डॉ. पंजाबराव देशमुख माहिती मराठी Dr Panjabrao Deshmukh Information In Marathi

महाराष्ट्राची भूमी ही समाजसुधारकांची भूमी म्हणून ओळखली जाते. आज आपण अशाच एका समाजसुधारकाबद्दल, त्यांच्या जीवन चरित्राची थोडक्यात माहिती घेणार आहोत.

२७ डिसेंबर १८९८ मध्ये विदर्भातील अमरावती जिल्ह्यात पापळ या गावी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचा जन्म झाला. डॉक्टर पंजाबराव देशमुख यांना हिंदुस्थानाच्या कृषी क्रांतीचे जनक म्हणून सुद्धा ओळखले जाते, तसेच यांना शिक्षण महर्षी म्हणून सुद्धा ओळखले जाते.

विज्ञानवादी नेता, एक समाज सुधारक व कृषी विद्यापीठ या कल्पनेचे जनक म्हणून डॉक्टर पंजाबराव देशमुख यांना ओळखले जाते.

आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या बद्दल माहिती दिली आहे. हि माहिती जाणून घेण्यासाठी खालील लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.

Table of Contents

डॉ. पंजाबराव देशमुख माहिती मराठी Dr Panjabrao Deshmukh Information In Marathi

नाव डॉ. पंजाबराव देशमुख
जन्म तारीख दि. २७ डिसेंबर १८९८
जन्म स्थळ पापळ, जिल्हा अमरावती
आईंचे नाव राधाबाई
वडिलांचे नाव शामराव
पत्नीचे नाव विमलाबाई वैद्य
ओळख हिंदुस्थानाच्या कृषी क्रांतीचे जनक
पूर्वीचे आडनाव कदम
मृत्यू दि. ०९  एप्रिल १९६५
मृत्यू ठिकाण दिल्ली

कोण होते डॉ. पंजाबराव भाऊसाहेब देशमुख ?

बहुजन भोळे गिळून टाकले होते अंधाराने, घरे मोडकी उभी राहिली तुझ्याच आधाराने, दिली मृतांना संजीवनी तू, गेल्या दूर निराशा, तू ज्ञानाचे गाणे, भाऊ तूच सूर्याची भाषा, समूयुगाला उजळून गेल्या तवा किरणांच्या रेषा.

हे वाचा –

काही माणसे एकट्याने मोठे होतात, काही माणसांना समाज मोठा करतो, तर काही माणसांमुळे समाज मोठा होतो. ज्या माणसांमुळे समाज मोठा झाला, अशी माणसं म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले, राजश्री शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज, या परंपरेत अभिमानाने ज्या नावाचा उल्लेख करावा लागतो, ते म्हणजे शिक्षण महर्षी कृषिरत्न डॉक्टर पंजाबराव उर्फ भाऊसाहेब देशमुख.

१८९८ रोजी डॉक्टर पंजाबराव देशमुख जन्माला आले. डॉक्टर पंजाबराव हे तीव्र संवेदनशील व्यक्तिमत्व होतं.

Dr Panjabrao Deshmukh

उच्च शिक्षण घेऊन, स्वातंत्र्याच्या लढत ते सहभागी झाले. इसवी सन १९३६ च्या निवडणुकीनंतर शिक्षण मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलं. स्वतंत्र भारतात कृषी मंत्री म्हणून त्यांनी काम केला आहे.

त्यांनी भारत कृषक समाजाची स्थापना करून, शेतकऱ्यांसाठी मोलाचं कार्य केलं. भाऊ साहेबांची बुद्धिमत्ता आणि प्रतिभा ही चतुरसर होती. ते जसे कृषी पंडित होते, तसे शिक्षण तज्ञ हे होते. महाराष्ट्र राज्यात शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून, त्यांनी शिवाजी शिक्षण संस्था काढली.

या संस्थेच्या एकट्या अमरावती विभागात एक हजारो अधिक शाळा आहेत. गुणग्राहकता संघटन कौशल्य, गोरगरिबां विषयी आत्मीयता आणि निस्वार्थ सेवाभावी वृत्ती, ही डॉक्टर पंजाबराव देशमुख यांची गुणवैशिष्ट्ये. दि.१० एप्रिल रोजी कर्मवीर शिक्षण महर्षी कृषिरत्न आणि बहुजनांचे कैवारी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांची पुण्यतिथी असते.

