MURUD JANJIRA FORT INFORMATION IN MARATHI | मुरुड जंजिरा किल्ला माहिती मराठी -रायगड जिल्ह्यातील मुरुड–जंजिरा हा एक अभेद्य आणि अजिंक्य असा जलदुर्ग आहे. याचे मूळ नाव जजीरे मेहरुब असे असून उर्दू भाषेत जंजीरा म्हणजे पाण्यानी वेढलेले बेट आणि मेहरुब म्हणजे चंद्रकोर. चारही बाजूंनी अरबी समुद्रने वेढलेला आहे. रायगड जिल्ह्याच्या पश्चिमेला अरबी समुद्र असून त्यात हा किल्ला आहे.
मुरुड जंजिरा किल्ला माहिती मराठी – MURUD JANJIRA FORT INFORMATION IN MARATHI
हे ठिकाण महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक आहे. मुरुड हे महाराष्ट्राच्या रायगड या जिल्ह्यातील एक तालुक्याचे ठिकाण आहे. मुरुड या ठिकाणाला एकेकाळी असल किंवा हपशी या नावाने ओळखले जायचे. संपूर्णतः निसर्ग संपन्न वातावरणाने भरून गेलेले मुरुड हे महाराष्ट्र बरोबर भारतातील बऱ्याच पर्यटकांना आकर्षित करत असते. दरवर्षी सुट्ट्यांच्या दिवसांचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक आवर्जून या ठिकाणाला भेट देण्यासाठी येत असतात.
मराठी झटका या आमच्या वेबपेजच्या आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास रायगड जिल्ह्यातील मुरुड जंजिरा या प्रसिद्ध व पर्यटन स्थळाबद्दल माहिती देणार आहोत. हा लेख तुम्ही नक्की वाचा.
मुरुड जंजिरा किल्ल्याची ठळक वैशिष्ट्ये
मुरुड जंजिरा किल्ला हा प्रमुख सागरी जलदुर्ग किल्ल्यांपैकी एक आहे. या किल्ल्यावर असलेली तटबंदी आजही भक्कम स्थितीत मजबूत आहे. महाराष्ट्रातील बरेच पर्यटक व इतिहासप्रेमी आवर्जून या किल्ल्याला भेट देण्यासाठी येत असतात.
स्थळ :- | किल्ले जंजिरा (मुरुड) |
ऊंची :- | नाही |
प्रकार :- | जलदुर्ग (सागरी किल्ला) |
चढाईची श्रेणी :- | सोपी |
ठिकाण :- | मुरुड |
जवळचे गांव :– | राजापुरी, मुरूड |
भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ :– | वर्षभर, पावसाळा टाळा |
डोंगररांग :- | नाही |
सद्यस्थिति :- | व्यवस्थीत |
मुंबई पासून अंतर :- | १४६ किलोमीटर |
मुरुड जंजिरा नावाचा अर्थ
“जझीरा” हा अरबी भाषेतील शब्द असून त्याचा अर्थ बेट असा होतो. मूळच्या या अरबी शब्दाचा अपभ्रंश जंजिरा असा झाला असे मानण्यात येते. पूर्वीच्या काळी मुरुडला हबसान असे म्हटले जायचे किल्ल्याचे नाव मुरुड जंजिरा किल्ला असे असून मुरुड हा शब्द कोकणी भाषेतील मोरोड या शब्दावरून आलेला आहे
मुरुड जंजिरा किल्ल्याचा भूगोल
मुरुड जंजिरा हा किल्ला मुंबईच्या दक्षिण बाजूस जवळपास १६० किलोमीटरवर असलेल्या मुरुड शहराजवळ आहे. हा किल्ला अरबी समुद्रात असून अंडाकृती खडकावर बांधलेला आहे. भारतातील सर्वात मजबूत तटीय किल्ल्यांपैकी एक असे जंजिरा किल्ल्याला मानले जाते. राजापुरी जेट्टीवरून बोटीने किल्ल्यापर्यंत प्रवास करता येतो.
मुरुड जंजिरा किल्ला नकाशा
हवामान
- कोकण पट्ट्यात मुख्यतः पावसाळा जरा जास्तच असतो.
येथील पाऊस सुमारे ३००० ते ४५०० मिलिमीटर पर्यंत असतो. - उन्हाळ्यात वातावरण उष्ण आणि दमट असते. उन्हाळ्याच्या दिवसात ३८ अंश सेल्सिअस पर्यंत तापमान पोहोचते.
- हिवाळ्यामध्ये त्या तुलनेने तापमान २५ अंश सेल्सिअस पर्यंत असून वातावरण थंड आणि कोरडे असते
मुरुड जंजिरा किल्ल्याची संरचना
मुरुड जंजिरा किल्ला, रायगड जिल्ह्यातील मुरुड समुद्र किनारपट्टीवर वसलेला आहे ज्याच्या चारही बाजूंनी पाणी आहे. त्याचबरोबर या किल्ल्याच्या आत मध्ये दोन गोड्या पाण्याचे तलाव आहेत.
