महाराणी ताराबाई माहिती मराठी Maharani Tarabai Information In Marathi

महाराष्ट्राच्या इतिहासाच्या प्रत्येक पानांमध्ये, वीरांच्या शौर्याच्या गाथा लिहिल्या आहे. ज्यांचे साक्षी आहेत, अनेक दस्तऐवज, गडकोट, किल्ले, समाजा आणि उभा सह्याद्री. कोण होती ती माणसे ? कसे होते त्यावेळेसचे जीवन ?

माहिती जाणून घेण्यासाठी चला तर पलटूया इतिहासातील एक अपरिचित पान, महाराणी ताराबाई. महाराणी ताराबाई या छत्रपती राजाराम महाराजांच्या दुसऱ्या पत्नी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या होय.

आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास महाराणी ताराबाई साहेब यांच्या बद्दल माहिती दिली आहे. हा लेख व माहिती जाणून घेण्यासाठी शेवट पर्यंत नक्की वाचा.

महाराणी ताराबाई माहिती मराठी Maharani Tarabai Information In Marathi

नाव महाराणी ताराबाई
जन्म तारीख १६७५ साली
वडिलांचे नाव सरसेनापती हंबीरराव मोहिते
पतीचे नाव राजाराम राजांच्या द्वितीय पत्नी
सासरे छत्रपती शिवाजी महाराज
मृत्यू ०९ डिसेंबर १७६१ साली
मृत्यूचे कारण वृद्धापकाळ
मृत्यूचे ठिकाण सातारा

ताराबाई यांचा जन्म व प्रारंभिक जीवन

राजाराम राजांच्या पत्नी महाराणी ताराबाई म्हणजे मराठ्यांच्या इतिहासातील असामान्य व्यक्तिमत्व. स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या, यांचा जन्म १६७५ साली झाला. सरसेनापती हंबीरराव मोहिते यांनी आपल्या या मुलीला युद्ध कलेचे शिक्षण देखील दिल होते.

हे सुद्धा वाचा –

छत्रपती संभाजी राजांनी राज्याभिषेक झाल्यानंतर, त्यांचे सावत्र भाऊ राजाराम राजांशी ताराबाईचे लग्न लावून दिले. ताराबाई या राजाराम राजांच्या द्वितीय पत्नी होत्या.

रायगडावरच त्यांना भालाफेक, घोडेस्वारी, तलवारबाजी यांचे शिक्षण मिळाले. राज कुटुंबात प्रवेश झाल्याने, जेवढा सुखाचा आनंद घ्यावा लागणार होता, तसेच दुःखाचे डोंगरही पचवावे लागणार होते. इसवी सन १६८७ मध्ये हंबीर रावांचा तोफेचा गोळा लागून मृत्यू झाल्याचे समजताच, ताराबाईंना प्रचंड दुःख झाले होते.

Maharani Tarabai Information In Marathi

छत्रपती संभाजी राजांच्या वधा नंतर, महाराणी येसूबाईंच्या सल्ल्याने राजाराम महाराज आणि त्यांचा कुटुंब, कबिला त्यांच्यासोबत रायगडाबाहेर पडला.

राजाराम राजांनी कर्नाटकात जाताना महाराष्ट्राचा कारभार महाराणी ताराबाई यांच्याकडे देऊन, त्यांच्या मदतीला रामचंद्र पंत, अमात्य शंकराजी नारायण, संताजी घोरपडे, धनाजी जाधव, यांसारखे मुसंडी आणि वीर ठेवले होते.

ताराबाईंनी लवकरच स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर, स्वतःचा ठसा उमटवायला सुरुवात केली. औरंगजेब मराठा सरदारांना वतनाची लालच दाखवून, स्वतःकडे खेचून घेण्याचा प्रयत्न करत होता, त्यामुळे शिवाजी राजांनी बंद केलेली वतनदारी पद्धत परत चालू करण्याचा निर्णय अगदी न्यायला जाणे, ताराबाईंना घ्यावा लागला होता.

