समर्थ रामदास स्वामी संपूर्ण माहिती मराठी | Sant Ramdas Information In Marathi

समर्थ रामदास स्वामी संपूर्ण माहिती मराठी | Sant Ramdas Information In Marathi – समर्थ रामदास स्वामी हे महाराष्ट्रातील नव्हे तर संपूर्ण भारतातील एक आदरणीय संत, कवी, तत्त्वज्ञ आणि आदरणीय व्यक्तिमत्त्व होते. त्यांचे प्रगल्भ ज्ञान आणि त्यांची शिकवण भविष्यातील पिढ्यांसाठी अतिशय मार्गदर्शनपर ठरली आहे. सुशिक्षित, सुसंस्कृत आणि बलशाली पिढी बनवण्यासाठी शिक्षण, अध्यात्म, तत्त्वज्ञान आणि बलाची उपासना करणे गरजेचे आहे हे त्यांनी नवमहाराष्ट्राला तसेच नवभारताला समजावून सांगितले. एक चिरंतन वारसा समर्थ रामदासांनी भारतीय जनतेला दिला असून समाजाच्या उन्नतीसाठी अध्यात्मिक वाढीसाठी आणि असंख्य व्यक्तींना अर्थपूर्ण जीवन जगण्यासाठी त्यांनी प्रेरणा दिली.

Table of Contents

समर्थ रामदास स्वामी संपूर्ण माहिती मराठी | Sant Ramdas Information In Marathi

पूर्ण नाव नारायण सूर्याजीपंत ठोसर
जन्म तारीख २४ मार्च १६०८ (चैत्र श. ९ हि. १५३०)
जन्मस्थळ जांब, जिल्हा जालना, महाराष्ट्र
वडिलांचे नाव सूर्याजीपंत ठोसर
आईचे नाव राणूबाई सूर्याजीपंत ठोसर
पंथ समर्थ पंथ
साहित्य रचनादासबोध, मनाचे श्लोक, आरती
वचनजय जय रघुवीर समर्थ
समर्थांचे कार्यजनजागृती, ११ मारुतींची स्थापना, भक्ती आणि शक्तीचा प्रसार,
मठांची स्थापना आणि समर्थ संप्रदायाचे कार्य.
समाधी १३ जानेवारी १६८१ (माघ क्र. ९ शके १६०३) 
समाधीस्थळ सज्जनगड, जिल्हा – सातारा, महाराष्ट्र.

कोण होते समर्थ रामदास स्वामी ?

समर्थ रामदास स्वामी हे महाराष्ट्रातील असे एक महामानव, थोर संत होते.ज्यांनी सामर्थ्याची उपासना व उपासनेचे सामर्थ्य अशा दोन्ही विरोधाभास गोष्टींचे महत्त्व जगाला सांगितले. त्यांनी मर्यादा पुरुषोत्तम राम व हनुमंताची सेवा व पूजा करून जगाला परमार्थ, स्वधर्म व देशप्रेमाची शिकवण दिली.

रामदास स्वामींनी रामाची व हनुमंताच्या पूजेसोबत, शक्तीची उपासना करणारे बहुतांश शिष्य सुद्धा निर्माण केले. आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास समर्थ रामदास स्वामी यांच्या बद्दल संपूर्ण माहिती देणार आहोत. हा लेख तुम्ही पूर्ण वाचावा.

समर्थ रामदास स्वामी यांचा जन्म

रामदास स्वामी यांचा जन्म २४ मार्च १६०८ रोजी जांबा जिल्हा मधील, जालना या ठिकाणी झाला. त्यांचा जन्म हा रामनवमी च्या दिवशी म्हणजे चैत्र शुद्ध नवमीस, रामजन्माच्याच शुभमुहूर्तावर, म्हणजे माध्यान्ही झाला. समर्थ रामदास स्वामी हे समर्थ संप्रदायाचे संस्थापक तसेच, एक महान कवी होते. त्यांनी स्वतःचे जीवन हे मर्यादा पुरुषोत्तम राम व हनुमानाची साधना करण्यासाठी व्यतीत केले.

समर्थ रामदास स्वामींचे बालपण

समर्थ रामदासांचे घराणे हे सूर्याची उपासना करणारे होते.. घराची आर्थिक स्थिती चांगली असूनही बाल नारायण बालपणापासून विरक्तीच्या दिशेने होते नारायण हे लहानपणापासून खोडकर असले तरी तेवढेच बुद्धिमान होते. आणि साहसी सुद्धा होते, घोड्यावर रपेट करणे, पुरात उड्या मारून पोहणे, झाडावर चढणे हे त्यांचे खेळ होते. बालपणात त्यांनी सर्व जाती धर्माचे मित्र करून घेतले आणि त्यांच्याबरोबर राहून त्याने वेगवेगळ्या गोष्टी शिकून घेतल्या.

असे सांगितले की लहान असताना ते एकदा फडताळात लपून बसले आणि आईने विचारल्यावर ते म्हणाले आई “मी चिंता करितो विश्वाची ” हे वाक्य ऐकून त्यांची आई खरेच काळजीत पडली. वयाच्या बाराव्या वर्षी त्यांचे लग्न ठरवण्यात आले. पण लग्न सुरू झाल्यानंतर, पुरोहितांनी सावधान शब्द उच्चारताच अंगावर नेसलेल्या दोन वस्त्रांनिशी नारायण हे लग्न मंडपातून पळून गेले. त्यांनी धावत जाऊन गावाबाहेरच्या नदीत उडी मारली आणि घर सोडून निघून गेले.

