कळसुबाई शिखर संपूर्ण माहिती मराठी : Kalsubai shikhar information in marathi language

Kalsubai shikhar information in marathi language | कळसुबाई शिखर संपूर्ण माहिती मराठी – या महाराष्ट्राच्या मातीत जन्म घ्यावा हे भाग्यच. शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही सुवर्णभूमी. सह्याद्रीच्या महाराष्ट्रातील अतीउंच शिखरांपैकी १६४६ मीटर उंचीचे कळसुबाई शिखर हे सर्वात उंच शिखर म्हणजे ट्रेकर्स मंडळीची ड्रीम ट्रेक, तर भक्तांसाठी आई कळसुबाई मंदिर श्रद्धास्थान.

Table of Contents

कळसुबाई शिखर संपूर्ण माहिती मराठी – Kalsubai shikhar information in marathi language

कळसुबाई शिखर उंची

कळसूबाई शिखर हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर असल्यामुळे याला महाराष्ट्राचे एव्हरेस्ट असेही म्हटले जाते. या शिखराची ट्रेकची चढाई पातळी ही मध्यम दर्जाची आहे. बारी गावापासून याची उंची जवळपास ९०० मीटर भरते आणि या चढाईसाठी सर्वसाधारण तीन ते चार तास लागतात. भंडारदरा धरणापासून हे शिखर सहा किलोमीटर अंतरावर आहे.

Kalsubai shikhar information in marathi language

चल तर मग, आज आपण या लेखाद्वारे जाणून घेऊ कळसुबाई शिखर संपूर्ण माहिती

कळसूबाई शिखर माहिती

नाव कळसुबाई शिखर
गाव बारी
तालुका अकोले
जिल्हा अहमदनगर
राज्य महाराष्ट्र
ऊंची १६४६ मीटर (५४०० फूट)
चढण १०८० मीटर
चढाईची श्रेणी मध्यम

कळसूबाई शिखर नकाशा

कळसुबाई नाव कसे पडले ?

एक अशी आख्यायिका आहे की, कळसुबाई ही या गावातील सून. हिला औषधी वनस्पती बद्दल खूप ज्ञान होते. त्या औषधांच्या सहाय्याने गावातील लोकांची सेवा करत असे तसेच गुरेवासरे , शेळ्या मेंढया यांचाही औषधोपचार करत असे. कालांतरानंतर तिच्या मृत्यूनंतर गावातील लोकांनी तिची ओळख म्हणून या डोंगरावर एक छोटेखानी मंदिर स्थापन केले आणि या शिखराला कळसुबाई नाव दिले.

स्थानिक ग्रामस्थांतर्फे या मंदिरात दररोज पूजा अर्चना केली जाते. तसेच दर मंगळवारी आणि गुरुवारी इथे आरती केली जाते. या मंदिरात नवरात्र उत्सव मोठ्या थाटामाटात आयोजित केला जातो.

कळसुबाई शिखराची भौगोलिक रचना

लाखो वर्षांपूर्वी भूगर्भिय हालचालींमधून सह्याद्री घाटाची निर्मिती झाली. त्यावेळी जी उंच शिखरे आणि पर्वत तयार झाले आहेत, त्यातील अतुल शिखर म्हणजे कळसुबाई. हे शिकार पश्चिम घाटात विपुलतेने आढळणाऱ्या बेसॉल्ट खडक यांनी बनलेले आहे.
कळसुबाई शिखर ज्या पर्वत रांगांमध्ये आहे त्या आजूबाजूच्या छोट्या पर्वत रांगां पश्चिमे पर्यंत पसरलेल्या आहेत. पश्चिमेला ह्या टेकड्या पश्चिम घाटात सामील होतात. या आजूबाजूच्या सर्व टेकड्या आणि डोंगर रांगा मिळून दक्षिण घाटाची नैसर्गिक सीमा तयार करतात.