राजाराम राजांचा आदमीने विशाळगडावर असलेल्या ताराबाई गुप्तरित्या जिंजी किल्ल्यावर पोहोचल्या. जिंजीच्या वास्तव्यात असताना दिनांक ०९ जून १६९६ रोजी ताराबाईंना मुलगा झाला. त्या मुलाचे नाव शिवाजी ठेवण्यात आले.

जिंजी किल्ला जुल्फी कारखानाने जिंकून घेतल्यानंतर, ताराबाई या राजाराम राजांसोबत महाराष्ट्रात परतल्या. सततची दगदग आणि प्रवासामुळे सिंहगडावर असताना, छत्रपती राजाराम राजांचा मृत्यू झाला.

त्यावेळी ताराबाई या विशाळगडावर होत्या, एकीकडे औरंगजेबाचा वाढता जोर आणि दुसरीकडे स्वराज्याचे छत्रपती मृत्युमुखी पडले असताना, जराही विचलित न होता ताराबाईंनी स्वतःला सावरले.

ताराबाईंनी स्वतःच्या मुलाला शिवाजी राजांना राज्याभिषेक करून, त्यांना छत्रपती म्हणून घोषित केले. शिवाजी राजे लहान असल्याने स्वराज्याच्या कारभाराची सर्व सूत्रे ताराबाईंनी स्वतःच्या हाती घेतली.

रामचंद्र पंत, अमात्य शंकराजी नारायण, परशुराम पंथ, खंडोबालाल, धनाजी जाधव, संताजी घोरपडे, खंडेराव दाभाडे घोरपडे, उदाजी चव्हाण, कान्होजी आंग्रे, अशा अनेक सरदारांच्या मदतीने ताराबाईंनी औरंगजेबाला सळोकी पळो करून सोडले होते.

मोगलांनी वेढा दिलेला किल्ला जास्तीत जास्त लढवायचा चतुरची जेवढी हानी करता येईल तेवढी करायची आणि पावसाळा तोंडावर आला की, मोगलांकडून जबरदस्त रक्कम घेऊन, किल्ला त्यांच्या ताब्यात द्यायचा आणि हाच किल्ला काही दिवसांनी परत घ्यायचा, असा सपाटा ताराबाईंनी लावला होता.

ताराबाईंच्या या नीतीमुळे, औरंगजेब अगदी मेटाकुटीला आला होता. शत्रूच्या कैदेतून सुटून आल्यानंतर, शाहू राजांनी सातारा येथे स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला आणि सातारा ही आपली राजधानी घोषित केली.

शाहू महाराज हे स्वराज्याचे खरे वारसदार होते, पण ताराबाईंना हे मान्य नव्हते. त्यांचे असे म्हणणे होते की, छत्रपती संभाजी राजांच्या मृत्यूनंतर, विस्कटलेले राज्य राजाराम राजांनी राखले होते, त्यामुळे शाहू महाराज हे वारसदार ठरू शकत नाहीत, त्यामुळे ताराबाईंना मानणारा आणि शाहू राजांना मानणारा असे दोन गट तयार झाले.

Maharani Tarabai Information In Marathi

ताराबाईंनी पन्हाळा ही राजधानी घोषित केली होती. ताराबाईंना अनपेक्षित अशी घटना पन्हाळगडावर घडली. राजाराम राजांच्या तिसऱ्या पत्नी यांनी ताराबाईंना नकळत स्वतःच्या मुलास संभाजी राजांना गादीवर बसवले.

ताराबाई कैदेत असतानाच, ताराबाईंचे पुत्र शिवाजी राजांचा मृत्यू झाला. इसवी सन १७३० साली वारणेच्या काठी झालेल्या युद्धात राजाराम राजांच्या तिसऱ्या पत्नी यांचा पुत्र संभाजी राजांचा पराभव झाला.

