सिंधुदुर्ग किल्ला माहिती मराठी : SINDHUDURG FORT INFORMATION IN MARATHI

SINDHUDURG FORT INFORMATION IN MARATHI : सिंधुदुर्ग किल्ला माहिती मराठी : “किल्ला” हा शब्द ऐकताच सर्वप्रथम मराठी माणसाच्या मनामध्ये उभी राहणारी छबी  म्हणजे “श्री छत्रपती शिवाजी महाराजांची”. महाराजांनी निर्माण केलेल्या या त्यांच्या वास्तूंना, त्यांच्या स्मृतींना व महाराजांना कोटी कोटी नमन.

Table of Contents

सिंधुदुर्ग किल्ला माहिती मराठी : SINDHUDURG FORT INFORMATION IN MARATHI

प्रस्तावना

नमस्कार मंडळी, आज आम्ही तुम्हाला एका ऐतिहासिक, प्रसिद्ध व श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या वास्तव्याची अनुभूती करून देणाऱ्या, सिंधुदुर्ग किल्ला अर्थातच मालवण किल्ला ची ओळख, त्याचा इतिहास, छत्रपती महाराजांचा राज्यकारभार व इतर महत्वपूर्ण माहिती (सिंधुदुर्ग किल्ला विषयी माहिती मराठी) तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे.

“सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा ! दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा”

असं म्हणणाऱ्या प्रत्येक महाराष्ट्रीय माणसाला ध्यास असतो तो महाराजांच्या वास्तूंच्या भेटीचा. तळकोकण प्रांतात श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेला किल्ला म्हणजे “सिंधुदुर्ग किल्ला”. या किल्ल्याची पायाभरणी श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी सतराव्या शतकामध्ये केली.

आजच्या सिंधुदुर्ग किल्ला माहिती मराठी या लेखात आपण सिंधुदुर्ग किल्ला इतिहास, सिंधुदुर्ग किल्ल्याची वैशिष्ट्ये, आणि सिंधुदुर्ग किल्ल्याची माहिती जाणून घेणार आहोत. चला तर पाहू SINDHUDURG FORT MARATHI.

मालवण किल्ला माहिती कोष्टक

नावसिंधुदुर्ग किल्ला
उंचीदोनशे फूट
प्रकारजलदुर्ग
चढाईची श्रेणीसोपी
जिल्हासिंधुदुर्ग महाराष्ट्र
शहरमालवण
डोंगररांगसिंधुदुर्ग
सध्याची अवस्थाव्यवस्थित
किल्ल्याची स्थापनाइसवी सन 25 नोव्हेंबर 1664
SINDHUDURG FORT INFORMATION IN MARATHI

सिंधुदुर्ग किल्ला इतिहास (SINDHUDURG FORT HISTORY IN MARATHI)

महाराष्ट्रातील अनेक गड किल्ल्यांपैकी तळकोकणची ओळख असणारा हा सिंधुदुर्ग किल्ला मालवण शहरामध्ये भर समुद्रात अजूनही हा किल्ला डौलाने उभा आहे. या किल्ल्याची पायाभरणी छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. यासाठी श्री छत्रपती महाराजांनी मालवण च्या समुद्रात असणाऱ्या “कुरटे” या बेटाची निवड केली. इंग्रज, पोर्तुगीज, डच ह्यांपासून संरक्षणासाठी महाराजांनी पाण्यामध्ये उभारलेला या किल्ल्याला मालवण किल्ला असेही म्हटले जाते.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये स्वराज्याच्या संरक्षणासाठी आणि आपली संरक्षण व्यवस्त भक्कम करण्यासाठी महाराज वेगवेगळ्या प्रकारचे मार्ग अवलंबत. शिवाजी महाराजांनी तळकोकण पर्यंतच्या संरक्षणासाठी निर्माण केलेला जलदुर्ग म्हणजे सिंधुदुर्ग किल्ला.

