डॉ. विक्रम साराभाई संपूर्ण माहिती : Dr. Vikram Sarabhai Information In Marathi

डॉ. विक्रम साराभाई संपूर्ण माहिती : Dr Vikram Sarabhai Information In Marathi – डॉ. विक्रम साराभाई, ज्यांना भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक म्हणून संबोधले जाते, ते एक दूरदर्शी शास्त्रज्ञ आणि अंतराळ संशोधन आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी होते. डॉ. साराभाई यांनी आपले जीवन वैज्ञानिक ज्ञान आणि अंतराळ संशोधनातील नवकल्पना विकसित करण्यासाठी समर्पित केले. भारताच्या अंतराळ क्षमतांच्या विकासासाठी त्यांच्या उल्लेखनीय योगदानामुळे भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) आणि त्यानंतरच्या यशाची पायाभरणी झाली.

अंतराळ तंत्रज्ञानाच्या शांततापूर्ण आणि फायदेशीर वापरावर गाढ विश्वास असलेल्या डॉ. साराभाईंचा वारसा जगभरातील शास्त्रज्ञ, अभियंते आणि अंतराळ प्रेमींच्या पिढ्यांना प्रेरणा देत आहे. वैज्ञानिक प्रगतीसाठी त्यांची चिरस्थायी बांधिलकी आणि अंतराळ संशोधनाची त्यांची दृष्टी भारताच्या वैज्ञानिक समुदायावर आणि जागतिक अवकाश क्षेत्रावर अमिट छाप सोडली आहे.

Table of Contents

डॉ विक्रम साराभाई मराठी माहिती : Vikram Sarabhai Information In Marathi

मूळ नाव विक्रम अंबालाल साराभाई
जन्म १२ ऑगस्ट १९१९
धर्म जैन
नागरिकत्व भारत
जन्मठिकाण अहमदाबाद, भारत
आईचे नाव सरला देवी साराभाई
वडिलांचे नाव अंबालाल साराभाई
पत्नीचे नाव मृणालिनी साराभाई
अपत्य मलिका , कार्तिकेय
ओळख भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक, इस्त्रोचे जनक
व्यवसाय विश्वकिरण वैज्ञानिक, खगोल, भौतिकशास्त्रज्ञ, उद्योगपती
मृत्यू ३० डिसेंबर १९७१
मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका
मृत्यूठिकाण तिरुवनंतपुरम, केरळ, भारत
निर्मित उपग्रह आर्यभट्ट

कोण होते डॉ विक्रम साराभाई ? (dr vikram sarabhai biography in marathi)

विक्रम साराभाई यांचे पूर्ण नाव विक्रम अंबालाल साराभाई आहे. साराभाई एक प्रसिद्ध भारतीय शास्त्रज्ञ म्हणून ओळखले जातात. विक्रम साराभाई यांनी ८६ वैज्ञानिक शोधनिबंध लिहिले. विज्ञानाला समर्पित ४० संस्था स्थापन केल्या. १९६६ च्या दरम्याने भारत सरकारद्वारे विक्रम साराभाई यांना अभियांत्रिक क्षेत्रामध्ये “पद्मभूषण” पुरस्कार देऊन सन्मानित केले.

डॉक्टर विक्रम साराभाई यांना अंतराळ क्षेत्रामध्ये होणाऱ्या कार्यक्रमांपासून सुद्धा वेगळे समजता येणार नाही, डॉक्टर विक्रम साराभाई यांनी भारताला अवकाश संशोधनाच्या क्षेत्रामध्ये सर्वप्रथम स्थान प्राप्त करून दिले. अंतराळ विज्ञानात त्यांनी भारताचे नाव आंतरराष्ट्रीय नकाशावर नेऊन ठेवले. यासोबतच औषध निर्माण, अणुऊर्जा, इलेक्ट्रॉनिक्स, वस्त्रोद्योग व इतर अनेक क्षेत्रातही त्यांनी महान योगदान दिले आहे.

Vikram Sarabhai Information In Marathi

डॉक्टर विक्रम साराभाई यांचा जन्म व प्रारंभिक जीवन

डॉक्टर विक्रम साराभाई म्हणजेच विक्रम अंबालाल साराभाई यांचा जन्म अहमदाबाद या ठिकाणी १२ ऑगस्ट १९१९ रोजी एका समृद्ध जैन कुटुंबामध्ये झाला. साराभाई यांचे वडील अंबालाल साराभाई व त्यांची आई सरला देवी साराभाई.

डॉ. साराभाई हे अहमदाबादच्या एका मोठ्या उद्योगपती कुटुंबातील पुत्र होते. त्यांचे वडील अंबालाल साराभाई हे अनेक उद्योगांचे मालक होते. त्यांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले होते आणि ते भारतीय शास्त्रज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ देखील होते. 

