सचिन तेंडुलकर माहिती मराठी | Sachin Tendulkar Information In Marathi Language – २४ एप्रिल १९७३ हा सोनियाचा दिवस उजाडला, आणि एका चमचमत्या ताऱ्याचा जन्म झाला. त्याचे नाव – क्रिकेटचा बादशहा, मास्टर ब्लास्टर, भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर. क्रिकेट क्षेत्रामध्ये सर्वोच्च स्थान प्राप्त केलेला, क्रिकेटचा बादशहा व क्रिकेट विश्वातील प्रसिद्ध मास्टर ब्लास्टर “सचिन तेंडुलकर” हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आहे.
सचिन तेंडुलकर हा एक उत्तम फलंदाज असून, आजपर्यंत क्रिकेट विश्वामध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू म्हणून सचिनचे नाव सुवर्ण अक्षरांमध्ये लिहिले गेले आहे. चाहत्यांसाठी सचिन हा क्रिकेट जगताचा देव समजला जातो.
सचिन तेंडूलकरचे चाहते देश विदेशामध्ये सर्वत्र पसरलेले असून, सचिनने आपल्या कर्तुत्वाने व कौशल्याने क्रिकेट विश्वामध्ये स्वतःचे नाव अमर केले आहे. त्याला भारत सरकारने विविध पुरस्कार देऊन सन्मानित केले.
आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास लोकप्रिय सचिन तेंडुलकर यांच्याबद्दल माहिती दिली आहे. हा लेख तुम्ही शेवटपर्यंत नक्की वाचा.
सचिन तेंडुलकर माहिती मराठी | Sachin Tendulkar Information In Marathi Language
पूर्ण नाव | सचिन रमेश तेंडुलकर |
जन्म | २४ एप्रिल १९७३ |
जन्मस्थळ | मुंबई, महाराष्ट्र |
टोपण नाव | क्रिकेटचा देव, मास्टर ब्लास्टर, तेंडल्या, सच्चू |
पेशा | क्रिकेटर |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
शाळा | इंडियन एज्युकेशन सोसायटी, न्यू इंग्लिश स्कूल वांद्रे (पूर्व), मुंबई शारदाश्रम विद्यामंदिर शाळा दादर, मुंबई |
कॉलेज | खालसा कॉलेज मुंबई |
धर्म | हिंदू |
जात | सारस्वत ब्राह्मण |
वैवाहिक स्थिती | विवाहित |
फलंदाजीची शैली | उजव्या हाताचा फलंदाज |
गोलंदाजी शैली | उजव्या हाताने लेग स्पिन, मध्यम गती |
आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण | पाकिस्तान विरुद्ध भारत, तारिख- 15 ते 20 नोव्हेंबर, 1989 |
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण | पाकिस्तान विरुद्ध भारत, तारिख- 18 डिसेंबर, 1989 |
आंतरराष्ट्रीय टी20 पदार्पण | दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत, तारिख- 1 डिसेंबर, 2006 |
सचिन तेंडुलकर शिक्षण जन्म ठिकाण आणि कौटुंबिक माहिती
सचिन तेंडुलकर याचा जन्म २४ एप्रिल १९७३ रोजी मुंबई, महाराष्ट्र या ठिकाणी झाला. सचिनचा जन्म ब्राह्मण कुटुंबात झाला असून, वडील रमेश तेंडुलकर कादंबरी लेखक व आई विमा कंपनीमध्ये काम करत होती.
सचिनला चार भावंडे आहे. ज्यामध्ये दोन भाऊ व एक बहीण आहे. सचिन या सर्वांमध्ये लहान आहे. सचिन तेंडूलकरच्या वडिलांनी पहिले लग्न केले होते, त्या पहिल्या लग्नापासून सचिनच्या वडिलांना तीन अपत्य (अजित, सुजीत आणि सविता) झाली. दुसऱ्या लग्नापासून सचिनच्या वडिलांना सचिन झाला.
सचिन तेंडुलकर कुटुंबाची थोडक्यात माहिती
वडील | रमेश तेंडुलकर (मराठी कादंबरी लेखक) |
आई | रजनी तेडुलकर |
भाऊ | अजित तेंडुलकर , नितीन तेंडुलकर |
बहीण | सविता तेंडुलकर |
पत्नी | अंजली तेंडुलकर |
मुलगा | अर्जुन तेंडुलकर |
मुलगी | सारा तेंडुलकर |
सचिन तेंडुलकरचे शिक्षण
सचिन तेंडूलकर हा अभ्यासामध्ये तितकासा चांगला नव्हता, तो शालेय शिक्षणामध्ये तेवढासा रस घेत नसे. प्रारंभिक शिक्षण सचिनचे वांद्रे या ठिकाणी इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश स्कूलमध्ये झाले.
त्यानंतर सचिन तेंडूलकरला क्रिकेटमध्ये प्रचंड आवड असल्याची, त्याच्या प्रशिक्षकांनी जाणून क्रिकेटचे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या सल्ल्यानुसार, सचिनने दादर, मुंबई या ठिकाणी शारदाश्रम विद्यामंदिर मध्ये क्रिकेटसाठी दाखला नोंदवला.
नक्की वाचा
- खो खो खेळाची संपूर्ण माहिती मराठी
- विराट कोहली माहिती मराठी
- पी टी उषा यांची माहिती
- सानिया मिर्झा माहिती
उच्च शिक्षणासाठी मुंबईतील खालसा महाविद्यालयामध्ये सचिनने ऍडमिशन घेतले. त्यानंतर स्वतःचे शिक्षण अर्धवट सोडून, सचिन स्वतःच्या प्रमुख ध्येयाकडे वळला व त्याने क्रिकेट विश्वामध्ये पदार्पण केले.
सचिनचे क्रिकेट विश्वात आगमन
सचिन तेंडूलकर म्हणतो की, “क्रिकेट हे माझे पहिले प्रेम आहे. क्रिकेटचा मी मनापासून आनंद घेतो, त्यामुळे मला एक नवीन ऊर्जा व महत्त्वकांक्षा प्राप्त होते. सचिनला बालपणापासून क्रिकेट खेळायला प्रचंड आवड होती. अभ्यासामध्ये त्याचे तितकेसे मन लागत नव्हते, दिवसभर सचिन मित्रांसोबत क्रिकेट खेळायचा. सुरुवातीला सचिन टेनिस बॉलने सराव करत असे.
त्याचा मोठा भाऊ अजित तेंडुलकरने सचिनचा क्रिकेटकडे असणारा कल बघून, त्याचे वडील रमेश तेंडुलकर यांच्यासोबत चर्चा केली. सचिनला जर योग्य मार्गदर्शन प्राप्त झाले, तर सचिन क्रिकेटमध्ये एक चांगले यश संपादन करू शकतो असे, आश्वासन सचिनच्या भावाने रमेश तेंडुलकर यांना दिले.
सचिन तेंडूलकर वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षाचा असताना, सचिनच्या वडिलांनी सचिनला फोन करून सचिनच्या मनामध्ये नेमकं क्रिकेट विषयी काय आहे ? हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला व त्याच्या भविष्याचा निर्णय घेण्यासाठी त्यांनी सचिनला प्रोत्साहित केले.
सचिनचे क्रिकेटवरील प्रेम पाहून सचिनला क्रिकेट प्रशिक्षणासाठी ऍडमिशन घेऊन दिले. त्यानंतर त्याचा सराव सीजन बॉल पासून सुरु झाला. सचिन तेंडूलकरचे पहिले गुरू रमाकांत आचरेकर हे होते. रमाकांत आचरेकरांनी सचिनची क्रिकेट विश्वामध्ये उत्साहीता पाहून, सचिनला शारदाश्रम विद्यामंदिर हायस्कूल मध्ये प्रवेश घेण्यास सांगितले.