सिंधुदुर्ग किल्ला विषयी माहिती मराठी

  • छत्रपती शिवाजी महाराजांनी जंजिऱ्याचा सिद्दी, मुंबईचे इंग्रज, गोव्याचे पोर्तुगीज अश्या परकीय शत्रू च्या बंदोबस्तासाठी या किल्ल्याची उभारणी केली.
  • या किल्ल्याची पायाभरणी २५ नोव्हेंबर १६६४ रोजी प्रथम केली गेली. पायाभरणी चे बांधकाम गोविंद विश्वनाथ प्रभू याने केले.
  • विजयदुर्ग व सिंधुदुर्ग यांच्या बांधणीसाठी महाराजांनी गोवेकरी पोर्तुगीजांकडून स्थापत्य विशारद बोलावले होते.
  • सिंधुदुर्गच्या बंदोबस्तासाठी आजूबाजूच्या किनाऱ्याजवळच पद्मगड, राजकोट व सर्जेकोट यांची बांधणी केलेली आहे. हा किल्ला म्हणजे शिवाजी महाराजांच्या आरमाराचे हे प्रमुख केंद्र होते

इ.स १६६४ मध्ये मालवण जवळील कुरटे नावाचे दगडी बेट महाराजांनी किल्ल्याच्या बांधकामासाठी निवडले. या किल्ल्याच्या तटांची पायाभरणी शिवाजी महाराजांच्या हस्ते झाली. खडकावरती महाराजांनी गणेश मूर्ती, एकीकडे सूर्याकृती, आणि दुसरीकडे चंद्राकृती स्थापन करून त्या जागेची पूजा केली. हा किल्ला बांधण्यासाठी साधारणतः एक कोटी होन खर्ची पडले. होन म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये चालणारे चलन. हा किल्ला बांधण्यासाठी सुमारे तीन वर्षाचा कालावधी लागला आणि १६६७ साली किल्ल्याचे बांधकाम पूर्ण झाले.

किल्ला बांधणीच्या वेळी जवळपास ७०,००० किलो लोखंड आणि ५०० खंडी शिसे यांचा वापर केला गेला. किल्ल्यासाठी लागणारे दगड ही किल्ला परिसरात खाणी खोदून काढले गेले.

ऐतिहासिक सौंदर्य लाभलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याच्या चारही बाजूने अथांग समुद्र आहे. महाराजांच्या आरमारामध्ये या किल्ल्याला फार महत्त्व होते. सिंधुदुर्ग किल्ल्यावर शिवरायांच्या उजव्या हाताचे व डाव्या पायाचे ठसे उमटवलेले आहेत.

मागील काही वर्षात लाटांमुळे किल्ल्याचे काही बुरुज व तटाचा भाग ढासळला आहे. तटबंदीवरुन किल्ल्यात खाली यायचे जिने आहेत. किल्ल्यात एक आडभिंत बांधलेली आहे . त्यात पूर्वी त्या जागी होडी वगैरे गुप्त साधनांची तरतूद करता येत असे व आणीबाणीच्या वेळी सुटका करुन घेण्याची सोय होती. दक्षिणेकडच्या तटाकडे चंद्राकृती आकारात व मऊ रेटचा किनारा आहे. यालाच ‘राणीची वेळ’ किंवा ‘राणीच्या स्नानाची जागा’ म्हणतात.

याशिवाय महादरवाजावरील मोडकळीस आलेला नगारखाना, राजवाड्याचे काही अवशेष दिसतात. इ. स. १७१३ मध्ये हा किल्ला कोल्हापूर संस्थानच्या आधिपत्याखाली आला.

१७६५ मध्ये तो इंग्रजांनी हा किल्ला ताब्यात घेऊन त्याचे नाव फोर्ट ऑगस्टस असे ठेवले होते, परंतु मुंबईच्या इंग्रजांनी तो पुढे कोल्हापूर च्या छत्रपतींना काही अटींवर परत दिला आणि मालवणला वखार घालण्यास परवानगी मिळवली. १८१२ मध्ये कर्नल लायोनेल स्मिथ याने हा किल्ला घेऊन येथील समुद्री लुटारूंचा बंदोबस्त केला.

