कणेरी मठ कोल्हापूर माहिती : KANERI MATH KOLHAPUR INFORMATION IN MARATHI

कणेरी मठ कोल्हापूर माहिती | KANERI MATH KOLHAPUR INFORMATION IN MARATHI – नमस्कार मित्रांनो, आमच्या मराठी झटका डॉट कॉम या वेबपेजवर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत. आम्ही आमच्या या वेब पेज द्वारे नवनवीन प्रकारची माहिती तुमच्या पर्यंत पोहोचविण्याचा एक छोटासा प्रयत्न नेहमीच करत असतो. चला तर मग वेळ न घालवता आपण पाहूया आजचा विषय – कणेरी मठ कोल्हापूर आणि त्याची दर्जेदार माहिती.

Table of Contents

काडसिद्धेश्वर महाराज कणेरी मठ कोल्हापूर (KANERI MATH INFORMATION)

kaneri math kolhapur

महाराष्ट्र राज्याच्या दक्षिण भागातील मोठे शहर म्हणून कोल्हापूर शहराला ओळखले जाते. हे शहर पंचगंगा नदीच्या काठावर वसलेले आणि सह्याद्री पर्वतरांगा सभोवताली असलेले असे शहर आहे. राजकीय शैक्षणिक सामाजिक आर्थिक आणि सांस्कृतिक या सगळ्याच क्षेत्रात कोल्हापूरने घेतलेली ही झेप कौतुक कौतुकास्पद आहे. आधुनिकतेच्या दृष्टीने होणारे नवनवीन बदल स्वीकारून आपल्या सगळ्या परंपरा पुढे नेण्याची कला, कोल्हापूर शहराने अगदी व्यवस्थितपणे सांभाळली आहे.
या कोल्हापूर शहरांमध्ये १२ किलोमीटर अंतरावर कणेरी नावाचे गाव आहे, आणि या कणेरी गावात एक मठ आहे. त्या मठाला कणेरी मठ कोल्हापूर (KANERI MATH KOLHAPUR) म्हणून ओळखले जाते. आज आपण या मठाची सैर करणार आहोत.

सिद्धगिरी मठ कोल्हापूर नकाशा (KANERI MATH KOLHAPUR MAP)

कणेरी मठ कोल्हापूर येथे पाहण्याची ठिकाणे -PLACES TO VISIT IN SIDDHAGIRI MATH KANERI KOLHAPUR

०१) सिद्धगिरी डीव्हाइन गार्डन (SIDDHAGIRI DIVINE GARDEN)

SIDDHAGIRI DIVINE GARDEN

कणेरी मठ मध्ये येणाऱ्या भाविकांना आणि पर्यटकांना आनंद लुटता यावा यासाठी सिद्धगिरी डीव्हाइन गार्डन ची स्थापना करण्यात आली आहे. या गार्डनमध्ये वेगवेगळे विभाग असून तेथे सिद्धगिरी म्युझियम, ग्रामीण जीवन म्युझियम, शिव शंकराचे प्राचीन मंदिर, त्याचबरोबर भारताच्या प्राचीन जीवनशैलीची ओळख करून देणारे शिल्पग्राम बांधण्यात आलेले आहे. लहान मुलांच्या विरंगुळ्यासाठी येथे फोर डी विडियो शो, मिरर मेझ त्याचबरोबर हॉरर शो ही आकर्षणे सुद्धा आहेत.

०२) ग्रामीण जीवन शिल्प ग्राम ( SIDDHAGIRI GRAMJIVAN MUSEUM)

SIDDHAGIRI GRAMJIVAN MUSEUM

ग्रामीण जीवनाची ओळख करून देणारा असा हा कणेरी मठ. या कणेरी मठांमध्ये बारा बलुतेदार पद्धत कशी होती? मोट म्हणजे काय? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे या मठात गेल्यानंतर तुम्हाला मिळतात. प्रचंड मोठे प्रवेशद्वार पार्किंगची प्रशस्त व्यवस्था येथे उपलब्ध आहे. या मठात गेल्यावर प्राण्यांची उभी शिल्पे दृष्टीस पडतात. अगदी मुंग्यांपासून बेडूक, बैल, शेळ्या, मेंढ्या, घोडा यांसारख्या असंख्य प्राणी जिवंत वाटतात.