किल्ल्याचा दिंडी दरवाजाचे तोंड राजापुरी कडे असले तरीही किल्ल्याच्या जवळ गेल्याशिवाय दिंडी दरवाजा दिसत नाही. किल्ल्यातून सुटकेसाठी समुद्राच्या बाजूने एक लहान गेट बांधलेले आहे
दौलताबाद, देवगिरी किल्ला माहिती मराठी
मुरुड जंजिरा किल्ल्याचे बांधकाम
किल्ल्यावर अजूनही वेगवेगळ्या प्रकारच्या तोफा आपल्याला पाहता येतात. या किल्ल्यावर २६ तोफांचे बुरुज आहेत. त्यातील कलाल बांगडी, लांडाकासम व चावरी आजही पाहायला मिळतात. आता थोड्याफार प्रमाणात उध्वस्त झालेला हा किल्ला आहे पूर्वीच्या काळी वेगवेगळ्या सोयीसुविधांनी परिपूर्ण असलेला होता. या किल्ल्यामध्ये बराक, साहेबांची निवासस्थाने, एक छोटी वसाहत, पिण्याच्या पाण्याचे तळे, त्याशिवाय निवासस्थानासाठी छोट्या खोल्या या सर्व सोयी होत्या. किल्ल्याच्या भिंतींचे निरीक्षण केले असता, काही शिल्पे आढळून येतात. त्यात हत्तीची शिकार करताना असलेल्या वाघाचे शिल्प उठून दिसते.
मुरुड जंजिरा किल्ला हा प्रमुख सागरी जलदुर्ग किल्ल्यांपैकी एक आहे. या किल्ल्यावर असलेली तटबंदी आजही भक्कम स्थितीत आणि मजबूत आहे. महाराष्ट्रातील बरेच पर्यटक व इतिहास प्रेमी आवर्जून या किल्ल्याला भेट देण्यासाठी येत असतात.
मुरुड जंजिरा किल्ल्याचा इतिहास
रामराव पाटील आणि मुरुड जंजिरा किल्ला
पूर्वी या बेटावर मेढेकोट बांधत असत म्हणून या बेटाला मेढेकोट बेट म्हटले जायचे. राजा रामराव पाटील हे कोळी समाजाचे प्रमुख होते. त्याचबरोबर ते जंजिरा बेटाची पाटीलकी सांभाळत. पंधराव्या शतकात कोळी समाजाला समुद्री लुटेऱ्यांपासून सांभाळण्यासाठी त्यांनी या बेटावर बांधकाम केले. अहमदनगरच्या सुलताना कडून परवानगी मिळाल्यानंतर त्यांनी हे बांधकाम केले.
रामराव पाटील यांचे मुरुड जंजिरा किल्ला युद्ध
त्यानंतर त्यांनी सुलतानाचा आदेश मानला नाही. त्याचा बदला घेण्यासाठी १४८९ मध्ये सुलतानाने पिराम खान यांच्यातर्फे राजाराम यांच्यावर हल्ला करविला. किल्ल्याची भक्कम तटबंदी असल्यामुळे या किल्ल्यावर हल्ला करणे आणि जिंकणे सहजासहजी शक्य नव्हते. त्यामुळे पिरामखानने स्वतः व्यापारी म्हणून किल्ल्यात प्रवेश घेतला आणि इथे त्यांनी रात्रीचा मुक्काम केला.
त्यावेळी रात्री खानपान आयोजित केल्यानंतर पाटील निद्रिस्त असताना आणि रात्री खानपान झाल्यानंतर सर्व कोळी सैनिक दारूचे पिऊन झोपलेले असताना पिराम खानच्या सैनिकांनी त्यांच्यावर हल्ला केला आणि बेट ताब्यात घेतले.
मराठा इतिहास
शिवाजी महाराज यांचा इतिहास
महाराष्ट्राला लाभलेल्या मोठ्या समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या जलदुर्गांमध्ये रायगड जिल्ह्यातील मुरुड जंजिरा हा एक अभेद्य किल्ला आहे. जंजिराचा अर्थ समुद्राने वेढलेला किल्ला. बांधकाम आणि आजूबाजूला समुद्र याशिवाय मुरुड जंजिराच्या तटावर असलेल्या ५७२ तोफा या साऱ्यांमुळे हा जंजिरा अभेद्य होता. यामध्ये विशेष मोठी आणि लांब पल्ल्याची कलाल बांगडी हि तोफ होती.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात महाराष्ट्राच्या स्वराज्यासाठी हा जंजिरा शेवटपर्यंत अजेय राहिला. जंजिऱ्या चे सिद्धी (janjira fort owner) हे मूळचे दर्यावर्दी, शूर-काटक आणि दणकटही होते. त्यांनी प्राणपणाने जंजिरा लढवला. अनेकांनी जंजिरा जिंकण्याचा प्रयत्न केला खरा पण, ते यशस्वी होऊ शकले नाहीत. छत्रपती शिवाजी राजांनाही जंजिऱ्यावर स्वामित्व मिळविता आले नाही. १९४७ अशी ३३० वर्षे जंजिरा हा अजिंक्य राहिला.