सिंधुदुर्ग किल्ल्याचे बांधकाम (CONSTRUCTION OF SINDHUDURG FORT IN MARATHI)

  • २५ नोव्हेंबर १६६४ रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदेशानुसार सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बांधकामाला सुरुवात झाली.
  • सुमारे ४८ एकरावर पसरलेल्या कुरटे या बेटावर शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्याच्या तटबंदीच्या पायाभरणीस सुरुवात केली.
  • किल्ल्याच्या तटबंदीची लांबी साधारणतः तीन किलोमीटर आहे.
  • या किल्ल्यावर बुरुजांची संख्या ५२ असून ४५ दगडी जिने आहेत.
  • सिंधुदुर्ग किल्ल्यावर गोड्या पाण्याच्या दगडी विहीरी देखील महाराजांनी गडावरील लोकांसाठी बांधलेल्या आहे. ज्या विहिरींची नावे दूधबाव, साखरबाव, दहीबाव अशी ठेवली आहेत.
  • किल्ल्याच्या तटाच्या बांधणीस ८० हजार होन खर्ची पडले.
  • तटाची उंची ही ३० फूट असून रुंदी १२ फूट आहे.
  • महाराजांनी तटबंदीच्या भिंतीमध्ये ३० ते ४० शौचालयांची त्या काळामध्ये निर्मिती केली असून स्वच्छतेचा संदेश महाराजांनी तेव्हापासून जनतेपर्यंत पोहोचवला आहे.
  • इ.स. १६९५ मध्ये शिवाजी महाराजांचे पुत्र श्री. छत्रपती राजाराम महाराज यांनी शिवाजी महाराजांच्या शंकराच्या रूपातील एका मंदिराची रचना केली.

मालवण सिंधुदुर्ग किल्ला नकाशा (SINDHUDURG FORT LOCATION)

मालवण सिंधुदुर्ग किल्लाचे प्रवेशद्वार पूर्वेस आहे. पाण्यातून मनुष्य या तटाजवळ उतरला की उत्तराभिमुख एक खिंड आहे. या खिंडीतून आत गेले की गडाचा दरवाजा लागतो. महाराजांनी या गडाच्या दरवाजाची निर्मिती गोमुखी केलेली आहे. शत्रूला दरवाज्याच्या जागी प्रवेशद्वार आहे, असे लक्षातच येत नाही. या दरवाजाची निर्मिती ही महाराजांनी भक्कम अशा उंबराच्या फळ्यांपासून केली आहे. उंबराचे लाकूड हे दीर्घकाळपर्यंत टिकते व त्या लाकडाला सागाच्या लाकडाची जोड देऊन असा भक्कम प्रकारचा दरवाजा महाराजांनी निर्माण केला.

छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ल्याच्या पूर्ण बांधकामाची जबाबदारी हिरोजी इंदुलकर यांच्यावर सोपवली. असे मानले जाते की, महाराजांनी किल्ल्यासोबतच एका भुयाराची पण निर्मिती केली होती. हे भुयार समुद्राच्या तळातून जाणारे ८ किमी. लांबीचे आहे. हा भुयारी मार्ग आठ किलोमीटर अंतरावर मालवण पासून ते ओझर पर्यंत आहे. या मार्गाला कोणताही सक्रूतदर्शनी पुरावा उपलब्ध नाही. सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बांधकामासाठी जवळपास 3०० पोर्तुगीज आणि ३ हजार कामगारांनी तीन वर्ष काम केले.

किल्ल्याचा राज्यकारभार (GOVERNANCE OF SINDHUDURG FORT IN MARATHI)

श्री. छत्रपती शिवाजी महाराज या किल्ल्याचा कारभार रायगड वरुन सांभाळत असत. मराठा साम्राज्याचे आरमार स्थापन करण्यात आणि स्वराज्याला बळकटी देण्यात या किल्ल्याचे महत्वपूर्ण योगदान आहे.

आमचा हे लेख देखील नक्की वाचा.

मराठा आरमार (NAVY OF MARATHA EMPIRE IN MARATHI)

छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याच्या आरमाराची सुरुवात ही १६५५ ते १६५६ च्या दारम्याने जावळी ताब्यात घेतल्यानंतर केली. “ज्याचे आरमार त्याचा समुद्र” हे पाहता स्वराज्याचे देखील आरमार असावे, हे स्वराज्याच्या हितासाठी व स्वराज्य बळकटीसाठी खूप महत्त्वाचे आहे हे ओळखून आरमार निर्माणाची सुरुवात झाली. समुद्राच्या वाटेने येणाऱ्या शत्रूला आळा घालण्यासाठी, छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्याची निर्मिती केली. हा जलदुर्ग स्वराज्याच्या संरक्षणामध्ये मध्ये महत्त्वाची भूमिका निभावत होता.

