रवींद्रनाथ टागोर माहिती मराठी : Rabindranath Tagore Information In Marathi

रवींद्रनाथ टागोर माहिती मराठी : Rabindranath Tagore Information In Marathi – प्रत्येकाच्या मनात आपला ठसा उमटविणाऱ्या, रवींद्रनाथ टागोर यांना आपल्या देशातील सर्वजण ओळखतात. एक महान कवी म्हणून त्यांची ख्याती विश्वात पसरलेली आहे. ते केवळ कवीच नव्हते, तर थोर साहित्यिक, कथाकार, गीतकार, संगीतकार, नाटककार, निबंधकार, चित्रकार, विचारक आणि मार्गदर्शक देखील होते. त्यांना लोक गुरुदेव म्हणायचे. भारताचे राष्ट्रगीत हे त्यांचेच वरदान आहे. रवींद्रनाथ टागोर यांचा जन्म ०७ मे १८६१ रोजी झाला.

बालपणापासून साहित्याची आवड असल्याने, ते एक महान कवी आणि प्रसिद्ध साहित्यकार म्हणून उदयास आले. वयाच्या आठव्या वर्षी त्यांनी आपली पहिली कविता लिहिली. त्यांनी जवळजवळ २२३० गीत रचना केल्या. तसेच बंगाली साहित्यात आपले अमूल्य योगदान दिले. साहित्यात आपल्या योगदानाकरिता १९१३ साली त्यांना नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रवींद्रनाथ एक अनुभवी आणि उत्तम चित्रकार देखील होते.

आजच्या लेखाद्वारे आम्ही महान कवी रवींद्रनाथ यांच्या बद्दल माहिती दिली आहे. हा लेख तुम्ही सविस्तर वाचवा.

Table of Contents

रवींद्रनाथ टागोर माहिती मराठी : Rabindranath Tagore Information In Marathi

पूर्ण नाव रवींद्रनाथ टागोर
जन्मतारीख ७ मे १८६१
जन्मस्थळ कोलकाताच्या जोरासाक्सची ठाकुरबरी
वडिलांचे नाव श्री देवेंद्रनाथ टागोर
आईचे नाव शारदा देवी
धर्म हिंदु
भाषा बंगाली, इंग्रजी
प्रसिद्धी लेखक आणि चित्रकार,कथाकार, निबंधकार
प्रसिद्ध रचना गीतांजली
पुरस्कार साहित्यामधील नोबेल पारितोषिक
मृत्यू ७ ऑगस्ट १९४१

रवींद्रनाथ टागोर यांचा परिचय

रवींद्रनाथ टागोर एक उत्तम कवी, साहित्यक, कथाकार, निबंधकार होते. रवींद्रनाथांकडे उत्कृष्ट प्रतिभांचा मौल्यवान खजिना होता. त्यांचे संपूर्ण जीवन हे उदाहरण व शिक्षणाच्या गोष्टींनी परिपक्व आहे. रवींद्रनाथ टागोर अशा काही महान लेखकांपैकी एक लेखक आहेत, ज्यांनी मृत्यूच्या क्षणापर्यंत काहीतरी शिकत राहण्याचा ध्यास धरला होता. रवींद्रनाथ टागोर हे असे महान कवी व लेखक होते, ज्यांना साहित्याचे नोबेल पारितोषिक हा महान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. आजही टागोरांच्या लेखनाचा जगभरातील विद्यार्थी अभ्यास करतात. रवींद्रनाथ टागोर यांना बंगालचे बार्ड म्हणून ओळखले जाते.

रवींद्रनाथ टागोर

रवींद्रनाथ टागोर यांचा जन्म

कलकत्ताच्या जोरासाक्सची ठाकुरबरी येथे रवींद्रनाथ टागोर यांचा जन्म झाला. वडील देवेंद्रनाथ टागोर व आई शारदा देवी यांच्या १४ अपत्यांमध्ये रवींद्रनाथ हे तेरावे होते. अकराव्या वर्षी मुंज झाल्यावर रवींद्रनाथांनी वडिलांसोबत १४ फेब्रुवारी १८७३  रोजी भारत भ्रमणार्थ कलकत्ता सोडले. या भ्रमंतीत त्यांनी विविध ठिकाणे पाहिली. वडिलांची शांतिनिकेतन येथील मालमत्ता, अमृतसर व हिमालयातील थंड हवेचे ठिकाण, डलहौसी, इत्यादी. येथे रवींद्रनाथांनी विविध व्यक्तींची आत्मचरित्र वाचली. इतिहास, खगोलशास्त्र, विज्ञान, कालिदासाचे काव्य, व संस्कृत आदींचे अध्ययन केले.

