आशा भोसले मराठी माहिती | Asha bhosle information in marathi

आशा भोसले ह्या एक प्रसिद्ध गायक असून, त्यांची कारकीर्द सहा दशकांहून अधिक काळ भारतीय संगीत क्षेत्रामध्ये राहिली. आशा भोसले यांनी विविध भाषांमध्ये हजारो गाणी,गझल, भजने, शास्त्रीय संगीत आणि काही विशेष लोकगीते गाऊन, लोकांच्या मनात स्वतःचे स्थान निर्माण केले.

आपल्या गाण्यांनी व मधुर आवाजाने लाखो हृदयांवर राज्य करणाऱ्या व संगीत क्षेत्राला स्वतःचे प्रचंड योगदान देणाऱ्या, श्रीमती आशा भोसले या भारताच्या गान कोकिळा आहे.

आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास या प्रसिद्ध पार्श्वगायिका, “आशाताई भोसले” यांच्या बद्दल माहिती दिलेली आहे. हा लेख जाणून घेण्यासाठी, माहिती शेवटपर्यंत पूर्ण वाचा.

Table of Contents

आशा भोसले मराठी माहिती Asha Bhosle Information In Marathi

मूळ नाव आशा भोसले
जन्म तारीख दि. ०८ सप्टेंबर१९३३
जन्म स्थळ सांगली, महाराष्ट्र
व्यवसायभारतीय पार्श्वगायक
गुरुदीनानाथ मंगेशकर (वडील)
राष्ट्रीयत्वभारतीय
धर्महिंदु
वैवाहिक स्थितीविवाहित
संपत्ती १० दशलक्ष (२०१६ मध्ये)

आशा भोसले यांचे प्रारंभिक जीवन

Asha bhosle information in marathi
  • दिनांक ०८ सप्टेंबर १९७३ रोजी लता मंगेशकर यांच्या लहान भगिनी आशाताई भोसले यांचा जन्म महाराष्ट्रामधील सांगली शहरातील, गोहर ह्या एका छोट्याशा गावात झाला. आशाताईंचा जन्म एका संगीतमय कुटुंबामध्ये झाला असून, त्यांचे वडील मास्टर दिनानाथ मंगेशकर हे एक प्रसिद्ध अभिनेता व संगीतकार होते. ते मराठी भाषिक गोमंतक मराठा समाजामधील होते, आणि मराठी संगीत मंचावरील एक प्रसिद्ध शास्त्रीय संगीतकार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात असे.
  • आशाताई फक्त नऊ वर्षाच्या असतानाच, त्यांचे वडील दीनानाथ मंगेशकर यांचे निधन झाले. त्यानंतर आशाताईंचे कुटुंब कोल्हापूर यानंतर, पुणे व नंतर मुंबईमध्ये स्थलांतरित झाले.
  • आशाताई व त्यांच्या मोठ्या बहिणी म्हणजेच लता मंगेशकर यांनी कुटुंबाला आर्थिक मदत करण्यासाठी, चित्रपटांमध्ये गाणे गाण्याचे व अभिनय करण्याचे प्रयत्न सुरू ठेवले व त्या क्षणापासून आशाताई व लता मंगेशकर यांच्या गाण्याच्या कारकिर्दीला सुरुवात झाली.आशा जी तथा त्यांच्या सर्व बहिणींना मास्टर दिनानाथ मंगेशकर यांनी संगीताचे शिक्षण प्रदान केले.

आशा भोसले यांची कौटुंबिक माहिती

वडिलांचे नाव दीनानाथ मंगेशकर (अभिनेता)
आईचे नाव शेवंती मंगेशकर
भावंडे हृदयनाथ मंगेशकर , लता मंगेशकर (मोठी बहीण), उषा मंगेशकर आणि मीना खडीकर (लहान बहीण)
पतीचे नाव गणपतराव भोसले (१९४९-१९६०) 
आर डी बर्मन (१९८०-१९९४ मृत्यूपर्यंत)
अपत्ये हेमंत भोसले, आनंद भोसले, वर्षा भोसले
सासरे एसडी बर्मन

