्त्री ही पदवी देऊन सन्मानित केले. तेव्हापासून लाल बहादूर यांना शास्त्री या नावाने ओळखले जाऊ लागले. व ते स्वतःच्या नावापुढे शास्त्री नावाचा वापर करू लागले. तसेच लाल बहादूर श्रीवास्तव या नावाने ओळखले जाणारे लालबहादूर यांना लाल बहादूर शास्त्री या नावाने ओळख प्राप्त झाली.
लाल बहादूर शास्त्री यांच्या बद्दल माहिती
स्वामी विवेकानंदांचा प्रभाव
आपल्या तरूणपणीच शास्त्री हे भारताचे प्रख्यात आध्यात्मिक नेते आणि तत्त्वज्ञ स्वामी विवेकानंद यांच्या शिकवणीने खूप प्रेरित झाले होते. स्वामी विवेकानंदांची स्वयं-शिस्त, अध्यात्म, समाजसेवा आणि सशक्त आणि स्वावलंबी भारताची कल्पना शास्त्रींच्या मनात खोलवर रुजली आणि यातूनच त्यांची वैचारिक जडणघडण झाली. त्यांचे आदर्श आणि मूल्ये पुढे आकाराला आली.
महात्मा गांधींचा प्रभाव
त्यांच्या सुरुवातीच्या काळापासून शास्त्रीजींनी महात्मा गांधी यांची जीवन विषयक आणि देश विषयक तत्वे आचरणात आणली. शास्त्रींवर महात्मा गांधींच्या शिकवणी आणि तत्त्वांचा खोलवर प्रभाव होता. अहिंसा तत्त्वज्ञान आणि सत्य, साधेपणा आणि स्वावलंबनाच्या तत्त्वांनी शास्त्रींच्या जागतिक दृष्टिकोनाला आणि त्यांच्या भावी राजकीय कारकिर्दीला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
राष्ट्रवादी चळवळींशी संबंध
1950 च्या दशकात विनोबा भावे यांनी सुरू केलेली संपूर्ण क्रांती चळवळ, भूदान चळवळ, स्वैच्छिक जमीन सुधारणा आणि खेड्यांमध्ये स्वयंपूर्णतेला प्रोत्साहन देऊन भारतीय समाजात संपूर्ण क्रांती घडवून आणण्याच्या उद्देशाने भारतभ्रमण सुरू केले. शास्त्री यांच्यावर विनोबा भावे चळवळीच्या उद्दिष्टांचा खूप प्रभाव होता.
लालबहादूर शास्त्री – स्वातंत्र्यसैनिक
लालबहादूर शास्त्री यांना नीलकमेश्वर प्रसाद यांच्याद्वारे महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, लाला लजपत राय, यांच्या जीवनाबद्दल विविध माहिती ऐकावयास मिळत होती. त्यामुळे शैक्षणिक गोष्टी करता करता, त्यांना स्वातंत्र्य चळवळीचे सुद्धा वेड लागले होते. लालबहादूर शास्त्री जसजसे वयाने मोठे होत होते, तसं तसं त्यांच्या मनामध्ये भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ओढ निर्माण होत होती.
शास्त्री वयाच्या अकराव्या वर्षी बनारस हिंदू विश्वविद्यालयांमध्ये कोनशिला बसवण्यासाठी त्या ठिकाणी महात्मा गांधी आले होते. तेथील महात्मा गांधी यांचे भाषण ऐकून, लालबहादूर शास्त्री खूप प्रभावीत झाले. तिथून पुढे महात्मा गांधीजींची लाल बहाद्दूर शास्त्रींनी पाठ सोडली नाही व लाल बहादूर शास्त्री महात्मा गांधींच्या सानिध्यात राहून, स्वातंत्र्यसंग्रामासाठी लढत राहिले. अगदी वयाच्या सोळा सतराव्या वर्षाच्या काळात, स्वातंत्र्यसंग्रामात सहभाग घेण्यास त्यांनी सुरुवात केली. महात्मा गांधीजींचे चंपारण्य आंदोलन, रौलेट अटॅक, जानियांवाला हत्याकांड इत्यादी घटनांनी बहादूर शास्त्री हे प्रभावित झाले होते.
