मेरी कोम मराठी माहिती Mary Kom Information In Marathi

मेरी कोम मराठी माहिती Mary Kom Information In Marathi – मेरी कोम हे एक प्रसिद्ध नाव तुम्ही ऐकलंच असेल. मित्रहो जी एक प्रसिद्ध ऍथिलिटी आहे. तिच्या उत्कृष्ट कामगिरीने, भारताचा अभिमान उंचावला आहे. अशा मेरी कॉम ह्या एकमेव भारतीय महिला बॉक्सर आहे, जिने २०१२ मध्ये ऑलिंपिक साठी पात्रता प्राप्त केली व कांस्यपदक स्वतःच्या नावे करून घेतले.

मेरी हि भारतीय महिला प्रथमच बॉक्सर म्हणून ऑलिंपिक साठी उतरली, याशिवाय मेरीने पाच वेळा “वर्ल्ड बॉक्सर चॅम्पियनशिप” जिंकली. मेरी ने वयाच्या अवघ्या आठव्या वर्षापासून बॉक्सिंग करिअरला सुरुवात केली.

मेरी कोमचा संघर्ष व बॉक्सिंग साठी समर्पण, संपूर्ण भारतीय जनतेसाठी एक प्रेरणा स्त्रोत आहे. तिने तिच्या जीवनामध्ये अनेक चढ-उतार पाहिले व त्या चढ उतारा मध्ये सुद्धा मेरी कॉम न डगमगता बॉक्सिंग मध्ये करिअर करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली.

आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास या प्रसिद्ध खेळाडू बद्दल माहिती दिलेली आहे. हा लेख व ही माहिती जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत नक्की वाचा.

Table of Contents

मेरी कोम मराठी माहिती Mary Kom Information In Marathi

नाव मांगते चुंगनेजंग मेरी कोम
जन्म तारीख ०१ मार्च १९८३
जन्म स्थळ कांगथेई, मणिपुरी, भारत
ओळख बॉक्सर
आईचे नाव मांगते अखम कोम
वडिलांचे नाव मांगते तोंपा कोम
पतीचे नाव करुंग ओंखोलार कोम
अपत्य
व्यवसाय बॉक्सिंग
प्रशिक्षक गोपाल देवांग, एम नरजीत सिंग, चार्ल्स ऍटकिन्सन, रोंगमी जोशिया
वजन५१ किलो
उंची१५८ मी
निवासस्थानइंफाळ, मणिपूर

कोण आहे मेरी कोम ?

  • मेरी कोम ही भारतातील प्रसिद्ध व नावाजलेली बॉक्सर असून, तिने बॉक्सिंग क्षेत्रामध्ये एक विशिष्ट नावलौकिक प्राप्त केले. मेरी कोमची कथा ही अतिशय उल्लेखनीय असून, भारतामधील मणिपूर या छोट्याशा प्रदेशांमध्ये जन्म घेऊन, सुद्धा स्वतःच्या व कुटुंबांच्या आक्षेपावर मात करून, शहरांमध्ये राहायला येऊन बॉक्सिंगच्या क्षेत्रामध्ये करिअर बनवणारी, सर्वप्रथम भारतीय बॉक्सर चॅम्पियन आहे. मेरी कोमने विविध स्तरावर झालेल्या बॉक्सिंग चॅम्पियनशिप मध्ये, विविध पदके पटकून एक अनोखा विश्वविक्रम केला आहे.
Mary Kom Information In Marathi
  • मेरी कोम सध्या भारताच्या संसदेची विद्यमान सदस्य म्हणून काम करते. मेरी कोम हिला “मॅग्नेफिशियंट मेरी” असे टोपण नाव प्राप्त झाले आहे. भारतातील तसेच जगातील सर्वात प्रसिद्ध क्रीडा व्यक्तिमत्वांपैकी मेरी कॉम ही एक आहे. मेरी कोम हीची जीवन कहाणी व बॉक्सर बनण्यापर्यंतचा संघर्ष तरुण पिढीसाठी प्रेरणादायी आहे.
  • मेरी कोम भारतामधील एकमेव महिला बॉक्सर होती. जिने ५१ किलोग्रॅम फ्लायवेट प्रकारात स्पर्धेसाठी एक उत्तम स्पर्धक म्हणून पात्र ठरली. जिने या प्रकारामध्ये, भारतासाठी कांस्यपदक जिंकून, भारताचे नाव संपूर्ण जगामध्ये उंचावले. याशिवाय मेरी कोम ही बॉक्सिंग चॅम्पियनशिपच्या, इतिहासामधील एकमेव महिला आहे जिने तिच्या पहिल्या सात जागतिक चॅम्पियनशिप मध्ये, प्रत्येकी एक पदक जिंकून विश्वविक्रम नोंदवला. तसेच जागतिक हौशी बॉक्सिंग चॅम्पियनशिपचे विजेतेपद सहा वेळा जिंकून मेरी कोमने एक नवा विक्रम घडवला.
  • मेरी कोमचे एका छोट्याशा खेडेगावातून, जागतिक स्तरावरच्या विलक्षण व अलौकिक प्रवासाने बॉक्सिंगच्या क्षेत्रामध्ये मेरीची एक प्रतिभाषाली छाप सोडली आहे. या प्रसिद्धीसाठी मेरीला असंख्य संघर्षाला सामोरे जावे लागले.
  • मेरी ही असंख्य तरुण पिढीसाठी प्रेरणास्थान आहे. मेरीचा दृढ निश्चय, खेळाबद्दलची आवड, श्रद्धा, लवचिकता, यामुळे मेरीला भारतामध्येच नाहीतर, पूर्ण जगभरामध्ये आयकॉनच्या दर्जावर पोहोचवले आहे. मेरी आतापर्यंतच्या महान बॉक्सिंग दिगज्यांपैकी एक म्हणून नेहमीच तरुण पिढीला प्रेरणा देत राहील.

