श्री मुरुडेश्वर मंदिर संपूर्ण माहिती – MURUDESHWAR TEMPLE INFORMATION IN MARATHI LANGUAGE

MURUDESHWAR TEMPLE INFORMATION IN MARATHI LANGUAGE | श्री मुरुडेश्वर मंदिर संपूर्ण माहिती – मुर्डेश्वर मंदिर हे कर्नाटक राज्यामध्ये भटकल तालुक्यातील प्रसिद्ध शिवमंदिर आहे. हे संपूर्ण जगातील सर्वात उंच असलेले दुसरे मंदिर आणि भारतातील पहिले मंदिर आहे. या मंदिराची उंची १२३ फूट आहे. या मंदिराची उंची खूप असल्यामुळे आपण हे मंदिर लांबून सुद्धा व्यवस्थित पाहू शकतो.

Table of Contents

MURUDESHWAR TEMPLE INFORMATION IN MARATHI LANGUAGE | श्री मुरुडेश्वर मंदिर संपूर्ण माहिती

नाव –मुरुडेश्वर मंदिर, मुर्डेश्वर मंदिर
स्थान –भगवान श्री शंकर
राज्य –कर्नाटक
तालुका –भटकल
जीर्णोद्धार –राम नागप्‍पा शेट्टी
मूर्तीची उंची –१२३ फूट
भाषा –कन्नड

मुरुडेश्वर मंदिराचा इतिहास

MURUDESHWAR TEMPLE INFORMATION IN MARATHI LANGUAGE

रामायणात मुरुडेश्वरचा उल्लेख आढळतो. हिंदू देवी देवता आत्मलिंगाची आराधना करीत. त्यामुळे त्यांना अमरत्व प्राप्त झाले होते. लंकेचा राजा रावण याने शिवतपस्या करून आत्मलिंगाची प्राप्ती केली. त्यानंतर काही कारणास्तव त्याला हे आत्मलिंग धरणीवर ठेवावे लागले. त्याने पुनः ते नेण्याचा प्रयत्न केला पण हा प्रयत्न निष्फल ठरला. हे आत्मलिंग मुरुडेश्वर स्थापन झाल्याची भाविकांची श्रद्धा आहे.

कर्नाटक राज्यामध्ये भटकल तालुक्यातील एका शहरामध्ये असलेल्या या मंदिराला तिन्ही बाजूंनी अरबी समुद्राने घेरलेले आहे. काही इतिहासकारांच्या मते, हे रामायण काळापासूनचे एक पौराणिक धार्मिक स्थळ आहे. येथे असलेली शंकराची मूर्ती बनविण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागला असे सांगितले जाते.

MURUDESHWAR TEMPLE INFORMATION IN MARATHI LANGUAGE

मुरुडेश्वर मंदिर कोठे आहे?

मुरुडेश्वर हे अरबी समुद्राच्या किना-यावर वसलेले आहे आणि मंगळुरुपासून १६५ किलोमीटर अंतरावर अरबी समुद्राच्या काठावर अतिशय सुंदर आणि शांत ठिकाणी वसलेले आहे . मुरुडेश्वर बीच हा कर्नाटकातील सर्वात सुंदर समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहे. पर्यटकांना येथे येणे फायदेशीर आहे, एकीकडे त्यांना हे धार्मिक स्थळ बघायला मिळते, तर दुसरीकडे निसर्गसौंदर्याचा आनंदही लुटायला मिळतो. मुरुडेश्वर हे मंगळुरू-मुंबई रेल्वे मार्गावर असलेले रेल्वे स्थानक देखील आहे. मुरुडेश्वर मंदिर परिसराच्या मागे एक किल्ला आहे जो विजयनगर साम्राज्याच्या काळातील आहे.