संभाजी राजांचे संपूर्ण कुटुंब शाहू राजांच्या ताब्यात आले, पण ताराबाईंनी शाहून बरोबर साताऱ्यात जाण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांना साताऱ्यात आणण्यात आले, दिनांक १० डिसेंबर १७६१ रोजी साताऱ्याच्या मुक्कामातच महाराणी ताराबाईंचा मृत्यू झाला.

महाराणी ताराबाईं यांच्या विषयी इतिहासकाराकांची मते –

महाराणी ताराबाईंनी आपल्या वडिलांचा शौर्याचा पराक्रमाचा वारसा पुढे चालवला. ताराबाईंनी शिवाजी राजांप्रमाणेच माणसे जपली. नव्याने निर्माण केली. आपल्या हुशारीच्या जोरावर औरंगजेबाला त्याचे उरलेले आयुष्य मोहिमा करण्यात आणि किल्ले घेण्याच्या कामी खर्च करायला भाग पाडले.

ताराबाईंच्या एकंदर काम करण्याच्या कार्यपद्धतीचा गौरव करताना, मोगली इतिहासकार खाफिकान म्हणतो की,

ताराबाई या राजाराम राजांच्या थोरल्या पत्नी, त्या अतिशय बुद्धिमान आणि शहाण्या होत्या. सैन्याची व्यवस्था आणि कारभार याबाबतीत राजाराम राजांच्या हयातीतच, ताराबाईंनी मोठा लौकिक मिळवला होता.

पुढे जाऊन तो म्हणतो, राजाराम राजांच्या पत्नी ताराबाईंनी विलक्षण धामधूम उडवली होती. त्यात त्यांच्या सैन्याच्या नेतृत्वाचे आणि मोहिमांच्या व्यवस्थेचे गुण प्रकट झाले आहेत. त्यामुळे मराठ्यांचे आक्रमण आणि त्यांची धामधूम दिवसेंदिवस वाढतच गेली.

भीमसेन सक्सेना नावाचा मोगली इतिहासकार म्हणतो की,

ताराबाईनी इतकी उत्तम व्यवस्था केली की, मराठी सरदार तिच्या आज्ञे शिवाय काहीही करीत नसत.

कवी परमानंद यांचे पुत्र देवदत्त हे महाराणी ताराबाईंच्या पराक्रमाचे वर्णन करताना म्हणतात की,

दिल्ली झाली दीनवाणी, दिल्लीशाहीचे गेले पाणी, ताराबाई रामराणी, भद्रकाली कोपली.

महाराणी ताराबाईंची समाधी संगम माऊली, जिल्हा सातारा येथे आहे. तर ताराबाई पुत्र शिवाजी राजांची समाधी पन्हाळगडावर आहे.

Maharani Tarabai

औरंगजेबच्या स्वप्नाचा चक्काचूर करणाऱ्या वीरांगना महाराणी ताराबाई

उत्तर पूर्व आणि दक्षिण भागावर आपले वर्चस्व राखून असणाऱ्या मोगल बादशाह, औरंगजेबाची नजर जेव्हा दख्खन भागावर वळाली, तेव्हा त्याच्या मनसुगांना सुरुंग लावण्याचे काम महाराणी ताराबाईंनी केले.

शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि स्वराज्याच्या कित्येक सरदारांकडून मार खालेल्या औरंगजेबाला पुन्हा अद्दल घडून, मराठ्यांच्या स्त्रिया यादेखील काही कमी नाही, हे त्यांनी दाखवून दिले.

औरंगजेब नावाचं वादळ १६८१ साली स्वराज्यावर चालू आले, तेव्हा मराठ्यांचा स्वातंत्र्यलढा सुरू झाला. त्या औरंगजेबास संभाजी राजांनी योग्य प्रकारे उत्तर देणे, पण कपटाने संभाजी राजांना पकडून, त्यांची हत्या करण्यात आली.

त्यानंतर या लढ्याची जबाबदारी येऊन पडली राजाराम महाराजांवर. त्यांनी हर प्रकारे मोघलांना तोंड दिले आणि सळो की पळो करून सोडले, पण दुर्दैवाने राजाराम महाराजांचे ०२ मार्च १७०० रोजी सिंहगडावर निधन झाले.