डॉ. पंजाबराव देशमुख यांचा जन्म, कौटुंबिक पार्श्वभूमी आणि शिक्षण

Dr Panjabrao Deshmukh

डॉ. पंजाबराव देशमुख यांचा जन्म दि. २७ डिसेंबर १८९८ मध्ये पापळ, जिल्हा अमरावती येथे झाला. डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचे मूळचे आडनाव कदम हे आहे. त्यांच्या वडिलांचे नावे शामराव बापू व आईंचे नावे राधाबाई.

डॉ. पंजाबराव देशमुख यांचे शिक्षण इयत्ता तिसरीपर्यंत पापड येथे झालेले होते. त्यानंतर त्यांनी चौथीचे शिक्षण चांदूर रेल्वे इथे घेतले नंतर अमरावती मध्ये त्यांचं दहावीपर्यंतचे शिक्षण झाले. त्यानंतर उच्च शिक्षण घेण्यासाठी ते इंग्लंडला गेले आणि तिथे एम.एस संस्कृत, नंतर इंग्लंड विद्यापीठातून १९३१ मध्ये त्यांनी एम.ए पूर्ण केले.

त्यानंतर १९२६ मध्ये ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने वैदिक साहित्यातील धर्माचा उगम व विकास यासाठी त्यांना D.Phil ही सर्वोच्च पदवी दिली. त्यासोबतच त्यांनी १९२५ मध्ये बार अक्ट. लॉ पदवी घेतली.

डॉ. पंजाबराव देशमुख यांचे सामजिक कार्य

डॉ. पंजाबराव देशमुख यांनी आंतरजातीय विवाह आणि स्वामी श्रद्धानंद वसतिगृह याची स्थापना

डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी जातीने सोनार असलेल्या विमलाबाई वैद्य यांच्याशी २५ नोव्हेंबर १९२७ मध्ये हा आंतरजातीय विवाह केला होता आणि हा आंतरजातीय विवाह प्रार्थना समाजाच्या पद्धतीने करण्यात आला होता.

त्या आंतरजातीय विवाह मुळे डॉ. पंजाबराव देशमुख यांच्यावर खूप मोठी टीका झाली होती. त्यांनी त्यासोबतच भाऊराव पाटील यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून १९२७ ला श्रद्धानंद वस्तीग्रह स्थापन केले होत. सर्व जातीच्या मुलांसाठी हे वस्तीगृह खुले होते.

डॉक्टर पंजाबराव यांनी मोहोड बंधूंच्या मदतीने श्री शिवाजी व्यायाम प्रसारक मंडळ १९२६ मध्ये सुरू केले होते.

अंबादेवी सत्याग्रह १९२७

डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी अमरावती मधील अंबादेवी मंदिर हे अस्पृश्यांसाठी खुले व्हावे यासाठी एक समिती नेमली होती.

त्यानंतर डॉक्टर पंजाबराव देशमुख यांची जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदी निवड झाली. यांनंतर पंजाबरावांनी अस्पृश्यासाठी विहिरी बांधल्या.

अकरा वर्षापर्यंतच्या मुलं मुली यांना प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले पाहिजे, असं सुद्धा डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी सांगितले.

डॉ. पंजाबराव देशमुख

वऱ्हाडचे मंत्री

१९३० मध्ये ज्या प्रांतिक निवडणुका झाल्या होत्या, त्या प्रांतिक निवडणुकांमध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख हे वऱ्हाडचे मंत्री होते.

आणि १९३० मध्ये क्रांती कायदेमंडळाच्या निवडणुकीत पंजाबराव देशमुख यांनी रामराव देशमुख यांचा ८०० मतांनी पराभव केला होता आणि हा पराभव केल्यानंतर, त्यांना वऱ्हाड प्रांताच्या गव्हर्नर यांनी डॉ पंजाबराव यांची शिक्षण कृषी व सहकार खात्याचे मंत्रिमंडळ त्यांची नेमणूक केली होती.