मुरुडेश्वर मंदिर नकाशा

मुर्डेश्वर मंदिराची निर्मिती

कर्नाटक राज्यातील भटकल तालुक्यातील एका शहरामध्ये असलेल्या या मुरुडेश्वराच्या मंदिराची निर्मिती एक व्यावसायिक, परोपकारी व्यक्ती राम नागप्‍पा शेट्टीने केली असे सांगितले जाते.

या सौंदर्याकडे पर्यटकांना आकर्षित करणारी एकमेव गोष्ट भगवान शिवाची तेजस्वी मूर्ती नाही. किचकट कोरीव कामांपासून ते देव-देवतांच्या बारकाईने तयार केलेल्या मूर्तींपर्यंत, या मंदिरातील प्रत्येक गोष्ट सौंदर्य दर्शवते. 

हे सुंदर मंदिर बनवण्यासाठी 200 हून अधिक कुशल कारागीर लागले. हे मंदिर शिवमोग्गाच्या काशिनाथने बांधले होते आणि परोपकारी व्यापारी रामा नागप्पा शेट्टी यांनी ते सुरू केले होते. त्याच्या बांधकामासाठी सुमारे 50 दशलक्ष रुपये खर्च करण्यात आले. 

या मंदिराचा सर्वात मनोरंजक पैलू म्हणजे मूर्तीची रचना अशा प्रकारे केली गेली आहे की ती त्यावर पडणाऱ्या किरणांना परावर्तित करते आणि त्यामुळे मूर्तीचा वरचा भाग सुंदरपणे चमकतो. हे खरोखरच पाहण्यासारखे दृश्य आहे.

मुरुडेश्वर मंदिराची वास्तुकला

मुरुडेश्वर मंदिराच्या वास्तुकले बाबत बोलायचे झाल्यास या मंदिराचे जे मुख्य प्रवेशद्वार आहे त्याला गोपूर असे म्हणतात. या मंदिराचे गर्भगृह सोडल्यास बाकी मंदिराचे आधुनिकीकरण झालेली आहे हे मंदिर एका चौकोनी आकारामध्ये बांधण्यात आलेले आहे. ज्यामध्ये लांबच्या लांब आणि छोटे शिखर आहेत.

मंदिरामध्ये रामायण आणि महाभारताच्या काही दृश्यांना उजाळा देणाऱ्या मूर्ती आपण बघू शकतो. यामध्ये सूर्य, रथ, अर्जुन, आणि भगवान कृष्ण आहेत. या मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारा जवळ दोन मोठ मोठ्या हत्तींच्या मूर्ती दिसतात. या मंदिराची डागडुजी हल्लीच करण्यात आलेली आहे. या मंदिराची मुख्य देवता श्री मृदेसा लिंग आहे जी मूळ आत्मलिंगाचा एक भाग असल्याचे मानले जाते. येथील ही शिवप्रतिमा इतकी प्रभावी आहे की तुम्हाला या ठिकाणी गेल्यावर शांततेची भावना देते.

murudeshwar temple information in marathi

मुरुडेश्वर मंदिराची वैशिष्ट्ये

शंकराची मूर्ती ही जवळपास १२३ फूट उंच आहे

मुरुडेश्वर मंदिरामध्ये असलेली भगवान शंकराची मूर्ती ही जवळपास १२३ फूट उंच आहे. जगातील सर्वात उंच असलेल्या शंकराच्या मंदिरांपैकी हे दुसऱ्या स्थानावर आहे तर भारतातील हे पहिले असे सर्वात उंच असलेले मंदिर आहे. या मूर्तीला अशा प्रकारे बनवले गेले आहे की दिवसभर सूर्याची किरणे या मूर्तीवर पडत राहतील. ज्यामुळे ही मूर्ती कायम चमकत राहील. तसेच या मूर्तीला उंची असल्यामुळे ही मूर्ती लांबून सुद्धा आपल्याला पाहता येते. हेच या मंदिराचे वैशिष्ट्य आहे.

