संत तुकाराम महाराज यांची संपूर्ण माहिती | Sant Tukaram Information In Marathi

Sant Tukaram Information In Marathi | संत तुकाराम महाराज यांची संपूर्ण माहिती – आपले महाराष्ट्र राज्य हे संतांची भूमी, कर्मभूमी म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्र राज्यामध्ये विविध संत होऊन गेले. ज्यामध्ये संत तुकाराम, संत एकनाथ, मुक्ताबाई, ज्ञानेश्वर, बाळूमामा, यांसारख्या विविध महान संतांची स्तुती करणे व त्यांचे कार्य शब्दांमध्ये सांगणे अशक्य आहे.

संत तुकाराम महाराजांनी विविध अभंगांची रचना करून सामान्य लोकांपर्यंत परमेश्वराची भक्ती कशी करावी ? याचा अगदी साध्या सोप्या पद्धतीने उल्लेख त्यांच्या अभंगातून केलेला आहे. आजच्या या लेखाद्वारे आम्ही आपणास संत तुकाराम महाराजांबद्ल माहिती दिली आहोत. हा लेख तुम्ही सविस्तर वाचावा.

Sant Tukaram Information In Marathi

Table of Contents

संत तुकाराम महाराज माहिती मराठी | Sant Tukaram Information In Marathi

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील संत तुकाराम महाराज हे एक थोर समतावादी संत म्हणून नावाजले होते. त्यांना लाभलेल्या अत्यल्प आयुष्यामध्ये, संत तुकाराम महाराजांनी विविध प्रकारची कार्ये करून व पांडुरंगाची भक्ती करून हजारो लोकांच्या मनामध्ये स्थान प्राप्त केलेले आहे.

संत तुकाराम महाराज यांचा जीवन परिचय

नावतुकाराम बोल्होबा अंबिले (मोरे)
जन्मतारीख इ.स. १५९८, देहू, महाराष्ट्र
संप्रदाय वारकरी संप्रदाय, चैतन्य संप्रदाय
गुरू केशवचैतन्य (बाबाजी चैतन्य),ओतूर
शिष्यनिळोबा,बहिणाबाई
साहित्यरचनातुकारामाची गाथा (पाच हजारांवरअभंग)
कार्यसमाजसुधारक, कवी, विचारवंत, लोकशिक्षक
संबंधित तीर्थक्षेत्रे देहू
वडिलांचे नाव बोल्होबा अंबिले
आईचे नाव कनकाई
पत्नीचे नाव पहिली पत्नी रुक्मिणी ,दुसरी पत्नी अवलाई
मृत्यू इ.स. १६५०, देहू, महाराष्ट्र

संत तुकाराम महाराज यांचे प्रारंभीक जीवन

संत तुकाराम हे पांडुरंगाचे मोठे भक्त होते. त्यांचा जन्म पुणे जिल्ह्यामधील, खेड्या तालुक्यातील देहु या छोट्याशा गावामध्ये झाला. दि. २२ जानेवारी १६०८ मध्ये तुकाराम महाराजांनी महाराष्ट्रातील भूमीवर जन्म घेऊन, महाराष्ट्र भूमी धन्य केली.

नक्की वाचा 👉संत ज्ञानेश्वर महाराजांची माहिती मराठी

तुकाराम महाराजांचे वडील हे बोल्होबा, तर आईचे नाव कनकाई असे होते. संत तुकाराम हे अत्यंत लोकप्रिय संत असून, त्यांचे आठवे पूर्वज होते, विश्वंभर बाबा हे ज्ञानेश्वर महाराजांच्या काळातील एक मोठे साधू मानले जात असत.

संत तुकाराम महाराजांचा जन्म हा एका क्षत्रिय समाजामध्ये झाला असून, ते स्वतःला शूद्र, कुणबी, समजत. त्यांना त्यांच्या क्षत्रिय कुलाचा अभिमान नव्हता. त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात जातींमध्ये असमानता, व वर्णांमध्ये मतभेद होते.

संत तुकाराम यांचा जातीव्यवस्था व वर्णांच्या मतभेदावर अजिबात विश्वास नव्हता. “यारे यारे लहान थोर, याती भलती नारी नर” असे त्यांच्या अभंगाद्वारे म्हणणारे संत तुकाराम हे प्रत्येक लोकांमध्ये समान भाग पाहणारे एक महान पुरुष होते.

संत तुकाराम महाराजांचे वैवाहिक जीवन

संत तुकाराम महाराजांचा विवाह हा लोहगाव या ठिकाणी पार पडला. संत तुकारामांच्या पत्नीचे नाव रुक्मिणी असे होते. लोहगाव संत तुकाराम महाराजांचे आजोळ होते. व तीच सासरवाडी सुद्धा झाली. संत तुकाराम हे विठ्ठल भक्त असल्यामुळे, त्यांना विठ्ठलाचे कीर्तन करणे व लोकांमध्ये विठ्ठल भक्ती जागवणे खूप आवडायचे. यामुळे ते स्वतःच्या आजोळी अर्थात सासरवाडीत सुद्धा अनेक कीर्तने करत, रुक्मिणी हिलाच रुखुमाई या नावाने ओळखले जात होते. ही तुकाराम महाराजांची पहिली पत्नी होती.

