स्वामी दयानंद सरस्वती यांना आधुनिक जागृत समाजाचे जनक देखील म्हटले गेले आहे. भारतीय समाजात त्यांनी अनेक संघर्ष केला. स्वराज्याचा संदेश दिला. दयानंद सरस्वतींनी भारतीय संस्कृतीच्या विकासासाठी, फार प्रयत्न केले.
उत्तम मार्गदर्शनाचे गुण त्यांच्यात समाविष्ट होते. उत्तम कामगिरी त्यांनी प्रदान केली. त्यांच्या महान विचारांमुळे, भारतातील समाज प्रभावी झाला.
आपले जीवन राष्ट्र हितासाठी समर्पित करून, समाजातील प्रचलित अंधविश्वास आणि कुप्रथा दूर करण्याचा स्वामी दयानंद सरस्वती यांनी प्रयत्न केला.
आपल्या प्रभावी आणि तेजस्वी विचारांनी समाजात जातीय भेदभाव, देवाच्या नावावर फसव्या चालीरीती आणि स्त्रियांना वेद म्हणण्याची परवानगी नसणे, यांसारख्या हिंदूधर्मीय अनेक अंधश्रद्धांवर त्यांनी सडकून टीका केली.
महर्षी सरस्वती यांच्या आधुनिक विचार आणि प्रयत्नामुळे भारतीय शैक्षणिक व्यवस्थेला पुनर्जीवन मिळाले. त्यामुळे एका छताखाली वेगवेगळ्या स्तरातील जाती धर्माच्या विद्यार्थ्यांना एकत्र आणले गेले.
त्याला आज आपण शाळेतला वर्ग म्हणून ओळखतो. तिकडे स्वदेश, समाज, धर्म सुधारण्यास सुरुवात केली, अशा महान व्यक्तिमत्त्वाविषयी आपण ह्या लेखाद्वारे जाणून घेणार आहोत.
आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास दयानंद सरस्वती यांच्या बद्दल माहिती दिली आहे. हि माहिती आणि हा लेख जाणून घेण्यासाठी खालील माहिती शेवट पर्यंत नक्की वाचा.
स्वामी दयानंद सरस्वती माहिती मराठी Swami Dayanand Saraswati Information In Marathi
मूळ नाव | मूळ शंकर अंबा शंकर तिवारी |
ओळख | महर्षी \ स्वामी दयानंद सरस्वती |
जन्म तारीख | दि. १२ फेब्रुवारी १८२४ |
जन्म स्थळ | टंकरा, गुजरात |
कार्य | आर्य समाजाची स्थापना |
आईचे नाव | यशोदाबाई |
वडिलांचे नाव | अंबा शंकर तिवारी |
गुरु | स्वामी विरीजानंद |
मृत्यू | ३० ऑक्टोबर १८८३ |
महर्षी दयानंद सरस्वती मूळ मुद्दे
- दयानंद सरस्वती यांचं वास्तविक नाव हे मूळ शंकर तिवारी हे आहे.
- त्यांचा जन्म दि. १२ फेब्रुवारी १८२४ ला टंकरा म्हणजेच गुजरात मध्ये झाला.
- त्यांचे वडील अंबाशंकर तिवारी हे होते.
- आई यशोदाबाई.
- महर्षी दयानंद सरस्वती शिक्षण – त्यांना वैदिक ज्ञान प्राप्त झालेले आहे.
- त्यांचे गुरु हे स्वामी विराजनंद हे होते.
- महर्षी दयानंद सरस्वती मृत्यू दि. ३० ऑक्टोबर १८८३ साली झाला.
हे वाचा –
- गोपाळ कृष्ण गोखले यांची माहिती
- वासुदेव बळवंत फडके माहिती मराठी
- सुखदेव माहिती मराठी
- मंगल पांडे माहिती मराठी
दयानंद सरस्वती वैशिष्ट्य
- आर्य समाजाचे संस्थापक होते.
- राज्याचा पुरस्कार करणारे प्रथम व्यक्ती.
