नरक चतुर्दशी 2023 मराठी माहिती | narak chaturdashi 2023 information in marathi

narak chaturdashi information in marathi | नरक चतुर्दशी संपूर्ण माहिती -अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला नरक चतुर्दशी म्हणतात. दिवाळीच्या एक दिवस आधी हा सण साजरा केला जातो. म्हणून याला नरक चौदस, रूप चतुर्दशी आणि छोटी दिवाळी असेही म्हणतात. धार्मिक ग्रंथानुसार छोटी दिवाळीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुर या राक्षसाचा वध केला होता.

आपला भारत देश हा सांस्कृतिक परंपरांचा देश म्हणून ओळखला जातो. या आपल्या देशामध्ये होणारे प्रत्येक सण आपण मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा करत असतो. त्यापैकीच एक असणारा दिवाळी हा सण आपण सगळे मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरा करतो. हा सण साधारणपणे पाच दिवस चालणारा भारतातील सर्वात मोठा सण मानला जातो. या दिवाळी सणाच्या तिसऱ्या दिवशी नरक चतुर्दशी हा दिवस असतो.

या दिवशी दीपदान करण्याची प्रथा देखील आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. ही नरक चतुर्दशी आपण का साजरी करतो? या नरक चतुर्थीचे महत्त्व, याची माहिती आणि यामागील कथा नक्की काय आहे? याबाबतची सगळी माहिती आज आम्ही आमच्या या मराठी झटका डॉट कॉम या वेब पेज द्वारे आपल्यापर्यंत घेऊन आलो आहोत. चला तर मग, वेळ न घालवता पाहूया, नरक चतुर्दशी.

Table of Contents

नरक चतुर्दशी मराठी माहिती | narak chaturdashi information in marathi

श्री कृष्णाच्या या पराक्रमाची आठवण म्हणून आश्विन कृष्ण चतुर्दशीस नरक चतुर्दशी हा सण साजरा केला जातो. नरकचतुर्दशीच्या दिवशी अलक्ष्मीचे पहाटे दर्शन करून आपल्यातील नरकरूपी पापवासनांचा नायनाट व अहंकाराचे उच्चाटन करायचे आहे. तेव्हाच आपल्या मनातील गर्वाचा पडदा दूर होऊन आत्मज्योत प्रकाशित होईल, असा यामागील उद्देश आहे.

नरक चतुर्दशी 2023 कधी आहे ?

सणाचे नाव नरक चतुर्दशी
सणाची इतर नावे नरक चौदस, रूप चतुर्दशी आणि छोटी दिवाळी
तिथी आश्विन कृष्ण चतुर्दशी
2023 मध्ये कधी आहे 12 नोव्हेंबर 2023 , वार रविवार 
नरक चतुर्दशी मुहूर्त सुरूवात 12 नोव्हेंबर 2023 ला संध्याकाळी 6 वाजून 3 मिनिटांनी सुरु
नरक चतुर्दशी मुहूर्त समाप्ती 13 नोव्हेंबर 2023 ला सकाळी 5 वाजून 27 मिनिटांनी संपणार
अभ्यंग स्नान
मुहूर्त
पहाटे 5 वाजून 5 मिनिटांनी सुरु आणि 6 वाजून 27 मिनिटांपर्यंत

या दिवसाला अभ्यंगस्नानाचे महत्त्व असे मानले जाते. सकाळी लवकर उठून, संपूर्ण शरीरास तेलाने मालीश करून, सुवासिक उटणे लावून, सूर्योदयापूर्वी केलेले स्नान म्हणजे अभ्यंगस्नान होय. नरकचतुर्दशी या दिवशी पहाटे यमासाठी नरकात, म्हणजे आधुनिक परिभाषेत घरातील आदल्या दिवशी घासून पुसून स्वच्छ केलेल्या स्वच्छतागृहात पणती लावण्याची प्रथा आहे. नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे पासून फटाके उडवायला सुरुवात होते आणि तिचा शेवट भाऊबीजेच्या रात्री होतो. त्यानंतर घरात उरलेले फटाके तुळशीच्या लग्नादिवशी उडवले जातात आणि संपवतात.

हा सण दिवाळीच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच धनत्रयोदशीच्या दुसऱ्या दिवशी आपण सगळेच साजरा करतो. या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला होता. त्या दिवसापासून दिवाळीच्या तिसऱ्या दिवशी आपण हा सण साजरी करतो. हा सण आपल्याला स्वतःच्या सुखापेक्षा इतरांच्या सुखामध्ये आनंद मानला पाहिजे अशी शिकवण देतो.