१८७७ साली प्रकाशित झालेल्या रचनांमुळे रवींद्रनाथ प्रथम लोकांसमोर आले. यात मैथिली कविता असलेल्या काही दीर्घ कविता होत्या. विनोदाने रवींद्रनाथांनी प्रथम या भानुसिंह नामक वैष्णव कवीने सतराव्या शतकात असलेल्या व नंतर गहाळ झालेल्या रचना आहेत असा अविर्भाव केला. व नंतर त्याचे कवित्व मान्य केले. या जगाला त्यांनी सध्या बंगाली भाषेतील पहिली लघुकथा “भिकारिणी” ही  व सुप्रसिद्ध कविता  “निर्झरेर स्वप्नभंग” आधी रचना केल्या. बॅरिस्टर होण्यासाठी त्यांनी लंडनच्या युनिव्हर्सिटी कॉलेज येथे प्रवेश घेतला. परंतु १८८० मध्ये कोणत्याही पदवीशिवाय ते बंगालला परतले.

रवींद्रनाथ टागोर यांचे शिक्षण

रवींद्रनाथ टागोर यांना शालेय शिक्षण कधी आवडले नाही. तसेच ते बहुतेक वेळा तासनतास विचार करत असत. ते सर्वात प्रतिष्ठित सेंट झेवियर्स स्कूलमध्ये गेले आणि नंतर, इंग्लंडमधील ब्रिज्टन येथील लंडन विद्यापीठात कायद्याचा अभ्यास करण्यासाठी आणि बॅरिस्टर बनण्यासाठी गेले. तरीही, त्यांना शालेय शिक्षण फारसे आवडले नाही. दोन वर्षांत ते पदवीशिवाय घरी परतले. त्यांना शालेय शिक्षण फारसं आवडलं नसलं तरी ते नेहमी वह्या, पेन आणि शाई घेऊन सापडायचे. ते नेहमी त्यांच्या वहीत गोष्टी लिहीत असायचे तथापि, ते आपले लेखन उघड करण्यास लाजाळू होते.

रवींद्रनाथ टागोर यांचा विवाह

०९ नोव्हेंबर १८८३ रोजी त्यांनी मृणालिनी देवी यांच्याशी विवाह केला. या विवाहापासून त्यांना पाच अपत्य झाले. १८९० साली रवींद्रनाथ आणि सध्याच्या बांगलादेशातील सियालदा येथील टागोर घराण्याची मालमत्ता सांभाळण्यास सुरुवात केली. त्यांची पत्नी व मुले १८९८  साली येथे त्यांच्यासोबत आली. या काळात ते जमीनदार बाबू या नावाने ओळखले जात. हा काळ रवींद्रनाथांचा साधना काळ म्हणून ओळखला जातो.

आणि शांतिनिकेतनची स्थापना

१९०१ साली रवींद्रनाथ शांतिनिकेतन येथे राहण्यात आले. एका आश्रमाची स्थापना करणे हा त्यांचा उद्देश होता. या आश्रमात त्यांनी एका प्रार्थना गृहाची, प्रयोगशील शाळेची, बाग बगीचा व ग्रंथालयाची स्थापना केली. रवींद्रनाथांच्या पत्नीचा व दोन मुलांचा मृत्यू येथे झाला. वडिलांचे देहावसन १९ जानेवारी १९०५ रोजी घडले व वारसदार म्हणून रवींद्रनाथांना नियमित मासिक उत्पन्न मिळू लागले.

रवींद्रनाथ टागोर

याशिवाय त्यांना त्रिपुराच्या महाराजांकडून आर्थिक सहाय्य, कौटुंबिक दाग दागिने व पुरी ओडिषा येथील बांगला विकून काही प्राप्त झाले. त्यांचे साहित्य बंगाली व विदेशी वाचकांचे अधिकाधिक लक्ष खेचू लागले होते. नैवेद्य व खेळ या रचना या कालात प्रकाशित झाल्या. याशिवाय कविता या नावाने अनुवाद करणे ही सुरू होते.

रवींद्रनाथ टागोर यांचे कार्य

रवींद्रनाथ टागोर यांनी बंगालच्या वास्तविक परिस्थितीचे चित्रण करण्याच्या हेतूने, त्यांच्या अभुतपूर्व प्रतिभेने त्यांनी लोकांना स्वतःकडे आकर्षित केले. त्यांच्या कथांद्वारे त्यांनी दूरदर्शी कथा लिहिण्याऐवजी, त्यांनी जे पाहिले, जे अनुभवले, त्याचे रेखाटन करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पारंपारिक रूढीच्या समाजामधून लोकांना मुक्त करून, त्यांनी त्यांच्या लेखनाचा शस्त्र म्हणून वापर केला. रवींद्रनाथ टागोर यांच्या कार्यास जगभर पसंती व कौतुक प्राप्त झाले. व त्यांना असंख्य भाषांमध्ये अनुवादित केले गेले.

