लिओनार्दो दा विंची माहिती मराठी Leonardo Da Vinci Information In Marathi

जगप्रसिद्ध मोनालिसाचे चित्र, तुम्हा सर्वांना माहीतच असेल. या चित्राचा चित्रकार होता लिओनार्डो द विंची. तो पंधराव्या शतकातील एक महान चित्रकार व जीनियस संशोधक होता.

तो केवळ चित्रच काढत नव्हता तर, तो पेंटिंगही करायचा. त्याला विज्ञानाचे ज्ञान होते. रिलीजन, राजकारण, साहित्य, संगीत, कला, नकाशे, इत्यादी अनेक विषयाचे ज्ञान त्याला होते. तो चित्रकार, शिल्पकार, वस्तू रचनाकार, शास्त्रज्ञ, गणितज्ञ, इंजिनियर, संगीतकार, साहित्यिक, खगोलशास्त्रज्ञ, आणखी खूप काही होता.

या सर्व गोष्टींपैकी तो त्याच्या चित्रकलेतील प्राविण्‍यासाठी प्रसिद्ध होता. व्यक्तीच्या अंगात असलेले गुण, त्याचा स्वभाव, त्याचे व्यक्तिमत्व, त्याच्या कलेतून दिसते. ते सर्व त्याचा अभ्यास त्याची बुद्धी आणि त्याच्या चित्रातून दिसून येतात.

तो आपल्या काळाच्या खूप समोर होता. तो एक अष्टपैलू आणि रहस्यमय व्यक्ती होता. तसेच तो एवढा तल्लख बुद्धीचा होता की, दोन्ही हाताने एकाच वेळी वेगवेगळे कार्य करू शकत असे. आपल्या दोन्ही हाताने तो एकाच वेळी लिहू शकत होता.

आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास लिओनार्दो द विंची यांच्या बद्दल माहिती दिली आहे, हि माहिती व लेख जाणून घेण्यासाठी खालील लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.

Table of Contents

लिओनार्दो दा विंची माहिती मराठी Leonardo Da Vinci Information In Marathi

नाव लिओनार्दो द विंची
जन्म तारीख दि. १५ एप्रिल १४५२
जन्म स्थळ इटली
ओळख चित्रकार, शिल्पकार, वस्तू रचनाकार, शास्त्रज्ञ, गणितज्ञ, इंजिनियर, संगीतकार, साहित्यिक, खगोलशास्त्रज्ञ,
जगविख्यात कलाकृती मोनालिसा
प्रसिद्ध चित्र मॅडोना ऑन द रॉक्स, लास्ट सफर, मोनालिसा
आईचे नाव कॅटरिना
वडिलांचे नाव सेर पिएरो
मृत्यू दि. २ मे १५१९

कोण होते लिओनार्दो द विंची ?

लिओनार्दो दा विंची हे इटालियन प्रबोधन काळातील श्रेष्ठ कलावंत, वैज्ञानिक व तत्व चिंतक, चित्रकार, शिल्पकार, वास्तुकार, अभियंता, संगीतकार, शरीर विज्ञ, गणिती, निसर्ग वैज्ञानिक संशोधक, तत्त्वज्ञ, अशा अनेक विविध गुणांनी त्यांचे कला जीवन संपन्न झाले होते. त्याचा जन्म फ्लोरेंनसिक नजीक विंची खेड्यात झाला.

Leonardo Da Vinci Information In Marathi

हे सुद्धा वाचा –

लिओनार्दो दा विंची यांचे वडील हे फ्लोरेन्स मधील प्रतिष्ठित लेखक, प्रमाणक व जमीनदार आणि आई शेतकरी कुटुंबातील होती. लिओनार्दो दा विंची हि त्यांची अवैध संतती होय, पण पुढे पित्याने त्याचा प्रतिपाळ केला.

लहानपणी लिओनार्दो दा विंची सुरेल आवाजात गात व लूट वाचवत असल्याचे उल्लेख सापडतात. पण केवळ संगीत साधना व कला त्यातच त्याचे मन रमले नाही, ज्ञानप्राप्तीची तीव्र लालसा व एक अस्वस्थ कुतूहल त्याला सतत वेगवेगळ्या दिशांना  खेचून नेत होते.