संभाजी महाराज यांचा इतिहास
महाराजांनी तर हा किल्ला हस्तगत करण्यासाठी या किल्ल्या नजीक पाच-सहा किलोमीटर अंतरावर पद्मदुर्ग नावाचा मजबूत किल्ला ही उभारला होता. पण तरीही मुरुडचा जंजिरा जिंकणे महाराजांना काही शक्य होऊ शकले नाही. जलदुर्ग प्रकारातील या किल्ल्याची तटबंदी इतकी विशाल आहे की त्याला सागराकडे दरवाजा आहे, १९ बुलंद बुरुज आहेत आणि दोन बुरूजामधील अंतर जवळपास ९० फुटांपेक्षा जास्त आहे. जंजिरा किल्लाला किल्ले मेहरूप उर्फ किल्ले जंजिरा असेही ओळखलं जातं.
संभाजी राजांची मुरुड जंजिरावर मोहीम
जंजिरा एक अभेद्य किल्ला ज्याला कोणीच कधी जिंकू शकले नाही. पण इतिहासात एक असा प्रसंग आला होता जेव्हा जंजिरा जवळ जवळ निष्ठाभूत झाला होता. ज्याप्रमाणे प्रभू श्री रामचंद्राने लंकेवर स्वारी करण्यासाठी रामसेतू बांधला, त्याप्रमाणे उसळत्या सागरामध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी सेतू बांधला होता. त्यावेळी साताऱ्याची सेना आणि तीनशे गलबते घेऊन राजांनी जंजिऱ्यावर आक्रमण केले.
किनाऱ्यावरून संभाजी महाराजांच्या तोफांचा मारा सुरू झाला. मराठ्यांच्या तोफांचे गोळे किल्ल्यावर पोहोचत होते. यावेळी जंजिऱ्यावर सिद्धी खैरात खान, सिद्धी कासम खान होते. हे ही शंभूराजांना रोखू शकले नाही. आता जंजिरा हातात येणार तेवढ्यातच औरंगजेबाने डाव साधला. त्याला कळून चुकले, की जर जंजिरा मराठ्यांच्या हाती लागला तर समुद्रावर संभाजी राजांची सत्ता येईल. औरंगजेबाने हसन आली नावाच्या सरदाराला स्वराज्यावर चाल करून पाठवले. हसन आली हा औरंगजेबाचा सरदार ४० हजाराची फौज घेऊन कल्याण भिवंडीच्या मार्गे रायगडच्या दिशेने येऊ लागला होता. त्यामुळे जंजिऱ्याची मोहीम अर्धवट ठेवून महाराजांना स्वराज्याच्या रक्षणासाठी रायगडाकडे परत शिरावे लागले.
या घटनेमुळे जंजिरा मराठ्यांच्या हातात आलाच नाही.
मुरुड जंजिरा किल्ल्याचा विडियो
मुरुड जंजिरा किल्ल्याची संपूर्ण माहिती (INFORMATION OF MURUD JANJIRA FORT)
किल्ल्याच्या मध्यभागी असलेला हुकूम सुरुलखानाचा भव्य मोठा वाडा आज भग्न अवस्थेत आहे. किल्ल्यावर पाण्याचे दोन मोठे तलाव आहेत. किल्ल्यामध्ये पूर्वी तीन रहिवासी मोहल्ले होते. यातील दोन मोहल्ले मुसलमानांचे व एक इतरांचा होता. पूर्वी किल्ल्यामध्ये सैनिक, कामगार, खलाशी यांची वस्ती होती. राजाश्रय संपल्यानंतर ते रहिवासी इथून विस्थापित झाले.
जंजिर्याच्या तटबंदीवरुन मुरुड चा विस्तृत प्रदेश दिसतो. यात समुद्रात बांधलेला कासा उर्फ पद्मदुर्ग किल्ला व किनार्यावरील सामराजगड हे किल्ले पण येथून दिसतात. ३३० वर्षे अभेद्य आणि अंजिक्य राहिलेल्या जंजिरा किल्ला पाहताना इतिहासातील अनेक पर्वांचा इतिहास आपल्या नजरेसमोरून तरळून जातो. थोडा या किल्ल्याच्या इतिहासाचा अभ्यास करुन जंजिर्याला भेट दिल्यास ती निश्चितच संस्मरणीय आणि अनोखी ठरेल.’