कळसुबाई येथील पर्यावरण

कळसुबाई शिखर हे भंडारदरा अभयारण्याच्या हद्दीत येत असल्याने आजूबाजूचा परिसर संरक्षित मानण्यात येतो. या टेकड्यांच्या चारही बाजूने असलेल्या जंगलामध्ये वेगवेगळ्या पशुपक्षी, कीटक आणि सांप वस्ती आहे. पावसाळ्यानंतर हा प्रदेश वेगवेगळ्या फुलांनी, पक्षांनी, फुलपाखरांनी ओसंडून वाहत असतो. इथे वेगवेगळ्या प्रकारचे सरडे, साप, फुलपाखरे, कीटक, मॉथ यांचे निरीक्षण करण्यासाठी पर्यावरण प्रेमी या ठिकाणाला भेट देतात.

कळसुबाई शिखर ट्रेक

कळसूबाई शिखर ट्रेक अकोल्यातील बारी या गावाच्या पायथ्याशी सुरू होतो. पुण्याहून बारीला जाण्याचा जाण्यासाठी NH60 मार्गे ओतूर, राजूर आणि भंडारदरा असे जावे. बारीपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला सुमारे पाच-साडेपाच तास लागतात, त्यामुळे पहाटे लवकर घरातून निघावे. बारी पासून, सर्वात वरच्या शिखरापर्यंतचा ट्रेकसाठी लागणारा वेळ हा आपल्या वेगावर आणि मध्ये घेतलेल्या विश्रांतीवर अवलंबून असतो. ट्रेकसाठी पाच ते सहा तास लागतील.

kalsubai shikhar trek ची चढाई पातळी मध्यम दर्जाची आहे. या शिखराची उंची समुद्रसपाटीपासून १६४६ मीटर एवढे आहे. तर पायथ्याच्या बारी गावातून अंदाजे ९०० मीटर इतकी आहे. या ट्रेक साठी साधारणतः ३ ते ४ तास लागतात. हे शिखर भंडारदरा धरण येथून ६ किलोमीटर अंतरावर असल्यामुळे तेथे दोन दिवस मुक्काम करून कळसुबाई, रांधा धबधबा, कोकणकडा इत्यादी ठिकाणे आपल्याला पाहता येतात.

कळसुबाई शिखर ट्रेक सूचना

  • हौशी ट्रेकर्स ना हा ट्रेक जवळपास सात किलोमीटरचा ट्रेक करता येतो.
  • हा ट्रेक जवळच्या बारी गावापासून सुरू करून, कळसुबाई शिखराची चढाई, करून पुन्हा मागे येऊन संपवता येतो.
  • पावसाळ्यातील दिवसात हिरवीगार पठारे, हिरवेगार डोंगर, छोटे मोठे धबधबे पाहत हा मध्यम काठीण्य पातळीचा ट्रेक एका दिवसात आटोपता येतो.
  • शिखर सर करणाऱ्यांपैकी ९०% ट्रेकर्स हे कळसुबाई देवीचे भक्त असतात. बारी गावाच्या पूर्वेकडून, डोंगराच्या दिशेने जाणारा मार्ग हा ट्रेकसाठी सगळ्यात आवडीचा मार्ग आहे.
  • ट्रेकिंग करताना आपल्याला दिसणारी कृष्णा नदी, प्रवरा नदीची उपनदी ही, उत्तरेकडील उतारावर उगम पावते आणि तिच्या प्रवाहाने वाहत जाते.
  • बाजूला असणाऱ्या ओढ्यापासून, थोड्याशा अंतरावर एक हनुमान मंदिर आहे. ट्रेक सुरू करताना हनुमान मंदिर ही महत्त्वाची खूण ठरते आणि ट्रेक संपल्यावर सुद्धा ट्रेकर्स इथे आराम करू शकतात.
  • हनुमान मंदिराच्या मागून जाणारा रस्ता हा थेट शिखरावर जातो. हा ट्रेक जरी सोपा असला तरी आजूबाजूला खडकाळ प्रदेश आणि छोट्या मोठ्या दऱ्या असल्यामुळे ट्रेकर्सने सांभाळून ट्रेक करावा.
  • सरकारने गेल्या काही वर्षात कळसुबाईला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या लक्षात घेऊन, या उतारावर लोखंडी रेलिंग आणि पायऱ्या बांधल्या आहेत, त्यामुळे चढाई सुकर होते.
  • बारी गावच्या पायथ्याशी सिमेंटच्या पायऱ्या बांधलेल्या आहेत. त्या पायऱ्या पावसाळ्यात निसरड्या होतात. याची काळजी घेणे गरजेचे आहे.