रवींद्रनाथ टागोर यांनी त्यांच्या कवितांद्वारे ब्रिटिश सरकारवर आवाज उठवला. त्यांच्या अनेक कविता समाजासाठी उपहासात्मक होत्या. त्यांची “मानसी” सर्वोत्कृष्ट कामांपैकी एक रचना आहे. ज्यामधून रवींद्रनाथांनी कोण प्रतिभावान लेखक होत आहे, उत्तम प्रकारे लोकांना दाखवून दिले. रवींद्रनाथ टागोर यांचा गीतांजली हा काव्यसंग्रह सर्वोत्कृष्ट असून आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेला आहे.

१४ नोव्हेंबर १९१३ रोजी टागोर यांना साहित्यातील नोबेल पुरस्कार प्राप्त झाला. गीतांजलीचे भाषांतर स्वतः रवींद्रनाथांनीच केले होते. १९१५ साली त्यांना ब्रिटिश सरकारने “सर” ही पदवी दिली. १९१९ च्या जालियनवाला बाग हत्याकांड्यानंतर त्यांनी ती सरकारला परत केली.

रवींद्रनाथ टागोर यांची राजकीय चळवळ

१९२१ साली रवींद्रनाथ व कृषी अर्थतज्ञ लिओनार्ड लिस्ट या शांतिनिकेतन जवळील सुरूल येथे एका ग्रामीण पुनर्निर्मान संस्थेची स्थापना केली. याच संस्थेचे रवींद्रनाथांनी पुढे श्री निकेतन असे नामकरण केले. श्री निकेतनच्या माध्यमातून महात्मा गांधींच्या प्रतीकात्मक स्वराज्य चळवळीला पर्याय देण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. ज्ञानसंवर्धनातून अज्ञानी व असाह्य ग्रामीण भागाची सुटका होईल, या उद्देशाने त्यांनी विविध देशातील विद्वान दाते व अधिकाऱ्यांस या उपक्रमात सहभागी करून घेतले.

१९३० सालापासून त्यांनी भारतातील पराकोटीच्या जातीयते विरुद्ध प्रचार सुरू केला. नाट्य, कविता, याद्वारे जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. केरळच्या मंदिरात दलितांना प्रवेश देण्यासाठी त्यांनी आवाहन केले. जीवनाच्या शेवटच्या दशकात रवींद्रनाथ पूर्णपणे जनसमुक होते. त्यांची लोकप्रियता, विशेषता, बंगालमध्ये शिखरावर होती.

१५ जानेवारी १९३४ रोजी बिहारमध्ये झालेल्या भूकंपाची महात्मा गांधींनी दलित अत्याचाराचा परमेश्वराने घेतला सूड अशी संभावना केली. या वक्तव्याचा रवींद्रनाथांनी निषेध केला. बंगालच्या आर्थिक व सामाजिक अवनतीबाबत व कोलकत्यातील भयावह दारिद्र्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. या दारिद्र्यावर केलेल्या मुक्तछंदातील १०० मुलींच्या कवितेचा प्रभाव सत्यजित रे याच्या अपूरा संसार या चित्रपटावर ही पडलेला दिसतो. पुनश्चन सप्तपत्रपूत अधिक गद्यपद यांचे समावेश असलेले स्वतःच्या लेखनाचे १५ खंड संपादित केले. या शिवाय चंडाल या एका नृत्य नाटिकांवर विविध प्रयोग केले.

रवींद्रनाथ टागोर

राष्ट्रगीताचे रचनाकार रवींद्रनाथ टागोर

रवींद्रनाथांनी लिहिलेली जनगणमन व अमार सोनार बंगला या रचना अनुक्रमे भारत व बांगलादेश यांची राष्ट्रगीते म्हणून स्वीकारण्यात आल्या. दोन राष्ट्रगीतांची जनकत्व असलेले रवींद्रनाथ हे पृथ्वीवरील एकमेव कवी आहेत. श्रीलंकेचे राष्ट्रगीतही त्यांच्या साहित्यातून प्रेरणा घेऊन तयार झाले.

जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्यविधाता!
पंजाब सिन्ध गुजरात मराठा द्राविड़ उत्कल बंग
विन्ध्य हिमाचल यमुना गंगा उच्छलजलधितरंग
तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिष मागे,
गाहे तव जयगाथा।
जनगणमंगलदायक जय हे भारत भाग्यविधाता!
जय हे, जय हे, जय हे, जय जय जय जय हे।।

रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेल्या कादंबऱ्या व इतर साहित्य

रवींद्रनाथ टागोरांनी त्यांच्या जीवनामध्ये विविध कादंबऱ्या व साहित्यांची रचना केली आहे. त्यामध्ये चतुरंग, चार अध्याय, नौका डुबी, घरे बाईरे, यांसारख्या चार लघु कादंबऱ्या व आठ मोठ्या कादंबऱ्या टागोरांनी लिहिल्या.