असा हा अजेय आणि अभेद्य जंजिरा, २० सिद्दी सत्ताधीशांनंतर आलेल्या, सिद्दी मुहमंद खान हा शेवटचा सिद्दी सुलतान असताना व त्या राज्याच्या स्थापनेनंतर ३३० वर्षांनी, म्हणजे ३ एप्रिल १९४८ रोजी भारतीय संघराज्यात विलीन झाला.
मुरुड जंजिरा किल्ल्यावर काय पहावे?
मुरुड जंजिरा अजूनही सुस्थितीत असून इथे इतिहासाच्या अप्रतिम पाऊलखुणा आपल्याला पाहता येतात.
अवाढव्य तोफा
अजूनही बऱ्याच अंशी व्यवस्थित असलेल्या या किल्ल्यावर भारतातील तिसऱ्या क्रमांकाची मोठी आणि 22 टन वजनी तोफ – कलाल बांगडी तोफ, इथे पाहता येते. त्याचबरोबर किल्ल्यावर अजूनही वेगवेगळ्या प्रकारच्या तोफा आपल्याला पाहता येतात. या किल्ल्यावर २६ तोफांचे बुरुज आहेत. त्यातील कलाल बांगडी, लांडाकासम व चावरी आजही पाहायला मिळतात. सिद्दींच्या काळात गडावर जवळपास एकूण ५०० पेक्षा जास्त तोफा होत्या. या तोफा ‘पंचधातू’पासून बनवलेल्या असून उन्हाळ्याच्या दुपारच्या वेळीही या तोफांचे तापमान सामान्य राहते.
गेटवरील शिल्प
किल्ल्याच्या दरवाजा जवळील भिंती पहिल्या असता त्यावर एक वाघाचे अप्रतिम शिल्प नजरेस पडते. या वाघाने हत्ती आपल्या शेपटीत धरलेला असून, त्याच्या पायाखाली ४ हत्ती आणि जाबड्यासामोर एक हत्ती आहे. हा हत्ती इथे राज्य करणाऱ्या राजाचे प्रतीक मानले जाते.
दर्या दरवाजा
जंजिरा किल्ल्याच्या पश्चिमेकडील दरवाजाला दर्या दरवाजा म्हटले जाते. किल्ल्याजवळ गेल्यावरच जंजिरा किल्ल्याचा मुख्य दरवाजा दिसतो परंतु पश्चिमेकडे असलेला दर्या दरवाजा दिसू शकत नाही. गडावर हल्ला करण्याचा प्रयत्न करणार्या लोकांमध्ये संभ्रम निर्माण होतो. गडाच्या पश्चिमेला ‘दर्या दरवाजा’ हे हल्ल्याच्या वेळी गुप्तपणे सुटकेसाठी वापरला जात असे.जंजिरा ते समुद्राखालच्या जवळच्या गावात जाण्यासाठी बोगद्याचा मार्ग असल्याचेही गावकरी मानतात.
गोड्या पाण्याचे तलाव
गडावर दोन नैसर्गिक गोड्या पाण्याचे तलाव असून सध्यातरी यातील पानी पिण्याजोगे नाही. हे तलाव सुमारे ६० फूट खोल असून पूर्वीच्या काली वर्षभर पिण्यायोग्य पाणी मिळायचे.
क्वीन्स पॅलेसचे अवशेष
एका तलावाजवळ पूर्वी राणीचा महाल होता. आज संपूर्णपणे भग्नावस्थेत असलेल्या क्वीन्स पॅलेसवर 7 रंगीत काचेच्या डिझाईन्स होत्या असे स्थानिकांचे म्हणणे आहे. आणि जेव्हा सूर्यप्रकाश काचेवर पडत होता तेव्हा ते तलावाच्या पाण्यावर इंद्रधनुष्य रंगाचे प्रतिबिंब तयार करत होते, असे मानले जाते.
३ मजली दरबार
किल्ल्याच्या मध्यभागी असलेला हुकूम सुरुलखानाचा भव्य मोठा वाडा आज भग्न अवस्थेत आहे. किल्ल्याच्या मध्यभागी आपल्याला किल्ल्यांचे अवशेष आणि तीन मजली दरबार दिसतो. येथून तुम्हाला आजूबाजूचे ३६० डिग्रीचे दृश्य पाहायला मिळते आणि किल्ल्याचे सामरिक महत्त्व लक्षात येते.
मुरुड जंजिरा किल्ल्यावर कधी जावे?
इथे पावसाळ्यापूर्वी येथे भेट देणे सर्वार्थाने सुंदर असते. ऑक्टोबर महिना ते मार्च पर्यंत येथील वातावरण भेट देण्यास अद्युत्कृष्ट आहे.