मेरी कोमचा जन्म, वय, जन्म ठिकाण, कुटुंब

मेरी कोमचे पूर्ण नाव मांगते चुंगनेजांग जान मेरी कोम असे आहे. मेरी कोमचा जन्म दिनांक १ मार्च १९८३ रोजी कांगथेई, मणिपूर. या ठिकाणी झाला. मेरी कोमचे वडील अतिशय कष्टाळू व गरीब शेतकरी होते. मेरी कोम यांना चार भावंडे होती. त्यामध्ये मेरी कोम सर्वात मोठ्या. लहानपणापासूनच त्या अतिशय कष्टाळू होत्या. आई-वडिलांसोबत काम करून, मेरी कोम त्यांना मदत करायच्या व आपल्या भावंडांची देखरेख करायच्या.

Mary Kom Information In Marathi

नक्की वाचा 👉👉 सानिया मिर्झा माहिती मराठी

नक्की वाचा 👉👉 पी टी उषा यांची माहिती मराठी

मेरी कोम हिचे शिक्षण

मेरी कोमची घरची परिस्थिती ही बेताची होती. एवढे कष्ट सहन करून सुद्धा, मेरीने “लोकतक ख्रिश्चन मॉडेल हायस्कूल” मध्ये प्रचंड अभ्यास करण्यास सुरुवात केली. तिथे तिने सहावीपर्यंत शिक्षण घेतले. यानंतर ती “सेंट झेवियर कॅथोलिक शाळेमध्ये” गेली. त्या ठिकाणी तिने आठवीपर्यंत परीक्षा पास केली.

उच्च शिक्षणासाठी मेरीने “ट्रायबल हायस्कूलमध्ये” दाखला घेतला.व नववी व दहावी ही ट्रायबल हायस्कूल मध्येच तिने पूर्ण केली. यानंतर मेरीने शाळा सोडून, नंतर एन.आय.ओ.एसची परीक्षा दिली व “चुराचंदपूर कॉलेज इंनफाळ, मणिपूर” या ठिकाणी पदवीचे शिक्षण घेतले.

Mary Kom

मेरी कोम हिचे कोच यांचे नाव

मेरी कोमचे पहिले प्रशिक्षक हे के कोसान होते. यांच्या मार्गदर्शनाखाली मेरीने इंफाळमध्ये प्रशिक्षण सुरू केले. यानंतर मेरीने खुमन लम्पक येथे, मणिपूर राज्य बॉक्सिंग प्रशिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली बॉक्सिंगचे प्रशिक्षण घेतले.

मेरी कोमची सुरुवातीची कारकीर्द

मेरीला बालपणापासूनच ऍथलेट बनण्याची प्रचंड आवड. त्यामुळे शालेय जीवनात मेरी फुटबॉल मध्ये जास्त सहभागी होत असे. परंतु मेरीने कधीही बॉक्सिंग मध्ये खेळाचे सादरीकरण केले नव्हते. त्यानंतर १९९८ मध्ये बॉक्सर “डिंगकों सिंगने” आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकावले. हा खेळाडू मणिपूरचा होता. त्याच्या या भव्य विजयामुळे, संपूर्ण भारताला आनंद झाला. मेरी सुद्धा डिंगकोच्या बॉक्सिंग शैलीमुळे प्रचंड प्रभावित झाली. व स्वतःने सुद्धा बॉक्सिंग मध्येच करिअर बनवण्याचा निश्चय केला.