रवींद्रनाथ टागोर यांची आत्मकथा

रवींद्रनाथ टागोर यांनी सांगितलेल्या बालपणापासूनच्या आठवणी त्यांनी लिहिलेल्या “जीवनस्मृती” या पुस्तकामध्ये आहे.

रवींद्रनाथ टागोर यांचे संगीत

रवींद्रनाथ टागोर यांनी २२३० पेक्षा जास्त गीत रचना केल्या आहेत. यामध्ये त्यांनी भारताचे व बांगलादेशचे राष्ट्रगीत “जनगणमन” व “आमार शोनार बांगला” या अनुक्रमे राष्ट्रगीतांची रचना केलेली आहे. संगीताच्या दृष्टिकोनातून पाहिले गेल्यास “अभिजात भारतीय संगीत” व “अभिजात पाश्चात्त्य संगीत” या रवींद्रनाथ यांच्या संगीतांच्या प्रेरणा मानल्या जातात.

रवींद्रनाथ टागोर यांची चित्रकला

रवींद्रनाथ टागोर यांनी स्वतःच्या वयाच्या ६० वर्षी चित्रे काढण्यास सुरुवात केली. रवींद्रनाथ टागोर यांनी स्वतःच्या कृतीतून हस्तलिखिते ही अनेकदा आपल्या कलाकुसरीतून सजवली आहेत.

रवींद्रनाथ टागोर यांचा नाट्य सहभाग

रवींद्रनाथ टागोर यांनी वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षापासून वाल्मिकी प्रतिभा नावाचे पहिले नृत्य नाट्य लिहिले. या वाल्मिकी प्रतिभा नृत्य नाट्य मध्ये, रवींद्रनाथ आणि भजनाच्या स्वरूपामध्ये असणाऱ्या पारंपारिक बंगाली कीर्तन व युरोपमधील गीत शैलीचा संमिश्र वापर केलेला दिसून येतो. विसर्जन, चंदालिका, राजा, चित्रांगदा, मायार खेला, ही रवींद्रनाथ टागोर यांची इतर नाटके आहे. या नाटकांच्या जोडीला रवींद्रनाथ टागोर नृत्य नाटिका या गोष्टीसाठी सुद्धा विशेष प्रसिद्ध आहे. नृत्य नाटिकेमध्ये रवींद्रनाथ टागोर यांनी मणिपुरी शैलीच्या अभिजात नृत्य शैलीचा वापर केला आहे.

रवींद्रनाथ टागोर यांच्या लघुकथा

गल्फ गुच्छ नावाच्या रवींद्रनाथ टागोर यांच्या ८४ लघुकथांचा तीन खंडी संग्रह विशेष प्रसिद्ध आहे. व विरोधाभासयुक्त असे ग्रामीण बंगालचे सुरेख चित्र यात रवींद्रनाथांनी रेखाटले आहे. या लघुकथांमधून टागोर आजूबाजूचा परिसर आधुनिक कल्पना व बौद्धिक प्रश्नांचा वेध घेण्याचा प्रयत्न याद्वारे करतात.

रवींद्रनाथ टागोर यांची एक कविता

इच्छा

विपत्तीमध्ये तू माझे रक्षण कर
ही माझी प्रार्थना नाही;
विपत्तीमध्ये मी भयभीत होऊ नये
एवढीच माझी इच्छा|
दुःखतापाने व्यथित झालेल्या माझ्या मनाचे
तू सांत्वन करावेस अशी माझी अपेक्षा नाही.
दुःखावर जय मिळवता यावा
एवढीच माझी इच्छा|
जगात माझे नुकसान झाले
केवळ फसवणूक वाट्याला आली;
तर माझे मन खंबीर व्हावे
एवढीच माझी इच्छा|
माझे तारण तू करावेस वा मला तारावेस ही माझी प्रार्थना नाही.
तरून जाण्याचे सामर्थ्य माझ्यात असावे
एवढीच माझी इच्छा|
माझे ओझे हलके करून
तू माझे सांत्वन केले नाहीस तरी माझी तक्रार नाही
ते ओझे वाहायची शक्ती मात्र माझ्यात असावी
एवढीच माझी इच्छा|
सुखाच्या दिवसांत नतमस्तक होऊन
मी तुझा चेहरा ओळखावा
दुःखांच्या रात्री जेव्हा, सारे जग फसवणूक करील,
तेव्हा तुझ्याविषयी माझ्या मनात शंका मात्र निर्माण होऊ नये, एवढीच माझी इच्छा|