मुरुडेश्वर राजगोपुरम् चे विहंगम दृश्य

या मंदिरातील आणखी एक प्रमुख आकर्षण म्हणजे त्याचे भव्य राजगोपुरम्. तसेच, टॉवर्सचा राजा म्हणून ओळखल्या जाणार्‍या या टॉवरला 20 मजले आहेत. आता या बुरुजाच्या सौंदर्याचे नुसते कौतुक करणे पुरेसे नाही. तुम्ही तिथे असताना, तुम्ही टॉवरच्या शिखरावर चढून अरबी समुद्राच्या चित्तथरारक दृश्यांचा आणि भव्य पुतळ्याचाही आनंद घेऊ शकता! तुम्हाला किती पायऱ्या चढायच्या आहेत याचा विचार करत असाल तर, लिफ्टही आहे म्हणून घाबरू नका.

मुरुडेश्वर येथील अद्वितीय शिवलिंग

तुमच्यापैकी बर्‍याच जणांना माहित नसेल पण प्रत्येक शिवमंदिरात तुम्हाला दिसणारे शिवलिंग हे पुरुषत्व आणि ब्रह्मांडाच्या निर्मितीत गेलेली शक्ती दर्शवते. साधारणपणे शिवलिंग एका संपूर्ण खडकात कोरलेले असते. तथापि, मुरुडेश्वर येथील शिवलिंग पोकळ असून ते आत्मा (आत्मा) लिंग असल्याचे दर्शवते. जगात अशी शिवलिंगे फार कमी आहेत. या पोकळ लिंगाचे महत्त्व रामायण काळापासून आहे.

मुरुडेश्वर मंदिरातील उत्सव

कार्तिक पौर्णिमा

कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेला शिवाने तीन राक्षस नगरांचा नाश केला होता. तसेच काहींच्या मते, शिवपुत्र कार्तिकेयचा याच दिवशी जन्म झाला होता, असे मत आहे. त्यामुळे या ठिकाणी कार्तिक पौर्णिमा मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते.

murudeshwar temple infomration in marathi

महाशिवरात्री

हा उत्सव फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यामध्ये असतो. देवी पार्वती सोबत भगवान शंकराच्या विवाहाचा हा दिवस आहे. तसेच काही पौराणिक ग्रंथांमध्ये अमृत मंथनादरम्यान भगवान शंकराने विष शोषून घेतलेला हा दिवस आहे असे सांगितले जाते. म्हणून या दिवशी या ठिकाणी महाशिवरात्री मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते.

मुरुडेश्वर मंदिरातील उपक्रम

मुरुडेश्वराचे हे मंदिर महादेवाचे, भगवान शंकराचे असून हे एक प्राचीन मंदिर आहे या मंदिरामध्ये महाशिवरात्रीच्या यात्रेला संपूर्ण भारतभरातून भाविक येत असतात. त्यादिवशी हा सोहळा डोळ्याचे पारणे फेडणारा असा साजरा केला जातो. श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी येथे पूजा – अर्चना, रुद्राभिषेक केले जातात.

दरवर्षी साजरा होणाऱ्या महाशिवरात्रीच्या यात्रेला या ठिकाणी बैलजोडीची शर्यत पहायला मिळते. वर्षभर वाट पाहणाऱ्या शर्यत प्रेमी याची जय्यत तयारी करत असतात. या स्पर्धेत भाग घेणारे बैल सुद्धा जीवाची बाजी लावून शर्यती धावत असतात. हे पाहण्यासाठी जमलेले शेतकरी तसेच बैल प्रेमी आणि मंदिरात दर्शनासाठी आलेले भावीक, पर्यटक यांच्या गर्दीने या सोहळ्याला चार चांद लागले जातात. या वार्षिक सोहळ्याची आणखी एक गंमत म्हणजे लोककलेचा अतिशय प्राचीन असा प्रकार म्हणजे तमाशा.