डॉ. विक्रम साराभाई यांच्या आई श्रीमती सरला देवी यांनी मॉन्टेसरी पद्धतीने एक खाजगी शाळा सुरू केली. मुलांचा सर्वांगीण विकास करणे हेच तिचे उद्दिष्ट होते, कारण तिला फक्त पुस्तकी ज्ञानच नाही तर इतर अनेक प्रकारचे शिक्षण मुलांना द्यायचे होते. आपल्या आठ भावंडांपैकी विक्रम हा एकमेव होता ज्याने आपले संपूर्ण आयुष्य भारताला आदर आणि अभिमानाने परिपूर्ण बनवण्यासाठी समर्पित केले.

डॉ विक्रम साराभाई यांचे कुटुंब

वडील अंबालाल साराभाई
आई सरलादेवी साराभाई
भाऊ सुहृद साराभाई एवं गौतम साराभाई
बहिणी मृदुला, भारती, लीना, गीता, गिरा साराभाई
पत्नी मृणालिनी विक्रम साराभाई
मुलगा कार्तिकेय साराभाई
मुलगी मल्लिका साराभाई

डॉक्टर विक्रम साराभाई यांचे कौटुंबिक जीवन व शिक्षण

विक्रम साराभाई यांचे सुरुवातीचे शिक्षण त्यांच्या आई सरला साराभाई यांनी मॉन्टेसरी शैलीत सुरू केलेल्या कौटुंबिक शाळेमध्ये झाले. इथे परदेशातून आलेल्या मॅडम मारिया यांनी त्यांना प्राथमिक शिक्षण दिले. त्याना लहानपणापासुनच गणित आणि भौतिकशास्त्र हे विषय विशेष आवडत होते.

डॉक्टर विक्रम साराभाई यांनी गुजरात कॉलेजमधून इंटरमिजिएट पर्यंत विज्ञानचे शिक्षण पूर्ण केले, व आपले १२ वी पर्यंतचे शिक्षण भारतामध्ये करून १९३७ साली पुढील शिक्षणासाठी ते इंग्लंड मधील केंब्रिज विद्यापीठात शिकायला गेले. यावेळी दुसरे महायुद्ध सुरू झाल्याने त्यांनी भारतात परतण्याचा निर्णय घेतला व त्यांनी बंगलोरमधील इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सायन्स मध्ये नोबेल पारितोषिक विजेते सर सी. व्ही. रामन यांच्या मार्गदर्शनाखाली वैश्विक किरणावर संशोधन केले.

डॉक्टर विक्रम साराभाई यांचे भारतात आगमन

जेव्हा विश्वामध्ये दुसरे महायुद्ध सुरू झाले, त्यावेळी ते भारतामध्ये परतले. स्वतःचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी, युद्ध समाप्तीनंतर ते पुनः परदेशी गेले. १९४७ साली त्यानी ‘काॅस्मिक रे इन्वेस्टिगेशन इन ट्राॅपिकल लॅटीट्यूड्स’ वर संशोधन करून डॉक्टरेट मिळवली आणि त्याचवर्षी ते आपल्या मायदेशी परत आले. झाल्यावर साराभाई भारतामध्ये परतले.

ते भारतात परतले तेव्हा भारत इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वतंत्र झाला होता. भारतात आल्यानंतर त्यांनी कॉस्मिक किरण भौतिकशास्त्रांवरील संशोधनांवरील कार्य सुरू ठेवले. यानंतर त्यांनी भारतामधील आंतरग्रहीय अवकाश विश्ववृत्त संबंध भूचुंबकत्व यांच्यावरील अभ्यास सुरू ठेवला.

डॉक्टर विक्रम साराभाई यांनी महान शास्त्रज्ञ चंद्रशेखर वेंकटरमण यांच्या निदर्शनाखाली वैश्विक किरणांवर संशोधन करण्यास सुरुवात केली. विक्रम साराभाई यांनी त्यांचा “टाईम डिस्ट्रीब्यूशन ऑफ कॉस्मिक रेज” हा संशोधनाचा लेख प्रोसिडिंग ऑफ द इंडियन अकॅडमी ऑफ सायन्सेस मध्ये प्रकाशित केला.

Vikram Sarabhai with indira gandhi

डॉक्टर विक्रम साराभाई यांच्यावरील प्रभाव

अहमदाबाद मधील त्यांचे वडीलोपार्जित “द रिट्रीट” या घरी त्यांच्या बालपणात सर्व क्षेत्रातील महत्त्वाच्या व्यक्ती भेट देत असत. या सर्व थोर व्यक्तींचा प्रभाव साराभाईंच्या व्यक्तिमत्त्वावर झाला.  

डॉ. विक्रम साराभाई हे भारताचे स्वातंत्र्यसैनिक असलेल्या काही प्रसिद्ध व्यक्तींपासून प्रेरित होते आणि त्यांच्यासोबत त्यांनी आपल्या जीवनात महान गोष्टी केल्या, त्यात मुख्य म्हणजे कृष्णमूर्ती, मोतीलाल नेहरू, श्रीनिवास शास्त्री, जवाहरलाल नेहरू, सरोजिनी नायडू, मौलाना आझाद, सीव्ही रमण आणि महात्मा गांधी इ. यानंतर ते कल्पक उद्योगपती आणि दूरदर्शीही झाले.