कळसुबाई शिखर ट्रेक स्व-सुरक्षितता

१.सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून वैयक्तिक -एकटे हँग आऊटसाठी, ट्रेकिंग करण्यासाठी हे सुरक्षित ठिकाण नाही.
२.जर तुम्ही ट्रेकिंग करत असाल तर समूहामध्ये राहून ट्रेकिंग करा. ज्यांना दम्याचा त्रास होत असेल किवा सोबत लहान मुले असल्यास ट्रेकिंग करणे टाळा.
३.ट्रेकिंग करतेवेळी, त्या ठिकाणी कोणतीही पोलीस सुरक्षा उपलब्ध नसते व जीव रक्षक उपलब्ध नसतात, त्यामुळे स्वतःची काळजी स्वतः घेणे व सुरक्षित रित्या ट्रेकिंग करणे याची गरज आहे.

कळसुबाई शिखर ट्रेक सूचना महत्वाच्या टिप्स

१)ट्रेकिंग करतेवेळी योग्य ते फुटवेअर वापरा. शक्यतो चप्पल वापरणे टाळा. बूट वापरा.
२)उन्हाळ्यात सनस्क्रीनचा वापर करा.
3)उन्हापासून संरक्षणा साठी टोपीचा वापर करा.
४)योग्य ते कपडे परिधान करा.
५)ट्रेकिंग करतेवेळी नेहमी दोन पोलचा वापर करा.

कळसुबाई शिखरावरील स्थळे

१) ट्रेकर्स बेस स्टॉप

कळसुबाई शिखरावरील ट्रेकर्स बेस स्टॉप

डोंगर चढायला सुरुवात केल्यावर पहिल्या टप्प्यावर हे ठिकाण लागते, लोकांना शिखरावर जाणे शक्य नाही, त्यांच्या सोयीसाठी हे बांधलेले आहे.

२) कातळात कोरलेली कळसुबाईची पावले

पुढे दुसरी पायरी चढल्यावर कातळात दोन पावले कोरलेले आहेत. ती कळसुबाईची पावले आहेत अशी श्रद्धा या ठिकाणी गावकरी मानतात. शेवटच्या पायरीच्या खाली विहीर व बाजूला एक पत्र्याची शेड आहे.

३) कळसुबाई मंदिर

 कळसुबाई मंदिर

शिखरावर कळसुबाईचे छोटे मंदिर आहे. देवळात साधारणता तीन माणसे बसू शकतील एवढीच जागा आहे. येथील ग्रामस्थांची कळसुबाई देवीवर आस्था आहे.

कळसुबाई येथील प्रेक्षणीय स्थळे

१) भंडारदरा

 भंडारदरा

भंडारदरा हे भारतातील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक आहे. येथे नैसर्गिक सौंदर्य, धबधबे, पर्वत, हिरवळ, उत्साहवर्धक हवा आणि निसर्गरम्य वातावरण आहे. मुख्यतः भंडारदरा येथील नैसर्गिक सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा उत्तम हंगाम असतो. ८२ मीटर उंच अश्या दगडी बांधकामात हे धरण बांधलेले आहे.