आशा भोसले यांचे वैयक्तिक जीवन

  • वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी आपल्या कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध जाऊन, ३१ वर्षीय गणपतराव भोसले यांच्यासोबत लग्न केले, गणपतराव भोसले हे आशाताईंची बहिण लता मंगेशकर यांचे सचिव होते. परंतु हे लग्न यशस्वी ठरले नाही. आशाताईंनी व गणपतराव भोसले यांनी घटस्फोट घेतला.
आशाताई आर डी बर्मन
  • त्यादरम्यान आशाताई यांना हेमंत, आनंद व वर्षा भोसले ही अपत्ये झाली.
  • यानंतर आशाताई पार्श्वगायिका म्हणून काम करतच राहिल्या. तेव्हा त्यांची भेट आर.डी.बर्मन यांच्यासोबत झाली. त्यानंतर त्यांच्यात मैत्रीचे संबंध वाढू लागले. १९८० मध्ये आशाताईंनी आर.डी बर्मन यांच्यासोबत लग्न केले. १९९४ मध्ये आर डी बर्मन यांचा मृत्यू झाला.
  • आशाताईंना स्वयंपाकाची प्रचंड आवड होती. त्यांनी दुबई, युके, तसेच कुवेत इत्यादी देशांमध्ये रेस्टॉरंट चालू करून, ते यशस्वीरित्या रेस्टॉरंट चालवतात. त्या अनेकदा म्हणाल्या की, त्या गायिका नसत्या, तर त्या एक उत्तम स्वयंपाकी बनल्या असत्या.

आशा भोसले यांचे वर्णन

उंची५ फूट २ इंच
वजन६४ किलोग्रॅम (अंदाजे )
केसांचा रंगकाळा
डोळ्यांचा रंगकाळा

आशा भोसले यांच्या आवडी-निवडी

आवडती अभिनेत्रीमधुबाला
आवडते ठिकाणऐतिहासिक स्थळे
छंदस्वयंपाक, गाणे, ऐकणे आणि वाचणे
आवडता रंगकाळा, सफेद
आवडता गायकलता मंगेशकर, मोहम्मद रफी, किशोर कुमार, शर्ली बसे, फ्रँक सिनात्रा
आवडता अभिनेताराज कपूर
आवडता खाद्यपदार्थमच्छी