यानंतर मेरी समोर प्रचंड आव्हाने येत गेली. कुटुंबीयांना बॉक्सिंग करिअरमध्ये नाव कमावण्यासाठी समजावणे मेरीला प्रचंड कठीण गेले. छोट्या ठिकाणच्या या सामान्य लोकांनी, बॉक्सिंग हा पुरुषांचा खेळ आहे असे समजले. या खेळासाठी प्रचंड ताक व मेहनतची आवश्यकता आहे, हे काम एका तरुण मुलीला करणे शक्य नाही. अशी हेटाळनिस्पद वाक्य बोलून, मेरीचा मजाक उडवला गेला. तरीही मेरी या प्रसंगांना न डगमगता बॉक्सिंग क्षेत्रात करिअर बनवण्याचा निर्धार करून, पुढे चालतच राहिले. तिने कधीच यानंतर मागे वळून पाहिले नाही.

मेरी कोम

मेरी कोम हिचे बॉक्सिंग प्रशिक्षण

मेरीने मनामध्ये निश्चय केला होता की, तिला प्रचंड प्रयत्न करावे लागले तरी ती तिचे ध्येय हे नक्कीच गाठेल. मेरी स्वतःच्या पालकांना न सांगता बॉक्सिंगच्या प्रशिक्षणासाठी जात असे. एकदा तिने खुमान लंपक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मध्ये मुलींना मुलांसोबत बॉक्सिंग करताना पाहिले व त्यामुळे तिला प्रचंड धक्काच बसला. तेथून तिने स्वतःचे स्वप्न साकार करण्यास सुरुवात केली.

मेरी तिच्या गावातून इंफाळला गेली व त्या ठिकाणी मणिपूरचे राज्य बॉक्सिंग प्रशिक्षण एम. नरजीत सिंग यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांना स्वतःला बॉक्सिंगचे प्रशिक्षण देण्याची, तिने त्यांच्याकडे विनंती केली. तिला बॉक्सिंग खेळामध्ये प्रचंड आवड होती व ती खूप लवकर शिकणारी सुद्धा होती. प्रशिक्षकाने या सर्व गोष्टी नोंद केल्या व नंतर मेरीला प्रशिक्षण देण्यास मंजुरी दिले. सर्वांनी प्रशिक्षण केंद्र सोडले, तरीही मेरी रात्र रात्रभर बॉक्सिंगचा सराव सुरूच ठेवत असे. व इथून मेरी बॉक्सिंग क्षेत्राला सुरुवात केली.

मेरी कोम हिचे बॉक्सिंग करिअर

  • बॉक्सिंगच्या करिअरला सुरुवात केल्यानंतर, मेरी कोमला माहीतच होते की, बॉक्सिंग मध्ये करिअर करण्याचे क्षेत्र निवडणे हे तिच्या कुटुंबीयांना अजिबात मान्य होणार नाही. म्हणून मेरीने हे सत्य तिच्या कुटुंबांपासून लपवून ठेवले.
  • १९९८ ते २००० पर्यंत ती कुटुंब कुटुंबीयांना न सांगताच, बॉक्सिंगचे प्रशिक्षण घेण्यासाठी जात असे. २००२ मध्ये जेव्हा मेरीने “महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिप” मणिपुर जिंकून, बॉक्सरचा पुरस्कार स्वतःच्या नावे पटकावला, तेव्हा तिथल्या प्रत्येक वर्तमानपत्रांमध्ये, तिचा विजय प्रकाशित करण्यात आला. तेव्हा तिच्या कुटुंबीयांना मेरी ही बॉक्सर असल्याची माहिती समजली.
  • या विजयानंतर तिच्या कुटुंबाने मेरीला सहर्ष स्वीकार करत, तिचा विजय साजरा केला. यानंतर मेरीने पश्चिम बंगाल मध्ये झालेला “महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिप” मध्ये सुवर्णपदक पटकावून, राज्याचा गौरव केला व त्या ठिकाणी तिच्या कारकर्दीचे छाप वर्तमानपत्रांमध्ये दिसून आले.

२००१

२००१ मध्ये मेरी कोमने आंतरराष्ट्रीय स्तरावर, तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यावेळी मेरीचे वय हे अवघे १८ वर्षे होते. सर्वप्रथम मेरीने अमेरिकेत झालेल्या, “ए.आय.बी.ए महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिप” मध्ये ४८ किलो वजनी गटात सहभाग घेतला व त्या ठिकाणी रौप्य पदक पटकावले.