उच्च शिक्षण आणि संशोधन

विक्रम साराभाई यांनी १९४० ते १९४५ च्या दरम्याने वैश्विक किरणांवरील संशोधन कार्यामध्ये बेंगलोर व काश्मीर हिमालय या ठिकाणी मुलर काउंटरवर वैश्विक किरणांच्या काळातील फरकांचा अभ्यास समाविष्ट करून घेतला.
विक्रम साराभाई यांनी 1940 मध्ये सेंट जॉन कॉलेजमधून ट्रायपोस इन नॅचरल सायन्सेसमध्ये पदवी प्राप्त केली.
विक्रम साराभाई यांनी पीएचडी करून कॉस्मिक रे इन्व्हेस्टिगेशन इन ट्रॉपिकल अक्षांशावर संशोधन केले आणि त्यावर प्रबंधही लिहिला.
दुसरे महायुद्ध संपल्यानंतर विक्रम साराभाई केंब्रिज विद्यापीठात गेले आणि त्यांनी वैश्विक किरणांवर संशोधन करून १९४७ मध्ये पीएचडी पदवी मिळवली.
१९४७ च्या दरम्याने विक्रम साराभाईंनी उष्णकटिबंधीय अक्षांशांमधील वैश्विक किरणांवरील प्रबंधांसाठी केंब्रिज विद्यापीठांमधून डॉक्टरेट पदवी प्राप्त केली.

नक्की वाचा 👉डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची संपूर्ण माहिती

विक्रम साराभाई यांची कारकीर्द

डॉक्टर विक्रम साराभाई यांनी त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात ही त्यांचे सुरुवातीचे शिक्षण पूर्ण करून ते इंग्लंड वरून भारतात परतले तेव्हा केली. विक्रम साराभाई यांनी अहमदाबाद मधील संशोधन संस्था बंद करण्यासाठी त्यांचे मित्र व कुटुंबातील सदस्यांना जमवले, आणि चॅरिटेबल ट्रस्टलाही ती संशोधन संस्था बंद करण्यासाठी  महत्व पटवून दिले. संस्था बंद करण्यात यावी कारण, ही संशोधन संस्था त्यांच्या घराच्या जवळ होती व या संशोधन संस्थेमुळे प्रचंड प्रदूषण पूर्ण ठिकाणी पसरले होते. यासर्व कारणामुळे भारतात भौतिक संशोधन प्रयोगशाळा स्थापन करण्याची गरज भासू लागली. व यासाठी भौतिक संशोधन प्रयोगशाळा स्थापन करण्याची योजना विक्रम साराभाई यांनी आखली.

काही काळानंतर डॉक्टर विक्रम साराभाई यांनी  अहमदाबाद एज्युकेशन सोसायटीमध्ये भौतिक संशोधन प्रयोग शाळेसाठी एक छोटी जागा स्वतःच्या नावे विकत घेऊन, त्या ठिकाणी त्यांनी भौतिक संशोधन प्रयोगशाळा बांधली. तर दुसरीकडे त्यांनी एमजी कॉलेज ऑफ सायन्सचे बांधकाम सुद्धा मोठ्या जिद्दीने सुरू केले. एमजी कॉलेज ऑफ सायन्स मध्ये संशोधन कार्यासाठी दोन लहान खोल्या विक्रम साराभाई यांनी तयार करून घेतल्या.

हळूहळू याचे काम पूर्ण झाल्यावर, त्या खोल्या पद्धतशीरपणे भौतिक संशोधन प्रयोग शाळेमध्ये विक्रम साराभाई यांनी रूपांतरित केल्या. काही कालावधीनंतर अजून पैसे जमा झाले व विज्ञानाकडे आपली कारकीर्द डॉक्टर विक्रम साराभाई यांनी अशीच सातत्याने चालू ठेवली.

Vikram Sarabhai with abdul kalam

अणु कार्यक्रम आणि होमी भाभा

डॉक्टर विक्रम साराभाई यांनी डॉक्टर होमी जहांगीर भाभा यांना सुद्धा पाठिंबा दिला. ज्यांना भारतीय अणुविज्ञान कार्यक्रमाचे जनक समजले जाते. डॉक्टर होमी भाभा यांना भारतीय पहिले रॉकेट प्रक्षेपण केंद्र उभारण्यासाठी साराभाई यांनी मदत केली. अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर तिरुअनंतपुरम जवळील थुंबा या ठिकाणी पहिले रॉकेट प्रक्षेपण केंद्र स्थापन करण्यात आले.