रवींद्रनाथ टागोर यांची अखेरची वर्षे

रवींद्रनाथ यांनी अखेरच्या काळात विज्ञानात रवींद्रनाथांनी विशेष रस घेतला. यातूनच त्यांच्या विश्व परिचय या निबंध संग्रहाची निर्मिती झाली. भौतिकी व खगोलशास्त्राचा त्यांनी केलेल्या अभ्यासाचा प्रभाव त्यांच्या कवितेवरही जाणवतो. त्यांच्या कवितेतून झलकणारा निसर्गवाद, हा त्यांना वैज्ञानिक नियमांप्रती त्यांना असलेला आदर अधोरीखित करतो. विज्ञानाची प्रगती त्यांनी आपल्या विविध रचनांमधून मांडली.

रवींद्रनाथ टागोर यांचा मृत्यू

रवींद्रनाथांच्या आयुष्यातील शेवटची चार वर्षे प्रदीर्घ व्याधी व आजारपणांनी व्यापली. १९३७ साली शुद्ध हरपून ते बराच काळ कोमात होते. पुन्हा १९४० सालचा कोमा जीवघेणा ठरला. या शेवटच्या काळात लिहिलेल्या, रवींद्रनाथांच्या काव्यरचना सर्वश्रेष्ठ मानण्यात येतात. त्यांचे मृत्यू विषयक चिंतन या ग्रंथातून प्रकटते. ०७ ऑगस्ट १९४१ रोजी रवींद्रनाथांचा कोलकत्याच्या त्यांच्या वडिलोपार्जित जोरासाक्सची ठाकुरबरी येथे मृत्यू झाला.