२००२

यानंतर २००२ मध्ये तुर्की येथे, झालेल्या “ए.आय.बी.ए महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिप” मध्ये ४५ किलो वजनी गटांमध्ये सहभाग दर्शवून, सुवर्णपदक स्वतःच्या नावे केले. त्याच वर्षी हंगेरी मध्ये झालेल्या “विच कपमध्ये” मेरी कोमने ४५ वजनीय गटांमध्ये सहभाग दर्शवला व त्या ठिकाणी मेरीने उत्तम कामगिरी करून सुवर्णपदक जिंकले.

२००३

२००३ मध्ये भारतामध्ये झालेल्या “आशियाई महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिप” मध्ये ४६ किलो वजनाच्या गटामध्ये सहभाग दर्शवून, मेरी ने सुवर्णपदक जिंकले. यानंतर मेरीने नॉर्वे, या ठिकाणी झालेल्या “महिला बॉक्सिंग वर्ल्ड कप” मध्ये पुन्हा उत्तम कामगिरी करून सुवर्णपदक पटकावले.

२००५

मेरी या प्रसिद्ध व उत्तम बॉक्सर आहे. जिने २००५ मध्ये तैवान, मध्ये झालेल्या “आशियाई महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिप” मध्ये ४६ किलो वजनीय गटामध्ये सहभाग दर्शवून, सुवर्णपदक पटकवून भारताचे नाव गौरवले. याच वर्षी मेरीने रशियामधील, “महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिप” मध्ये सहभाग दर्शवून, ती चॅम्पियनशिप स्वतःच्या नावे करून घेतली.

२००६

२००६ मध्ये मेरी ने डेन्मार्क मध्ये आयोजित झालेल्या, “व्हीनस महिला बॉक्सिंग” व भारतामध्ये आयोजित करण्यात आलेल्या “महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिप” मध्ये सक्रिय सहभाग दर्शवून, ती चॅम्पियनशिप जिंकून सुवर्णपदक पटकावले.

२००८

२००६ मध्ये खेळून, २००७ मध्ये एका वर्षाचा ब्रेक घेऊन, २००८ ला मेरी कोम पुन्हा रणांगणांवर परतल्या. यानंतर, भारतामध्ये झालेल्या “आशियाई महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिप” मध्ये उत्तम कामगिरी दर्शवून, मेरीने रौप्य पदक जिंकले. यासोबतच “ए.आय.बी.ए महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिप” चीनमध्ये झालेली होती, त्यामध्ये मेरीने सुवर्णपदक पटकावले.

२००९

२००९ मध्ये व्हिएतनाम मध्ये झालेल्या “एशियन इंनडोर गेम्स” मध्ये मेरीने सुवर्णपदक पटकावले.

२०१०

मेरी ने २०१० मध्ये झालेल्या, कझाकस्तान, मध्ये “आशियाई महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिप” मध्ये सुवर्णपदक जिंकले. यासोबतच मेरीने  “ए.आय.बी.ए महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिप” मध्ये सलग पाचव्यांदा सुवर्णपदक जिंकवून, रेकॉर्ड नोंदवला. त्याच वर्षी कोमने, “आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये” ५१ किलो वजनीय गटांमध्ये सहभाग दर्शवून कांस्यपदक स्वतःच्या नावे केले.

तसेच याच वर्षी भारतामध्ये “कॉमनवेल्थ गेम्सचे” आयोजन करण्यात आले होते, त्या ठिकाणी उद्घाटन सोहळ्या मध्ये विजेंदर सिंग सोबत मेरी कॉम सुद्धा उपस्थित होत्या.

२०११

२०११ मध्ये चीनमध्ये झालेल्या “आशियाई महिला कप” खेळामध्ये मेरीने ४८ किलो वजनीय गटात सहभाग दर्शवून सुवर्णपदक पटकावले.

२०१२

मंगोलिया या ठिकाणी “आशियाई महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिप” मध्ये २०१२ साली ५१ किलो वजनीय गटामध्ये कोमने सुवर्णपदक जिंकून, उत्तम कामगिरी केली. यानंतर याच वर्षी लंडनमध्ये आयोजित केलेल्या ऑलिंपिक मध्ये, मेरीला प्रचंड सन्मान प्राप्त झाला. ती ऑलम्पिक साठी पात्र ठरणारी, पहिला महिला बॉक्सर होती. या ठिकाणी मेरीने ५१ किलो वजनीय गटात कांस्यपद मिळवले. यासोबत ऑलम्पिक मध्ये पदक जिंकणारी ती तिसरी भारतीय महिला होती.