अंतराळ संशोधन संस्था आणि अणुऊर्जेतील योगदान

विक्रम साराभाई यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची स्थापना केली. व ही त्यांच्या जीवनामधील सर्वात मोठी उपलब्धी समजली जाते. १९४७ च्या दरम्याने इंग्लंडमधील केंब्रिज विद्यापीठातून डॉक्टर पदवी प्राप्त करून ज्यावेळी डॉक्टर विक्रम साराभाई भारतामध्ये परतले, तेव्हा त्यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्था ही नव्याने स्थापन झालेल्या स्वतंत्र भारत सरकारला भारतासारख्या विकसनशील देशासाठी किती महत्त्वाची आहे, हे पटवून देण्यात यश प्राप्त केले.

मूलभूत सुविधा, कर्मचारी दळणवळण, आणि लॉन्च पॅड उभारण्याच्या उल्लेखनीय प्रयत्नानंतर दिनांक २१ नोव्हेंबर १९६३ रोजी या प्रक्षेपण केंद्राचे उद्घाटन झाले. या रॉकेटच्या उड्डाण सोडियम बाष्प पेलोडसह सुरू करण्यात आले. डॉक्टर विक्रम साराभाई यांनी नासा यांसारख्या इतर महत्त्वाच्या देशाच्या अंतराळ संस्थेची सतत वाटाघाटी करत राहिले, व त्यांच्या या प्रयत्नांमुळे सॅटॅलाइट इन्स्ट्रक्शनल टेलिव्हिजन प्रयोग साल १९७५ जुलै ते साल १९७६ जुलै च्या दरम्याने प्रक्षेपित करण्यात आले.

डॉक्टर विक्रम अंबालाल साराभाई यांना विज्ञान शिक्षणामध्ये प्रचंड आवड होती. त्यांनी अहमदाबाद या ठिकाणी १९५६ मध्ये “कम्युनिटी सायन्स सेंटरची” सुद्धा स्थापना केली. या कम्युनिटी सायन्स सेंटरला विक्रम साराभाई यांनी कम्युनिटी सायन्स सेंटर असे नाव दिले. यात फॅब्रिकेशन आणि भारतीय उपग्रहांच्या प्रक्षेपणासाठी एक प्रकल्पही सुरू करण्यात आला.

विक्रम साराभाई यांनी भारताचा पहिला उपग्रह “आर्यभट्ट” प्रक्षेपित करण्यासाठी अतिशय उत्कटतेने काम केले. परंतु दुर्दैवाने उपग्रह प्रक्षेपित होण्याच्या चार वर्षांपूर्वीच विक्रम साराभाई यांचे दुर्दैवाने निधन झाले.

डॉक्टर विक्रम साराभाई यांचा वारसा

अंतराळ संशोधन क्षेत्रामधील विक्रम साराभाई यांच्या योगदानासाठी त्यांना “भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक” म्हणून संबोधले जाते. विक्रम साराभाई यांना त्यांनी केलेल्या कार्यासाठी भारत सरकारने १९६६ रोजी पद्यभूषण व १९७२ मध्ये विक्रम साराभाई यांच्या मरणोत्तर पद्यविभूषण अशा भारतातील दोन महान सर्वश्रेष्ठ सन्माननीय  पुरस्काराने गौरवित केले. विक्रम साराभाई यांनी दिलेला त्यांचा वारसा भारतीय अंतराळ कार्यक्रम आणि अणुकार्यक्रमाच्या माध्यमातून पुढे चालू आहे. हे कार्यक्रम दोन्ही स्वदेशी विकासावर केंद्रित आहे. ही कल्पना विक्रम साराभाई यांची आहे.

३० डिसेंबर १९७२ रोजी पहिल्या पुण्यतिथीनिमित्त भारतीय टपाल विभागाने विक्रम साराभाई यांच्या स्मृतिबद्दल मेमोरियल फिलाटेलिक हाऊस बांधले. संपूर्ण भारतामध्ये प्रतिवर्षी १२ ऑगस्ट डॉक्टर विक्रम साराभाई यांचा जन्मदिवस “अंतराळ विज्ञान दिन” म्हणून साजरा केला जातो.

विक्रम साराभाई हे भारताच्या चंद्रयान – २  लॅन्डरचे नाव होते. तसेच विक्रम साराभाई स्पेस सेंटर व तिरुवनंतपुरम मधील इस्त्रोच्या रॉकेट विकास साईटचे सुद्धा नाव होते. चंद्रावरील साराभाई विवर, जो सी ऑफ सेरेनिटी मध्ये स्थित आहे. व पृथ्वीच्या जवळून अगदी दिसण्याजोग आहे. तो विक्रम साराभाई यांच्या नावावर आहे.

young Vikram Sarabhai with friends

डॉक्टर विक्रम साराभाई इस्त्रोचे जनक

डॉक्टर विक्रम साराभाई यांनी भारताच्या अंतराळ कार्यक्रमांमध्ये महत्त्वाचे नेतृत्व केले. त्यांनी अणुऊर्जेच्या विकासामध्ये सुद्धा अग्रगण्य मदत केली. एक उल्लेखनीय संस्था निर्माते म्हणून विक्रम साराभाई प्रसिद्ध आहेत, ज्यांनी विविध विषयांमध्ये मोठ्या संख्येने संस्था स्थापन केल्या, त्यावेळी विक्रम साराभाई यांचे वय अवघे २८ वर्षे होते. साराभाई एक संस्था निर्माण करणारे व त्या संस्थेचे पालन पोषण करणारे होते. पीआरएल हे त्या दिशेने जाणारे प्रथम पाऊल होते.