विहिरीवर पाणी आणवयास जाणाऱ्या स्त्रिया, जात्यावर दळण दळणारी महिला, चर्मकार, कुंभार, लोहार, सुतार, गारुडी, शेतकरी, दरवेशी, तांबट यासारख्या अनेक गोष्टी आपली नजर खेळवून ठेवतात. जिवंत वाटावे इतकी देखणी शिल्प पाहून पुन्हा जुन्या काळात गेल्याचा भास होतो. पाटलाचा वाडा, सावकार, पहिलवान यासारखी शिल्प तसेच त्या काळातली कार्य पद्धती यांची अप्रतिम आणि जीवंत शिल्पे त्या काळात आपल्याला घेऊन जातात.

पंढरीची वारी, उत्सव ही शिल्पे इतकी छान बनवली आहेत कि त्यांचा अविस्मरणीय अनुभव आपल्याला येथे पहावयास मिळतो. प्रत्येक मूर्तीच्या चेहऱ्यावरचे हावभाव इतके अप्रतिम आहेत की खरोखरच या मुर्त्या जिवंत असल्यासारख्या वाटतात. कोणती मूर्ती खरी आणि कोणती खोटी हे हात लावल्याशिवाय विश्वास बसत नाही. कणेरी मठाच्या शेवटी कार्यशाळा आहे. जिथे कारागीर आपल्यासमोर ताजी बांबू कलाकृती भांडी आणि बरेच काही बनवताना पाहू शकतो आणि आपण बनविण्यास शिकूही शकतो.

०३) कणेरी मठ कोल्हापूर गोशाला ( KANERI MATH KOLHAPUR GOSHALA)

KANERI MATH KOLHAPUR GOSHALA

कणेरी मठामध्ये जवळपास ५०० हून जास्त गोवंश आहे. इथे प्रामुख्याने गोवंश संवर्धनाचे कार्य केले जाते. त्याचबरोबर देशी गोवंशाचे पालन आणि वृद्धी याचेही काम इथे होते. इथे एकूण २२ प्रकारच्या देशी गाईंचे संगोपन केले जाते. यामध्ये काही देशी वळू आहे जे ब्रीडिंग साठी वापरले जातात. यातील पुंगनूर जातीच्या गाईचे दूध हे अतिशय दुर्मिळ व पौष्टिक असते. अतिशय काटक अशी ही जात आहे या गाईची किंमत तीन लाख रुपयांपर्यंत असते आणि ही साधारण दिवसाला पाच ते सहा लिटर दूध देते.

०४) कणेरी मठ कोल्हापूर शिव मंदिर ( KANERI MATH SHIVA TEMPLE)

 KANERI MATH SHIVA TEMPLE

श्रीक्षेत्र सिद्धगिरी मठाला प्राचीन परंपरा लाभली आहे. काडसिद्ध संप्रदायाचे मूळ स्थान म्हणजेच कणेरी मठ. सिद्धगिरी क्षेत्र अत्यंत पुरातन, धार्मिक व आध्यात्मिक पीठ आहे. ‘जगद्गुरू काडसिद्धेश्वरांचा मठ’ अशी याची ओळख आहे. नैसर्गिक सौंदर्य असलेल्या कणेरीच्या घनदाट अरण्यात एका शिवपिंडीची स्थापना करण्यात आली. मठाच्या मध्यभागी सिद्धेश्वरांचे देवालय आहे. त्याच्या भोवती समाधी, अडकेश्वर, चक्रेश्वर, रुद्रपाद देवालयेही आहेत. येथील प्रमुख निलगार हे लिंगायत आहेत. जगद्गुरू काडसिद्धेश्वर हे मूळचे हेमांडपंथी शिल्पकलेचे भव्य शिवमंदिर आहे.

त्याच्या आत कोरीव बाजूच्या बाहेरील दोन मंडप आहेत. ह्या मंदिराची बांधणी मोठ्या व कोरीव दगडात केली आहे. तीनशे एकरात पसरलेला हा संस्थान मठ असून पाठीमागे पश्चिमेला उजव्या बाजूस मुप्पिन काडसिद्धेश्वर स्वामी महाराज यांचे समाधिस्थान व गुरुदेव ध्यानमंदिर आहे. मुख्य मंदिरांच्या बाजूस श्री सिद्धरामेश्वर महाराजांची प्रतीकात्मक समाधी असलेला मंडप आहे. बाहेरील बाजूस जलमंदिर आहे.