लालबहादूर शास्त्री आणि स्वातंत्र्य चळवळ
असहकार चळवळीतील भूमिका
शिक्षण संपल्यानंतर शास्त्रींनी लाला लजपतराय यांच्या माध्यमाने सुरू झालेल्या “द सर्व्हन्ट्स ऑफ द पीपल सोसायटी” याच्यामध्ये त्यांनी सक्रिय सहभाग दर्शवला. तसेच महात्मा गांधींच्या विदेशी मालाचा बहिष्कार व स्वदेशी मालाचा वापर म्हणजेच, खादीचा वापर करण्यासाठी लाल बहादूर शास्त्री यांनी अग्रेसर सहभाग दर्शवला.
खादी आणि स्वदेशीचा प्रचार
इसवी सन १९२१ मध्ये असहकार आंदोलनात त्यांनी सहभाग दर्शवला. १९२१ मध्ये महात्मा गांधींनी ब्रिटिशांविरुद्ध सुरू केलेल्या असहकार आंदोलनात शास्त्रींनी सहभाग घेतल्याने, ब्रिटिशांनी त्यांना अटक करून कारावासात पाठवले. प्रत्येक राष्ट्रीय चळवळीत ते भाग घेत होते. हा देशाला लागलेला कलंक आहे, हे त्यांनी जाणले `आणि हा कलंक पुसण्याचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केला.
सर्व माणसात ईश्वर समान रूपात भरलेला आहे, सर्वांना प्रगती करण्याचा अधिकार आहे. असे लोकांना शास्त्री समजून सांगत असत. शास्त्रीजी स्वतः खादीचे कपडे वापरत असत, देशवासीयांनी खादीचे कपडे वापरावेत असे त्यांना वाटत होते. यासाठी त्यांनी गावोगावी प्रचार केला.त्यावेळी त्यांना तुरुंगवास सुद्धा भोगावा लागला. परंतु वय कमी असल्याकारणाने त्यांना तुरुंगातून सुटका प्राप्त झाली.
मीठ सत्याग्रहातील नेतृत्व
1930 मध्ये, महात्मा गांधी यांनी दांडी यात्रा केली आणि मिठाचा कायदा मोडला. या प्रतिकात्मक संदेशाने संपूर्ण देशात क्रांती आली. लाल बहादूर शास्त्री पेटून उठले आणि स्वातंत्र्य लढयात त्यांनी स्वत:ला झोकून दिले
निदर्शने आणि निदर्शनांमध्ये सक्रिय भूमिका
१९३० च्या दरम्याने महात्मा गांधींच्या सविनय अवज्ञा आंदोलनामध्ये सुद्धा लाल बहादूर शास्त्री यांनी सक्रिय सहभाग दर्शविला. या आंदोलनाचा मुख्य उद्देश हा देशाच्या नागरिकांना इंग्रज सरकारकडून कर न देण्याबाबत जागरूक करण्यासाठी, हे आंदोलन घडवून आणले होते. लाल बहादूर शास्त्री यांनी अनेक भाषणे देऊन, लोकांमध्ये कर न देण्याबाबत जागरूकता निर्माण केली. त्यामुळे त्यांना तेव्हा अडीच वर्षाचा तुरुंगवास भोगाव लागला होता.
तुरुंगवास आणि त्याग
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात काँग्रेसने स्थापन केलेल्या, जनआंदोलनात सहभाग दर्शवल्यामुळे, लाल बहादूर शास्त्री यांना पुन्हा एक वर्षाचा तुरुंगवास भोगावा लागला. तसेच १९४२ मध्ये झालेल्या भारत छोडो आंदोलनामध्ये, लालबहादूर शास्त्री यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे त्यांना ११ दिवस भूमिगत राहावे लागले होते. तरीसुद्धा इंग्रज सरकारने लाल बहादूर शास्त्री यांना पकडले व १९४५ मध्ये त्यांची तुरुंगातून सुटका करण्यात आली.
लालबहादूर शास्त्री यांचा राजकीय प्रवास
शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाला चालना देणे
इसवी सन १९४६ मध्ये झालेल्या प्रांतीय निवडणुका यादरम्यान, लालबहादूर शास्त्री यांचे देशाप्रती निष्ठावान कार्य पाहून, पंडित गोविंद वल्लभ पंत यांनी लाल बहादूर शास्त्री यांना संसदीय सचिव पद सोपवले. लालबहादूर शास्त्री यांनी या पदाची भूमिका उत्तमरीत्या पार पाडली. त्यामुळे गोविंद पंत यांनी त्यांना मंत्रिमंडळात सामील सुद्धा करून घेतले व त्यांना पोलीस व परिवहन मंत्री हे मंत्रीपद बहाल केले. त्यावेळी शास्त्री यांनी देशांमधील महिलांची स्थिती सुधारण्यासाठी व त्यांना रोजगार प्राप्ती होण्यासाठी, महिलांना परिवहन विभागात आरक्षण प्राप्त करून दिले व महिलांची वाहक पदी भरती केली.