१९६६ ते १९७१ पर्यंत डॉक्टर विक्रम साराभाई यांनी पीआरएल चे सदस्यत्व भूषवले. डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या आवडीनिवडी या विविध होत्या. त्यांनी भारतामधील व्यावसायिक व्यवस्थापन शिक्षणाची गरज ओळखून १९६२ च्या दरम्याने अहमदाबाद मध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटची सुद्धा स्थापना केली. रशियन स्पुटनिक प्रक्षेपणानंतर साराभाई यांनी भारतासारख्या विकसनशील देशासाठी अंतरावर कार्यक्रमाचे महत्त्व भारत सरकारला पटवून दिले.

अशा रीतीने डॉक्टर विक्रम साराभाई यांनी भारत सरकारला असे आश्वासन दिले की, भारतात अंतराळ केंद्र झाल्यास भारताच्या विकासाला प्रचंड चालना मिळेल व आपल्या येणाऱ्या नवीन पिढीला अंतराळशी संबंधित गोष्टी सुद्धा अतिशय सहजरीत्या प्राप्त होऊ शकतील. त्यासाठी भारत अंतराळ केंद्राची गरज आहे, यासाठी तुम्हाला भारत अंतराळ केंद्राची स्थापना करणे गरजेचे आहे. त्यांच्या या विचारांनी प्रभावित होऊन भारत सरकारने भारत अंतराळ केंद्र उघडण्यासाठी परवानगी दिली. म्हणून डॉक्टर साराभाई यांना “इस्त्रोचे जनक” म्हटले जाते.

विक्रम साराभाई यांनी केलेले शोध व प्रयोग

 • डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या निर्दशनाखाली वैश्विक किरणाचे निरीक्षण करणाऱ्या पहिल्या नवीन दुर्बिनी बांधण्यात आल्या. त्या दुर्बिणीची रचना अशा प्रकारे केली होती की, ज्यामुळे गुलमार्क सारख्या वेगवेगळ्या ठिकाणाहून निघणाऱ्या वैश्विक किरणांची तीव्रता व त्यांचे सातत्य बदलणारे परिणाम याबद्दल संपूर्ण व सखोल तपास करता येईल.
 • विक्रम साराभाई यांनी वैश्विक किरणांवर संशोधन सुरू ठेवल्याने, त्यांना पुढील निरीक्षणे करण्यासाठी विविध प्रकारच्या संसाधनांची गरज भासू लागली, यामुळे विक्रम साराभाई यांनी तयार केलेल्या विद्यार्थ्यांच्या गटासह, गुलमर्ग सारख्या विविध ठिकाणी बाह्य दुर्बिणीचा वापर करून, वैश्विक किरणोत्सर्ग आणि वैश्विक किरणांच्या सतत बदलणाऱ्या ट्रेंडचे निरीक्षण करण्यास सुरुवात केली व किरणांच्या तीव्रतेसाठी मोठ्या संख्येने वैश्विक किरण दुर्बिणी सुद्धा त्यांनी बनवल्या. ती संपूर्ण प्रक्रिया त्यांनी अहमदाबाद शिवाय त्रिवेंद्रम मध्ये पार पाडली.
 • रशियन स्पूटनिक प्रक्षेपणानंतर विक्रम साराभाई यांनी भारतासारख्या विकसनशील देशांमध्ये अंतराळाचे महत्त्व भारत सरकारला पटवून देऊन, भारतामध्ये अवकाश कार्यक्रमाचे महत्त्व समजावून सांगितले. यानंतर त्यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची सुरुवात केली.
 • या संशोधन संस्थेची घोषणा विक्रम साराभाई यांनी १९४७ च्या स्वातंत्र्यदिनी केली. ही संस्था सुरू करण्याचा सर्वात महत्त्वाचा पाया डॉक्टर साराभाई यांनी रचला. डॉक्टर विक्रम साराभाई यांनी स्वतः इंडियन स्पेस रिसर्च म्हणजेच, इस्त्रो नावाची संस्था स्थापन केल्यामुळे, त्यांना इस्त्रोचे जनक म्हटले जाते.
 • डॉक्टर विक्रम साराभाई यांचा नासाशीही चांगलाच संबंध होता. नासाच्या कार्यकाऱ्यांशी बोलल्यानंतर, त्यांच्या सहकार्याने विक्रम साराभाई आणि १९७५ ते १९७६ दरम्यान उपग्रह दूरदर्शनचा यशस्वी प्रयोग सुरू केला व पुढे एक अप्रतिम भारतीय उपग्रह बनवण्याचा प्रकल्प सुद्धा त्यांनी हाती घेतला. या उपग्रहाचे नाव आर्यभट्ट होते. व हा पहिला भारतीय उपग्रह म्हणून ओळखला जातो, जो १९७५ मध्ये रशियन कॉस्मोंड्रॉममधून कक्षेत ठेवण्यात आला होता.