या धरणावर २०० फुटावरुन पाणी नदीपात्रात सोडले जाते ते खडकावरून खळखळ वाहत नदीपात्रात झेपावते. हे दृश्य एखाद्या भव्य छत्रीसारखे दिसते. म्हणून इथे तयार होणाऱ्या या धबधब्याला अंब्रेला फॉल असे म्हणतात. छत्रीच्या आकाराचे पाणी नदीपात्रात झेपावते तेव्हा पर्यटक भान हरपून ते दृश्य पाहत असतात. धबधब्यातून उडणारे असंख्य तुषार पर्यटकांना चिंब भिजवून टाकतात. पावसाळ्यात अतिरिक्त पाणी जेव्हा स्पील वे मधून सोडले जाते तेव्हा ते पाणी प्रचंड वेगाने वाहत जाते. हे दृश्य नक्कीच अनेक वर्ष डोळ्यांसमोर तरळत राहते. धरणाचे काम १९२६ साली पूर्ण झाले. त्याच वर्षी १० डिसेंबर १९२६ रोजी गवर्नर लेस्ली वेलस्ली यांच्या हस्ते धरणाचे उदघाटन करण्यात आले. धरणाला त्याकाळी विल्सन डॅम तर धरणाच्या पाणीसाठ्याला ऑर्थर लेक असे नाव देण्यात आले.

२) कळसुबाई भंडारदरा अभयारण्य

कळसुबाई भंडारदरा अभयारण्य

वनस्पतींची विविधता या अभयारण्याएवढी इतरत्र कुठेही आढळणार नाही. करवंद, कारवीच्या जाळी, धायटी, उक्षी, मदवेल, कुडा, पांगळी, हेकळ, पानफुटी, गारवेल इत्यादी वनस्पती येथे आढळतात. या भागातील प्राणिवैभव कमी असले तरीही कोल्हे, तरस, रानडुकरे, बिबळ्या, ससे, भेकर, रानमांजरे इत्यादी प्राणी या ठिकाणी आढळतात.

३) केदारेश्वर गुहा

 केदारेश्वर गुहा

हरिश्चंद्रगड वरील केदारेश्वर गुफा ही एक पवित्र श्रद्धास्थान आहे. या गुफे मध्ये महादेवाचे खूप मोठं असे शिवलिंग आहे. या गुहेत ४ खांब आहेत. असे म्हटले जाते की हे खांब युगाप्रमाणे आहेत. यातील ३ खांब हे पडले आहेत. शेवटचा उरलेला खांब हा कलियुगाचा आहे. तो खांब पडला की कलियुगाचा अंत होईल.

या ठिकाणी कोणत्याही ऋतु मध्ये गेले तरी पाणी असते. दरवर्षी खूप पर्यटक येथे भेट देत असतात. पाऊस चालू झाला की इथं पर्यटकांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढते. प्रत्येक ट्रेकर्स ची पंढरी म्हणून या ठिकाणाला ओळखलं जातं. एकदा तरी इथं भेट दिली पाहिजे, म्हणजे तुम्हाला सह्याद्रीच्या निसर्गाचा आनंद घेता येईल.

४) सांधण व्हॅली

सांधण व्हॅली

एका अतिप्राचीन जिओग्राफिक फॉल्टलाईन (भौगोलिक प्रस्तरभंग रेषा) म्हणजे जमिनीला पडलेली एक मोठी भेग, यामुळे निर्माण झालेली ही सांधण व्हॅली किंवा घळ हा निसर्गाचा अद्भुत असा चमत्कारच आहे. सांदण दरी दोनशे ते चारशे फुट खोल आणि जवळ-जवळ 4 कि.मी लांबवर पसरलेली आहे. पावसळ्यात सांधण दरीला जाणे अशक्य असते. कारण पावसाचं पाणी याच दरीतुन खाली कोसळतं. त्यामुळे येथे जाण्याचा उत्तम कालावधी म्हणजे उन्हाळा. दरीतील ऊन-सावल्यांचा खेळ बघण्यासारखा असतो.

