वसुबारस सणाची संपूर्ण माहिती मराठी | Vasubaras Information In Marathi

वसुबारस सणाची संपूर्ण माहिती मराठी | Vasubaras Information In Marathi – दरवर्षी ‘दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी…’ असं म्हणत दिव्यांच्या सणाचे म्हणजेच दिवाळी या सणाचे आपण जल्लोषात आणि मोठ्या आनंदाने स्वागत करतो. पावसाळा संपत येऊन कडाक्याच्या थंडीला सुरूवात झालेली असते. अभ्यंगस्नान, फटाक्यांची आतषबाजी, दारातील आकाशकंदील आणि पणत्या यांनी सजलेलं घर… अशा अतिशय आनंददायी वातावरणात या प्रकाशमय सणाचं स्वागत केले जाते. दिवाळी सणाची सुरुवात होते वसुबारस या सणापासून.

भारतीय संस्कृतीमध्ये गायीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. साऱ्या देवांची वस्ती गोमातेच्या शरीरात असते, अशी आपली श्रद्धा आहे. वसुबारस हा दिवस दीपावलीच्या एक दिवस आधी साजरा केला जातो. या दिवशी गायीची पूजा केली जाते. दिवाळीची सुरुवात वसु बारसच्या उत्सवापासून होते. वसू म्हणजे गाय आणि बारस म्हणजे बारावा दिवस.

आपल्या भारतीय संस्कृतीत सतत पाच दिवस साजरा केला जाणारा सण म्हणून दिवाळी या सणाकडे पहिले जाते. या सणाचा पहिला दिवस म्हणजे वसू बारस. यालाच गोवत्सद्वादशी असे देखील म्हटले जाते. आपला भारत देश हा कृषिप्रधान देश आहे. आणि आपल्या सर्वांसाठी अन्न पिकवतो तो अन्नदाता म्हणजेच शेतकरी.

गोवत्स द्वादशीचं महत्व या आमच्या शेतकरी बांधवांसाठी अधिक आहे. म्हणूनच शेतकरी वर्ग गोमाता अर्थात गाईबाबत कृतज्ञता या दिवशी व्यक्त करीत असतात. प्रेम भावनेचा हा अविष्कार जगात कुठेच बघायला मिळणार नाही इतकं हे शेतकरी आणि गायी वासराचं अनोखं प्रेम,नातं असते. आश्विन कृष्ण द्वादशीस, म्हणजेच गोवत्सद्वादशीस, वसुबारस हा सण साजरा केला जातो. 

गाईची वासरासह संध्याकाळी पूजा करतात. घरांत लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे. वसुबारस या सणाचा इतिहास, त्याचे महत्व, त्याची कथा नेमकी काय आहे,हे आज आपण मराठी झटका डॉट कॉम या वेब पेजद्वारे जाणून घेणार आहोत. चला तर मग,पाहुयात वसुबारस.

Vasubaras Information In Marathi

Table of Contents

वसुबारस सणाची संपूर्ण माहिती मराठी | Vasubaras Information In Marathi

सणाचे नाववसुबारस
सणाचे इतर नावगोवत्स द्वादशी
सणाचा प्रकारभारतीय सण
सणाचे महत्वगाई-गुरांबददल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी
साजरा केव्हा करतात ?आश्विन महिन्यातील वद्य द्वादशी
यावर्षी 2023 मध्ये कधी आहे? 9 नोव्हेंबर , वार गुरुवार 2023

भारत हा कृषिप्रधान देश असला तरी फार पूर्वी प्रत्येक घरामध्ये गुरे वासरे पाळली जायची. परंतु या धकाधकीच्या जीवनामुळे आणि शहरीकरण झाल्यामुळे आता प्रत्येकाच्या घरी गाई, गूरे, वासरे असतीलच असे नाही. ज्यांच्या घरी गाई, गूरे, वासरे आहेत, त्यांच्या घरी या दिवसाला फार महत्त्व असते. या दिवशी त्यांच्या घरामध्ये पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो.