रवींद्रनाथ टागोर यांचे प्रेरणादायी विचार

  • आपण धोक्यांपासून सुरक्षित रहावे अशी प्रार्थना न करता, त्यांना तोंड देताना निर्भय होण्यासाठी प्रार्थना करा.
  • आपण आपल्याला पटलेल्या तत्त्वाप्रमाणे वागावे, आणि दुसऱ्यालाही वागू द्यावे.
  • आपण महान त्याच्या सर्वात जवळ तेव्हा असतो, जेव्हा आपण नम्रपणात महान असतो.
  • आपण सर्वश्रेष्ठाची निवड करू शकत नाही, सर्वश्रेष्ठ आपली निवड करते.
  • कला ही जीवनाची दासी आहे. तिचे कार्य जीवनाची सेवा करणे हे आहे.
  • मातीच्या बंधनापासून मुक्ती म्हणजे झाडासाठी आजादी नव्हे, कलाकार हा निसर्गप्रेमी असतो. त्यामुळे तो निसर्गाचा दासही असतो. आणि स्वामीही असतो.
  • नेहमी तर्क करणाऱ्या, विचार धारदार चाकू समान आहे. जो वापरणाऱ्याच्या हातातून रक्त काढतोच.
  • जीवन म्हणजे एक अनंत आव्हान, प्रदीर्घ, साहस व पात्रतेची कसोटी आहे. जे चांगले आहे, ते काही एकटे येत नाही, ते सर्व मंगल गोष्टी सोबत घेऊन येते.
  • चंद्र आपला प्रकाश संपूर्ण आकाशात पसरवतो, परंतु कलंक स्वतः जवळ ठेवतो.
  • जो मनुष्य आपल्या मनाची वेदना, मनातले दुःख, स्पष्टपणे दुसऱ्यांना सांगू शकत नाही. त्याला अधिक राग येत असतो.
  • फक्त प्रेमच वास्तविकता असते, ती केवळ भावना नसते, ते एक परम सत्य आहे.
  • जे सृष्टीच्या हृदयात राहते, मानवी जीवन नीतीनिरपेक्षक कधीच असू शकत नाही. त्याला नीतीचा पाया असलाच पाहिजे.
  • ज्याप्रमाणे पक्षांच्या आश्रयस्थान घरटे असते. त्याचप्रमाणे आपल्या वाणीचे असल्या स्थान मौन असते.
  • थोडे वाचणे, पण अधिक विचार करणे, थोडे बोलणे, पण अधिक ऐकणे, हाच बुद्धिमान बनण्याचा उपाय आहे.
  • आत्म्यामध्ये परमात्म्याचा साक्षात्कार प्राप्त करणे, हे जीवनाचे ध्येय असते.
  • विश्वासा असा पक्षी आहे की, जो उषाकाला पूर्वीच्या अंधारात प्रकाशाचा अनुभव घेत असतो.
  • एखाद्या मुलाचे शिक्षण आपल्या ज्ञानापुरते मर्यादित ठेवू नका, कारण त्याचा जन्म दुसऱ्या काळात झालेला आहे.
  • परमेश्वराच्या महान शक्तीचे दर्शन वादळ वाऱ्यात होत नसून, ते वाऱ्याच्या झोप मध्येच होते.
  • पात्रता नाही म्हणून आपण एकमेकांना भेटणे बंद केले, तर आपल्यापैकी बऱ्याच जणांना अज्ञातवासात जावे लागेल.
  • पात्रातील पाणी नेहमीच चमकत असते, आणि समुद्राचे पाणी नेहमीच गडद असते. लघु सत्तेचे शब्द नेहमी स्पष्ट असतात, महान सत्य मौन असते.
  • पायदळी चुरगळलेली फुले, चुरगळणाऱ्या पायाला आपल्या सुगंध अर्पण करतात. खऱ्या क्षमेचे हेच कारण आहे.
  • प्रकाश जेव्हा काळ्या ढगांना स्पर्श करतो, तेव्हा तो स्वर्गाचे फुल बनवतो. फुलांच्या पाकळ्या तोडणाऱ्याला फुलांचे सौंदर्य कधीच अनुभवता येत नाही.
  • प्रांतीय आणि जातीय भावना मनात आणून न देता, व्यक्तींनी भेदभाव विसरायला हवा. आणि आपण सर्व एक आहोत हीच भावना मनात बाळगायला हवी.
  • महत्वकांक्षाच्या वेलीला पाणी घातल्याशिवाय, यशाची मधुर फळे हाती लागत नाहीत. तथ्य अनेक असले तरी, सत्य एकच आहे.
  • नदीकाठी उभे राहून फक्त पाणी बघितल्याने, आपण नदी पार करू शकत नाही. जे आपले आहे ते आपल्याला मिळणारच, जर आपण ते साध्य करण्याची क्षमता निर्माण केली, तरच.
  • खरे प्रेम स्वातंत्र्य देते, अधिकार गाजवत नाही.
  • जी व्यक्ती नेहमीच दुसऱ्यांचे चांगले करण्यात व्यस्त असते, त्यांच्याकडे स्वतः चांगले होण्यासाठी वेळ पुरत नाही.
  • प्रत्येक मूल जगात येताना संदेश देते की, देव अजूनही मनुष्यांकडून निराश झालेला नाही.
  • एका फुलाने काट्यांचा द्वेष करू नये, फुल एकच आहे, पण काट्यांची संख्या जास्त आहे.
  • पुढे ढकलण्यात आलेली प्रत्येक अडचण नंतर भूत बनवून आपल्या शांततेत अडथळा आणेल.
  • कलेमध्ये व्यक्ती स्वतःला प्रदर्शित करते, कलाकृतीला नाही.
  • विश्वास हा एक असा पक्षी आहे, जो अंधारात असताना, देखील प्रकाशाची जाणीव करून देतो.
  • ज्यांच्याकडे खूप काही आहे, त्यांच्याकडे घाबरण्यासाठी बरेच काही आहे.
  • आयुष्यातून सूर्यप्रकाश निघून गेला म्हणून, जर तुम्ही रडत बसाल, तर तुमच्या अश्रूंमुळे तुम्ही रात्रीचे मोहक चांदणे ही पाहू शकणार नाही.
  • माणुसकी असेल तर, तुम्ही कोणतेही यश सहजपणे संपादन करू शकता.
  • आनंदी राहणे, खूप सोपे असते. परंतु साधेपणा अंगीकारणे कठीण असते.
  • महिलांच्या स्वभावातील सर्वात मोठे बदल प्रेमाद्वारे घडून आणले जाऊ शकतात. तर पुरुषांमधील महत्वकांक्षेने.
  • विधाता मोठया साम्राज्यांपासून विमुख होऊ शकतो. परंतु इवल्याच्या फुलांपासून त्याला विमुख होता येत नाही.
  • जर चित्रकलेचा मुख्य घटक रेषा असेल, तर काव्याचा मुख्य घटक शब्द असतो.
  • स्वातंत्र्य आणि स्वावलंबनाच्या वातावरणात, विद्यार्थ्यांच्या मनावर सुसंस्कार घडावेत, आपण जगाचे नागरिक आहोत ही भावना वाढीस लागावी, आणि तसेच समर्थ नागरिक बनण्याची पात्रता, त्यांच्या अंगी यावी.
  • देशाला जसे स्वातंत्र्य हवे, तसेच ते व्यक्तिमत्वालाही हवे. ते जर असेल तरच त्या व्यक्तीला स्वतःच्या विकासाचा मार्ग सापडू शकतो.
  • कोंदट आणि ठरीव अभ्यासक्रम असलेल्या शालेय जीवनामुळे संपन्नता येणार नाही, मनाचा विकास होणार नाही.
  • अन्यायाने वागून माणसाला वैभव लाभेल. दृष्टीला जे प्रिय वाटते त्याची प्राप्ती देखील होईल. शत्रूंनाही जिंकता येईल. पण मुळाशीच कीड लागून त्याचा नाश होईल.
  • प्रेमाच्या आसनावर ज्याचे स्थान अमर आहे, त्याला मृत्यूच्या शासनाचे भय काय ?