कारण या शाळेचा क्रिकेट संघ हा खूप चांगला होता. अनेक चांगले खेळाडू येथून घडले आहेत, रमाकांत आचरेकर सर सचिन तेंडूलकरला शाळेच्या वेळेबाहेर सकाळ, संध्याकाळ क्रिकेटचे उत्तम प्रशिक्षण द्यायचे. यानंतर हळूहळू सचिनची अनेक संघांमध्ये निवड झाली.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये पदार्पण
मुंबईकडून देशांतर्गत क्रिकेटमध्ये 1988 मध्ये पदार्पण करतानासचिन तेंडूलकरची प्रतिभा दिसून आली. लहान वय असूनही, त्याचे फलंदाजीचे तंत्र आणि कौशल्य आणि संयम हाताळण्याची क्षमता दिसून आली. त्याच्या सुरुवातीच्या कामगिरीने महानतेची झलक दिसून येते.
भारतीय राष्ट्रीय संघात निवड
सचिन तेंडूलकरच्या अपवादात्मक कौशल्यामुळे वयाच्या १६ व्या वर्षी भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघात त्याची निवड झाली. १९८९ मध्ये त्याचे आंतरराष्ट्रीय पदार्पण म्हणजे एका युगाची सुरुवात होती. तेंडुलकरच्या तरुण वयाने खेळाकडे पाहण्याचा त्याचा परिपक्व दृष्टीकोन ठरवला आणि त्याने आपल्या कामगिरीने चाहतावर्ग मिळवला.
त्याच्या निवडीने एका प्रवासाची सुरुवात झाली,आणि भयंकर आव्हानांना सामोरे जाऊन अनेक विश्वविक्रम केले. सचिन तेंडूलकरचा भारतीय संघात समावेश हा केवळ वैयक्तिक कामगिरीच नाही तर भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील महत्वपूर्ण पर्व आहे.
आंतरराष्ट्रीय पदार्पण
सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मंचावर प्रवेश केल्याने एका विलक्षण कारकिर्दीची सुरुवात झाली.
पहिला कसोटी सामना
सचिन तेंडूलकरचा पहिला कसोटी सामना १५ नोव्हेंबर १९८९ रोजी पाकिस्तानविरुद्ध कराची येथे झाला. अवघ्या 16 व्या वर्षी, त्याने इम्रान खान आणि वसीम अक्रम यांच्या गोलंदाजीचा सामना करत प्रचंड संयम आणि कौशल्य दाखवले. आव्हानात्मक परिस्थिती असूनही, आपल्या पदार्पणात त्याने 15 धावा करत आपली क्षमता दाखवली.
पहिला एकदिवसीय सामना
18 डिसेंबर 1989 रोजी सचिन तेंडूलकरने गुजरानवाला येथे पाकिस्तानविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्या सामन्यात खाते उघडण्यापूर्वीच (पुन्हा) वकार युनूसने त्याला बाद केले. परंतु त्याच्या निर्भय दृष्टिकोनाने जगभरातील क्रिकेट रसिकांचे लक्ष वेधून घेतले. ही त्याच्या एकदिवसीय प्रवासाची सुरुवात होती.
सचिन तेंडूलकरची कसोटी आणि एकदिवसीय या दोन्ही प्रकारांमध्ये पदार्पण करिअरची सुरुवात झाली ज्यामुळे तो विक्रमांचे डोंगर रचत गेला, पिढ्यांना प्रेरणा देत गेला आणि क्रिकेटच्या जगामध्ये एक आयकॉन बनला.
सचिन तेंडुलकरचा कर्णधारपदाचा कार्यकाळ
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून सचिन तेंडुलकरचा कार्यकाळ हा त्याच्या बहुचर्चित क्रिकेट कारकिर्दीत नेतृत्व, आव्हाने आणि वाढीचा काळ होता.
सचिन भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून
1996 ते 2000 पर्यंत सचिन तेंडूलकरच्या कर्णधारपदाने क्रिकेटच्या मैदानावर आपल्या देशाचे नेतृत्व करण्याचे समर्पण दाखवले. तो प्रामुख्याने त्याच्या फलंदाजीच्या पराक्रमासाठी ओळखला जात असताना, त्यावेळी त्याने संघाला मार्गदर्शन करण्याची आणि धोरणात्मक निर्णय घेण्याची जबाबदारी स्वीकारली.
कर्णधारपदाची आव्हाने आणि अनुभव
आव्हाने आणि अनुभवांच्या मिश्रणाने सचिन तेंडूलकरचे कर्णधारपद हे चिन्हांकित होते. त्याने कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले. वैयक्तिक तेज असूनही या काळात संघाला काही अडचणींचा सामना करावा लागला. कर्णधारपदाच्या मागणीचा समतोल स्वतःच्या फलंदाजीच्या कामगिरीने करणे हे तेंडुलकरसमोर कायम आव्हान होते.
सचिन तेंडूलकरच्या नेतृत्वाखाली भारताने न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका जिंकल्या. 1999 चा क्रिकेट विश्वचषक हा त्याच्या कर्णधारपदाच्या काळातील उल्लेखनीय क्षणांपैकी एक होता, जिथे भारत सुपर सिक्स टप्पा पार करू शकला नाही. संघाची कामगिरी आणि त्याच्या कर्णधारपदाच्या निर्णयांना, चौकशीला सामोरे जावे लागले.
सचिन तेंडुलकरचे प्रेम जीवन आणि विवाह
सचिन तेंडुलकरच्या पत्नीचे नाव अंजली तेंडुलकर आहे. अंजली तेंडुलकर ही एक बालरोग तज्ञ आणि प्रसिद्ध उद्योगपती अशोक मेहता यांची मुलगी आहे. सचिनचा स्वभाव हा थोडासा लाजाळू, त्यामुळे तो कधीही मीडियासमोर, त्याच्या प्रेम कथेबद्दल तितकाच बोलला नाही.
सचिन तेंडूलकर प्रथम मुंबई विमानतळावर अंजली मेहता म्हणजेच त्याची बायको अंजली तेंडुलकर हिला भेटला. नंतर एका म्युचल मित्राच्याद्वारे सचिन तेंडूलकर पुन्हा एकदा अंजलीला भेटला. मग त्या दोघांमध्ये बोलणे वाढू लागले, अंजली ही मेडिकलची विद्यार्थिनी असून, तिला क्रिकेटमध्ये हा तितकाचा रस नव्हता. परंतु सचिन हा क्रिकेटपटू आहे हे तिला माहीत नव्हते.
दोघे एकमेकांना चांगले भेटू लागले. तेव्हा अंजलीला क्रिकेटमध्ये रस वाटू लागला. दोघेही ज्यावेळी एकमेकांना भेटले, तेव्हा अंजली तिचा मेडिकलचा अभ्यास करत होती. सचिन तेंडूलकरचा क्रिकेट प्रवास पण सुरू झाला होता.
सचिनने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यामुळे दोघांना दोघांच्या बिझी शेड्युलमुळे भेटणे तितकेसे सोपे होत नव्हते. कारण दोघेही ज्या ठिकाणी जात त्या ठिकाणी सचिनचे चाहते त्याला घेरत असत.