घरातील सुहासिनी बायका गाईच्या पायावर पाणी घालून तिला हळद, कुंकू, फुले, अक्षता वाहून तिच्या गळ्यामध्ये फुलांची माळ घालतात. तिला निरांजनाने ओवाळून केळीच्या पानावर पुरणपोळी सह गोड धोडाचा पदार्थ, नैवेद्य वाढून गाईला खाऊ घातला जातो. ह्या दिवसापासून अंगणामध्ये रांगोळ्या काढण्यास सुरुवात केली जाते. कारण दिवाळी या सणाचा हा पहिला दिवस समजला जातो.

काही बायका या दिवशी उपवास देखील करतात. या दिवशी गहू, मूग यासारखे पदार्थ त्या खात नाहीत. तसेच दूध, दुधाचे पदार्थ, तळलेले पदार्थ देखील खाल्ले जात नाहीत. उपवास केलेल्या स्त्रिया बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगांची भाजी खाऊन हा उपवास सोडतात.

आपल्या मुलाबाळांना, आपल्या घराला चांगले आरोग्य, सुख, शांती लाभावी, म्हणून ही पूजा केली जाते. ज्यांच्या घरी गाई, गूरे, वासरे पाळली जात नाहीत, ते लोक सुद्धा गाईची कृतज्ञतापूर्वक स्मरण करून अंगणामध्ये तसेच तुळशी वृंदावना शेजारी किंवा देवघरातील एका कोपऱ्यामध्ये पाट मांडून त्या ठिकाणी गाईचे प्रतिकात्मक रूप तयार केले जाते.

आणि त्या ठिकाणी तिची पूजा केली जाते. दूध दुभत्यासाठी होणारा गाईचा उपयोग, तिच्या पासून तयार होणाऱ्या बैलांची शेतीच्या कामी होणारी मदत या गोष्टी लक्षात घेऊन या गाईंची कृतज्ञतापूर्वक पूजा केली जाते.

वसुबारस 2023 | Vasubaras 2023

ह्या वर्षी आश्विन महिन्याच्या सुरवातीलाच म्हणजेच वसुबारस 9 नोव्हेंबर 2023 ला, वार गुरुवार आहे. ह्या दिवशी सूर्योदय हा सकाळी ६ वाजून 37 मिनिटांनी आहे. आणि चंद्रोदय हे संध्याकाळी 5 वाजून 58 मिनिटांनी आहे.

 • गोवत्स द्वादशी – गुरुवार, 9 नोव्हेंबर, 2023
 • प्रदोषकाल गोवत्स द्वादशी मुहूर्त – 05:31 PM ते 08:09 PM
 • कालावधी – 02 तास 38 मि
 • द्वादशी तिथीची सुरुवात – 09 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 10:41
 • द्वादशी तिथी समाप्त – 10 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी 12:35 वाजता

वसुबारस मंत्र | Vasubaras Mantra in Marathi

पूजा करताना खालील मंत्राचा जप करावा.

ततः सर्वमय देवी सर्वदेवैरलङकृते |
मातर्मामा भिलाषितं सफलं कुरू नन्दिनि ||

वसुबारस मंत्राचा अर्थ

हे सर्वात्मक व सर्व देवांनी अलंकृत अशा नंदिनी माते, तू माझे मनोरथ सफल कर. असा या मंत्राचा अर्थ आहे.

वसुबारस म्हणजे काय? What Is Vasubaras?

वसु या शब्दाचे खूप अर्थ सांगितले जातात. वसु म्हणजे सूर्य, वसु म्हणजे कुबेर, वसु म्हणजे धन! आणि सर्वात महत्त्वाचा अध्यात्मिक अर्थ म्हणजे “सर्वांमध्ये वास करणारा” असा आहे आणि बारस म्हणजे द्वादशीचा दिवस! भारतात दिवाळी हा सण खूपच प्रसिद्ध आहे. विविध राज्यांतील संस्कृतीप्रमाणे दिवाळी साजरी केली जाते. महाराष्ट्रात दिवाळी साजरी करण्याची प्रथा पूर्वीपासून चालत आलेली आहे.