या दिवशी या ठिकाणी संपूर्ण भाविक वर्ग मनोरंजनासाठी आवर्जून पसंती देतात. या तमाशा मध्ये काम करणाऱ्या तमाशा कलाकारांची मेहनत सुद्धा अफाट असते. दर बारा वर्षांनी घडणाऱ्या कुंभमेळ्याच्या धर्तीवर या ठिकाणी महायज्ञ आणि हरिनाम सप्ताह संपूर्ण पंचक्रोशी मध्ये भक्तीचे वातावरण निर्माण करत असतो. प्रत्येक भक्तांनी हा विलक्षण सोहळा पाहण्यासाठी या प्राचीन मंदीराला नक्कीच भेट द्यावी जेणेकरून पृथ्वीवरील स्वर्गाची आपणास प्रचिती आल्याशिवाय राहत नाही.

मुरुडेश्वर मंदिरातील पूजापाठ

सकाळी सहा पासून दुपारी एक पर्यंत भगवान शंकराचे दर्शन घेता येते. सकाळी साडेसहा पासून साडेसात पर्यंत पूजेचा कार्यक्रम चालतो. सकाळी सहा ते बारा पर्यंत अभिषेकाचे कार्य चालते.

दुपारी सव्वा बारा ते एक आपण मुरुडेश्वराची पूजा करू शकतो. एक पासून तीन वाजेपर्यंत मंदिर बंद राहते.त्यानंतर तीन पासून रात्री सव्वा आठ वाजेपर्यंत येणारे भाविक मुरुडेश्वराचे दर्शन घेऊ शकतात. तीन पासून संध्याकाळी सात वाजेपर्यंत अभिषेकाचा कार्यक्रम सुद्धा आपण करू शकतो.

संध्याकाळी सव्वा सात वाजल्यापासून सव्वा आठ वाजेपर्यंत आपण पूजाअर्चा करू शकतो.

मुरुडेश्वर मंदिरात पुजेचे तास

सकाळी

सकाळी ६:०० ते दुपारी १:०० पर्यंत दर्शन उपलब्ध आहे.
सायंकाळी ६:०० ते ७:०० पर्यंत पूजेची वेळ असेल.
रुद्राभिषेक सकाळी ६:०० ते दुपारी १२:०० वा.

दुपारी

दुपारचे १:०० ते दुपारी १२:१५
दुपारी १ ते ३ वाजेपर्यंत मंदिर बंद असते.
दुपारी ३:०० ते ८:१५ पर्यंत दर्शन उपलब्ध आहे.
दुपारी ३:०० वा. ते संध्याकाळी ७.०० रुद्राभिषेकम्

संध्याकाळी

७:१५ आणि ८:१५ दरम्यान आरती

murudeshwar temple infomration in marathi

मुरुडेश्वर मंदिरात जाण्यासाठी सर्वोत्तम वेळ कधी आहे?

कर्नाटक राज्यामध्ये असलेले भगवान शंकराचे हे मुरुडेश्वर मंदिर सर्व सोयीसुविधांनी युक्त असे आहे. त्यामुळे या ठिकाणी फिरण्यासाठी दर्शन घेण्यासाठी तसेच पूजा चर्चा करण्यासाठी संपूर्ण वर्षात तुम्ही कधीही या ठिकाणी जाऊ शकता. या मंदिरामध्ये महाशिवरात्रीचा उत्सव सगळ्यात मोठा उत्सव असतो त्यामुळे महाशिवरात्रीच्या दरम्याने जाण्यासाठीचा काळ सगळ्यात योग्य समजला जातो.

साधारणपणे ऑक्टोबर पासून फेब्रुवारी, मार्च पर्यंतचा काळ योग्य समजला जातो. कारण एप्रिल मे च्या दरम्याने उष्णतेचे प्रमाण या ठिकाणी जास्त असते तसेच हे मंदिर मुरुडेश्वर किनाऱ्यालगत असल्यामुळे पावसाच्या हंगामात देखील आपल्याला या ठिकाणी थोडाफार त्रास होण्याची शक्यता असते.