आशा भोसले यांची गायन कारकीर्द

  • आशा भोसले यांनी १९४८ मध्ये गायनाची सुरुवात केली. त्यांनी “चुनरिया” या चित्रपटांमधून सर्वप्रथम गायनात पदार्पण केले. त्यांनी चुनरिया या पिक्चरमध्ये “सावन आया” या गाण्याचे सादरीकरण केले. या गाण्यानंतर आशा ताईच्या मधुर आवाजामुळे त्यांना प्रसिद्धी मिळू लागली.
  • आशाताईंनी सुरुवातीला अगदी कमी बजेटच्या हिंदी चित्रपटांसाठी, गाणी गाऊन आपल्या गायन कारकर्दीला सुरुवात केली. त्यांच्या बहुतेक गाण्यांची सुरुवात ही व्हॅम्प, कॅबरे नंबर किंवा सी-ग्रेड चित्रपटांसारख्या भूमिकेंसाठी होती. आशाजींनी गायन कारकिर्दीमध्ये खूप कष्ट घेतले.
  • आशाताईंच्या मधुर व मनमोहक आवाजाने, संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीमध्ये जादू चालवली. यासोबतच त्यांना त्यांच्या कारकीर्दीला यशाची साथ प्राप्त झाली. १९५३ मध्ये आशाताईंनी “परिणीता” चित्रपटासाठी तर, १९५४ मध्ये “बूट पॉलिश” त्यानंतर, १९५६ मध्ये “सीआयडी” तर १९५८ मध्ये “नया दौर” सारख्या चित्रपटांसाठी सुपरहिट गाणी गायली व त्या गाण्यांची नोंद सुद्धा केली गेली.
  • यानंतर आशाताईंनी “उडे जब जब जुल्फे तेरी”, “मांगके साथ तुम्हारा” यांसारख्या सुपरहिट गाण्यांद्वारे संगीत क्षेत्रामध्ये स्वतःची छाप रसिकांच्या मनात उमटवण्यास सुरुवात केली. यानंतर आशाताईंनी “दिवाना हुआ बादल”, “आओ हुजूर तुमको”, “ये दिल मेहरबान” यांसारखी सुपरहिट गाणी गाऊन लोकांना आश्चर्यचकित करून सोडले.
आशाताई लतादीदी
  • यानंतर आशाताईंनी १९७४ मध्ये “प्राण जाये पर वचन ना जाये” या चित्रपटासाठी “चैन से”  हे गाणे गाऊन एक उत्तम रेकॉर्ड स्वतःच्या नावे नोंदवला. आशाताईंच्या गाण्यांच्या भरघोस यशानंतर त्यांनी एस.डी बर्मन सारख्या प्रसिद्ध संगीत दिग्दर्शकांच्या मार्गदर्शनाने गाण्याची सुरुवात केली.
  • आशाताई व एस.डी बर्मन यांनी काला बाजार, इंसान जाग उठा, काला पानी, लाजवंती, सुजाता, तीन देवीया, यांसारख्या चित्रपटांसाठी अनेक हिट साऊंड ट्रॅक बनवले. यातील सर्वात प्रसिद्ध गाणी आशाताई व मोहम्मद रफी तसेच किशोर कुमार यांनी एकत्र गायली आहेत.
  • १९६० च्या मध्यामध्ये आशाताई यांना आर.डी बर्मनची मदत प्राप्त झाली व त्या काळात त्या यशाच्या शिखरावर जाऊन पोहोचल्या. १९६६ मध्ये प्रदर्शित झालेल्या “तिसरी मंजिल” या चित्रपटांमधून आशाताईंना प्रचंड प्रसिद्धी प्राप्त झाली. या चित्रपटांमध्ये आशाताई व आर.डी बर्मन यांनी गायलेल्या गीतांनी आशाताई व आर.डी बर्मन हे अगदी चांगले मित्र झाले.
  • आशाताईंचा यशाचा पल्ला हा अगदी शिगेला पोहोचला होता. त्यानंतर त्या काळातील सर्वात सुंदर नर्तकांपैकी एक असणाऱ्या हेलनच्या आवाजासाठी आशा भोसले यांची निवड करण्यात आली.
  • आशा भोसले यांनी हेलन साठी गायलेल्या काही सुपरहिट गाण्यांच्या यादीमध्ये, १९६६ मध्ये प्रदर्शित झालेल्या “तिसरी मंजिल” चित्रपटातील “ओ हसीना जुल्फो वाली” या गाण्याने तसेच “कारवा” चित्रपटांमधील “पिया तू अब तो आजा” या गाण्यांनी हेलनला तसेच आशाजींना प्रसिद्धी प्राप्त झाली. १९७८ मध्ये “डॉन” चित्रपटातील “ये मेरा दिल” हे गाणे तर, १९७२ मधील “जवानी दिवानी” चित्रपटातील “जा जाने जाना” या गाण्याने आशाताईंना लोकप्रियता प्राप्त झाली.
  • हरे राम हरे कृष्ण, चित्रपटातील “दम मारो दम” हे गाणे आशाजींच्या नवीन प्रतिभेचा पैलू होते. यामध्ये आशा ज्यांच्या लो पीच पासून ते हाय पिचपर्यंत गाणे म्हणण्याची कला लोकांपर्यंत पोहोचली. याशिवाय अनेक हिट गाणी देऊन आशाजींनी आपल्या आवाजाने लोकांना मंत्रमुग्ध केले.
आशा भोसले
  • आशाताईंनी देशभक्ती पासून ते गझल व रोमँटिक गाण्यांपर्यंत सर्व प्रकारच्या गाण्यांद्वारे, समीक्षकांना त्यांच्या विरोधावर चुकीचे सिद्ध केले. एकदा महान संगीतकार यांनी आशाताईंना नेहमीपेक्षा दोन नोट कमी गाण्यात सांगितले, म्हणून त्यांनी त्याकडे लक्ष दिले आणि आपली गायन शैली मजबूत केली. याचा असा परिणाम झाला की, आशाताईंची गाणी आजपर्यंत मोठ्या अभिमानाने व आदराने गायली जातात.
  • १९९० च्या दशकामध्ये आशाजींनी ए.आर.रहमान, अनु मलिक, यांसारख्या तरुण संगीत दिग्दर्शकांसोबत याई रे, चोरी पे चोरी, तन्हा तन्हा, यांसारखी सुपरहिट गाणे गायली.
  • त्याच कारकिर्दीमध्ये आशाताईंच्या मोठ्या बहिण लता मंगेशकर यांनी सुद्धा स्वतःच्या आवाजाने संपूर्ण रसिक प्रेक्षकांच्या मनात एक दबदबा निर्माण केला होता. परंतु अशा ज्यांनी सुद्धा स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करण्यास सुरुवात केली व त्यांनी ती निर्माण सुद्धा केली.
  • पाश्चात्य पॉप, कॅब्रे, शास्त्रीय, गझल, यांसारख्या शैलीमधून आशाताईंनी गाणे गाण्यास सुरुवात केली.