महाराष्ट्र हे शेतीप्रधान राज्य आहे. तसेच गाई, गुरे, जनावरे यांनाही प्रत्येक घरात महत्त्वाचे स्थान आहे. गाई तसेच इतर जनावरांबद्दल कृतज्ञता दाखवण्याचा दिवस म्हणजे वसुबारस, म्हणजेच दिवाळी सुरू होण्याचा पहिला दिवस म्हणजे वसु – बारस. वसु बारस हा दिवस, कृतज्ञता दिवस म्हणून अश्विन महिन्यातील कृष्ण द्वादशीस साजरा केला जातो. या द्वादशीस गोवत्स द्वादशी असे देखील म्हटले जाते.

वसुबारस सणाचा इतिहास | Vasubaras History

Vasubaras History

हिंदू पौराणिक कथांमध्ये, गायीला हे  पवित्र व देवाचा अवतार मानले जाते. या दिवसाला वसुबारस, गोवत्सद्वादशी किंवा नंदिनी व्रत असेही संबोधले जाते. तथापि, हा सण महाराष्ट्र राज्यात सर्वात जास्त साजरा केला जातो. जेथे तो गायी आणि वासराच्या सन्मानाशी संबंधित आहे.

या सणाचा उगम समुद्रमंथन या पौराणिक कथेशी संबंधित आहे, जेव्हा देव आणि दानव समुद्रमंथन करून अमृत किंवा जादुई अमृत शोधण्यासाठी धडपडत होते. या प्रक्रियेत दैवी गाय कामधेनू सात महान देवांची देणगी म्हणून उदयास आली. कामधेनू हे मातृत्व, प्रजनन, देवत्व आणि पालनपोषण यांच्या आशीर्वादांशी संबंधित आहे. दैवी प्राणी देखील भगवान श्रीकृष्ण, विष्णू अवतार यांच्याशी जवळून संबंधित आहे.

वसूबारस सणाचे महत्व 

आजही भारत हा कृषीप्रधान देश आहे. देशाचा मोठा भाग आजही शेतीच्या माध्यमातून उत्पन्न मिळवतो. कामधेनू म्हणजेच गाय ही शुद्धता, पवित्रता तसेच प्रजननक्षमता, त्याग आणि मातृप्रेम यासारखे स्वभाव दर्शवते जे मानवी जीवनाचे पालन करते.

जर तिच्याबद्दल पूजा, आदर आणि प्रेम असेल तर तिच्याकडे मालकाच्या सर्व इच्छा आणि इच्छा पूर्ण करण्याची क्षमता आहे. गाय ही सनातन धर्माच्या अनुयायांची अंतिम देवी आहे आणि शक्तिशाली आशीर्वाद देणारी मानली जाते. म्हणून ग्रामीण भारतातील अनेक भागांमध्ये, लोक त्यांच्या गायी आणि वासरांची पूजा करून हा दिवस साजरा करतात.

कारण त्यांच्यासाठी गाय हे त्यांच्या उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत आहेत. घरातील महिला गोपूजा आणि श्रीकृष्ण पूजा करतात. या दिवशी धनाची देवी म्हणून ओळखली जाणारी लक्ष्मी गाईचे रूप धारण करते, म्हणून लोक देवी लक्ष्मीचा आशीर्वाद घेण्यासाठी गाईची पूजा करतात अशी देखील आख्यायिका आहे.

गोवत्स द्वादशी वसु बारस म्हणून साजरी करतात (Govats Dwadashi celebrate as Vasu Baras)

महाराष्ट्रात, जिथे हा कार्यक्रम अधिक उत्साहाने साजरा केला जातो, गोवत्स द्वादशीला वसु बारस म्हणून ओळखले जाते. आपल्या मुलाबाळांना, आपल्या घराला चांगले आरोग्य, सुख, शांती लाभावी, म्हणून ही पूजा केली जाते. गायींचा सन्मान करताना महिला या दिवशी उपवास करतात. शिवाय, ते कृष्णाची पूजा करतात. या दिवशी गहू, मूग यासारखे पदार्थ त्या खात नाहीत.

तसेच दूध, दुधाचे पदार्थ, तळलेले पदार्थ देखील खाल्ले जात नाहीत. उपवास केलेल्या स्त्रिया बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगांची भाजी खाऊन हा उपवास सोडतात. त्याच वेळी, लोक नवीन पोशाख करतात, रांगोळीचे नमुने, दिवे आणि रंगांनी त्यांची घरे सजवतात आणि पवित्र गायींना आदर देतात. हिंदू धर्मात गायींना पवित्र प्राणी मानले जाते. दुसरीकडे, गुजरात गोवत्स द्वादशीला वाघ बारस म्हणून पाळतात.