1965 च्या भारत-पाक युद्धादरम्यान नेतृत्व
शास्त्रीजींच्या पंतप्रधान काळात 1965 च्या भारत-पाक युद्ध हा शास्त्रींच्या नेतृत्वाचा एक निर्णायक क्षण होता. संघर्षामुळे उद्भवलेल्या आव्हानांना न जुमानता त्यांनी या कठीण प्रसंगी खंबीर नेतृत्व दाखवले आणि धैर्याने आणि दृढनिश्चयाने देशाचे नेतृत्व केले.
अन्न संकटाचा सामना
1960 च्या दशकाच्या मध्यात, जेव्हा भारत एका मोठ्या कृषी संकटात सापडला होता, तेव्हा अमेरिकेतून गव्हाची वार्षिक आयात तीन ते चार दशलक्ष टन इतकी होती. त्यावेळी भारत आपला शेजारी देश पाकिस्तानविरुद्ध युद्धात गुंतला होता. आणि दुसरीकडे, भारताला अन्नाचा मुख्य पुरवठादार अमेरिकेने भारताने युद्ध थांबवले नाही तर गव्हाचा पुरवठा कमी करण्याची धमकी दिली.
भारत अन्नधान्याच्या प्रचंड तुटवड्याला तोंड देत होता आणि तो परदेशी निर्यातीवर अवलंबून होता. त्या वेळी शास्त्री यांनी नियोजन आयोगाच्या निदर्शनास कृषी क्षेत्र आणले. पंतप्रधानांच्या निवासस्थानी शेती करण्याचा उपक्रम हा देशाला अन्न संकटातून सोडवण्याचा मोठा संदेश होता. त्यांच्या या पाऊलामुळे भारतीय शेतकऱ्यांना अन्नधान्य उत्पादनात स्वावलंबी होण्यासाठी प्रेरणा मिळाली.
श्वेतक्रांतीचा प्रचार
देशात दूध उत्पादन वाढल्यास गरीब शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल म्हणून शास्त्री यांनी देशांतर्गत दुग्ध उत्पादनाला प्रोत्साहन दिले. या क्रांतीने केवळ मोठ्या प्रमाणावर उत्पादनच नाही, तर जनसामान्यांच्या उत्पादनात वाढ झाली; म्हणून या प्रक्रियेला “श्वेत क्रांती” असे संबोधले जाते. अमूलचे अध्यक्ष आणि संस्थापक डॉ. वर्गीस कुरियन यांची पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी NDDB चे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली.
ताश्कंद घोषणा
भारत आणि पाकिस्तान यांमध्ये रशियातील ताश्कंद येथे १० जानेवारी १९६६ रोजी झालेला करार. भारतावरील पाकिस्तानी आक्रमणामुळे ५ ऑगस्ट ते २३ सप्टेंबर १९६५ पर्यंत झालेल्या युद्धाची समाप्ती या कराराने झाली. भारताचे प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री व पाकिस्तानचे राष्ट्रपती अयुबखान यांच्यामध्ये सोव्हिएट महामंत्री कोसिजिन यांच्या मध्यस्थीने ४ जानेवारी १९६६ पासून वाटाघाटी होऊन १० जानेवारीस नऊ कलमी करारावर उभय नेत्यांनी सह्या केल्या.
या करारान्वये दोन्ही देशांनी संयुक्त राष्ट्र–सनदेप्रमाणे परस्परांशी स्नेहपूर्ण शेजारसंबंध निर्माण करण्याची व परस्परविरुद्ध सैन्यबळाचा उपयोग न करता, आपापसांतील तंटे शांततामय मार्गाने सोडविण्याची हमी देण्यात आली.
पंतप्रधान म्हणून नेतृत्व
- आपल्याला मिळालेल्या पदाचा योग्य रीत्याने वापर करून पोलीस नियमात त्यांनी काही सुधारणा केल्या, लोकांची गर्दी हटवण्यासाठी पूर्वी काठीचा वापर केला जात होता, परंतु लाल बहादूर शास्त्री यांनी हा नियम मोडीत काढून त्याऐवजी पाण्याची फवारणी करण्याचा नियम सुरू केला. देशात संविधान लागू झाल्यानंतर निवडणुका घोषित करण्यात आल्या, त्यावेळी शास्त्री यांना काँग्रेस पक्षाचे महासचिव हे पद प्राप्त झाले.