सिंधुदुर्ग किल्ल्याची संरचना

किल्ला बांधला म्हणजे गोष्टी संपत नसतात, केवळ किल्ला बांधतो तो राजा पण भविष्यातील धोक्यांचा अंदाज घेत त्या किल्ल्यातून चोर वाटा तयार करून घेणारा जाणता राजा”. आपल्या महाराष्ट्र भूमीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने असाच एक जाणता राजा होऊन गेला, आणि या जाणत्या राजाने न भूतो न भविष्यती अशा अफलातून किल्ल्यांची व त्या किल्ल्यामधून निघणाऱ्या चोरवाटांची निर्मिती केली. अशाच किल्ल्यांपैकी एक किल्ला म्हणजे “सिंधुदुर्ग किल्ला”.

हा किल्ला अथांग समुद्राच्या मधोमध वसलेला आहे. “हे समुद्रकिनाऱ्या या गडाला तुझा आधार आहे व हे ऐतिहासिक सौंदर्य तू जतन करू शकतोस. माझ्या शिवरायांनी, मावळ्यांना घेऊन उभी केलेली ही वास्तू अखंडपणे उभी राहू दे, हीच तुझ्या चरणी प्रार्थना” असे म्हणत आपण या सिंधुदुर्ग किल्ल्याची माहिती जाणून घेऊ.

छत्रपती महाराज जेव्हा कोकण दौऱ्यावर होते, त्यावेळी मालवणच्या किनारपट्टीवर समुद्रात त्यांना एक काळा ठिपका खुणावत होता, जवळच असलेल्या एका कोळी बांधवाला याबाबत त्यांनी विचारल्यावर त्या कोळी बांधवांनी ते कुरटे बेट असल्याचे महाराजांना सांगितले. ज्या कोळी बांधवांनी महाराजांना ही कुरटे बेट शोधून काढण्यास मदत केली त्या कोळी बांधवांना महाराजांनी गावे इनाम म्हणून दिलीत.

सिंधुदुर्ग किल्ल्यावरती ठिकठिकाणी तोफा ठेवण्याच्या जागा आहेत, बंदुका रोखण्यासाठी तटाला भोके पण आहेत, सैनिकांसाठी पायखाने आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा अविस्मरणीय इतिहास म्हणजे सिंधुदुर्ग किल्ला. असंख्य मावळ्यांच्या मदतीने व कष्टाने या अथांग पसरलेल्या निळ्याभोर समुद्रामध्ये महाराजांनी एक जलदुर्ग निर्माण केला ज्याचे नाव आता सिंधुदुर्ग किल्ला म्हणून प्रसिद्ध आहे.

हे स्थान पर्यटकांचे एक विशेष आकर्षण आहे. सिंधुदुर्ग किल्ला मालवण पासून सुमारे अर्धा मैल समुद्रात आहे. या किल्ल्याला नैसर्गिक सौंदर्य प्राप्त आहे. किल्ल्याच्या आजूबाजूस अथांग अरबी समुद्र असून तो किल्ल्याला एक अनोखे व अलौकिक सौंदर्य प्राप्त करून देतो. त्याचप्रमाणे किल्ल्यावरती असणाऱ्या गोड्या पाण्याच्या विहिरी देखील किल्ल्यामध्ये असणारा एक चमत्कारच म्हणता येईल.

चारही बाजूला खाऱ्या पाण्याचे स्त्रोत असून किल्ल्यावर मात्र असणाऱ्या गोड्या पाण्याला ते खारट करत नाहीत.

मुख्य प्रवेशद्वाराच्या आत गेल्यावर समोरच मारुतीचे मंदिर आहे. त्या मंदिराच्या तिथूनच बुरुजाकडे जाण्याचा मार्ग आहे. बुरुजावर गेल्यानंतर आजूबाजूला सर्वत्र १५ मैलाचा प्रदेश हा सहज व स्पष्ट दृष्टीस पडतो. पश्चिमेकडे जरीमरी मातेचे देऊळ आहे. या किल्ल्यावर आज देखील लोक वस्ती करून राहतात.

“श्री शिवाजी महाराजांचे देवालय व मंडपात महाराजांची इतर कुठेही न दिसणारी बैठी प्रतिमा फक्त सिंधुदुर्ग किल्ल्यावरती विराजमान आहे”. या किल्ल्याचे वैशिष्ट्य असे आहे की हा किल्ला जेव्हा इंग्रजांच्या ताब्यात गेला तेव्हा, इंग्रजांनी या किल्ल्याची नासधूस केली होती. हा किल्ला पुन्हा बांधण्यासाठी वापरलेला चुना आज देखील या किल्ल्यामध्ये आहे, आणि महाराजांच्या काळातील स्मृतींना उजाळा देतो.