वसूबारस पूजा विधि – vasubaras puja vidhi

वसू बारस या दिवशी ग्रामीण भागामधील लोकांकडून गाईला स्नान घातले जाते. त्यांना सुशोभित करण्यात येते. त्याचबरोबर गाईला नवीन कापड अर्पण केले जाते. तसेच गाईच्या कपाळावर हळद, कुंकू आणि चंदन टिळा लावला जातो. त्याचबरोबर गाईच्या गळ्यामध्ये फुलांचा हार घातला जातो.

गाईला पुरणपोळी आणि गोडधोडचा नैवेद्या देखील दाखवला जातो. तसेच गाईला गहू आणि अंकुर या पासून बनवलेले पदार्थ खायला घालतात. अश्या प्रकारे वसू बारस या दिवशी गाईची लक्ष्मिरूपी पूजा करून तिचे आशीर्वाद घेतले जातात. या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. स्वच्छ वस्त्र परिधान करुन घराबाहेर छान रांगोळी काढावी.

आपल्या घरी गाई आणि वासरु असेल तर त्यांची पूजा करावी. परंतु जर आपण शहरी भागात राहात असाल तर गायी आणि तिच्या वासराच्या मूर्तीची पूजा करावी. तिला निरंजनाने ओवळावे आणि गायीसाठी पुरणपोळीचा नैवेद्य खाऊ घालावा. या दिवशी गायीचे दूध, तूप, दही हे पदार्थ खाण्यास वर्ज्य असतात.

अशी साजरी करावी वसूबारस

 • या दिवसापासून अंगणात रांगोळी काढून दिवाळी सणाची सुरुवात होते. 
 • या दिवशी दूध, दुधाचे पदार्थ, तळलेले पदार्थ देखील खाल्ले जात नाहीत.
 • ह्या दिवशी संध्याकाळी गाय आणि वासरू ह्यांची पूजा केली जाते.
 • गायीच्या पायावर पाणी टाकावे.
 • गायीला हळद-कुंकू, फुले, अक्षता वाहून फुलांची माळ घालावी.
 • वासराची अश्याच रितीने पूजा करावी.
 • निरांजनाने ओवाळून घ्यावे.
 • गायीच्या अंगाला स्पर्श करावे.
 • गाय- वासराला गोडाचा नैवेद्य दाखवावा.
 • नंतर गायीला प्रदक्षिणा घालावी.
 • उपवास केलेल्या स्त्रिया बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगांची भाजी खाऊन हा उपवास सोडतात.
 • जवळपास गाय उपलब्ध नसल्यास घरी पाटावर रांगोळीने किंवा तांदळाने गाय- वासराचे चित्र रेखावे व पूजा करावी.
 • त्यादिवशी शक्य असल्यास उपवास करावा.
 • आपल्या मुलाबाळांना, आपल्या घराला चांगले आरोग्य, सुख, शांती लाभावी, म्हणून ही पूजा केली जाते.
 • या दिवशी गहू, मूग यासारखे पदार्थ त्या खात नाहीत.
अशी साजरी करावी वसूबारस

वसुबारस व्रत – vasubaras vrat

गोवत्स द्वादशीच्या दिवशी भक्त ब्रह्मचर्य पाळतात आणि त्या दिवशी भक्त लोक दिवसभर उपवास करून रात्री पूजा करूनच व्रत सोडतात त्याचबरोबर या व्रतामध्ये गहू आणि दुग्धजन्य पदार्थ वापरण्यास सक्त मनाई आहे. या दिवशी दूध, दुधाचे पदार्थ, तळलेले पदार्थ देखील खाल्ले जात नाहीत.

या दिवशी भक्त लोक श्री कृष्णाच्या नावांचा जप करतात, मंत्र आणि त्याला समर्पित श्लोक पाठ करतात. ह्या दिवशी संध्याकाळी गाय आणि वासरू ह्यांची पूजा केली जाते. तसेच ज्या जोडप्यांना मूल होण्याची इच्छा आहे ते या दिवशी उपवास ठेवतात.

वसुबारस कशी साजरी केली जाते?