अंजली बोलली की, “सचिन तेंडूलकर जेव्हा आंतरराष्ट्रीय दौऱ्यावर होता, तेव्हासचिन तेंडूलकरशी बोलण्यासाठी, आंतरराष्ट्रीय फोनचे बिल वाचवण्यासाठी ती त्याला प्रेम पत्र लिहायची. सचिनचे आणि अंजलीचे हे नाते पाच वर्षे टिकले. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
२४ मे १९९९ रोजी सचिन व सचिन तेंडूलकरची बायको अंजली या दोघांनी एकमेकांसोबत लग्न केले. लग्नाच्या दोन वर्षानंतर सचिनच्या घरी मुलीचा जन्म झाला. जिचे नाव त्यांनी सारा तेंडुलकर ठेवले. व त्या दोन वर्षानंतर म्हणजेच मुलगा जन्मला. ज्याचे नाव अर्जुन ठेवले. यानंतर सचिन तेंडूलकरची पूर्ण फॅमिली झाली. मुले झाल्यावर अंजलीला तिचे काम थांबवावे लागले. आणि तिचे सर्व लक्ष मुलांच्या संगोपनावर केंद्रित झाले.
तिने इंटरव्यूच्या दरम्याने सांगितले की, “तिला आपले करिअर सोडायचा कोणताही पश्चाताप नाही. ती आपल्या पती आणि मुलांना वेळ देणे अधिक योग्य समजते. अंजलीने आदर्श आई व पत्नीचे कर्तव्य पार पाडले आणि यशस्वी वैवाहिक जीवन प्रस्थापित केले.
सचिन तेंडुलकरचे अफेअर
सचिन तेंडुलकर हा शांत स्वभावाचा असून, त्याने त्याचे वैयक्तिक आयुष्य मीडियासमोर कधी उघड केले नाही. आजपर्यंत सचिन तेंडुलकर याचे नाव फक्त एका मुलीशी जोडले गेले, आणि त्या मुली सोबतच सचिनने लग्न केले. ती म्हणजे त्याची बायको अंजली तेंडुलकर.
याशिवाय सचिन तेंडूलकरचे अजून कोणासोबतही नाव जोडले गेले नाही. त्याने फक्त अंजलीवर प्रेम केले व तिच्यासोबत लग्न करून, अंजली तेंडुलकर म्हणून तिची ओळख सर्व जगासमोर आणली.
सचिन तेंडूलकर लुक
वजन | ६२ किलोग्राम |
उंची | ५’ ५” फुट |
शरीराचा आकार | ३९-३० -१२ |
डोळ्यांचा रंग | गडद तपकिरी |
केसांचा रंग | काळा |
सचिन तेंडुलकरची कारकीर्द
- सचिन तेंडूलकरची क्रिकेट कारकीर्द आणि आगामी सर्व खेळाडूंसाठी एक मार्गदर्शक आहे. सचिनचे वडील, भाऊ व मुख्य प्रशिक्षक आचरेकर सर यांची भूमिका ही महत्त्वाची होती. सचिन क्रिकेटसाठी अतिशय समर्पित होता. त्याने आपले स्थान मिळवण्यासाठी संपूर्ण आयुष्य क्रिकेटसाठी समर्पित केले.
- १९८८ मध्ये त्याने राज्यस्तरीय सामन्यात मुंबई संघाकडून खेळताना, स्वतःच्या क्रिकेट विश्वातील कारकीर्दला सुरुवात केली व त्या ठिकाणी सचिन तेंडूलकरने पहिले शतक झळकावले. या सामन्यातील त्याची उत्कृष्ट कामगिरी पाहून, सचिनची राष्ट्रीय स्तरावर निवड करण्यात आली. तो प्रथमच भारत टीम कडून खेळला.
- सचिन तेंडूलकरचा पहिला आंतरराष्ट्रीय सामना वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी पाकिस्तान सोबत झाला. त्यानंतर सचिन तेंडूलकरने दमदार कामगिरी केली. आणि या सामन्यांमध्ये त्याच्या नाकाला दुखापत झाली. मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला. परंतु त्याने जिद्दीने व चिकाटीने त्याची चांगली कामगिरी सर्वांसमोर दाखवून पाकिस्तानी संघासोबत खेळताना षटकार मारून टीमला विजयी केले.
- १९९० च्या दरम्याने सचिनने पहिला कसोटी सामना खेळला. जो भारत इंग्लंड दरम्यान खेळला गेला. या ठिकाणी सचिनने शतक झळकावून, कमी वयामध्ये शतक झळकवण्याचा विक्रम मोडला.
- सचिनच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे सर्वांना सचिन तेंडूलकरचे चाहते बनण्यास भाग पाडले. १९९६ च्या विश्वचषकात टीम इंडियाचा कर्णधार सचिनला बनवण्यात आला.
- १९९८ मध्ये सचिन तेंडूलकरने कर्णधार पद सोडले, परंतु १९९९ मध्ये सचिन तेंडूलकरला पुन्हा कर्णधारपद सोपवण्यात आले. परंतु संघाला सचिनचे कर्णधार पद आवडले नाही, आणि त्यांनी २५ पैकी फक्त चार कसोटी सामने जिंकले. म्हणून त्यांनी कर्णधार पदाचा स्वतःहून राजीनामा दिला. पुन्हा सचिनने कधीही संघाचे नेतृत्व केले नाही.
- २००१ च्या दरम्याने एक दिवसीय सामन्यात दहा हजार धावा करणारा सचिन तेंडूलकर हा पहिला क्रिकेटपटू ठरला. २००३ हा सचिन साठी सुवर्णकाळ होता. २००३ पासून सचिन तेंडूलकरच्या चाहत्यांमध्ये वाढ होत गेली.
- सचिन तेंडूलकरने ११ सामन्यांमध्ये ६७३ धावा करून, टीम इंडियाला विजय मिळवून दिला.
- वर्ल्ड कप फायनल मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या सामन्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. त्यामुळे सचिनला “मॅन ऑफ द मॅचचा” किताब मिळाला.
- सचिनने विविध सामने वेगवेगळ्या भागांमध्ये जाऊन खेळले, या सामन्यांमध्ये सचिन तेंडूलकरने एकेकाळी खूप वाईट वेळ पाहिली. जेव्हा त्याच्यावर सामना हरवल्याचा आरोप लावला. परंतु कशाकडेही लक्ष न देता त्याने स्वतःच्या खेळावर लक्ष केंद्रित करून, स्वतःला एक वेगळे स्थान प्राप्त करून देण्यासाठी नेहमी प्रयत्न केला.
- २००७ मध्ये सचिन तेंडूलकरने एका कसोटी सामन्यात ११००० धावा करण्याचा स्वतःचाच विक्रम पुन्हा मोडून काढला. त्यानंतर तो पुन्हा २०११ च्या विश्वचषकात पूर्ण समर्पित होऊन, उतरला व त्याने द्विशतक झळकावले या मालिकेत ४८२ धावा सचिन तेंडूलकरने एकट्याने केल्या.
- २०११ विश्वचषक भारताने जिंकली. सचिन तेंडूलकरने लहानपणापासून पाहिलेले स्वप्न साकार झाले व त्याचा विश्वचषकातील हा पहिला विजय ठरला.
सचिन तेंडुलकरचे पुनरागमन आणि आव्हाने
सचिन तेंडुलकरचा प्रवास हा आव्हाने आणि उल्लेखनीय पुनरागमन या दोन्हींद्वारे दर्शवला जातो. प्रतिकूल परिस्थितीतही आपला दृढनिश्चय आणि प्रबळ इच्छाशक्ती त्याची कारकीर्द सक्षम होण्यास मदत करते.
सचिनला झालेल्या दुखापती आणि अडथळे
त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत, सचिन तेंडूलकरला अशा दुखापतींचा सामना करावा लागला ज्याने महत्त्वपूर्ण आव्हाने उभी केली. त्याला पाठीच्या समस्या, कोपराच्या दुखापती आणि इतर विविध आजारांचा सामना करावा त्याला करावा लागला ज्यामुळे त्याच्या खेळण्याच्या कारकिर्दीला धोका निर्माण झाला होता. या दुखापतींमुळे त्याला महत्त्वपूर्ण सामने आणि मालिका चुकवायला भाग पाडले, त्यावेळी त्याच्या मानसिक आणि शारीरिक क्षमतेची चाचणी घेतली गेली होती.