मानवी विचाराच्या कक्षेत येणारी प्रत्येक गोष्ट समजावून घेण्याची, स्वाभाविक उर्मी त्याच्यात होती. त्याच्या वडिलांनी त्याला वयाच्या सुमारे १५ वर्षे तिथिल एका प्रसिद्ध चित्र शाळेच्या कार्यशाळेत उमेदवारीसाठी धाडले.

तिथे त्याने चित्र शिल्पकलेचे प्राथमिक धडे घेतले. सुमारे १४७५ साली भित्ती चित्राच्या डाव्या बाजूच्या कोपऱ्यातील एका देवतांचे चित्रे लिओनार्दो दा विंची याने रंगवली. त्यात त्याचे चित्र कौशल्य प्रकर्षाने दिसून येते.

लिओनार्दो द विंची यांचा जन्म व प्रारंभिक जीवन

इटली देशातलं विंची नावाचा एक छोटासा शहर आहे. एका बाजूला अर्णव नावाची नदी, तर दुसरीकडे मोठे मोठे डोंगराएवढे खडक. निसर्गरम्य गावात दि. १५ एप्रिल १४५२ या दिवशी सेर पिएरो आणि कॅटरिना यांच्या पोटी लिओनार्दो दा विंची याचा जन्म झाला.

Leonardo Da Vinci Information In Marathi

निसर्गात राहिल्यामुळे त्याला चित्रकला, संगीत, पक्षी, प्राणी, गणित, इत्यादीची खूप आवड होती. आपली चित्रे खरीखुरी वाटली पाहिजे म्हणून तो वेगवेगळे प्रकारचे प्रयोग करायचा. तो जंगलात फिरून पाली सरडे साप वटवाघुळ गोळा करून त्याचे निरीक्षण करायचा.

दहा ते बारा वर्षांचा असताना लिओनार्दो दा विंची वडिलांसोबत फ्लोरेंस मध्ये राहायला आला. त्यावेळेचे फ्लोरेंस बुद्धिमत्ता, चित्रकार, शिल्पकार, कारागीर, व्यापारी, श्रीमंत तत्त्वज्ञ यांच शहर होत.

फ्लोरेंस मध्ये १० ते १२ वर्षे शास्त्र आणि कला याची लिओनार्दो नेटाने उपासना केली. सण १४७२ मध्ये तो फ्लोरेंसच्या चित्रकार संघाचा म्हणजेच गिलचा प्रमुख चित्रकार बनला.

त्याने स्वतः निर्मिती काल नोंदवलेले आद्य रेखाचित्र दि. ०५ ऑगस्ट १४७३ मध्ये हे असून, त्यात खडकांची घडण व भू रचना याविषयी त्याने संशोधनात्मक निरीक्षण प्रत्ययास येते. सन १४७६ मध्ये त्याने फ्लोरेंस मध्ये स्वतःचे कलाग्रह स्थापन केले.

एडवरेशन ऑफ द मॅगी ९१४८१,  हे चर्चमधील वेली चित्र रंगवण्याचे मोठे काम त्याला मिळाले. हे चित्र जरी अपूर्ण राहिले, तरीही त्यातही त्याचे चित्र निर्मितीचे कौशल्य व नव दृष्टिकोन दिसून येतो.

मिलानचा ड्यू लोदो विको स्कॉर्सच्या निमंत्रणावरून तो, १४८२ मध्ये मिलानचा दरबारी रुजू झाला. त्याचा तेथील वास्तव्याचा काळ कला निर्मितीच्या दृष्टीने भरभराटीचा ठरला. तेथे त्याने राजघराण्यातील प्रमुख व्यक्तींची उभेउभ व्यक्ती चित्रे रंगवली.

मिलान नगरीचा सरकारी अभियंता म्हणून त्याने काम केले. नगरामध्ये विविध रंजन प्रकारांची योजना तसेच एकाखाली एक असे रस्ते तयार करून, रहदारीच्या वेळी अपघात टाळण्याच्या दृष्टीने रस्त्याची पुनर्रचना, शहराचे सौंदर्य प्रतिंगत करणारी सरोवरे, धबधबे, उद्याने, वैगरे यांच्या विविध योजना, अशा अनेक कल्पना समाविष्ट असलेला आदर्श नगर रचनेचा आखाडा त्यांनी तयार केला होता.