समर्थ रामदास स्वामींचे गुरु

समर्थ रामदासांचे खरे आध्यात्मिक गुरु हे नारायण महाराज होते. वयाच्या बाराव्या वर्षी घर सोडल्यानंतर त्यांनी संत श्री. नारायण महाराज यांच्याशी भेट घेतली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यात्माचा, धर्मग्रंथांचा सखोल अभ्यास करून, आपली बुद्धी तल्लख केली. नारायण महाराजांच्या सहवासात अध्यात्म – बलाची उपासना, सामाजिक सुधारणा, चांगले आचरण, मनाचा ताबा या शिकवणीमुळे समर्थ रामदासांचा अध्यात्माच्या दिशेने अलौकिक प्रवास सुरू झाला.

समर्थ रामदास स्वामींची साधना

असे मानले जाते की, घर सोडून गेल्यानंतर पंचवटीला जाऊन रामदासांनी श्रीरामांचे दर्शन केले आणि नाशिकला जाऊन बारा वर्षे तपश्चर्या केली. नाशिक मध्ये आपली ओळख लपवण्यासाठी त्यांनी रामदास हे नाव स्वीकारले. आपल्या साधनेसाठी त्यांनी टाकळी टेकडीवरील गुहा हे ठिकाण निवडले. नंदिनी नदीच्या काठावर उंच टेकडीवर ही गुहा होती. तिथे जवळपास 1621 ते 1633 अशी बारा वर्षे ते राहिले. आपली साधना करत असताना ते पहाटे उठून रोज बाराशे सूर्यनमस्कार घालित, त्यानंतर सूर्योदयापासून दुपारपर्यंत नदीत उभे राहून गायत्री मंत्राचे नामस्मरण करीत.

त्यांनी जवळपास श्रीराम जय राम जय जय राम या त्रयोदशहाक्षरी रामनामाचा जप 13 कोटी वेळा केल्याचे मानले जाते. त्यामुळेच प्रत्यक्ष प्रभुरामांना श्री रामदासांचे गुरु मानतात.

समर्थ रामदास स्वामी

आपली साधना करीत असताना ते केवळ पाच घरी भिक्षा मागून अन्न ग्रहण करत आणि श्रीरामाला नैवेद्य दाखवत. सायंकाळच्या वेळी ते मंदिरात श्रवण साधना करत आणि ग्रंथांचा अभ्यास करत. या बारा वर्षात त्यांनी वेद, उपनिषदे, विविध शास्त्र, धर्मग्रंथ यांची साधना केली. त्यांनी आर्ततेने श्रीरामाची प्रार्थना करून करुणाष्टकांची निर्मिती केली. त्याच बरोबर समर्थ रामदास लिखित श्री रामायण लिहिले. या त्यांच्या बारा वर्षाच्या ततपश्चर्येने त्यांना आत्मसाक्षात्कार झाला.

वयाच्या 24 व्या वर्षी त्यांनी नाशिक मध्ये टाकळी येथे भगवान श्री हनुमंताची मूर्ती स्थापन केली. त्यांनी शक्ती आणि बुद्धी दोन्हींची उपासना करण्याचा अध्यात्म मार्ग तरुण पिढीला शिकवला.

समर्थ रामदास स्वामींचे भारतभ्रमण आणि तीर्थयात्रा

आपली तीर्थयात्रा आणि भारतभ्रमण करताना समर्थांनी संपूर्ण भारत पायाखाली घातला. ते उत्तर भारतात फिरताना त्यांच्या मनामध्ये वैराग्यभाव जागृत झाला. असे मानले जाते की तिथे त्यांना प्रभू राम दर्शन झाले. आपल्या तीर्थयात्रेमध्ये श्रीनगर येथे ते शिखांचे सहावे गुरु हरगोविंदसिंग यांना भेटले. हरगोविंदसिंग यांच्याशी त्यांचे बोलणे झाल्यावर त्यांना हरगोविंदसिंग बाळगत असलेले सैनिक आणि त्यांच्याकडील तलवारी याचे महत्त्व समजले.

पसायदान मराठी रचना आणि भावार्थ

धर्माचे रक्षण करण्यासाठी फक्त धर्माचे ज्ञान असून उपयोग नाही तर प्रत्येकाने बलशाली असणे तेवढेच गरजेचे असते, याचाही साक्षात्कार त्यांना झाला. त्या वेळपासून समर्थ रामदासांनी बलोपासना हा अध्यात्माच्या मार्गाला सुरुवात केली. गुरु हरगोविंद सिंगांबरोबर समर्थ रामदास सुवर्ण मंदिरात दोन महिने राहिले

समर्थ रामदास स्वामींनी स्वधर्म, परमार्थ, व देशभक्तीचा प्रचार पूर्ण महाराष्ट्राभर केला. रामदास स्वामी हे संत तुकारामांचे समकालीन होते. त्यांनी समर्थ संप्रदायाची स्थापना करून, धर्माचे रक्षण करण्यासाठी लोकांना जागृत राहण्याची प्रेरणा दिली.

समर्थ रामदास स्वामींचे व्यक्तिमत्त्व

श्री स्वामी समर्थ रामदासांचे व्यक्तिमत्व अलौकिक होते. बलाच्या उपासनेने आणि तरुण वयामध्ये बनलेले कणखर शरीर, त्याचबरोबर अध्यात्म आणि धर्माच्या अभ्यासाने तल्लकख बुद्धिमत्ता या सर्वांचा परिपाक म्हणून एक वेगळेच तेज त्यांच्या व्यक्तिमत्त्वात होते. या अलौकिक तेजपुंज व्यक्तिमत्वा पुढे सर्वच भारावून जात.

मध्यम उंची, मजबूत बांधा, गौर वर्ण, तेजस्वी कांति, कपाळावर लहानसे टेंगूळ, असे समर्थांचे स्वरूप होते. कमरेस लंगोटी, किंवा कधी कफनी, पायांत खडावा. लांब दाढी, जटा, गळ्यांत जपाची माळ, यज्ञोपवीत, हातांत कुबडी, काखेस झोळी, अशा थाटात समर्थांची रुबाबदार आणि दुसऱ्यावर छाप पाडणारी मूर्ती होती.