आता वेळ अशी होती की, स्वराज्याला छत्रपती तर होते, पण ते अतिशय लहान होते. अशा बिकट प्रसंगी पंचवीस वर्षे महाराणी ताराबाईंनी, राज्यकारभार आपल्या हाती घेतला.

राज्यकारभाराची सर्व सूत्रे हाती आल्यानंतर, समोर उभे असणाऱ्या अनेक कठीण प्रसंगांनी खचून न जाता, मोगली फौज्यांना मागे सारणासाठी ताराबाईंनी आक्रमक भूमिका घेतली.

इसवी सन १७०२ साली मराठ्यांनी ताराबाईंच्या नेतृत्वाखाली माळवा गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, इत्यादी. प्रदेशातील मोगली भागातील महत्त्वाच्या भागावर हल्ले केले. इसवी सन १७०३ रोजी मराठ्यांनी ३५००० ची फौज गुजरात मध्ये घुसवली, त्यावेळी दुसरी तुकडी नेमाजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली, शहरात गेली आणि मोगल फौज्यांना त्यांनी खडे चारले.

या जिंकलेल्या प्रदेशातून चौथाई वसूल करून, स्वराज्याची तिजोरी आर्थिकदृष्ट्या बळकट केली. घोडेस्वार निपुण असणाऱ्या, महाराणी ताराबाई  अत्यंत बुद्धिमान आणि तडफदार होत्या. त्यांना युद्ध कौशल्य आणि राजकारणातल्या उलाढालीचे तंत्र अवगत होते.

महाराणी ताराबाई या काही नाममात्र राज्यकर्त्या नव्हत्या, त्यांच्या राज्याची सर्व सूत्रे त्यांच्या हाती होती. याशिवाय लष्करी मोहिमांची आखणीही त्या स्वतः करत असत.

मोगल इतिहासकार म्हणतो, ताराबाई ही राजारामाची बायको होती, ती बुद्धिमान आणि शहाणी होती. सैन्याची व्यवस्था आणि राज्यकारभार याबाबतीत नवऱ्याच्या हयातीत तिचा फार मोठा वाटा होता.

इसवी सन १७०० ते १७०७ या काळात शिवाजी महाराजांच्या या सुनेच्या तडफदार धोरणामुळे, औरंगजेबाला सात वर्षे दक्षिणेत मुक्काम करावा लागला आणि अखेरीस येथेच महाराष्ट्रात मरण पावला.

औरंगजेबाचे महाराष्ट्र जिंकण्याचे स्वप्न ताराबाईंनी पूर्ण होऊ दिले नाही. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मराठ्यांमध्ये फूट पडावी म्हणून, कायद्यात असणाऱ्या संभाजी राजांचे पुत्र शाहू महाराजांना मुक्त केले.

शाहू महाराज हेच मराठा राज्याचे उत्तर अधिकारी असल्याचे, अनेक सरदार सेनानी यांना वाटू लागले. दोन्ही बाजूंनी छत्रपती पदाच्या वारसा हक्कावरून संघर्ष सुरू झाला. शाहू महाराजांनी महाराणी ताराबाई व त्यांचा पुत्र शिवाजी दुसरा यांच्या विरुद्ध पुकारले.

१७०७ साली खेड येथे झालेल्या युद्धात शाहू राजांची सरशी झाली आणि महाराणी ताराबाईंनी साताराहून माघार घेतली. आणि कोल्हापूर येथे वेगळी गादी स्थापन केली.

शेवटी वारणेला झालेला तहानुसार शाहू राजांनी कोल्हापूरच्या गादीला संमती दिली. अडचणीच्या काळात कोणी कर्तबगार पुरुष घरात नसताना आणि औरंगजेबासारखा बालाढ्य शत्रू आपल्याच राज्यात आला असताना, एका स्त्रीने राज्याची जबाबदारी समर्थपणे सांभाळली.