काही कारणास्तव, रुक्मिणीचा अकस्मात मृत्यू झाला. व तिच्या पहिल्या मुलाचा म्हणजेच तुकाराम महाराजांच्या पहिल्या मुलाचा संतू नावाचा मुलगा याचा सुद्धा अकाली मृत्यू झाला. या दुःखाने महाराज व्याकूळ झाले. तुकाराम महाराजांच्या कुटुंबाने त्यांचे दुसरे लग्न लावून दिले. त्यांच्या दुसऱ्या पत्नीचे नाव जिजाई असे होते.

संत तुकाराम महाराज

जिजाई ही पुणे जिल्ह्यामधील खेडच्या आप्पाजी गुळवे यांची कन्या होती. जिजाईचे नाव अवलाई असे होते. दुसऱ्या लग्नानंतर संत तुकाराम महाराजांना महादेव, विठोबा, नारायण, काशी, भागीरथी, गंगा, अशी सहा मुले झाली.

तुकाराम महाराजांचा दानशूरपणा

पुढील तीन वर्षांमध्ये म्हणजेच १६२९, १६३०, व १६३१ च्या काळात मोठा दुष्काळ पडला. या दुष्काळामध्ये लोकांची अन्नान दशा झाली. लोक अन्नासाठी इकडे तिकडे फिरू लागली. संत तुकाराम महाराज हे खूप करुणामय व उदार व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी स्वतःकडील संपत्ती लोकांना वाटून टाकली.

स्वतःकडे असलेली गहाण खते, इंद्रायणी नदीमध्ये सोडून लोकांना संत तुकाराम महाराजांनी कर्जमुक्त केले. संत तुकाराम महाराजांच्या पहिल्या पत्नीचा व मुलाचा मृत्यू व अचानक येणाऱ्या दुष्काळामुळे संत तुकाराम महाराजांचे मन अगदी व्याकुळ झाले, जगामध्ये जर खरच देव आहे तर जगावरती एवढे मोठे दुःख का येते ? असा प्रश्न संत तुकाराम महाराजांना पडायचा. व यामुळे संत तुकाराम गहन विचार करू लागले, व तिकडच्या जवळच्या भामचंद्र डोंगरावर संत तुकाराम महाराजांनी तपस्या सुरू केली, परमेश्वराचा धावा करून ते विठ्ठलाची आराधना करू लागले. याच भामचंद्र डोंगरावर संत तुकाराम महाराजांना विठ्ठलाचे दर्शन झाले.

तुकाराम महाराज यांचे आध्यात्मिक जीवन

संत तुकाराम हे लहानपणापासूनच अतिशय हुशार व चतुर होते. त्यांचे आई वडील संत तुकाराम महाराजांना त्यांच्या घरीच उत्तम प्रकारे शिक्षण देत असत. तुकाराम महाराजांनी हिंदू धर्मातील प्रमुख ग्रंथांचा अभ्यास स्वतःच्याच घरी राहून केला. व धर्मातील ज्ञान अर्जित केले.

तुकाराम महाराजांना अभंग रचना करणे खूप प्रिय होते. त्यांनी अभंग रचना करण्याची सुरुवात केली. त्यांचे स्वतःचे विठ्ठल मंदिर होते. त्या मंदिराची दुरुस्ती करून, मंदिर नवीन बनवले. मंदिरामध्ये स्वतःचे कीर्तन करू लागले, व स्वतः लिहिलेले अभंग मंदिरामध्ये गाऊ लागले.

भागवत संप्रदायाचे तत्त्वज्ञान, लोकांसमोर व वारकऱ्यांना अति सोप्या पद्धतीने व सखोल भाषेमध्ये ते समजावू लागले. यामुळे संत तुकाराम महाराजांची प्रतिमा जनसामान्यांच्या मनामध्ये घर करून गेली.

गाथा नदीतून बाहेर आली

तुकाराम महाराजांनी आपल्या कवितेतून समाजातील सामर्थ्यवान लोकांवर प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष टीका केली होती. त्यामुळे त्यांना धार्मिक न्यायालयात हजर राहण्यास सांगण्यात आले होते. धर्माविरुद्ध वर्तन केल्याबद्दल त्याला दोषी ठरवण्यात आले आणि त्याची शिक्षा म्हणून त्यांचे साहित्यिक कार्य नदीत बुडविण्यास सांगण्यात आले. दंतकथेनुसार, त्यांनी आपले साहित्यिक काम बुडवल्यानंतर, बरेच दिवस खाणे बंद केले. काही दिवसांनंतर, त्यांची साहित्यकृती चमत्कारिकरित्या कोणत्याही नुकसानाशिवाय नदीतून बाहेर आली. असे सांगितले जाते.