सचिनचा दृढनिश्चय आणि यशस्वी वाटचाल
दुखापतींवर मात करून मजबूत पुनरागमन करण्याची सचिन तेंडूलकरची क्षमता त्याच्या विलक्षण दृढनिश्चयाचे प्रदर्शन करते. त्याच्या पुनरागमनाच्या प्रयत्नांनी, त्याच्या अतूट इच्छाशक्तीने, दृढनिश्चयाने त्याला वेळोवेळी परत येण्यास सक्षम केले.
महत्वाचे म्हणजे, 2005 मध्ये कोपराच्या मोठ्या दुखापतीनंतर, त्याने आपल्या खेळाची लय परत मिळविण्यासाठी कठोर परिश्रम केले आणि उल्लेखनीय टप्पे गाठले. सचिन तेंडूलकरचे यशस्वी पुनरागमन हे त्याच्या खेळाप्रती असलेल्या वचनबद्धतेचा आणि क्रिकेटच्या शिखरावर राहण्यासाठी आवश्यक असलेल्या कठोर परिश्रमांचा पुरावा होता. अडथळ्यांवर मात करण्याची आणि नव्या जोमाने मैदानात परतण्याची सचिनची क्षमता सर्वांना प्रेरणा देणारी आहे.
सचिन तेंडुलकरचे सामन्यांचे रेकॉर्ड
सचिन कसोटी सामने रेकॉर्ड्स
सचिन तेंडूलकरने एकूण २०० कसोटी सामने खेळले आहे. ज्यामध्ये सचिनने ५१ शतके, ६८ अर्धशतके झळकावली. या कसोटी सामन्यातील सचिनची उत्तम कामगिरी खालील तपशील मध्ये दिलेली आहे.
बेटिंग | गोलंदाजी | ||
रेकॉर्ड्स | ३२९ | सर्वोत्तम खेळी | १४५ |
नाबाद | ३३ | विकेट्स | ४६ |
चौकार विक्रम | २०५८ | इकोनोमिक रेट्स | ३.५३ |
षटकार विक्रम | ६९ | बॉल | ४२४० |
सर्वाधिक धावा | २४८ | ||
सरासरी | ५३.७९ | ||
स्कोअरिंग दर | ५४ . ०८ | ||
अर्धशतक | ६८ | ||
शतक | ५१ |
सचिन वनडे मॅच रेकॉर्ड्स
सचिनने ४६३ एकदिवसीय सामन्यांमध्ये ९६ अर्धशतके व ४९ शतके स्वतःच्या नावे करून घेतली. सचिनचा एकदिवसीय सामन्याचा रेकॉर्ड खालील तपशील मध्ये दिलेला आहे.
बेटिंग | गोलंदाजी | ||
रेकॉर्ड्स | ४५२ | सर्वोत्तम खेळी | २७० |
नाबाद | ४१ | विकेट्स | १५४ |
चौकार विक्रम | २०१६ | इकोनोमिक रेट्स | ५.१ |
षटकार विक्रम | १९५ | बॉल | ६८५० |
सर्वाधिक धावा | २०० | ||
सरासरी | ४४.८३ | ||
स्कोअरिंग दर | ८६.२४ | ||
अर्धशतक | ९६ | ||
शतक | ४९ |
सचिन तेंडुलकरचे T-20 मॅच रेकॉर्ड
सचिन तेंडूलकर फक्त एक T-20 सामना केला. ज्यामध्ये त्यांनी दहा धावा केल्या व दोन चौकार मारले, त्यासाठी सामन्याचा तपशील खाली दिलेला आहे.
बेटिंग | गोलंदाजी | ||
रेकॉर्ड्स | १ | सर्वोत्तम खेळी | १ |
नाबाद | ० | विकेट्स | १ |
चौकार विक्रम | २ | इकोनोमिक रेट्स | ४.८ |
षटकार विक्रम | ० | बॉल | १५ |
सर्वाधिक धावा | १० | ||
सरासरी | १० | ||
स्कोअरिंग दर | ८३.३३ | ||
अर्धशतक | ० | ||
शतक | ० |
सचिन तेंडुलकरचे आयपीएल मॅच रेकॉर्ड
सचिन तेंडुलकरने त्याच्या क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये एकूण ७८ आयपीएल सामने खेळले. ज्यामध्ये त्याने २९ षटकार व २९५ चौकार मारले. तसेच एक शतक व १३ अर्धशतके सचिनने स्वतःच्या नावे केली.
बेटिंग | गोलंदाजी | ||
रेकॉर्ड्स | ७८ | सर्वोत्तम खेळी | ४ |
नाबाद | ९ | विकेट्स | ० |
चौकार विक्रम | २९५ | इकोनोमिक रेट्स | ९.६७ |
षटकार विक्रम | २९ | बॉल | ३६ |
सर्वाधिक धावा | १०० | ||
सरासरी | ३३.८३ | ||
स्कोअरिंग दर | ११९.८२ | ||
अर्धशतक | १३ | ||
शतक | १ |
सचिनची क्रिकेटमधून निवृत्ती
क्रिकेटचा बादशहा व महान क्रिकेटर सचिन तेंडुलकर याने, जेव्हा क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी सचिनच्या या निर्णयामुळे त्याचे खूप चाहते दुखावले गेले. या निर्णयाला विरोध सुद्धा केला. परंतु डिसेंबर २०१२ मध्ये सचिनने एक दिवसीय सामन्यामधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला.
जानेवारी २०१३ च्या दरम्याने सचिन तेंडूलकरने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. जेव्हा ही बातमी प्रसारमाध्यमाद्वारे सर्वत्र पसरली, तेव्हा या निर्णयाने अनेक चाहत्यांची मने मोडली गेली. सचिनला त्याचा निर्णय मागे घेण्याची विनंती सुद्धा करण्यात आली, परंतु सचिन त्याच्या मतावर ठाम राहिला.
सचिन तेंडूलकरने 16 नोव्हेंबर 2013 रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमच्या त्याच्या घरच्या मैदानावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप दिला. भावनिक वातावरणातून त्याचे चाहत्यांशी असलेले खोल नाते दिसून आले. त्याची अंतिम खेळी त्याच्या कारकिर्दीची एक मार्मिक आठवण करून देणारी होती.
ज्यावेळी त्याने निरोपाचे भाषण केले त्यावेळी आपल्या घरचे,नातेवाईक आणि मित्रमंडळी तसेच आपल्यासारखे चाहते यांचे सुद्धा त्याच्या यशाचे वाटेकरू म्हणून आभार मानले. जयजयकार आणि कृतज्ञतेच्या अश्रूंमध्ये त्याने मैदान सोडले.
सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याने एका युगाचा अंत झाला. त्याने आपल्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये ३४ हजार धावा केल्या. ज्यामध्ये १०० शतकांचा समावेश आहे. आजपर्यंत कोणत्याही क्रिकेटरने हा विक्रम मोडलेला नाही.
सचिन तेंडूलकरच्या निवृत्तीने दोन दशकांहून अधिक काळ पसरलेल्या एका अतुलनीय क्रिकेट प्रवासाचा समारोप झाला, जो खेळाच्या इतिहासात कायमचा कोरला जाईल, असा वारसा मागे सोडला.