शिल्पकलेतील त्याचे महत्त्वपूर्ण निर्मिती ही, ह्याच काळात मिलान मध्ये आकारास आली. ड्युपच्या पित्याचा भव्य अश्वारूढ पुतळा ब्राँझ मध्ये घडवण्याचे काम त्यांनी हाती घेतले. त्यासाठी प्रचंड अवाढव्य आकारमानाचा घोडा त्याने भाजक्या मातीमध्ये तयार केला.

सुमारे हा घोडा त्या काळात जगातला आठवा आश्चर्य मानला गेला.पण दरम्यानच्या युद्धकाळातील ब्राँझच्या तुटवड्यामुळे तो ब्रांच मध्ये ओतता आला नाही. तसेच घोड्यावरचा पुतळा हि तयार झाला नाही. अल्पवाधीतच तो मातीचा घोडा हि नष्ट झाला.

लिओनार्दो द विंची यांचे द लास्ट सफर भित्तीचित्र

लिओनार्दो दा विंची याने प्रसिद्ध बेबी चित्र रंगवले, या चित्रात लूजर पॅरिस इसवी सन १४८३ ते १४८५ येथील व नॅशनल गॅलरी लंडन इसवी सन १४९४ ते १५०६ येतील दोन आवृत्ती उपलब्ध आहेत. त्या चित्रात गुढ रम्य निसर्गाच्या पार्श्वभूमीवर एका गुहेमध्ये जॉन व येशू या बालकांची भेट कुमारी माता मेरी व देवदूत यांच्या सानिध्यात रंगवले आहे.

संदिग्ध बाह्य रेषा, गुहेतील धुसर प्रकाश, त्यामुळे या चित्रला चित्राला साक्षात्कारी अध्यात्मिक अनुभूतीचे वलय लाभले आहे. चित्रातील व्यक्ती प्रतिमा शंकवाकार पिरॅमिड रचनेमध्ये बसवले आहेत.

मिलानच्या एका मठाच्या भिंतीवर रंगवलेली द लास्ट सफर हे भव्य भित्तीलेप चित्र ह्याच काळातले इसवी सन १४९७, पण या भीत्ती लेखातील तैल रंगाचा वापर केल्याने ते अल्पकाळातच खराब झाली. मात्र प्रबोधनाच्या उत्कर्ष काळातील हे एक श्रेष्ठ चित्र मानले जाते.

त्यात येशू ख्रिस्ताने आपल्या नेकटावरती बारा शिष्यासमवेत घेतलेल्या अंतिम भोजनाचे दृश्य रंगवले आहे. यापैकी एक शिष्य आपला विश्वासात करेल असे भाकित ख्रिस्ताने याच प्रसंगी वर्तवले, त्याचा परिणाम वेगवेगळ्या शिष्या वर भिन्न प्रकारे झाला.

त्यांच्या समिश्र भावनांचे व मानसिक ताणतणावांचे चित्रण अत्यंत सूक्ष्मपणे आणि प्रभावी रित्या लिहून ठेवले आहेत. या चित्राची रचना समतोल पद्धतीची असूनही, त्यातील मानवी आकृत्यांचे गतिशीलता प्रभावी व परिणामकारक आहे. व्यक्ति चित्रणाला मानसशास्त्रीय बैठक प्राप्त करून देणारे हे कलेच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण चित्र आहे.

मोनालिसाच्या व्यक्तिचित्रातील मिलनातही अशी सूक्ष्म भाव दर्शनाची मानसशास्त्रीय बैठक आहे. फ्रेंचांनी १४९९ मध्ये मिलानवर हल्ला केला, परिणामी लिओनार्दो द विंची मिलान सोडून इसवी सन १५०० मध्ये फ्लोरेंसला परतले.

तेथे काही काळ लष्करी अभियंता म्हणून त्यानी काम केले. त्या काळात त्याने मानवी देहाची शवविच्छेदन निपुण प्रमाणात करून शरीर रचना शास्त्राची जानकारी प्राप्त केली व तो त्याच्या काळातील सर्वात निपुण शरीर विज्ञ म्हणून मान्यता पावला.

त्या कालखंडात त्याने तीन मोठे कार्यक्रमा प्रकल्प हाती घेतले, सेंट अँड समवेत कुमारी माता मेरी व बालक येशू या विषयावर त्याने अनेक रेखाटन केले. त्यापैकी पॅरिसच्या लवर संग्रहालयात असलेले सेंट अँड वर्चीन अँड द इनफ्रंट विद अ लॅब इस १५१० हे रंग चित्र अप्रतिम आहे. या चित्राचे वैशिष्ट्य म्हणजे चित्रातील नेटक्या सुबक व्यक्ती प्रतिमा व त्यांची शंक रचना.