डॉ. पंजाबराव देशमुख यांची महत्वाची विधयके

ज्यावेळेस डॉ. पंजाबराव देशमुख हे वऱ्हाडचे मंत्री होते, त्यावेळेस त्यांनी काही विधेयक तयार केली होती, त्यातील काही महत्त्वाची विधयके  खालील प्रमाणे –

  • हिंदू देवस्थान संपत्ती बिल १९३२ – हिंदुस देवस्थान संपत्ती बिल हे एक त्यातील महत्त्वाचा विषय होता. कर्ज लवाद कायदा १९२८
  • शेतकरी मुलांसाठी महाविद्यालयात राखीव जागा याची सुद्धा तरतूद डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी त्यावेळेस केली होती.
  • रोग प्रतिबंधक कायदा
  • ग्रामपंचायत बिल हे विधेयक सुद्धा त्यावेळेस डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी मांडलेले होतं.

शेतकरी मुलांसाठी महाविद्यालयात राखीव जागा, ग्रामपंचायत बील, रोग प्रतिबंधक कायदा आणि हिंदू देवस्थान संपत्ती बिल जे की १९३२ मध्ये मांडलं होतं, याला खूप मोठा विरोध झाला होता.

Dr Panjabrao Deshmukh Information In Marathi

हे बिल असं होतं की, देवस्थानाची संपत्ती सरकारने ताब्यात घेऊन, त्यातून शिक्षणासारखे विधायक कार्य हाती घ्यावे, या उद्देशाने १९३२ मध्ये हिंदू देवस्थान संपत्ती बिल डॉक्टर पंजाबराव देशमुख आणि मांडले होते आणि हे बिल मांडल्यानंतर, यांना खूप मोठा विरोध झाला होता.

त्यानंतर अजून एक महत्वाचा बिल होते ते, म्हणजे कर्ज लावाद कायदा १९२८. या कर्ज लवाद कायद्यामुळे १९३३ मध्ये पंजाबरावांच्या प्रयत्नामुळे वारंवार पडणारा दुष्काळ व सावकारांची शोषण नीती, यामुळे कर्जात अखंड बुडलेल्या शेतकऱ्यांना बाहेर काढणारा कर्ज लवाद कायदा सुरु करण्यात आला.

आणि या ऋणमुक्तीच्या कायद्यामुळेच, डॉक्टर पंजाबराव देशमुख यांना हिंदुस्थानाच्या कृषी क्रांतीचे जनक म्हटलेले आहेत. म्हणजे हा कायदा शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा होता.

डॉ. पंजाबराव देशमुख यांची शेतीविषयक कार्य –

डॉ. पंजाबराव देशमुख यांची शेतीविषयक कार्य खूप मोलाची आहे खूप महत्त्वाचे आहे. त्यांनी शेतीविषयक कार्यासाठी १९२७  मध्ये शेतकरी संघाची स्थापना केली होती.

शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी एखादी संघटन असावी या विचारातून शेतकरी संघटना डॉ. पंजाबराव देशमुख यांनी स्थापन केली होती. त्या संघटनेचे पहिले अध्यक्ष होते बॅरिस्टर एन.एम देशमुख आणि अध्यक्ष होते पंजाबराव देशमुख.

पंजाबराव देशमुख यांनी या शेतकरी संघाचा जो काही विचार आहे त्याच्या प्रसारासाठी महाराष्ट्र केसरी वृत्तपत्र सुरू केले.

डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांची लोकसभेवर तीन वेळा निवड झाली होती. १९५२ १९५७ व १९६२.

१९५२ ते १९५७ मध्ये पंजाबराव हे भारताचे पहिले कृषी राज्यमंत्री होते. नंतर १९६२ पर्यंत ते केंद्रीय मंडळात कृषिमंत्री म्हणून कार्यरत राहिले.

भाताचे उत्पादन वाढवण्यासाठी त्यांनी नवनवीन प्रयोग केले, यामध्ये त्यांनी जपानी पद्धतीचा प्रयोग केला होता आणि याच प्रयोगाच्या माहितीसाठी, त्यांनी २५६ केंद्र उभारली होती. त्यावेळेस खाजगी क्षेत्रात शेतीवर १९००० केंद्र उभारली होती. यात शेतकऱ्यांना प्रशिक्षणासाठी ६३४ प्रशिक्षण केंद्राची सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिली होती.

भारत कृषक समाज

डॉ पंजाबराव देशमुख यांनी भारत कृषी समाजाची स्थापना केली होती व शेतकऱ्यांनी आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी मत्स्य, कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय असे जोडधंदे करण्याचा सल्ला भाऊसाहेबांनी दिला होता. भारत कृषी समाजाची स्थापना दि. ०७ फेब्रुवारी १९५५ ला झाली होती.