वसुबारस या दिवसानंतर धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, बलिप्रतिपदा, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज असे दिवस दिवाळी या सणात साजरे केले जातात. आपल्या जगण्यात स्वतःच्या कामाचा, वस्तूंचा आणि सजीवांचा समावेश होत असतो, त्याबद्दल कृतज्ञता म्हणून महाराष्ट्रात प्रत्येक सण साजरा केला जातो.

गाय हा हिंदू संस्कृतीत पवित्र प्राणी आहे. त्याची उपासना करण्याचा भारतात इतिहास आहे. त्याचीच एक प्रचिती म्हणजे दिवाळी सणाचा पहिला दिवस (The first festival of Diwali is Vasu baras) ‘वसुबारस’! महाराष्ट्रात ‘वसुबारस’ (Vasu baras ) या दिवसापासून दिवाळीला खरी सुरुवात होते. वसु बारस या दिवशी गाईची तिच्या वासरासह आणि आता तर त्यासोबत इतर प्राण्यांचीही सायंकाळी पूजा केली जाते.

संपूर्ण रोषणाईने आसमंत उजळून टाकणारा हा सण आणि त्यामध्ये वसु बारस या दिवसाने होणारी सुरुवात म्हणजे सर्वत्र आल्हाददायक वातावरण असते तसेच या मंगल दिनी सर्वजण विविध देवतांची, कुलदेवता, ग्रामदेवता या सर्वांची उपासना करतात. सौभाग्यवती स्त्रिया या सणाला वासरासह उभ्या असलेल्या गाईचा सन्मान म्हणून पुरणपोळीचा नैवेद्य गाईला आणि वासराला खाऊ घालतात.

त्याअगोदर गाईच्या व वासराच्या पायावर पाणी घालून व त्याबरोबर हळदी – कुंकू वाहून फुलांची माळ घालून त्यांची आरती ओवाळली जाते. वसु बारस या दिवशी ज्यांच्या घरी गाई – वासरे आहेत त्या घरी लवकर उठून रांगोळी काढली जाते. सर्व देवतांचे आणि तुळशीचे पूजन केले जाते. काही ठिकाणी या दिवशी दूध तसेच दुधाचे पदार्थ खाल्ले जात नाहीत.

वसु बारस हा दिवस म्हणजे दिवाळीची सुरुवात असल्याने पुरण पोळीचे जेवण बनवले जाते. या दिवशी दूध, दुधाचे पदार्थ, तळलेले पदार्थ देखील खाल्ले जात नाहीत. या दिवशी गहू, मूग यासारखे पदार्थ त्या खात नाहीत. काही स्त्रिया गरज वाटल्यास या दिवशी उपवास देखील करतात. आपल्या मुलाबाळांना, आपल्या घराला चांगले आरोग्य, सुख, शांती लाभावी, म्हणून ही पूजा केली जाते.

अशी साजरी करावी वसूबारस

उपवास कसा करावा?

सर्वप्रथम द्वादशीचे व्रत करणाऱ्यांनी सकाळी स्नान करून स्वच्छ झाल्यावर स्वच्छ वस्त्र परिधान करावीत, त्यानंतर वासरासह दूध देणार्‍या गायीला आंघोळ घालून तिला सजवावे. मग त्यांची शिंगे सजवा. दोघांनाही फुलांच्या माळा घालून, कपाळावर चंदनाचा टिळक लावा, आता तांब्याच्या भांड्यात पाणी, अक्षता, तीळ, सुगंधी पदार्थ आणि फुले मिसळा. निरांजनाने ओवाळून घ्यावे. गायीच्या अंगाला स्पर्श करावे. गाय- वासराला गोडाचा नैवेद्य दाखवावा. नंतर गायीला प्रदक्षिणा घालावी.

त्यानंतर खालील मंत्राचा उच्चार करताना गायीला स्नान घालावे.