मागील बाजूस पंचकर्म चिकित्सालय आहे. येथे जुन्या, असाध्य अशा आजारांवर इलाज करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली पंचकर्म पद्धतीने उपचार केले जातात. याच्या शेजारी क्राँक्रीटचे दोन महाकाय हत्ती यात्रेकरूंचे लक्ष वेधून घेतात. पायर्‍या उतरल्यानंतर महाकाय नंदी व पिंडीच्या आकाराच्या छोट्या मंदिरावर 25 फूट उंचीची शंकराची मूर्ती सगळ्यांना आकर्षून घेते. पश्चिमेस भक्तनिवास आहे. तेथेच प्रसादनिलय व अतिथीगृह आहेत.कणेरी मठामध्ये एक पुरातन शिवाचे मंदिर आहे. या मंदिराचे बांधकाम अतिशय सुंदर आहे.

या मंदिरात सोमवती अमावस्या, महाशिवरात्र हे उत्सव साजरे केले जातात. काळ्या दगडांमध्ये बांधलेले हे मंदिर पाहण्यासाठी भाविकांनी इथे जरूर भेट द्यावी.

०५) सिध्दगिरी म्युझियम (KANERI MATH SIDDHAGIRI MUSEUM)

KANERI MATH SIDDHAGIRI MUSEUM

कोल्हापूर शहरातील कणेरी मठाच्या सुमारे दहा एकरावर वसलेल्या या भागात सिद्धगिरी वस्तू संग्रहालय आहे. यामध्ये जिवंत गावपण साकारलेले आहे आणि म्हणूनच या वस्तू संग्रहालयाचा आशिया खंडातील पहिल्या दहा वस्तू संग्रहालयामध्ये समावेश होतो. या वस्तुसंग्रहालयाच्या सुरुवातीला बारा राशींची बारा शिल्पे आहेत, त्यानंतर एका गुहासदृश्य प्रवेशद्वारातून प्रवेश करताच आपल्याला भारताची प्राचीन ऋषि परंपरा पूतळ्यांच्या स्वरूपात पाहावयास मिळते.

प्राचीन भारतातील ऋषी म्हणजेच कपिल मुनी, वेदव्यास, महर्षी कणाद, नारद, चिरकालिक, भगीरथ, पतंजली, सुश्रुत, चरक, जेमिनी, गार्गी, विष्णू शर्मा, जीवक, आर्यभट्ट, नागार्जुन, वाल्मिकी, महर्षी हर्षवर्धन, भरत मुनी, पाणीनी, एकलव्य, शबरी, वराहमीहिर, शूर्पणखा, यशोदा, चाणक्य महर्षि पराशर आणि कश्यप यांच्यासह 32 ऋषीमुनींचे सिमेंट काँक्रेटमध्ये तयार केलेले कोरीव पुतळे आहेत.

ऋषींची नावे त्यांची विद्या आणि त्यांचे योगदान याची सामान्य माणसाला ठाऊक नसलेली माहिती देखील तेथे लिहून ठेवलेली आहे. या गुहेतून बाहेर पडल्यावर गोष्टीरूप कुंभार, चांभार, न्हावी, लोहार, शिंपी, सोनार यासह पिंगळा, वासुदेव यांचीही शिल्पे त्या त्या जीवनशैलीचे दर्शन घडवतात.

ग्रामीण भागात असलेल्या घरांचे विविध नमुने इथे पहावयास मिळतात. म्हणजेच वतनदाराचा वाडा, पाटलाचा वाडा यांच्या हुबेहूब प्रतिमा येथे उभ्या करून ठेवलेल्या आढळतात. तसेच दोन्ही बाजूंना हिरवीगार शेते आणि त्यात काम करणाऱ्या माणसांच्या प्रतिकृती दिसतात. धंद्याची पेरणी करण्यापासून ते अगदी धान्य घरात येईपर्यंतच्या सर्व प्रक्रिया या प्रतिकृतींमध्ये दाखवलेल्या आहेत.

