राज कपूर माहिती मराठी | Raj Kapoor Information In Marathi – राज कपूर हे भारतीय चित्रपट सृष्टीतील प्रमुख व लोकप्रिय अभिनेते म्हणून ओळखले जातात. यांना दिग्दर्शक, निर्माता, म्हणून हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये महत्त्वाचे स्थान आहे. त्यांनी त्यांच्या उत्तम अभिनयाने हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये महत्वाचे स्थान प्राप्त केले आहे.
यांच्या चाहत्यांनी यांना भारतीय चित्रपटाचे “चार्लिन चॅप्लिन ”, “द शोमन”, “राज साहेब”, इत्यादी. नावाने संबोधले आहे. कपूर यांनी बरसात, आवारा, जेल यात्रा, श्री 420, जागते रहो, शारदा, परवरीश, राम तेरी गंगा मैली, प्रेम रोग, मेरा नाम जोकर, कल आज और कल, संगम, धरम करम, इत्यादी. सुपरहिट पिक्चर मध्ये काम केले आहे.
यांचे १९३५ पासून १९८८ पर्यंत हिंदी चित्रपट सृष्टी मध्ये योगदान लाभले. त्यांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये उत्तम कामगिरी केली असून, त्यांच्या योगदानाबद्दल हिंदी सिनेमा सृष्टीद्वारे त्यांना सन्मानित सुद्धा केले गेले.
आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास प्रसिद्ध व लोकप्रिय राज कपूर यांच्या बद्दल माहिती दिलेली आहे. ही माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत पूर्ण वाचा.
राज कपूर माहिती मराठी | Raj Kapoor Information In Marathi
पूर्ण नाव | रणबीर राज कपूर |
जन्म तारीख | दि. १४ डिसेंबर १९२४ |
जन्म स्थळ | पेशावर (पाकिस्तान) |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
पदार्पण | बालकलाकार म्हणून : चित्रपट – इंकलाब (१९३५) दिग्दर्शक म्हणून : चित्रपट – आग (१९४८) |
व्यवसाय | अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक |
ओळख | प्रसिद्ध अभिनेता, बॉलिवूडचा शोमन |
मुख्य चित्रपट | आग, नीलकमल, मेरा नाम जोकर, जागते रहो, आवरा, श्री ४२०, राम तेरी गंगा मैली. |
मृत्यू | दि. ०२ जून १९८८ |
मृत्यूचे ठिकाण | नवी दिल्ली, भारत |
मृत्यूचे कारण | हृदयविकाराचा झटका |
आवडते खाणे | चिकन बिर्याणी छोटे समोसे कॅरमल कस्टर्ड |
आवडता अभिनेता | दिलीप कुमार |
आवडती अभिनेत्री | नर्गिस |
आवडते पेय | ब्लॅक लेबल व्हिस्की |
आवडता संगीतकार | शंकर जयकिशन |
आवडते संगीत वाद्य यंत्र | अकॉर्डियन |
राज कपूर यांचा जन्म आणि सुरुवातीचे जीवन
- यांचा जन्म दि. १४ डिसेंबर १९२४ रोजी पेशावर म्हणजेच पाकिस्तान या ठिकाणी झाला. यांच्या वडिलांचे नाव पृथ्वीराज कपूर व आईचे नाव हे राम सरणी देवी कपूर असे होते. कपूर यांचा जन्म हिंदी सिनेमा सृष्टीमधील प्रसिद्ध कपूर कुटुंबामध्ये झाला असल्यामुळे, त्यांना एक वेगळी ओळख सुद्धा प्राप्त झाली. राज यांना शम्मी कपूर, शशि कपूर, नंदि कपूर व देवी कपूर असे चार भाऊ होते व उर्मिला सियाल कपूर ही एक बहीण सुद्धा होती.
- राज यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण जेवियर्स कोलगेट स्कूल कोलकत्ता व कर्नल ब्राऊन केंब्रिज स्कूल डेहराडून येथून पूर्ण केले. इयत्ता सहावी मध्ये असताना, राज हे नापास झाले होते. त्यानंतर त्यांना शिक्षण पूर्ण करण्याची आवड राहिली नाही व त्यांनी त्यानंतर शाळा सोडण्याचा निर्णय घेतला.