क्रिकेट विश्वात सतत सहभाग
निवृत्तीनंतरही सचिन तेंडूलकरचा क्रिकेट विश्वातील सहभाग कायम होता. निवृत्तीनंतर जुलै 2014 मध्ये, त्याने लॉर्ड्स येथे द्विशताब्दी सेलिब्रेशन सामन्यात MCC संघाचे नेतृत्व केले. सल्लागाराच्या भूमिकांमधून सचिनची क्रिकेटशी बांधिलकी कायम राहिली. तो मुंबई इंडियन्स, आयपीएल संघाचा मार्गदर्शक बनला.
त्याने मुंबई इंडियन्स आयपीएल संघासोबत आपला संबंध सुरू ठेवला, तरुण खेळाडूंना मार्गदर्शन दिले. त्याने आपले अंतर्दृष्टी आणि अनुभव तरुण खेळाडूंसोबत शेअर केले. डिसेंबर २०१४ मध्ये, त्याला आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०१५ स्पर्धेचा राजदूत म्हणून घोषित करण्यात आले.
त्यांच्या निवृत्तीनंतरच्या प्रयत्नांमध्ये सतत परोपकारी प्रयत्न आणि विविध व्यावसायिक उपक्रमांमध्ये सहभाग यांचा समावेश होता. या पाठपुराव्याने मैदानावर आणि मैदानाबाहेर फरक करण्यासाठी त्याचे समर्पण दाखवले.
तेंडुलकरने माजी क्रिकेटपटू शेन वॉर्नच्या भागीदारीत प्रदर्शनी क्रिकेट सामने आयोजित केले. क्रिकेट ऑल-स्टार्स यूएस मध्ये बेसबॉल स्टेडियममध्ये आयोजित केले गेले होते आणि त्यामध्ये निवृत्त खेळाडू होते, त्यापैकी काही सौरव गांगुली, शोएब अख्तर, वसीम अक्रम होते.
ऑस्ट्रेलियन बुशफायर पीडितांसाठी निधी उभारण्यासाठी आयोजित एक धर्मादाय सामना होता, 8 फेब्रुवारी 2020 रोजी, तो बुशफायर क्रिकेट बॅशमध्ये खेळला. 2020-21 रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजमध्ये विजय मिळवण्यासाठी त्याने भारतीय दिग्गज संघाचे नेतृत्व केले आणि स्पर्धेत भारतीय संघासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता.
ही त्यांची दुसरी टर्म आहे कारण त्यांनी आधीची आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०११ चे राजदूतपद भूषवले आहे. याव्यतिरिक्त, त्याने क्रिकेट कॉमेंट्रीमध्ये योगदान दिले, त्याचे विश्लेषण आणि कौशल्य प्रेक्षकांना दिले. क्रिकेटबद्दलची त्याची आवड आणि प्रतिभेचे पालनपोषण याने खेळाच्या भविष्यासाठीचे त्याचे समर्पण अधोरेखित केले.
याव्यतिरिक्त, क्रिकेट समालोचक म्हणून सचिनच्या योगदानाने त्याच्या निवृत्तीनंतरच्या कारकिर्दीला एक नवीन आयाम जोडला. त्याचे तज्ञ विश्लेषण आणि अंतर्दृष्टीने दर्शकांची गेमबद्दलची समज समृद्ध झाली. तेंडुलकरच्या निवृत्तीमुळे त्याची खेळण्याची कारकीर्द संपुष्टात आली, पण त्याचा परिणाम झाला नाही. क्रिकेट आणि इतर उपक्रमांमधला त्याचा सतत सहभाग या खेळाप्रती त्याची चिरस्थायी बांधिलकी आणि अर्थपूर्ण मार्गांनी समाजासाठी योगदान देण्याची त्याची इच्छा दर्शवितो.
सचिन तेंडुलकर आंतरराष्ट्रीय पदार्पण
ODI (ODI) | १८ डिसेंबर १९८९ भारत आणि पाकिस्तान गुजरांवाला |
कसोटी | १५ नोव्हेंबर १९८९ भारत आणि पाकिस्तान कराची |
T-२० | ०१ डिसेंबर २००६ भारत आणि दक्षिण आफ्रिका, जोहान्सबर्ग |
सचिन तेंडुलकर आंतरराष्ट्रीय शेवटचे सामने
ODI | 18 मार्च 2012 पाकिस्तान वि |
कसोटी | 14 नोव्हेंबर 2013 विरुद्ध वेस्ट इंडिज |
T-२० | ऑक्टोबर २०१३ |
सचिन तेंडुलकरला मिळालेले पुरस्कार आणि यश
पुरस्कार | वर्ष |
भारतरत्न | २०१३ |
पद्मश्री | १९९९ |
विस्डेन क्रिकेटर ऑफ द इयर | १९९७ |
राजीवगांधी खेळरत्न अवार्ड | १९९७ |
पद्मविभूषण | २००८ |
सर गारफिल्ड सोबर्स ट्रॉफी | २०१० |
एलजी पीपल्स चॉईस अवॉर्ड | २०१० |
महाराष्ट्र भूषण पुरस्कार | २००१ |
विस्डेन जगातील आघाडीचा क्रिकेटपटू | २०१० |
विस्डेन इंडिया उत्कृष्ट कामगिरी पुरस्कार | २०१२ |
क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी | २०१० |
अर्जुन पुरस्कार | १९९४ |
ICC ODI टीम ऑफ द इयर | २०१०,२००७,२००४ |
कॅस्ट्रॉल इंडियन क्रिकेटर ऑफ द इयर | २०११ |
जागतिक कसोटी इलेव्हन | २०११, २०१०, २००० |
पीपल्स चॉइस अवॉर्ड | २०१० |
BCCI क्रिकेटर ऑफ द इयर | २०११ |
सचिन तेंडुलकरच्या आवडी आणि पसंती
खाद्य पदार्थ | बॉम्बे डक, क्रॅब मसाला, कीमा पराठा, लस्सी, चिंगरी प्रॉन्स, मटण बिर्याणी, मटन करी, बैंगन भरता, सुशी |
अभिनेत्री | माधुरी दीक्षित |
अभिनेता | अमिताभ बच्चन, आमिर खान, नाना पाटेकर |
चित्रपट | शोले |
खेळ | क्रिकेट, लॉन टेनिस |
रंग | निळा |
आवडते ठिकाण | न्यूझीलंड, मसुरी |
आवडता गायक | किशोर कुमार, लता मंगेशकर |
आवडते संगीतकार | सचिन देव बर्मन, बप्पी लाहिरी |
खेळाडू | जॉन मॅकेनरॉय आणि रॉजर फेडरर |
आवडते गाणे | “याद आ रहा है तेरा प्यार” बप्पी लाहिरी |
आवडते क्रिकेट मैदान | सिडनी |
सचिन बद्दल काही मनोरंजक तथ्य
- सचिनच्या वडिलांना म्हणजे रमेश तेंडुलकर यांना संगीतामध्ये प्रचंड आवड होती. म्हणून, त्यांनी त्या काळातील प्रसिद्ध संगीतकारांच्या नावावरून सचिनचे नाव ठेवले. सचिनची मुलगी सारा तेंडुलकर हिचा आवाज सुद्धा अप्रतिम आहे व ती पण मधुर संगीत गाते.
- सचिनला घड्याळ व पर्फुम्स गोळा करून साठवण्याचा छंद आहे
- सचिनचे क्रिकेट गुरु रमाकांत आचरेकर यांनी सचिन सोबत प्रचंड मेहनत केली, आणि त्याला एक यशस्वी क्रिकेटर बनवले. आपल्या कारकर्दीतील जुने दिवस आठवून सचिनने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, “क्रिकेट सराव करताना त्याचे प्रशिक्षक विकेटवर एक नाणे ठेवायचे, जर त्याला कोणी बाद केले, तर त्या खेळाडूला हे नाणे मिळेल. अन्यथा तो स्वतःसाठी हे नाणे मिळवेल. जे सचिनच्या आयुष्यासाठी एक बहुमूल्य बक्षीस होते.