संत रामदास यांचे कार्य (Work Of Samarth Ramdas Swami)

समर्थ दासबोध

ही समर्थ रामदासांची अलौकिक साहित्यकृती आहे. हा एक तत्त्वज्ञान धिष्ठित अध्यात्मिक ग्रंथ असून, यामध्ये नैतिक मूल्ये, आत्मसाक्षात्कार, सामाजिक आचरण आणि शासन या वेगवेगळ्या विषयावरची मार्गदर्शक तत्त्वे आहेत. दासबोध या ग्रंथाकडे आध्यात्मिक दृष्ट्या तसेच व्यवहारिक दृष्ट्या पाहिल्यास तो जीवनात नक्कीच मार्गदर्शक ठरेल.

शिवाजी महाराजांशी केलेला पत्रव्यवहार

रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांशी केलेला पत्रव्यवहार नैतिकता, अध्यात्म आणि शासन यावरचे मार्गदर्शक सल्ले देतो. नीतिमान राज्यव्यवस्थेसाठी लागणाऱ्या संकल्पनांना आकार देण्याची भूमिका ही पत्रे बजावतात.

सामाजिक सुधारणा

समर्थ रामदासांनी समाजातील उपेक्षित घटकांच्या उन्नतीसाठी कार्य केले आहे. जाती भेदभाव निर्मूलन यासाठी त्याचबरोबर सामाजिक सलोखा वाढवण्यासाठी त्यांनी आपल्या शिकवणीतून भर दिला. समाजातील गरजू आणि पिढीत लोकांना मदत करण्यासाठी तरुणांनी पुढे आले पाहिजे, असे त्यांच्या तत्त्वज्ञानात स्पष्ट केले आहे.

बलोपासना आणि शिक्षण

बलाच्या उपासने सोबतच धर्मशिक्षण आणि व्यवहारिक शिक्षण घेणे अतिशय गरजेचे असते. त्यामुळेच आश्रम शाळा स्थापन करण्यासाठी समर्थ रामदासांनी पाया घातला त्याचबरोबर तरुण पिढीला सुसंस्कृत बनवण्यासाठी त्यांनी बरेच प्रयत्न केले.

आध्यात्मिक आचरण

चांगला समाज हा सदविचार, आध्यात्मिक आचरणाने तयार होऊ शकतो आणि अध्यात्मिक शक्तीसाठी मनाचा ताबा सर्वात महत्त्वाचा आहे, यासाठी त्यांनी मनाचे श्लोक लीहून लहान, तरुण तसेच आबाल वृद्धांसाठी एक सुंदर आध्यात्मिक वाट निर्माण करून दिलेली आहे.

आश्रमांची स्थापना

समर्थ रामदास स्वामींनी संपूर्ण महाराष्ट्रात अनेक आश्रम, आध्यात्मिक केंद्र, त्याचबरोबर मठ स्थापन केले. हे आश्रम शिक्षण, संप्रदायिक सलोखा आणि अध्यात्मिक साधना यांच्यासाठी काम करत होते.

भक्तिमार्ग

महाराष्ट्रात धर्मजागृतीसाठी भक्तिमार्ग हा सर्वात सोपा मार्ग आहे. त्यासाठी भगवान श्रीरामांची भक्ती आणि बलाच्या उपासनेसाठी श्री हनुमंत भक्ती ही चळवळ लोकांमध्ये पसरून प्रेम भक्ती आणि धार्मिकतेचा संदेश दिला.

सांस्कृतिक योगदान

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीत समर्थ रामदास यांचे अलौकिक योगदान आहे. वेगवेगळे सण उत्सव सांस्कृतिक कार्यक्रम यांना कला, संगीत, आरत्या यांच्याशी जोडण्याचे काम समर्थ रामदासांनी केले.

समर्थ रामदास स्वामी

समर्थ रामदास स्वामी यांचे जीवन

राजकारण व धर्म या दोन्हीही क्षेत्रांमध्ये समर्थ रामदास स्वामींनी अतोनात प्रयत्न केलेले, आपल्याला दिसून येतात. रामदास स्वामी हे भारतीय संत परंपरेतील, एक उदार, प्रभावशाली व्यक्तिमत्व असून, समाज व निसर्गाविषयी रामदास स्वामींच्या मनामध्ये सखोल सद्भावना होती.

स्वतःच्या वैयक्तिक परिवर्तनाच्या विषयाविषयी, त्यांनी उपदेश व लेखन सुद्धा केलेले आहे. देवाचे मनापासून चिंतन करण्यासाठी, स्वतःवर नियंत्रण असणे खूप गरजेचे आहे. व यासाठी रामदास स्वामींनी अतोनात प्रयत्न केले. त्यांनी आध्यात्मिक मार्गदर्शन शोधण्यासाठी, विविध सल्ले दिले. रामदास स्वामींनी धर्माच्या प्रसारासाठी लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी स्वतःचे जीवन समर्पित केले होते.

स्वतःला झालेल्या आत्मसाक्षात्कारानंतर समर्थांनी स्वाभाविकपणे, सामान्य लोकांना अध्यात्मक दृष्टीच्या मार्गाकडे नेण्याची इच्छा प्रकट केली. परंतु, येणाऱ्या पुढच्या अवघ्या बारा वर्षाच्या प्रवासामध्ये, त्यांनी जे काही पाहिले, अनुभवले, त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वांमध्ये एक वेगळा बदल झाला. त्यांनी पाहिले व जाणले की, भारतातील जनता ही अत्यंत दुःखी, गरीब, अपमानित, आहे. यवन अधिकाऱ्यांच्या होणाऱ्या गुलामगिरीमुळे, लोक त्रासली आहेत.