मुरुडेश्वर मंदिराचे प्रवेश शुल्क

हे भगवान शंकराला समर्पित एका हिंदू धर्माशी निगडित कर्नाटक मधील प्रमुख मंदिर आहे. या मंदिरामध्ये संपूर्ण भारतातून भाविक येत असतात. या मंदिरात जाण्यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जात नाही. येणाऱ्या भाविकांना विनामूल्य प्रवेश दिला जातो.

मुरुडेश्वर मंदिर येथे कसे जायचे?

कर्नाटक राज्यातील भटकल तालुक्यातील एका शहरामध्ये हे मुरुडेश्वराचे मंदिर आहे. या ठिकाणी जाण्यासाठी आपण विमान, ट्रेन, बस, तसेच खाजगी वाहनांचा वापर करून या ठिकाणी पोहोचू शकतो.

विमान – कर्नाटक राज्यात खूप विमानतळे आहेत. मंदीरापासून सगळ्यात जवळचे विमानतळ म्हणजे मंगलोर विमानतळ आहे. या विमानतळापासून साधारण १६० किलोमीटरच्या अंतरावर म्हणजेच तीन तासाच्या अंतरावर हे मंदिर आहे. या ठिकाणी येण्यासाठी तुम्ही बस, कॅब यांचा वापर करू शकता.

ट्रेन – मुरुडेश्वर मंदिराच्या सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन हे मुरुडेश्वर रेल्वे स्टेशन आहे. या ठिकाणाहून साधारण दोन किलोमीटरच्या अंतरावर हे मंदिर आहे. या मंदिरापर्यंत येण्यासाठी तुम्ही ऑटो किंवा कॅबने येऊ शकता.

बस – मुरुडेश्वर मंदिरापर्यंत येण्यासाठी मुरुडेश्वर बस स्थानकापासून पाच मिनिटाच्या अंतरावर हे मंदिर आहे. या ठिकाणी येण्यासाठी तुम्ही ऑटो किंवा कॅबने येऊ शकता.

खाजगी वाहने – मुंबई पुणे गोवा बेंगलोर हायवे ने तुम्ही खाजगी गाडीने सुद्धा या ठिकाणी येण्यासाठी प्रवास करू शकता, जो तुमच्यासाठी सोयीस्कर असेल. मुंबई पुणे गोवा मार्गे मुरुडेश्वर मंदिर अंतर साधारणपणे ७५० किलोमीटरचे असून १४ तासांचा प्रवास करावा लागतो.

मुरुडेश्वर प्रवास कार्यक्रम 

  • पहिला दिवस तुम्ही मुरुडेश्वरला आल्यावर विश्रांती घ्यावी .
  • संध्याकाळी मुरुडेश्वर मंदिरात जाऊन मंदिर पाहून घ्यावे .
  • दुसऱ्या दिवशी मुरुडेश्वर समुद्रकिनारा फिरून घ्यावा.
  • दुसऱ्या दिवशी तुम्ही नेत्राणी बेटावर जाऊ शकता.

मुर्डेश्वर मंदिर जवळील पर्यटन स्थळे

स्टॅच्यू पार्क मुरुडेश्वर

स्टॅच्यू पार्कमध्ये भगवान शंकराची १२३ फूट उंच अशी मूर्ती आहे. हे ठिकाण पर्यटकांचे विशेष आकर्षण बनले आहे. या पार्कमध्ये आजूबाजूला हिरवीगार झाडे, सुंदर वेगवेगळ्या प्रकारची फुले आहेत. त्यामुळे हे ठिकाण उत्साहित वातावरणासाठी ओळखले जाते.या पार्कमध्ये असलेल्या तलावात फिरणारी सुंदर बदके आणि येथील धबधबा यामुळे मन प्रसन्न आणि मोहून जाते.