- पारंपारिक विचारांना बदलून, अनेक चालीरीती रूढी परंपराना देखील त्यांनी विरोध केला.
- एक प्रामाणिक देश भक्त.
कोण होते स्वामी दयानंद सरस्वती ?
महर्षी दयानंद सरस्वती हे भारतीय तत्त्वज्ञ, समाज सुधारक आणि आर्य समाजाचे संस्थापक होते. यांचा जन्म १८२४ मध्ये गुजरात मधील एका ब्राह्मण परिवारात झाला. त्यांच्या लहान बहिणीचा मृत्यू झाला आणि या घटनेने त्यांना जन्म आणि मृत्यू काय आहे ? हा प्रश्न पडला आणि या प्रश्नाच्या उत्तराच्या शोधात, त्यांनी २१ वर्षाचे असतानाच घर सोडलं.
एका तपस्वीप्रमाणे त्यांनी भारत भ्रमंती केली आणि हा प्रकार पुढे पंधरा वर्षे चालला. अखेर त्यांचे गुरु विरजानंद यांना मथुरा या ठिकाणी भेटले. पुढे जाऊन हे विरजानंदांचे शिष्य बनले आणि त्यांच्या आश्रमातच राहू लागले. त्यांनी त्यांच्या गुरूकडून वेदांचे महत्त्व, वेदांचा अर्थ आणि वेदांचे तत्त्वज्ञान शिकून घेतलं.
योग ही क्रिया सुद्धा आत्मसात केली आणि या प्रकारे मुल शंकर तिवारी आता दयानंद सरस्वती झाले. स्वामी विरजानंद यांना वाटत होतं की, हिंदू धर्म त्यांच्या ऐतिहासिक मार्गावर भटकलेला आहे.
कालांतराने ज्या रूढी-परंपरा आणि तत्त्वज्ञान हिंदू धर्माचा भाग झाले आहे, यामुळे सरस्वती यांनी आपल्या गुरूंना म्हणजे स्वामी विरजानंदाना एक आश्वासन दिले, तिथे संपूर्ण आयुष्य हिंदू धर्माला पवित्र करण्यात आणि वेदांचा आणि साहित्याचा योग्य अर्थ सांगण्यात व्यतित करतील.
स्वामी दयानंद सरस्वती यांचा जन्म व प्रारंभिक जीवन
समाज सुधारक स्वामी दयानंद एका समृद्ध ब्राह्मण कुटुंबात दि. १२ फेब्रुवारी १८२४ रोजी गुजरात राज्यातील टंकरा येथे झाला. बालपणी त्यांना मूळ शंकर आंबा शंकर तिवारी या नावाने ओळखले जायचं. त्यांचे वडील अंबा शंकर तिवारी कर अधिकारी या पदावर कार्यरत होते. हे सुखी, समृद्ध आणि श्रीमंत कुटुंब प्रभावी व्यक्तिमत्व होते, याशिवाय कट्टर अनुयायी देखील होते.
त्यांची आई यशोदाबाई या गृहिणी होत्या. सुखी संपन्न कुटुंबात जन्म झाल्यामुळे, दयानंद सरस्वतींचे बालपण ऐश्वर्यात व्यतीत झालं. लहानपणापासून स्वामी दयानंद विलक्षण, प्रतिभावंत आणि कुशाग्र बुद्धीचे धनी होते. अवघ्या दोन वर्षांच्या वयात गायत्री मंत्राचा उच्चार स्पष्ट होत होता.
घरातील वातावरण धार्मिक असल्याने आणि कुटुंब शिवभक्त असल्याने, स्वामी दयानंद यांच्यावर देखील तेच संस्कार घडले आणि हळूहळू त्यांच्या मनात परमेश्वराबद्दल नितांत भाव निर्माण झाला. पुढे वेद अभ्यासक होण्यासाठी त्यांनी लहानपणापासूनच वेद शास्त्र, धार्मिक ग्रंथ आणि संस्कृत भाषेचे मन लावून अध्ययन केले.