या दिवसाला खूप महत्त्व आहे. तसेच या दिवशी होणाऱ्या अभ्यंग स्नानाला देखील महत्त्व प्राप्त झाले आहे. या दिवसाला छोटी दिवाळी असे सुद्धा म्हटले जाते. हा एक हिंदूंचा पवित्र सण असून या दिवशी भगवान श्रीकृष्णांनी नरकासुराला मारून 16100 मुलींना मुक्त केले होते. हा सण अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षांमधील चतुर्दशीला येतो.

या दिवशी भारतातील सगळे लोक सकाळी सूर्योदयाच्या आधी उठून सुवासिक उटणे तसेच तेल लावून गरम पाण्याने अंघोळ करतात. म्हणजेच शरीरातील नरकासुरारुपी राक्षसाचा नाश आणि आपल्या शरीरातील मनातील वाईट विचार नष्ट व्हावे यासाठी देवाला प्रार्थना केली जाते. अभंग स्नान झाल्यानंतर यमासाठी नरकात दीपदान केले जाते.

narak chaturdashi information in marathi

नरक चतुर्दशी म्हणजे काय ? narak chaturdashi in marathi

या सणाला नरका चतुर्दशी, नरका पूजा किंवा रूप चतुर्दशी सारख्या इतर नावांनी देखील ओळखले जाते. हा सण आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला साजरा केला जातो. मान्यतेनुसार याच दिवशी भगवान श्रीकृष्ण यांनी नरकासुराचा वध करून 16100 मुलींची सुटका केली व त्यामुळेच ही साजरी केली जाते.

यासोबतच या दिवशी संध्याकाळी दिवा दान करण्याची प्रथा आहे, हा दिवा यमराजासाठी केला जातो, पौराणिक कथांनुसार या दिवशी यमदेवाची पूजा केली जाते.  महापर्वाच्या या मालिकेतील या सणाला स्वतःचे वेगळे महत्त्व आहे. आश्विन महिन्यातील कृष्ण तिथीच्या दिवशी पूर्ण विधीपूर्वक पूजा केल्यास जन्मभर केलेल्या पापांपासून मुक्ती मिळते, तसेच नरक आणि अकाली मृत्यूचे भय राहत नाही.

नरक चतुर्दशी तारीख वार मुहूर्त 2023 | Narak Chaturdashi 2023

ह्या वर्षी नरक चतुर्दशी 2023 तारीख आणि वार हे पुढील प्रमाणे आहे.

ह्या वर्षी 12 नोव्हेंबर, वार रविवार 2023 ला नरक चतुर्दशी 2023 आहे. हि चतुर्दशी अश्विन अमावस्याला असते.

हि नरक चतुर्दशी 12 नोव्हेंबर 2023 ला संध्याकाळी 6 वाजून 3 मिनिटांनी सुरु होणार असून ती 13 नोव्हेंबर 2023 ला सकाळी 5 वाजून 27 मिनिटांनी संपणार आहे.

ह्या दिवशी संध्याकाळी 2 वाजून 44 मिनिटांनी अमावस्या सुरु होऊन ती दुसऱ्या दिवशी संध्याकाळी म्हणजे 13 नोव्हेंबर 2023, वार 12 सोमवार ला 2 वाजून 56 मिनिटांनी अमावस्या संपणार आहे.

Narak Chaturdashi 2023

अभ्यंग स्नान मुहूर्त 2023 | Abhyanga Snan 2023 Date Time Muhurat

ह्या वर्षी अभ्यंग स्नान मुहूर्त 2023 सकाळी – सकाळी उठून ज्या मुहूर्तावर आंघोळ करायची असते ती वेळ आपण बघणार आहोत. तसेच हे स्नान पहाटे ब्रम्ह मुहूर्तावर जरी केले तरी चालते.

अभ्यंग स्नान मुहूर्त हा पहाटे 5 वाजून 5 मिनिटांनी सुरु होऊन तो 6 वाजून 27 मिनिटांपर्यंत आहे. फक्त १ तास 22 मिनिटांचा अवधी ह्या वर्षी आहे.

हे ही वाचा – दसरा संपूर्ण माहिती मराठी 

नरक चतुर्दशी हा सण का साजरा केला जातो? 