नेत्राणि आइलँड

मुरुडेश्वर मंदिराचे दर्शन केल्यानंतर नेत्राणि द्वीप या ठिकाणाला एकदा नक्की भेट द्या. या द्वीप ला “कबूतर द्वीप” असेही म्हटले जाते. या द्वीप ला जर आपण उंचावरून पाहिले तर हे द्वीप हृदयाच्या आकाराप्रमाणे दिसते. या ठिकाणी समुद्रामध्ये पर्यटकांना स्कुबा डायविंग, बोटिंग आणि मासेमारीचा आनंद घेता येतो. या ठिकाणाला स्कुबा डायव्हिंगची राजधानी असेही म्हटले जाते.

मुरुडेश्वर बीच

मुरुडेश्वर मंदिर हे मुरुडेश्वर बीच ला लागून आहे. मुरुडेश्वर मंदिराला भेट देणारे, दर्शन घेणारे भावीक मुरुडेश्वर बीचला अवश्य भेट देतात. या बीचवर तुम्ही वॉटर स्पोर्ट्स, स्कुबा डायव्हिंग त्यानंतर बोटींग, मासेमारीचा आनंद लुटू शकता. याच्या आजूबाजूला उंच उंच डोंगर, हिरवीगार झाडे, वेगवेगळे सीगल पक्षी, किंगफिशर दृष्टीस पडतात.

मुर्डेश्वर समुद्रकिनारा पाण्याखालील जग आणि वॉटरस्पोर्ट्सच्या जबरदस्त अनुभवासाठी ओळखला जातो. तुम्हाला अरबी समुद्रातील विविध प्रकारचे माशांचे जीवन तसेच नेपोलियन व्रासे, कोबिया, स्टोनफिश, ब्लॅक टिप शार्क, ग्रेट बॅराकुडा, कासव आणि स्टिंगरे इत्यादींसह समोरासमोर येण्याची संधी मिळेल. इथे जलक्रीडा देखील आहे. त्यात पॅरासेलिंग, स्पीड बोटिंग आणि स्नॉर्कलिंग यांचा समावेश आहे.

मुरुडेश्वर फोर्ट

मुरुडेश्वर मंदिराच्या परिसरात मुरुडेश्वर किल्ला हा एक प्रमुख, विशेष आकर्षण ठरलेला आहे. मुरुडेश्वर मंदिराच्या पाठीमागे हा किल्ला आहे. या किल्ल्याचा इतिहास विजयनगर साम्राज्याशी संबंधित आहे.

भटकल बीच

मुरुडेश्वर मंदिराच्या जवळपास फिरण्यासाठीचे सर्वोत्तम ठिकाण म्हणजे भटकल बीच जे पर्यटकांसाठी केंद्रबिंदू ठरले आहे. हा बीच अरबी समुद्राच्या किनारी असून आजूबाजूला नारळाच्या झाडांनी वेढलेला दिसून येतो.

जामा मशीद मुरुडेश्वर

भटकल तालुक्यामध्ये असलेल्या या भागातील सर्वात जुन्या मशिदींपैकी एक म्हणजे येथे असणारी जामा मशीद. ही तळघर असलेली एक विस्तीर्ण अशी तीन मजली इमारत आहे. या ठिकाणी पर्शियन शिलालेख, तसेच प्राचीन इतिहास आणि अध्यात्माचा एक मजबूत आधार आपल्याला पहावयास मिळतो.

मुरुडेश्वर येथे काय खरेदी करावे ?

मुरुडेश्वर मंदिर आणि त्याच्या आसपास बरीच दुकाने आहेत. या ठिकाणी तुम्ही हस्तकलेच्या वस्तू, ज्वेलरी बॉक्स, देवांच्या मुर्त्या, मुर्डेश्वराची मूर्ती, मुरुडेश्वर चे फोटो, रुद्राक्ष माळा, यानंतर या ठिकाणची माहिती देणारी पुस्तके, स्मृतिचिन्हे, कपडे, खाण्याच्या वस्तू इ. खरेदी करू शकता.