- सचिन एकवेव असा खेळाडू आहे ज्याने रणजी, दलीप व इराणी ट्रॉफी या सामन्यामध्ये सुरवातीलाच शतक पटकावले होते. आणि त्याचा हा रेकॉर्ड आजपर्यंत कोणीही मोडू शकला नाहीये.
- सचिन गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्ही उजव्या हाताने खेळतात परंतु लिहितात मात्र डाव्या हाताने तसेच ते टेनिस देखील डाव्याच हाताने खेळतात.
- विनोद कांबळी हा सचिनचा शारदाश्रम शाळेतील अगदी जवळचा मित्र होता. विनोद कांबळी व सचिन या दोघांचा क्रिकेट प्रवास शारदाश्रम शाळेमधूनच सुरू झाला.
- सचिनची पत्नी सचिन पेक्षा सहा वर्षांनी मोठी आहे.
- जेव्हा सचिन bating करत असतात तेंव्हा त्यांची पत्नी अंजली ना काही अन्न खातात व पाणी देखील पीत नाही.
- २००८ मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया मध्ये मोहाली येथे सामना झाला होता तेंव्हा सचिन ने सर्वाधिक धावांचा रेकॉर्ड मोडला होता. मैदानात इतका जल्लोष होता कि आतिशबाजी मुळे २० मिनिटे खेळ थांबविण्यात आला जेणे करून झालेला धूर निघून जाईल.
- क्रिकेटपेक्षा वेगळा व्यवसाय सुरु केला, सचिनने मुंबईमधील कुलाबा या ठिकाणी तेंडुलकर रेस्टॉरंट नावाचे एक रेस्टॉरंट ओपन केले आहे.
- सचिन ची बॅट साधारण १.५ किलोग्राम ची असायची. एवढी जड बॅट फक्त दक्षिण आफ्रिकेचे लान्स क्लूजनर वापरत होते.
- सचिनला कारची आवड आहे आणि त्याच्याकडे अनेक लक्झरी आणि स्पोर्ट्स कार आहेत ज्यात BMW i8, Ferrari 360 Modena आणि Nissan GT-R यांचा समावेश आहे.
- सचिन कधी कधी घरी आपली पत्नी अंजली व आपल्या मुलांसाठी नाश्ता बनवितात. एवढेच नव्हे तर १९९८ मध्ये सचिन ने संपूर्ण संघासाठी वांग्याचे भरीत बनविले होते.
- सचिन तेंडुलकरच्या मेणाच्या पुतळ्याचे 2009 मध्ये लंडनमधील मादाम तुसाद संग्रहालयात अनावरण करण्यात आले, त्याची जागतिक लोकप्रियता आणि खेळातील योगदान ओळखून.
- सचिनच्या जीवनावर आधारित एक चित्रपट तयार करण्यात आला आहे, ज्या चित्रपटाचे नाव अ ब्रिलियन ड्रीम असे आहे. यामध्ये सचिन तेंडुलकरने मुख्य भूमिका साकारली आहे.
- सचिन तेंडुलकरला क्रिकेटमधील योगदानाबद्दल म्हैसूर विद्यापीठ आणि पूर्व लंडन विद्यापीठासह अनेक विद्यापीठांनी मानद डॉक्टरेट प्रदान केली आहे.
सचिन तेंडुलकर क्रिकेटच्या पलीकडे
सचिन तेंडुलकरचा प्रभाव क्रिकेट क्षेत्राच्या पलीकडे पसरलेला आहे, त्याच्या परोपकारी प्रयत्नांनी आणि उद्योजकीय उपक्रमांनी विविध क्षेत्रात छाप सोडली आहे.
सोशल मीडियामध्ये उपस्थिती
सचिन ट्विटर आणि इंस्टाग्रामसह सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सक्रिय उपस्थिती दाखवतो. चाहत्यांशी संवाद साधण्यासाठी, तो या प्लॅटफॉर्मचा वापर करतो.
क्रिकेट मार्गदर्शक आणि सल्लागार
सचिन तेंडुलकरने आपले अफाट ज्ञान आणि अनुभव युवा क्रिकेटपटूंसोबत शेअर केले आहेत. 2013 पासून इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये मुंबई इंडियन्स संघाचे मार्गदर्शक आणि सल्लागार म्हणून सचिन काम करत आहे. त्यांच्या कार्यकाळात मुंबई इंडियन्सने अनेक IPL खिताब जिंकून संघाच्या यशात त्यांचे मार्गदर्शन आणि मेंटॉरशिप महत्त्वपूर्ण ठरली आहे.
उपक्रम
सचिन केरळ ब्लास्टर्स फुटबॉल क्लबचा सह-मालक आहे, त्याने क्रिकेटच्या पलीकडे असलेल्या खेळांबद्दलची आवड दाखवली. आपल्या क्रिकेट कारकिर्दीपलीकडे, सचिनने विविध व्यवसाय आणि उद्योजकीय उपक्रमांमध्ये झोकून दिले आहे.
सचिनने इंग्लंडच्या ‘मिडलसेक्स क्लब’सोबत करार केला असून ‘सचिन तेंडुलकर मिडलसेक्स ग्लोबल अॅकॅडमी’च्या माध्यमातून क्रीडा शिक्षणाचा प्रसार करण्यातही त्यांचा सहभाग आहे. या उपक्रमाचा फक्त चांगले क्रिकेटर घडवणे हाच हेतू नसून भविष्यात सुजाण जागतिक नागरिक घडवणे हा देखील मुख्य हेतू आहे.
लेखक आणि आत्मचरित्र
सचिन तेंडुलकरने त्याचे आत्मचरित्र लिहिले, “प्लेइंग इट माय वे”, जे 2014 मध्ये प्रसिद्ध झाले. हे पुस्तक त्याचे जीवन आणि क्रिकेट प्रवासाचे तपशीलवार वर्णन देते, त्याचे अनुभव, संघर्ष आणि विजयांबद्दल माहिती देते.
क्रिकेट प्रशासन आणि सुधारणा
सचिन तेंडुलकरने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) स्थापन केलेल्या क्रिकेट सल्लागार समितीचे (CAC) सदस्य म्हणून काम केले. भारतीय क्रिकेटमधील सुधारणांना प्रोत्साहन आणि अंमलबजावणी करण्यात सक्रिय सहभाग घेतला आहे. त्यांनी भारतीय राष्ट्रीय संघाचे मुख्य प्रशिक्षक निवडण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
दूरदर्शन समालोचक आणि विश्लेषक
सचिनने दूरचित्रवाणी समालोचक आणि क्रिकेट विश्लेषक म्हणूनही कारकीर्द घडवली आहे. तो क्रिकेट प्रसारणादरम्यान आपल्या तज्ञ अंतर्दृष्टी आणि विश्लेषण प्रदान करतो.
परोपकारी उपक्रम
सचिन विविध परोपकारी कार्यात सक्रियपणे सहभागी झाला आहे. त्यांनी सचिन तेंडुलकर फाउंडेशनची स्थापना केली, जी आरोग्यसेवा, शिक्षण आणि बाल कल्याणाशी संबंधित उपक्रमांवर लक्ष केंद्रित करते. फाउंडेशनने अनेक धर्मादाय प्रकल्पांना समर्थन दिले आहे आणि संपूर्ण भारतातील जीवन सुधारण्यात महत्त्वपूर्ण प्रभाव पाडला आहे.