लिओनार्दो द विंची यांची जगविख्यात कलाकृती “मोनालीसा”

मोनालीसा ही जगविख्यात कलाकृती ह्याच काळातली आहे. हे व्यक्तिचित्र कलेच्या इतिहासात अद्वितीय व अजरामर ठरले आहे. व्यक्तीचित्रण कलेतील ही सर्वोच्च सिद्धी मानले जाते.

Leonardo Da Vinci monalica

मोनालिसाच्या चेहऱ्यावरचे गुण, मंद स्मित, डोळ्यातील विलक्षण चैतन्यपूर्ण जिवंत भाव व त्यातून डोकावणारे सूक्ष्म तारुण्य, हातांचे व त्यांवरील वस्त्रांची चुन्यांचे अत्यंत कौशल्यपूर्ण सुबक रेखाटन, चित्रांना दिलेली निसर्गाची काल्पनिक गिरी प्रदेशाची गुढरम्य पार्श्वभूमी, धूसर बाह्य रेषा व सौमस्तर रंग या तंत्राचा कटाक्षाने केलेला वापर ही या चित्राची ठळक वैशिष्ट्य आहेत.

चित्रावरील छाया प्रकाशाचा सुचक वापर यामुळेच चित्रास यथा दर्शनीय सफलता प्राप्त होऊन परिणामी त्याच्या गुढरम्य मुक्ततेत अधिकच भर पडली आहे. संदिग्धता व अनेक कार्य सुचकता ही श्रेष्ठ कलाकृतीची मुख्य लक्षणे मोनालिसांमध्ये पुरेपूर दिसून येते.

लिओनार्दो दा विंची १५०६ मध्ये मिलानला परतला, तेथे १५१३ पर्यंत होता. त्या काळात त्याने आणखी एका अश्वारूढ पुतळ्यावर काम सुरू केले पण त्याची फक्त रेखाटनेस तो करू शकला, नंतर तो रोमला गेला.

इसवी सन १५१३ ते १५१६ दरम्यान, पुढे फ्रेंच राजा पहिल्या फ्रान्सिसने त्याला आपल्या दरबारी बोलावून घेतले आणि राजाच्या अग्रणी चित्रकार वास्तुकार यंत्रज्ञ म्हणून त्याला मानाचा किताब दिला.

लिओनार्डो दा विंचीचा मृत्यू

दि. २ मे १५१९ मध्ये एकाच वेळी चित्रकार, शिल्पकार, वास्तुशास्त्र, लष्करी अभियंता, साहित्यिक, संगीतकार, नेतृत्यकार, लेखक, तंत्रज्ञानिक, या सगळ्या भूमिका निभावणारा कालावंत द ग्रेट लिओनार्दो द विंची यांचा मृत्यू झाला .

लिओनार्दो द विंची

लिओनार्दो द विंची यांचे प्रेरणादायी विचार

अतिशय विद्वान व्यक्ती लिओनार्दो द विंची यांचे प्रेरणादायी सुविचार खालील प्रमाणे :