- लहानपणापासूनच राज यांना अभिनयामध्ये प्रचंड आवड होती. अगदी लहान वयामध्ये त्यांनी हिंदी सिनेमा सृष्टीमध्ये काम करण्यास सुरुवात केली.
- हे सुद्धा वाचा – लता मंगेशकर माहिती मराठी
- हे सुद्धा वाचा – शांता शेळके यांची माहिती मराठी
- हे सुद्धा वाचा – बाबा आमटे माहिती मराठी
- हे सुद्धा वाचा – अभिनेत्री रंजना देशमुख
राज कपूर यांची कौटुंबिक माहिती
आईचे नाव | पृथ्वीराज कपूर |
वडिलांचे नाव | रामशर्णी देवी कपूर |
भावाचे नाव | शशी कपूर, शम्मी कपूर, नंदी कपूर |
बहिणेचे नाव | उर्मिला सियाल कपूर |
पत्नी | कृष्णा मल्होत्रा |
अपत्य | रणधीर कपूर, राजीव कपूर व ऋषी कपूर, रितू नंदा, रीमा जैन |
राज कपूर यांचे व्यावसायिक जीवन
राज कपूरच्या चित्रपटांचा सुरुवातीचा काळ
- राज यांना लहानपणापासूनच चित्रपट सृष्टीत काम करायची फार आवड होती. १९३५ मध्ये प्रकाशित झालेल्या इन्कलाब या चित्रपटांमधून बालकलाकार म्हणून राज हे पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर आले.
- यानंतर १९४३ पासून राज एक तरुण अभिनेता म्हणून चित्रपटसृष्टीमध्ये काम करायला लागले. १९४३ मध्ये राज कपूर यांनी एका चित्रपटांमध्ये काम केले, ज्या चित्रपटाचे नाव होते “गौरी” ज्याचे दिग्दर्शक हे केदारनाथ शर्मा होते. या चित्रपटात राज यांनी एक लहानशी भूमिका साकारली होती.
- १९४७ सालामध्ये राज यांनी गजानन जहागीरदार यांनी दिग्दर्शित केलेला जेलयात्रा या चित्रपटांमध्ये एक छोटी भूमिका साकारली. तसेच त्याच वर्षी त्यांनी नीलकमल या चित्रपटांमध्ये सुद्धा अभिनय केला.
- नीलकमल या चित्रपटाचे दिग्दर्शक केदारनाथ शर्मा हे होते. केदारनाथ शर्माने राज यांना नीलकमल या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेमध्ये, पडद्यासमोर आणले. या नीलकमल चित्रपटांमध्ये राज यांनी मधुसूदन या नावाची भूमिका साकारली होती.
राज कपूरच्या चित्रपटांचा नंतरचा प्रवास
- १९४८ मध्ये राज यांनी अभिनयासोबत स्वतःला एक उत्तम निर्माता व दिग्दर्शक बनवण्याची संधी दिली व त्यांनी त्यांच्या उत्तम निर्माता व दिग्दर्शकाच्या भूमिकेमध्ये साकारलेला “आग” हा चित्रपट पडद्यावर आला. आग हा चित्रपट राज यांनी दिग्दर्शित केलेला, पहिला चित्रपट होता. या चित्रपटामध्ये राज यांनी केवल खन्नाची भूमिका साकारली होती.
- राजने त्यांच्या कंपनीचे नाव “आर.के फिल्म” असे ठेवले. १९४९ मध्ये यांनी “अंदाज” या चित्रपटांमध्ये काम केले. या चित्रपटाचे दिग्दर्शक मेहबूब खान यांनी केले. या चित्रपटांमध्ये यांनी राजन नावाची व्यक्तिरेखा साकारली होती. या चित्रपटांमध्ये राज यांच्यासोबत दिलीप कुमार व नर्गिस यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. हा चित्रपट रसिक प्रेक्षकांना प्रचंड भावला व यांची लोकांमध्ये छाप उमटू लागली.