क्षीरोदार्णवसम्भूते सुरासुरनमस्कृते। सर्वदेवमये मातर्गृहाणार्घ्य नमो नमः

आपल्यापैकी बहुतेकांना दीपावली, दिवाली ज्याचा अर्थ दिव्यांची रांग किंवा दिव्यांचा सण आहे, जेव्हा घरे दीपाने उजळली जातात याबद्दल माहिती असेल, परंतु अनेकांना हे माहीत नसेल. पाच दिवसांचा सण प्रत्यक्षात दैवी गायींच्या पूजेसह असतो. वसु बारस हा दिवाळीच्या पहिल्या दिवशी पवित्र गायी आणि प्राण्यांच्या पूजेला समर्पित दिवस आहे.

हिंदू कॅलेंडर नुसार, महिन्यातील कृष्ण पक्षाचा बारावा दिवस अश्विन किंवा कार्तिक मधील वसु बारस आहे. या वर्षी  विविध प्रांतात “गोवत्स द्वादशी किंवा नंदिनी व्रत” म्हणून साजरा करण्यात आला. तथापि, महाराष्ट्र राज्यात हा सण अधिक ठळकपणे साजरा केला जातो.

वसूबारस दिवसाचे काही नियम

 • या दिवशी तव्यावर बनवलेले पदार्थही खात नाहीत.
 • या दिवशी दूध, दुधाचे पदार्थ, तळलेले पदार्थ खात नाहीत. 
 • स्त्रिया या दिवशी दिवसभर उपास करतात.
 • स्त्रिया बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगांची भाजी खाऊन उपास सोडतात.
 • ह्या दिवशी गहू, मूग खात नाही.
 • आपल्याला दूध देऊन आपले पोषण करणार्‍या या प्राण्याप्रती कृतज्ञता म्हणून हा दिवस साजरा केला जातो. आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून स्त्रिया ही पूजा करतात.

वसुबारसच्या दिवशी गोडधोडाचे पदार्थ करुन ते गायीला खाऊ घालतात

वसुबारसच्या दिवसापासून अंगणात रांगोळी काढून दिवाळी सणाची सुरुवात होते. या दिवशी तेलातुपात तळलेले पदार्थ आणि गायीचे दूध, तूप व ताक खात नाहीत. पुरणपोळी, उडदाचे वडे, भात व गोडधोडाचे पदार्थ करून ते गायीला खाऊ घालतात.

स्त्रिया या दिवशी दिवसभर उपास करतात. घरात लक्ष्मी देवीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी वासरु असलेल्या गायीची पूजा करण्याची पद्धत आहे. आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून स्त्रिया ही पूजा करतात. घरातील सवाष्ण बायका गायीच्या पायावर पाणी घालतात. हळद-कुंकू आणि अक्षता वाहतात.

ज्यांच्या घरी गुरे, वारसे आहेत, त्यांच्या घरी पुरणाचा स्वयंपाक केला जातो. मग गाईला निरांजनाने ओवाळून गायीला प्रदक्षिणा घालावी. केळीच्या पानावर पुरणाचा नैवेद्य खायला दिला जातो. समुद्र मंथनातून उत्पन्न झालेल्या नंदा नावाच्या धेनूला उद्देशून हे व्रत केले जाते.

वसुबारस ची पौराणिक कथा – Vasubaras story

एक नगर होते. त्या ठिकाणी एक कुणब्याची म्हातारी राहत होती. तिला एक सून देखील होती. तिच्याकडे ढोरे म्हशी गव्हाळी मुगाळी वासरे देखील होती. अश्विन महिना सुरू झाला. एके दिवशी काय झाले? पहिल्या द्वादशीच्या दिवशी म्हातारी सकाळी उठली आणि शेतावर जाऊ लागली. आपल्या सुनेला हाक मारून म्हणाली, मुली इकडे ये. सून काय म्हणून विचारू लागली.

तशी म्हातारी म्हणाली, मी शेतावर जाते. दुपारी येईल. तू माडीवर जा, गव्हाचे मुगाचे दाणे काढ. गव्हाळे मुगाळे शिजवून ठेव. असे सांगून ती शेतावर निघून गेली. सून माडीवर गेली. गहूमूग काढून ती खाली आली. गोठ्यात गेली. गव्हाळी मुगाळी वासरे जी उड्या मारत होती, त्यांना तिने ठार मारली आणि मांस शिजवून ठेवून ती सासूची वाट पाहू लागली.