एवढेच नाही तर, खऱ्या अर्थाने मराठी शाईला नष्ट होण्यापासून, वाचवण्याचे काम ताराबाईंनी केले नाही तर, शिवरायांनी स्थापन केलेले स्वराज्य इसवी सन १७४० नष्ट झाले असते. राज्याला, सिंहासनाला आणि महाराष्ट्राला खंबीर नेतृत्व ताराबाईंनी दिले, सर्वांचे नित्य टिकून ठेवले .

१७६१ पर्यंत आपल्या मृत्यूपर्यंत ताराबाईंनी मराठा साम्राज्याचे अनेक चढ उतार पाहिले. कधी कधी त्यांना कठोर निर्णय घ्यावे लागले, पण त्यांनी कधीही मराठा साम्राज्य पणास लावले नाही.

छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वप्न शेवटपर्यंत आबादित राखण्याचे हे एकच ध्येय त्यांच्यासमोर होते आणि त्यासाठी त्या आयुष्यभर सक्रिय राहिल्या.

करवीर राज्य म्हणजेच कोल्हापूरच्या राजगादीची ज्यांनी स्थापना केली, राजाराम राजेंच्या मृत्यूनंतर सात वर्ष ज्यांनी औरंगजेबाला कडवी झुंज दिली आणि छत्रपती शिवरायांनी उभं केलेलं हिंदवी स्वराज्य ज्यांनी पापी औरंगजेबाच्या हाती लागू दिले नाही, अशा स्वराज्याच्या महान वीरांगणा म्हणजेच स्वराज्य सौदामिनी महाराणी ताराबाई राणीसाहेब.

महाराणी ताराराणी म्हणजेच स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या आणि छत्रपती शिवरायांचे धाकले पुत्र राजाराम राजे यांच्या पत्नी होय. १६७५ साली महाराणी ताराराणींचा जन्म झाला होता. दि. ११ मार्च १६८९ मध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू झाला.

शंभूराजांच्या मृत्यूनंतर त्यांचे धाकले बंधू म्हणजेच राजाराम राजे यांनी स्वराज्याची सर्व सूत्र स्वतःच्या हाती घेतली. पण इसवी सन १७०० मध्ये वयाच्या अवघात ३० व्या वर्षी राजाराम राजेंचा देखील मृत्यू झाला. अतिशय कमी वयामध्ये वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी महाराणी ताराराणी या विधवा झाल्या.

परंतु स्वतःचे वैयक्तिक दुःख बाजूला ठेवून, संकटात असलेले स्वराज्य वाचवण्यासाठी, महाराणी ताराराणी पुढे सरसावल्या. राजाराम राजांच्या मृत्यूनंतर स्वराज्य संपण्याच्या वाटेवर होतं, एकीकडे परकीयांचा झंजावात तर दुसरीकडे यामुळे स्वराज्य संकटात सापडला होत.

राजाराम राजेंच्या मृत्यूनंतर, आता तरी स्वराज्य ताब्यात येईल असं, औरंगजेबाला वाटत होत. पण त्याच्या दुर्दैवाने राजाराम राजांच्या मृत्यूनंतर सात वर्षात महाराणी ताराराणींनी स्वतः तलवार हाती घेतली आणि या सह्याद्रीच्या मातीमध्ये औरंगजेबाला धूळ चारली.

महाराणी ताराबाई यांचा मृत्यू व समाधी  ?

या महान वीरांगणा, भद्रकाली ताराराणी यांचा मृत्यु नेमकं कसा झाला ? कुठे झाला ? त्याची समाधी कुठे आहे? असे असंख्य प्रश्न आपल्या पैकी अनेक लोकांना पडले असतील.

महाराणी ताराबाई

छत्रपती शिवरायांनी उभं केलेलं स्वराज्य जिंकायला आलेला औरंगजेब २७ वर्ष या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात भटकत राहिला. पण त्याला शेवटपर्यंत स्वराज्य जिंकता आलं नाही. शेवटी १७०७ मध्ये औरंगजेब तडफडून मेला.

