Pateti Festival 2023 : पतेती म्हणजे काय? कशा देतात शुभेच्छा?

पतेती म्हणजे काय ? – भारतामध्ये 15 ऑगस्ट रोजी ‘पतेती’ सण आहे. तर 16 ऑगस्ट दिवशी पारशी समाज नववर्ष साजरं करणार आहे. पारशी नववर्षाचा पहिला दिवस हा नवरोझ (Nowruz) म्हणून देखील ओळखला जातो. पारशी नूतन वर्षाचा आरंभ ‘फरवर्दीन’ माहिन्याने होतो.

WHAT IS PATETI? – पतेती (Pateti 2023) हा पारशी लोकांचा महत्वाचा सण असून पारशी समाजाच्या पारंपरिक झोरोस्टर कॅलेंडरनुसार (Zoroastrian Calendar) वर्षाचा शेवटचा दिवस हा Pateti Festival 2023 म्हणून ओळखला जातो. या दिवशी पारशी लोक अहुरा माजदाचे प्रतीक म्हणून अग्नीची पूजा करतात. या उत्सवात पारशी समाजातील लोक चांगले विचार करण्याचा, चांगले शब्द बोलण्याचा आणि चांगली कामे करण्याचा प्रयत्न करतात. जाणून घेऊ पतेती ची माहिती – farvardin in marathi

Pateti Festival 2023 : पतेती म्हणजे काय? कशा देतात शुभेच्छा?

Pateti Festival 2023

पतेती म्हणजे काय ?(What Is Pateti 2023 Utsav?)

पतेती हा पारश्यांचा नववर्ष दिवस होय. मुळात Pateti म्हणजे “पश्चात्तापाचा दिवस” (पेटेटचा अर्थ “कबुलीजबाब” असा आहे). हा खरोखर आत्मनिरीक्षणाचा दिवस आहे आणि मूलतः पारसी वर्षाच्या शेवटच्या दिवशी (किंवा शेवटच्या 5 दिवसांवर) हा सण साजरा केला जात असे. कालांतराने नवीन वर्षाचा दिवस म्हणून (पहिल्या दिवशी) साजरा केला जाऊ लागला. नाव कायम ठेवले असले तरी आता हा आत्मपरीक्षणाचा दिवस राहिलेला नाही. पारशी नववर्षाचा पहिला दिवस हा नवरोज किंवा जमशेदी नवरोज असे म्हणून ओळखला जातो.

पारशी समाज हा भारतातील एक लहान समाजगट आहे. मुळात पर्शिया म्हणजे इराणमधून हा समाजगट भारतात येऊन स्थिरावला आहे हा फारशी धर्मीयांचा महत्त्वाचा सण मानला जातो. धार्मिक प्रथा व परंपरेनुसार पारशी धर्मीय हा सण साजरा करतात. दिनदर्शिकेनुसार पारशी वर्षाच्या ह्या पहिल्या दिवसाला नवरोज (नवी सृष्टी) म्हणले जाते. या दिवशी पारशी लोक अग्यारीत जाऊन प्रार्थना करतात आणि पारशी भोजन घेतात.

पतेती म्हणजे काय

पतेती उत्सवाची सुरुवात कशी झाली?(How Pateti Utsav Startad?)

झोरोस्टेरियन समुदायाच्या श्रद्धेनुसार 3000 वर्षांपूर्वी या दिवशी साह जमशेद इराणच्या सिंहासनावर बसला होता. पारसी समाजातील लोकांनी त्याचा जलाभिषेक करुन त्याला सिंहासनावर बसवले होते. जमशेद यांनीच सर्वप्रथम पारसी लोकांना वार्षिक कॅलेंडरची ओळख करून दिली होती.

इंग्रजी दिनदर्शिकेनुसार वर्षात 365 दिवस असतात, पण पारशी समाजातील लोक फक्त 360 दिवसच वर्ष मानतात. वर्षातील शेवटचे पाच दिवस गाथा म्हणून साजरे केले जातात. म्हणजेच या पाच दिवसांत कुटुंबातील सर्व सदस्य आपल्या पूर्वजांचे स्मरण करतात. नवरोजचा इतिहास मान्यतेनुसार, झोरास्ट्रियन धर्मावर विश्वास ठेवणारे लोक राजा जमशेदच्या स्मरणार्थ नवरोजचा सण साजरा करतात.