मुरुड जंजिरा किल्ल्यावर भेट देण्याची वेळ
किल्ला सकाळी सात ते संध्याकाळी सहा पर्यंत पर्यटकांसाठी खुला असतो
बोटीचे वेळापत्रक :-
सकाळी सात ते दुपारी बारा आणि दुपारी दोन ते संध्याकाळी पाच पर्यंत येथे बोटीने जाता येते.
बोटीचे भाडे :-
बोट आकाराप्रमाणे अंदाजे ५० ते ३०० रुपये भाडे आकारले जाते. मुरुड जंजिरा फेरीबोट सकाळी सात ते संध्याकाळी सहा पर्यंत सुरू असते.
प्रवेश शुल्क :-
जंजिरा किल्ल्यावर कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जात नाही. अलिबाग बस स्टेशन पासून किल्ल्याचे अंतरे साधारणतः ५३ किलोमीटर आहे. पार्किंग चार्जेस रुपये तीस ते पन्नास आहेत.
मुख्य शहर ते मुरुड जंजिरा अंतर
- १. मुंबई ते मुरुड जंजिरा पर्यंत साधारणतः १७० किलोमीटर एवढे अंतर आहे.
- २. पुणे ते मुरुड जंजिरा पर्यंत साधारणतः २७० किलोमीटर एवढे अंतर आहे.
मुरुड जंजिराला कसे जाल ?(HOW TO REACH MURUD JANJIRA FORT)
बससेवा :- मुरुड जंजिराला भेट देण्यासाठी तुम्ही बस ऑटो किवा टॅक्सी जाऊ शकता.
रेल्वेसेवा :- कोकण रेल्वे मार्गावर असलेले रोहा रेल्वे स्थानक, हे मुरुडपासून सर्वात जवळचे रेल्वेस्थानक आहे. सुमारे २३ किलोमीटर अंतरावर असलेले रोहा रेल्वे स्थानक, मुंबईच्या विविध रेल्वे स्थानकांशी चांगले जोडलेले आहे. अशा प्रकारे मुरुड हे मुंबईहून रेल्वे मार्गाने खूप चांगले जोडलेले आहे.
विमानसेवा :- सर्वात जवळचे विमानतळ, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. जे मुरुड जंजिरा पासून १४० किमी अंतरावर आहे. जंजिरा किल्ल्यावर मुंबई पासून गाडीने जाण्यासाठी साधारणतः तीन तास लागतात. पुणे येथून जाण्यासाठी साधारणतः चार तास लागतात. ट्रेनने जायचे असल्यास रोहा रेल्वे स्टेशन हे सर्वात जवळचे स्टेशन आहे. आणि हे किल्ल्यापासून साधारणतः ५० किलोमीटर एवढे अंतरावर आहे. विमानाने जायचे असल्यास आपल्याला मुंबईत उतरावे लागते आणि मुंबईहून तीन तास प्रवास करून किल्ल्यावर पोहोचता येते.
आमचे हे लेख सुद्धा वाचा. 👇
मुरुड मधील प्रेक्षणीय स्थळे (Places To Visit Near Murud Janjira Fort)
अ) समुद्रकिनारे
१. अलिबाग समुद्रकिनारा
हा समुद्रकिनारा मुरुड जंजिरा किल्ल्यापासून साधारणतः दोन तासाच्या अंतरावर आहे. येथे पर्यटक वेगवेगळ्या प्रकारच्या वॉटर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी करू शकतात. बॉलीवूड चित्रपटसृष्टीतील खूपसे कलाकार या किनाऱ्यावर बऱ्याच वेळा फिरायला येतात
२. मुरुड समुद्रकिनारा
मुरुड समुद्रकिनारा हा सुंदर आणि आकर्षक समुद्रकिनारा आहे. हा सुंदर समुद्रकिनारा नारळाच्या झाडांनी व सुपारीच्या बागांनी परिपूर्ण आहे. तसेच परदेशी सीगल पक्षांचे दर्शन येते घडून येते. हा महाराष्ट्रातील एक लोकप्रिय समुद्रकिनारा आहे. हे ठिकाण भारतातील अशा ठिकाणांपैकी एक आहे, ज्या ठिकाणी मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. पांढरी शुभ्र चमकणारी वाळू आणि आजूबाजूला असणाऱ्या निसर्ग सौंदर्यामुळे हा बीच प्रसिद्ध आहे.
त्याचबरोबर समुद्रकिनाऱ्यावर असणाऱ्या छोट्या स्टॉल पासून परिपूर्ण सुविधा असणाऱ्या हॉटेल्स आणि रिसॉर्ट यामुळे ओळखले जाते. निळे पाणी, खडक आणि डोंगरांना वेढलेले हे ठिकाण पुणे मुंबई आणि अलिबागच्या सानिध्यात असल्यामुळे, या ठिकाणी वर्षभर मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात.