तेवढ्यात त्यांच्या जीवनातील एका घटनेने त्यांचं आयुष्य पूर्ण बदलून टाकलं आणि परंपरेने चालत आलेल्या निती नियमांवर आणि परमेश्वराविषयी गंभीर प्रश्न उपस्थित करण्यावर, त्यांना बाध्य व्हावं लागलं. स्वामी सरस्वतींचे वडील कट्टर शिवभक्त असल्याने, नेहमी धार्मिक कार्यात मग्न असत. त्यामुळे स्वामी दयानंद देखील वडिलांच्या या धार्मिक कार्यास सहभागी असायचे.
एकदा महाशिवरात्रीच्या दिवशी त्यांच्या वडिलांनी त्यांना शिवरात्रीचे महत्त्व समजावून सांगितलं आणि उपवास ठेवण्यास सांगितला. स्वामी दयानंद यांनी देखील वडिलांची आज्ञा प्रमाण मानून उपवास केला आणि
रात्री आराधना करण्यासाठी ते मंदिरात जाऊन बसले. मंदिरात अनेक उंदीर देवा जवळचा प्रसाद खाताना दयानंद ना दिसला आणि त्यांच्या बालमनात अनेक प्रश्न त्या क्षणी उभे राहिले की, वास्तवात देवाची मूर्ती आहे का ?
हा एक पाषाण आहे आणि जो देव आपल्या अन्नाची रक्षा करू शकत नाही, तो आपले रक्षण कसे करणार, या घटनेने स्वामी दयानंद यांच्या मनावर खोलवर परिणाम केला आणि त्यांचा पूजेवरचा विश्वास उडाला.
वयाच्या २१ व्या वर्षी स्वामी दयानंद सरस्वती यांनी घराचा त्याग केला
या विषय संबंधी स्वामी दयानंद यांचा वडिलांशी बराच वाद झाला. त्यांनी आपला वडिलांना निरीक्षण सांगितलं की, आपण मुळात असाहाय्य ईश्वराची उपासना करावी असं नको. पुढे जन्म मृत्यूच्या फेऱ्याची सत्यता जाणून घेण्यासाठी, वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी सुमारे १८४६ मध्ये मोहमायेचा त्याग करत, संन्यास घेण्याचा निर्णय घेत.
घराचा त्याग केला. त्याच्यात हे सत्य जाणण्याची इच्छा एवढी प्रबळ होती की, त्यामुळे संसारिक जीवन त्यांना व्यर्थ वाटू लागलं आणि आपल्या विवाहाचा प्रस्ताव देखील त्यांनी अमान्य केला.
या विषयाला घेऊन, त्यांच्या मध्ये व वडिलांमध्ये अनेकदा वाद देखील झाले. पण अखेर स्वामी दयानंद यांच्या इच्छेपुढे वडिलांना माघार घ्यावी लागली.
स्वामी दयानंद सरस्वती यांची स्वामी विराजनंद यांच्याशी भेट व मार्गदर्शन
अध्यात्मिक अध्ययनासाठी स्वामी दयानंद मथुरा येथे स्वामी विराजानंद यांना भेटले. तिथे त्यांनी योग्य विद्याशास्त्र आणि आर्य ग्रंथाचे ज्ञान प्राप्त केले.
ज्ञान प्राप्ती नंतर ज्यावेळी गुरुदक्षिणा देण्याची वेळ आली, त्यावेळी गुरु वीरजानंदांनी स्वामी दयानंद यांना समाजात पसरलेल्या अनिष्ट चालीरीती, अन्याय आणि अत्याचारा विरोधात कार्य करणे आणि सामान्य लोकांमध्ये जागरूकता पसरवण्यास सांगितले.
अशा तऱ्हेने स्वामी दयानंद यांच्या गुरुंनी त्यांना समाज कल्याणचा मार्ग दाखविला.
स्वामी दयानंद सरस्वती यांचे कार्य
- दयानंद सरस्वती यांनी पुढे समाजासाठी अनेक महान कार्य केली व इंग्रज सरकारचा कडाडून विरोध केला. एवढेच नाही तर, भारतीयांना आर्य भाषा अर्थात हिंदी भाषेप्रति जागृत केलं.