पौराणिक कथेनुसार नरक चतुर्दशीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने अत्याचारी आणि दुष्ट राक्षस नरकासुरचा वध केला. 16,100 मुलींना नरकासुराने आपल्या कैदेत ठेवले होते, श्रीकृष्णाने या मुलींना नरकासुराच्या बंदिवासातून मुक्त केले आणि पत्नी सत्यभामाच्या मदतीने 16,100 मुलींशी विवाह करून त्यांना सन्मान दिला होता.  मुलींच्या बंधनातून मुक्ती आणि नरकासुराच्या वधाच्या स्मरणार्थ नरक चतुर्दशीच्या दिवशी दीपदानाची परंपरा सुरू झाली. त्यासाठी दिवे लावून सजावट केली जाते आणि नरक चतुर्दशीचा सण साजरा केला जातो.

नरकासुर दहन परंपरा

महाराष्ट्र आणि गोव्यात दिवाळीपूर्व नरकासुर दहन ही एक मोठी परंपरा आहे. नरकासुराच्या महाकाय प्रतिकृती आणि जल्लोषात निघणारी भव्य मिरवणूक काढून पहाटे नरकासुराचे दहन केले जाते. काही ठिकाणी नरकासुर दहन केल्यानंतरच गोव्यात खऱ्या अर्थानं दिवाळीला सुरूवात होते.

चौकाचौकात अक्राळविक्राळ स्वरूपातील नरकासुराच्या प्रतिकृती पाहायला मिळतात. नरकासुर दहनापूर्वी नरकासुराची वाजत गाजत मिरवणूक काढली जाते. यासाठी आकर्षक विद्युत रोषणाई केली जाते सोबतीला डिजे आणि मोठ्या प्रमाणावर युवा सहभागी होत असतात. नरक चतुर्थी दिवशी संपूर्ण रात्रभर हा मिरवणूकीचा कार्यक्रम सुरू असतो. काही ठिकाणी मध्यरात्र उलटून गेल्यानंतर तर, काही ठिकाणी पहाटे नरकासुराचे दहन केले जाते.

नरक चतुर्दशी कशी साजरी करतात ?

नरक चतुर्दशीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून सर्वप्रथम आपल्या अंगाला उठणे आणि तेल लावून गरम पाण्याने अभंग स्नान केले जाते. त्यानंतर देवाला दिवा लावून दारामध्ये रांगोळी काढून फटाके लावून आनंदोत्सव साजरा केला जातो. आंघोळीनंतर पायाखाली करटुले नावाचे कडू फळ चिरडण्याची पद्धत आहे. नरकासुराच्या वधाचे प्रतीक म्हणून ही प्रथा पार पाडली जाते.

अभंग स्नान झाल्यानंतर नवीन कपडे, दागिने परिधान करून देवदर्शन केले जाते. त्यानंतर फराळाचे पदार्थ देवाला नैवेद्य म्हणून दाखवून आपण प्रसाद म्हणून घरातील सर्व सदस्य मिळून एकत्र ग्रहण करतो. संध्याकाळी वेगवेगळ्या प्रकारच्या पणत्या, आकाश कंदील लावून जागोजागी रोषणाई करतो.

नरकासुराचा वध

त्याचप्रमाणे फटाक्यांची देखील आतषबाजी केली जाते. यामागे असणाऱ्या पौराणिक कथेनुसार ज्यावेळी भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला, त्यावेळी मरताना नरकासुराने त्यांच्याकडून वर मागितला की, आजच्या तिथीला मंगल स्नान करणाऱ्यांना नरकाची पीडा होऊ नये. म्हणूनच त्या दिवसापासून सूर्योदयापूर्वी स्नान अभ्यंग स्नान करण्याची प्रथा पडलेली दिसून येते. जे या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून लोक स्नान करत नाहीत, त्यांच्या मागे वर्षभर दारिद्र्य संकट येत असतात. यापासून त्यांना मुक्ती मिळत नाही, असे देखील समजले जाते.