- १९५० मध्ये “सरगम” या चित्रपटांमध्ये यांनी एका सहाय्यक भूमिकेमध्ये अभिनय केला. १९५१ मध्ये यांनी स्वतःला चित्रपटसृष्टीमध्ये एक उत्तम अभिनेता म्हणून सिद्ध करून, लोकांमध्ये स्वतःची लोकप्रियता वाढवली.
- “आवारा” या चित्रपटांमध्ये यांनी राज रघुनाथ ही व्यक्तिरेखा साकारून, स्वतःचे नाव व स्वतःची छबी प्रेक्षकांच्या मनामध्ये उमटवली. या चित्रपटाचे दिग्दर्शन व निर्मितीचे काम सुद्धा यांनी पूर्ण केले.
- १९५३ मध्ये यांनी “आह” या चित्रपटांमध्ये काम केले. या चित्रपटाचे दिग्दर्शक राज नवनाथ यांनी केले. या चित्रपटात यांनी राज रायबहादूर ही व्यक्तिरेखा साकारली. या चित्रपटात त्यांच्यासोबत नर्गिस ही मुख्य भूमिकेमध्ये होती.
- १९५४ मध्ये यांनी पुन्हा एकदा एक सुपरहिट, ब्लॉकबस्टर चित्रपट बनवला. त्यावर्षी त्यांनी एका चित्रपटांमध्ये “बूट पॉलिश” करण्याचे काम केले. या चित्रपटाचे दिग्दर्शक प्रकाश अरोरा व निर्माता स्वतः राज होते.
राज कपूरच्या चित्रपटांचा यशस्वी प्रवास
- १९५५ मध्ये यांनी एक ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये उत्तम रोल केला. ज्या चित्रपटाचे नाव होते, “श्री 420” या चित्रपटाचे दिग्दर्शक हे स्वतः होते. ज्यात राज यांनी “रणबीर राज” व “पीपलीचा राज कुमार” पात्र साकारली होती. १९५५ मधील सर्वात ब्लॉकबस्टर व सुपरहिट चित्रपट म्हणून, श्री 420 या चित्रपटाकडे पाहिले जात असे. या चित्रपटांमध्ये राज सोबत अभिनेत्री नर्गिस हिने मुख्य भूमिका साकारली होती.
- १९५६ मध्ये राज यांचा “जागते रहो” हा चित्रपट आला. या चित्रपटांमध्ये राज यांनी एक अतिशय दमदार व ब्लॉकबस्टर अभिनय करून, प्रेक्षकांसमोर त्यांची एक वेगळी छाप निर्माण केली. या चित्रपटाचे दिग्दर्शक शंभू मित्र व अमित मित्रा होते. या चित्रपटांमध्ये राजच्या अभिनयाचे सर्वांनी फारच कौतुक केले. प्रेक्षकांना सुद्धा हा चित्रपट भन्नाट आवडला होता. तोपर्यंत यांनी हिंदी सिनेमा सृष्टीमध्ये स्वतःचा दबदबा निर्माण केला.
- त्यानंतर त्याच वर्षी म्हणजेच १९५६ मध्ये “चोरी चोरी” हा चित्रपट प्रकाशित झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शक अनंत ठाकूर यांनी केले. या चित्रपटांमध्ये यांनी सागर व सुलताना डाकू ही पात्रे साकारली. या चित्रपटाला सुद्धा प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद प्राप्त झाला.
- १९५७ मध्ये यांनी “शारदा” या चित्रपटांमध्ये काम केले. ज्या चित्रपटाचे दिग्दर्शक एल. व्ही प्रसाद व स्वतः राज यांनी केले. या चित्रपटांमध्ये राज यांनी चिरंजीव व शेखर ही पात्रे साकारली. या चित्रपटांमध्ये राज सोबत मीनाकुमारी या मुख्य भूमिकेमध्ये होत्या.
- १९५८ मध्ये राज यांचे दोन चित्रपट हे मोठ्या पडद्यावर यशस्वीरित्या नावाजले गेले. त्यातील पहिल्या चित्रपटाचे नाव होते “फिर सुबहा होगी” ज्याचे दिग्दर्शक रमेश सैगल होते. या चित्रपटांमध्ये यांनी राम बाबू या नावाची व्यक्तिरेखा साकारली होती व त्यांच्यासोबत माला सिन्हा या मुख्य भूमिकेमध्ये होत्या.