- १८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामात स्वामी दयानंद सरस्वतींचे योगदान हे अमूल्य आहे.
- त्यांनी ज्ञान प्राप्तीनंतर संपूर्ण भारत भ्रमण केलं. ब्रिटिश सरकार, भारतीय नागरिकांचा अमानुष छळ करत असल्याच त्यांच्या निदर्शनास आलं, त्यानंतर त्यांनी इंग्रजांन विरोधात बोलण्यास सुरुवात केली आणि लोकांना ब्रिटिशांच्या अत्याचारा विरोधात आवाज बुलंद करण्यात प्रोत्साहित केलं.
- भारताचे महान सुपुत्र तात्या टोपे, नानासाहेब पेशवे, हाजी मुल्लाखा, स्वामी दयानंद यांच्या या कार्याने प्रभावित होते. इतकच नव्हे तर त्या सर्वांनी देखील स्वामी दयानंद यांच्या विचारांचे अनुसरण केले व त्यांनी दाखवलेल्या मार्गावर मार्गक्रमण करण्यास सुरुवात केली.
- याशिवाय समाज सुधारण्यासाठी महात्मा गांधीजींनी देखील स्वामी दयानंद यांच्या अनेक उपक्रमात सहभाग घेतला.
- स्वामी दयानंद यांनी स्वातंत्र्य प्राप्तीच्या या संग्रामात सर्वात आधी साधु संताना जोडलं, जेणेकरून त्यांच्या माध्यमातून सामान्य नागरिकांना स्वातंत्र्य मिळविण्यासाठी प्रेरित करता येईल.
स्वामी दयानंद सरस्वती यांचे योगदान
महर्षी दयानंद यांनी मूर्ती पूजा, अस्पृश्यता आणि बहुपत्नी पद्धतीला आणि हिंदू धर्मात असलेल्या एका प्रथेला म्हणजे श्राद्ध, ज्यामध्ये मृत पावलेल्या पूर्वजांना आपण नैवेद्य देतो, या प्रथेला त्यांनी अथर्वती सांगून, विरोध केला आहे.
यासोबत जातीव्यवस्थेला बद्दल त्यांनी विरोध केला. बालविवाह याला सुद्धा स्वामी दयानंद यांनी प्रखर शब्दात विरोध केला आहे. त्यांनी मुलांच्या लग्नाची वय २५ असावे आणि मुलींचे १६ अशी शिफारस केली.
महिलांना सुद्धा समाजात योग्य दर्जा दिला जावा, यासाठी त्यांनी आवाज उठवला. आंतरजातीय विवाह आणि विधवांच्या पुनर्विवाह साठी महर्षी दयानंद सरस्वती यांनी पाठिंबा दिला.
आणखी एक गोष्ट म्हणजे वेदांमध्ये असलेले चतुवर्ण व्यवस्था यामध्ये त्यांनी सांगितले आहे की, मनुष्याची जाती ही त्याच्या जन्मावर नाही तर, त्याच्या कर्मावरून ठरते आणि या सर्व विचारांच्या आधारावर आणि तत्त्वज्ञानाच्या आधारावर स्वामी दयानंद सरस्वती यांनी १८७५ साली आर्य समाजाची स्थापना केली.
आर्य समाजाची स्थापना
ख्रिश्चन धर्म, मुस्लिम धर्म आणि सनातन धर्माचा त्यांनी खुला विरोध केला. विधान मध्ये असलेल्या ज्ञानाला स्वामी दयानंद यांनी सर्वश्रेष्ठ आणि प्रमाणित मांडलं आणि या भावनेने त्यांनी आर्य समाजाची स्थापना केली.
जनसेवा, ज्ञान आणि कर्म सिद्धांताला लक्षात ठेवून, महान समाज सुधारक दयानंद सरस्वतीने १८५७ ला गुढीपाडव्याच्या दिवशी आर्य समाजाची स्थापना केली. त्यांचं हे ऐतिहासिक कल्याणकारी पाउल महत्वाचा भाग ठरला.