- इसवी सन १९५२ मध्ये झालेल्या निवडणुकीनंतर लाल बहादूर शास्त्री यांना रेल्वे व परिवहन मंत्री यासाठी नियुक्त करण्यात आले. त्यावेळी त्यांना त्यांच्या पदाचा सुद्धा उपयोग करून, रेल्वेतील प्रथम श्रेणी व तृतीय श्रेणी यांच्यातील अंतर बऱ्याच प्रमाणात कमी केले.
- इसवी सन १९५६ मध्ये दुर्दैवाने एक रेल्वे अपघात झाला. व या घटनेमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई म्हणून स्वतःची नैतिक जबाबदारी लक्षात घेत लालबहादूर शास्त्री यांनी या पदाचा राजीनामा दिला.
- इसवी सन १९६१ मध्ये पंडित गोविंद वल्लभ पंत यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या जागेवर लाल बहादूर शास्त्री यांना गृहमंत्री पद संपवण्यात आले. गृहमंत्री असताना त्यांनी देशाच्या संरक्षणासाठी अनेक महत्त्वपूर्ण कामगिरी केली १९६२ मध्ये भारत चीन युद्ध चालू असताना, त्यांनी देशातील शांतता स्थिर ठेवण्यासाठी महत्त्वाची कामगिरी केली.
- २७ मे १९६४ रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांचे निधन झाले. ०९ जून १९६४ रोजी शास्त्री यांची पंतप्रधान म्हणून एकमताने निवड करण्यात आली. पंडित जवाहरलाल नेहरू नंतर स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान होण्याचा मान लालबहादूर शास्त्री यांना मिळाला. लालबहादूर शास्त्री यांचा सर्व कारभार स्वच्छ होता. त्यांनी अत्यंत धैर्याने पंतप्रधान हे पद स्वीकारले. देशाची जनता गरीब आहे, हे त्यांनी जाणले आणि अनेक गोष्टींचा त्यांनी त्याग केला. आपल्या मुलांसाठी अथवा नातेवाईकांसाठी कधी सत्तेचा उपयोग करून घेतला नाही.
- त्यावेळी त्यांनी पंतप्रधान पदी असताना भारत पाकिस्तान युद्ध दरम्यान आपली खुशाल बुद्धिमत्ता वापरून, परिस्थिती उत्तमरीत्या हाताळली. काँग्रेसची संघटना वाढवली. इंग्रजांविरुद्ध सर्व जनता जागृत व्हावी, या दृष्टीने त्यांनी सातत्याने कार्य सुरू ठेवले.
- १९६५ मध्ये पाकिस्तानची युद्ध सुरू झाले. तेव्हा कणखर भूमिका घेऊन, अत्यंत धैर्याने तोंड दिले. त्यावेळी यशवंतराव चव्हाण हे भारताचे संरक्षण मंत्री होते. भारतीय सैनिक प्राण पणाला लावून लढले, व त्यांनी विजयी मिळवला.
लालबहादूर शास्त्री यांची घोषणा “जय जवान जय किसान”
लालबहादूर शास्त्री यांना पंतप्रधानपदी असताना देशात खाण्यापिण्याच्या गोष्टी बाहेरून आयात कराव्या लागत असत. अशावेळी त्यांनी लोकांना एक दिवस उपवास पकडण्याची विनंती करून, लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी “जय जवान जय किसान” हा नारा दिला जो पुढे अजून प्रसिद्ध होऊन लालबहादूर शास्त्री यांचे ब्रीद घोषवाक्य म्हणून प्रसिद्ध झाला.
“जय जवान जय किसान” ही त्यांची घोषणा होती. भारत हा कृषिप्रधान देश आहे. भारताची प्रगती शेतकऱ्यांच्या प्रगतीवर अवलंबून आहे. शेतीच्या विकासासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांनी उपयोग करून घेतला पाहिजे, असे लाल बहादूर शास्त्री यांना नेहमी वाटे. शास्त्री यांची मूर्ती लहान पण कीर्ती महान होती. आयुष्यभर त्यांनी सन्मार्गावर चालू देशाची सेवा केली.