२०१४

दक्षिण कोरिया, मध्ये झालेल्या “आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये” २०१४ साली महिलांच्या फ्लाएवेट मध्ये मेरीने सुवर्णपदक जिंकून, इतिहास रचला.

2017

व्हिएतनाम येथे झालेल्या “आशियाई महिला चॅम्पियनशिप” मध्ये 48 किलो वजनी गट जिंकला.

2018

ऑस्ट्रेलियात झालेल्या “कॉमनवेल्थ गेम्स” मध्ये 45-48 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले.

24 नोव्हेंबर 2018

भारतात आयोजित AIBA महिला जागतिक चॅम्पियनशिपमध्ये 45-48 किलो वजनी गटात 6 वी जागतिक स्पर्धा जिंकणारी पहिली महिला बनून इतिहास रचला.

2019

इंडोनेशियामध्ये झालेल्या “प्रेसिडेंशियल कप” मध्ये 51 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकून देशाचा गौरव केला. तिने ऑस्ट्रेलियाच्या एप्रिल फ्रँकचा 5-0 असा पराभव करून सुवर्णपदक जिंकले.

मेरी कोम हिची यशस्वी कारकीर्द

वर्षपदकभारस्पर्धास्थान
2001रजत४८महिला विश्व मुक्केबाजी स्पर्धास्क्रैंटन  ,  पेंसिल्वेनिया  ,  संयुक्त राज्य अमेरिका
2002स्वर्ण४५महिला विश्व मुक्केबाजी स्पर्धाअंताल्या  ,  तुर्की
2002स्वर्ण४५विच कपपेक्स  ,  हंगरी
2003स्वर्ण४६एशियाई महिला चैंपियनशिपहिसार , भारत
2004स्वर्ण४१महिला विश्व कपटोंसबर्ग  ,  नॉर्वे
2005स्वर्ण४६एशियाई महिला चैंपियनशिपकाऊशुंग  ,  टाई
2005स्वर्ण४६महिला विश्व मुक्केबाजी स्पर्धापोडॉल्स्क  ,  रशिया
2006स्वर्ण४६महिला विश्व मुक्केबाजी स्पर्धानवी दिल्ली  ,  भारत
2006स्वर्ण४६वीन्स महिला बॉक्स कपवाइला  ,  डेनमार्क
2008स्वर्ण४६महिला विश्व मुक्केबाजी स्पर्धानिंगबो  ,  चीन
2008रजत४६गुवाहाटी  ,  भारत
2009स्वर्ण४६एशियाई इंडोर खेळहनोई  ,  वियतनाम
2010स्वर्ण४८महिला विश्व गैर – व्यावसायिक मुक्केबाजी स्पर्धाब्रिजटाउन  ,  बारबाडोस
2010स्वर्ण४६एशियाई महिला चैंपियनशिपअस्ताना  ,  कजाखस्तान
2010कांस्य५१एशियाई खेळगुआंगज़ौ  ,  चीन
2011स्वर्ण४८एशियाई महिला कपहाइको  ,  चीन
2012स्वर्ण४१एशियाई महिला चैंपियनशिपउलानबातार  ,  मंगोलिया
2012कांस्य५१ग्रीष्मकालीन ओलंपिकलंदन  ,  युनायटेड किंगडम
2014स्वर्ण५१एशियाई खेळइनचान  ,  दक्षिण कोरिया
2017स्वर्णएशियाई महिला चैंपियनशिपहो ची मिन्ह सिटी, वियतनाम
2018स्वर्णकॉमनवेल्थ गेम्सगोल्ड कोस्ट, क्वींसलैंड, ऑस्ट्रेलिया
2018स्वर्णAIBA महिला विश्व चैंपियनशिपनई दिल्ली, भारत

मेरी कोम टोकीयो ऑलिंम्पिकमध्ये गेली

बॉक्सिंग क्षेत्रात, भारताचे प्रतिनिधित्व करणारी मेरी ही टोकियो ऑलिंम्पिक मध्ये स्वतःचे बॉक्सिंगचे कौशल्य सादर करीत आहे. तिने एक उत्तम कामगिरी करत, पहिल्या दोन फेऱ्या स्वतःच्या नावे करून घेतल्या. यानंतर पुढील फेरीसाठी त्या उप उपांत्यपूर्व फेरीमध्ये पोहोचल्या. हा सामना कोलंबियाच्या इंग्रिट व्हॅलेन्सियाशीया ठिकाणी होता. या सामन्यामध्ये कोमला ०२ ते ०३ असा पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे ती या खेळांमधून बाहेर पडली.