मुरुडेश्वर येथील स्कूबा डायव्हिंग

मुरुडेश्वर हे कर्नाटक राज्यातील भटकळ तालुक्यातील अतिशय सुंदर समुद्रकिनाराअसलेले शहर आहे. हा किनारा येथील सागरी जैवविविधतेसाठी प्रसिद्ध आहे. मुरुडेश्वर हे ठिकाण वॉटर स्पोर्ट्स आणि स्कुबा डायव्हिंगसाठी लोकप्रिय डेस्टिनेशन आहे. नेत्राणी बेट हे मुरुडेश्वरपासून जण्यासारखे कोरलसाठी प्रसिद्ध आणि एक उत्कृष्ट स्कूबा डायव्हिंग स्पॉट आणि प्रशिक्षण केंद्र आहे.

मुरुडेश्वर मंदिर

मुरुडेश्वर मंदिराजवळील हॉटेल्स

  • आर एन एस गोल्फ रिसॉर्ट अँड नेचर सेंटर
  • आर एन एस रेसिडेन्सी सी व्ह्यू
  • श्री विनायक रेसिडेन्सी
  • आर्यन रेसिडेन्सी
  • आर एन एस गेस्ट हाऊस
  • डिसोझा होम स्टे
  • स्टे हाऊस सह्याद्री
  • नेसले सह्याद्री बीच फ्रंट होम स्टे
  • स्टे मेकर हॉटेल कीर्थी

मुरुडेश्वर मंदिराजवळील प्रसिद्ध खाद्यपदार्थ

कर्नाटक राज्यामध्ये दक्षिण भारतीय,उत्तर भारतीय तसेच चायनीज पाककृती रेस्टॉरंट मध्ये दिल्या जातात. तरीही डोसा, इडली, वडा सांबार, उपीट, रोटी, वांगी भात, केसरी भात यासारखे स्थानिक पदार्थ आणि मैसूर पाक, धारवाड पेढा, चिरोटे यांसारखी मिठाई खूप प्रसिद्ध आहे.

मुर्डेश्वर मंदिर

मुरुडेश्वर मंदिर कथा

तीनही बाजूंनी पाण्याने वेढलेल्या कंदुका टेकडीवर हे मुरुडेश्वर मंदिर भगवान शंकराचे आहे. येथे भगवान शंकराच्या आत्मलिंगाची स्थापना आहे. ज्याची कथा रामायण काळापासूनची आहे जेव्हा रावण अमरत्व मिळावे म्हणून शंकराला प्रसन्न करून घेण्यासाठी तपस्या करत होता त्यावेळी त्याच्या तपस्येला खुश होऊन शंकराने त्याला शिवलिंग दिले ज्याला आत्मलिंग असे म्हटले जाते. हे आत्मलिंग लंकेमध्ये जाऊन स्थापित केलेस तर तू अमर राहू शकतोस तसेच हे लिंग ज्या ठिकाणी ठेवून देशील त्या ठिकाणी ते स्थापन होणार असेही सांगितले.

भगवान शंकराच्या म्हणण्यानुसार रावण शिवलिंग घेऊन लंकेला जात होता. वाटेमध्ये भगवान गणेशाने चलाखीने रावणाला लंकेला पाठवून दिले. आणि हे लिंग गोकर्ण च्या जमिनीवर ठेवून दिले जिथे हे स्थापित झाले. या रागाने रावणाने या लिंगाला नष्ट करण्याचा प्रयत्न केला आणि या शिवलिंगाचे पडलेले तुकडे फेकू लागला तसेच हे शिवलिंग ज्या वस्त्राने झाकून ठेवले होते ते वस्त्र मुरुडेश्वराच्या कंदुका पर्वतावर जाऊन पडले. यामुळेच आता याला मुरुडेश्वर म्हणून ओळखले जाते याची कथा शिवपुराणामध्ये दिसून येते.