भारत कृषी समाजाची उद्दिष्टे

  • शेतकऱ्यांना शेती विषयी नवीन माहिती देणे,
  • आधुनिक पद्धतीच्या शेतीची माहिती देणे,
  • शेतकऱ्यांच्या सर्व समस्यांचा आढावा घेणे,

कृषी विषयक प्रदर्शनी आणि संमेलन भरवणे आणि शेती विषयी धोरणे ठरवणे, हे या भारत कृषी समाज स्थापनेचे उद्दिष्ट होते.

डॉक्टर पंजाबराव देशमुख यांना भारत कृषी समाजाच्या चार शाखा अभिप्रेत होत्या. एक म्हणजे भारत कृषी समाज प्रतिनिधी मंडळ, दुसरं कृषी महिला संघटना, तिसरं युवक कृषी समाज आणि चौथं विद्यार्थी कृषी मंडळ.

शेतकऱ्यांसाठी याच भारत कृषी समाजाने शेतकऱ्यांसाठी विमा योजना आणली होती. १९६० ला भारत कृषी समाजाच्या वतीने दिल्लीत पहिले जागतिक कृषी प्रदर्शन भरवले होते

काँग्रेसमध्ये प्रवेश १९४६

डॉ पंजाबराव देशमुख यांनी १९४६ मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला, या नंतर त्यांची घटना समितीवर निवड झाली होती.

भाऊसाहेबांनी घटनेच्या मूळ आराखड्यात सर्वाधिक ५०० दुरुस्त्या सुचवल्या होत्या. म्हणूनच डॉक्टर राजेंद्र प्रसाद म्हणतात किं घटनेचा एक चिकित्सक शिल्पकार अमरावती परिसरात जन्माला आला, हे या भूमीचा भाग्य म्हणावं लागेल.

त्यानंतर डॉ पंजाबराव देशमुख यांनी ३० सप्टेंबर १९५० मध्ये शिवाजी लोक विद्यापीठाची स्थापना केली आणि समाजाला बहुजनमुख शिक्षण देण्यासाठी, ग्रामीण अर्थव्यवस्थेला व शेतकरी यांनाच या विद्यापीठाच्या केंद्रस्थानी ठेवले होते.

त्यानंतर शिवाजी शिक्षण संस्था जी की विदर्भामध्ये सर्वच जिल्ह्यामध्ये सध्या आहे या शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना दि. ०१ जुलै १९३२ ला ए. डब्ल्यू पाटील यांच्या सहकार्याने डॉक्टर भाऊसाहेब देशमुख यांनी याची स्थापना केली होती.

त्यानंतर अमरावती येथे १९५२ मध्ये डॉक्टर भाऊसाहेब देशमुख यांनी कस्तुरबा गांधी कन्या शाळा सुरू केली. यानंतर वर्धा मध्ये मॉर्डन हायस्कूल व मूर्तिपूजापुर गाडगेबाबा हायस्कूल यांची स्थापना केली, तसेच अमरावती मध्ये फिरता दवाखाना सुद्धा डॉक्टर पंजाबराव भाऊसाहेब देशमुख यांनी सुरू केला होता.

मृत्यू

डॉक्टर भाऊसाहेब देशमुख यांचा मृत्यू दि. ०९  एप्रिल १९६५ रोजी दिल्ली मध्ये झाला. त्यांचा मृत्यू भाऊसाहेब देशमुख यांनी वडिलांच्या श्राद्धा दिवशी अस्पृश्य मुलांना जेवू घातले होते. यांनतर डॉ. पंजाबराव देशमुख यांनी १९५० मध्ये अखिल भारतीय दलित संघाची स्थापना केली.

त्यानंतर डॉक्टर पंजाबराव भाऊसाहेब देशमुख कृषी विद्यापीठ कल्पनेचे जनक सुद्धा म्हणतात

डॉक्टर पंजाबराव भाऊसाहेब देशमुख यांच्या नावाने अकोला येथे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला स्थापन झाले. आजही या विद्यापीठाने शेतकऱ्यांच्या सेवेत जवळपास ५० वर्ष पूर्ण केली.