भारतीय विज्ञानात विक्रम साराभाई यांचे योगदान

डॉ. साराभाई यांच्या नेतृत्वाखाली महत्त्वाच्या संस्थांची स्थापना करण्यात आली होती ज्या खालीलप्रमाणे आहेत

 • पहिली महत्त्वाची संस्था म्हणजे भौतिक संशोधन प्रयोगशाळा, ज्याचा पाया साराभाईंच्या नेतृत्वाखाली घातला गेला, जी आजही अहमदाबादमध्ये ओळखली जाते.
 • साराभाईंनी अनेक यश मिळवले, त्यापैकी एक भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची सुरुवात होती. ज्याने देशाचा विकास अनेक प्रकारे वाढवला.
 • विक्रम साराभाई यांनी अहमदाबादमध्ये ‘द अहमदाबाद टेक्सटाईल इंडस्ट्री रिसर्च असोसिएशन’च्या स्थापनेत योगदान दिले. आणि नंतर त्यांनी अहमदाबाद टेक्सटाईल रिसर्च इंडस्ट्रीचा भारतभर प्रसार करण्यावर भर दिला.
 • त्यांच्या अनेक कामगिरींपैकी एक म्हणजे ते विज्ञानाशी बर्‍याच प्रमाणात जोडलेले होते, ज्यामुळे त्यांना अहमदाबादमध्ये सामुदायिक विज्ञान केंद्राची पायाभरणी करण्याची प्रेरणा मिळाली. त्यांनी आपल्या मेहनतीने आणि झोकून देऊन हे प्रस्थापित केले. आजही ते केंद्र विक्रम साराभाईंच्या नावाने ओळखले जाते, ज्यांचे नाव ‘विक्रम साराभाई कम्युनिटी सायन्स सेंटर’ आहे.
 • त्यानंतर त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचीही निर्मिती केली. त्याची स्थापनाही डॉ. साराभाईंनीच केली होती, तीही अहमदाबादमध्येच स्थापन झाली होती.
 • काही काळानंतर त्यांनी स्वतःच्या हाताने ‘विक्रम साराभाई स्पेस सेंटर’ची पायाभरणीही केली. तिरुअनंतपुरममध्येच त्यांनी हे केंद्र बांधले. पुढे, साराभाईंनी बांधलेल्या सहा संस्थांचे एकत्रीकरण करून अहमदाबादमध्ये एक विशाल स्पेस अॅप्लिकेशन सेंटर तयार करण्यात आले.
 • ‘फास्ट टेस्ट रिअॅक्टर’ देखील साराभाईंनी बांधली होती, जी कल्पक्कममध्ये स्थापित आहे.
 • त्यानंतर, त्यांनी आपल्या पत्नीसह अहमदाबाद येथे असलेल्या दर्पण अकादमी फॉर परफॉर्मन्स आर्ट्सची स्थापना केली.
 • काही काळानंतर त्यांनी कलकत्ता येथे स्थापन झालेल्या ‘व्हेरिएबल एनर्जी सायक्लोट्रॉन प्रोजेक्ट’मध्येही हातभार लावला.
 • युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (UCIL) ची स्थापना बिहारमधील जादुगुडा येथे झाली.
 • त्यांनी देशातील पहिली ‘बाजार संशोधन संस्था’ स्थापन केली ज्याचे नाव ऑपरेशन रिसर्च ग्रुप होते.
 • त्यांनी हैदराबादमध्ये इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (ECIL) ही कंपनी तयार केली होती.
 • अशाप्रकारे, त्यांच्या सखोल अभ्यासाने हळूहळू अनेक अवकाश अभ्यासांना हातभार लावला. याशिवाय अनेक संशोधने विकसित करण्यातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. ते असे व्यक्तिमत्व होते ज्यांनी केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही अनेक संस्था स्थापन करण्यात मदत केली आणि स्वतः अनेक संस्था स्थापन केल्या.

पुरस्कार

 • डॉक्टर विक्रम साराभाई यांना त्यांनी घडवून आणलेल्या नाविन्यपूर्ण विचारसरणीसाठी तसेच त्यांच्या दूरदर्शी स्वभावासाठी भारत सरकारकडून कौतुकास्पद पुरस्कार देऊन, त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. त्यापैकीच एक पद्यभूषण हा १९६६ दरम्याने डॉक्टर विक्रम साराभाई यांना देऊन गौरवित केले.
 • तसेच त्यांच्या मरणोत्तर १९७२ मध्ये पद्यविभूषण हा पुरस्कार देऊन, डॉक्टर विक्रम साराभाई यांना भारत सरकारने सन्मानित केले.
 • काही कालावधीने “शांतीस्वरूप भटनागर पुरस्काराने” सुद्धा डॉक्टर विक्रम साराभाई यांना गौरवित करण्यात आले.
 • आज सुद्धा डॉक्टर विक्रम साराभाई जन्मदिवस “अंतराळ विज्ञान दिन” म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. डॉक्टर विक्रम साराभाई हे त्यांच्या जीवन कारकिर्दीमध्ये अतिशय प्रसिद्ध महान शास्त्रज्ञ होते. व आज सुद्धा संपूर्ण भारतामध्ये त्यांना महान शास्त्रज्ञ म्हणून संबोधले जाते.