आर्य समाजाच्या स्थापनेचा उद्देश मानसीक, शारीरिक आणि सामाजिक उन्नती करणे, हा होता आणि या विचारांनी स्वामीजींनी आर्य समाजाची स्थापना केली.
अनेकांनी त्यांचा विरोध देखील केला. परंतु दयानंद सरस्वतींच्या तर्कसंगत ज्ञानापुढे, त्यांचा टिकाऊ लागला नाही आणि मोठमोठे विद्वान पंडितांना देखील स्वामी पुढे नमते घ्यावे लागले.
स्वामी दयानंद यांनी दि. १० एप्रिल १८७५ रोजी मुंबई येथे आर्य समाज स्थापन केला. दयानंदनी दि. २४ जून १८७७ रोजी पंजाब प्रांतातील लाहोर येथे आर्य समाजाची शाखा सुरू केली लाहोर हेच या समाजाचे मुख्य केंद्र बनले.
आर्य समाजाची तत्त्वे
- आर्य समाजाच्या तत्त्वज्ञानात वेद प्रामाण्यवर भर दिला.
- वेद हा आर्याचा पवित्र धर्मग्रंथ असून, तो सर्व आर्यांनी प्रामाण्य मानावा.
- ईश्वर हा एकच असून, तो निराकार, अनंत, न्याय सर्व साक्षी, दयाळू आणि सर्व शक्तिमान पवित्र आहे. ईश्वर हा सृष्टीचा निर्माता व नियंता आहे.
- परमेश्वराच्या शुद्ध रूपाचे ज्ञान वेदात असून, प्रत्येक हिंदू व्यक्तीने वेदाचा अभ्यास करणे, हे त्यांचे प्रथम कर्तव्य आहे.
- आर्याच्या वैदिक धर्माचे दरवाजे सर्व धर्म्यांसाठी खुले आहेत. शुद्धीकरणाने कोणाचेही या धर्मात प्रवेश मिळतो.
- प्रत्येक कार्य समाजाच्या अनुयायाने सत्य ग्रहण करावे व असत्याचा त्याग करावा.
- प्रत्येकाने एकमेकांबरोबर प्रेमाने व न्यायाने वागावे.
- आर्य धर्माचा मूळ उद्देश मानवजातीचे कल्याण करणे हाच आहे.
- केवळ स्वतःच्या कल्याणाचा विचार न करता इतरांच्या कल्याणासाठी सदैव प्रयत्न करावा.
- समाजाच्या कल्याणाच्या आड वैयक्तिक मतभेद आणू नयेत.
- अज्ञानाचा नाश करून ज्ञानाच्या प्रसाराचे ध्येय प्रत्येकाने बाळगावे.
आर्य समाजाची कामगिरी
धार्मिक सुधारणा
- आर्य समाजाने वेदांचे प्रामाण्य मान्य केले. वेदांत सांगितलेल्या विशुद्ध धर्माचे अनुकरण करण्याचा आग्रह धरला.
- रूढी परंपरेने उपासनेच्या वेढ्यात सापडलेल्या हिंदू धर्माला वाचवण्यासाठी, दयानंद यांनी गो बॅक टू वेदास, वेदाकडे परत चला हा आदेश दिला.
शुद्धीकरण चळवळ
- ख्रिश्चन आणि मुस्लिम धर्म सक्तीने धर्मांतरित झालेल्या, हिंदूंना पुन्हा स्वधर्मात घेण्यात आले.
- आर्य समाजाचे आणखी एक महत्त्वाचे कार्य म्हणजे त्यांनी हाती घेतलेली शुद्धीकरणाची मोहीम होय.
- इसवी सन १८२१ मध्ये मलबार येथील अनेकांना सक्तीने मुसलमान धर्माची दीक्षा दिली. अशा सुमारे २५०० लोकांना आर्य समाजाच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा हिंदू धर्मात घेतले. तसेच शुद्धीकरणाची ही मोहीम राजस्थान, हैदराबाद आणि पंजाब मध्ये सुद्धा राबवली.