स्वातंत्र्याच्या वेळेची गोष्ट देशाच्या संसदेत संविधान बनवण्याचं काम सुरू होत संविधान सभेमध्ये जात होता पण घटनेचा मुख्य मसुदा लिहिण्याची जबाबदारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे सोपवण्याच्या वेळेचा एक किस्सा सांगितला जातो की एकदा एका सकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घरी संविधान सभेमध्ये विदर्भाचे प्रतिनिधी डॉक्टर पंजाबराव देशमुख अचानक प्रकटले

डॉ. पंजाबराव देशमुख यांनी मराठा समाजाला मिळून दिले आरक्षण

पंजाबराव देशमुख म्हणजे महाराष्ट्रातल्या कृषी आणि शिक्षण क्रांतीचे जनक. दलितांसाठी मंदिर खुली  करण्याच्या आंदोलना पासून त्यांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी चांगली मैत्री निर्माण झाली. दोघांना एकमेकांबद्दल आदरणीय विश्वास होता.

पंजाबराव देशमुख यांच्यावर टीका झाली होती, तेव्हा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उभे होते. पण त्या दिवशी बाबासाहेबांना जाणवलं की, सकाळी सकाळी भेटायला आलेले पंजाबराव थोडेसे अस्वस्थ वाटतायत. पंजाबराव यांना  चिंता लागली होती, संविधानामध्ये आरक्षणाची.

बाबासाहेब आपल्या घटनेमध्ये दलितांना आरक्षण देणार, हि तर काळ्या दगडावरची रेखच होती. शैक्षणिक आणि आर्थिक दृष्ट्या इतर अनेक मागास जातींचा अभ्यास घटनेने करावा आणि त्यांच्यासाठी घटनेत काही सवलती असाव्यात, अशी पंजाब रावांची इच्छा होती.

या विषयावरच बोलण्यासाठी ते बाबासाहेबांच्या घरी आले होते, आंबेडकरांपुढे त्यांनी हा विषय काढला, तेव्हा बाबासाहेब म्हणाले मला तुमची कळकळ जाणवते, मात्र अशा जातींची संख्या प्रचंड असल्याने, अल्पावधी त्यांची मोजणी आणि अभ्यास करणे शक्य नाही, त्यामुळे विचारपूर्वक घटनेमध्ये ३४० कलम अधिक जोडण्यात आली आहे.

पंजाबराव देशमुख यांना बाबासाहेबांच्या शब्दामुळे दिलासा मिळाला. घटनेच्या ३४० या कलमानुसार असा आदेश दिला गेला की, स्वतंत्र झाल्यानंतर त्यांनी राष्ट्रपतींच्या आदेशाने एक कमिशन मिळवावं आणि या कमिशन मधील देशभर आरक्षणास पात्र अशा सर्व जातींची माहिती काढून सरकारला द्यावी.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान निर्मितीच्या अखेरच्या मान्यवरांची घटनेच्या निर्मिती मध्ये मदत झाली, त्या सर्वांचा नावानिशी उल्लेख करून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. यात डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचा विशेष उल्लेख होता.

पुढे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली, पहिलं सरकार स्थापन झालं. तेव्हा डॉक्टर पंजाबराव देशमुख देशाचे पहिले कृषिमंत्री झाले, त्यांनी शेतकऱ्यांच्या मुलांना रोजगार मिळावा यासाठी आपले सुरू केलेले प्रयत्न, बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात केलेल्या तरतुदीनुसार, १९५३ साली कालेकर आयोग आणि त्यानंतर १९७९ ला मंडळ आयोग कायदा सुरु केला.

दुर्दैवाने पंजाब रावांना अपेक्षित असलेला मराठा समाजाला आरक्षण मिळू शकलं नव्हतं, मराठा समाज बहुसंख्येने शेती करत असल्यामुळे तो मुळात कुणबी असल्यामुळे त्यांनी कागदपत्रा मध्ये कुणबी  जात लावावी, यासाठी त्यांनी भरपूर प्रयत्न केला.

त्या काळात पंजाबराव देशमुख हे मंत्री होते, त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला कुणबी प्रवर्गात टाकावं म्हणून मुंबईच्या मराठा मंदिर येथे मीटिंग बोलावली. त्यावेळी मराठा समाजातील दिग्गज नेते आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.