नरकचतुर्दशीच्या दिवशी पुढील कुलाचार करण्यात येतात

  • सूर्योदयापूर्वी सुवासिक तेल व उटणे लावून गरम पाण्याने पुरुषांचे अभ्यंगस्नान होणे.
  • घरातील सुवासिनींनी त्यांना औक्षण करणे.
  • दारासमोर रांगोळी काढणे.
  • आकाशकंदील लावणे.
  • सर्वांनी भगवंताचा जयजयकार करणे.
  • घरातील देवांना तेल उटणे लावून मंगलस्नान घालणे व पूजा करणे.
  • सणानिमित्त केलेल्या फराळाचा नैवेद्य दाखवणे.
  • कुटुंबातील सर्वांनी एकत्र बसून फराळ करणे.
  • सायंकाळी दीपोत्सव करणे.
  • चार वातींची समई पूर्वेकडे लावून तिचे दान करणे.

नरक चतुर्दशीचे महत्त्व

नरक चतुर्दशीच्या दिवशी दिवा लावून दिवा दान करण्याचे पौराणिक महत्त्व आहे.  या दिवशी संध्याकाळी दिवे लावल्याने अंधार दूर होतो, म्हणूनच नरक चतुर्दशीला छोटी दिवाळी असेही म्हणतात. या दिवशी नरकासुराचा वध करून 16,100 मुलींना बंधनातून मुक्त केल्यावर, श्रीकृष्णाने लग्न करून या मुलींचा आदर करण्याचे विशेष महत्त्व आहे.

आपल्या हिंदू धर्मामध्ये स्वर्ग आणि नरक अशा दोन संकल्पना आपण मानतो. म्हणूनच आयुष्य चांगल्या प्रकारे घालवले आणि चांगल्या गोष्टी आपण या पृथ्वीतलावर केल्या, तर आपल्याला स्वर्ग मिळतो आणि जर आपण वाईट वागलो, वाईट वृत्ती आपल्या मनात तयार केली, तर आपल्याला नरकात जावे लागते. अशी आपल्या हिंदू धर्मातील लोकांची मान्यता आहे.

म्हणूनच या नरकाच्या भयापासून मुक्ती मिळवण्यासाठी सगळ्या ठिकाणी दिव्यांची आरास करावी असे देखील समजले जाते. लोकांच्या मनातील भीती नष्ट व्हावी, सर्वांनी पापमुक्त राहावे, एकमेकांना सहाय्य करावे, ज्याप्रमाणे दिवे स्वतः जळतात आणि इतरांना प्रकाश देतात, त्याचप्रमाणे आपणही दुसऱ्यांची मदत केली पाहिजे, या दृष्टीकोनातून आपण वेगवेगळ्या पणत्या या दिवशी प्रज्वलित करून दीपदान करतो. आणि आपल्या आयुष्यातील अज्ञान, अंधार दूर करण्याचा प्रयत्न करतो.

हे वाचा – नवरात्री संपूर्ण माहिती मराठी

नरक चतुर्दशी का फोडले जाते कारिट फळ?

अभ्‍यंगस्‍नानापूर्वी कारिट नावाचे फळ फोडण्‍याची परंपरा महाराष्‍ट्रात अनेक ठिकाणी आढळते. ते फळ नरकासूर या राक्षसाचे प्रतिक मानले जाते. या दिवशी पहाटे लवकर उठून अभ्‍यंगस्‍नानाच्‍या पूर्वी घराबाहेर किंवा तुळशी वृदांवनाजवळ डाव्‍या पायाच्‍या अंगठ्याने कारिट ठेचले जाते. अभ्‍यंगस्‍नानाच्‍या आधी कारिट फोडून नरकासुराचा प्रतिकात्मक वध करत त्याच्‍या रुपात असलेली सारी कटुता, दुष्टता नाहीशी करावी आणि त्‍यानंतर मंगल स्नानाने पवित्र होऊन अभ्यंगस्नान करणाऱ्या व्यक्तीला प्रथम कुंकवाचा टिळा लावण्यात येतो.

अभ्यंगस्नान म्हणजे काय ?

सर्व शरीराला कोमट केलेले तिळाचे तेल लावून ते जिरे पर्यंत मर्दन करणे किंवा अंग चोळणे या प्रक्रियेला खरे तर अभ्यंग म्हणतात. या दिवशी सूर्योदयापूर्वी संपूर्ण शरीराला उटणे आणि तेल लावून आपण जे स्नान करतो, त्याला अभ्यंगस्नान असे म्हणतात.