मुरुड समुद्रकिनाऱ्यावरती तुम्ही वॉटर स्पोर्ट ऍक्टिव्हिटीज करू शकता. बंपर राईड, बनाना राईड, पॅरासेलिंग अशा विविध प्रकारच्या जलक्रीडांचा आनंद घेऊ शकता. त्याच प्रकारे संध्याकाळचा सूर्यास्त सुद्धा तुम्ही मुरुड समुद्रकिनाऱ्यावरून निहाळू शकता. या ठिकाणी पांढरे शुभ्र वाळू व निळा समुद्र यांच्या लाटांमध्ये तुम्ही मनसोक्त खेळून समुद्रावरील हे मनमोहक क्षण साठवून ठेवू शकता.
३. काशिद समुद्रकिनारा
काशीच समुद्रकिनारा हा किल्ल्यापासून साधारणता ४५ किलोमीटर, २५ मिनिटाच्या मिनिटांच्या अंतरावर असून येथील पांढऱ्याशुभ्र वाळूचा किनारा हा अतिशय प्रसिद्ध आहे. सलग तीन किलोमीटर लांबीचा असलेला समुद्रकिनारा उत्तर कोकणातील सर्वात सुंदर समुद्रकिनारा मानला जातो.
ब) धार्मिक
१. दत्तात्रेय मंदिर
एका उंच टेकडीवर असलेले हे मंदिर स्वामी ब्रम्हेंद्र यांनी बांधले आहे. येथे श्री दत्तात्रेयांची त्रिमुखी मूर्ती आहे. अतिशय निवांत आणि रमणीय अक्षय ठिकाणी हे मंदिर असून, या मंदिरास भेट देण्यासाठी दत्त जयंतीला भाविकांची अलोट गर्दी होते.
२ सिद्धिविनायक मंदिर
नांदगाव मधील सिद्धिविनायक मंदिर हे महाराष्ट्राचे रायगड या जिल्ह्यातील नांदगाव या गावांमध्ये स्थित आहे. जंजिरा या बंदरापासून नांदगाव हे गाव ०८ किलोमीटर अंतरावर आहे. सिद्धिविनायक मंदिर हे भगवान गणेशाला समर्पित आहे. जे अतिशय भव्य आणि आकर्षक मंदिर आहे. मुरुड तालुक्यामध्ये पूर्व नंदिग्राम अशी या मंदिराची ओळख आहे. गणेश चतुर्थीला भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी या मंदिरामध्ये आपल्याला पाहायला मिळते.
क) ऐतिहासिक
१. रेवदंडा किल्ला
रेवदंडा किल्ला हा १५२४ साली पोर्तुगीज कॅप्टन यांनी बांधला. हा किल्ला पोर्तुगीज, मराठा आणि ब्रिटिशांनी सांभाळाला. काळाच्या ओघात हा किल्ला बऱ्यापैकी ढासळला असून, इतिहास प्रेमी या किल्ल्याला आवर्जून भेट देतात
२. कुडा लेण्या
कुडा लेण्या महाराष्ट्राच्या रायगड या जिल्ह्यातील कुडा या गावामध्ये स्थित आहेत. मुरुड जवळ असणाऱ्या लेण्या या ठिकाणी असणाऱ्या निसर्ग सौंदर्यामुळे बऱ्याच पर्यटकांना आकर्षित करत असतात. समुद्रकिनाऱ्याजवळ असणाऱ्या एका टेकडीमध्ये २६ कोरीव गुफांचा समूह आहे. कुडाच्या २६ गुहां पैकी एकूण चार चैत्यगृह आहेत. या ठिकाणी येऊन प्राचीन वस्तूकालीन नमुने आपल्याला पाहायला मिळतील. यामुळे बऱ्याच पर्यटकांना आकर्षित करत असतात.
३. अहमदगंज पॅलेस
हे मुरुड या शहरामध्ये असलेले एक सुंदर आणि आकर्षक ठिकाण आहे. हा पॅलेस मुगल आणि कौटिल्य स्थापत्य शैलीच्या मिश्रणात बांधलेला एक सुंदर राजवाडा आहे. एकेकाळी या महालामध्ये रॉयल नवाब राहत होते. यामुळे या राजवड्याला नवाब पॅलेस असेही म्हटले जाते. अहमदगंज पॅलेस हा सुंदर राजवाडा पाहण्यासाठी बरेच पर्यटक येत असतात. मुरुड या बस स्थानकापासून हा पॅलेस ०२ किलोमीटर इतके अंतरावर आहे.