पण यापैकी विशेष मराठवाडा व पश्चिममहाराष्ट्रातल्या नेत्यांनी आम्ही  क्षत्रिय जमीनदार आहोत मग स्वतःला कुणबी मागासवर्गीय कस म्हणून घ्यायचं हा मुद्दा उपस्थित केला. मात्र पंजाब राव यांचा प्रभाव असणाऱ्या विदर्भातील मराठा नेतृत्वानी  त्त्यांच ऐकल.

तिथल्या कागदपत्रांवर कुणबी अशीच नोंद करण्यात येऊ लागली.याचाच परिणाम पुढे जेव्हा ओबीसी साठी आरक्षण लागू झाल तेव्हा विदर्भातल्या मराठा कुणबी समाज याचा लाभ लाभ घेऊ शकला, गरीब मराठा कुटुंबातील मूल रोजगार व शिक्षण यापासून वंचित राहू नये यासाठी पंजाबराव देशमुखांनी केलेले प्रयत्न सार्थकी ठरले.

पंजाबराव देशमुखांचा सन्मान

  • विदर्भातील अकोला येथे असलेल्या कृषी विद्यापीठाला डाॅ. पंजाबराव देशमुखांचे नाव दिले आहे.

पंजाबराव देशमुखांच्या जीवनावरील पुस्तके

  • सूर्यावर वादळे उठतात. (नाटक, लेखक बाळकृष्ण द. महात्मे)

डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या बद्दल दहा ओळी

  • डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचा जन्म दि. २७ डिसेंबर १८९८ मध्ये महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात पापळ या गावी झाला.
  • पंजाबराव यांच्या वडिलांचे नाव शामराव व आईचे नाव राधाबाई होते.
  • पंजाब रावांचे मूळ आडनाव कदम होते, त्यांच्या घराण्यात असलेल्या वतनदारीमुळे त्यांना देशमुख हे आडनाव प्राप्त झाले.
  • पंजाबराव यांचे प्राथमिक शिक्षण त्यांच्या जन्म गावी झाले, व माध्यमिक शिक्षण अमरावती येथे झाले.
  • अमरावतीच्या हिंदू हायस्कूल मधून १९२८ मध्ये ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले.
  • महाविद्यालयीन शिक्षणासाठी, पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयांमध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी दाखला घेतला.
  • पदवी संपादन करण्यापूर्वीच ते उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेले.
  • अमरावती जिल्हा कौन्सिलचे अध्यक्ष असताना डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी प्राथमिक शिक्षण सर्वांसाठी सक्तीचे केले.
  • शिक्षण क्रांती हा डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या जीवनाचा विभाज्य भाग होता.
  • शिक्षणाची गंगा तळघळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यावेळी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे म्हणून, अनेक सवलती उपलब्ध करून दिल्या.
  • शेतकरी कर्जातून मुक्त झाला पाहिजे, यामध्ये डॉक्टर पंजाबराव यांचा मोठा सक्रिय सहभाग होता.
  • कृषकांचा कैवारी असलेल्या भाऊसाहेबांनी जगातील शेतकऱ्यांना संघटित व्हा हा मंत्र दिला.
  • कृषिमंत्री असताना, शेतकऱ्यांच्या हिताच्या अनेक योजना आखून अमलात आणल्या. भारतीय शेतकऱ्यांनी प्रगत तंत्रज्ञानाचा अवलंब करावा म्हणून, त्यांनी प्रयत्न केले.
  • डॉक्टर पंजाबराव भाऊसाहेब देशमुख यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी १९५५ मध्ये भारत कृषक समाजाची स्थापना केली.
  • भाऊसाहेब डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी कृषी क्षेत्रात तसेच शिक्षण क्षेत्रामध्ये मौल्यवान कार्य केले. त्यांनी शिक्षक संस्था चालक व बहुजन समाजाला प्रेरणा दिली. त्यांनी शेतकरी वर्गाच्या उन्नतीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असे कार्य केले.