या यवन अधिकाऱ्यांमुळे बायका, मुले, आया, देव, धर्म, संस्कृती, मालमत्ता, काहीही सुरक्षित नाही. अशा प्रकारची ही जनतेची मनाला भेदून टाकणारी अवस्था पाहून, समर्थ रामदास स्वामी हे खूप अस्वस्थ झाले. त्यामुळे त्यांनी जनतेचा विश्वास पुन्हा वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू केले, व त्याआधी त्यांना संघटित करून सबळ बनवणे गरजेचे आहे, हे जाणून त्यांना सशक्त केले पाहिजे ही भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली.

समर्थ रामदास यांना निसर्गा विषयी प्रचंड प्रेम होते. त्यामुळे अनेकदा, ते निसर्गरम्य सहवासामध्ये राहण्यास जास्त पसंती दर्शवत. समर्थ रामदास स्वामींना आवडणारी निसर्ग स्थळे, आज सुद्धा तरुण पिढींना आकर्षित करत असतात. सज्जनगड, शिवथरगड, चाफळ, व समर्थांची विविध शिखरे पाहण्यासाठी गिर्यारोहक आवडीने येत असतात.

समर्थ स्वामी यांना अंगपूरच्या दोह्यात दोन पूज्य देवांच्या मुर्त्या सापडल्या होत्या, एक श्री रामचंद्रांची व दुसरी तुळजाभवानीची. त्यांनी चाफळ या ठिकाणी रामचंद्रांच्या मूर्तीची स्थापना केली. सज्जनगडच्या अंगाई देवीच्या प्रसिद्ध मंदिरामध्ये तुळजाभवानी मातेची स्थापना केली.

समर्थ रामदास स्वामी यांची साहित्यरचना व काव्य

समर्थांना सज्जनगडाच्या पायथ्याशी एक बाग बनवायची होती, व या बागांमध्ये त्यांनी कोणती झाडे लावावी ? हा त्यांना प्रश्न पडला होता. व यामुळे त्यांनी यावर अभ्यास करून, बागेमध्ये पालेभाज्या, फळभाज्या, फुले, औषधी वनस्पती, इत्यादी सुमारे ३५० वनस्पतीं बागेमध्ये लावल्याची संकल्पना त्यांनी त्यांच्या कवितेंद्वारे जणांपर्यंत पोहोचवली आहे.

रामदासस्वामींची वाङ्‌मय संपदा अद्भुत आहे. समर्थांनी विविध विषयांवर चिंतनपर रचना केल्या. दासबोध, आत्माराम, मनाचे श्लोक, करुणाष्टके, शेकडो अभंग, स्तोत्रे, स्फुट रचना, रुबाया, सवाया, भारुडे, कविता, अनेक ओवीबद्ध पत्रे तसेच आरत्या त्यांनी रचलेल्या आहेत. त्यांना शब्दांची कधी वाणच पडली नाही.

सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची, ही श्री गणपतीची आरती. लवथवती विक्राळा ब्रम्हांडी माळा ही शंकराची आरती. दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी, ही तुळजापूरच्या कुलस्वामिनीची आरती. सतराने उडणे हुंकारी वदनी हे मारुती विषयीची आरती. तसेच दत्तात्रय, विठ्ल, श्रीकृष्ण, खंडेराव, दशावताराच्या विविध देवतांच्या आरत्या स्वामी समर्थांनी तयार केल्या. याशिवाय त्यांनी रामायणामधील किश्किंदा, सुंदर आणि युद्ध, तसेच अनेक अभंग, भूपल्य, प्रदेश रोड, राजधर्म, क्षत्रिय धर्म, शिवाजी महाराज, संभाजी महाराजना पत्रे इत्यादी विषयांवर लेखन सुद्धा केलेले आहे.

समर्थ रामदास स्वामी यांच्या मनाच्या श्लोकांचा अर्थ (Manache Shlok Meaning)

नको रे मना द्रव्य ते पुढीलांचे

अती स्वार्थ बुद्धी नारे पाप सांचे

घडे भोगणे पाप ते कर्म खोटे

न होता मना सारिखे दुःख मोठे

याचा अर्थ असा की, इतरांच्या पैशावर लक्ष ठेवण्यापेक्षा स्वतःकडे लक्ष द्यावे इतरांच्या पैशावर लक्ष ठेवत राहिल्यास, यामुळे स्वार्थीपणा वाढवून आपल्या पापामध्ये भर पडते. व अशा कृतीमुळे आपल्या हातून पाप घडते. जर तुम्ही, इतरांकडून जास्त अपेक्षा ठेवल्यास,  अपेक्षा पूर्ण न झाल्याचे वाईट हे नेहमी तुम्हालाच वाटत राहील.

देह त्यागीता कीर्ती मागे उरावी

मला सज्जना हेचि क्रिया धरावी

मना चंदनाचे परि तवा झिजावे

परी अंतरी सज्जना निववावे

याचा अर्थ असा की, आपल्या देहाचा जरी नाश झाला तरी, आपले नाव हे कायम सर्वांच्या मनात राहावे. असे काहीतरी करणे गरजेचे असते. जर आपण सर्व कामे प्रामाणिकपणे केल्यास, व स्वतःला चंदनासारखे झिजून आपल्याला झालेल्या दुःखाचा लाभ आपण इतरांना मिळू द्यावा.

समर्थ रामदास स्वामींचे तत्त्वज्ञान

समर्थ रामदासांची शिकवण आणि त्यांची कार्य ही महाराष्ट्राच्या पिढीला एक वर्ष मार्गदर्शन करीत आहे. त्यांचा भक्तीभाव, नीतिमत्ता, सामाजिक समता आणि मनाची शिकवण या गोष्टी काळ वेळ आणि भाषांच्या पलीकडे आहेत. त्यामुळेच फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर व्यापक अध्यात्मिक वर्तुळात त्यांची शिकवण वादातीत आहे.