- त्यानंतर त्याच वर्षी दुसरा हिट चित्रपट “परवरिश” राज कपूर ने दिला. या चित्रपटाचे दिग्दर्शक एस बॅनर्जी होते. या चित्रपटांमध्ये यांनी राजा जयसिंग नावाचे पात्र साकारले. या चित्रपटाला सुद्धा प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला.
- १९६० मध्ये यांनी पहिल्यांदा “जिस देश मे गंगा बहती है” या चित्रपटांमध्ये काम केले, चित्रपटाचे दिग्दर्शक राधु कर्माकर यांनी केले. या चित्रपटांमध्ये यांनी राजू नावाची भूमिका साकारली. ज्यामध्ये त्यांच्यासोबत पद्मिनी व प्राण या दोघांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. जिस देश मे गंगा बहती है, १९६० मधील सर्वात लोकप्रिय व प्रसिद्ध चित्रपट म्हणून नावाजला, याच वर्षी यांनी छालीया चित्रपटांमध्ये काम केले व या चित्रपटाला सुद्धा प्रेक्षकांकडून प्रचंड साथ मिळाली.
- १९६४ मध्ये यांनी संगम या चित्रपटांमध्ये काम केले. ज्या चित्रपटाचे दिग्दर्शन निर्मिती व संपादन या तिन्ही गोष्टी यांनी मन लावून केल्या. या चित्रपटामध्ये यांनी सुंदर खन्ना या नावाची व्यक्तिरेखा साकारली. ज्या चित्रपटांमध्ये राज सोबत वैजयंतीमाला राजेंद्र कुमार हे मुख्य भूमिकेमध्ये होते. हा चित्रपट एक उत्तम कमाई करणारा व ब्लॉकबस्टर चित्रपट म्हणून नावाजला गेला.
- १९७० मध्ये राज यांनी एका जोकराच्या भूमिकेमध्ये स्वतःची ओळख लोकांसमोर आणली. या चित्रपटाचे नाव होते, “मेरा नाम जोकर” हा चित्रपट सर्वांना इतका भावला की, या चित्रपटाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. या चित्रपटांमधील “जिना यहा मरना यहा” या गाण्यामुळे राज यांना लोकांमध्ये एक वेगळे स्थान प्राप्त करून दिले. या चित्रपटाचे दिग्दर्शक, निर्माता व संपादक हे स्वतः होते. त्यामध्ये यांनी राज उर्फ जोकर ची भूमिका स्वीकारली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिस वर ब्लॉकबस्टर चित्रपटांच्या यादीमध्ये स्वतःचे स्थान प्राप्त केले. या चित्रपटाला विविध पुरस्कार देऊन राज यांना सन्मानित करण्यात आले.
- १९७३ मध्ये राज यांनी बॉबी या चित्रपटांमध्ये काम केले. या चित्रपटात राज यांनी एक अभिनेता म्हणून काम न करता, दिग्दर्शक व निर्माता म्हणून काम केले. हा चित्रपट सुद्धा प्रेक्षकांना प्रचंड आवडला. या चित्रपटाने सुद्धा बॉक्स ऑफिसवर यशस्वी चित्रपटांच्या यादीमध्ये स्वतःचे नाव नोंदवले.
- १९७५ मध्ये यांनी त्यांच्या मुलाने दिग्दर्शित केलेल्या, चित्रपटांमध्ये काम केले. ज्या चित्रपटाचे नाव “धरम करम” असे होते. या चित्रपटातील यांच्या मुख्य पात्राचे नाव अशोक कुमार असे होते. या चित्रपटांमध्ये सोबत रेखा, दारासिंग, प्रेमनाथ, यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या.
- १९७८ च्या दरम्याने यांनी एका चित्रपटांमध्ये काम केले व दुसऱ्या चित्रपटाचे दिग्दर्शक व निर्माते बनले. त्या चित्रपटांमध्ये यांनी “सत्यम शिवम सुंदरम” या चित्रपटाचे दिग्दर्शक,निर्मिती,संपादक तसेच निवेदकाची भूमिका साकारली.