४. खोकरी घुमट
खोकरी घुमट हे ठिकाण मुरुडच्या ऐतिहासिक स्थळांपैकी एक आहे. खोकरी गावांमध्ये आल्यानंतर इस्लामी वास्तुशास्त्राचा प्रभाव असलेल्या तीन भव्य वस्तू आपल्याला पाहायला मिळतात. या वास्तू जंजिरा मधील राजाच्या तीन तत्कालीन शासकांच्या कबरी आहेत. सुमारे साडेतीन वर्षांपूर्वीचे हे शिल्प इतिहास प्रेमासाठी एक आकर्षण केंद्र आहे. मुरुडला भेट देणारे बरेच पर्यटक व इतिहास प्रेमी आवर्जून या ठिकाणाला भेट देण्यासाठी येत असतात. मुरुड शहरापासून हे ठिकाण ०६ किलोमीटर इतके अंतरावर आहे.
५. पद्मदुर्ग किल्ला
महाराष्ट्र राज्यातील, रायगड जिल्ह्यातील मुरुड या गावाजवळील कासा नावाच्या बेटावर पद्मदुर्ग किल्ला वसलेला आहे. जलदुर्ग प्रकारातील या किल्ल्याचे बांधकाम सुमारे 350 वर्षांपूर्वी झालेले आहे. जंजिरा किल्ल्यावर लक्ष ठेवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला बांधला होता. सतत समुद्राच्या लाटा झेलत असूनही आजही हा किल्ला सुस्थितीत पाहायला मिळतो. किल्ल्याला मजबूत तटबंदी असून त्यावर जागोजागी झरोखे आणि तोफा ठेवलेल्या आहेत. समुद्रातून येणारे शत्रू तसेच जंजिराच्या सिद्धी याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी मुख्यत्वे या किल्ल्याची निर्मिती झाली.
हा किल्ला मुरुड जंजिरा या किल्ल्यापासून साधारणतः पाच ते सहा किलोमीटर अंतरावर आहे.छत्रपती संभाजी महाराजांनी जंजिरा किल्ल्यावर स्वारी करण्याच्या वेळी या किल्ल्याची बांधणी केली. हा किनारी दुर्ग, मुरुड किनाऱ्यावर असून, आपल्या जंजिरा भेटीदरम्यान या किल्ल्याला अवश्य भेट द्या.
६. कोरलाई किल्ला
कोरलाई किल्ला हा पंधराशे एकवीस साली पोर्तुगीजांनी एका बेटावर बांधला. या बेटावरून चारही बाजूचा अप्रतिम नजारा दिसतो. आता या किल्ल्याचे अवशेष आपणास पाहायला पाहायला मिळतात. मुरुड जंजिरा किल्ल्यापासून एका तासाच्या अंतरावर हा किल्ला वसलेला आहे. या किल्ल्याच्या पूर्व दिशेला जवळपास ३० किलोमीटर अंतरावर डोंगराच्या माथ्यावर घोसाळगड आहे. पूर्वीच्या राज्यकर्त्यांनी या किल्ल्याचा उपयोग जंजिरा किल्ल्याची चौकी म्हणून केला होता.
ड) इतर
१. गारंबी धरण
गारंबी धरण, मुरुड या ठिकाणचे सर्वात सुंदर आणि आकर्षक ठिकाण आहे. नैसर्गिक रित्या पाणी अडवून बांधलेले धरण म्हणून या धरणाला ओळखले जाते. याच धरणातून संपूर्ण मुरूड या शहराला पाणीपुरवठा केला जातो. या धरणाचा इतिहास पाहिला तर गारंबी धरण हे सिद्धी शेवटचे शासक सिद्धी अहमद खान यांनी बांधले होते. पावसाळ्यामध्ये महाराष्ट्रातील बरेच पर्यटक या धरणाच्या जवळपासच्या परिसरामध्ये निसर्ग संपन्न वातावरणाचा मनसोक्त आनंद घेण्यासाठी येत असतात. मुरुड या शहरापासून गारंबी धरण हे ०७ किलोमीटर इतके अंतरावर आहे.
२. फणसाड अभयारण्य
फणसाड अभयारण्य हे अलीकडच्या सर्वात सुंदर आणि आकर्षक पर्यटन स्थळांपैकी एक आहे. वन्यजीव अभयारण्य पर्यटकांचे एक आवडते ठिकाण बनले आहे. हे अभयारण्य प्रामुख्याने फणसाड प्रकारच्या वन्यजीव प्राण्यांचे संवर्धन क्षेत्र म्हणून ओळखले जाते. अस्वल, बिबट्या, हरीण इत्यादी अनेक प्रकारचे वन्यजीव प्राणी पाहायला मिळतात. हे अभयारण्य साधारणता ७० चौरस किलोमीटर इतक्या क्षेत्रावर विस्तारलेले आहे. हे अभयारण्य मुरुड पासून सुमारे ११ किलोमीटर इतके अंतरावर आहे.