औरंगजेबाच्या मृत्यूनंतर असलेले पुत्र थोरले शाहू महाराज स्वराज्यात परत आले, ते स्वराज्यात परत आल्यावर स्वराज्याचा वारसा हक्कावरून त्याचा ताराराणीं मध्ये संघर्ष सुरू झाला. दोघांच्या सैन्यामध्ये खेड जवळ लढाई देखील झाली.

या लढाईमध्ये ताराराणीच्या सैन्याचा पराभव झाला. ज्यांनी आपल्या पराक्रम आणि शिवरायांनी उभा केलेले स्वराज्य शंभूराजांच्या मृत्यूनंतर अठरा वर्ष सांभाळलं, त्याच महाराणी ताराराणीच्या आयुष्यातली पुढचे वर्ष मात्र प्रचंड संघर्षात गेली.

तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही पण, १७१४ मध्ये आपल्यातीलच काही लोकांनी दगा फटका करून, महाराणी ताराराणींना त्रास दिला.

सातारकर शाहू छत्रपती यांच्याकडे असलेली स्वराज्याची सूत्र, हळूहळू पेशव्यांकडे जाऊ लागली होती. यानंतर १७३१ मध्ये वारणेचा तह झाला आणि याच वारणेच्या तहानंतर, स्वराज्याच्या सातारा आणि कोल्हापूर अशा दोन गाद्या निर्माण करण्यात आल्या.

यानंतर सातारकर थोरले शाहू महाराज आणि महाराणी ताराराणी यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा संघर्ष झाला नाही. पण याच काळामध्ये छत्रपतींच वर्चस्व कमी होऊन, महाराष्ट्रात हळूहळू पेशव्यांच्या हाती सत्ता गेली.

अखेर १७६१ मध्ये पानिपतचे तिसरे युद्ध झाले. या युद्धामध्ये मराठ्यांचा पराभव झाला. त्यानंतर दि. ०९ डिसेंबर १७६१ साली वयाच्या ८६ व्या वर्षी वृद्धपकाळाने महाराणी ताराराणींचा साताऱ्यामध्ये मृत्यू झाला.

साताऱ्यातल्या माहुली संगमावर कृष्णा आणि वेण्णा या दोन नद्यांच्या संगमावरती, महाराणी ताराराणीची समाधी आहे. पण दुर्दैवाने स्वराज्याच्या या महान वीरांगणीची समाधी अतिशय वाईट अवस्थेमध्ये आहे.

या समाधीला अजूनही हक्काचे छत्र नाही. समाधीचा जिर्णोद्धार केला जाईल, अशा घोषणा वारंवार केल्या जातात, पण अजूनही समाधीला हक्काचं छत्र मिळालं नाही. हे महाराष्ट्राचं दुर्दैव म्हणावं लागेल,

करवीर राज्य म्हणजेच कोल्हापूरच्या राज गादीची स्थापना करणाऱ्या आणि औरंगजेबाच्या स्वप्नांचा चक्काचूर करत, स्वराज्यामध्ये ठेवणाऱ्या स्वराज्यवादी ठेवणाऱ्या महाराणी ताराबाई त्याकाळी स्वराज्याला असे महान नेतृत्व मिळाले, याचा महाराष्ट्राला सदैव अभिमान असेल स्वराज्याच्या या महान विरंगणीला अवघ्या महाराष्ट्राचा मनाचा मुजरा.

महाराणी ताराबाई यांच्या शौर्याची कथा

हिंदवी स्वराज्याची स्थापना करून, स्वातंत्र्याची ज्योत पेटवणाऱ्या शिवरायांचा १६८० साली मृत्यू झाला. या बातमीने खुश झालेला, अख्ख्या हिंदुस्तानचा बादशाह औरंगजेब मराठ्यांना संपवण्याची पहाडी गर्जना करून दिल्ली सोडून दक्षिणेत आला होता.