याचबरोबर शेतामध्ये बैल, गाय, म्हशी या जनावरांचा असणारा वावर आणि लगोरी, सूर पारंब्या, लंगडी यांचे प्रत्यक्ष दर्शन या प्रतिकृतींमध्ये जिवंत वाटावे इतक्या बारकाईने टिपलेले आहे.

कणेरी मठात करण्यासारख्या गोष्टी (THINGS TO DO AT KANERI MATH KOLHAPUR)

  • ०१) अद्भुत शिल्पकला (EXPLORING SCULPTURE ART)
  • o२) मुलांसाठी ४D शो (4D PROJECTOR SHOW FOR KIDS)
  • ०३) हॉरर शो (HORROR SHOW)
  • ०४) भूलभुलैया (MIRROR MAZE)
  • ०५) प्राचीन भारत शिल्प ग्राम (ANCIENT INDIA SCULPTURE TOUR)

कणेरी मठ कोल्हापूर माहिती : KANERI MATH KOLHAPUR INFORMATION IN MARATHI

सिद्धगिरी म्य़ुझियमच्या सुरुवातीला बारा राशींची बारा शिल्पे आहेत. त्यानंतर एका गुहेसदृश भागातून आत जाताच प्राचीन भारतातील ऋषिमुनींचे कोरीव पुतळे बनवले आहेत. ऋषींची नावे, त्यांची विद्या आणि त्यांचे योगदान याची सामान्य माणसाला ठाऊक नसलेली माहिती तेथे लिहिली आहे.

या गुहेतून बाहेर पडल्यावर दोन्ही बाजूला हिरवीगार शेते आणि त्यांत काम करणारया माणसांच्या प्रतिकृती दिसतात. धान्याची पेरणी करण्यापासून ते धान्य घरात येईपर्यंतच्या सर्व प्रक्रिया या प्रतिकृतींमधून दाखवण्यात आल्या आहेत. याच बरोबर शेतामध्ये बैल, गाय, म्हशी या जनावरांचा असणारा वावर, लगोरी, सूरपारंब्या, लंगडी यांचे प्रत्यक्ष दर्शन या प्रतिकृतींमध्ये जिवंत वाटाव्या इतक्या बारकाईने टिपल्या गेल्या आहेत.

बारा बलुतेदार ही समाजव्यवस्था खेड्यांमधून आज लुप्त होत चालली आहे. बलुतेदारी म्हणजे काय आणि त्यावर चालणारा उदरनिर्वाह याची ओळख करून देणारी शिल्पे येथे पहावयास मिळतात. कोष्टी, कुंभार, चांभार, न्हावी, लोहार, शिंपी, सोनार यांसह पिंगळा, वासुदेव यांचीही शिल्पेही त्या-त्या जीवनशैलीचे दर्शन घडवतात. ग्रामीण भागांत असलेल्या घरांचे विविध नमुने येथे पहावयास मिळतात.

ग्रामीण जीवन दर्शन (VILLAGE LIFE EXPLORATION)

कणेरी मठात जवळपास ५० हून अधिक उत्पादनांची निर्मिती केली जाते. आणि या उत्पादनांच्या विक्रीसाठी मुंबई, पुणे यासारख्या अनेक शहरात शाखाही निर्माण केल्या आहेत. भारतीय वंशातील देशी गाईंचा समावेश असलेल्या या मठात जवळपास ४० गोशाळा आहे. या गोशाळेतून सुमारे सातशे ते हजार गाईंचे पालन केले जाते या गाईंपासून मिळणारे दूध, दही, तूप, शेण आणि गोमूत्र यापासून विविध पदार्थ या मठा तयार केले जातात.

देशी गायीचे दूध जवळपास सत्तर ते ऐशी रुपये लिटर तर तूप चारशे ते पाचशे रुपयांच्या आसपास किलोने विकले जाते. देशी गाईंचे शेणखत आणि गांडूळ खत हे मठा चे वैशिष्ट्य आहे. तसेच या गाईंपासून मिळणाऱ्या गोमूत्रापासून आरोग्य संदर्भात वेगवेगळे औषधे तयार केली जातात. तेथील शेतकरी कुटुंबातील महिलांसाठी सिद्धगिरी महिला बचत गटाची स्थापना करण्यात आलेली आहे. यांच्यातर्फे वीस ते पंचवीस प्रकारचे पापड आठ ते दहा प्रकारच्या चटण्यांचे उत्पादन आणि विक्री केली जाते.