किल्ला बघायला येताना घ्यावयाची काळजी (PRECAUTIONS VISITING MURUD JANJIRA FORT)
- किल्ल्यावरील कोणत्याही वास्तुस हानी होता कामा नये, याची काळजी घ्यावी.
- किल्ला स्वच्छ ठेवावा .
- किल्ल्यावर कचरा, कागद, बॉटल टाकू नये.
किल्ल्याला भेट देते वेळी काही महत्वाच्या टिप्स (TIPS FOR MURUD JANJIRA FORT)
- किल्ल्यावर फिरतवेळी गरज भासल्यास मार्गदर्शक घ्यावा.
- किल्ला बघण्यास अंदाजे दोन ते तीन तास लागतात,म्हणून पाण्याचा मुबलक साठा सोबत ठेवावा.
- योग्य कपडे परिधान करावे.
- जास्त उन असल्यास सनग्लासेस चा वापर करावा.
मुरुड जंजिराला भेट देण्यासाठी उत्तम वेळ (BEST TIME TO VISIT MURUD JANJIRA FORT)
मुरुड जंजिरा येथे जाण्यासाठी सर्वोत्तम हंगाम म्हणजे हिवाळा. तापमान आरामदायक राहते आणि पर्यटनासाठी योग्य आहे. भेट देण्यासाठी सर्वोत्तम महिने ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च आहेत. मुरुड जंजिरा येथे जून महिन्यात पावसाळा सुरू होतो आणि तो सप्टेंबरपर्यंत असतो.
मुरुड जंजिराला भेट देते सोबत घ्यावयाच्या गोष्टी
- प्लास्टिक शीट
- गरम कपडे (स्वेटर मफलर आदी)
- टोपी
- ट्रॅव्हल फूड (ड्रायफ्रूट्स, चिक्की, चॉकलेटस,)
- पाण्याची बॉटल्स
- सनस्क्रीम
- प्रथमोपचार साहित्य
- मुबलक रोख रक्कम
- जैवविघटनशील कचरा पिशवी
आपत्कालीन संपर्क
मुरुड पोलीस स्टेशन –०२१४४२७४०३३
मुरुड जंजिरा मधील प्रसिद्ध हॉटेल्स
- बागडे फार्म हाऊस
- मुरुड मरीना हॉटेल
- ड्रीम बीच हाउस (गोल्डन क्राउन हॉटेल)
- माऊली कॉटेज
- सी ब्रीझ बीच रिसोर्ट – मुरुड
- नंदाई रिसॉर्ट
- सी बीच कॉटेज
- एकविरा हॉटेल
- समुद्र किनारा रिसॉर्ट
- हॉटेल सिल्वर बीच
FAQ
मुरुड जंजिऱ्याबद्दल काय प्रसिद्ध आहे?
स्वच्छ सोनेरी आणि पांढरे वालुकामय समुद्र किनारे. चमचमीत आणि उत्कृष्ट कोकणी जेवण. ऐतिहासिक किल्ला, चित्तथरारक वॉटर स्पोर्ट्स.
मुरुड जंजिरा किल्ला कोणी जिंकला?
एका आख्यायिकेनुसार, १४८९ मध्ये अहमदनगर सम्राज्याने आपला सरदार पिराम खान (इथिओपियन वंशाचा) याने राम पाटील यांच्याकडून मुरुड-जंजिरा किल्ला ताब्यात घेतला.
जंजिरा किल्ल्याचे संस्थापक कोण होते?
मुरुड जंजिरा किल्ल्याची स्थापना ११०० च्या सुरुवातीला करण्यात आली होती आणि हा किल्ला सिद्धी राज्यकर्त्यांनी बांधला होता.
मुरुड समुद्रकिनारा कोठे आहे?
हे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यामध्ये आहे.
मुरुडमध्ये पाहण्यासाठी आणि करण्यासारख्या गोष्टी कोणत्या आहेत?
मुरुड जंजिरा किल्ला हा ऐतिहासिक जलदुर्ग असून मुरुड गावाजवळील बेटावर असलेला हा भारतातील सर्वात मजबूत सागरी किल्ल्यांपैकी एक आहे. दत्तात्रेय मंदिर हे शहरातील सर्वात प्रसिद्ध मंदिर आहे. मुरुड जंजिरा किल्ल्या जवळ मुरुड बीच आहे. खोकरी समाधी आपण पाहू शकतो.
मुरुड जंजिरा किल्ला पाहण्यासाठी किती वेळ लागेल?
सुमारे एक ते दोन तास
निष्कर्ष
मित्रहो आम्ही आमच्या लेखातून मुरुड जंजिरा किल्ल्याबद्दल माहिती दिली आहे. हा लेख तुम्ही नक्की वाचा आणि कमेंट करून आम्हास नक्की कळवा.
धन्यवाद.