रवींद्रनाथ टागोर यांची पुस्तके

  • एकविंशति (कथासंग्रह, साहित्य अकादमी प्रकाशन)
  • काबुलीवाला आणि इतर कथा (अनुवादक – मृणालिनी गडकरी)
  • गीतांजली (काव्य, मेहता प्रकाशन)
  • चक्षूशल्य (कथासंग्रह, साहित्य अकादमी प्रकाशन)
  • चित्रांगदा (लेखसंग्रह; अनुवादक – गंगाधर गवाणकर)
  • जीवनस्मृती (आत्मचरित्र, अनुवादक – नीलिमा भावे)
  • तीन सांगातिणी (व्यक्तिचित्रणे, अनुवादक – मृणालिनी गडकरी)
  • देवदूत (कथासंग्रह, भावानुवाद – विजया भुसारी)
  • नष्ट नीड (कादंबरी, अनुवादक – नीलिमा भावे)
  • पोरवय (आठवणी, अनुवादक – पु.ल. देशपांडे)
  • पोस्टमास्तर आणि इतर कथा (अनुवादक – मृणालिनी गडकरी)
  • बऊठाकुरानीर हाट (कादंबरी, मेहता प्रकाशन)
  • भानुसिंहाची पत्रावली (रवींद्रनाथांची पत्रे, अनुवादक – विलास गिते)
  • योगायोग (साहित्य अकादमी प्रकाशन)
  • रवीन्द्र गीताली (माहितीपर, विजय प्रकाशन-नागपूर)
  • रवीन्द्र कल्पना (कवितासंग्रह, अनुवादक – डॉ.राम म्हैसाळकर, विजय प्रकाशन-नागपूर)
  • रवीन्द्र काव्यांजली (माहितीपर, विजय प्रकाशन-नागपूर)
  • रवीन्द्र गीतिमाल्य (विजय प्रकाशन-नागपूर)
  • रवीन्द्र जन्मदिने (माहितीपर, अनुवादक – डॉ. राम म्हैसाळकर, विजय प्रकाशन-नागपूर)
  • रवींद्रनाथ टागोरांच्या निवडक कथा (अनुवादक – आराधना कुलकर्णी)
  • रवींद्रनाथ टागोरांच्या बालकविता (बालसाहित्य, अनुवादक – पद्मिनी बिनीवाले)
  • रवीन्द्र पथिक (माहितीपर, विजय प्रकाशन-नागपूर)
  • रवीन्द्र भावांजली (माहितीपर, विजय प्रकाशन-नागपूर)
  • रवीन्द्र शेषलेखा (माहितीपर, अनुवादक – डॉ. राम म्हैसाळकर, विजय प्रकाशन-नागपूर)
  • रवीन्द्र क्षणिका (रवींद्रनाथांच्या क्षणिका व चैतालि या काव्यसंग्रहाचा भावानुवाद, अनुवादक – डॉ. राम म्हैसाळकर, विजय प्रकाशन-नागपूर)
  • रशियाहून लिहिलेली पत्रे (लोकवाङ्मय प्रकाशन)
  • सोनार तरी (कवितासंग्रह, अनुवादक – डॉ. राम म्हैसाळकर, विजय प्रकाशन-नागपूर)
  • स्वदेशी समाज आणि साधना (वैचारिक, अनुवादक – साने गुरुजी)

रवींद्रनाथ टागोर गीतांजली

1901 मध्ये, टागोरांनी त्यांची सर्वात प्रसिद्ध रचना, “गीतांजली” प्रकाशित केली, ज्याने त्यांना आंतरराष्ट्रीय ख्याती मिळवून दिली. हा संग्रह सुरुवातीला बंगाली भाषेत प्रकाशित झाला आणि नंतर टागोरांनी स्वतः इंग्रजीत अनुवाद केला. “गीतांजली” टागोरांच्या गीतात्मक आणि अध्यात्मिक काव्याचे प्रदर्शन करते, जे निसर्ग, प्रेम आणि दैवी यांच्याशी त्यांचे खोल संबंध प्रतिबिंबित करते. “गीतांजली” च्या प्रकाशनाने टागोरांना 1913 मध्ये साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळवून दिले, ज्यामुळे ते हा प्रतिष्ठित पुरस्कार प्राप्त करणारे पहिले गैर-युरोपियन बनले.