  • चित्र ही एक कविता आहे, जी अनुभवणे ऐवजी दिसते आणि कविता हे चित्र आहे, जे दिसणे ऐवजी जाणवले जाते.
  • चित्रकाराने प्रत्येक कॅनवास ची सुरुवात काळ्या रंगाने केली पाहिजे, कारण जेथे प्रकाश पडतो त्याला सोडून निसर्गातील सर्व गोष्टी गडद आहेत.
  • एकदा जर तुम्ही उडान भरण्याची चव चाखली की, तुम्ही नेहमीच आकाशाकडे नजर करून पृथ्वीवर चालाल, कारण तुम्ही तेथे आधी गेलेले आहात आणि तेथे पुन्हा जाण्याची तुमची इच्छा असेल.
  • इच्छेशिवाय अभ्यास केल्याने स्मरणशक्ती बिघडते आणि मग तुमची स्मरणशक्ती जे अभ्यास करते ते ती टिकून ठेवू शकत नाही.
  • ही गोष्ट माझ्या लक्षात फार पूर्वी आली होती की कर्तृत्ववान लोक क्वचित शांत बसतात आणि गोष्टींना त्यांच्यासाठी घडू देतात. ते परिस्थितीला कधीच त्यांच्यानुसार घडू देत नाहीत. ते बाहेर जातात आणि परिस्थितीला स्वतःच्या मनासारखे घडवतात.
  • चित्रकाराच्या मनात आणि हातात संपूर्ण विश्व असते.
  • मौना इतकी अधिकाराला कोणतीही गोष्ट मजबूत करत नाही.
  • मला ते लोक आवडतात जे संकटातही हसतात.
  • स्वतःवर प्रभुत्व मिळवण्या पेक्षा लहान किंवा मोठे इतर कोणतेही प्रभुत्व असू शकत नाही.
  • सर्वात मोठा आनंद म्हणजे समजून घेण्याचा आनंद. मी लहानपणापासूनच मांसाहार सोडला आहे आणि अशी वेळ येईल जेव्हा माझ्यासारखे लोक प्राण्यांच्या हत्ये कडे अशा प्रकारे पाहतील, जसे ते आता माणसाच्या हप्ते कडे पाहतात.
  • कोणतीही गोष्ट अगोदर समजून घेतल्याशिवाय, त्या गोष्टीवर प्रेम किंवा तिचा द्वेष करता येत नाही.
  • कला कधीच संपत नाही. ती फक्त सोडली जाते.
  • जर तुम्ही एकटे असाल तर, तुम्ही पूर्णपणे स्वतःचे आहात. जर तुमच्या सोबत सोबती असेल मित्र असेल तर, तुम्ही फक्त अर्धे स्वतःचे असाल, जर तुमच्याकडे एकापेक्षा अधिक साथीदार असतील तर, तुम्ही त्याच दुर्दशेत अधिक खोलवर पडाल.
  • ज्या प्रकारे चांगला घालवलेला दिवस, एक चांगली झोप आणते. त्याच प्रकारे उत्तम प्रकारे जगलेले आयुष्य, चांगली मृत्यू आणते.
  • मला ते आवडतात जे संकटात हसू शकतात, जे संकटातून सामर्थ्य गोळा करू शकतात आणि चिंतन आणि धैर्यवान बनू शकतात.
  • छोट्या मनाचे काम कमी होण्याचे असते, पण ज्याचे मन खंबीर आहे आणि ज्यांचा विवेक त्यांच्या आचरणाला मान्यता देतो, ते आपली तत्वे मरेपर्यंत पाळतात.
  • शिक्षण मनाला कधीच थकवत नाही, सर्व गोष्टींचे ज्ञान शक्य आहे.
  • पुरुषांची सर्वात मोठी फसवणूक त्यांच्या स्वतःच्या मतांमुळे होते.
  • तीन प्रकारचे लोक असतात जे बघतात, दुसरे ते ज्यांना जे दाखवले जाते तेच बघतात आणि तिसरे जे बघतच नाहीत.
  • पूर्ण मनाच्या विकासाची तत्वे; विज्ञानाच्या कलेचा अभ्यास करा. कलेच्या विज्ञानाचा अभ्यास करा. तुमच्या संवेदनांचा अभ्यास करा. विशेषता कसे बघायचे ते शिका, लक्षात ठेवा की प्रत्येक गोष्ट इतर सर्व गोष्टींची जोडते.
  • तात्काळ कार्य करण्याच्या सवयीने मी प्रभावीत झालो आहे. फक्त माहिती असून उपयोग नाही, आपण ते अमलात आणायला हवे. केवळ इच्छा असणे पुरेशी नाही, आपण ते करायला पाहिजे.
  • शेवटी प्रतिकार करणे ऐवजी, सुरुवातीला प्रतिकार करणे सोपे असते.
  • भावना जितकी खोल असेल, वेदनात तेवढीच जास्त असेल.
  • जर तुम्हाला ते करता येत नसेल जे तुम्हाला करायचे आहे, तर त्या गोष्टीची इच्छा करा जी तुम्ही करू शकता.
  • जर तुम्हाला एखाद्या गोष्टीच्या स्वभावाचे सखोल ज्ञान नसेल तर, तुम्हाला कोणत्याही गोष्टीवर प्रेम किंवा द्वेष करण्याचा अधिकार नाही.
  • आवडत्या गोष्टीच्या ज्ञानातून महान प्रेम उद्भवते आणि जर तुम्हाला थोडेसे ज्ञान असेल तर, तुम्ही त्यावर थोडेसे किंवा अजिबातच प्रेम करू शकणार नाही.
  • मला वाटते की मी जगण्यासाठी शिकत होतो, परंतु मी फक्त मरण्यासाठी शिकत होतो.
  • प्रत्येक वेळी थोडे दूर जा, थोडा आराम करा. कारण जेव्हा तुम्ही तुमच्या कामावर परत याल, तेव्हा तुमचा निर्णय अधिक पक्का होईल.
  • काही अंतरावर जा, कारण तेव्हा काम लहान दिसेल आणि त्यातील बरेच काही एकाच नजरेत केले जाऊ शकते आणि नंतर सामंजस्य व प्रमाणाचा अभाव अधिक सहजपणे दिसून येतो.
  • तुमचे स्वतःवर आहे त्यापेक्षा अधिक किंवा कमी वर्चस्व इतर कोणत्याही गोष्टीवर नसेल.
  • व्यक्तीच्या यशाची उंची त्याच्या आत्मनिपूनतेवरून मोजली जाते. त्याच्या आत्म त्यागा वरून त्याच्या अपयशाची खोली मोजली जाते आणि हा नियम शास्त्रज्ञानाचा पुरावा आहे.
  • जो स्वतःवर प्रभुत्व प्रस्थापित करू शकत नाही, त्याला इतरांवर प्रभुत्व मिळवता येणार नाही.
  • कलाकार त्या गोष्टी बघतो ज्याची इतरांना फक्त एक झलक दिसते.
  • लोखंडाचा वापर नाही केला तर ते गंजते, स्थिर पाणी त्याची शुद्धता गमावते आणि थंड वातावरणात गोठून जाते, त्याचप्रमाणे निष्क्रियतेमुळे मनातील उत्साह नष्ट होते.
  • ज्या जीवनामध्ये प्रेम नाही, ते जीवन अजिबातच नाही.
  • एक साधारण व्यक्ती न बघताच बघत असतो, न एकताच ऐकतो, न अनुभवता स्पर्श करतो, न चव घेतात खातो, शारीरिक भाव न ठेवताच हालचाल करतो, गंध किंवा सुगंधाची जाणीव न घेता श्वास घेतो आणि विचार न करताच बोलतो.
  • जे वेळेचा वापर करतात, त्यांच्यासाठी वेळ पुरेसा असतो.
  • तुमचे काम, तुमचा जो उद्देश आहे. त्यानुसार करा.
  • जिथे हातासोबत आत्मा काम करत नसतो, तेथे कला नसते.
  • आपल्या सर्व ज्ञानाचा उगम आपल्या धारणांमध्ये आपल्या आकलनामध्ये आहे.
  • मी देवाला आणि मानव जातीला नाराज केले आहे, कारण माझे काम ज्या गुणवत्तेपर्यंत पोहोचायला पाहिजे तिथे पोहोचले नाही आहे.