पारशी समाजातील योद्धा जमशेद यांनी सुमारे तीन हजार वर्षांपूर्वी पारशी दिनदर्शिकेची स्थापना केल्याचे सांगितले जाते. तेव्हापासून आजपर्यंत लोक हा दिवस नवीन वर्ष म्हणून साजरा करतात. या दिवशी जमदेशने इराणमध्ये गादी ग्रहण केल्याचेही सांगितले जाते.

How is Pateti Utsav celebrated?

कसा साजरा केला जातो पतेती उत्सव? (How is Pateti Utsav celebrated?)

हिंदू धर्माप्रमाणेच पारसी धर्माचे लोकही अग्नीची पूजा करतात. हे लोक अग्नीला पवित्र मानतात आणि त्यात यज्ञही करतात. पारशी लोक या दिवशी नवीन कपडे घालतात आणि त्यांच्या पूजास्थळावर म्हणजेच अग्नि मंदिरात जातात आणि प्रार्थना करतात. यानंतर लोक एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतात. तसेच एकमेकांना घरी जेवणासाठी आमंत्रित करतात. या उत्सवाची तयारी महिनाभरापूर्वी सुरू केली जाते. या दिवशी लोक आपली घरे साफ करतात. फुलांनी आणि रंगांनी घरांची सजावट करतात. तसेच या दिवशी गोड पदार्थांचे सेवन करतात.

नवरोजच्या दिवशी झोरास्ट्रियन धर्मावर विश्वास ठेवणारे लोक सकाळी लवकर उठतात आणि तयार होतात. या दिवशी घराची साफसफाई केल्यानंतर घराबाहेर रांगोळी काढली जाते. मग विशेष पदार्थ बनवले जातात. याशिवाय एकमेकांवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी या दिवशी भेटवस्तूंचेही वाटप केले जाते. तसेच पारशी लोक चंदनाचे तुकडे घरात ठेवतात. असे करण्यामागचे कारण म्हणजे चंदनाचा सुगंध सर्वत्र पसरल्याने हवा शुद्ध होते अशी त्यांची श्रद्धा आहे.

 पतेतीच्या शुभेच्छा

अशा देतात पतेतीच्या शुभेच्छा (These are the wishes of Pateti)

भारतात जवळपास 60 हजार पारशी लोकं राहतात. पारशी लोकांचा धर्म झोरास्ट्रियन आहे, तर ‘अवेस्ता’ पारशी धर्मग्रंथ हा आहे. तुम्ही देखील तुमच्या पारशी मित्रमैत्रिणींना पारसी नववर्षाच्या शुभेच्छा देत असाल तर ‘पारशी नूतनवर्षाभिनंदन’ किंवा ‘हॅप्पी नवरोझ’ असं म्हणून त्यांचा आनंद द्विगुणित करू शकता.

हे पण वाचा

महत्वाचे

पतेती हा पारशी बांधवांचा नववर्ष दिवस. महात्मा गांधी पारशी बांधवां विषयी म्हणाले होते की हा समाज भारताच्या लोकसंख्येच्या तुलनेत फक्त ०.००७% आहे पण त्यांची कामगिरी मात्र उल्लेखनीय आहे. खरोखर स्वातंत्र सैनिकां पासून ते उद्योजकां पर्यंत पारश्यांनी आपले वर्चस्व सिध्द केले आहे. इस्रायल कॅलेंडर प्रमाणे वर्षाच्या ह्या पहिल्या दिवसाला ‘नवरोज’ म्हटले जाते. नवरोजचा अर्थ जणू सृष्टी नवीन हिरवा शेला अंगावर पांघरुन स्वागताला उभी आहे. ह्या दिवशी अग्यारीत जाऊन प्रार्थना म्हटल्या जातात आणि खास पारशी भोजनाचा आस्वाद घेतला जातो.

भारतात इतरत्र पारशी हॉटेल्स आढळली नाहीत तरी मुंबईत त्यांचे स्थान खवय्यांच्या मनात वरचे आहे. बोली भाषेत त्यांना ‘इराण्याचे’ हॉटेल म्हटले जाते. पारंपारिक संगमरवराचे गोल टेबल आणि विशिष्ट रचनेच्या खुर्च्या ही पारशी हॉटेल्सची मुख्य खुण. ह्या हॉटेल्स मध्ये आकूरी, पोरो, वेगवेगळे केक्स, खारी, ब्रून-मसका आणि मसाला चहाचा आनंद काही औरच आहे.

Leave a comment