आशा भोसले यांची बंगाली कारकीर्द

  • आशाताई भोसले यांनी १९५८मध्ये एच.एम.व्ही. या बॅनरखाली बंगाली भाषेमध्ये पहिले गाणे गायले. मन्ना डे यांनी लिहिलेले, विनोद चट्टोपाध्याय यांच्यासोबत आशाताई भोसले यांनी हे गाणे सादर केले. “गुंजो डोलोजी भरमार”, “चोखे नाम ब्रिस्ती” व “गुण गुण गुंजे” इत्यादी. बंगाली भाषेतील आशा भोसले यांनी गाणी गायली.
  • १९७० च्या दशकामध्ये आशाताईंनी अनेकदा सुधीर दास गुप्ता, नचिकेता घोष, आरटीसी यांनी लिहिलेल्या बंगाली गाण्यांसाठी स्वतःचा आवाज दिला.
  • १९७५ मध्ये आशा भोसले यांनी आनंद आश्रमात किशोर कुमार सोबत जुगलबंदी केली. यानंतर त्यांनी बंगाली चित्रपटांमध्ये स्वतःचा आवाज दिला. १९८० च्या दशकामध्ये आशाताईंनी बंगालीमध्ये “कुंज बिहारी है गिरिधारी” हे भजन गाऊन, लोकांना मंत्रमुग्ध केले. अशा प्रकारे एका मागून एक बंगाली भाषेत सुपरहिट गाणे गाऊन, आशाताई भोसले स्वतःची लोकप्रियता निर्माण केली.

आशा भोसले यांची मराठी कारकीर्द

  • १९४३ मध्ये आशाताई भोसले यांनी “माझं बाळ” या मराठी चित्रपटासाठी पहिले गीत गायले. मराठी भाषेतील गाण्यांमध्ये आशाताई भोसले यांची नुकतीच सुरुवात होती. त्यामुळे त्यांना फारशी प्रसिद्धी प्राप्ती झाली नाही. परंतु “गोकुळचा राजा” पौराणिक चित्रपटातून, आशाताईंनी मराठी पार्श्वगायन सुरू केले/ त्यानंतर एका मागून एक मराठी भाषेमध्ये आशाताईंनी अनेक गाणे गायली. ज्यामध्ये चित्रपट गीते, भावपूर्ण गाणी, यांचा समावेश आहे.
  • आशाताई भोसले यांचे वडील मास्टर दिनानाथ मंगेशकर यांचे नाट्य संगीत हे मराठी संगीत नाटक आशा भोसले यांच्या आवाजात ध्वनिमुद्रित झाले होते. १९५० ते १९६० च्या दशकामध्ये आशा व त्यांच्या मोठ्या बहिणी लताताई मंगेशकर ह्या मराठी चित्रपटांमध्ये प्रमुख पार्श्वगायिका बनल्या.
  • आशाताई भोसले यांनी मराठी चित्रपटामध्ये आपला मधुर आवाज दिला. ज्यामध्ये मोलकरीण, जैत रे जैत, घरकुल, देवबाप्पा सांगते ऐका, सिंहासन, सामना, मराठा तितूका मिळवावा इत्यादी चित्रपटांचा समावेश आहे.
  • या चित्रपटांशिवाय आशाताई भोसले यांनी श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेली काही मराठी भक्ती गीते ही गायली. अशाप्रकारे आशाताईंनी मराठी चित्रपटसृष्टीमध्ये स्वतःचा दबदबा निर्माण केला.