मुरुडेश्वर मंदिरा बद्दल 12 मनोरंजक तथ्ये 

  • मुरुडेश्वर मंदिर ज्यासाठी सर्वात प्रसिद्ध आहे ते म्हणजे त्यात असलेली भव्य शिवमूर्ती.
  • ही 123 फूट उंच आहे आणि दोन वर्षांत बांधली.
  • नेत्राणी बेट हे फिरण्यासाठी आणि स्कुबा साठी उत्तम ठिकाण आहे
  • मंदिराचे प्रवेशद्वार २० मजली राजगोपुरम आहे.
  • पोकळ शिवलिंग असलेल्या जगातील काही ठिकाणांपैकी मुर्डेश्वर हे एक आहे
  • या ठिकाणी जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात उंच शिवाची मूर्ती १२३ फूट उंच आहे.
  • मंदिराशी रामायणाचा संबंध आहे.
  • मंदिर तीन बाजूंनी अरबी समुद्राने वेढलेल्या कंदुका टेकडीवर आहे. अशा प्रकारे, समुद्राचे उत्कृष्ट दृश्य दिसते.
  • मंदिरात प्राचीन आणि आधुनिक वास्तुकलेचा मिलाफ आहे.
  • मुरुडेश्वर किल्ला टिपू सुलतान यांनी बांधला.
  • पर्यटकांना राजगोपुरमच्या 18 व्या मजल्यावरून मंदिराचे विहंगम दृश्य पाहता येते.
  • मुरुडेश्वर मंदिरात जगातील सर्वात उंच गोपुरम आहे.

मुरुडेश्वर मराठी माहिती प्रश्न

मुरुडेश्वर मंदिर कुठे आहे ?

मुरुडेश्वर मंदिर हे कर्नाटक राज्यातील भटकल तालुक्यातील एका गावामध्ये अरबी समुद्राच्या किना-यावर आणि मंगळुरुपासून १६५ किलोमीटर अंतरावर अतिशय सुंदर आणि शांत ठिकाणी वसलेले आहे . मुरुडेश्वर बीच हा कर्नाटकातील सर्वात सुंदर समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहे

मुरुडेश्वर मंदिरात जाण्यासाठी कोणता महिना चांगला आहे?

मुरुडेश्वर मंदिरामध्ये जाण्यासाठी साधारणपणे ऑक्टोबर पासून फेब्रुवारी, मार्च पर्यंत कधीही जाऊ शकता.

मुरुडेश्वर मंदिरामध्ये किती वेळ लागतो?

मुरुडेश्वर मंदिरामध्ये दोन ते तीन तासांचा वेळ लागतो.

मुरुडेश्वर मंदिराच्या आजूबाजूला काय आहे?

मुरुडेश्वर मंदिराच्या बाजूला मुरुडेश्वर बीच, मुरुडेश्वर किल्ला आहे.

मुरुडेश्वर मंदिराची उंची किती आहे?

मुरुडेश्वर मंदिराची उंची १२३ फूट आहे.

मुरुडेश्वर हे कोणाचे मंदिर आहे?

मुरुडेश्वर हे भगवान शंकराचे मंदिर आहे

मुरुडेश्वर मंदिराची स्थापना कोणी केली?

मुरुडेश्वर मंदिराची स्थापना राम नागप्पा शेट्टी यांनी केली.

मुरुडेश्वर मंदिर कोणत्या राज्यात येते?

मुरुडेश्वर मंदिर हे कर्नाटक राज्यात येते.

निष्कर्ष

कर्नाटक राज्यातील भटकल तालुक्यातील हे मुरुडेश्वराचे मंदिर आणि त्याबाबतची माहिती असणारा – मुर्डेश्वर मंदिर कर्नाटक माहिती -हा लेख तुम्ही वाचला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. आमचा हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट आणि शेअर करा. या लेखाबाबत काही चुका आढळल्यास तसेच सुधारणा आवश्यक असल्यास आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आम्ही त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करू. पुन्हा भेटू अशाच प्रकारची नवनवीन माहिती, नवनवीन विषय घेऊन तोपर्यंत नमस्कार

Leave a comment