रवींद्रनाथ टागोर यांना नोबेल पुरस्कार

टागोरांना त्यांची रचना ‘गीतांजली’साठी नोबेल मिळाले. गीतांजली ही मूळ बंगाली भाषेत लिहिली गेली होती. टागोरांनी या कवितांचा इंग्रजीत अनुवाद करायला सुरुवात केली. त्यांनी काही अनुवादित कविता त्यांच्या चित्रकार मित्र विल्यम रोथेनस्टाईनसोबत शेअर केल्या. विल्यमला कविता खूप आवडल्या. त्यांनी या कविता प्रसिद्ध कवी प. बी. येट्स वाचायला दिल्या. त्यांनाही या कविता आवडल्या आणि त्यांनी गीतांजली हे पुस्तक वाचण्यासाठी मागवले. हळूहळू गीतांजली पाश्चात्य साहित्य विश्वात प्रसिद्ध होऊ लागली. अखेरीस 1913 मध्ये त्यांना साहित्यासाठी नोबेल देण्यात आले. 

गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्याबद्दल मराठी पुस्तके

  • गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर (चरित्र, व्यक्तिचित्रण, उज्ज्वला दीक्षित)
  • रविंद्रनाथ टागोर (प्रतिभा लेले)
  • रवींद्रनाथ टागोर: एक संपन्न व्यक्तिमत्त्व (पद्मिनी बिनीवाले)
  • रवींद्रनाथ टागोर युगनिर्माता विश्वमानव (डॉ. नरेंद्र जाधव)
  • रवींद्रनाथ-शुभ बुद्धीचे उपासक (आशा साठे)
  • रवींद्रनाथ टागोर समग्र साहित्यदर्शन (डॉ. नरेंद्र जाधव)

रवींद्रनाथ टागोर यांचा व्हिडिओ

FAQ

१. रवींद्रनाथ टागोर यांचे पूर्ण नाव काय?

कोलकाताच्या जोरासाक्सची ठाकुरबरी येथे रवींद्रनाथ टागोर यांचा जन्म झाला.त्यांना गुरदेव रवींद्रनाथ टागोर म्हणून ओळखले जाते. वडील देवेंद्रनाथ टागोर व आई शारदा देवी यांच्या १४ आपत्यांमध्ये रवींद्रनाथ हे तेरावे होते.

२. रवींद्रनाथ टागोर यांचा मृत्यू कधी झाला?

रवींद्रनाथांच्या आयुष्यातील शेवटची चार वर्षे प्रदीर्घ व्याधी व आजारपणांनी व्यापली. १९३७ साली शुद्ध हरपून ते बराच काळ कोमात होते. पुन्हा १९४० सालचा कोमा जीवघेणा ठरला. या शेवटच्या काळात लिहिलेल्या, रवींद्रनाथांच्या काव्यरचना सर्वश्रेष्ठ मानण्यात येतात. त्यांचे मृत्यू विषयक चिंतन या ग्रंथातून प्रकटते. ०७ ऑगस्ट १९४१ रोजी रवींद्रनाथांचा कोलकत्याच्या त्यांच्या वडिलोपार्जित जोरासाक्सची ठाकुरबरी येथे मृत्यू झाला.

३. रवींद्रनाथ टागोर यांना नोबेल पुरस्कार कधी मिळाला?

रवींद्रनाथ टागोर यांचा गीतांजली हा काव्यसंग्रह सर्वोत्कृष्ट असून आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेला आहे.१४ नोव्हेंबर १९१३ रोजी टागोर यांना साहित्यातील नोबेल पुरस्कार प्राप्त झाला. गीतांजलीचे भाषांतर स्वतः रवींद्रनाथांनीच केले होते.

४. रवींद्रनाथ टागोरांची किती नावे आहेत?

रवींद्रनाथ टागोर यांना भानू सिंगा ठाकूर या त्यांच्या टोपण नावाने सुद्धा ओळखले जाते, तसेच टागोर यांना गुरूदेव, कबिगुरु आणि बिस्वकाबी या नावानेही ओळखले जातात, रवींद्रनाथ भारतीय एक कवी, संगीतकार आणि चित्रकार होते.

निष्कर्ष

मित्रहो, आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास रवींद्रनाथ टागोर यांच्या बद्दल माहिती दिली आहे. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला कळवा. व लेख आवडल्यास तुमच्या इतर मित्रपरिवारांसोबत नक्की शेयर करा. धन्यवाद.

Leave a comment