या सामन्यात तिसरी आणि अंतिम फेरी मेरी कोमने स्वतः जिंकून, ०३ ते ०२ अशी उत्तम कामगिरी केली. परंतु पहिल्या फेरीमध्ये पराभव झाल्यामुळे, मेरीला ही स्पर्धा जिंकता आली नाही व कोमचा टोकियो ऑलिंम्पिक मधील प्रवास इथे राहिला व यातून ती बाहेर पडली.

मेरी कोम हिचे वैयक्तिक जीवन

२००१ मध्ये कोमची ऑन्लर कोम सोबत दिल्लीमध्ये भेट झाली. ज्यावेळी मेरी राष्ट्रीय खेळासाठी पंजाबला जायच्या, त्यावेळी ऑन्लर हा दिल्ली विद्यापीठामध्ये, कायद्याचे शिक्षण घेत होता. दोघेही एकमेकांना प्रचंड आवडायचे व एकमेकांबद्दल त्यांच्या मनात आवड निर्माण झाली. त्यांची मैत्री चार वर्षाची होती. यानंतर २००५ मध्ये मेरी व ऑन्लर कोमने लग्न केले. दोघांना तीन अपत्य आहेत.

मेरी कोम फॅमिली

मेरी कोमच्या जीवनातील प्रमुख घटना आणि काही धडे

एका इंटरव्यूच्या वेळी मेरी म्हणाल्या की, “तुम्ही कितीही सराव केलात व तयारी केली, तरी तुम्ही शिस्तबद्ध नसाल, तर तुम्ही रिंगण मध्ये जिंकू शकत नाही. जर तुम्ही दिवसाचे चार तास सराव करत असाल, व तुम्ही शिस्तबद्ध नसाल, तर तुम्ही रिंगणामधील लोकांशी प्रतिस्पर्धी करू शकणार नाही. त्यामुळे खेळात शिस्त असणे प्रचंड गरजेचे आहे.

जेव्हा तुम्ही रिंगणामध्ये असतात, तेव्हा तुम्ही केलेल्या सरावाच्या सर्व हालचाली आणि तयारी तुम्ही विसरता. हे खरे आहे. परंतु, तुम्ही लाखो वेळा सराव केलेल्या, गोष्टी कधीच विसरू शकत नाही. योग्य वेळी ते तुम्हाला नक्कीच उपयोगी पडते व हाच दावा तुमच्या प्रतिस्पर्ध्यासाठी अचूक प्रत्युत्तर आहे.

मेरी कोमला मिळालेले पुरस्कार आणि उपलब्धी

२००३अर्जुन पुरस्कार 
२००८CNN-IBN आणि रिलायन्स इंडस्ट्रीतर्फे ‘रिअल हॉर्स अवॉर्ड’ प्रदान करण्यात आला.
२००६पद्मश्री पुरस्कार
२००७ लिम्का बुक रेकॉर्ड द्वारे वर्षातील लोकांचा सन्मान प्राप्त केला.
२००८AIBA द्वारे ‘मॅग्निफिसेंट मेरी’ पुरस्कार.
२००७ ‘राजीव गांधी खेलरत्न’ या सर्वात मोठ्या क्रीडा सन्मानासाठी नामांकन मिळाले होते.
२००८पेप्सी एमटीव्ही युथ आयकॉन
२०१० सहारा स्पोर्ट्स अवॉर्ड्सद्वारे स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर पुरस्कार देण्यात आला.
२०१३देशाचा तिसरा सर्वोच्च सन्मान पद्मभू२००६ण देण्यात आला.
२००९राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार

२०१२ लंडन ऑलीम्पिक मध्ये मेरी कोमला मिळालेले पुरस्कार

  • अरुणाचल प्रदेश सरकारकडून १० लाख रुपयांचे रोख बक्षीस मेरीला देण्यात आले.
  • भारतीय आदिवासी व्यवहार मंत्रालयाकडून १० लाख रुपयाचे रोख बक्षीस, मेरीला प्रदान करण्यात आले.
  • मेरी हिस मणिपुर सरकारने, ५० लाख रुपये रोख देऊन, २ एकर जमीन प्रदान केली.
  • राजस्थान सरकारकडून ५० लाख रुपयांचे, रोख बक्षीस मेरीला २०१२ लंडन ऑलीम्पिक मध्ये कांस्यपदक जिंकण्यासाठी देण्यात आले.
  • आसाम सरकारकडून कोमला २० लाख रुपयांचे रोख बक्षीस देऊन गौरविले गेले.