आशाताई यांना मिळालेले पुरस्कार आणि यश

२००१ मध्ये आशाताई भोसले यांना भारत सरकारच्या मार्फत “दादासाहेब फाळके पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात आले.

यानंतर २००८ मध्ये भारत सरकारने आशाताई भोसले यांना पद्यविभूषण हा राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविले.

तसेच आशाताईंनी मध्य प्रदेश व महाराष्ट्र सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार व इतर पुरस्कार प्राप्त करून स्वतःची ओळख निर्माण केली.

आशाताई यांना फ़िल्मफ़ेयर सर्वश्रेष्ठ महिला पार्श्वगायक पुरस्कार मिळाला.

वर्ष चित्रपट गाणे
१९७४प्राण जाए पर वचन न जायेचैन से हमको कभी
१९७२हरे राम हरे कृष्णादम मारो दम
१९६६दस लाखगरीबों की सुनो
१९७८डॉनये मेरा दिल
१९७३नैनाहोने लगी हैं रात
१९७१कारवांपिया तू अब तो आजा
१९६८शिकारपरदे में रहने दो

आशाताई यांना मिळालेले आईफा अवार्ड्स

२००२ लगानराधा कैसे न जले

आशाताई यांना मिळालेले विशेष पुरस्कार

१९९५रंगीला विशेष पुरस्कार


आशाताई यांना मिळालेले राष्ट्रीय फिल्म पुरस्कार

१९८६इजाज़तमेरा कुछ समान
१९८१उमराव जानदिल चीज़ क्या है


आशाताई यांना मिळालेले लाइफटाइम अचीवमेंट पुरस्कार

२००१फिल्मफेयर लाइफटाइम अचीवमेंट पुरस्कार

आशा भोसले यांचे अल्बम आणि कॉन्सर्ट

  • १९७० ते ८० च्या दशकामध्ये प्रमुख संगीतकार-गीतकार गुलजार जी व आर डी बर्मन यांच्या नावाचा समावेश आहे. अशा प्रसिद्ध गीतकारा सोबत १९८७ मध्ये आशाजींनी दुहेरी अल्बम बनवला.
  • यानंतर आशाताईंनी १९७७ मध्ये संगीतकार लेस्ली लुईस यांच्या मदतीने “जानम समजा करो” हा इंडी पॉप अल्बम प्रकाशित केला. या अल्बमला लोकांकडून प्रचंड प्रसिद्ध प्रतिसाद मिळून, हा अल्बम पुरस्कारासाठी पात्र ठरला
  • २००२ मध्ये आशाताईंनी “आपकी आशा” या वैयक्तिक अल्बमसाठी एक टीम तयार केली. ज्याचे गीत प्रसिद्ध मजरूह सुलतानपूरी यांनी लिहिले होते.
  • २००० मध्ये आशाताईंनी राहुल आणि मी हा अल्बम रिलीज केला. जो आर डी बर्मन यांच्या कलाकृतीचा एक संग्रह होता.
  • आशाताईंनी स्वतःच्या काही अल्बम मध्ये, अनेक मोठ्या संगीतकारांच्या मदतीने गाणी गायली. त्यातली अनेक गाणी अदनान सामी सोबत त्यांनी गायली, त्यापैकी एक गाणे होते “कभी तो नजर मिलाओ”.
  • आशा भोसले केवळ हिंदुस्तानी शास्त्रीय दिग्गज अली अकबर खान यांच्या सोबतच नाही, तर गुलाम अली, मेहंदी हसन व जगजीत सिंग यांसारख्या भारत आणि पाकिस्तान मधील प्रत्येक प्रमुख गझलकार कलाकारांसोबत सुद्धा काम केले.
  • आशाताई भोसले यांनी फक्त भारतातच नव्हे तर, परदेशामध्ये सुद्धा संगीतकारकासोबत त्यांचे संगीत सादर करण्यासाठी जगभर दौरा केला.
  • यु.एस मधील तेरा शहरांमध्ये वीस दिवसात त्यांनी त्यांचा उत्तम परफॉर्मन्स दिला. स्टॉकहोम, दुबई, लंडन, कॅनडा व इतर देशांमध्ये त्यांनी प्रसिद्ध गाणी गायली.
  • २०१४ मध्ये आशाताईंचे पती राहुल देव बर्मन यांच्या ७५ व्या जयंतीनिमित्त “पंचम तुम कहां ” हा अल्बम त्यांनी बनवला. ह्या अल्बम मध्ये त्यांनी आठ गाणी गायली. जी आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केली.
  • २००६ मध्ये आशा भोसले यांनी क्रिकेटर ब्रेटली सोबत एक गाणे गायले.