शैक्षणिक कार्य
- स्वामी दयानंदनी गुरुकुल विद्यालय स्थापन केली. या शाळेतून संस्कृत आणि वैद्यकीय शिक्षण दिले जाऊ लागले.
- लाला हंसराज यांनी लाहोर येथे दयानंद ऍग्रो वेदिक कॉलेज सुरू करून, इंग्रजी आणि वैद्यकीय शिक्षणाचा प्रसार केला.
- आजही महाराष्ट्रात कोल्हापूर आणि मुंबई येथे आर्य समाजाच्या संस्थांमधून शैक्षणिक कार्य सुरू आहे.
राष्ट्रभक्तीच्या प्रसाराचे कार्य
- स्वामी दयानंद आणि आर्यावत ही आर्याची भूमी आहे हे घोषित केल्याने, हिंदी लोकांत राष्ट्रभक्तीची भावना निर्माण झाली.
- स्वदेश आणि राष्ट्रीय शिक्षणावर आर्य समाजाने भर दिला. स्वामी दयानंद सरस्वती म्हणत की, टाकाऊतील टाकाऊ स्वराज्य हे परकीय सत्तेपेक्षा अधिक हितकारक असते.
- आर्य समाजाने लाला लजपत राय स्वामी श्रद्धानंद आणि बिपिनचंद्र पाल यांसारखे जहाल देशभक्त हिंदुस्तानाला देऊन स्वातंत्र्य चळवळीला अधिक गती दिली.
स्वामी दयानंद सरस्वती यांचा थोर व्यक्तिमत्त्वावर प्रभाव
धर्म परिवर्तन केलेल्या लोकांमध्ये पुन्हा हिंदू धर्माची प्रेरणा रुजवली आणि त्याकरता शुद्धीकरण आंदोलन चालवलं. १८८६ साली लाहोर इथं दयानंद यांचे अनुयायी लाला हंसराज यांनी दयानंद अँग्लो वैदिक महाविद्यालयाची स्थापना केली होती.
त्यामुळे हिंदू समाजात जागरूकता वाढीस लागली. स्वामी दयानंद सरस्वतींचा ज्या व्यक्तिमत्त्वावर प्रभाव पडला.
त्यात मादाम कामा, पंडित लेखराम, स्वामी श्रद्धानंद, आनंद पंडित, गुरुदत्त, विद्यार्थी शाम कृष्ण वर्मा, विनायक दामोदर सावरकर, लाला हरदयाल मदनलाल केंद्रा, रामप्रसाद बिस्मिल्ला, महादेव गोविंद रानडे, महात्मा हंसराज, लाला लजपत राय यांसारखे व्यक्तिमत्त्वांचा समावेश होता.
समाजाच्या कल्याणासाठी स्वामी दयानंद यांनी त्याकाळी पुढाकार घेतला आणि एकतेच महत्त्व पटवून दिलं. स्वामी दयानंद सरस्वती एक थोर समाज सुधारक होते. समाजात पसरलेल्या अनिष्ट चालीरीती उदाहरणार्थ बालविवाह, सती प्रथा, विधवा पुनर्विवाह यांसारख्या प्रथा त्यांनी बंद केल्या.
स्वामी दयानंद सरस्वती यांचे निधन
महाराज यशवंत सिंह स्वामी दयानंद सरस्वती यांच्या प्रतिभाशाली व्यक्तिमत्वावर प्रभावीत झाले. त्यांनी स्वामीजींचा फार आदर्श सत्कार केला. त्या सुमारास राजे यशवंत सिंह यांचे संबंध एका नर्तकी सोबत होते.
ते पाहता स्वामीजींनी अत्यंत नम्रतेने महाराजांना त्यांच्या चुकीच्या आणि असामाजिक असलेल्या संबंधाची जाणीव करून दिली आणि ते म्हणाले, एकीकडे आपण धर्माशी जुळवून घेण्याची इच्छा व्यक्त करता आणि दुसरीकडे मोहात अडकलेले आहात, अशाने ज्ञानाची प्राप्ती होऊ शकत नाही.