परोपकारी कार्य आणि योगदान
वंचित मुलांचे शिक्षण आणि आरोग्यसेवा यासह विविध उपक्रमांमध्ये सचिनचा सहभाग आहे.सचिनची समाजकारणाशी असलेली बांधिलकी त्यांच्या परोपकारी प्रयत्नातून दिसून येते. ‘मेक-ए-विश फाऊंडेशन’ आणि ‘लेंड अ हेल्पिंग हँड’ सारख्या संस्थांशी त्यांचा संबंध समाजाला मदत करण्याच्या त्याच्या वृत्तीवर प्रकाश टाकतो.
ब्रँड समर्थन आणि राजदूत भूमिका
सचिन ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून अनेक ब्रँडशी जोडलेला आहे. त्याच्या प्रतिष्ठित उंचीने आणि प्रतिष्ठेने त्याला विविध उत्पादने आणि सेवांचे समर्थन करण्यासाठी एक लोकप्रिय व्यक्तिमत्व बनवले आहे.
उद्योजक उपक्रम
सचिन इंडियन सुपर लीग (ISL) मधील केरळ ब्लास्टर्स फुटबॉल क्लबचे सह-मालक असून भारतातील इतर खेळांना प्रोत्साहन आणि वाढ करण्यात पसंती दाखवतात. त्यांनी उद्योजकतेमध्ये प्रवेश केला असून विविध व्यावसायिक उपक्रमांमध्ये गुंतवणूक आणि प्रोत्साहन देण्याचे काम करतात.
सचिन तेंडुलकर संबंधित काही वाद
- सचिन तेंडुलकर खूप चांगला गोलंदाज होता. सचिनची गोलंदाजीची शैली ही अप्रतिम होती. २००१ मध्ये जेव्हा दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये सामना झाला, त्यावेळी क्रिकेटर सौरभ गांगुलीने सचिनवर बॉल टेपरिंगचा आरोप केला होता. या गोष्टीचे सचिनला फार दुःख झाले. सचिन वर कसोटी सामन्याची बंदी घालण्यात आली. रेफरी खूप आश्चर्यचकित झाले. या संपूर्ण प्रकरणाची तळाशी चौकशी करून, जुने फोटोज पाहिले गेले. त्यानंतर सचिन निर्दोष असल्याचे सिद्ध झाले.
- २००२ च्या दरम्याने २९ कसोटी शतके पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सर डॉन ब्रॅडमन यांनी सचिनला फरारी ३६० स्पोर्ट कार भेट म्हणून दिली. लाच देऊन एक कोटीहून अधिक रुपयांचे आयात शुल्क माफ केल्याचा, सचिनवर आरोप होता. यासाठी न्यायालयात खटला दाखल करून नंतर ही रक्कम सचिनला परत करावी लागली.
- सचिनच्या वाढदिवसानिमित्त त्याचे खास मित्र व नातेवाईकांनी पार्टीचे नियोजन केले होते, यांनी वाढदिवसाच्या पार्टीत केकवर तिरंग्याची रचना करण्यात आली होती. २०१० मध्ये जेव्हा सचिनने हा केक कापला, तेव्हा त्याच्यावर भारतीय राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याचा आरोप होता.
सचिन तेंडुलकरचे विचार
- मला क्रिकेटमध्ये हरणे आवडत नाही. क्रिकेट हे माझे पहिले प्रेम आहे. एकदा मी मैदानात उतरलो की, ते माझ्यासाठी पूर्णपणे वेगळे क्षेत्र आहे. आणि जिंकण्याची भूक मला नेहमीच असते.
- मी कुठे जात आहे, याचा कधीच विचार करत नाही. किंवा कोणतेही ध्येय गाठण्यासाठी स्वतःला भाग पाडत नाही.
- मी तुमची तुलना इतरांशी कधीच केली नाही.
- प्रत्येकाची स्वतःची शैली असते, आणि मैदानावर आणि मैदानाबाहेर स्वतःला सादर करण्याची वेगळी पद्धत असते.
- टीकाकारांनी मला माझे क्रिकेट शिकवले नाही, आणि माझ्या शरीरात आणि मनात काय आहे हे त्यांना माहीत नाही.
- चेंडूकडे पहा आणि आपल्या क्षमतेनुसार खेळा.
- वेगवेगळे खेळाडू विजयासाठी स्वतःचे योगदान देतात, म्हणून विजय नेहमीच महान असतो.
- मी फार पुढे विचार करत नाही, मी एका वेळी एकाच गोष्टीचा विचार करतो.
- मी एक खेळाडू आहे. राजकारणी नाही. मी एक खेळाडू आहे आणि तसाच राहणार. मी क्रिकेट सोडून राजकारणात येणार नाही. क्रिकेट हे माझे जीवन आहे मी त्याच्या सोबतच राहणार.
सचिन तेंडुलकरांच्या कारकिर्दीवर केंद्रित पुस्तकांची यादी
- सचिन तेंडुलकर : एक निश्चित चरित्र – वैभव पुरंदरे, (2005)
- सचिन : आता शंभर शतके – कृष्णस्वामी, व्ही. (2012)
- मास्टर स्ट्रोक : सचिन तेंडुलकरची 100 शतके – नीलिमा आठल्ये, (२०१२)
- धृवतारा – संजय दुधाणे, (2013) दिलीपराज प्रकाशन.
- सचिन तेंडुलकर मास्टरफुल – पीटर मरे, (2002).
- सचिन के सौ शतक – धर्मेंद्र पंत, (२०१२)
- क्रिकेट हा धर्म असेल तर सचिन देव आहे – विजय संथानम, (2009)
- सचिन : जगातील महान फलंदाजाची कहाणी – Gulu Ezekiel, (2002).
- सचिन तेंडुलकरचा ए टू झेड – Gulu Ezekiel, (2002).
सचिन तेंडुलकरची व्यावसायिक कारकीर्द
- ऑक्टोबर 2021 मध्ये, तेंडुलकरचे नाव Pandora पेपर्स लीकमध्ये आले होते. त्यांच्या प्रतिनिधींनी तेंडुलकरच्या गुंतवणुकीवर कायदेशीर आणि पूर्णपणे कर आकारला असल्याचे सांगितले.
- 1995 मध्ये, त्याने WorldTel सोबत विक्रमी क्रीडा व्यवस्थापन करारावर स्वाक्षरी केली , या कराराचे मूल्य पाच वर्षांमध्ये ₹ 300 दशलक्ष (US$3.8 दशलक्ष) इतके होते.
- तेंडुलकरने दोन रेस्टॉरंट उघडले आहेत: तेंडुलकरचे ( कुलाबा, मुंबई ) आणि सचिनचे ( मुलुंड, मुंबई ). मार्स रेस्टॉरंट्सच्या संजय नारंग यांच्या भागीदारीत या रेस्टॉरंट्सची मालकी सचिनकडे आहे.
- 2006 मध्ये, तेंडुलकरचे विपणन हक्क साची आणि साची यांना तीन वर्षांच्या, ₹ 1.8 अब्ज (US$23 दशलक्ष) कराराद्वारे विकले गेले.
- 2001 मध्ये त्यांनी WorldTel सोबत पाच वर्षांच्या, ₹ 800 दशलक्ष (US$10 दशलक्ष) करारासह पुन्हा स्वाक्षरी केली.
- सचिन रमेश तेंडुलकर स्पोर्ट्स मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड ही क्रीडा व्यवस्थापन संस्था सुरू केली. तेंडुलकरांच्या सर्व सामाजिक आणि व्यावसायिक कामांचे व्यवस्थापन करते.