अभ्यंग स्नानाचे महत्त्व

हे अभ्यंग स्नान करणे अत्यंत फलदायी असे मानले जाते, या अभ्यंग स्नानात संपूर्ण शरीरावर तेलाची मालिश करण्यात येते, ब्रह्म मुहूर्तावर सूर्योदयापूर्वी करण्यात आलेल्या या अभ्यंग स्नानाला अतिशय महत्त्व प्राप्त झालेले आहे.नरक चतुर्दशीला शुभ मुहूर्तावर स्नान केल्याने नरकाच्या भयापासून मुक्ती मिळते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. स्नानानंतर दक्षिण दिशेला हात जोडून यमराजाची प्रार्थना केल्यास वर्षभरात केलेली पापे नष्ट होतात, असाही समज आहे

अभ्यंगस्नानाचे फायदे

खरे तर दिवाळीचा काळ म्हणजे थंडीच्या आगमनाची वेळ. यावेळी शरीराला हंगामी आजार होण्याची शक्यता असते. अभ्यंगस्नान केल्याने शरीरातील रोगांशी लढण्याची शक्ती वाढते.अभ्यंगस्नानाला जेवढे भौतिक महत्त्व आहे, तेवढेच धार्मिक महत्त्व आहे. अभ्यंगस्नानाने शरीरातील सर्व छिद्रे उघडतात. त्यामुळे शरीराची रोगांशी लढण्याची क्षमता वाढते.

पूर्ण शरीराला व्यवस्थित तेल लावून मालिश केल्याने त्वचेमधील वाताचे प्रमाण हे कमी होते. उटणे लावल्याने शरीराची चांगली मसाज होते. त्यात आयुर्वेदिक घटक असल्याने त्याचा फायदा होतो. त्वचेतील कोरडेपणा नाहीसा होऊन त्वचा मुलायम आणि कोमल होते. शरीरातील रक्त प्रवाह सुरळीत व्हायला लागतो. घामाचा येणार दुर्गंध नाहीसा होतो.

दिवाळीला शास्त्र शुध्द पध्दतीने बनविलेले तेल कुण्या प्रेमाच्या व्यक्ती कडुन सर्व अंगाला लावुन नंतर शुध्द वनौषधीच्या चुर्णाचे ऊटणे वापरुन मग गरम गरम पाण्याने आंघोळ करण्याचे स्वर्ग सुख काही अवर्णनीयच असते. तेजोमय दिवाळित भेटलेले हेच विसाव्याचे क्षण , आपुलकीचे क्षण, पुढे वर्षभर धकाधुकीयुक्त जीवनाला स्नेहाचा-प्रेमाचा आधार देतात.

नरक चतुर्दशी कथा | narak chaturdashi story in marathi

अश्विन कृष्ण चतुर्दशीला हा सण साजरा करतो. या सणाची संबंधित एक पौराणिक कथा आहे. या आणि कथेनुसार नरकासुर हा एक दुष्ट आणि क्रूर असा असुर होता. ज्यावेळी विष्णूंनी पृथ्वीचा उद्धार करण्यासाठी वराह अवतार घेतला, त्यावेळी त्याचा जन्म पृथ्वीच्या गर्भातून झाला होता. त्याचा जन्म झाल्यानंतर राजा जनकाने नरकासुराचा सांभाळ केला,

पृथ्वीच्या गर्भातूनच त्याचा जन्म झाल्यामुळे आपल्याबरोबर पृथ्वी त्याला विष्णू लोकात घेऊन गेली. विष्णूंनी त्याला प्रागज्योतिषपूर राज्याचे कारभार सांभाळण्यासाठी सांगितले. त्यासाठी त्याला एक दुभेथ रथ दिला. मथुरेचा राजा कंस याचा मित्र होता. त्याचे लग्न विदर्भाच्या राजकन्या मायाशी झाला. नरकासुराने आपले राज्य काही काळ व्यवस्थित सांभाळणे. पण त्याची मित्र बाणासुराशी होती. त्यामुळे त्याच्या संगतीत राहून तो लोकांवर अत्याचार अन्याय करू लागला.

त्याने आपल्या अत्याचाराने सगळीकडे उच्छाद मांडला होता. त्याच्या या उच्छादाला कंटाळून एकदा वशिष्ठ ऋषींनी त्याला शाप दिला की, त्याचा मृत्यू विष्णूंच्या हस्ते होणार आहे.या शापापासून वाचण्यासाठी त्यांनी ब्रह्मदेवाची कठोर तपश्चर्य केली. आणि ब्रह्मदेवांना त्याने प्रसन्न करून घेतला आणि मला कोणीही मारू शकणार नाही, असा वर घेतला. वर मिळाल्यानंतर त्यांनी स्वतःला अमर समजून त्याने अनेक राजांना बंदिस्त करून त्यांच्या बायका मुलींवर अत्याचार सुरू केले.