स्वामीजींच्या विचारांनी महाराजांचे डोळे उघडले आणि त्यांनी त्या नर्तकीच्या समवेत असलेले आपले संबंध संपवले. राजे यशवंत सिंहासमवेत आपले संबंध स्वामी दयानंद मुळे संपुष्टात आले आहेत, हे कळल्यावर नर्तीकी प्रचंड संतापली आणि रागाच्या भरात तिने स्वयंपाक बनवणारे आचार्य समवेत संगनमत करून, स्वामी दयानंद यांच्या जेवणात काचेचे बारीक तुकडे मिसळले.
ते भोजन ग्रहण केल्यावर स्वामीजींची तब्येत बिघडू लागली. पुढे आचाऱ्याने आपला गुन्हा कबूल केला. त्यावेळी विशाल हृदयाच्या स्वामी दयानंद यांनी त्यांना देखील क्षमा केली. पण या घटनेनंतर स्वामीजींचा मृत्यू दि. ३० ऑक्टोबर १८८३ झाला.
स्वामी दयानंद सरस्वती यांचे मूल्यवान विचार
- अज्ञानी होणे चुकीचे नाही, परंतु अज्ञानी बनून राहणे हे चुकीचे आहे.
- जगाला तुम्ही तुमचे सर्वश्रेष्ठ द्या. जे तुम्ही सर्वश्रेष्ठ दिलेल आहे, ते तुम्हाला नक्की परत मिळेल.
- पूर्णपणे अंध विश्वासू होण्या पेक्षा वर्तमान आयुष्यात केले जाणारे कर्म अधिक महत्त्वाचे असते.
- हे शरीर नश्वर आहे, या शरीराच्या द्वारे आपल्याला माणुसकी व आत्मविवेक सिद्ध करण्याची संधी मिळालेली असते.
- मनुष्याची विद्या हे त्याचे अस्त्र आहे, धर्म त्याचा रथ व सत्य त्याचा सारथी आहे व मनुष्याची भक्ती हे त्याच्या रथाचे घोडे आहेत.
- कोणतेही मूल्य हे तेव्हा मूल्यवान असते, जेव्हा त्याचे मूल्य कोणा दुसऱ्यासाठी मौल्यवान असेल.
- तोंडातून तेच निघाले पाहिजे, जे आपल्या हृदयामध्ये आहे.
- ज्या व्यक्तीमध्ये अहंकार असतो, त्या व्यक्तीचा विनाश हा निश्चित आहे.
- चांगले संस्कार हे मनुष्याच्या स्वभावाचा पाया आहे .
- रागाचे अन्न विवेक असतो, आपल्याला यापासून सावध राहिला पाहिजे, कारण विवेक नष्ट झाल्यावर सगळं काही नष्ट होते.
- देवाचे कोणतेही रूप व रंग नाही, तो अविनाशी व अनंत आहे. जे कोणी त्याला या जगामध्ये बघते, ते त्यांच्या कल्पनेने, त्याच्या महानतेचे वर्णन करतात.
- जो व्यक्ती सगळ्यात कमी घेतो, तो व्यक्ती सगळ्यात जास्त योगदान देतो. तो व्यक्ती एक परिपक्व असतो. त्याच्यातच त्याचा आत्मविकास निश्चित आहे.
महर्षी दयानंद यांनी लिहिलेली पुस्तके
- पंचमहायज्ञविधी
- वेदभाष्य (अपूर्ण)
- गोकरुणानिधी
- संस्कारविधी
- सत्यार्थ प्रकाश
दयानंदांची चरित्रे
- पंडित स्वामी श्रीमद्दयानंद सरस्वती (१८८३) लेखक गोपाळ हरी देशमुख
- स्वामी दयानंद सरस्वती : व्यक्ती विचार आणि कर्तृत्व (डॉ. जनार्दन वाघमारे)
- दयानंद (अनंत ओगले)
- स्वामी दयानंद सरस्वती (मेघा अंबिके)
- दयानंद सरस्वती (प्रल्हाद कुळगेरी)
स्वामी दयानंद सरस्वती यांचा व्हिडिओ
FAQ
१. स्वामी दयानंद सरस्वती यांचे पूर्ण नाव काय?