संत तुकाराम महाराजांचे शिष्य

संत तुकाराम महाराजांचे अनेक शिष्य होते. त्यांनी कधीही जात किंवा लिंग हे त्यांचे शिष्य होण्याचे पात्र मानले नाही. त्यांचे शिष्य विविध जातीतील होते. नवजी माळी, संत निळोबा , संत बहिणाबाई, भगवानबाबा, गावनरशेट वाणी, संताजी जगनाडे, शिवबा कासार, बहिणाबाई पाठक आणि महादाजीपंत कुलकर्णी हे त्यापैकी काही.

वाचा👉 संत एकनाथ महाराजांची संपूर्ण माहिती मराठी

बहिणाबाई पाठक या त्यांच्या प्रसिद्ध शिष्यांपैकी एक होत्या. ती ब्राह्मण जातीची होती. एकदा, तिला एक दृष्टी आली ज्यामध्ये तिने संत तुकारामांना आपले गुरू म्हणून स्वीकारले, परंतु संत तुकारामांचे शत्रू असलेल्या मंबाजीने या कल्पनेला विरोध केला. तिने तुकाराम महाराजांची शिष्या होण्याचा निर्णय घेतल्यास तिला हाकलून देण्याची धमकीही दिली. काही ब्राह्मण संत तुकारामांना शूद्र मानत.

संत तुकाराम महाराज अभंग आणि अर्थ

“वेदांचा तो अर्थ
आम्हासीच ठावा
इतरांनी वहावा
भार माथा”

“अर्थ विना पाठांतर
कसया करावे
उगाची मरावे
घोकुनिया”

इतक्या स्पष्ट व सखोल शब्दांमध्ये संत तुकाराम महाराजांनी, त्या काळाच्या कर्मठ लोकांवर टीका केली. या वेदांचा उल्लेख करून, संत तुकाराम जनांपर्यंत त्यांच्या लोकभाषेमध्ये स्पष्ट शब्दात जनजागृती करत आहेत, ही गोष्ट त्या काळातील ब्राह्मण समाजातील काही कपटी लोकांना अजिबात आवडत नव्हती.

संत तुकाराम हे लोकांमध्ये इतके प्रसिद्ध झाले होते की, त्यांची कीर्ती ही एखाद्या मधुर संगीता प्रमाणे सर्वत्र पसरत होती. व त्यांचा तुकाराम महाराजांची किर्ती शिवरायांच्या कानी सुद्धा पोहोचली.

छत्रपती शिवाजी महाराजांनी संत तुकारामांना द्रव्य व पोशाख इत्यादी भेटवस्तू पाठवल्या, परंतु संत तुकाराम महाराजांना सोन्याची हाव नव्हती, ते स्पष्ट शब्दात बोलले की, मला सोन्याची हाव नाही. सोने हे माझ्यासाठी माती समान आहेत. या सोन्याचा तुम्ही वापर आवश्यक गरजू गोरगरिबांच्या कल्याणासाठी करावा. असे उत्तर संत तुकाराम महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांना दिले. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात संत तुकाराम महाराजां बद्दल आदर हा अधिकच वाढला.

“असाध्य ते साध्य करिता सायास |
कारण अभ्यास तुका म्हणे “|

संत तुकाराम महाराजांनी एकापेक्षा एक नितांत सुंदर अभंग रचले आहे. तुकाराम महाराजांना वारकरी जगद्गुरु म्हणून सुद्धा प्रसिद्धी मिळाली आहे. आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत जनतेच्या मनामधील एक लोकप्रिय राजा छत्रपती शिवाजी महाराज संत तुकाराम महाराजांना त्यांचे गुरु मानत असत.

संत बहिणाबाई तुकाराम महाराजांच्या शिष्या होत्या. संत तुकाराम महाराजांनी “तुकाराम गाथा” लिहिली. या गाथेमध्ये त्यांनी पाच हजारापेक्षा जास्त अभंग लिहिले. विठ्ठल हे तुकारामांचे आराध्य दैवत होते. लोकांमध्ये विठ्ठल भक्ती जागरूक करण्यासाठी त्यांनी समाजामध्ये अनेक उपदेशपर उपदेशपर अभंग व कीर्तने रचली.

लहानपण देगा देवा |
मुंगी साखरेचा रवा |

नाही निर्मळ जीवन |
काय करील साबण |

तुकाराम महाराज यांनी त्यांच्या कुशाग्र बुद्धीच्या बळावर, विविध अभंग रचना रचल्या. त्यांच्या अभंगामधील गोडवा, मधुरता ही असाधारण होती. त्यांचे अभंग म्हणजे विठ्ठलाचे दर्शन त्यांच्या अभंगामधून घडून येत असे. वारकरी संप्रदायाची अखंड परंपरा संत तुकाराम यांनीच सुरू केली. सतराव्या शतकामध्ये सामाजिक प्रबोधनाची एक लोकप्रिय मुहूर्तमेढ संत तुकाराम महाराजांनी रोवली. त्या काळामध्ये समाजामध्ये पसरलेली अंधश्रद्धा दूर करून, समाजाला एका योग्य मार्गावर आणण्याचे महत्त्वपूर्ण व असाधारण कार्य संत तुकाराम महाराजांनी केले.