सिंधुदुर्ग किल्ल्यावर एक नगारखाना आहे. या नगारखान्यामधून महाराजांच्या काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ध्वनी निर्माण केले जात. छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा राज्यदरबारामध्ये प्रवेश करत त्यावेळी महाराजांच्या स्वागतासाठी एक वेगळ्या प्रकारचा ध्वनी नगारखान्यामधून येत असे. महाराजांचे मावळे राज्यदरबारामध्ये येत असत त्यावेळी त्यांच्यासाठी वेगळ्या प्रकारचा ध्वनी, व तसेच ज्यावेळी शत्रू गडावर किंवा राज्यावर आक्रमण करण्यासाठी येत, त्यावेळी या नगारखान्यामधून वेगळा आवाज येई.

त्याचप्रमाणे आज देखील ही परंपरा या किल्ल्यावर पार पडते, पण नगारखान्यामधून येणारा ध्वनी हा संध्याकाळच्या सूर्यास्तच्या वेळी येतो, किंवा आठ वाजता केला जातो.

सिंहगड किल्ला माहिती मराठी

सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये पहायची ठिकाणे (PLACES TO VISIT IN SINDHUDURG FORT)

१. गोड्या पाण्याच्या विहिरी

सिंधुदुर्ग किल्ल्यावर तीन गोड्या पाण्याच्या दगडी विहिरी आहेत, ज्यांची नावे दूधबांव , दहीबांव व साखरबांव आहे. या विहीरिंमधिल पाणी अतिशय गोड व मधुर आहे.

२. छत्रपती शिवाजी महाराजाचे मंदिर

सिंधुदुर्ग किल्ल्यावर प्रवेश केल्यानंतर प्रवेशद्वाराच्या समोरच आत मध्ये एक छोटे मारुतीचे मंदिर आहे व तेथूनच पश्चिमेकडे जरीमरी मातेचे मंदिर देखील आहे. गडावरती महाराजांचे पुत्र छत्रपती राजाराम महाराज यांनी शिवाजी महाराजांच्या मंदिराची निर्मिती केली. मंदिराचे एकूण क्षेत्रफळ १३ मीटर *७ मीटर आहे. हे मंदिर अतिशय आकर्षक व विलोभनीय आहे.

३. ठसे

मुख्यद्वारामधून किल्ल्यामध्ये प्रवेश केल्यानंतर महाद्वाराच्या उजव्या बाजूला दोन देवळी आहेत. त्यातील एका देवळीमध्ये शिवाजी महाराजांचा डाव्या पायाचा ठसा आहे आणि दुसऱ्या देवळीमध्ये शिवाजी महाराजांच्या उजव्या हाताचा ठसा आहे.

४. सभागृह

श्री. शिवाजी महाराजांच्या मंदिराच्या थोडसं पुढे गेलं की एक मोठे सभागृहा आपल्याला पाहायला मिळते. ही सभागृह श्री छत्रपती शाहू महाराजांनी १९०७ साली बबांधले होते.

५. किल्ल्यावर असणाऱ्या इतर देवी देवतांची मंदिरे

श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरा व्यतिरिक्त सुद्धा किल्ल्यामध्ये अजून बरीच छोटी मोठी मंदिरे आहेत. मुख्य द्वाराच्या आतमध्ये प्रवेश करताना श्री. हनुमंताचे मंदिर आहे. तसेक एक महादेवाचे मंदिर, महापुरुषाचे मंदिर आणि भगवती देवीचे मंदिर आहे. पश्चिमेला जरीमरी मातेचे मंदिर आहे.

६. दुर्गाचा दरवाजा

मुख्यद्वाराला दुर्गाचा महादरवाजा म्हणतात. या मुख्याद्वाराची निर्मिती ही महाराजांनी भक्कम अशा उंबराच्या फळ्यांपासून केली आहे. उंबराचे लाकूड हे दीर्घकाळपर्यंत टिकते व त्या लाकडाला सागाच्या लाकडाची जोड देऊन असा भक्कम प्रकारचा दरवाजा महाराजांनी निर्माण केला.