एकूणच समर्थ रामदासांची कीर्ती, त्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांवर असलेला प्रभाव, त्यांचे सामाजिक सुधारणेतील कार्य, महाराष्ट्रातील शैक्षणिक योगदान आणि सांस्कृतिक तसेच अध्यात्मिक क्षेत्रातील चिरंतन वारसा हा आपल्याला त्यांच्यासमोर नतमस्तक होण्यास कारणीभूत ठरतो. तसेच सर्वसामान्य जनांच्या आध्यात्मिक विकासासाठी तो बोधप्रद ठरतो.

समर्थ रामदास स्वामींचे अनुयायी – शिष्यमंडळ

समर्थ रामदासांनी जवळपास अकराशे मठांची स्थापना करून, पंधराशे तरुण मुलांना समर्थ संप्रदायाची दीक्षा दिली. त्यांचे शिष्य हे गृहस्थाश्रमी आहेत तसेच ब्रह्मचारी सुद्धा असायचे. कल्याण स्वामी हे समर्थांचे पट्ट शिष्य होते. कठोर साधना, अभ्यास त्याचबरोबर बलोपासना समर्थ करून घेत. दासबोध समजून घेऊन त्याचा स्वीकार करणे ही कसोटीची पातळी होती. त्यांच्या सर्व शिष्यांना दासबोध कंठस्थ असावा अशी समर्थांची अपेक्षा असायची.

समर्थ रामदास स्वामींचे अनुयायी

अनंत कवीमेरु स्वामीकल्याण स्वामीदिवाकर स्वामी
अंबिकाबाईवेणा बाईहणमंत स्वामीभोळाराम स्वामी
आक्का बाईउद्धव स्वामीगिरिधर स्वामीभीमदास स्वामी
भीम स्वामीकेशव स्वामीदत्तात्रय स्वामीदिनकर स्वामी
वासुदेव स्वामीहंसराज स्वामीरंगनाथ स्वामीआचार्य गोपालदास
रघुनाथ स्वामीरोकडाराम स्वामीअनंतबुवा मेथवडेकर

समर्थ रामदास स्वामी आणि शिवाजी महाराज

छत्रपती शिवाजी महाराज समर्थ रामदास स्वामींच्या कार्यांनी प्रभावीत होते. समर्थ रामदासांची आणि शिवाजी महाराजांची भेट झाली असल्याचे मानण्यात येते. त्यावेळी समर्थ शिवाजी महाराजांना म्हणाले होते की, राजे हे राज्य तुमचेही नाही हे राज्य माझेही नाही हे राज्य परमेश्वराचे आहे. समर्थ भेटीनंतर शिवाजी महाराजांनी समर्थांना मठ बांधून देण्याचा आग्रह केला. पण समर्थाने तो स्वीकारला नसल्याचे मानले जाते.

रामदास स्वामींना शिवाजी महाराजांनी त्यांचे गुरु मानले होते. छत्रपती शिवाजी महाराज १५ सप्टेंबर १६७८ रोजी समर्थ रामदास स्वामींना काही गावे बक्षीस म्हणून दिली.

शिवाजी महाराजांनी रामदास स्वामींना दिलेली सनद

छत्रपती शिवाजी महाराजांनी ३१ नोव्हेंबर १६७८ मध्ये समर्थ रामदास स्वामींना एक विस्तृत सनद लिहून काही गावे इनाम म्हणून दिली होती. याबाबतचे एक पत्र इ. स. १९०६ मध्ये धुळ्याच्या शंकरराव देवांनी ‘समर्थांची दोन जुनी चरित्रे’ या ग्रंथात प्रकाशित केले होते; पण या वेळेस देवांना या पत्राची मूळ प्रत न मिळता एक नक्कल सापडली होती.

संत रामदास यांचा सांस्कृतिक वारसा

आजही रामदास हे महाराष्ट्रासाठी पूजनीय आहेत. महाराष्ट्राच्या संस्कृतीत सण उत्सवात म्हटल्या जाणाऱ्या आरत्यांपैकी बऱ्याच आरत्या या समर्थ रामदास रचित आहेत. त्याचप्रमाणे घरोघरी म्हटले जाणारे मनाचे श्लोक आणि गणेश आरती हे याचे अप्रतिम उदाहरण आहे. बालपणापासून धर्माचे चांगले संस्कार करणे, मनाला चांगले शिकवण देणे या गोष्टी समर्थ रामदासांच्या शिकवणीतून या महाराष्ट्राला मिळाल्या आहेत.

संत रामदास यांचा वैचारिक वारसा

रामचंद्र रानडे, बाळ गंगाधर टिळक, केशव हेगडेवार विश्वनाथ राजवाडे हे १९ – २० व्या विषयावर शतकातील इतिहासकार, समाजसुधारक तसेच विचारवंत होऊन गेले. यांना समर्थ रामदासांची प्रेरणा मिळाली. रामदासांच्या शिकवणीप्रमाणे बलशाली भारत बनवण्यासाठी तरुण पिढीला अध्यात्म बरोबरच बलाची उपासना करण्याची शिकवण दिली पाहिजे, असे विचारवंतांचे म्हणणे होते. त्याचप्रमाणे अध्यात्मिक गुरु गोंदवलेकर महाराज, भाऊसाहेब महाराज तसेच रणजीत महाराज यांनी तरुण वर्गाला दासबोधाची शिकवण दिली.