५) रतनगड

रतनगड

महाराष्ट्रातील ट्रेकिंगसाठी रतनगड हे अतिशय लोकप्रिय ठिकाण असून भंडारदरा पर्यटन स्थळांपैकी एक आहे. हा किल्ला ४२५० फूट उंचीवर आहे. रतनगड किल्ला हा ४०० वर्ष जुना किल्ला आहे, जो मराठा योद्धा शिवाजी महाराजांनी वापरला होता. किल्ल्याला गणेश, हनुमान, कोकण आणि त्र्यंबक असे चार दरवाजे आहेत.

रतनगडावर निसर्गाने मुक्त हाताने उधळण केली आहे .भव्य जलाशय, सांधणदरी, मोठे डोंगर, उंचच उंच गिरीशिखरे, कात्राबाईची खिंड, कोकणकडे, घनदाट जंगल, फेसाळणारे धबधबे, लांबवर दिसणारा हरिश्चंद्रगड, कळसूबाई शिखर, पाबरगड, अलंग, मलंग, आजोबाचा डोंगर, सोबत वाहणारी अमृतवाहिनी प्रवरामाई आणि जून महीन्यातील काजवा महोत्सव पाहून पर्यटक थक्कच होतात .

३) हरिश्चंद्रगड

 हरिश्चंद्रगड

भंडारदरापासून ५० किमी अंतरावर, पुण्यापासून १६६ किमी आणि मुंबईपासून २१८ कि. मी. अंतरावर, हरिश्चंद्रगड हा महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील एक ऐतिहासिक किल्ला आहे. हरिश्चंद्रगड समुद्रसपाटीपासून १४२४ मीटर उंचीवर आहे.

हरिश्चंद्रगड हा ठाणे , नगर आणि पुणे ह्या जिल्ह्यांच्या सीमारेषेवर येतो. ह्या गडावर जाण्यासाठी एकूण 8 वाटा आहेत. खिरेश्वर तसेच जुन्नर दरवाजा, टोलारखिंड, नळीची वाट, माकडनाळ, पाचनई इ. ह्या मार्गाने किल्ल्यावर जाता येते. ह्या गडावर पाहण्यासाठी केदारेश्वर गुहा, कोंकणकडा, तारामती शिखर, गणेशगुहा, पुष्करणी अशी भरपूर ठिकाणे आहेत. ह्या गडाला c आकाराच्या कोकणकड्यामूळे अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. पावसाळ्यात या गडाचे सौदर्य काही औरच असते.

तारामती य गडाचे सर्वोच्च शिखरावरून नाणेघाट, जीवधन, रतनगड, कात्राबाईची खिंड, आजोबाचा डोंगर, कळसूबाई, अलंग, मदन, कुलंग, भैरवगड, हडसर आणि चावंड हा परिसर दिसतो. अशा तहेने अप्रतिम निसर्गसौंदर्याने नटलेला हरिश्चंद्रगड ट्रेकर्सची पंढरी ठरतो.

६) माळशेज घाट

माळशेज घाट

माळशेज घाट हा गिर्यारोहक, ट्रेकर्स आणि निसर्ग प्रेमींमध्ये लोकप्रिय असून, पश्चिम घाटातील हा अद्भुत पर्वतीय खिंड त्याच्या ट्रेकिंग ट्रेल्स, धबधबे, तलाव आणि ऐतिहासिक किल्ल्यांसाठी प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील माळशेज घाट हे निसर्गाच्या सानिध्यात बसून विश्रांती घेण्यासाठी उत्तम ठिकाण आहेच. तसेच रोमांचक अनुभव घडवून आणणाऱ्या साहसी खेळांसाठी देखील हे ठिकाण एक चांगला पर्याय आहे. इथे तुम्हाला शांत नदी, आभाळाला टेकणारे डोंगर अणि सुंदर दऱ्या यांच्या सानिध्यात वॉटर स्कींग आणि रॅपेलिंगसारख्या जलक्रीडांचा अनुभव घेता येईल. या ठिकाणाला भेट दिल्यानंतर तुम्हाला शांतता आणि चैतन्य या दोन्हीचा अनुभव मिळेल.