७ . बुरुज व दगडी जिने

या किल्ल्यावर एकूण बुरुजांची संख्या ५२ असून ४५ दगडी जिने आहेत.

८ . सभोवतालचा परिसर

सिंधुदुर्ग किल्ल्यावरून नैसर्गिक सौन्दर्य लाभलेल्या किनारी प्रदेशाचे आणि अथांग निळ्याभोर समुद्राचे दर्शन घेता येते. हे सृष्टीसौंदर्य मनाला भुरळ पाडून जाते. सिंधुदुर्ग किल्ला हा 48 एकर पसरलेला असल्यामुळे तुम्ही काही तासांमध्ये सिंधुदुर्ग किल्ला पाहू शकता व सिंधुदुर्ग किल्ल्यावरून मालवण समुद्राच्या आगळ्या वेगळ्या रूपाचा आस्वाद घेऊन, आनंद अनुभवू शकता. आजूबाजूचा परिसर इतका मनमोहक असल्यामुळे तुम्हाला समाधानाची अनुभूती नक्कीच मिळते.

सिंधुदुर्ग किल्ल्यावरील नारळाचे झाड (SINDHUDURG FORT COCONUT TREE)

coconut tree sindhudurg fort

फार पूर्वी या किल्ल्यावर असे नारळाचे झाड होते ज्याला २ शाखा होत्या. सन २००९ साली झालेल्या वादळ वाऱ्यात या झाडावर वीज पडली आणि कालांतराने हे झाड वाळून गेले. हे नारळाचे झाड वाचवण्याचे शासनाकडून आणि निसर्ग प्रेमींकडून आटोकाट प्रयत्न झाले . परंतु हे झाड काही वाचू शकले नाही.

सिंधुदुर्ग किल्ल्याची माहिती – उत्सव (FESTIVALS AT SINDHUDURG FORT IN MARATHI)

सिंधुदुर्ग किल्ल्यावर शिवजंयती, रामनवमी, नवरात्र इ. उत्सव तिथीनुसार साजरे केले जातात. काही स्थानिक कुटुंबांची येथे वस्ती असून इथे एक अंगणवाडी व एक पूर्व प्राथमिक शाळा आहे. कोल्हापूर संस्थान छत्रपतींच्या वतीने येथील शिवाजी मंदिरात प्रतिवर्षी जिरेटोप, वस्त्रे अर्पण केली जातात. तसेच या किल्ल्यावरील शिवरायांच्या हाताच्या ठशाचा चांदीचा छाप बनविण्यात आला असून त्याची दररोज पूजा कोल्हापुरातील जुना राजवाडा येथील भवानी मंदिरात होते.

दर बार वर्षांनी मालवण मधील श्री रामेश्वरची पालखी किल्ल्यावरील शिवराजेशवर मंदिरात भेटीसाठी आणली जाते. हा सोहळा आभूतपर्व असतो.

चौऱ्यांशी बंदरांत हा जंजिरा मोठा व अठरा टोपीकरांचे उरावर अजिंक्य दुर्ग होता’ असे बखरकार लिहितात , म्हणून महाराजांनी मोठ्या अभिमानाने या किल्ल्याचे नाव ‘शिवलंका’ ठेवले. स्वराज्याच्या आरमारी दलाची साक्ष देणारा हा किल्ला पर्यटक आणि दुर्ग अभ्यासकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरला आहे.

सिंधुदुर्ग किल्याच्या बाजूला असणारी प्रेक्षणीय स्थळे (PLACES TO VISIT NEAR SINDHUDURG FORT)

मित्रहो जसे तुम्ही सिंधुदुर्ग किल्ल्यावर प्रेक्षणीय स्थळांची भेट घेता व तिथला आनंद अनुभवता त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग किल्ल्याच्या आजूबाजूला देखील अतिशय प्रेक्षणीय स्थळे आहेत, ती खालीलप्रमाणे

  • १. जय गणेश मंदिर :-
  • २. रॉक गार्डन :-
  • ३. चिवला बीच
  • ४. दांडी बीच
  • ५. तारकर्ली बीच
  • ६. देवबाग बीच
  • ७. मालवण बीच
  • ८. वायरी बीच
  • ९. तळाशील बीच
  • १०. कोळंब बीच
  • ११. तोंडवळी बीच
  • १२. ओझर गुफा
  • १३. आंगणे वाडी मंदिर
  • १४. मालवण बाजारपेठ
  • १५. राजकोट आणि सर्जेकोट किल्ला
  • १६. त्सुनामी आयलँड