मेरी कोम संबंधी पुस्तके

अनब्रेकेबल (अनुवादित आत्मचरित्र, मूळ लेखिका – एम. सी. मेरी कोम)

मेरी कोम हिच्यावर आधारित चित्रपट

कोमच्या जीवनावर आधारित “मेरी कोम” हा चित्रपट ओमंग कुमारने बनवला असून, दि. ०५ सप्टेंबर २०१४ रोजी हा पिक्चर रिलीज झाला होता. या चित्रपटामध्ये कोमची मुख्य भूमिका, “प्रियांका चोप्रा” हिने साकारली आहे. ज्यामध्ये तिचा अभिनय हा अतिशय उत्कृष्ट होता.

मेरी कोम राज्यसभा सदस्याच्या रूपात

आज मेरी ने अनेक संघर्षाचा सामना करीत बाॅक्सिंग करता पाहिलेले स्वप्नं सत्यात उतरविले. मेरी ला 26 एप्रील 2016 ला राज्यसभा सदस्य म्हणुन सन्मानित करण्यात आले.

बाॅक्सिंग क्षेत्रात आपली आगळीवेगळी ओळख निर्माण करणारी आणि भारताचे नाव संपुर्ण विश्वात गौरवान्वित करणारी महिला मुष्टीयोध्दा कोम पासुन प्रत्येकाने प्रेरणा घेण्याची गरज आहे. याशिवाय मार्च 2017 ला भारत सरकार ने कोम ला ‘‘युवा कार्यक्रम आणि क्रिडा मंत्रालय’’ व्दारे बाॅक्सिंग ची राष्ट्रीयस्तरावर परिक्षक म्हणुन सन्मान दिला.

मुष्टीयुध्द केवळ पुरुषांचे साम्राज्य आहे हा समाजाचा झालेला गैरसमज दुर सारत स्वतःला अव्वल स्थानी पोहोचवले आणि महिला कुठल्याही क्षेत्रात मागे नाही हे पुन्हा एकदा सिध्द केले.

मेरी कोम ब्रँड अँबेसिडर म्हणून घोषित

केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री, अर्जुन मुंडा यांनी भगवान बिरसा मुंडा यांचे नातू सुकाराम मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये, नवी दिल्लीत दिल्ली हार्ट या ठिकाणी “ट्रिबल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग डेव्हलपमेंट फेडरेशन लिमिटेड” या महोत्सवाच्या उद्घाटनाचे आयोजन केले होते. या उद्घाटनाच्या वेळी ऑलिंपिक पदक विजेती तसेच बॉक्सर पद्यविभूषण मेरी यांना आमंत्रित केले होते व त्यांना ट्रायफिड आदी महोत्सवाची ब्रँड अँबेसिडर म्हणून घोषित करण्यात आले.

हा राष्ट्रीय आदिवासी सण होता. तसेच आदिवासी व्यवहार मंत्रालय व “ट्रिबल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग डेव्हलपमेंट फेडरेशन लिमिटेड” यांचा संयुक्त उपक्रम सुद्धा आहे. सध्या मेरी या “बीएसएनएल” ची ब्रँड अँबेसेडर आहे.

मेरी कोमबद्दल दहा ओळी

  • मेरी ही भारतीय बॉक्सिंग पटू आहे.
  • तिथे पूर्ण नाव मांगते चुंगनेजंग मेरी असे आहे.
  • मेरीचा जन्म दि.०१ मार्च १८८३ मध्ये कांगथेई, मणिपूर या ठिकाणी झाला.
  • ०६ वेळा जागतिक हौशी बॉक्सिंग चॅम्पियनशिप जिंकणारी ती एकमेव महिला आहे.
  • आज जागतिक चॅम्पियनशिप पदके जिंकणारी मेरी एकमेव भारतीय महिला आहे.
  • २०१२ साली लंडन ओलंपिक स्पर्धेमध्ये कोमने कांस्यपदक मिळवले.
  • २०१४ साली आशियाई स्पर्धेमध्ये कोमने सुवर्णपदक मिळवले.
  • २०१३ साली मेरीने “अनब्रेकेबल” नावाचे आत्मचरित्र लिहिले.
  • २०१८ मध्ये मणिपूर सरकारने कोमला “मिथोयी लिमा” ही पदवी देऊन सन्मानित केले.
  • राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार, पद्मश्री, पद्मभूषण, अर्जुन पुरस्कार, पद्मविभूषण, इत्यादी. सर्वोच्च पुरस्काराने कोमला गौरवित करण्यात आले.