लाल बहादूर शास्त्री यांचे योगदान
लालबहादूर शास्त्री यांना भारतीय स्वातंत्र्य लढ्यामधील प्रमुख स्वातंत्र्य सैनिक व भारतीय प्रजासत्ताकाचे दुसरे पंतप्रधान म्हणून नावाजले जाते. दिनांक ०९ जून इसवी सन १९६४ रोजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मृत्यूनंतर लालबहादूर शास्त्रींनी पंतप्रधान पदाची सूत्रे स्वतःच्या हाती घेतली.
यांच्या या कार्यकाळामध्ये इसवी सन १९६५ सालचे दुसरे भारत पाकिस्तानचे युद्ध सुरू झाले. ब्रिटिश कालीन भारतात इंग्रज सरकारविरुद्ध मोठ्या प्रमाणात लढे देणारे, गांधीवादी नेते व स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना एक महान व थोर नेता तसेच, स्वातंत्र्य सेनानी म्हणून संबोधले जाते.
लालबहादूर शास्त्री यांचा सन्मान
पूर्ण देशात त्यांची एक प्रतिमा एक दूरदर्शी, इमानदार, आणि निष्ठावान नेत्यांच्या स्वरूपात प्रसिद्धी आहे. त्यांनी आपल्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळामध्ये अनेक संकटांना स्वतःहून सामोरे जाऊन, देशाला प्रगतीच्या मार्गावर नेले. त्यांच्या मरणोत्तर त्यांना भारत सरकारने भारतरत्न हा पुरस्कार देऊन सन्मानित केले.
लालबहादूर शास्त्री – तरुण सत्याग्रही
- भारताचे दुसरे पंतप्रधान म्हणून नावाजलेले लाल बहादूर शास्त्री यांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये एक तरुण सत्याग्रही म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली आहे. लालबहादूर शास्त्री यांचा एक तरुण सत्याग्रही म्हणून झालेला प्रवास अनेकांना माहिती आहे. शास्त्री भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सहभाग वाराणसीतील त्यांच्या महाविद्यालयीन काळामध्येच सुरू केला. त्यामध्ये त्यांनी सक्रिय सहभाग दर्शवला.
- ब्रिटिश वसाहतवादी राजवटीविरुद्ध, अहिंसा प्रतिकार या संघटनेच्या विचारसरणीचा लालबहादूर शास्त्री आणि मोठ्या सन्मानाने स्वीकार केला. तसेच १९२० मध्ये महात्मा गांधींच्या असहकार चळवळीमध्ये सक्रिय सहभाग लालबहादूर शास्त्री यांनी दर्शवला. स्वातंत्र्यासाठीची बांधिलकी त्यांच्या या कृत्यातून दिसून येते.
- ब्रिटिश संस्थांवर बहिष्कार टाकण्याच्या, गांधीजींच्या आवाहनाने उत्तेजित झालेले लाल बहादूर शास्त्री यांनी सहकारी भारतीयांना ब्रिटिश अधिकाऱ्यांशी असहकार व वसाहतीचे प्रतीक म्हणून सामील केले. स्वतः खादी व स्वदेशी गोष्टींचा वापर करून, स्वदेशी कापड उद्योगाला लालबहादूर शास्त्री यांनी प्रोत्साहन दिले. खादी गोष्टीला चालना देण्यासाठी लालबहादूर शास्त्री यांचे समर्पण आर्थिक स्वयंपूर्णता आणि राष्ट्रीय अभिमानासाठी त्यांची वचनबद्धता दर्शवून देते.
- १९३० च्या दरम्यान एक तरुण सत्याग्रही म्हणून नावाजलेले लालबहादूर शास्त्री, यांचा उल्लेखनीय योगदानापैकी महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली एक महत्त्वपूर्ण सविनय कायदेभंग चळवळ, मीठ सत्याग्रहात लालबहादूर शास्त्री यांनी सक्रिय सहभाग दर्शवला. शास्त्री यांनी ब्रिटिश मीठ कायदा विरोधामधील आंदोलनांमध्ये सक्रिय सहभाग दर्शवून त्या गटाचे नेतृत्व सुद्धा केले.