आशा भोसले यांच्यावरील लेख असलेली पुस्तके

  • मंगेशकर – स्वरांचा कल्पवृक्ष (प्रभाकर तांबट)
  • खय्याम (विश्वास नेरुरकर)
  • नामांकित (डाॅ. अनघा केसकर)
  • सुरा मी वंदिले (कृष्णकुमार गावंड)
  • आशा भोसले : नक्षत्रांचे देणे (संपादक – वामन देशपांडे, मोरया प्रकाशन)

आशा भोसले यांची प्रसिद्ध गाणी

  • पिया तू अब तो आजा
  • उडे जब जब जुल्फे तेरी
  • आईये मेहरबा
  • शरारा
  • चुरालीया हे तुमने जो दिल को
  • केहदु तुम्हे
  • प्यार करने वाले कभी मरते नही
  • राधा कैसे न जले
  • चेहरा क्या देखते हो
  • जवानी जानेमन हसीन दिलरुबा
  • ओ मेरे सोना रे सोना

आशा भोसले यांच्या नावे पुरस्कार

चित्रपट संगीतात लक्षणीय कामगिरी करणाऱ्या पार्श्वगायकास, अखिल भारतीय नाट्य परिषद (पिंपरी चिंचवड शाखा) आणि काही अन्य संस्थांच्या वतीने आशा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त, २००२ सालापासून आशा भोसले पुरस्कार दिला जातो.

या पुरस्काराचे स्वरूप एक लाख अकरा हजार रुपये रोख व एक स्मृती चिन्ह असे आहे. हा पुरस्कार लता मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर, रवींद्र जैन, शिवकुमार शर्मा, लक्ष्मीकांत प्यारेलाल जोडीतले प्यारेलाल, सुरेश वाडकर, कल्याणजी आनंदजीमधले आनंदजी, बप्पी लाहिरी,  हरिहरन, शंकर महादेवन, संगीतकार खय्याम, अन्नू मलिक, आणि सोनू निगम यांना २०१३ सालापर्यंत मिळाला आहे.   

आशा भोसले यांच्याशी संबंधित वाद

  • एकेकाळी बॉलीवूड गायक हिमेश रेशमिया ह्या सुरत मध्ये एका कार्यक्रमादरम्यान आशाजीचे पती आरडी बर्मन यांना भेटला. त्यांच्या गायन शैलीवर हिमेश रेशमिया यांनी असे मत व्यक्त केले की, ते नाकातून गातात. त्यामुळे आशाताई ह्या प्रचंड नाराज झाल्या.
  • त्यानंतर बर्मन यांच्या मृत्यूनंतर, आशाताईंनी अशी प्रतिक्रिया दिली की, त्या म्हणाल्या आर डी बर्मन यांच्या बद्दल कोणी म्हणेल की ते नाकातून गातात, तर त्यांच्या तोंडात मारली पाहिजे.