जवळपास 16 हजार 100 बायकांना त्याने कारागृहात दाबून ठेवले होते. त्याच्या अत्याचाराला सगळेच कंटाळले होते. देव, गंधर्व, मानवांना याचा त्रास होत होता. ते सगळे विष्णू देवांकडे गेले. विष्णूंनी त्याला मारण्याचा ठरवले. आणि कृष्णाच्या रूपात येऊन त्याचा वध केला. त्याचे त्यांनी बांधलेले महाल वेगवेगळ्या खंडहराने, अग्नीने वेढले गेले होते. कृष्णाने गरुडावर बसून नरकासुराचे दोन तुकडे पाडले. आणि त्याचा वध केला आणि त्याच्या कारागृहात बंदीवान असलेल्या 16100 मुलींची सुटका केली.

त्यानंतर सगळ्यांनाच असा प्रश्न पडला की, या बंधिवान झालेल्या मुलींचा स्वीकार कोण करणार? कृष्णाने त्या सोळा हजार 100 मुलींचा लग्न करून त्यांचा स्वीकार करून त्यांना मान मिळवून दिला. युद्ध करताना नरकासुराच्या रक्ताच्या काही थेंब कृष्णाच्या अंगावर पडले होते. ते स्वच्छ करण्यासाठी कृष्णाने तेल लावून स्नान केले होते. या दिवशीपासून आपण तेल लावून अभ्यंगस्नान करतो. या दिवशी अभंग स्नान केल्याने सर्व संकटे दूर होतात, असे सांगितले जाते.

नरक चतुर्दशी

नरक चतुर्दशी माहिती व्हिडिओ

प्रश्न

नरक चतुर्दशीच्या दिवशी काय करावे?

नरक चतुर्दशीच्या दिवशी मृत्यूची देवता यमराजाची पूजा करावी.
दारासमोर रांगोळी काढणे. आकाशकंदील लावणे.सणानिमित्त केलेल्या फराळाचा देवाला नैवेद्य दाखवणे. कुटुंबातील सर्वांनी एकत्र बसून फराळ करणे.
सायंकाळी दीपोत्सव करणे.

नरक चतुर्दशी कशी करावी?

नरक चतुर्दशीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून सर्वप्रथम आपल्या अंगाला उठणे आणि तेल लावून गरम पाण्याने अभंग स्नान केले जाते. त्यानंतर देवाला दिवा लावून दारामध्ये रांगोळी काढून फटाके लावून आनंदोत्सव साजरा केला जातो.

नरक चतुर्दशीचे महत्त्व काय आहे?

नरक चतुर्दशीच्या दिवशी यमराजाची पूजा केली जाते, ज्यामुळे व्यक्तीच्या जीवनातून अकाली मृत्यूची भीती दूर होते.
तसेच या दिवशी यमराजांसमोर दिवा लावल्याने नरकाच्या भयापासून मुक्ती मिळते.

नरक चतुर्दशी चांगली की वाईट?

नरक चतुर्दशी हा एक शुभ दिवस आहे जो धनत्रयोदशीनंतर दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी येतो. हा दिवस वाईटावर चांगल्याचा विजय साजरा करतो कारण या दिवशी दुष्ट राक्षस नरकासुराचा भगवान कृष्ण यांनी वध केला होता.

नरक चतुर्दशी आपण का साजरी करतो?

या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला होता. या दिवशी अलक्ष्मीचे पहाटे दर्शन करून आपल्यातील नरकरूपी पापवासनांचा नायनाट व अहंकाराचे उच्चाटन करायचे आहे. तेव्हाच आपल्या मनातील गर्वाचा पडदा दूर होऊन आत्मज्योत प्रकाशित होईल, असा यामागील उद्देश आहे. म्हणून नरक चतुर्दशी आपण साजरी करतो.

 निष्कर्ष

मित्रांनो, मराठी झटका डॉट कॉम या वेब पेजद्वारे नरक चतुर्दशी या सणाबद्दल माहिती, महत्व आणि पूजाविधि, याबाबतची सगळी माहिती आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे. आपल्याला ही माहिती वाचून कशी वाटली? कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. पुन्हा भेटू असाच एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.

Leave a comment