KANERI MATH SIDDHAGIRI MUSEUM

मठाधिपती कणेरी मठ कोल्हापूर (ADHIPATI OF KANERI MATH KOLHAPUR)


श्री क्षेत्र सिद्धगिरी मठाला मठाधिपतींची शेकडो वर्षांची परंपरा आहे. या मठामध्ये आतापर्यंत ४८ मठाधिपती झालेले आहेत. काडसिद्धेश्वर महाराज हे सध्याचे ४९ वे मठाधिपती आहेत. यांचा जन्म १९६४ मध्ये विजापूर जिल्ह्यातील एका गावात झाला. ते उच्च विद्याविभूषित असून १९८९ मध्ये सिद्धगिरी मठचे अधिपती झाले. त्यांच्या अथक प्रयत्नांनी या मठाचा विविध क्षेत्रात कायापालट झालेला दिसून येतो.

काडसिद्धेश्वर स्वामी कणेरी मठ – Kadsiddheshwar Maharaj Kaneri Math

त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज पर्यंत ५० च्या वर ग्रंथ आणि विविध पुस्तके प्रकाशित करण्यात आली आहेत. आज पर्यंत सर्व मठाधिपतींनी केलेल्या कार्यात काडसिद्धेश्वर स्वामींनी केलेले कार्य अपार आहे व अजूनही ते करत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी, आरोग्य, गुरुकुल, विद्यालय आणि विविध प्रकारचे मदत कार्य अशा, एक ना अनेक क्षेत्रांमध्ये या मठाची प्रगती झालेली आपल्यास दिसून येते.

ग्रामीण रोजगार (RURAL EMPLOYMENT AT KANERI MATH KOLHAPUR)

KANERI MATH KOLHAPUR


पूर्वीच्या काळी बहुतांशी गावे ही आपल्या दैनंदिन जीवनात लागणाऱ्या खाण्यापिण्याच्या गोष्टींसाठी स्वावलंबी होती. परंतु जशी लोकसंख्या वाढत गेली, तसतसा आयात निर्यातीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल होऊ लागला. स्वतः पिकवण्यापेक्षा, विकत घेण्याची मानसिकता निर्माण झाली त्यामुळे गावातील लोकांच्या उत्पन्नावर मर्यादा येऊ लागल्या.

हे सगळे लक्षात घेऊन कणेरी मठातील श्री सिद्धगिरी महासंस्थांनी स्वावलंबी ग्राम योजना राबवण्याचा निर्णय घेतला. मठाधीपती श्री काडसिद्धेश्वर स्वामी यांच्या संकल्पनेतून ही योजना सुरू करण्यात आली. त्याचाच एक भाग म्हणून परिसरातील आजूबाजूच्या शंभर गावांची यादी करून त्या त्या गावातील सरपंच, ग्रामसेवक यांच्याशी चर्चा करून त्यांची एक टीम तयार करण्यात आली.

या योजनेप्रमाणे दैनंदिन जीवनात लागणाऱ्या वस्तू या १०० गावातच उत्पादित केल्या जातील. म्हणजेच धान्य, भाजीपाला इत्यादी. तसेच शेती आणि गुरे वगैरे पाळली गेल्यामुळे गुरांपासून मिळणाऱ्या शेणामुळे एलपीजी गॅस पेक्षा गोबर गॅस निर्माण होतील. तसेच स्थानिक लोकांना लागणाऱ्या वस्तू त्याच गावात मिळतील. त्या उत्तम दर्जाच्या आणि कमी भावात उपलब्ध होतील आणि त्या गावातील युवकांना रोजगार, महिलांना उद्योग आणि गावातील बचत गटांना काम मिळाल्या मुळे हे गाव पुन्हा स्वावलंबी होईल, याची या योजनेतून काळजी घेतली जाते.