संत तुकाराम हे उदार व्यक्तिमत्व होते. करुणामय होते. त्यामुळे ते स्वतःपेक्षा जास्त इतरांचा विचार करत, इतरांच्या कल्याणाकडे कायम तत्पर असत. फाल्गुन वैद्य द्वितीयेला संत तुकाराम महाराज हे विठ्ठल चरणी लिन झाले. म्हणजेच वैकुंठ ध्यान पावले. हा दिवस “तुकाराम बीज” म्हणून ओळखला जातो.

तुकाराम महाराज हे अतिशय लोकप्रिय प्रसिद्ध संत होते. त्यांच्या जीवनावर आधारित विविध पुस्तके, मालिका, चित्रपट सुद्धा लोकप्रिय झाले. लोकांमध्ये संत तुकाराम महाराजांचे अभंग एक नवीन दिशा उत्स्फूर्तता व प्रेरणा प्रदान करते.

त्यांचा मृत्यू हा वादग्रस्त विषय ठरला आहे. वारकरी संप्रदायाच्या बहुतेक अनुयायांचा असा विश्वास आहे की भगवान विष्णूने त्यांच्यासाठी विमान पाठवले आणि त्यांना वैकुंठाला नेले. पण काही जाणकारांचे मत आहे की, ते त्याकाळी बलाढ्य लोकांवर कठोर शब्दांत टीका करत असल्यामुळे त्याची हत्या झाली.

त्यांचे एक वंशज श्रीधर महाराज सांगतात की, संत तुकाराम इंद्रायणी नदीच्या काठी कीर्तन करीत होते. त्याने आपल्या 14 सहकारी वारकऱ्यांना सांगितले की ते वैकुंठाला जाणार आहे आणि त्यांनीही आपल्यासोबत यावे. ते त्यांना मिठी मारून गायब झाला. ही घटना बहुधा 9 मार्च 1650 रोजी घडली असावी.

संत तुकाराम महाराजांच्या जीवनातील घटना

संत तुकाराम हे फार दयाळू व उदार व्यक्तिमत्व होते. ज्यावेळी १६२९, १६३०, व १६३१ च्या काळात मोठा दुष्काळ पडला. त्यावेळी त्यांनी आपल्याकडील सर्व संपत्ती गोरगरिबांना वाटून दिली. परंतु स्वतःच्या घरामध्ये काहीही खाण्यास ठेवले नाही. यावर संत तुकाराम महाराजांची बायको चिडून म्हणाली, असे का बसलात, शेतात जाऊन ऊस घेऊन.

या त्यावेळी संत तुकाराम महाराज उसाचा गठ्ठा घेऊन घराकडे निघाले, परंतु वाटेत काही गरीब माणसाने त्यांच्याकडे ऊस मागितले, तुकाराम महाराज इतके दयाळू होते. त्यांनी सर्व माणसांना ऊस देऊन टाकला. व घरी फक्त एकच ऊस ते घेऊन आले.

एकच ऊस आणलेला बघून त्यांची पत्नी तुकाराम महाराजांवर भयंकर चिडल्या, व त्याच उसाने तुकाराम महाराजांना त्यांनी मारायला सुरुवात केली. जेव्हा तुकाराम महाराजांना मारून तो ऊस तुटून गेला, त्यावेळी त्यांच्या पत्नीचा राग शांत झाला.

यावर तुकाराम महाराज हसले, व शांतपणे त्यांच्या पत्नीला म्हणाले उसाचे दोन तुकडे झाले आहेत. एक तुकडा मी खातो, दुसरा तुकडा पत्नीला दिला. हे सर्व कृत्य पाहून, डोळ्यातील अश्रू थांबवता आले नाहीत. तुकाराम महाराजांनी पत्नीच्या डोळ्यातील अश्रू पुसून तिला ऊस खाऊ घातला.

संत तुकाराम महाराजांच्या नावावरून ठेवण्यात आलेल्या ठिकाणांची नावे

  • तुकाराम नगर (तळेगाव दाभाडे पुणे)
  • तुकाराम वाडी (डोंबिवली पूर्व) तुकाराम वाडी (पेण कोकण)
  • तुकाराम नगर (पिंपरी पुणे)
  • तुकाराम वाडी (जळगाव)
  • तुकाराम उद्यान (निगडी पुणे)
  • तुकाराम नगर (खराडी पुणे)
  • संत तुकाराम कॅन्सर हॉस्पिटल (संत तुकाराम चौक अकोला)

संत तुकाराम महाराजांचे बारा अभंग

१) सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती । रखुमाईच्या पती सोयरिया ॥१॥गोड तुझें रूप गोड तुझें नाम । देईं मज प्रेम सर्व काळ ॥ध्रु.॥विठो माउलिये हा चि वर देईं । संचरोनि राहीं हृदयामाजी ॥२॥तुका म्हणे कांहीं न मागे आणीक । तुझे पायीं सुख सर्व आहे ॥३॥