थोड्या वेळाने सासू आली. सुनेने जेवण वाढले. बघितले तर तांबडे मांस तिच्या दृष्टीस पडले. तिने हे काय म्हणून आपल्या सुनेला विचारल्यावर सुनेने सर्व हकीकत सांगितली. तिला कळून चुकले की, आपली चूक झाली. लगेच देवापाशी जाऊन ती प्रार्थना करू लागली. म्हणाली, देवा माझ्या सुनेच्या हातून खूप मोठा अपराध घडला आहे. तिला याची क्षमा कर. माझी गाई वासरे जिवंत कर. असे जर झाले नाही, तर मी संध्याकाळपर्यंत आपला प्राण देईल. आणि ती तशीच देवापाशी बसून राहिली.

देवाने तिचा तो निश्चय पाहिला. संध्याकाळी ज्यावेळी गायी घराकडे आल्या, त्यावेळी हंबरडा फोडू लागल्या. तशी देवाला चिंता वाटली. म्हातारीचा निश्चय सुद्धा पक्का होता. हे देखील देवाला कळून चुकले. मग देवाने तिची वासरे जिवंत गेली. ती उड्या मारीत मारीत आपल्या आईकडे दूध प्यायला गेले. गाईचे हंबरडे बंद झाले. तसे म्हातारीला फार आनंद झाला. याचा मात्र सुनेला फार आश्चर्य वाटले.

मात्र सर्वांना आनंद झाला. नंतर म्हातारीने गाईगुरांची पूजा केली. स्वयंपाक करून नैवेद्य दाखवला. आणि देवाचे आभार मानले. त्यानंतर ती स्वतः जेवली. त्या दिवसापासून आपण वसुबारस या दिवशी गायी गुरांची पूजा करतो, नैवेद्य दाखवतो.

FAQ

वसु बारस मध्ये काय करतात?

ज्यांच्या घरी गाई, गूरे, वासरे आहेत, त्यांच्या घरी या दिवसाला फार महत्त्व असते. या दिवशी त्यांच्या घरामध्ये पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो.
घरातील सुहासिनी बायका गाईच्या पायावर पाणी घालून तिला हळद, कुंकू, फुले, अक्षता वाहून तिच्या गळ्यामध्ये फुलांची माळ घालतात. तिला निरांजनाने ओवाळून केळीच्या पानावर पुरणपोळी सह गोड धोडाचा पदार्थ, नैवेद्य वाढून गाईला खाऊ घातला जातो.

वसुबारस म्हणजे काय?

वसु या शब्दाचे खूप अर्थ सांगितले जातात. वसु म्हणजे सूर्य, वसु म्हणजे कुबेर, वसु म्हणजे धन! आणि सर्वात महत्त्वाचा अध्यात्मिक अर्थ म्हणजे “सर्वांमध्ये वास करणारा” असा आहे आणि बारस म्हणजे द्वादशीचा दिवस. गाई तसेच इतर जनावरांबद्दल कृतज्ञता दाखवण्याचा दिवस म्हणजे वसुबारस, वसू म्हणजे गाय आणि बारस म्हणजे बारावा दिवस.

वसु बारस ही दिवाळी आहे का?

हो. वसु बारस ही दिवाळी आहे. गोवत्स द्वादशी हा एक हिंदू सांस्कृतिक आणि धार्मिक सण आहे जो विशेषत: भारताच्या महाराष्ट्र राज्यात दिवाळी उत्सवाची सुरुवात करतो, जिथे तो वसु बारस म्हणून ओळखला जातो.

वसू बारस या दिवशी काय खायला असते ?

वसुबारसच्या दिवशी गायी व वासराची पूजा केली जाते. त्यांना गव्हाचे पदार्थ दिले जातात आणि वसुबारस पाळणारे बहुतेक लोक या दिवशी गहू किंवा दुग्धजन्य पदार्थ खात नाहीत. यादिवशी पुरणपोळीचा गोडधोडचा नैवेद्य केला जातो.

निष्कर्ष

मित्रांनो, मराठी झटका डॉट कॉम या वेब पेजद्वारे वसुबारस या सणाबद्दल माहिती, महत्व आणि पूजा  विधि, याबाबतची सगळी माहिती आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे. आपल्याला ही माहिती वाचून कशी वाटली? कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. पुन्हा भेटू असाच एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.

Leave a comment