- त्यानंतर यांनी १९७८ मध्ये नोकरी या चित्रपटांमध्ये काम केले. ज्या चित्रपटाचे दिग्दर्शक ऋषिकेश मुखर्जी यांनी केले. यांनी या चित्रपटामध्ये स्वराज सिंह ही व्यक्तिरेखा साकारली.
दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून राज कपूर यांचा चित्रपटांमधील यशस्वी प्रवास
- १९८२ मध्ये यांनी प्रेम रोग या चित्रपटांमध्ये उत्तम भूमिका साकारली. ज्या चित्रपटाचे दिग्दर्शक निर्माता व संपादक म्हणून त्यांनी काम पाहिले. या चित्रपटात शम्मी कपूर, ऋषी कपूर, पद्मिनी, तनुजा, रजा मुराद, ओमप्रकाश यांनी प्रमुख भूमिका साकारल्या. प्रेम रोग हा चित्रपट सर्वांना फार आवडला व यामुळे यांना एक उत्तम व सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून पुरस्कार प्राप्त झाला.
- १९८५ मध्ये यांनी आणखी एक ब्लॉकबस्टर चित्रपट सिनेमासृष्टीला दिला. त्या चित्रपटाचे यांनी केवळ दिग्दर्शक, निर्मिती व संपादक म्हणून काम केले नाही, तरी या चित्रपटात त्यांनी लेखकाची भूमिका सुद्धा साकारली. ज्या चित्रपटाचे नाव “राम तेरी गंगा मैली” होते. ज्या चित्रपटांमध्ये मंदाकिनी व राजीव कपूर यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या.
- या चित्रपटांना सुद्धा अनेक पुरस्कार देऊन, राज यांच्या कार्यास सन्मानित केले गेले. यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट संपादकाचा, पुरस्कार राम तेरी गंगा मैली या चित्रपटात द्वारे प्राप्त झाला.
- यांनी हिंदी सिनेमा सृष्टी मध्ये उत्तम अभिनेता बरोबरच, एक उत्तम दिग्दर्शक, निर्माता, संपादक व लेखक म्हणून स्वतःचे नाव कमावले होते.
राज कपूर यांचे पुरस्कार आणि यश
यांनी त्यांच्या अभिनयासाठी एकूण २६ पुरस्कार स्वतःच्या नावे करून घेतले त्यापैकी काही पुरस्कारांची यादी खालील प्रमाणे –
- हिंदी सिनेमा सृष्टीतील योगदानाबद्दल राज यांना राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
- १९७१ मध्ये राज यांना “पद्यभूषण” पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
- १९५५ मध्ये राज यांनी दिग्दर्शित केलेला “श्री 420” या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट पिक्चर फिल्म चा पुरस्कार प्राप्त झाला.
- १९८७ मध्ये यांना “दादासाहेब फाळके पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात आले.
- १९६४ मध्ये यांना त्यांनी दिग्दर्शित केलेल्या “संगम” चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक व सर्वोत्कृष्ट संपादक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
राज कपूर यांचे वैयक्तिक आयुष्य
यांनी इसवी सन १९४६ मध्ये कृष्णा मल्होत्रा हिच्यासोबत लग्न केले. कृष्णा व राज यांना पाच अपत्य आहेत. त्यांच्या मुलांची नावे रणधीर कपूर, राजीव कपूर व ऋषी कपूर तसेच मुलीचे नाव रितू नंदा, रीमा जैन असे आहे.
राज कपूरचे अफेयर्स
नर्गिस
हे विवाहित असून सुद्धा, विविध हिंदी चित्रपटांमध्ये अभिनेत्रीमुळे कायमच चर्चेत असत. राज व अभिनेत्री नर्गिस यांच्या प्रेम संबंधाबद्दल, हिंदी सिनेमा सृष्टी मध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा चालली होती. या दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकमेकांसोबत काम केले होते. परंतु राज यांचे नर्गिस सोबतचे नाते कोणाला सुद्धा मान्य नव्हते. कारण राज स्वतःच्या पत्नींना व मुलांना सोडून नर्गिस सोबत नाते टिकवू शकत नव्हते. यामुळे नर्गिस सोबतचे नाते राज यांनी संपवले. नर्गिस यांचे सुनील दत्त यांसोबत लग्न झाले.