आशा भोसले यांच्याबद्दल काही मनोरंजक तथ्ये

  • आशा भोसले यांनी हिंदी, मराठी, बंगाली, तेलुगू, तामिळ, इंग्रजी अशा जवळपास 20 भारतीय आणि परदेशी भाषांमध्ये गाणी गायली आहेत. एक हजारपेक्षा जास्त चित्रपटांसाठी त्यांनी गाणी गायली आहेत. भजन असो वा गझल, लोकगीत असो किंवा लावणी, कव्वाली, युगुलगीत, उडत्या चालीची गाणी, पाश्चिमात्य पद्धतीची अशी वेगवेगळ्या धाटणीची गाणी त्यांच्या गळ्याला शोभतात.
  • आशा भोसले यांना जळगाव विद्यापीठ, जोधपुर राष्ट्रीय विद्यापीठ, अमरावती विद्यापीठ कडून मानद पदव्या प्राप्त झाल्या आहेत.
  • अकरा वर्षांच्या संसारानंतर 1960 मध्ये दोघं विभक्त झाले. गणपतराव भोसलेंपासून वेगळं झाल्यानंतर आशा भोसले यांनी संगीतकार राहुल देव बर्मन अर्थात आर डी बर्मन उर्फ पंचमदा यांच्यासोबत 1980 मध्ये लग्न केलं. आर डी बर्मन हे आशा भोसलेंपेक्षा सहा वर्षांनी लहान होते. तर आरडी यांचंही हे दुसरं लग्न होतं. 1994 मध्ये पंचमदा यांचं निधन झालं.
  • आशाताई भोसले यांची मुलगी वर्षा हिने दि. ८ ऑक्टोंबर २०१२ रोजी आत्महत्येचा प्रयत्न केला होता.
  • 1997 मध्ये उस्ताद अली अकबर खान यांच्यासह ‘लिगसी’ अल्बमसाठी ‘ग्रॅमी’ पुरस्काराचं नामांकन मिळालेल्या आशा भोसले या पहिल्या भारतीय ठरल्या होत्या.
  • आतापर्यंत आशाताई भोसले यांनी बारा हजार पेक्षा जास्त गाणी गायली आहेत.
  • रेकॉर्डिंगच्या वेळी हेलन आशाताईंना भेटून गाण्याची भावना समजून घ्यायची व त्यानुसार त्यांची कोरिओग्राफी करत असे.
  • ब्रिटनच्या अल्टरनेटिक रॉक बॅण्डने ‘ब्रिमफुल ऑफ आशा’ 1997 मध्ये रिलीज केलं होतं. आशा भोसलेंना डेडिकेट केलेलं गाणं आंतरराष्ट्रीय स्तरावर हिट झालं होतं.
  • आशाताईंची मोठी बहीण लता मंगेशकर जी लहानपणापासून आशाताईंच्या प्रचंड जवळ आहेत.
  • आशा भोसले यांना मिमिक्रीचीही आवड आहे. लता मंगेशकर आणि गुलाम अली यांच्या आवाजाची त्या हुबेहुब नक्कल करतात.
  • सध्या आशाताई तिच्या नातीला म्हणजेच जनाईला प्रशिक्षण देत आहे व माई या मराठी चित्रपटातून जनाईने तिच्या गाण्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली आहे.
  • दुबई आणि कुवेतमध्ये ‘आशाज’ नावाची रेस्टॉरंट्स आहेत. इथे पारंपरिक उत्तर आणि पश्चिम भारतीय जेवण मिळतं. याशिवाय अबुधाबी, दोहा, बहरीनमध्येही त्यांची रेस्टॉरंट्स आहेत.
  • २०१३ मध्ये आशाताईंनी चित्रपटामध्ये काम करण्यास सुरुवात केली व माई या मराठी चित्रपटांमध्ये आशाताईंनी आईची भूमिका साकारली आहे.
  • आशा भोसले यांनी सुरुवातीला ‘आजा आजा मैं हूँ प्यार तेरा’ या गाण्यासाठी इन्कार दिला होता. पाश्चिमात्य धाटणीचं गाणं त्यांना आव्हानात्मक वाटत होतं.
  • महाराष्ट्र सरकारच्या लता मंगेशकर पुरस्काराने त्यांना 1999 मध्ये गौरवण्यात आलं होतं. तर इंडो-पाक असोसिएशनच्या ‘नाइटिंगल ऑफ एशिया’ पुरस्काराने त्यांना 1987 मध्ये सन्मानित करण्यात आलं होतं.