आमचा हे लेख देखील नक्की वाचा.👇

कळसुबाई शिखराला कसे भेट द्याल?

१.रस्ता

मित्रांनो या ठिकाणी पोहोचण्यासाठी विविध रस्ते आहे. या शिखरावर जाण्यासाठी मुख्य रस्ता ही बारी गावातून जातो. भंडारदर्‍यापासून बारी हे गाव ३ किलोमीटर अंतरावर आहे. बारी गावात जायचं झाल्यास मुंबई नाशिक महामार्गावर, इगतपुरीला जावे व इगतपुरी वरून भंडारदर्‍याला जाणाऱ्या एसटीने बारी या गावी आपल्याला जाता येते. येथून शिखरावर जाण्यास ३ तास लागतात.
वैयक्तिक वाहन असल्यास मुंबईत कसारा मार्गे कोटी गाठावे, कोटी सिन्नर मार्गावर भंडारदरा फाटा आहे. या फाट्यावरून भंडारदर्‍याला जाताना भंडारदर्‍याच्या अलीकडे ६ किलोमीटर अंतरावर बारी हे गाव आपल्याला लागते.

२.रेल्वे

इगतपुरी रेल्वे स्टेशन हे कळसुबाई शिखर च्या सर्वात जवळचे स्टेशन आहे.

मुंबईतून रेल्वेने यायचे असल्यास कसारा लोकल ट्रेन किंवा लांब पल्याच्या ट्रेनने इगतपुरी पर्यंत जाऊ शकतो. इगतपुरी कडून आपल्याला पुणे, भंडारदरा, अकोले या मार्गाने जाणाऱ्या बस करून पुढचा प्रवास बसने करावा लागतो. इगतपुरी ते बारी हा बस प्रवास 45 मिनिटांचा आहे आणि कसारा ते बारी हा बस प्रवास एक तासाचा आहे

3.विमान

आपण जर विमानाने येत असाल तर पुणे किंवा मुंबई पर्यन्त विमानाने येऊ शकता. त्यानंतर चा प्रवास इगतपुरी पर्यन्त ट्रेन, बस, किंवा खाजगी वाहनाने करावा. इगतपुरी पासून पुढे बस किंवा खाजगी गाडी निवडावी.

कळसूबाई शिखरावर जाण्यासाठी सर्वोत्तम वेळ

मान्सून ट्रेकसाठी जुलै ते सप्टेंबर या कालावधीत तुम्ही कळसुबाईला भेट देऊ शकता. थंडीच्या काळात ट्रेकसाठी तुम्ही ऑक्टोबर ते फेब्रुवारी या कालावधीत तुम्ही भेट देऊ शकता, फेब्रुवरी ते मे च्या दरम्यान तुम्ही रात्रीच्या ट्रेकसाठी जाऊ शकता.

कळसुबाई शिखराहण्याची सोय आहे का ?

कळसुबाई शिखरावर राहण्याची सोय नाही. शिखाराखालील शेडमध्ये किंवा भंडारदर्‍याला राहण्याची सोय होऊ शकते. तसेच बारी गावात, भंडारदऱ्यात जेवणाची सोय आपली होऊ शकते.