वैजयंतीमाला
नर्गिस सोबत नाते संपून सुद्धा, राज यांचे नाव बऱ्याच अभिनेत्री सोबत नाते जोडले गेले. राज यांचे १९६० मध्ये अभिनेत्री वैजयंतीमाला हिच्यासोबत नाव जोडले गेले. या दोघांमधील नात्याचा खुलासा स्वतः राज यांनी केला. परंतु वैजयंतीमाला यांनी या अफवा आहेत असे म्हटले.
पद्मिनी
राज यांचे पद्मिनी हिच्यासोबत सुद्धा नाव जोडले गेले होते. ज्याचा खुलासा त्यांचे स्वतःचे सुपुत्र ऋषी कपूर यांनी २०१७ मध्ये केले.
राज कपूर यांचे वादविवाद
- राज यांचे नर्गीस वैजयंतीमाला पद्मिनी यासारख्या अभिनेत्रींबरोबर प्रेम संबंध असल्यामुळे त्यांची पत्नी कृष्णा हे राज कपूर यांच्यावर नाराज असायची. खूप वेळा तर त्यांनी आपले घर देखील सोडले होते.
- राज आपल्या चित्रपटातील नायिकांकडून छोट्या कपड्यांमध्ये चित्रपटांमध्ये काम करून घेत असत. त्यावेळी असे कपडे घालणे सामान्य गोष्ट नव्हती, त्यामुळे प्रेक्षकांकडून त्यांना नाराजी सहन करावी लागली होती.
- महान गायिका लता मंगेशकर यांना सन 1978 मध्ये राज यांनी वचन दिले होते की, त्यांचा भाऊ हृदयनाथ मंगेशकर यांना सत्यम शिवम सुंदरम या चित्रपटासाठी संगीत निर्देशक म्हणून त्यांची नियुक्ती करेल. परंतु ज्यावेळी लता मंगेशकर एका संगीत दौऱ्यासाठी अमेरिकेमध्ये गेल्या होत्या, त्याच वेळी या फिल्मसाठी हृदयनाथ मंगेशकर यांच्याऐवजी लक्ष्मीकांत प्यारेलाल यांची संगीत निर्देशक म्हणून नियुक्ती केली. यामुळे लता मंगेशकर यांच्यावर नाराज झाल्या होत्या.
राज कपूर एक आशावादी व्यक्तिमत्व
मुंबईच्या चाळीत राहणारा हुशार तरुण असो किंवा खेडेगावातील पात्र असो त्यांचे पात्र इतके सामान्य होते आणि साधे होते, यामुळे त्यांची सामाजिक भावनिक मूल्यांशी असलेली ओढ दिसून येते. कठीण परिस्थितीतून, त्यांनी घेतलेल्या निर्णयातून, त्यांच्या डोळ्यातून, शब्दातून, प्रेमभावना दिसून येते. संगम मधल्या राज कपूरच्या व्यक्तिरेखेने सगळ्यांचीच मने जिंकली. साध्या, खेळकर, प्रेमाची उधळण केलेली नायिका, जी अगोदरच दुसऱ्या नायकाच्या प्रेमात असते, या दोघांमध्ये येणारा तिसरा माणूस म्हणजेच राज कपूर. परंतु प्रेक्षकांची सहानुभूती मात्र राज कपूरनाच मिळते.
चार्ली चॅप्लिनची झलक
चार्ली चॅप्लिन या महान अभिनेत्याची झलक आपल्याला राज कपूर मध्ये पाहायला मिळते. त्यांनी चार्ली चॅप्लिनला जो भारतीय पोशाख घातला, तो खूपच लोकप्रिय आणि आकर्षक होता. यामुळेच तो केवळ देशातच नाही, तर परदेशातही प्रसिद्ध झाला. भारद्वाज यांच्या म्हणण्यानुसार अभिनेते चार्ली चॅप्लिनचे भारतीयकरण राज कपूर यांनी सुरू केले. तसेच श्री 420 या चित्रपटांमध्ये ते एका नवीन उंचीवर पोहोचल्याचे आपल्याला दिसून येते.