कणेरी मठ कोल्हापूर कडे कसे जायचे? (HOW TO REACH KANERI MATH KOLHAPUR)

  • कोल्हापूर शहरातून बसने साधारण अर्ध्या तासाच्या अंतरावर कणेरी मठ आहे
    बसने सिद्धगिरी म्युझियम बस स्टॉप येथे उतरून जाता येते
  • कोल्हापूर बस स्थानक ते कणेरी मठ यामध्ये साधारण १३ किलोमीटरचे अंतर आहे.
  • तसेच तेथे जाणारे प्रवासी आपल्या खाजगी गाडीने सुद्धा जाऊ शकतात.
  • कोल्हापूर विमानतळावरून सात किलोमीटरच्या अंतरावर हा कणेरी मठ आहे.
  • कोल्हापूर रेल्वे स्टेशन ते कणेरी मठ साधारणता १४ किलोमीटर म्हणजेच अर्धा तासाचे अंतर आहे.
  • म्हणजेच कोल्हापूर शहरातील कणेरी मठामध्ये जाण्यासाठी आपण विमानतळ, ट्रेन, खाजगी गाडी, बस यापैकी कुठल्याही मार्गाने आपण कणेरी मठापर्यंत पोहोचू शकतो.
KANERI MATH KOLHAPUR

कणेरी मठ तिकीट दर (ENTRY FEES TO VISIT KANERI MATH)

कणेरी मठात जाण्यासाठी मुलांना पन्नास रुपये आणि प्रौढ व्यक्तींसाठी शंभर रुपयांचे तिकीट दर आहेत.

कणेरी संग्रहालय आणि मठात जाण्याची वेळ (TIME TO VISIT KANERI MATH)

कणेरी मठ हा बाराही महिने चालू असतो या मठात जाण्याचा वेळ हा सकाळी नऊ पासून संध्याकाळी सहा पर्यंतचा दिलेला आहे.

कणेरी मठाचे कार्य (SOCIAL WORK BY KANERI MATH KOLHAPUR)

आरोग्य सुविधा (HEALTHCARE AT KANERI MATH KOLHAPUR)

कणेरी मठाने आरोग्य क्षेत्रातही आपले मोठे योगदान दिलेले आहे. जवळपास अडीचशे खाटांचे सर्व सुविधांनी युक्त असलेले असे भव्य हॉस्पिटल व पन्नास खाटांचे नामांकित आयुर्वेदिक आरोग्यधाम बांधण्यात आलेले आहे. सिद्धगिरी धर्मादाय हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर मठाच्या अधिपत्याखाली चालते गेल्या दहा वर्षापासून गरिबांना अल्पदरात उपचार देण्यासाठी या हॉस्पिटलमध्ये तरुण आणि तज्ञ डॉक्टर कार्यरत आहेत.

न्यूरो विभाग हृदयरोग विभाग यासाठी माझी महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या प्रयत्नाने जवळपास साडेतीन कोटी रुपयांची अद्ययावत यंत्रणा हॉस्पिटल साठी मिळवून दिलेली आहे. भविष्यात या ठिकाणी अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया सुद्धा करण्यात येतील. सध्या बायपास साठी अँजिओग्राफी ही मोफत केली जाते.

आमचे हे लेख सुद्धा वाचाश्री महालक्ष्मी – कोल्हापूर

कणेरी मठ कोल्हापूर कृषी सुविधा (FARMING AT KANERI MATH KOLHAPUR)

या मठात नैसर्गिक पद्धतीने केली जाणारी शेती आणि सेंद्रिय उत्पादने घेण्यासाठी मठाकडून शेतकऱ्यांना खास कृषी विज्ञान केंद्राची स्थापना करण्यात आली आहे धान्य फळे भाजीपाला या शेतमालासाठी हमीभाव देणारी बाजारपेठ या मठाकडून तयार करण्यात आली आहे या जवळपास शंभर ते दीडशे एकरात शेती प्रयोग केले जातात भविष्यात ते हजार एकरापर्यंत जाईल अशी आशा आहे.

कणेरी मठ कोल्हापूर पर्यटन (TOURISM AT KANERI MATH KOLHAPUR)

या मठामध्ये फोर डी विडियो सारख्या टेक्नॉलॉजीच्या शॉर्ट फिल्म आणि हॉरर हाऊस सारखे आधुनिक शोध देखील आहेत. या ठिकाणी वेगवेगळे आरसे आहेत ज्यामध्ये आपण मजेशीर प्रतिबिंब पाहू शकतो. असे हे हॉल ऑफ मिरर पाहण्यासाठी अवश्य जावे. या वस्तू संग्रहालयामध्ये छोटी खाण्यायोग्य पदार्थांची तसेच पुस्तकांची छोटी छोटी दुकाने देखील आढळतात. या ठिकाणी असणारी स्वच्छतागृहे अतिशय स्वच्छ आहेत.