आशाताई भोसले यांच्या गायनाबद्दल जेवढे कौतुक करावे, तेवढे कमीच आहे. कारण आशाताई या प्रसिद्ध व लोकप्रिय गायिका असून, आशाताईंच्या गाण्यांचे लाखो करोडो लोक ही चाहते आहे. आशाताईंची गाणी लोकांना इतकी आवडतात की, आज सुद्धा आशाजींची गाणी प्रत्येकाच्या ओठावर गायली जातात. आशाताई आपल्या भारतीय चित्रपट सृष्टीमधील एक चमकता तारा आहे. ज्यांना कधीही विसरता येणार नाही. अशा महान व प्रतिभाषाली व्यक्तिमत्त्वास कोटी कोटी नमन.

आशा भोसले यांचा व्हिडीओ

FAQ

१. आशा भोसले यांनी किती लग्न केले?

आशा भोसले यांनी २ वेळा लग्न केले.वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी आपल्या कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध जाऊन, ३१ वर्षीय गणपतराव भोसले यांच्यासोबत लग्न केले, परंतु हे लग्न यशस्वी ठरले नाही. आशाताईंनी व गणपतराव भोसले यांनी घटस्फोट घेतला. १९८० मध्ये आशाताईंनी आर.डी बर्मन यांच्यासोबत लग्न केले.

२. आशा भोसले यांना किती मुले आहेत?

आशा भोसले यांना ३ अपत्य झाली . हेमंत, आनंद व वर्षा भोसले.

३. आशा भोसले का प्रसिद्ध आहेत?

आशा भोसले ह्या एक प्रसिद्ध गायक असून, त्यांची कारकीर्द सहा दशकांहून अधिक काळ भारतीय संगीत क्षेत्रामध्ये राहिली. आशा भोसले यांनी विविध भाषांमध्ये हजारो गाणी,गझल, भजने, शास्त्रीय संगीत आणि काही विशेष लोकगीते गाऊन, लोकांच्या मनात स्वतःचे स्थान निर्माण केले. आपल्या गाण्यांनी व मधुर आवाजाने लाखो हृदयांवर राज्य करणाऱ्या व संगीत क्षेत्राला स्वतःचे प्रचंड योगदान देणाऱ्या, श्रीमती आशा भोसले या भारताच्या गान कोकिळा आहे.

४. आशा भोसले आणि लता मंगेशकर यांचे नाते काय?

आशाताईंची मोठी बहीण लता मंगेशकर जी लहानपणापासून आशाताईंच्या प्रचंड जवळ आहेत.

५. आशा भोसले यांचा जन्म कधी व कूठे झाला ?

दिनांक ०८ सप्टेंबर १९७३ रोजी लता मंगेशकर यांच्या लहान भगिनी आशाताई भोसले यांचा जन्म महाराष्ट्रामधील सांगली शहरातील, गोहर ह्या एका छोट्याशा गावात झाला.

६. आशाताई यांचे गुरु कोण होते ?

आशाताईंचा जन्म एका संगीतमय कुटुंबामध्ये झाला असून, त्यांचे वडील मास्टर दिनानाथ मंगेशकर हे एक प्रसिद्ध अभिनेता व संगीतकार होते. आशा जी तथा त्यांच्या सर्व बहिणींना मास्टर दिनानाथ मंगेशकर यांनी संगीताचे शिक्षण प्रदान केले.

निष्कर्ष

मित्रहो, आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणस प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांच्या बद्दल माहिती दिली आहे. हा लेख तुम्हाला कसा वाटला, हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. लेख आवडल्यास तुमच्या इतर मित्रपरिवारांसोबत नक्की शेयर करा. धन्यवाद.

Leave a comment