लालबहादूर शास्त्री – स्वतंत्र भारताचे नेते
- लालबहादूर शास्त्री यांनी स्वतंत्र भारतातील एक प्रमुख भूमिका पार पाडली. भारताचे दुसरे पंतप्रधान म्हणून त्यांनी अनेक संकटांना सामोरे जात देशाच्या उत्तम प्रगतीसाठी उल्लेखनीय योगदान दिले आहे. स्वतंत्र भारतातील लालबहादूर शास्त्री यांच्या नेतृत्वाचा एक अहवाल या ठिकाणी दिला गेला आहे. पंतप्रधान नेहरूंच्या अकालीन निधनानंतर लालबहादूर शास्त्री यांनी ०९ जून १९६४ पासून भारताच्या पंतप्रधानाची जबाबदारी स्वीकारली. देशाला अंतर्गत आणि बाह्य दोन्ही आव्हानांचा लालबहादूर शास्त्री आणि निडरपणे सामना केला.
- या गंभीर काळामध्ये त्यांनी देशाचे नेतृत्व सांभाळले. पंतप्रधानाच्या कार्यकाळात लालबहादूर शास्त्रींना दुष्काळ व पीक अपयशामुळे गरीब गंभीर अन्न संकटाचा सामना सुद्धा करावा लागला. याचे प्रत्युत्तर म्हणून त्यांनी उच्च उत्पादक वाढ, आधुनिक कृषी तंत्र व सिंचन सुविधांचा वापर करून कृषी उत्पादकामध्ये “हरितक्रांती” सुरू केली. या उपायामुळे भारताला अन्न उत्पादनात स्वयंपूर्ण होण्यास मदत प्राप्त झाली.
- लालबहादूर शास्त्री हे “श्वेताक्रांतीला” प्रोत्साहन देण्यासाठी सुद्धा संबोधले जातात. दुग्ध उत्पादन वाढवण्यासाठी व ग्रामीण जीवनमान उंचावण्याच्या उद्देशाने डेअरी विकास कार्यक्रम त्यांनी राबवले. त्यांनी नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डची स्थापना केली.
- १९६५ चा भारत पाकिस्तान युद्धात शास्त्रींचा नेतृत्वाचा एक निर्णायक क्षण होता. संघर्षामुळे उद्भवलेल्या या संकटांना त्यांनी खंबीरपणे सामोरे जात देशाचे नेतृत्व निभवले.
लालबहादूर शास्त्री यांचे निधन
इसवी सन १९६६ मध्ये भारत आणि पाकिस्तानच्या शांतता स्थापित करण्यासाठी पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्रपती अयुब खान यांनी लालबहादूर शास्त्री यांच्यासोबत मुख्य मुद्द्यावर हस्ताक्षर केले. त्याच रात्री ११ जानेवारी १९६६ साली ताश्कंद येथे भारत-पाकिस्तान युद्ध बंदीचा करार करण्यात आला व स्वाक्षरी केल्यानंतर काही तासातच तेथेच त्यांचा देहांत झाला. त्यांच्या कार्याची दखल घेत भारत सरकारने सन १९६६ साली त्यांना मरणोत्तर भारतरत्न हा किताब देऊन सन्मानित केले.
लालबहादूर शास्त्री यांच्या मृत्यूचे रहस्य
लाल बहादूर शास्त्री ताश्कंद भेट
1965 च्या भारत-पाक युद्धातून उद्भवलेल्या समस्यांचे निराकरण करण्याच्या उद्देशाने पाकिस्तानचे अध्यक्ष अयुब खान यांच्यासोबत ताश्कंद, उझबेकिस्तान येथे शिखर परिषदेसाठी लाल बहादूर शास्त्री गेले असता यांचा मृत्यू 11 जानेवारी 1966 रोजी ताश्कंद, उझबेकिस्तान येथे संशयास्पद परिस्थितीत झाला.
मृत्यूचे अधिकृत कारण
ताश्कंद घोषणेवर स्वाक्षरी केल्यानंतर काही वेळातच शास्त्री यांच्या निधनाने त्यांचे झोपेत अनपेक्षित निधन झाले. लाल बहादूर शास्त्री यांच्या मृत्यूचे अधिकृत कारण, सरकारने नोंदवल्याप्रमाणे, हृदयविकाराचा झटका होता. 11 जानेवारी 1966 रोजी त्यांच्या निधनाची घोषणा करण्यात आली आणि अंत्यसंस्कारासाठी त्यांचे पार्थिव भारतात परतण्यात आले.