राज कपूर व मित्रपरिवार
राज कपूर आपल्या मित्रांच्या अगदी जवळ होते. देवानंद, दिलीप कुमार, राजेंद्र कुमार, शंकर जय किशन, प्राण, ऋषिकेश मुखर्जी, ख्वाजा हमद अब्बास, राजेश खन्ना, हे हिंदी सिनेमा सृष्टी मधील प्रसिद्ध अभिनेते राज कपूर यांचे जवळचे मित्र होते.
राज कपूर आणि दिलीप कुमार
हिंदी सिनेमा सृष्टीमधील राज कपूर व दिलीप कुमार हे महत्त्वाचे अभिनेता आहेत. या दोघांनी सुद्धा चार दशके हिंदी सिनेमा सृष्टीवर स्वतःचा दबदबा कायम ठेवला होता. त्याचबरोबर राजकपूर व दिलीप कुमार यांची लोकप्रियता व प्रसिद्धी ही तितकीच होती. देवानंद सुद्धा राज कपूर व दिलीप कुमार यांच्या बरोबरीने राहिले. परंतु, राज कपूर व दिलीप कुमार यांनी ज्या प्रसिद्धीला प्राप्त केले, त्या प्रसिद्धी पर्यंत देवानंद पोचलो पोहोचू शकले नाही.
राज कपूर यांचा मृत्यू
राज कपूर यांचा मृत्यू दिनांक ०२ जून १९८८ मध्ये झाला. त्यावेळी त्यांचे वय हे ६३ वर्ष होते. राज कपूर यांना काही दिवसापासून दम्याचा त्रास सुरू झाला होता. या कारणामुळे, राज कपूर यांचा मृत्यू झाला. राजकपूर शेवटचे “हिना” चित्रपटाला शूटिंग मध्ये काम करत होते. हा चित्रपट राज कपूर नंतर त्यांचा मुलगा रणधीर कपूर व ऋषी कपूर यांनी पूर्ण केला व हा चित्रपट १९९१ मध्ये प्रदर्शित करण्यात आला.
राज कपूर यांच्या संबंधित मनोरंजक तथ्य
- राज कपूर यांचा जन्म पठाणी हिंदू परिवारामध्ये झाला होता.
- राज कपूर यांना आतापर्यंत अकरा फिल्म फेअर, तीन राष्ट्रीय पुरस्कार, तसेच पद्मभूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार आणि फिल्म लाईफ टाईम अचीवमेंट यासारख्या पुरस्कारांनी सन्मानित केले गेले आहे.
- राज कपूर धूम्रपान तसेच ड्रिंक सुद्धा करत होते.
- प्रसिद्ध हिंदी फिल्म निर्देशक केदार शर्मा यांच्यासोबत राज कपूर यांनी क्लिपर बॉय या रूपामध्ये आपल्या अभिनयाच्या करिअरची सुरुवात केली होती.
- आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये त्यांना संगीत निर्देशक बनायचे होते.
- राज कपूर यांचे वडील पृथ्वीराज कपूर यांनी त्यांचे लग्न त्यांच्या मामाची मुलगी कृष्णा तिच्याशी करून दिले होते.
- वयाच्या दहाव्या वर्षी ड्रामा फिल्म इन्कलाब 1935 मध्ये त्यांनी बालकलाकाराच्या रूपामध्ये आपल्या चित्रपटाच्या करिअरला सुरुवात केली होती.
- आवारा, अनहोनी, आह, श्री 420, जागते रहो, चोरी चोरी, अनाडी, जिस देश मे गंगा रहती है, छलिया, दिल ही तो है यासारखे त्यांची सुपरहिट फिल्म आहे.