लिओनार्दो दा विंची थोडक्यात माहिती

वयाच्या चौदाव्या वर्षापासून ते सत्ताविसाव्या वर्षापर्यंत लिओनार्दो दा विंचीने व्हेरीशियो त्या वेळच्या विख्यात  चित्रकाराकडे चित्रकलेच शिक्षण घेतलं. त्याला गणित आणि तंत्रज्ञान हे विषय खूप आवडत. विश्व कसे निर्माण होते? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी त्यांने खगोलशास्त्राचाही अभ्यास केला होता.

शिल्पकार दगडाचा नको असलेला भाग काढत राहतो, पण चित्रकार चित्रातल्या जागा हवा असलेल्या गोष्टींनी भरत राहतो. अस त्याने लिहून ठेवलं होत. १४७२ साली लिओनार्दो दा विंचीने ख्रिश्चन कथेवर आधारलेलं चित्र काढलं होता.

लिओनार्दो दा विंची याचा स्वभाव शांतता पूर्ण होता. जिथे पक्षी विक्रीला ठेवलेले दिसले की तो तिथे जाऊन, विक्रेता सांगेल ती किंमतीत देऊन ते पक्ष विकत घेऊन, लगेचच त्यांना मुक्त करत असे. त्याला गुलाबी रंगाचे कपडे खूपच आवडायचे.

तो नेहमीच प्रसन्न आणि आनंदी असायचा आणि सगळ्यांची मिळून मिसळून वागायचा. लिओनार्दो याची प्रचंड गाजलेली जगप्रसिद्ध कलाकृती म्हणजे मोनालिसाचे चित्र. १५०३ ते १५०५ अशी तीन वर्षे लिओनार्दो दा विंची या चित्रावर काम करत होता.