समर्थ रामदास स्वामींचे मठ

१. जांब
२. चाफळ
३. सज्जनगड
४. डोमगाव
५. शिरगाव
६. कन्हेरी ७. दादेगाव
8 मादळमोही

रामदास स्वामींनी वास्तव्य केलेल्या ‘घळी’

रामघळ, सज्जनगड
मोरघळ, सज्जनगड जवळ मोरबाग येथे
चंद्रगिरी, वसंतगडाच्या समोर, कराडजवळ
हेलवाक, हेलवाक गावाजवळ
शिगनवाडी, चंद्रगिरी जवळ
शिवथरघळ, महाड जवळ
तोंडोशीघळ, चाफळच्या उत्तरेस
टाकळी, नाशिक जवळ

रामदास स्वामींची मराठीतील चरित्रे आणि त्यांच्यासंबंधी इतर ग्रंथ

  • आनंदवनभुवनी (कादंबरी, लेखिका : शुभांगी भडभडे)
  • ऐसी हे समर्थ पदवी (अशोक प्रभाकर कामत)
  • संत कबीर रामदास : एक तुलनात्मक अभ्यास (डॉ. ज्योत्स्ना खळदकर)
  • कल्याणा, छाटी उडाली (सुनील चिंचोलकर)
  • ग्रंथराज दासबोध खंड १ (सुनील चिंचोलकर)
  • तुकाराम दास (तुलसी आंबिले)
  • तोचि येक रामदास (जनार्दन ओक)
  • पत्र समर्थांची (सुनील चिंचोलकर)
  • प्राचीन मराठी वाङ्‌मयाचा इतिहास : तुकाराम-रामदास (अच्युत नारायण देशपांडे)
  • मनाच्या श्‍लोकातून मनःशांती (सुनील चिंचोलकर)
  • मला दासबोधीच लाभेल बोध (सुनील चिंचोलकर)
  • राजगुरू समर्थ रामदास (शं.दा. पेंडसे)
  • राजवाड्यांचा रामदास : (राजवाडे लेखसंग्रहाअंतर्गत)
  • रामदास (श.श्री. पुराणिक)
  • रामदास : वाङ्मय आणि कार्य (न.र. फाटक)
  • श्री रामदास स्वामींचे प्रपंचविज्ञान (श्री.म. माटे)
  • विद्यार्थ्यांचे श्रीरामदास (सुनील चिंचोलकर)
  • शिवाजी आणि रामदास (सुनील चिंचोलकर)
  • शिष्य समर्थांचे (सुनील चिंचोलकर)
  • श्रीसमर्थ चरित्र (ज.स. करंदीकर, १९५३)
  • श्रीसमर्थ चरित्र (न.र. फाटक) (१९५१)
  • श्रीसमर्थ चरित्र (सदाशिव खंडो आळतेकर)
  • श्रीसमर्थचरित्र (सदाशिव खंडो आळतेकर)
  • श्री समर्थ चरित्र : आक्षेप आणि खंडन (सुनील चिंचोलकर)
  • श्रीसमर्थ चरित्र (अनेक खंड) : खंड १. -श्रीसमर्थावतार (बा.सी. बेंद्रे)
  • श्री समर्थ चरित्र (अनेक खंड) : तृतीय खंड -श्री समर्थ संप्रदाय (शंकरराव देव)

समर्थ रामदास स्वामी यांचे साहित्य

  • अस्मानी सुलतानी
  • आत्माराम
  • आनंदवनभुवनी
  • एकवीरा समाधी अर्थात्‌ जुना दासबोध
  • करुणाष्टके
  • छत्रपती शिवाजी महाराजांना लिहिलेले पत्र
  • दासबोध
  • समर्थकृत देवी स्तोत्रे
  • नृसिंहपंचक : हे काव्य लाटानुप्रासाचे उत्तम उदाहरण आहे.
  • ’भीमरूपी महारुद्रा’ सारखे स्तोत्र
  • मनाचे श्लोक- मनाचे श्लोक एकूण २०५ आहेत.
  • मारुति स्तोत्र
  • मुसलमानी अष्टक
  • रामदास स्वामींचे अभंग
  • राममंत्राचे श्लोक
  • समर्थांच्या उर्दू पदावल्यांचे पुस्तक
  • सवाई
  • ’सुखकर्ता दुखहर्ता’, ’लवथवती विक्राळा ब्रम्हांडी माळा’ यांसारख्या सुमारे ६१ आरत्या
  • सोलीव सुख
  • अप्रसिद्ध असलेला हजारो पानी मजकूर

समर्थ रामदासांनी स्थापन केलेले मारुती

शहापूर – कराड – 1644
मसूर – कराड – 1645
चाफळ वीर मारुती – सातारा – 1645
चाफळ दास मारुती – सातारा – 1648
शिंगणवाडी – सातारा – 1649
उंब्रज – मसूर – 1649
माजगाव – सातारा – 1649
बहे – सांगली – 1651
मानपाडले – कोल्हापूर – 1651
पारगाव – वारणानगर – 1651
शिराळा – सांगली – 1654

समर्थ रामदासांच्या जीवनावरील नाटक /चित्रपट

  • संत रामदास (मराठी चित्रपट, दिग्दर्शक राजा नेने)
  • समर्थ रामदास स्वामी (मराठी चित्रपट, दिग्दर्शक राजू सावंत)
  • जय जय रघुवीर समर्थ (मराठी लघुपट, दिग्दर्शक जितेंद्र वाईकर)
  • श्रीशिवसमर्थ (नाटक, लेखक : जयवंत पंदिरकर)
  • श्री राम समर्थ (चित्रपट, दिग्दर्शक संतोष तोडणकर)
  • रघुवीर

रामदास स्वामींच्या कथारुपक कथा

कथा एक

समर्थ रामदास स्वामी हे हिंदू तत्ववादी महान आत्मा होते. ज्यावेळी ते त्यांच्या जांब गावामध्ये आले, तेव्हा ते त्या गावात बरेच दिवस ध्येयविरहित भटकत होते व त्यांना भेटेल त्यांच्याकडे भिक्षा मागत होते. परंतु त्यांना कोणीही ओळखू शकले नाही.

ज्यावेळी ते भिक्षू अवस्थेमध्ये होते, त्यावेळी त्यांच्या वहिनीने त्यांना ओळखले, समर्थ रामदास स्वामींच्या वयाच्या ३६ व्या वर्षी महाराष्ट्रामध्ये परतले. त्यांच्या वयाच्या प्रवासाच्या शेवटच्या क्षणी ते पैठणला आले. त्यावेळी त्यांनी नाथांची भेट करून, नंतर नाथ व त्यांच्या पत्नी सोबत राहिले. काही कालावधीनंतर स्वामींनी भिक्षा मागण्यासाठी साधु रूप धारण करून, भिक्षा मागण्यास निघून गेले.