डॉ. साराभाई (विक्रम साराभाई संस्था) यांनी स्थापन केलेली सुप्रसिद्ध संस्था

 • भौतिक संशोधन प्रयोगशाळा (पीआरएल), अहमदाबाद
 • कम्युनिटी सायन्स सेंटर, अहमदाबाद
 • विक्रम साराभाई स्पेस सेंटर, तिरुवनंतपुरम
 • फास्टर ब्रीडर टेस्ट रिएक्टर (एफबीटीआर), कल्पकम
 • युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (यूसीआयएल), जादुगुडा, बिहार
 • दर्पण अकादमी फॉर परफॉर्मिंग कला, अहमदाबाद
 • व्हेरिएबल एनर्जी सायक्लोट्रॉन प्रकल्प, कोलकाता
 • स्पेस सेंटर, अहमदाबाद

डॉक्टर विक्रम साराभाई यांची वैयक्तिक माहिती

१९४२ च्या दरम्याने शास्त्रीय नृत्यांगना मृणालिनी यांच्यासोबत डॉक्टर विक्रम साराभाई हे विवाहबद्ध झाले. दोघांचे लग्न भारतातील चेन्नई या शहरामध्ये झाले. विक्रम साराभाई यांना दोन मुले झाली. त्यामध्ये मुलीचे नाव मलिका व मुलाचे नाव कार्तिकेय असे त्यांनी ठेवले.

त्यांची मुलगी मलिका अभिनेत्री व प्रसिद्ध कार्यकर्ता म्हणून प्रसिद्ध आहे. तर मुलाने विज्ञान क्षेत्रामध्ये प्रभुत्व प्राप्त केले आहे. डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या पत्नीसोबत त्यांचे वैवाहिक जीवन हे दीर्घकाळ टिकले नाही. यानंतर विक्रम साराभाई यांचे डॉक्टर कमला चौधरी यांच्यासोबत प्रेम संबंध होते, असे सांगण्यात आले होते.

डॉक्टर विक्रम साराभाई व डॉक्टर कमला प्रेमसंबध

डॉक्टर विक्रम साराभाई व मृणालीनी साराभाई यांचा वैवाहिक संबंध जास्त काळ टिकला नाही. लग्नानंतर काही वर्षांनीच दोघांमध्ये दुरावा वाढत गेला. या अंतराचे मुख्य कारण म्हणजे डॉक्टर कमला चौधरी. ज्या मृणालिनीची मैत्रिण होत्या.

मृणालिनीला विक्रम साराभाई यांचे प्रेम संबंध कमला यांच्यासोबत चालू आहे असे वाटू लागले, व ते दोघे सुद्धा आपली फसवणूक करत आहेत, यामुळे मृणालिनीने विक्रम साराभाईंपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. विक्रम साराभाई यांनी स्वतःचे वैवाहिक संबंध वाचवण्याचा खडतर प्रयत्न केला. परंतु, शेवटी त्यांचा घटस्फोट झाला होता कि नाही हे अजूनही माहित नाही. परंतु ते दोघे एकमेकांपासून वेगळे झाले होते.

डॉक्टर विक्रम साराभाई यांचा मृत्यू

डॉक्टर विक्रम साराभाई यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये खूप मोठे काम केले. व शेवटी रुची रॉकेटच्या प्रक्षेपणानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी पहिल्या थुंबा रेल्वे स्टेशनची पायाभरणी सुद्धा केली. ज्यावेळी पहिला भारतीय उपग्रह आर्यभट्ट हा लॉन्च होणार होता, त्याच्या चार वर्षांपूर्वीच दुर्दैवाने हृदयविकाराच्या झटक्याने डॉक्टर विक्रम साराभाई यांचा दि. ३० डिसेंबर १९७१ रोजी वयाच्या अवघ्या ५२ व्या वर्षी मृत्यू झाला.

डॉक्टर विक्रम साराभाई यांच्याविषयी तथ्ये

 • डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या शोधामधील पहिला भारतीय उपग्रह आर्यभट्ट अंतराळामध्ये ठेवण्यात आला.
 • भारताचे महान संशोधक डॉक्टर विक्रम साराभाई यांचा १२ ऑगस्ट हा जन्मदिवस “अंतराळ विज्ञान दिन” म्हणून संपूर्ण भारतात साजरा केला जातो.
 • डॉक्टर विक्रम साराभाई यांची पत्नी मृणालिनी हिची मैत्रीण डॉक्टर कमला यांच्यासोबत प्रेम संबंध होते, असे सांगितले जाते.
 • विक्रम साराभाई यांच्या योगदानाबद्दल बोलायचे गेल्यास, त्यांनी विविध संस्था स्थापन करून, भारताला एक अनमोल भेट प्रदान केली आहे.
 • डॉक्टर विक्रम साराभाई यांची मुलगी मल्लिका साराभाई ही एक प्रसिद्ध शास्त्रीय नृत्यांगना आहे.