- सन 1931 मध्ये राज कपूर यांचे भाऊ देवी कपूर यांचा निमोनियामुळे मृत्यू झाला होता. त्याच वर्षी त्यांचा दुसरा भाऊ नंदी कपूरसुद्धा बागेमध्ये उंदरांना मारणाऱ्या औषधांमधील गोळी खाल्ल्याने मृत्यू झाला होता.
- 1948 मध्ये 24 वर्षाच्या राज कपूर यांनी आर के फिल्म या नावाने कंपनी सुरू केली. यामध्ये आग या चित्रपटाचे त्यांनी प्रथम निर्देशन केले.
- त्यांचा मुलगा ऋषी कपूर यांनी त्यांच्या आत्मकथा खुल्लम खुल्ला यामध्ये राज कपूर यांचे वेगवेगळ्या अभिनेत्रींबरोबरचे संबंध सांगितले होते.
- रणबीर कपूर हा त्यांचा आवडता नातू.
- चीन, दक्षिण पूर्व एशिया, मध्यपूर्व आफ्रिका यासारख्या देशांमध्ये राजकपूर खूप प्रसिद्ध होते.
- त्यांची पहिली रंगीत फिल्म संगम ही होती.
- राज कपूर आपल्या शेवटच्या दिवसांमध्ये हिना हा चित्रपट करत होते. त्यानंतर त्यांचे मुलगी ऋषी कपूर आणि रणबीर कपूर यांनी तो चित्रपट पूर्ण केला होता.
- एकदा चुकून राज कपूर यांनी केदार शर्मा यांची खोटी दाढी पकडली होती, त्यावेळी रागात येऊन केदार शर्मा यांनी राज कपूर यांना थप्पड मारली होती.
- बॉबी या चित्रपटांमध्ये एका दृश्यामध्ये ऋषी कपूर आपल्या घरामध्ये डिंपल कपाडिया या अभिनेत्रीला भेटतात. हे दृश्य राज कपूर आणि अभिनेत्री नर्गिस यांच्या वास्तविक जीवनावर आधारित होते.
- वीस पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये संगीत निर्देशक म्हणून शंकर, जय किशन यांच्याबरोबर त्यांनी काम केले होते.
- राज कपूर यांचा प्रसिद्ध चित्रपट आवारा आणि बूट पोलिश (1954) या चित्रपटांसाठी फ्रान्समध्ये आयोजित केलेल्या कांस फिल्म समारोह मध्ये पालमे डी और या पुरस्कारासाठी त्यांना दोन वेळा नामांकन मिळाले होते.
- प्रसिद्ध गायक मन्नाडे आणि मुकेश यांनी त्यांच्या चित्रपटांचा गीतांसाठी आवाज दिला होता.
- 14 डिसेंबर 2001 मध्ये भारतीय डाक सेवेने एक तिकीट सुरू केले होते, जे राज कपूर यांना सन्मानित करते.
- बांद्रा बँड स्टँड, मुंबई वॉक ऑफ द स्टार्स मध्ये मार्च 2012 मध्ये त्यांची प्रतिमा ठेवली गेली होती.
- शंकर जयकिशन, शैलेंद्र आणि हसरत जयपुरी यांना चित्रपट सृष्टी मध्ये राज कपूर यांनी आणले होते.
FAQ
१. राज कपूर यांना किती मुले आहेत?
राज कपूर यांनी इसवी सन १९४६ मध्ये कृष्णा मल्होत्रा हिच्यासोबत लग्न केले. कृष्णा व राज यांना पाच अपत्य आहेत. त्यांच्या मुलांची नावे रणधीर कपूर, राजीव कपूर व ऋषी कपूर तसेच मुलीचे नाव रितू नंदा, रीमा जैन असे आहे.
२. राज कपूर यांचा जन्म कधी झाला ?
राज कपूर यांचा जन्म दि. १४ डिसेंबर १९२४ रोजी पेशावर म्हणजेच पाकिस्तान या ठिकाणी झाला.
निष्कर्ष
मित्रहो, आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास राज कपूर यांच्या बद्दल माहिती दिली आहे. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की नक्की कळवा, व लेख आवडल्यास तुमच्या इतर मित्रपरिवारांसोबत नक्की शेयर करा. धन्यवाद.