२) कर कटावरी तुळसीच्या माळा । ऐसें रूप डोळां दावीं हरी ॥१॥ठेविले चरण दोन्ही विटेवरी । ऐसें रूप हरी दावीं डोळां ॥ध्रु.॥कटीं पीतांबर कास मिरवली । दाखवीं वहिली ऐसी मूर्ती ॥२॥गरुडपारावरी उभा राहिलासी । आठवें मानसीं तें चि रूप ॥३॥झुरोनी पांजरा होऊं पाहें आतां । येईं पंढरीनाथा भेटावया ॥४॥तुका म्हणे माझी पुरवावी आस । विनंती उदास करूं नये ॥५॥

३) राजस सुकुमार मदनाचा पुतळा । रविशशिकळा लोपलिया ॥१॥कस्तुरीमळवट चंदनाची उटी । रुळे माळ कंठीं वैजयंती ॥ध्रु.॥मुगुट कुंडले श्रीमुख शोभलें । सुखाचें ओतलें सकळ ही ॥२॥कासे सोनसळा पांघरे पाटोळा । घननीळ सांवळा बाइयानो ॥३॥सकळ ही तुम्ही व्हा गे एकीसवा । तुका म्हणे जीवा धीर नाहीं ॥४॥

४) समचरणदृष्टि विटेवरी साजिरी । तेथें माझी हरी वृत्ति राहो ॥१॥आणीक न लगे मायिक पदार्थ । तेथें माझें आर्त्त नको देवा ॥ध्रु.॥ब्रम्हादिक पदें दुःखाची शिराणी । तेथें दुश्चित झणी जडों देसी ॥२॥तुका म्हणे त्याचें कळलें आम्हां वर्म । जे जे कर्मधर्म नाशवंत ॥३॥

५) सुंदर तें ध्यान उभे विटेवरी । कर कटावरी ठेवूनियां ॥१॥तुळसीचे हार गळां कासे पीतांबर । आवडे निरंतर तें चि रूप ॥ध्रु.॥मकरकुंडलें तळपती श्रवणीं । कंठीं कौस्तुभमणि विराजित ॥२॥तुका म्हणे माझें हें चि सर्व सुख । पाहीन श्रीमुख आवडीनें ॥३॥

६) विसरले कुळ आपुला आचार । पती भावे दीर घर सोय ॥१॥सांडिला लौकिक लाज भय चिंता । रातलें अनंता चित्त माझें ॥२॥मज आतां कोणी आळवाल झणी । तुका म्हणे कानीं बहिरी जालें ॥३॥

७) आधिल्या भ्रतारें काम नव्हे पुरा । म्हणोनि व्यभिचारा टेकलियें ॥१॥रात्रंदिस मज पाहिजे जवळी । क्षण त्यानिराळी न गमे घडी ॥२॥नाम गोष्टी माझी सोय सांडा आतां । रातलें अनंता तुका म्हणे ॥३॥

८) नाहीं काम माझें काज तुम्हांसवें । होतें गुप्त ठावें केलें आतां ॥१॥व्यभिचार माझा पडिला ठाउका । न सर ती लोकांमाजी जालें ॥२॥न धरावा लोभ कांहीं मजविशीं । जालें देवपिशी तुका म्हणे ॥३॥

९) गरुडाचें वारिकें कासे पीतांबर । सांवळें मनोहर कैं देखेन ॥१॥बरवया बरवंटा घनमेघ सांवळा । वैजयंतीमाळा गळां शोभे ॥ध्रु.॥मुगुट माथां कोटि सूर्यांचा झळाळ । कौस्तुभ निर्मळ शोभे कंठीं ॥२॥ओतींव श्रीमुख सुखाचें सकळ । वामांगीं वेल्हाळ रखुमादेवी ॥३॥उद्धव अक्रूर उभे दोहींकडे । वर्णिती पवाडे सनकादिक ॥४॥तुका म्हणे नव्हे आणिकांसारिखा । तो चि माझा सखा पांडुरंग ॥५॥

१०) वाळो जन मज म्हणोत शिंदळी । परि हा वनमाळी न विसंबें ॥१॥सांडूनि लौकिक जालियें उदास ।नाहीं भय आस जीवित्वाची ॥२॥नाइकें वचन बोलतां या लोकां । म्हणे जालों तुका हरिरता ॥३॥

११) हाचि नेम आतां न फिरें माघारी । बैसलें शेजारीं गोविंदाचे ॥१॥घररिघी जालें पट्टराणी बळें । वरिलें सांवळें परब्रम्ह ॥२॥बळियाचा अंगसंग जाला आतां । नाहीं भय चिंता तुका म्हणे ॥३॥

१२) न देखें न बोलें नाइकें आणीक । बैसला हा एक हरि चित्तीं ॥१॥सासुरें माहेर मज नाहीं कोणी । एक केलें दोन्ही मिळोनियां ॥२॥आळ आला होता आम्ही भांडखोरी । तुका म्हणे खरी केली मात ॥३॥

संत तुकाराम महाराजांचे दोहे हिन्दी रचना

लोभी के चित धन बैठे, कामिनि के चित काम।
माता के चित पूत बैठे, तुका के मन राम॥

तुका बड़ो न मानूं, जिस पास बहुत दाम।
बलिहारी उस मुख की, जिस ते निकसे राम॥

तुका मार्या पेट का, और न जाने कोय।
जपता कछु राम नाम, हरि भगत की सोय॥

तुका कुटुंब छोरे रे लड़के, जीरो सिर मुंडाय।
जब ते इच्छा नहिं मुई, तब तूँ किया काय॥

राम-राम कह रे मन, और सुं नहिं काज।
बहुत उतारे पार आगे, राखि तुका की लाज॥

तुका दास तिनका रे, राम भजन नित आस।
क्या बिचारे पंडित करो रे, हात पसारे आस॥

राम कहे सो मुख भला रे, बिन राम से बीख।
आय न जानू रमते बेरा, जब काल लगावे सीख॥

कहे तुका जग भुला रे, कह्या न मानत कोय।
हात परे जब काल के, मारत फोरत डोय॥

कहे तुका तु सबदा बेचूं, लेवे केतन हार।
मीठा साधु संत जन रे, मूरख के सिर मार॥

ब्रीद मेरे साइयां को, तुका चलावे पास।
सुरा सोहि लरे हम से, छोरे तन की आस॥

संतन पन्हैयाँ ले खड़ा, रहूँ ठाकुरद्वार।
चलता पाछे हूँ फिरो, रज उड़त लेउं सिर॥

भीस्त न पावे मालथी, पढ़िया लोक रिझाय।
नीचा जेथे कमतरीन, सोही सो फल खाय॥

तुका और मिठाई क्या करूँ, पाले विकार पिंड।
राम कहावे सो भली रूखी, माखन खीर खांड॥

चित्त मिले तो सब मिले, नहिं तो फुकट संग।
पानी पत्थर एक ही ठोर, कोर न भीजे अंग॥

फल पाया तो सुख भया, किन्ह सूं न करे विवाद।
बान न देखे मिरगा, चित्त मिलाया नाद॥

तुका प्रीत राम सूं, तैसी मीठी राख।
पतंग जाय दीप पररे, करे तन की ख़ाक॥

राम कहे सो मुख भला रे, खाए खीर खांड।
हरि बिन मुख मों धूल परी, क्या जनी उस रांड॥

कहे तुका भला भया, हुआ संतन का दास।
क्या जानूं केते मरता, न मिटती मन की आस॥

तुका बस्तर बिचारा क्या करे, अतंर भगवान होय।
भीतर मैला कब मिटे रे मन, मरे ऊपर धोय॥

चित सुंचित जब मिले, तब तन थंडा होय।
तुका मिलना जिन्ह सूं, ऐसा बिरला कोय॥

तुका संगत तिन से कहिए, जिन से सुख दुनाए।
दुर्जन तेरा मूं काला, थीतो प्रेम घटाए॥

तुका मिलना तो भला, मन सूं मन मिल जाय।
ऊपर-ऊपर माटी घासनी, उनको को न बराय॥

तुकादास राम का, मन में एकहिं भाव।
तो न पालटू आवे, येही तन जाय॥

तुका राम सूं चित बाँध राखूं, तैसा आपनी हात।
धेनु बछरा छोर जावे, प्रेम न छूटे सात॥

तुका राम बहु मीठा रे, भर राखूं शरीर।
तन की करुं नाब री, उतारूँ पैल तीर॥

तुका सुरा बहुत कहावे, लड़न बिरला कोय।
एक पावे ऊँच पदवी, एक खौसा जोय॥

तुका इच्छा मिटी नहिं तो, काहा करे जटा ख़ाक।
मथीया गोलाडार दिया तो, नहिं मिले फेर न ताक॥

काफर सोही आप न बुझे, आला दुनिया भर।
कहे तुका सुनो रे भाई, हिरदा जिन्ह का कठोर॥

तुका सुरा नहिं शबद का, जहाँ कमाई न होय।
चोट सहे घन की रे, हिरा नीबरे तोय॥

संत तुकाराम महाराजांचे भक्तिमय जीवन

आजच्या शतकात म्हणजेच कलियुगामध्ये विज्ञान तंत्रज्ञान हे खूप प्रगत झालेले असून, प्रत्येक कुटुंबामध्ये सामाजिक, भावनीक, तसेच कौटुंबिक समस्या निर्माण होतात. या समस्यांचा मार्ग हा तुम्हाला तुकोबांच्या अभंगातून नक्कीच मिळेल. नाहीतर आपली अवस्था ही “तुझे आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलासी” अशा तुकोबांच्या अभंग रचनेसारखी होऊन जाईल.

संत तुकाराम हे विठ्ठल भक्त होतेच, तसेच ते एक ज्ञानी व उदार व्यक्तिमत्व होते. अशा उदार व्यक्तिमत्त्वांचा व दैवी संताचा जन्म आपल्या महाराष्ट्राच्या भूमीवर झाला. हे आपले अहोभाग्यच आहे. संत तुकाराम महाराज आणि त्यांच्या जीवनाच्या कालावधीमध्ये ४००० पेक्षा जास्त अभंग रचना केली आहे.

संत तुकाराम महाराज हे विठ्ठल भक्ती मध्ये इतके लीन होते की, ते स्वतःला समाजापासून वीरक्त करत होते. त्यांना कोणत्याही प्रकारची मोह, माया, सारख्या गोष्टींबद्दल फरक पडत नव्हता. त्यांना प्रपंचाच्या गोष्टींमध्ये आशा, अपेक्षा उरल्या नव्हत्या.

स्वतःचे जीवन ते वैराग्य पद्धतीने जगत होते. वयाच्या चाळीशी नंतर संत तुकाराम महाराजांना स्वतः हे जग सोडून विठ्ठलाच्या चरणी लीन व्हावे, विठ्ठलाची सेवा करावी, व जगाचा निरोप घ्यावा, असे वाटू लागले. याचा प्रभाव म्हणजे वयाच्या ४२ व्या वर्षी, संत तुकाराम महाराजांनी दिनांक ९ मार्च १६५० रोजी ते जग सोडून वैकुंठाला निघून गेले.

संत तुकाराम महाराज हे वैकुंठाला निघून गेले असले तरी, त्यांचे मौल्यवान विचार हे लोकांमध्ये अजूनही कायम आहे. संत तुकाराम महाराजांनी वारकरी संप्रदाय सुरुवात केली. व वारकऱ्यांमध्ये तुकाराम महाराजांचे विचार व त्यांच्या जीवनाचा सार सर्वस्व आहे.

आजही वारकरी विठ्ठलाच्या दर्शनाला जातेवेळी, देहूला सुद्धा संत तुकाराम महाराजांच्या चरणांचे दर्शन घेण्यासाठी नक्कीच जातात. अशा प्रकारे संत तुकाराम महाराजांनी लोकांच्या मनामध्ये देवभक्ती जागरूक करून विविध प्रकारच्या अभंग रचनांची रचना करून लोकांमध्ये सद्भावना निर्माण केली.

संत तुकाराम महाराज यांचा छत्रपती शिवाजी महाराज यांना उपदेश

संत तुकाराम महाराज

एके दिवशी छत्रपती शिवाजी महाराज संत तुकाराम महाराजांचे दर्शन, सत्संग आणि आशीर्वाद मिळवण्यासाठी देहू या गावी गेले होते. ईश्‍वरनिष्ठ महापुरुषाला पाहून ते इतके प्रभावित झाले की, त्यांच्या कृपेची याचना करू लागले; परंतु दूरदृष्टीसंपन्न लोकसंत तुकाराम महाराजांनी त्यांना समर्थ रामदासस्वामींना शरण जाण्याचा उपदेश केला. संत तुकाराम महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांना क्षात्रधर्म म्हणजे काय, हे सांगून राजधर्म समजावला. छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांच्या कीर्तने आणि मार्गदर्शने यांतून प्रेरणा घेतली.

संत तुकाराम महाराजांची समाधी

संत तुकाराम महाराज ज्या दिवशी वैकुंठाला गेले तो दिवस म्हणजेच  9 मार्च 1650 तुकाराम बीज म्हणून ओळखला जातो. फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या दुसर्‍या दिवशी साजरा केला जातो. तुकोबाचे जन्मस्थान असलेल्या देहूला हजारो भाविकांनी भेट देऊन मंदिरात प्रार्थना केली.

संत तुकाराम महाराज यांच्या मृत्यूचे कारण

संत तुकाराम महाराज यांच्या मृत्यूबद्धल दोन मतप्रवाह आहेत. पहिला आहे ते विमानात बसून सदेह वैकुंठाला गेले आणि दुसरा आहे, त्यांची हत्या केली. तुकाराम महाराज यांचा जन्म 1608 चा तर मृत्यू 1650 सालचा. म्हणजे ते फक्त 42 वर्षे जगले. ते वयाच्या 42 व्या वर्षी मृत्यू पावले. हे वय मृत्यूचे नाही. संत तुकाराम महाराज अत्यंत तरुण असताना त्यांचा मृत्यू कसा झाला हा नेहमीच शंकेचा, वादाचा विषय राहिला आहे.

संत तुकाराम महाराजांचा लढा ब्राह्मणाविरुद्ध होता, त्यांनी तुकाराम महाराजाना खूप त्रास दिला होता. तुकाराम महाराज विचाराने लढत होते, तर, ब्राह्मण त्यांच्याविरुद्ध कटकारस्थान करत होते. त्यांच्या अभंग लेखनावर बंदी घालणे, त्यांचे अभंग इंद्रायणीत बुडवणे, त्यांची बदनामी करणे, या बाबी ब्राह्मणांनी संत तुकाराम महाराजांची हत्या करून ते विमानात बसून वैकुंठाला गेले अशी अफवा पसरवली. पण अनेक चरित्रकारांना तुकोबांच्या मृत्यूबद्दलची ही शक्यता अजिबात मान्य नाही.

श्रीधरमहाराज लिहितात- ‘इंद्रायणीकाठी तुकोबांचं कीर्तन सुरू होतं. त्यांनी सर्वांना ‘आम्ही वैकुंठाला जात आहोत, तुम्ही माझ्याबरोबर वैकुंठाला चला’ असं सांगितलं. १४ टाळकऱ्यांनी क्षेमालिंगन दिले. सकळही माझी बोळवण करा । परतोनि घरा जावा ।। अशी सूचनाही केली. आणि भगवतकथा करीत असता तुकोबा अदृश्य झाले. तुकारामांचा मृत्यू नेमका कसा झाला हे कोणालाच सांगता आलेलं नाही.’