शवविच्छेदनाचा अभाव
त्या वेळच्या सोवियत रशियानाने शास्त्रींचे पोस्टमार्टम न केल्याचे मान्य केले आहे. परंतु लालबहादूर शास्त्री यांचे खाजगी डॉक्टर आर.एन आणि काही रशियन डॉक्टरांनी केलेल्या तपासणीचा अहवाल आपल्याजवळ असल्याचे मान्य केले जात आहे.
विषबाधेचा संशय
लालबहादूर शास्त्री यांच्यावर विष प्रयोग झाला, असा आरोप लाल बहादूर शास्त्री यांची पत्नी ललिता शास्त्री यांनी वारंवार केला आहे. मृत्यूनंतर त्यांचे शरीर हे काळे निळे पडले होते. हा त्यांच्यावरील विष प्रयोगाचा पुरावा असल्याचे, अनेकांचे सुद्धा मत आहे. शास्त्री यांच्या रशियन स्वयंपाक्याला त्यांच्यावर विष प्रयोग केल्याच्या आरोपावरून अटक सुद्धा करण्यात आली. मात्र नंतर त्याची निर्दोष सुटका सुद्धा करण्यात आली.
चौकशीची मागणी
इसवी सन २००९ साली अरुण धार यांनी माहिती हक्काच्या कायद्यानुसार, पंतप्रधान कार्यालयाकडे शास्त्रींच्या मृत्यूचे कारण घोषित करण्याची विनंती केली. पण पंतप्रधान कार्यालयाने ही विनंती न एकता, ती विनंती फेटाळून लावली. त्यासाठी कारण देताना यामुळे आपले इतर देशांशी असलेले संबंध बिघडण्याची शक्यता आहे, देशात हिंसाचार उकळून येण्याची शक्यता आहे व संसदेच्या विशेष अधिकाराचा भंग होऊ शकतो. असे सुद्धा पंतप्रधान कार्यालयाकडून नमूद करण्यात आले.
पंतप्रधान कार्यालयाने लाल बहादूर शास्त्री यांच्या मृत्यूबाबत एक दस्तऐवज स्वतःकडे असल्याचा दावा केला. मात्र तो उघड करण्यास त्यांनी नकार दिला आहे.
साधेपणा आणि सचोटीचा वारसा
लाल बहादूर शास्त्री हे साधेपणा, नम्रता आणि सचोटीसाठी ओळखले जातात. त्यांनी वैयक्तिक फायद्यांपेक्षा नेहमीच राष्ट्रहिताला प्राधान्य दिले. त्यांच्या सचोटीने आणि प्रामाणिकपणामुळे त्यांना भारतीय जनतेचा आदर आणि विश्वास मिळाला. नैतिक शासन, उत्तरदायित्व आणि सर्वसमावेशक विकासावर त्यांचा भर भारतातील पुढाऱ्यांच्या पिढ्यांना प्रेरणा देत आहे.
लाल बहादूर शास्त्री यांचा पंतप्रधान म्हणून कार्यकाळ कदाचित अल्पकाळ टिकला असेल, परंतु भारताच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण काळात त्यांच्या नेतृत्वाने देशाच्या प्रगती आणि विकासावर महत्त्वपूर्ण प्रभाव टाकला. कृषी क्षेत्रातील त्यांचे पुढाकार, त्यांनी भारत-पाक युद्धाची हाताळणी आणि राष्ट्रीय एकता आणि सामाजिक न्यायावर दिलेला भर भारताच्या राजकीय आणि सामाजिक-आर्थिक परिदृश्याला आकार देत आहे.
मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार
लाल बहादूर शास्त्रीजींची सर्वात मोठी खासियत काय होती? शास्त्रीजींचे सर्वात मोठे वैशिष्टय़ म्हणजे त्यांचा जन्म एका सामान्य कुटुंबात झाला, त्यांचे पालनपोषण सामान्य कुटुंबात झाले आणि देशाच्या पंतप्रधानासारख्या महत्त्वाच्या पदावर पोहोचले तरीही ते सामान्यच राहिले.
आजही संपूर्ण भारत शास्त्रीजींना त्यांच्या साधेपणा, देशभक्ती आणि प्रामाणिकपणाने श्रद्धेने स्मरण करतो. 1966 मध्ये त्यांना मरणोत्तर भारतरत्न देण्यात आला .
लाल बहादूर शास्त्री पुण्यतिथी
भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची पुण्यतिथी ही ११ जानेवारी रोजी साजरी केली जाते. ११ जानेवारी २०२३ रोजी लाल बहादूर शास्त्री यांची ५७ वी पुण्यतिथी साजरी केली गेली आहे.