मोनालिसाच्या चेहऱ्यावरच स्मित आजही भल्याभल्यांना कोड्यात टाकत. हे चित्र ला-गियोकोंडा या नावाने ओळखले जात. हे चित्र काढताना लिओनार्दो दा विंचीने मोनालिसाला मॉडेल म्हणून बसून राहण्याचा कंटाळा येऊ नये, म्हणून तिच मन रमण्यासाठी गायक वादही ठेवले होते, असे म्हणतात.

तो एकाच वेळी चित्रकार, शिल्पकार, वास्तुशास्त्र, लष्करी अभियंता, साहित्यिक, संगीतकार, नेतृत्यकार, लेखक, तंत्रज्ञानिक, या सगळ्या भूमिका निभावणारा एक कालावंत होता.

लिओनार्दो दा विंची ने काढलेल्या मॅडोना ऑन द रॉक्स, लास्ट सफर, मोनालिसा यांसारख्या मोजक्या चित्रांनी त्याचं नाव जगात अजरामर झालं. लिओनार्दो ने अनेक यंत्र तयार केली, अनेकांचे आराखडे तयार केले आणि अनेक गोष्टींचे शोधाही लावले.

लिओनार्दो दा विंची आणि मोनालिसासंबंधी मराठी पुस्तके

  • रूपबंध (एस.डी. इनामदार)
  • लिओनार्दो – बहुरूपी प्रतिभावंत (दीपक घारे)
  • लिओनार्दो (डाॅ. संजय कप्तान)

FAQ

१. लिओनार्डो दा विंची प्रसिद्ध का आहे?

जगप्रसिद्ध मोनालिसाचे चित्र, तुम्हा सर्वांना माहीतच असेल. या चित्राचा चित्रकार होता लिओनार्डो द विंची. तो पंधराव्या शतकातील एक महान चित्रकार व जीनियस संशोधक होता. तो केवळ चित्रच काढत नव्हता तर, तो पेंटिंगही करायचा. त्याला विज्ञानाचे ज्ञान होते. रिलीजन, राजकारण, साहित्य, संगीत, कला, नकाशे, इत्यादी अनेक विषयाचे ज्ञान त्याला होते. तो चित्रकार, शिल्पकार, वस्तू रचनाकार, शास्त्रज्ञ, गणितज्ञ, इंजिनियर, संगीतकार, साहित्यिक, खगोलशास्त्रज्ञ, आणखी खूप काही होता.

२. लिओनार्डो दा विंचीने कोणती चित्रे काढली?

लिओनार्दो ने काढलेल्या मॅडोना ऑन द रॉक्स, लास्ट सफर, मोनालिसा यांसारख्या मोजक्या चित्रांनी त्याचं नाव जगात अजरामर झालं. लिओनार्दो ने अनेक यंत्र तयार केली, अनेकांचे आराखडे तयार केले आणि अनेक गोष्टींचे शोधाही लावले.

३. लिओनार्डो दा विंचीचा मृत्यू कधी झाला?

दि. २ मे १५१९ मध्ये एकाच वेळी चित्रकार, शिल्पकार, वास्तुशास्त्र, लष्करी अभियंता, साहित्यिक, संगीतकार, नेतृत्यकार, लेखक, तंत्रज्ञानिक, या सगळ्या भूमिका निभावणारा कालावंत द ग्रेट लिओनार्दो द विंची यांचा मृत्यू झाला .

४. लिओनार्डो दा विंचीचा जन्म कधी आणि कुठे झाला?

इटली देशातलं विंची नावाचा एक छोटासा शहर आहे. एका बाजूला अर्णव नावाची नदी, तर दुसरीकडे मोठे मोठे डोंगराएवढे खडक. निसर्गरम्य गावात दि. १५ एप्रिल १४५२ या दिवशी सेर पिएरो आणि कॅटरिना यांच्या पोटी लिओनार्दो दा विंची जन्म झाला.

निष्कर्ष

मित्रहो, आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास द ग्रेट लिओनार्दो द विंची या बद्दल माहिती दिली आहे. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. लेख आवडल्यास तुमच्या इतर मित्र परीवारांसोबत नक्की शेयर करा. धन्यवाद.

Leave a comment