नक्की वाचा 👇

डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या बद्दल १० ओळी

 • डॉक्टर विक्रम साराभाई एक भारतीय भौतिक विज्ञान आणि व खगोलशास्त्रीय होते.
 • डॉक्टर विक्रम साराभाई यांचे पूर्ण नाव विक्रम अंबालाल साराभाई असे होते.
 • विक्रम साराभाई यांचा जन्म अहमदाबाद गुजरात या ठिकाणी झाला.
 • विक्रम साराभाई यांच्या आईचे नाव सरला देवी व वडिलांचे नाव अंबालाल साराभाई असे होते.
 • विक्रम साराभाई यांचे पिता एक श्रीमंत उद्योगपती व परोपकारी होते, तसेच त्यांच्या पित्ताने साराभाई समूह कंपनीची स्थापना सुद्धा केली.
 • विक्रम साराभाई यांना भारतीय अंतरिक्ष कार्यक्रमाचे जनक म्हटले जाते.
 • १९६२ मध्ये डॉक्टर विक्रम साराभाई यांनी अहमदाबाद या ठिकाणी भारतीय प्रबंध संस्था स्थापन करण्यासाठी मदत केली.
 • १९६६ मध्ये पद्यभूषण, १९७२ मध्ये मरणोत्तर पद्यविभूषण देऊन विक्रम साराभाई यांना भारत सरकारने सन्मानित केले.
 • विक्रम साराभाई यांची पत्नी मृणालिनी ही प्रसिद्ध शास्त्रीय नृत्यांगना होती.
 • डॉक्टर विक्रम साराभाई यांना “इस्त्रोचे जनक” सुद्धा म्हटले जाते.

विक्रम साराभाई यांची माहिती मराठी व्हिडिओ

FAQ

१. विक्रम साराभाई यांचे पूर्ण नाव काय आहे?

विक्रम साराभाई यांचे पूर्ण नाव विक्रम अंबालाल साराभाई आहे. साराभाई एक प्रसिद्ध भारतीय शास्त्रज्ञ म्हणून ओळखले जातात. विक्रम साराभाई यांनी ८६ वैज्ञानिक शोधनिबंध लिहिले. ४० संस्था स्थापन केल्या.

२. विक्रम साराभाई यांचा मृत्यू कधी झाला?

भारतातील प्रसिद्ध थोर संशोधक विक्रम साराभाई यांचे ३० डिसेंबर १९७१ रोजी ह्रदयविकाराच्या झटक्याने कोवलम, केरळ येथील हॅल्सियन कॅसल येथे निधन झाले.

३. विक्रम साराभाई यांनी कोणते शोध लावले?

विक्रम साराभाई यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची स्थापना केली. व ही त्यांच्या जीवनामधील सर्वात मोठी उपलब्धी समजली जाते. डॉक्टर विक्रम साराभाई एक भारतीय भौतिक विज्ञान आणि व खगोलशास्त्रीय होते.त्यांना भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक मानले जाते.

विक्रम साराभाई कशासाठी ओळखले जातात?

डॉ. विक्रम साराभाई यांना भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक मानले जाते; ते एक दूरदर्शी शास्त्रज्ञ आणि अंतराळ संशोधन आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी होते. डॉ. साराभाई यांनी आपले जीवन वैज्ञानिक ज्ञान आणि अंतराळ संशोधनातील नवकल्पना विकसित करण्यासाठी समर्पित केले. भारताच्या अंतराळ क्षमतांच्या विकासासाठी त्यांच्या उल्लेखनीय योगदानामुळे भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) आणि त्यानंतरच्या यशाची पायाभरणी झाली.

विक्रम साराभाई यांना भारतीय अवकाशाचे जनक का म्हटले जाते?

डॉ. विक्रम साराभाई यांचा वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी 11 नोव्हेंबर 1947 रोजी अहमदाबादमध्ये भौतिक संशोधन प्रयोगशाळा (पीआरएल) ची स्थापना करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. ते एक दूरदर्शी शास्त्रज्ञ आणि अंतराळ संशोधन आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी होते.त्यांनी इस्रोच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावली ज्यासाठी त्यांना “भारतीय अंतराळ संशोधनाचे जनक” ही पदवी दिली गेली .

निष्कर्ष

मित्रहो, आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणस डॉ.विक्रम साराभाई यांच्या बद्दल माहिती दिली आहे. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा, लेख आवडल्यास तुमच्या इतर मित्रपरिवारांसोबत नक्की शेयर करा. धन्यवाद.

Leave a comment