त्यांच्या वहिनीने त्यांना ओळखले त्यावेळी स्वामींनी वहिनींना स्वामींचे रूप प्रकट केले. हे रूप बघून वहिनी अत्यंत खूष झाल्या. त्यांची स्वतःची आई राणूबाई सुद्धा समर्थांना ओळखू शकत नव्हती, परंतु स्वामींच्या २४ व्या वर्षी अध्यात्मानंतर त्यांना काही विशेष शक्ती प्राप्त झाल्या. असे म्हटले जाते की, समर्थांच्या आई या अंध होत्या. समर्थांनी ज्यावेळी रामचंद्रांची प्रार्थना करत, आईच्या डोळ्यांना स्पर्श केला. त्यावेळी समर्थांची आईचे अंधत्व मिटून संपूर्ण जग उघड्या डोळ्यांनी पाहू लागली.

त्यावेळी त्यांच्या आईने समर्थांना विचारले, की बाळ तू ज्या तपश्चर्याला गेलेलास, त्या तपश्चर्यामध्ये तू काही साध्य केले आहेस का ? त्यावेळी समर्थांनी त्यावरती एक अभंग रचून, संपूर्ण रामचरित्र आईला समजावले. जो ग्रंथ आईला रामदास स्वामींनी समजावून सांगितला होता, तो म्हणजे “कपिल गीता”.

झाशीची राणी लक्ष्मीबाई माहिती मराठी

कथा दोन

सीताबाई कुलकर्णी व बाजीपंत कुलकर्णी, कराड जवळ शहापूर या छोट्याशा गावामध्ये राहत होते. सीताबाईंनी एक विचित्र कल्पना मनामध्ये केली, की रामनाम नावाचा शेवट करावा. सुखी संसारात व तिच्या आयुष्यामध्ये तिला रामनाम घेणे आवडत नसे.

परंतु, एकेकाळी ज्यावेळी समर्थ रामदास स्वामी सीताबाईच्या दारासमोर भिक्षा मागण्यासाठी आले, त्यावेळी त्यांनी रामनामाचा उच्चार केला. त्यावेळी सीताबाई समर्थ स्वामींवर भयानक चिडल्या, व त्यांना खडसावून म्हणाल्या, बाबा तुम्ही आमच्या दारासमोर रामाचे नाव घेऊ नका. त्यावेळी रामदास स्वामी अगदी कोमल आवाजामध्ये म्हणाले, आई रामाच्या नामामध्ये तुझे भरलेले जीवन अधिक आध्यात्मिक होऊन जाईल.

परंतु सीताबाईना रामदास स्वामींनी दिलेला हा सल्ला अजिबात आवडला नाही. व त्यामुळे तिने रामदास स्वामींना भिक्षा देण्यास नकार दिला. जेव्हा दुसऱ्या दिवशी परत समर्थ स्वामी भिक्षा मागण्यासाठी गेले, व रामनाम घेतला. त्यावेळी तिने पुन्हा त्यांना खडसावले, असा प्रकार रोज आठ दिवस घडू लागला.

नवव्या दिवशी  रामदास स्वामी परत सीताबाईंच्या दारासमोर भिक्षा मागण्यासाठी गेले, त्यावेळी सीताबाई अगदी उदास चेहऱ्याने घराच्या बाहेर आल्या, कारण तिच्या पतीला म्हणजेच बाजीपंत यांना यवन अधिकाऱ्याने कोणत्याही गुन्ह्याशिवाय पकडले होते. त्यावेळी ती समर्थ रामदास स्वामींना म्हणाली, तुमच्या या रामनामामुळे माझ्या नवऱ्याला कोणत्याही गुन्ह्याशिवाय यवन अधिकाऱ्याने पकडून नेले. त्यावेळी समर्थ रामदास स्वामी अगदी आत्मविश्वासाने बोलले, तुझा नवरा आज पासून ११ दिवसात परत येईल.

सीताबाईंनी त्यावेळी समर्थ रामदास स्वामींना असे सांगितले की, जर माझा नवरा आजपासून अकरा दिवसाच्या आत घरी परतला, तर मी रामनाम घेईन, यवनाने नियुक्त केलेले अनेक हिंदू अधिकारी समर्थांचे हे शिष्य होते. व यातूनच समर्थांनी बाजीपंतांची सुटका करून घेतली, व सीताबाई यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे पुन्हा रामनाम घेण्यास सुरुवात केली.

कथा तीन

समर्थ रामदास स्वामींचे अनेक शिष्य होते. समर्थांचे एक आगळे वेगळे वैशिष्ट्य होते ते म्हणजे, ते एखाद्या व्यक्तीला समजवण्यासाठी त्याच्या नुसार त्याला समजावत असत. समर्थ ज्यावेळी लोकांना सल्ले किंवा एखादा उद्देश देत असत, त्यावेळी ते अतिशय सोप्या भाषेमध्ये त्यांना समजावून सांगत असं.

एके दिवशी धोंडीबा नावाच्या एका शिष्याने रामदास स्वामींना असे विचारले की, स्वामी माझ्या मनाची अवस्था कशी असेल ? समर्थ स्वामींनी त्या शिष्याला त्याच्याच भाषेमध्ये उत्तर देत म्हणाले, तुझ्या मनाचे ऐकू नकोस, तुला जे हवे तसे कर.