शिवरायांच्या पाठोपाठ संभाजी महाराजांनी स्वराज्याची घडी बिघडू दिली नाही. सामना केला, पण दुर्दैवाने दगा फटका करून, औरंगजेबाने शंभू राजांना पकडल आणि हाल हाल करून मारलं. त्यांच्या मुलाला आपल्या कैदेत टाकलं.

आता मराठी साहित्य राजाराम महाराजांना छत्रपती बनून, मराठ्यांनी आपल्या लढा सुरूच ठेवला. राजाराम महाराजांनी शिवरायांनी दूरदृष्टीने खोल दक्षिणेत उभारलेल्या जिंजीचा सहारा घेतला की, आता तरी मराठ्यांचा अंतिम निकाल लागला आहे.

पण औरंगजेबाचा हे स्वप्न खोटं ठरलं. त्याला कारण होत्या, भद्रकाली महाराणी ताराराणी बाई साहेब. त्यांचा ज्वलंत इतिहास जाणून घेतलाच पाहिजे.

जेव्हा शिवरायांच्या मृत्यू नंतर, छत्रपती पदासाठी वाद होण्याची चिन्ह दिसू लागली, तेव्हा हंबीररावणी आपले सख्खे भाचे व भावी जावई असलेल्या राजाराम महाराजांच्या ऐवजी संभाजी महाराजांची निवड केली आणि आपल्या न्यायवृत्तीचे दर्शन घडवले.

हाच न्यायचा आदर्श ताराबाई राणीसाहेबांनी आयुष्यभर सांभाळला. छत्रपती राजाराम महाराज जिंजीला गेल्यानंतर, ताराबाई या विशाळगड येथे राहिल्या. रामचंद्र पंत अमात्य, यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी विशाळगड येथे लष्करी व मूलकी व्यवहाराची माहिती घेतली.

राजाराम महाराजांचा मृत्यू झाला, त्यानंतर ताराबाई राणीसाहेबांची कारकीर्द सुरू झाली. तेव्हा त्या फक्त २५ वर्षांच्या होत्या. स्वराज्याचे युवराज शाहू महाराज कैदेत होते, औरंगजेबाच्या आक्रमणामुळे दक्षिणेस सर्व घडी विस्कटलेली होती.

ताराबाई महाराणी साहेबांनी वयाने लहान असलेल्या आपल्या मुलाला म्हणजेच दुसऱ्या शिवाजींचा विशाळगड येथे राज्याभिषेक केला व त्यांच्या नावाने कारभार पाहू लागल्या. त्या हंबीरराव मोहिते यांच्या मुलगी असल्यामुळे त्या राज्यकारभारा बरोबर, युद्ध कले मध्ये देखील पारंगत होत्या.

धनाजी जाधव हे त्याचे सेनापती होते, तर उदाजी चव्हाण, चंद्रसेन जाधव, कान्होजी आंग्रे, बाळाजी विश्वनाथ, या सगळ्या वीर सेनानीना त्यांनी एकत्र आणलं होतं. शिवाजी महाराजांनी शिकवलेल्या गनिमी काव्याच्या पद्धतीचा वापर करून, तलवारीच्या बळावर त्या एकेक करत किल्ले परत जिंकू लागल्या.

महाराणी ताराबाई स्वतः घोडेस्वारी मध्ये पारंगत होत्या. एकाच ठिकाणी फार काळ मुक्काम करायचा नाही, हे सूत्र त्यांनी कटाक्षाने पाळलं होतं. गडा गडावर जाऊन त्या जातीने पाहणी करत असत, सरदारांना सल्ला देत असत, दक्षिणेतील मोघलांच्या सैन्याचे एकत्रित बळ कमी व्हावे म्हणून, त्यांनी उत्तरेत व पश्चिमेकडे चढाई केली.

कोणताही कर्तबगार पुरुष सत्तेत नसताना, एक स्त्री युद्धात आपल्याला भारी पडते हे, औरंगजेबाला सहन होत नव्हतं. रागाने जळणाऱ्या बादशहाची झोप उडाली होती आणि त्यातच त्याने अनेक चुका देखील केल्या होत्या.