लालबहादूर शास्त्री जयंती
लाल बहादूर शास्त्री यांची जयंती दरवर्षी ०२ ऑक्टोबर रोजी साजरी केली जाते.
लालबहादूर शास्त्री नावाच्या संस्था
- लालबहादूर शास्त्री मार्ग (एल.बी.एस.रोड -मुंबई) : जुने नाव – (सायनपासून ते मुलुंडपर्यंतचा) आग्रा रोड
- लालबहादूर शास्त्री रोड (नवा एटी-फीट रोड, पुणे) : जुने नाव : नवी पेठ; अलका टॉकीज ते स्वार गेटपर्यंतचा रस्ता.
- लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी मसुरी, डेहराडून, उत्तराखंड.
लालबहादूर शास्त्रींवरील पुस्तके
- गोष्टीरूपी लालबाहादुर (बालसाहित्य, लेखक – शंकर कऱ्हाडे)
- शांतीदूत लालबहाद्दूर शास्त्री (प्रभाकर नारायण तुंगार)
लाल बहादूर शास्त्री यांच्या बद्दल दहा ओळी
- १. लालबहादूर शास्त्री हे भारतीय स्वातंत्र्यलढातील स्वातंत्र्यसैनिक व भारताचे दुसरे पंतप्रधान होते.
- २. लालबहादूर शास्त्री यांचा जन्म ०२ ऑक्टोबर १९०४ रोजी मुघलसराई येथे झाला.
- ३. लालबहादूर शास्त्री यांनी आपले संपूर्ण जीवन देशसेवेसाठी समर्पित केले.
- ४. शास्त्रीजी महात्मा गांधींच्या विचाराने प्रेरित होते.
- ५. लालबहादूर शास्त्री यांनी स्वातंत्र्यलढ्यातील सर्व आंदोलनांमध्ये सक्रिय सहभाग दर्शवला.
- ६. शास्त्रींनी दांडीयात्रा, असहयोग आंदोलन, भारत छोडो आंदोलन यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.
- ७. भारत छोडो आंदोलनामध्ये जनतेला जागृत करण्यासाठी शास्त्रीजींनी “करो या मरो” या नाऱ्याला बदलून “मरो नही मारो” चा नारा दिला.
- ८. शास्त्रीजींना या आंदोलनामध्ये १९ ऑगस्ट १९४२ ला अटक करण्यात आली.
- ९. लालबहादूर शास्त्री यांनी देशाला विकासाच्या मार्गावर नेले.
- १०. लालबहादूर शास्त्री जनसामान्यांमध्ये एक लोकप्रिय नेता होते.
व्हिडिओ – Lal Bahadur Shastri Biography In Marathi
लाल बहादुर शास्त्री माहिती मराठीत प्रश्न
१. लालबहादूर शास्त्री यांचा मृत्यू कधी झाला?
११ जानेवारी १९६६ साली ताश्कंद येथे भारत-पाकिस्तान युद्ध बंदीचा करार करण्यात आला व स्वाक्षरी केल्यानंतर काही तासातच तेथेच लाल बहादूर शास्त्री यांचा देहांत झाला.
२. लाल बहादूर शास्त्री यांचे खरे नाव काय होते?
लाल बहादूर शास्त्री यांचे खरे नाव लाल बहादूर शारदाप्रसाद श्रीवास्तव असे होते. इसवी सन १९२५ मध्ये काशी विद्यापीठाने लाल बहादूर शास्त्री यांना शास्त्री ही पदवी देऊन सन्मानित केले. तेव्हापासून लाल बहादूर यांना शास्त्री या नावाने ओळखले जाऊ लागले.
३. लाल बहादूर शास्त्री कोणत्या वर्षी भारताचे पंतप्रधान होते?
दिनांक ०९ जून इसवी सन १९६४ रोजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मृत्यूनंतर लालबहादूर शास्त्रींनी पंतप्रधान पदाची सूत्रे स्वतःच्या हाती घेतली.
निष्कर्ष
मित्रहो, आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणस लाल बहादूर शास्त्री यांच्या बद्दला माहिती दिली आहे. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. Lal Bahadur Shastri Biography In Marathi हा लेख आवडल्यास तुमच्या इतर मित्रपरिवारांसोबत नक्की शेयर करा. धन्यवाद.