डॉ. पंजाबराव देशमुख थोडक्यात माहिती

  • 1926 – मुशफिंदच्या माध्यमातून गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी श्रद्धानंद वसतिगृह स्थापन करण्यात आले.
  • 1927 –‘महाराष्ट्र केसरी’ वृत्तपत्र शेतकरी संघाला चालना देण्यासाठी सुरू केले.
  • वैदिक साहित्यात धर्मातील मूळ व विकास यावर डॉक्टरेट.
  • 1927 – शेतकरी संघाची स्थापना.
  • 1933 – कर्जमाफी अधिनियम मंजूर करण्यात मोठा वाटा आहे, ज्यामुळे शेतकऱ्याना कर्जातून मुक्त केले जाते. म्हणूनच त्यांना भारतातील शेतकरी क्रांतीचे जनक म्हटले जाते.
  • 1932 – श्री. अ. डब्ल्यू.पाटील यांच्या सहकार्याने श्री शिवाजी शैक्षणिक संस्थेची स्थापना.
  • गाव निवास मंडळाची स्थापना.
  • 1950 – लोक विद्यापीठ (पुणे) ची स्थापना, नंतर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात बदलली.
  • 1956 – अखिल भारतीय दलित महासंघाची स्थापना.
  • 1955 – भारत कृषक समाजची स्थापना आणि राष्ट्रीय कृषी सहकारी खरेदी व विक्री महासंघ स्थापना.
  • 1930 – प्रांतीय विधान परिषदेत निवडले गेले. शिक्षण, कृषी, सहकार मंत्री
  • 18 ऑगस्ट 1928 – अस्पृश्यांसाठी अमरावती अंबाबाई मंदिर सुरू करण्यासाठी सत्याग्रह.
  • 1960 – दिल्लीत जागतिक कृषी प्रदर्शन आयोजित केले.
  • 1952 ते 1962 पर्यंत केंद्रीय मंत्रिमंडळात कृषिमंत्री. भारताचे पहिले कृषिमंत्री.
  • 1952, 1957 आणि 1962 मध्ये तीन वेळा लोकसभेवर निवडले गेले.
  • 1932 मध्ये देवस्थानची मालमत्ता शासनाच्या ताब्यात घ्यावी आणि विधायक काम व्हावे या उद्देशाने हिंदू देवस्थान प्रॉपर्टी विधेयक 1932 मध्ये आणले गेले.
  • प्राथमिक शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्राथमिक शिक्षक संघटना स्थापन करणे.

FAQ

१. डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचा मृत्यू कधी व कोठे झाला?

डॉक्टर भाऊसाहेब देशमुख यांचा मृत्यू दि. ०९  एप्रिल १९६५ रोजी दिल्ली मध्ये झाला.

२. पंजाबराव यांच्या आईचे नाव काय?

पंजाबराव यांच्या वडिलांचे नाव शामराव व आईचे नाव राधाबाई होते.

३. भारत कृषक समाज या संस्थेचे संस्थापक कोण?

डॉक्टर पंजाबराव भाऊसाहेब देशमुख यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी १९५५ मध्ये भारत कृषक समाजाची स्थापना केली.

४. कोण होते डॉ पंजाबराव देशमुख ?

उच्च शिक्षण घेऊन, स्वातंत्र्याच्या लढत ते सहभागी झाले. इसवी सन १९३६ च्या निवडणुकीनंतर शिक्षण मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलं. स्वतंत्र भारतात कृषी मंत्री म्हणून त्यांनी काम केला आहे. त्यांनी भारत कृषक समाजाची स्थापना करून, शेतकऱ्यांसाठी मोलाचं कार्य केलं. भाऊ साहेबांची बुद्धिमत्ता आणि प्रतिभा ही चतुरसर होती. ते जसे कृषी पंडित होते, तसे शिक्षण तज्ञ हे होते. महाराष्ट्र राज्यात शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून, त्यांनी शिवाजी शिक्षण संस्था काढली. या संस्थेच्या एकट्या अमरावती विभागात एक हजारो अधिक शाळा आहेत. गुणग्राहकता संघटन कौशल्य, गोरगरिबां विषयी आत्मीयता आणि निस्वार्थ सेवाभावी वृत्ती, ही डॉक्टर पंजाबराव देशमुख यांची गुणवैशिष्ट्ये.

५. देशमुखांचे काय काम होते?

पंजाब रावांचे मूळ आडनाव कदम होते, त्यांच्या घराण्यात असलेल्या वतनदारीमुळे त्यांना देशमुख हे आडनाव प्राप्त झाले.

निष्कर्ष

मित्रहो, आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या बद्दल माहिती दिली आहे. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. लेख आवडल्यास तुमच्या इतर मित्र परीवारांसोबत नक्की शेयर करा. धन्यवाद.

Leave a comment