धोंडीबाणे ते ऐकल्यानंतर रामदास स्वामींची रजा घेऊन, तो स्वतःच्या घरी निघाला परंतु त्याच्या मनाला असे वाटू लागले की, आता आपल्याला घरी जायचे. पण रामदास स्वामींनी त्यांना सांगितले होते की तुझ्या मनाचे ऐकू नकोस तुला जे वाटेल ते कर. त्यामुळे त्याने घरी न जाण्याचा निर्णय घेतला. मग त्याच्या मनामध्ये विचाराला की, मला जंगलामध्ये जायचे. पण मनाचे न ऐकता त्याने जंगलात सुद्धा जाणे नाकारले. यानंतर धोंडीबाच्या लक्षात आले की, आपल्या मनात येणारे विचार हे मनाच्या विरुद्ध असतात. अशावेळी आपण काय करावे ? कधी आपल्याला घरी जायचे असते, तर कधी आपल्याला घरी जायचे नसते.

मग मनाचे न ऐकणे म्हणजे काय करावे ? यावर धोंडीबाने गहन विचार करून, धोंडीबाने “श्रीराम जय जय राम जय जय राम” असे म्हणण्यास सुरुवात केली. याचा तो जप करू लागला. असे विचार त्याच्या मनामध्ये येऊ नये म्हणून त्याने, ७२ तास रामनामाचा जप सुरू ठेवला. ७२ तास उलटून गेल्यानंतर, त्याचे मन उन्मन्न अवस्थेत गेले. अगदी सहज शब्दांमध्ये रामदास स्वामींनी सल्ला दिला व धोंडीबाने मोठ्या भक्ती भावाने तो मानून स्वीकारला, म्हणून नेहमी देवावर श्रद्धा ठेवल्यास, तुमची इच्छा देव अवश्य पूर्ण करतो.

समर्थ रामदास स्वामींचे निधन

पंधरा दिवस अगोदर, समर्थ रामदास स्वामी यांनी त्यांच्या शिष्यांना सज्जनगडावरती त्यांचा देह नेऊन ठेवावा असे आधी सांगितले होते. यानंतर माघ वद्य नवमीला, समर्थ रामदास स्वामींनी तीन वेळा मोठ्याने रामनामाचे पठण केले व समाधि घेतली.

त्या दिवसापासून माग वद्य नवमी ही “दशा नवमी” म्हणून प्रचितीस आली. समर्थ रामदास स्वामींच्या अंतयात्रेला मोठ्या प्रमाणात लोकांची उपस्थिती होती.

स्वतः छत्रपती संभाजी महाराजांनी यावेळी उपस्थिती दर्शवून, समर्थ रामदास स्वामींच्या समाधीचे नंतर मंदिर बांधून, त्या मंदिरावर राम सीता व लक्ष्मणांच्या मूर्तीची स्थापना केली. आजही समर्थ रामदास स्वामींची समाधी सज्जनगडावर प्रचंड भक्तांना पाहता येते. व समर्थ रामदास स्वामींचे विचार व कार्य मनाला नवचैतन्य देते.

FAQ

समर्थ रामदास स्वामी कोण आहेत ?

रामदास स्वामी हे मर्यादा पुरुषोत्तम राम व हनुमानांचे मोठे भक्त होते. त्यांनी विविध प्रकारच्या अभंगांची, कवितेची, रचना केली होती. त्यामुळे ते भारतातील एक प्रसिद्ध हिंदू संत, तत्त्वज्ञ, कवी, लेखक, अध्यात्मिक गुरु बनले. समर्थ रामदासांना रामदास स्वामी किंवा संत रामदास अशी प्रसिद्धी मिळाली आहे.

संत रामदास यांनी कोणते ग्रंथ लिहिले आहेत ?

संत रामदास स्वामी यांनी मनाचे श्लोक, करुणाष्टके, दासबोध, यांसारखे ग्रंथ लिहिले आहेत.

समर्थ रामदासांची पुण्यतिथी काय म्हणतात?

रामदास नवमी ही समर्थ रामदासांची पुण्यतिथी आहे .

रामदास स्वामींची शिष्या कोण आहे?

श्री कृषणजी पंत कुलकर्णींनी आपला पहिला पुत्र रामदास स्वामींना अर्पण केला. तोच त्यांचा पहिला शिष्य अंबाजी कृष्णाजी कुलकर्णी म्हणजेच उद्धवस्वामी होय. समर्थांचा शिष्य संप्रदाय पुढे महाराष्ट्रात सर्वत्र पसरला. त्यांच्या प्रमुख शिष्यांत कल्याणस्वामी, वेणास्वामी, अक्काबाई, भीमस्वामी, दयानंदप्रभू, दिवाकर स्वामी यांचाही समावेश होतो.

समर्थ संप्रदायाचे दुसरे नाव काय?

समर्थ संप्रदायाचे दुसरे नाव रामदासी पंथ असून महाराष्ट्रात इसवी सन सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात समर्थ रामादासांचे कार्य आणि शिकवण यांतून प्रवर्तित झालेला एक पंथ. समर्थ संप्रदाय हे त्याचे प्रचलित असलेले दुसरे नाव.

दास नवमी म्हणजे काय?

समर्थ गुरु श्री रामदास स्वामींनी साताऱ्याजवळील परळी किल्ल्यावर आयुष्याचा शेवटचा काळ घालवला आणि फाल्गुन कृष्ण नवमीला समाधी घेतली. हा दिवस देशभरात ‘दास नवमी’ उत्सव म्हणून साजरा केला जातो,

टाकळीचे पहिले मठपती कोण होते?

टाकळी येथील रामदास स्वामींच्या मठातील पहिले मठपती समर्थ रामदास स्वामी स्वतः होते , इथे गाभाऱ्यात श्रीराम, लक्ष्मण, सीता, हनुमान आिदच्या मूर्ती आहेत.

संत रामदास यांच्या विषयी माहिती निष्कर्ष

मित्रहो, आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास संत रामदास यांच्या विषयी माहिती दिली आहे. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. व लेख आवडल्यास तुमच्या इतर मित्रपरीवारांसोबत नक्की शेयर करा. धन्यवाद.

Leave a comment