जवळपास २५ वर्ष आपली घरे सोडून, दक्षिणेत आलेले मुघल सैन्य देखील वैतागले होते. त्यातच आलेल्या महापुरामध्ये सैनिक, घोडे, खजिना वाहून गेला. त्यामुळे बादशाह औरंगजेब लंगडा झाला होता.

ताराबाई साहेब आणि त्यांच्या शूर मावळ्यांनी सळो कि पळो केलेला औरंगजेब अखेर मराठी माती मध्ये गाडला गेला. मराठ्यांचे राज्य संपवण्याच त्यांच स्वप्न कधीही पूर्ण होऊ शकलं नाही. त्याच्या मृत्यू नंतर शाहू महाराजांची सुटका झाली.

त्यांनी परत आल्यावर छत्रपती पद परत मागितल. तब्बल सात वर्ष मिळेल त्या मावळ्याला घेऊन, औरंगजेबाची लढा देणाऱ्या ताराबाई राणीसाहेबांनी याला मात्र नकार दिला.

याची परिणीती दुर्दैवी युद्धात झाली आणि युद्ध झाल आणि अखेर वारणेच्या तहानुसार अलीकडे शाहू महाराजांची सातारा गादी आणि पलीकडे ताराराणी साहेबांची करवीर गादी अशी छत्रपती पदाची वाटणी झाली. ताराबाई ८६ वर्ष जगल्या.

FAQ

१. ताराबाई आणि शाहू का भांडले ?

औरंगजेबाच्या मृत्यूनंतर असलेले पुत्र थोरले शाहू महाराज स्वराज्यात परत आले, ते स्वराज्यात परत आल्यावर स्वराज्याचा वारसा हक्कावरून त्याचा ताराराणीं मध्ये संघर्ष सुरू झाला. दोघांच्या सैन्यामध्ये खेड जवळ लढाई देखील झाली. या लढाईमध्ये ताराराणीच्या सैन्याचा पराभव झाला. ज्यांनी आपल्या पराक्रम आणि शिवरायांनी उभा केलेले स्वराज्य शंभू राजांच्या मृत्यूनंतर अठरा वर्ष सांभाळलं, त्याच महाराणी ताराराणीच्या आयुष्यातली पुढचे वर्ष मात्र प्रचंड संघर्षात गेली.

२. महाराणी ताराबाई पित्याचे नाव काय ?

महाराणी ताराबाई या छत्रपती राजाराम महाराजांच्या दुसऱ्या पत्नी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या होय.

३. राजाराम आणि ताराबाई कोण होते ?

छत्रपती संभाजी राजांनी राज्याभिषेक झाल्यानंतर, त्यांचे सावत्र भाऊ राजाराम राजांशी ताराबाईचे लग्न लावून दिले. ताराबाई या राजाराम राजांच्या द्वितीय पत्नी होत्या.

४. कोण होत्या महाराणी ताराबाई ?

मोगल इतिहासकार म्हणतो, ताराबाई ही राजारामाची बायको होती, ती बुद्धिमान आणि शहाणी होती. सैन्याची व्यवस्था आणि राज्यकारभार याबाबतीत नवऱ्याच्या हयातीत तिचा फार मोठा वाटा होता. इसवी सन १७०० ते १७०७ या काळात शिवाजी महाराजांच्या या सुनेच्या तडफदार धोरणामुळे, औरंगजेबाला सात वर्षे दक्षिणेत मुक्काम करावा लागला आणि अखेरीस येथेच महाराष्ट्रात मरण पावला.

निष्कर्ष

मित्रहो आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास महान क्रांतिकारी भद्रकाली महाराणी ताराबाई यांच्या बद्दल माहिती दिली आहे. हा लेख तुम्हाला कसा वाटला, हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. लेख आवडल्यास तुमच्या इतर मित्र परीवारांसोबत नक्की शेयर करा. धन्यवाद.

Leave a comment