कळसुबाई जवळील हॉटेल्स

१) एमटीडीसी भंडारधारा

कळसुबाईच्या ट्रेकिंग करता तुम्ही बजेट फ्रेंडली हॉटेल बघत आहात तर एमटीडीसी भंडारधारा हा एक उत्तम पर्याय आहे. या ठिकाणी तुम्हाला नीट नेटके रूम्स, उत्तम जेवणाची सोय, तसेच योग्य तो पाहुणचार दिला जातो.या हॉटेल मध्ये फ्री वायफाय,फ्री पार्किंग,नाश्ता, वातानुकुलीत रूम्स अश्या विविध सोयी सुविधा मिळतात.

२) आनंदवन रिसोर्ट

कळसुबाईजवळील आनंद हे एक उत्तम राहण्याची सोय असलेले हॉटेल आहे. या ठिकाणी तुम्हाला नीट नेटके रूम्स, उत्तम जेवणाची सोय, तसेच योग्य तो पाहुणचार दिला जातो.या हॉटेल मध्ये फ्री वायफाय, फ्री पार्किंग, नाश्ता, वातानुकुलीत रूम्स अश्या विविध सोयी सुविधा मिळतात.

३) KALSUBAI PEAK हॉटेल & रेस्टॉरंट

KALSUBAI PEAK हॉटेल & रेस्टॉरंट हे बजेट फ्रेंडली हॉटेल & रेस्टॉरंट असून या ठिकाणी विविध सोयी सुविधा उपलब्ध आहे. फ्री वायफाय, फ्री पार्किंग, नाश्ता, वातानुकुलीत रूम्स.

४) हॉटेल ट्रेकर्स कट्टा, कळसुबाई

हॉटेल ट्रेकर्स कट्टा, कळसुबाई हे कळसुबाई जवळील एक चांगले हॉटेल असून या हॉटेल मध्ये जेवणाची व राहण्याची उत्तम सोय आहे. या ठिकाणी वातानुकुलीत रूम्स, फ्री वायफाय, फ्री पार्किंग, नाश्ता आदी सोयी सुविधा उपलब्ध आहेत .

FAQ

कळसूबाई ट्रेक अवघड आहे का?

कळसुबाई येथे ट्रेकिंग अडचण पातळी हि मध्यम आहे. जरी लांबचा ट्रेक असला, तरी शिखराच्या माथ्यापर्यंत पायऱ्या आहेत. त्या मुळे हा ट्रेक चढाई साठी तेवढासा अवघड नाही.

कळसूबाईच्या सर्वात जवळचे गाव कोणते?

कळसूबाईच्या सर्वात जवळचे गाव बारी हे आहे.

कळसूबाई ट्रेक करण्यासाठी किती वेळ लागतो?

कळसूबाई ट्रेकला ४ तास लागू शकतात.

शिखर कळसूबाईसाठी कोणता हंगाम चांगला आहे?

मान्सून ट्रेकसाठी जुलै ते सप्टेंबर या कालावधीत तुम्ही कळसूबाईला भेट देऊ शकता. थंडीच्या काळात ट्रेकसाठी तुम्ही ऑक्टोबर ते फेब्रुवारी या कालावधीत तुम्ही कळसूबाईला भेट देऊ शकता, फेब्रुवारी ते मे च्या दरम्यान तुम्ही रात्रीच्या ट्रेकसाठी जाऊ शकता.

कळसूबाई कोणता घाट आहे?

कळसूबाई हे महाराष्ट्राचे एव्हरेस्ट म्हणून ओळखले जाते, हे महाराष्ट्राच्या पश्चिम घाटात आहे.

निष्कर्ष

मित्रहो आम्ही आमच्या लेखातून आपणास महाराष्ट्राचे अति उच्च शिखर कळसुबाई ह्या बद्दल माहिती – कळसुबाई शिखर संपूर्ण माहिती मराठी Kalsubai shikhar information in marathi languageदिली आहे. हा लेख तुम्ही नक्की वाचा,आणि कसा वाटला हे कमेंट करून आम्हास नक्की कळवा.
धन्यवाद.

संदर्भ

Leave a comment