दयानंद सरस्वती यांचं वास्तविक नाव हे मूळ शंकर तिवारी हे आहे.
२. स्वामी दयानंद कशासाठी प्रसिद्ध आहेत?
ख्रिश्चन धर्म, मुस्लिम धर्म आणि सनातन धर्माचा त्यांनी खुला विरोध केला. विधान मध्ये असलेल्या ज्ञानाला स्वामी दयानंद सरस्वती यांनी सर्वश्रेष्ठ आणि प्रमाणित मांडलं आणि या भावनेने त्यांनी आर्य समाजाची स्थापना केली. जनसेवा, ज्ञान आणि कर्म सिद्धांताला लक्षात ठेवून, महान समाज सुधारक दयानंद सरस्वतीने १८५७ ला गुढी पाडव्याच्या दिवशी आर्य समाजाची स्थापना केली. त्यांचं हे ऐतिहासिक कल्याणकारी पाउल महत्वाचा भाग ठरला.
३. दयानंद सरस्वती यांचे योगदान काय आहे?
महर्षी दयानंद सरस्वती यांनी मूर्ती पूजा, अस्पृश्यता आणि बहुपत्नी पद्धतीला आणि हिंदू धर्मात असलेल्या एका प्रथेला म्हणजे श्राद्ध, ज्यामध्ये मृत पावलेल्या पूर्वजांना आपण नैवेद्य देतो, या प्रथेला त्यांनी अथर्वती सांगून, विरोध केला आहे.
यासोबत जाती व्यवस्थेला बद्दल त्यांनी विरोध केला. बालविवाह याला सुद्धा स्वामी दयानंद सरस्वती यांनी प्रखर शब्दात विरोध केला आहे.
त्यांनी मुलांच्या लग्नाची वय २५ असावे आणि मुलींचे १६ अशी शिफारस केली.
महिलांना सुद्धा समाजात योग्य दर्जा दिला जावा, यासाठी त्यांनी आवाज उठवला. आंतर जातीय विवाह आणि विधवांच्या पुनर्विवाह साठी महर्षी दयानंद सरस्वती यांनी पाठिंबा दिला.
४. दयानंद सरस्वती यांची हत्या कोणी केली ?
स्वामीजींच्या विचारांनी महाराजांचे डोळे उघडले आणि त्यांनी त्या नर्तकीच्या समवेत असलेले आपले संबंध संपवले. राजे यशवंत सिंहा समवेत आपले संबंध स्वामी दयानंद मुळे संपुष्टात आले आहेत, हे कळल्यावर नर्तीकी प्रचंड संतापली आणि रागाच्या भरात तिने स्वयंपाक बनवणारे आचार्य समवेत संगणमत करून, स्वामी दयानंद यांच्या जेवणात काचेचे बारीक तुकडे मिसळले. परिणामी दि. ३० ऑक्टोंबर १८८३ रोजी स्वामी दयानंद सरस्वती यांचा मृत्यू झाला.
निष्कर्ष
मित्रहो, आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास स्वामी दयानंद सरस्वती यांच्या बद्दल माहिती दिली आहे.
स्वामी दयानंद सरस्वतीने केवळ समाजातील अनिष्ट चालीरीती, रूढी, परंपरा, समाज कल्याण, स्वातंत्र्य संग्रामात सहभागी होऊन, लोकांमध्ये देश प्रेमाची भावना देखील जागृत केली. समाजासाठी असलेले त्यांचे योगदान कधीही विसरले जाणार नाही.
हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. लेख आवडल्यास तुमच्या इतर मित्र परीवारांसोबत नक्की शेयर करा. धन्यवाद.