मेरी कोम – हिची लोकप्रियता आणि मीडिया

  • मेरी चे आत्मचरित्र ज्याला “अनब्रेकेबल” असे नाव आहे. २०१३ च्या सुरुवातीला हार्पर कॉलिंन्स यांनी “अनब्रेकेबल” आत्मचरित्र प्रदर्शित केले.
  • २०१४ च्या दरम्याने मेरी हीच्या जीवनावर आधारित मेरी कोम हा चित्रपट सुद्धा आला. ज्या चित्रपटामध्ये कोमची जीवन कथा व तिच्या आयुष्यामधील संघर्ष योग्यरीत्या रेखाटला आहे. “मेरी कोम” हा बॉलीवूड चित्रपट दि. ०५ सप्टेंबर २०१४ रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटात द्वारे कोमला भारतातील सामान्य लोकांमध्ये अजून एक खास ओळख प्राप्त झाली.
  • “द गुड नाईट स्टोरीज फॉर रिबेल गर्ल्स” हे पुस्तक जे स्त्रियांबद्दलच्या छोट्या कथा दाखवते आणि तिच्या कथांमध्ये मुलांचे रोल मॉडेल म्हणून स्त्रियांना समाविष्ट करते. त्यात मेरी कोमची रोल मॉडेल म्हणून तिच्या जीवनावर आधारित एक लघुकथा दिलेली आहे.
  • त्याचबरोबर २०१६ च्या डॉक्युमेंटरी मध्ये कोमला कॅमिओ भूमिकेसह देखील दर्शवले गेले आहे.

मेरी कोम हिचे नेटवर्थ

एका तपशील नुसार कोमची ओलंपिक नंतरची कमाई ३.३२ कोटी रुपयांच्या जवळपास आहे.

मणिपूर आणि राजस्थान या दोन्ही सरकारने ऑलम्पिक कांस्यपदक विजेता म्हणून कोम हीस ५० लाख रुपये देऊ केले. मेरी कोमची २०२३  पर्यंत एकूण मालमत्ता ७ कोटी रुपयांच्या आसपास आहे.

मेरी कोम हीचा व्हिडिओ

FAQ

१. मेरी कोमने किती जागतिक स्पर्धा जिंकल्या?

०६ वेळा जागतिक हौशी बॉक्सिंग चॅम्पियनशिप जिंकणारी मेरी कोम हि एकमेव महिला आहे.

२. भारतातील पहिली महिला बॉक्सर कोण आहे?

मेरी कोम हि भारतीय महिला प्रथमच बॉक्सर म्हणून ऑलिंपिक साठी उतरली, याशिवाय मेरीने पाच वेळा “वर्ल्ड बॉक्सर चॅम्पियनशिप” जिंकली. मेरी ने वयाच्या अवघ्या आठव्या वर्षापासून बॉक्सिंग करिअरला सुरुवात केली.

३. मेरी कोमने कोणत्या वर्षी ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकले?

२०१२ साली लंडन ओलंपिक स्पर्धेमध्ये मेरी कोमने कांस्यपदक मिळवले.

४. मेरी कोमची सर्वात महत्त्वाची कामगिरी कोणती?

०६ वेळा जागतिक हौशी बॉक्सिंग चॅम्पियनशिप जिंकणारी ती एकमेव महिला आहे. आज जागतिक चॅम्पियनशिप पदके जिंकणारी मेरी एकमेव भारतीय महिला आहे.

५. मेरी कोमचा जन्म कधी झाला ?

मेरी कोमचा जन्म दिनांक १ मार्च १९८३ रोजी कांगथेई, मणिपूर. या ठिकाणी झाला.

६. मेरी कोमचे पूर्ण नाव काय आहे ?

मेरी कोमचे पूर्ण नाव मांगते चुंगनेजांग जान मेरी कोम असे आहे.

७. मेरी कोमचे काय काम आहे?

मेरी कोम एक प्रसिद्ध ऍथिलिटी आहे. तिच्या उत्कृष्ट कामगिरीने, भारताचा अभिमान उंचावला आहे. अशा मेरी कॉम ह्या एकमेव भारतीय महिला बॉक्सर आहे, जिने २०१२ मध्ये ऑलिंपिक साठी पात्रता प्राप्त केली व कांस्यपदक स्वतःच्या नावे करून घेतले.

निष्कर्ष

मित्रहो, आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणस मेरी कोमबद्दल माहिती दिली आहे. हा लेख तुम्हाला कसा वाटला, हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. लेख आवडल्यास तुमच्या इतर मित्रपरिवारांसोबत नक्की शेयर करा. धन्यवाद.

Leave a comment