सचिन तेंडुलकरची राजकीय कारकीर्द
- एप्रिल 2012 मध्ये, तेंडुलकर यांना राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी भारताच्या संसदेचे वरिष्ठ सभागृह, राज्यसभेवर नामनिर्देशित केले होते. हा सन्मान मिळवणारा तो पहिला सक्रिय खेळाडू आणि क्रिकेटपटू ठरला. त्यांनी ४ जून रोजी पदाची शपथ घेतली. त्यांनी नवी दिल्लीत त्यांना वाटप केलेला बंगला स्वीकारण्यास नकार दिला.
- खासदार म्हणून आपल्या कारकिर्दीत त्यांनी 22 प्रश्न विचारले आणि कोणत्याही वादात भाग घेतला नाही. त्यांच्या पहिल्या वर्षात ते एकाही दिवशी अर्थसंकल्पीय किंवा हिवाळी अधिवेशनाला उपस्थित राहिले नाहीत आणि पावसाळी अधिवेशनासाठी त्यांची उपस्थिती ५ टक्के होती. ते माहिती तंत्रज्ञान स्थायी समितीचे सदस्य होते. एकूणच, त्याच्या सहा वर्षांच्या कालावधीसाठी त्यांची उपस्थिती 8 टक्के होती. त्याच्या उपस्थितीबद्दल झालेल्या टीकेला उत्तर देताना, तेंडुलकर म्हणाले की वैयक्तिक समस्यांमुळे तो अनुपस्थित होता.
- राज्यसभेचे खासदार म्हणून सहा वर्षांच्या काळात, तेंडुलकरने पगार आणि इतर मासिक भत्ते म्हणून जवळपास ₹ 90 लाख जमा केले. हे संपूर्ण वेतन आणि भत्ते त्यांनी पंतप्रधान मदत निधीला दान केले.
- देशभरातील 140 सरकारी शाळांमध्ये मूलभूत सुविधा, विशेषत: मुलींसाठी शौचालये निर्माण करण्यासाठी ₹ 70 दशलक्ष जमा केले. 2009 मध्ये, तेंडुलकरने जाहीर केले की ते 200 मुलांच्या शिक्षणाचे प्रायोजकत्व आपल्या सासू , ॲनाबेल मेहता यांच्याशी संबंधित असलेल्या मुंबई स्थित गैर-सरकारी संस्थेमार्फत करतील. २०१३ पर्यंत, तेंडुलकर दरवर्षी २०० मुलांना आपल्याद्वारे आधार देत राहिले.
- तेंडुलकरची सचिन तेंडुलकर फाऊंडेशन ही सेवाभावी संस्था आहे.
- 2003 मध्ये, तेंडुलकरने भारतात पोलिओ प्रतिबंधाविषयी जागरूकता पसरवण्यासाठी युनिसेफच्या पुढाकारासाठी काम केले . 2010 मध्ये, तेंडुलकरच्या क्रुसेड अगेन्स्ट कॅन्सर फाऊंडेशनसाठी, “सचिनचे क्रुसेड अगेन्स्ट कॅन्सर इन चिल्ड्रन” या मोहिमेने ₹ 10.25 दशलक्ष जमा केले होते.
- 2014 मध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत मिशनला प्रोत्साहन देण्यासाठी नियुक्त केलेल्या पहिल्या नऊ सेलिब्रिटींपैकी तेंडुलकर एक होते. तेंडुलकरने नामांकन स्वीकारले, मुंबईत मित्रांसोबत रस्त्यावर झाडू मारतानाचा व्हिडिओ देखील पोस्ट केला. 2017 मध्ये, स्वच्छता ही सेवा मोहिमेत योगदान देण्यासाठी त्यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांना वांद्रे किल्ला स्वच्छ करण्यास मदत केली.
- मार्च 2020 मध्ये, त्यांनी कोविड-19 महामारीच्या सुरुवातीच्या महिन्यांत पंतप्रधान मदत निधीला ₹ 25 लाख आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री मदत निधीला ₹ 25 लाख दान केले. मे २०२० मध्ये, तेंडुलकरने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळेतील मुलांसह ४,००० लोकांना अघोषित रक्कम दान केली . 29 एप्रिल 2021 रोजी, भारतातील महामारीच्या दुसऱ्या लाटेदरम्यान, त्यांनी मिशन ऑक्सिजन समूहाला ₹ 1 कोटी दान केले.
FAQ
१. सचिन तेंडुलकर चा जन्म किती साली झाला?
सचिन तेंडुलकर याचा जन्म २४ एप्रिल १९७३ रोजी मुंबई, महाराष्ट्र या ठिकाणी झाला.
२. सचिन तेंडुलकर यांचे पूर्ण नाव काय?
सचिनचा जन्म ब्राह्मण कुटुंबात झाला असून, सचिन तेंडुलकर यांचे पूर्ण नाव सचिन रमेश तेंडुलकर असे आहे.
३. कोणत्या क्रिकेटपटूला मास्टर ब्लास्टर म्हणतात?
क्रिकेट क्षेत्रामध्ये सर्वोच्च स्थान प्राप्त केलेला, क्रिकेटचा बादशहा व क्रिकेट विश्वातील प्रसिद्ध मास्टर ब्लास्टर म्हणून “सचिन तेंडुलकर” याला म्हटले जाते
४. सचिनला सुरुवातीपासूनच फक्त फलंदाजीत रस होता का?
नाही.
सुरवातीला त्याला वेगवान गोलंदाज व्हायचे होते, परंतु प्रशिक्षक, ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज डेनिस लिली यांनी तेंडुलकरला त्याऐवजी त्याच्या फलंदाजीवर लक्ष केंद्रित करण्यास सुचवले.
५. सचिन तेंडुलकर किती तास सराव करतो?
सचिन तेंडुलकर दररोज १२ तास प्रशिक्षण आणि खेळत असे, सचिनचे क्रिकेट गुरु रमाकांत आचरेकर यांनी सचिन सोबत प्रचंड मेहनत केली, आणि त्याला एक यशस्वी क्रिकेटर बनवले.
६. सचिनने किती टी-20 खेळले?
सचिन फक्त एक T-20 सामना केला. ज्यामध्ये त्यांनी दहा धावा केल्या व दोन चौकार मारले.
७. सचिन तेंडुलकरची शैक्षणिक पात्रता काय आहे?
सचिन तेंडुलकरने 16 वर्षांचा असताना त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली.उच्च शिक्षणासाठी मुंबईतील खालसा महाविद्यालयामध्ये सचिनने ऍडमिशन घेतले. त्यानंतर स्वतःचे शिक्षण अर्धवट सोडून, सचिन स्वतःच्या प्रमुख ध्येयाकडे वळला व त्याने क्रिकेट विश्वामध्ये पदार्पण केले.
सचिनने किती षटकार मारले?
सचिन तेंडुलकरने त्याच्या कारकिर्दीत १९५ षटकार मारले.
सचिन तेंडुलकरने पहिले आंतरराष्ट्रीय शतक कोठे झळकावले?
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये 100 शतके ठोकली आहेत. सचिन तेंडुलकरने 14 ऑगस्ट 1990 रोजी वयाच्या 17 वर्षे 112 दिवसात इंग्लंडमध्ये पहिले आंतरराष्ट्रीय शतक झळकावले.
निष्कर्ष
मित्रहो, आजच्या सचिन तेंडुलकर माहिती मराठी या लेखाद्वारे आम्ही आपणास क्रिकेट विश्वातील प्रसिद्ध खेळाडू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर बद्दल माहिती दिली आहे. हा लेख तुम्ह्लाला कसा वाटला हे कमेंट करून आम्ह्लाला नक्की कळवा. लेख आवडल्यास तुमच्या इतर मित्रपरिवारांसोबत नक्की शेयर करा. धन्यवाद