सिंधुदुर्ग किल्याच्या जवळपास असणारी आकर्षणे

  • वॉटर स्पोर्ट्स :- मालवण च्या किनाऱ्यावर दांडी बीच येथे वॉटर स्पोर्ट्स केले जातात. इथे पर्यटक या साहसी खेळांचा आस्वाद घेऊ शकतात.
  • स्कूबा डायव्हिंग :- सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ अगदी कमी खर्चात स्कूबा डायव्हिंग केले जाते.
  • बोटिंग :- मालवण किनाऱ्याजवळ, दांडी बीच जवळ तसेच चिवला बीच येथे बोटिंग केले जाते.
  • बॅकवॉटर टूर :- मालवण तोंडवली खाडी येथे बॅक वॉटर बोटिंग केले जाते.

सिंधुदुर्ग किल्ल्या जवळ असणारी हॉटेल्स व राहण्याची सोय (HOTELS NEAR SINDHUDURG FORT)

सिंधुदुर्ग किल्ला पाहण्यासाठी तुम्ही आला असाल व तुम्हाला राहण्याची सोय हवी असेल, आणि जर तुम्ही एक उत्तम प्रकारचे रेस्टॉरंट किंवा हॉटेल शोधताय जे तुमच्या बजेट पासून ते लक्झरी हॉटेल पर्यंत असेल तर आपल्या बजेट प्रमाणे हॉटेल्स तुम्हाला मालवण मध्ये उपलब्ध होतात. अधिक माहितीसाठी हेडिंग वर क्लिक करा.

सिंधुदुर्ग किल्ला प्रवास

बस सेवा

मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाण्यासाठी जर बसने जाण्याचा तुम्ही विचार करत असाल तर महाराष्ट्र स्टेट गव्हर्मेंट च्या बसेस आहे ज्या पुणे, मुंबई, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी अशा वेगवेगळ्या राज्यांमधून धावतात व त्या बसेस तुम्हाला सिंधुदुर्ग किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी खूप सुलभ आहेत व त्यामुळे तुम्ही व्यवस्थित सिंधुदुर्ग किल्ल्याचा आस्वाद घेऊ शकता. गोव्या मधून देखील येण्यासाठी कदंबा ट्रान्सपोर्ट आहे जी पणजी, वास्को ते सिंधुदुर्ग वाहतूक करते त्यामुळे सिंधुदुर्ग किल्ल्या पर्यंत पोहोचू शकता.  

रेल्वे

सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाण्यासाठी सिंधुदुर्ग मध्ये सगळ्यात जवळचे स्टेशन असेल तर ते कुडाळ स्टेशन आहे. कुडाळ स्टेशन वरून साधारणतः सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाण्यासाठी २५ ते ३० किलोमीटर अंतर पार करावे लागते. सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाण्यासाठी तुम्ही कणकवली रेल्वे स्टेशन किंवा सावंतवाडी रेल्वे स्टेशन वरून सुद्धा जाऊ शकता.

विमान

सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाण्यासाठी तुम्ही विमानतळावरून सुद्धा जाऊ शकता. हे विमानतळ चिपी विमानतळ किंवा सिंधुदुर्ग विमानतळ म्हणून सुद्धा ओळखले जाते. हे विमानतळ पासून 21 किलोमीटर आणि सिंधुदुर्ग किल्ल्यापासून 22 किलोमीटर अंतरावर आहे. सिंधुदुर्ग किल्ल्याला जाण्यासाठी विमानतळावरून बस किंवा रिक्षा करू शकता.

किल्ला प्रवेश शुल्क (ENTRY FEES AT SINDHUDURG FORT)

भारतीय पर्यटकांसाठी प्रवेश शुल्क ५० रुपये आणि परदेशी पर्यटकांसाठी २०० रुपये आहे, फेरीबोटीसाठी १०० रुपये प्रति व्यक्ती शुल्क आहे. पार्किंगची जागा फक्त समुद्रकिनाऱ्याजवळ उपलब्ध आहे. जर तुम्ही स्वतःची वैयक्तिक गाडी घेