शरद पवार यांची माहिती | Sharad Pawar Information In Marathi

शरदचंद्र गोविंदराव पवार हे महाराष्ट्र राज्याचे प्रमुख राजकारणी म्हणून प्रसिद्ध आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते संस्थापक व अध्यक्ष आहेत. शरदराव यांना संपूर्ण महाराष्ट्र एक उत्तम राजकारणी नेता म्हणून संबोधते.

आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास शरद पवार यांच्या बद्दल माहिती दिली आहे. शरद पवार यांची माहिती हा लेख संपूर्ण आणि शेवटपर्यंत वाचा.

Table of Contents

शरद पवार यांची माहिती मराठी | Sharad Pawar Information In Marathi

पूर्ण नाव शरदचंद्र गोविंदराव पवार
जन्म तारीख १२ डिसेंबर १९४०
जन्म स्थळ बारामती, महाराष्ट्र, भारत
शिक्षण बी.कॉम
प्रसिद्धी समाजवादी पार्टीचे प्रमुख
व्यवसायराजनेता
पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
वैवाहिक स्थिती विवाहित

कोण आहेत शरद पवार ?

 • शरदचंद्र गोविंदराव पवार यांना संपूर्ण महाराष्ट्र शरद पवार या नावाने ओळखते. शरदराव हे नामवंत भारतीय राजकारणी आहे. १९९९ पासून ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस वेगळे झाल्यानंतर, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे संस्थापक व अध्यक्ष स्थान शरदराव यांनी भूषवले आहे. शरद पवार यांनी आपल्या राजकीय कारकर्दीमध्ये राज्याच्या राजकारणामध्ये व राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाच्या पदावर कामे केली आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा भारताचे संरक्षण मंत्री म्हणून शरदराव यांनी कार्य केले आहे.
sharad pawar information in marathi
sharad pawar
 • शरदराव यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले गेले. २००५ ते २००८ या कालावधीमध्ये पवार यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष स्थान भूषवले. इंग्लंडचा डेव्हिड मॉर्गनच्या स्थानी शरद पवार यांचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
 • शरदराव यांना गुटखा खाण्याची सवय असल्याकारणाने, १९९९ मध्ये शरदराव यांना तोंडाचा कर्करोग झाल्याचे निदान झाले. एप्रिल २००४ मध्ये त्यांच्या तोंडाची शस्त्रक्रिया करण्यात आली व मार्च २०२१ मध्ये त्यांच्या पित्ताशयाच्या समस्येवर शस्त्रक्रिया करण्यात आली.

शरद पवार यांचा जन्म आणि सुरुवातीचे आयुष्य

शरदराव यांचा जन्म दिनांक १२ डिसेंबर १९४० रोजी महाराष्ट्र राज्यामध्ये बारामती जिल्ह्यातील श्री गोविंदराव पवार व श्रीमती शारदाबाई पवार यांच्या कुटुंबामध्ये झाला. शरदराव यांचे वडील गोविंदराव पवार हे बारामती मध्ये शेतकरी सहकार संस्थेत काम करत. ज्या संस्थेला सहकारी खरेदी विक्री संघ म्हणून प्रसिद्धी प्राप्त होती.

Sharad Pawar

शरद पवार यांच्या आई श्रीमती शारदाबाई पवार या बारामती पासून अंदाजे दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या काटेवाडी या ठिकाणी कौटुंबिक शेतीची देखभाल करत असत. शरद पवार यांना पाच भाऊ व चार बहिणी आहेत. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या शाळेमध्ये शरद पवार यांचे प्राथमिक शिक्षण झाले. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी शरद पवार यांनी पुणे विद्यापीठाच्या बृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स मध्ये बीकॉम ही पदवी प्राप्त केली.

शरद पवार यांची कौटुंबिक माहिती

वडिलांचे नाव गोविंदराव पवार
आईचे नाव शारदाबाई पवार
भाऊप्रताप गोविंदराव पवार आणि ४ इतर
बहिण सरोज पाटिल व ३ इतर
पत्नीचे नाव सुलक्षणा ( प्रतिभा पवार )
अपत्य १ मुलगी
मुलीचे नाव सुप्रिया सुळे
शरद पवार फॅमिली

शरद पवार यांची राजकीय कारकीर्द

 • शरदराव यांनी त्यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात पुणे या ठिकाणी केली. महाराष्ट्राचे प्रथम मुख्यमंत्री व आधुनिक महाराष्ट्राचे निर्माते यशवंतराव यांच्या नेतृत्वाखाली, शरदराव यांनी युवा काँग्रेस व राजकीय कारकीर्दीला चालना दिली. यशवंतराव यांना शरद पवार यांनी आपले राजकीय गुरू मानले होते.
 • शरदराव यांना राजकारणामध्ये अतिशय आवड होती. वादविभागातील त्यांचा उत्साह, गतिमान वकृत्व कौशल्य, मैदानी क्रिया कलाप, खेळाचे आयोजन, आयोजन करण्याचा त्यांचा उत्साह, हे त्यांच्यामधील असलेले महत्त्वाचे नेतृवाचे गुण होते.
 • १९५६ मध्ये गोवा मुक्ती चळवळीच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या, निषेध मोर्चामध्ये शरदराव यांनी सक्रिय सहभाग दर्शवला व संघटना हे त्यांचे राजकारणातील पहिले काम होते. शरद पवार यांनी बृहन महाराष्ट्र कॉमर्समध्ये विद्यार्थी नेतृत्वाचे प्रतिनिधित्व केले व त्या ठिकाणी त्यांनी सरचिटणीस म्हणून काम पाहिले.
 • या पदामुळे त्यांचा राजकारणामध्ये प्रवेश झाला व राजकारणामध्ये शरदराव यांचा युवक काँग्रेसची चांगला संबंध झाला. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार समजल्या जाणाऱ्या यशवंतराव चव्हाण यांच्या संपर्कामध्ये शरदराव आल्याने पवार यांना एक वेगळी ओळख प्राप्त झाली.
Sharad Pawar

शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पद सोडण्याची घोषणा केली

शरदराव यांनी दि. ०२ मे २०२३ मध्ये मुंबईमध्ये त्यांच्या पुस्तकाचे प्रकाशन समारंभ आयोजित केले होते, त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी पक्षातील अध्यक्ष पद सोडण्याची घोषणा केली. दि. १० सप्टेंबर २०२२ रोजी पक्षाच्या कार्यकारणीच्या बैठकीमध्ये, पवार साहेब यांची राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

शरद पवार ५५ वर्षापासून राजकारणात सक्रिय आहेत

पवार साहेब त्यांच्या आयुष्यामधील ५५ वर्षापासून महाराष्ट्राचा राजकारणामध्ये सक्रिय आहे. शरद पवार चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून निवडून आले. पवार साहेब यांनी केंद्रामध्ये कृषी आणि संरक्षण मंत्री म्हणून भूमिका बजावली. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना पवार यांनी आपले राजकीय गुरू मानले.

शरद पवार यांची विधानसभेतील कारकीर्द

 • विधानसभा निवडणुकीत पवार यांनी बारामती येथून, निवडणूक लढवावी असे यशवंतराव चव्हाण यांनी सांगितले पण, काँग्रेस पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी याला विरोध केला. निवडणूक काय जिंकणार, असं त्यांचं मत होतं. आपण ही सीट हरणार असे जिल्हा पातळीवरील नेत्यांनी चव्हाण यांना सांगितले. तरी चालेल पण बारामतीची निवडणूक पवार साहेब यांनीच लढवावी असा निर्णय यशवंतराव यांनी घेतला यशवंतराव चव्हाण यांनी दाखवलेला. विश्वास सार्थ ठरवत, १९६७ साली पवार साहेब आमदारकीचे निवडणूक जिंकले आणि त्याकाळी सर्वात कमी वयात आमदार होण्याचा मान मिळवला. तेव्हापासून ते आज पर्यंत बारामतीच्या या सीटवर पवार घराण्यातील व्यक्तीस निवडून आले आहेत.
 • श्री वसंतराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात त्यांचा राज्यमंत्री म्हणून वयाच्या २९ व्या वर्षी समावेश झाला. १९७८ सालच्या निवडणुकीनंतर, वसंतदादा पाटील मुख्यमंत्री झाले. परंतु काँग्रेस पक्षाचे बारा आमदार फोडून पवारांनी विरोधी पक्षाबरोबर हात मिळवणी केली आणि वसंत दादांचे सरकार पाडले.
 • १९७८ रोजी शरद पवारांचा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून, शपथविधी झाला. ३८ व्या वर्षी मुख्यमंत्री पदाची शपथ घेत, महाराष्ट्रातील सर्वात तरुण मुख्यमंत्री बनण्याचा किताब त्यांनी पटकावला. यानंतर शरद पवार १९८८ ते १९९१ व १९९३ ते १९९५ या कालखंड यादरम्यान, ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून कार्यरत राहिले.
शरद पवार

शरद पवार पहिल्यांदा मुख्यमंत्री कधी झाले ?

पवार साहेब १९६७ च्या दरम्याने पहिल्यांदा आमदार झाले. बारामती विधानसभा मतदारसंघांमधून शरद पवारांनी काँग्रेसच्या तिकिटावर विजय प्राप्त केला. यानंतर १९७८ मध्ये पवार साहेब यांनी काँग्रेस सोडली व नंतर जनता पक्षासोबत महाराष्ट्रामध्ये युतीचे सरकार स्थापन केले. शरद पवार यांनी पहिल्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. १९९० मध्ये केंद्रात इंदिरा गांधी पुन्हा सत्तेवर आल्या, त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र सरकार बरखास्त केले.

शरद पवार पहिल्यांदा खासदार कधी झाले ?

१९८३ मध्ये पवार साहेब यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष स्थान भूषवले. यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघांमधून निवडणूक जिंकून, त्यांनी पहिल्यांदा लोकसभेमध्ये स्थान प्राप्त केले. यानंतर १९८५ मध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुका झाल्या. तेव्हा पवार साहेब यांनी संसद सदस्यत्वाचा राजीनामा दिला. व निवडणुकात भाग घेऊन, विजयाची छाप सोडली. या निवडणुकीनंतर शरद पवारांची विधानसभेमधील विरोधी पक्षनेते पदी निवड करण्यात आली.

शरद पवार पुन्हा मुख्यमंत्री झाले

पवार साहेब हे जास्त काळ काँग्रेस पक्षामध्ये राहिले नाही. १९८७ मध्ये ते पुन्हा काँग्रेस पक्षात परतले. १९८८ मध्ये केंद्रातील राजीव गांधी यांच्या सरकारमध्ये, महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांना केंद्रीय अर्थमंत्री करण्यात आले व त्यानंतर पवार साहेब यांना पुन्हा मुख्यमंत्रीपद सोपवण्यात आले. यानंतर १९९० मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये, भाजप शिवसेना युतीने काँग्रेसला कडवी झुंज दिली. तरीसुद्धा काँग्रेसला २८८ पैकी १४१ जागा जिंकण्यामध्ये यश प्राप्त झाले. परंतु, ते बहुमताने जिंकू शकले नाहीत. यानंतर पवार साहेब यांना १२ अपक्ष आमदारांचा पाठिंबा प्राप्त झाला व ते परत मुख्यमंत्रीपदावर बसले.

पवार यांची १२ व्या लोकसभेत विरोधी पक्षनेते पदी निवड झाली

महाराष्ट्रामध्ये १९९५ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना व भाजप युतीने १३८ जागा स्वतःच्या नावे केल्या. त्यानंतर मनोहर जोशी हे मुख्यमंत्री पदावर बसले. त्या काळात काँग्रेसला फक्त ८० जागा प्राप्त झाल्या होत्या. पवार साहेब यांनी १९९६ पर्यंत विधानसभेमधील विरोधी पक्ष नेते पण निवडले. १९९६ मध्ये लोकसभा निवडणूक जिंकून ते संसदेमध्ये पोहोचले.

१९९८ च्या दरम्यान मध्यावधी निवडणुका झाल्या. तेव्हा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष व त्यांच्या मित्र पक्षांनी ४८ पैकी ३७ जागा जिंकून उत्तम प्रतिउत्तर दिले व यानंतर पवार साहेब यांची १२ व्या लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करण्यात आली.

राष्ट्रवादीची स्थापना कधी आणि कशी झाली ?

 • १९९९ मध्ये बारावी लोकसभा संपुष्टात आली. त्यावेळी पवार, पीए संगमा, तारीक अनवर, यांनी आवाज उठवला की, काँग्रेसच्या पंतप्रधानाचा उमेदवार परदेशामध्ये नाही तर भारतातला असावा.
 • १९९९ रोजी पवार साहेब यांनी त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. १९९० च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत कोणताही पक्षाला बहुमत मिळाले नाही, त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या आघाडी होऊन विलासराव देशमुख राज्याचे नवे मुख्यमंत्री झाले. अशा प्रकारे नव्याने सुरू झालेला राष्ट्रवादी हा पक्ष पहिलाच निवडणुकीत सत्येत आला.
 • १९९९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये कोणत्याही पक्षाला जास्त बहुमत मिळाले नसताना, सुद्धा काँग्रेस व राष्ट्रवादीने मिळून त्यांचे सरकार स्थापन केले.
 • २००४ च्या लोकसभा निवडणुका नंतर पवार यांनी कृषिमंत्री पद स्वीकारले.

शरद पवार यांच्या सत्तेतील संघर्ष काळ

 • जानेवारी २०१२ मध्ये पवारांनी तरुण नेतृत्वासाठी मार्ग मोकळा करण्यासाठी, २०१४ च्या लोकसभा निवडणुका न लढवण्याची घोषणा केली. एप्रिल २०१४ मध्ये सहा वर्षांच्या मुदतीसाठी ते संघात निवडून आले होते. २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत, भाजप प्रणित एनडीएने सत्तारूढ यूपीए सरकारला पराभूत केले. तेव्हा त्यांनी त्यांचे मंत्रिपद गमावले. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर, महाराष्ट्रातही पवारांच्या राष्ट्रवादीने सत्ता गमावली नवीन विधानसभेत भाजपाने बहुसंख्य जागा जिंकला. भाजपचा मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेने नंतर भाजप प्रणित सरकारात प्रवेश केला आणि त्या सरकारला राष्ट्रवादीच्या पाठिंबाची गरज नव्हती. राष्ट्रवादीचा पराभव झाला. या निवडणुकीत राष्ट्रवादी संपली असे इतर पक्षांनी घोषित केले, पण पवार थांबले नाहीत आणि खचले ही नाहीत. हरले तर मुळीच नाही.
 • आता राष्ट्रवादी काही पुन्हा सत्तेत येणार नाही, त्या विचाराने अनेक नेत्यांनी राष्ट्रवादी पक्ष सोडला. दिवसेंदिवस त्यांचा संख्याबळ कमी होऊ लागलं. २०१९ च्या निवडणुका आल्या, त्यावेळी पवार साहेबांनी कंबर कसली. वयाच्या ७९ व्या वर्षी त्यांनी दिवसाला तीन सभा घेतल्या, तब्बल ४१ सभा घेतला. यावेळी त्यांना म्हातारा पैलवान बोलून हिणवण्याचा प्रयत्नही विरोधकांनी केला, पण याला पवार साहेबांनी अत्यंत खोचक उत्तर देते म्हणाले, ‘कुस्ती पैलावानाशी केली जाते, वस्तादान बरोबर नाही, मी म्हातारा झालो नाही, मला अजून खूप लोकांना घरी बसवायचं’.
 • याच काळातली त्यांची भर पावसात भाषण देतानाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आणि या वयातही त्यांची लढा देण्याची वृत्ती लोकांना भावली. २०१४ ला राष्ट्रवादीचे ४१ आमदार आले होते, त्यातले सात आमदार पक्ष सोडून गेले. त्यामुळे त्यांचे आता २५ आमदार ही येणार नाहीत असे सर्वांना वाटत होतं, पण पवार साहेबांनी ५४ आमदार निवडून आणले. दि. २८ नोव्हेंबर २०१९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस या पक्षांमध्ये युती होऊन, महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आले. जून २०२० मध्ये पवार पुन्हा राज्यसभेवर निवडून आले. जी राष्ट्रवादी संपली असे सर्वांना वाटत होते, तीच राष्ट्रवादी पुन्हा सत्तेत आली आणि या यशामध्ये पवार साहेबांचा सिंहाचा वाटा होता.

शरद पवार यांचे क्रिकेटवर विशेष प्रेम

पवार यांना राजकारणाबरोबर क्रिकेटमध्ये सुद्धा प्रचंड आवड आहे. २००५ ते २००८ च्या दरम्याने बीसीसीआयचे अध्यक्षस्थान शरद पवार यांनी भूषवले. यानंतर २०१० ते २०१२ पर्यंत पवार यांनी आयसीसीच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी सुद्धा अतिशय उत्तम रित्या पार पाडली. शरद पवार हे २००१ ते २०१२ या दरम्यान मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष पण होते व यानंतर २०१५ मध्ये त्यांची पुन्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.

शरद पवार आणि क्रीडा प्रशासन

कबड्डी कुस्ती फुटबॉल खो-खो आणि क्रिकेट यासारख्या खेळांमध्ये पवार यांना रस असल्यामुळे त्यांच्या प्रशासनाशी ही त्यांचा संबंध आहे. ते विविध संस्थांचे प्रमुख राहिले आहेत.

 • महाराष्ट्र कुस्ती संघ
 • महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटना
 • मुंबई क्रिकेट असोसिएशन
 • आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे उपाध्यक्ष
 • आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष
 • महाराष्ट्र खो-खो असोसिएशन
 • भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड
 • महाराष्ट्र कबड्डी असोसिएशन

शरद पवार यांच्याशी संबंधित वाद व टीका

 • गहू आयातिशी संबंधित कोट्यावधी रुपयांच्या घोटाळ्यामध्ये अडकल्याचा आरोप करून, भारतीय जनता पक्षाने म्हणजेच भाजपने २००७ मध्ये पवार यांच्या राजीनामाची मागणी केली होती.
 • कृषिमंत्री या नात्याने पवार साहेब यांच्यावर कृषी उत्पादनाच्या वाढलेल्या किमती हाताळता येत नसल्याचा सुद्धा आरोप केला गेला होता.
 • अब्दुल करीम तेलगिने केलेल्या सहाशे अब्ज रुपयांच्या स्टॅम्प पेपर घोटाळ्यात, पवार यांचे नाव विविध भारतीय वृत्तवाहिनींनी पकडलेल्या नार्को विश्लेषणामध्ये समाविष्ट केले होते.

शरद पवार यांनी एकच मुल होण्याची अट पत्नी समोर ठेवली

पवार यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, लग्नापूर्वी त्यांची पत्नी प्रतिभा पवार यांना एकच मूल असावे अशी अट त्यांनी त्यांच्यासमोर ठेवली. ते म्हणाले होते, आम्हाला एकच मूल होईल, मग तो मुलगा असो वा मुलगी. यानंतर सुप्रियाचा जन्म दि. ३० जून १९६९ मध्ये पुण्यात झाला.

शरद पवारांनी जिंकलेले पुरस्कार

 • भारताच्या तत्कालीन राष्ट्रपती श्रीमती प्रतिभा देवसिंग पाटील यांच्याकडून शरद पवार यांना “उत्कृष्ट संसद पटू पुरस्कार” २००३ मध्ये देऊन सन्मानित केले गेले.
 • शरद यांच्यावर प्रकाशित पुस्तक “फास्ट फॉरवर्ड” या पुस्तकाला २००८ मध्ये भारताचे माननीय पंतप्रधान श्री मनमोहन सिंग यांच्याकडून प्रकाशित करण्यात आले.
 • लॉरेन्स टेक्नॉलॉजीकल यूनिवर्सिटी, साउथ फिल्ड, डेट्रॉईड यांनी पवार साहेब यांना मानवतेची मानस “डॉक्टरेट” ही पदवी बहाल केली.
 • २०१७ मध्ये पवार साहेब यांना पद्य विभूषण भारतीय प्रजासत्ताकाचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मानित केले गेले.

शरद पवार यांच्या बद्दल काही कमी ज्ञात तथ्य

 • २००५  मध्ये पवार साहेब यांनी बीसीसीआयचे अध्यक्ष स्थान भूषवले.
 • शरद पवार हे बारामती पासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या काटेवाडी गावाचे रहिवासी आहे.
 • पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे या सुद्धा एक प्रसिद्ध राजकारणी आहे.
 • शरद पवार यांचे लहान भाऊ प्रताप गोविंदराव पवार हे प्रभावी मराठी दैनिक सकाळ चालवतात.
 • २०१७ मध्ये शरद पवार यांना पद्य विभूषण भारतीय प्रजासत्ताकाचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मानित केले गेले.
 • २०१० मध्ये शरद पवार यांना आयसीसीचे अध्यक्ष बनवले गेले.

शरद पवार यांना कर्करोग झाला

गुटखा चघळण्याच्या सवयीमुळे १९९९ मध्ये शरद पवार यांना तोंडाचा कर्करोग झाल्याचे निदान डॉक्टरांनी सांगितले. एप्रिल २००४ मध्ये शरद पवार यांच्या तोंडाची शस्त्रक्रिया करण्यात आली व यानंतर मार्च २०२१ मध्ये शरद पवार यांच्या पित्ताशयाच्या समस्येवर सुद्धा शस्त्रक्रिया करण्यात आली.

शरद पवार यांची चरित्रे आणि आत्मचरित्र

 • शरद पवार यांचे ’लोक माझे सांगाती’ नावाचे मराठी आत्मचरित्र आहे.
 • साहेब (शरद पवार चरित्रग्रंथ), लेखक व संपादक – सोपान गाडे
 • Sharad Pawar – A Mass Leader (लेखक – दीपक बोरगावे)
 • लोकनेते शरदराव पवार (लेखक – राम कांडगे)

शरद पवार यांचे नेटवर्थ

नेटवर्थ
रु. ३२.१६ कोटी (२०१४ मध्ये)
पगार रु. १००,००० + मतदारसंघ भत्ता
४५,००० + संसद कार्यालय भत्ता
४५,००० + संसद अधिवेशन भत्ता
२००० प्रतिदिन

शरद पवार यांचा व्हिडीओ

शरद पवार यांच्याबद्दल थोडक्यात माहिती

 • शरद गोविंदराव पवार, महाराष्ट्रातील बारामती येथील एक लोकप्रिय नेते. ज्यांनी साठ वर्षांहून अधिक काळ सामाजिक क्षेत्रात काम केलं, तर काही नेत्यांच्या वयापेक्षाही जास्त वर्षांचा अनुभव पवार साहेबांजवळ आहे. महाराष्ट्राच्या प्रादेशिक राजकारणाबरोबरच, त्यांचे भारतीय राजकारणातही महत्त्वाचे स्थान आहे. आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत, पवार यांनी तीन वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद जबाबदारीने सांभाळले. तसेच भारत सरकारमध्ये संरक्षण मंत्री आणि कृषिमंत्री पद देखील भूषवले.
 • पवारांचा जन्म १२ डिसेंबर १९४० रोजी पुणे जिल्ह्यातील बारामती येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव पवार आणि आई शारदाबाई पवार. गोविंदराव बारामती सहकारी खरेदी विक्री संघामध्ये दीर्घकाळासाठी कार्यरत होते. १९३७ ते १९५२ या काळात शारदाबाई पवार सलग तीन वेळा जिल्हा स्थानिक मंडळावर निवडून आल्या होत्या. त्या सुद्धा अवघ्या २७ व्या वर्षी निवडणूक जिंकल्या होत्या.
 • राजकारणाचे बाळकडू शरद पवार यांना त्यांच्या घरातून लहानपणापासूनच मिळाले, असं म्हणायला काहीच हरकत नाही. बारामती मधूनच त्यांनी त्यांचा शालेय शिक्षण पूर्ण केले. उच्च शिक्षण घेण्यासाठी ते पुणेला गेले अभ्यासात ते सामान्य होते, परंतु विद्यार्थी राजकारणात त्यांचा सक्रिय सहभाग असायचा.
 • १९५६ साली शाळेत शिकत असताना, त्यांनी गोवा मुक्ती सत्याग्रहाला पाठिंबा देण्यासाठी एका विद्यार्थी रॅलीचे आयोजन केले होते. येथून त्यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात झाली. त्यानंतर कॉलेजमध्ये असताना विद्यार्थी संघटनेचे नेते म्हणूनही ते कार्य करत राहिले. विद्यार्थी संघटनेच्या एका समारंभासाठी, महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण उपस्थित होते. त्यावेळी पवारांनी केलेल्या भाषणामुळे, यशवंतराव चव्हाण अतिशय प्रभावी झाले.
 • त्यानंतर चव्हाण यांच्या सांगण्यावरून पवारांनी युवक काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांनी पवारांच्यातील राजकीय नेता ओळखला आणि त्यानंतर पवार त्यांचे शिष्य बनले. वयाच्या २४ व्या वर्षी ते महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले. त्यानंतर यशवंतराव चव्हाण यांचा राजकीय वारसदार म्हणून पवारांकडे पाहिले जाऊ लागले.
 • राजकारणाबरोबरच क्रिकेट हे देखील पवारांच्या आवडीचे क्षेत्र. २०१० रोजी त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारली. यांच्यानंतर आयसीसीचे अध्यक्षपद भूषवणारे ते दुसरे भारतीय आहेत.

FAQ

१. शरद पवार यांचा जन्म किती साली झाला?

शरद पवार यांचा जन्म दिनांक १२ डिसेंबर १९४० रोजी महाराष्ट्र राज्यामध्ये बारामती जिल्ह्यातील श्री गोविंदराव पवार व श्रीमती शारदाबाई पवार यांच्या कुटुंबामध्ये झाला.

२. शरद पवार किती वेळा मुख्यमंत्री होते?

शरद पवार त्यांच्या आयुष्यामधील ५५ वर्षापासून महाराष्ट्राचा राजकारणामध्ये सक्रिय आहे. शरद पवार चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून निवडून आले. शरद पवार यांनी केंद्रामध्ये कृषी आणि संरक्षण मंत्री म्हणून भूमिका बजावली.

३. कोण आहेत शरद पवार ?

शरद गोविंदराव पवार, महाराष्ट्रातील बारामती येथील एक लोकप्रिय नेते. ज्यांनी साठ वर्षांहून अधिक काळ सामाजिक क्षेत्रात काम केलं, तर काही नेत्यांच्या वयापेक्षाही जास्त वर्षांचा अनुभव पवार साहेबांजवळ आहे. महाराष्ट्राच्या प्रादेशिक राजकारणाबरोबरच, त्यांचे भारतीय राजकारणातही महत्त्वाचे स्थान आहे. आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत, पवार यांनी तीन वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद जबाबदारीने सांभाळले. तसेच भारत सरकारमध्ये संरक्षण मंत्री आणि कृषिमंत्री पद देखील भूषवले.

४. पवार यांचे राजकीय गुरु कोण आहे ?

महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण उपस्थित होते. त्यावेळी पवारांनी केलेल्या भाषणामुळे, यशवंतराव चव्हाण अतिशय प्रभावी झाले.
त्यानंतर चव्हाण यांच्या सांगण्यावरून पवारांनी युवक काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांनी पवारांच्यातील राजकीय नेता ओळखला आणि त्यानंतर पवार त्यांचे शिष्य बनले.

५. शरद पवार यांना किती अपत्य आहे ?

लग्नापूर्वी त्यांची पत्नी प्रतिभा पवार यांना एकच मूल असावे अशी अट त्यांनी त्यांच्यासमोर ठेवली. ते म्हणाले होते, आम्हाला एकच मूल होईल, मग तो मुलगा असो वा मुलगी. यानंतर सुप्रियाचा जन्म दि. ३० जून १९६९ मध्ये पुण्यात झाला.

६. महाराष्ट्रातील सर्वात तरुण मुख्यमंत्री कोण ?

शरद पवार यांनी ३८ व्या वर्षी मुख्यमंत्री पदाची शपथ घेत, महाराष्ट्रातील सर्वात तरुण मुख्यमंत्री बनण्याचा किताब त्यांनी पटकावला.

निष्कर्ष

मित्रहो, आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणस महाराष्ट्राचे प्रसिद्ध राजकीय नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बद्दल माहिती दिली आहे. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. लेख आवडल्यास तुमच्या इतर मित्रपरिवारांसोबत नक्की शेयर करा. धन्यवाद.

Leave a comment