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना विविध ठिकाणी कचराकुंड्या आहेत. या मठामध्ये असणारे रस्ते हे स्वच्छ आणि मोठे आहेत. इथे असलेल्या या शिल्प ग्राम मध्ये अनेक ऋषीमुनींचे पुतळे आणि त्यांची माहिती आपल्यास आढळून येते.

KANERI MATH KOLHAPUR

गुरुकुल शिक्षण व्यवस्था (GURUKUL AT KANERI MATH KOLHAPUR)

या मठात गुरुकुल पद्धत राबवली जाते. म्हणजेच चौदा विद्या, चार वेद, सहा शास्त्रीय आणि 64 प्रकारच्या कला शिकवणाऱ्या या मठातील गुरुकुल विद्यालयात प्रवेश घेण्यासाठी महाराष्ट्र कर्नाटक गोवा राज्यातून व अगदी परदेशातून सुद्धा अर्ज येतात. सात ते दहा वयोगटातील शंभर जणांना मोफत प्रवेश घेऊन त्यांना देशातील दीडशे आधुनिक व पारंपारिक प्रकारचे शिक्षण येथे देण्यात येते.

या विद्यालयात बारा वर्षानंतर स्वयंपूर्ण होऊन बाहेर पडणाऱ्यांसाठी एकाच विषयात पीएचडी करण्यासाठी स्वतंत्र विद्यापीठही तयार केली आहे. जेणेकरून या मठातील गुरुकुल विद्यालयातून बाहेर पडणारा प्रत्येक जण स्वयंपूर्ण आणि स्वयं सिद्ध बनणार असून उपजीविकेसाठी कोणापुढेही हात पसरणार नाही. तसेच इंजिनीयर, उद्योजक, व्यावसायिक, शिल्पकार, संगीतकार, पाकशास्त्र, ज्योतिषशास्त्र, हवामानशास्त्र, हॉर्स व बून रायडींग, इतिहास, श्लोक पाठांतर, शिल्प, कला, मॅनेजमेंट, नॅचरल सायन्स, वैदिक गणित, ब्युटी पार्लर, प्रशासन या प्रकारचे कौशल्य शिक्षण सुद्धा दिले जाते.

हे सर्व शिकवताना संस्कृतला, मातृभाषेला आश्रम भाषेला व राष्ट्रभाषेला आणि शेवटी इंग्लिश भाषेला सुद्धा महत्त्व दिले जाते. तसेच या गुरुकुल विद्यालयात संगणकाचे सुद्धा अत्याधुनिक शिक्षण दिले जाते.

सामाजिक कार्य (SOCIAL WORK AT KANERI MATH KOLHAPUR)

कणेरी मठ हा जसा पर्यटनासाठी तसेच आरोग्य संस्कृती या क्षेत्रामध्ये जसा अग्रगण्य आहे, त्याचप्रमाणे लोकांच्या मदतीसाठी देखील सदैव तत्पर असतो. भूकंप, महापूर,, दुष्काळ, अशा अनेक नैसर्गिक आपत्ती मुळे ग्रस्त असणाऱ्या लोकांसाठी सिद्धगिरी मठतर्फे जीवनावश्यक वस्तूंची तसेच वैद्यकीय सेवेची तात्काळ मदत केली जाते.

ज्यावेळी कोरोनाचे तांडव संपूर्ण जगामध्ये सुरू होते, त्यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील कणेरी येथील श्री क्षेत्र सिद्धगिरी मठाने हजारो लोकांना जेवण अन्नधान्य, उपचार अशी मदत करून तेथील लोकांना दिलासा दिला आहे. कोणत्याही संकटाच्या वेळी लोकांच्या हाकेला साथ देणारा असा हा मठ म्हणून या मठाची ख्याती आहे. लोकांच्या सेवेसाठी सुमारे दीडशेहून अधिक स्वयंसेवकांची तुकडी या मदत कार्यात आढळून सदैव सक्रिय असते.

या कोरोनाच्या काळात मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये जवळपास तीन महिने बऱ्याच कुटुंबांना तांदूळ, रवा, मीठ, डाळ, साखर, तेल यापासून ते अगदी माचिस बॉक्स पर्यंतचे किट ची मदत पोहोचवण्यात आली.
वादळग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी या मठाने गवंडी, लोहार, सुतार, प्लंबर, वेल्डिंग करणारे, इलेक्ट्रिशियन यांचा समावेश असलेल्या लोकांबरोबर घरबांधणी दुरुस्तीसाठी विटा -सिमेंट -पत्रे- वाळू -लोखंडी- खडी इत्यादि सामग्री पोचवली.

भविष्यातील संकल्पना

पंचवीस ते तीस कलाकारांच्या माध्यमातून आणि तीन एलसीडी स्क्रीनच्या मदतीने कणेरी मठातील लाईव्ह शोच्या माध्यमातून आपल्या स्वातंत्र्यसैनिकांचे शौर्य पर्यटकांना इथे दाखवले जाणार आहे. स्वातंत्र्यसैनिकांचा दैदीप्यमान इतिहास नव्या पिढीला कळावा आणि त्याचबरोबर जुन्या पिढीलाही त्याची सविस्तर माहिती व्हावी यासाठी एक हजार आसनक्षमता असलेले भव्य नाट्यगृह उभारण्यात आले आहे.

इतिहास समीक्षा आणि सादरीकरण करणाऱ्या नाट्यगृहाला ‘प्रेरणा पार्क’ असे नाव देण्यात आले आहे. आपल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या कार्याचा गौरव करणारे हे देशातील एकमेव उद्यान असेल असा दावा सिद्धगिरी मठाच्या व्यवस्थापनाने केला आहे.

KANERI MATH KOLHAPUR

KANERI MATH MAHITI – FAQ

कणेरी मठ येथे जाण्यासाठी किती फी आहे?

लहान मुले: पन्नास रुपये
प्रौढ व्यक्ती: शंभर रुपये

कणेरी मठ कशासाठी प्रसिद्ध आहे?

कणेरी मठात असलेले शिव मंदिर त्याच बरोबर इथे असलेले विविध प्रकारचे पुतळे, तेथील ऋषीमुनींचे पुतळे, ग्रामीण जीवनशैली आणि गोशाळा ही सर्वच या मठातील प्रसिद्ध ठिकाणे आहेत.

संपूर्ण कणेरी मठ फिरण्यासाठी किती वेळ लागतो?

संपूर्ण कणेरी मठ परिसर पाहण्यासाठी साधारणतः तीन ते चार तास लागतात.

कणेरी मठ कधी खुला असतो?

कणेरी मठ बाराही महिने चालू असतो. पर्यटकांना हा मठ पाहण्यासाठी आणि फिरण्यासाठी सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा पर्यंतचा वेळ दिलेला आहे.

कणेरी मठाच्या आजूबाजूला कोणती हॉटेल्स आहेत?

श्री एक्झिक्युटिव्ह लॉजिंग आणि हॉटेल
हॉटेल पार्क ट्री कोल्हापूर
हॉटेल रवीकरण फॅमिली रेस्टॉरंट अँड लॉजिंग
स्पॉट ओन सोहम हॉटेल अँड लॉजिंग

कणेरी मठाच्या आजूबाजूला काय टुरिस्ट आकर्षणे आहेत?

महालक्ष्मी मंदिर
टेंबला देवी मंदिर
भवानी मंडप कोल्हापूर
रंकाळा तलाव
न्यू पॅलेस संग्रहालय
ज्योतिबा मंदिर
विशाळगड
कोल्हापूर वॉटर पार्क
शालिनी पॅलेस
दाजीपूर

निष्कर्ष

कणेरी मठाची संपूर्ण माहिती (KANERI MATH KOLHAPUR INFORMATION IN MARATHI) या लेखाद्वारे देण्याचा आम्ही एक छोटासा प्रयत्न केलेला आहे. आमचा हा लेख तुम्हाला कसा वाटला? तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. काही चुका असतील तर त्याही आम्हाला कळवा, आम्ही त्या सुधारण्याचा नक्की प्रयत्न करू. पुन्हा भेटू अशाच नवनवीन माहिती द्वारे.धन्यवाद .

Leave a comment