संत तुकाराम महाराज पंढरपूर वारी

पांडुरंगाचा सन्मान करण्यासाठी ही पंढरपूरची वार्षिक यात्रा आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील भाविक “ग्यानबा तुकाराम” म्हणत पायी चालत पंढरपूरला जातात. मोर्चात लाखो लोक सहभागी होतात. देहूतील वारकरी संत तुकारामांच्या पादुका देहूहून पंढरपूरला पालखीत घेऊन जातात.

प्रश्न

संत तुकाराम महाराजांचे संपूर्ण नाव काय आहे?

संत तुकाराम महाराजांचे पूर्ण नाव तुकाराम बोल्होबा अंबिले आहे.

संत तुकारामांचा जन्म केव्हा झाला ?

संत तुकारामांचा जन्म सोमवार २१ जानेवारी १६०८, माघ शुद्ध पंचमी, शा.शके १५३०, युगाब्द ४७०९.देहू, महाराष्ट्र येथे झाला.

संत तुकारामांची शिष्या कोण?

तुकारामाचे शिष्य संत निळोबा, संत बहिणाबाई, भगवानबाबा हे होते.

संत तुकारामांनी समाधी कुठे घेतली ?

संत तुकारामांनी समाधी संत तुकाराम वैकुंठस्थान मंदिर, देहू येथे घेतली.

संत तुकाराम महाराज बीज म्हणजे काय?

तुकाराम बीज, म्हणजे संत तुकाराम महाराजांच्या सदेह वैकुंठ गमनाचा दिवस. फाल्गुन वद्य द्वितीयेला, म्हणजेच ९ मार्च १६५० तुकारामांचे सदेह वैकुंठ-गमन झाले, असे मानले जाते. हा दिवस ‘तुकाराम बीज’ म्हणून ओळखला जातो.

आपण तुकाराम बीज का साजरी करतो?

तुकाराम बीज हा दिवस संत तुकाराम महाराजांच्या सदेह वैकुंठ गमनाचा दिवस मानला जातो. पारंपारिक मराठी दिनदर्शिकेनुसार फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षाच्या दुसऱ्या दिवशी हा दिवससाजरा केला जातो.

संत तुकाराम महाराज मृत्यू कारण काय होते?

संत तुकाराम महाराज यांच्या मृत्यूबद्धल दोन मतप्रवाह आहेत. पहिला आहे ते विमानात बसून सदेह वैकुंठाला गेले आणि दुसरा आहे, त्यांची हत्या केली. तुकाराम महाराज यांचा जन्म 1608 चा तर मृत्यू 1650 सालचा. म्हणजे ते फक्त 42 वर्षे जगले. ते वयाच्या 42 व्या वर्षी मृत्यू पावले. हे वय मृत्यूचे नाही. संत तुकाराम महाराज अत्यंत तरुण असताना त्यांचा मृत्यू कसा झाला हा नेहमीच शंकेचा,वादाचा विषय राहिला आहे.
संत तुकाराम महाराजांचा लढा ब्राह्मणाविरुद्ध होता, त्यांनी तुकाराम महाराजाना खूप त्रास दिला होता. तुकाराम महाराज विचाराने लढत होते, तर, ब्राह्मण त्यांच्याविरुद्ध कटकारस्थान करत होते. त्यांच्या अभंग लेखनावर बंदी घालणे, त्यांचे अभंग इंद्रायणीत बुडवणे, त्यांची बदनामी करणे, या बाबी ब्राह्मणांनी संत तुकाराम महाराजांची हत्या करून ते विमानात बसून वैकुंठाला गेले अशी अफवा पसरवली. पण अनेक चरित्रकारांना तुकोबांच्या मृत्यूबद्दलची ही शक्यता अजिबात मान्य नाही.
श्रीधरमहाराज लिहितात- ‘इंद्रायणीकाठी तुकोबांचं कीर्तन सुरू होतं. त्यांनी सर्वांना ‘आम्ही वैकुंठाला जात आहोत, तुम्ही माझ्याबरोबर वैकुंठाला चला’ असं सांगितलं. १४ टाळकऱ्यांनी क्षेमालिंगन दिले. सकळही माझी बोळवण करा । परतोनि घरा जावा ।। अशी सूचनाही केली. आणि भगवतकथा करीत असता तुकोबा अदृश्य झाले. तुकारामांचा मृत्यू नेमका कसा झाला हे कोणालाच सांगता आलेलं नाही.’

निष्कर्ष

मित्रहो, आजच्या लेखाच्या माध्यमाने आम्ही आपणास तुकाराम महाराजांबद्दल माहिती दिली आहे. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा.व लेख आवडल्यास तुमच्या इतर मित्रापरीवारांसोबत नक्की शेयर करा. धन्यवाद.

Leave a comment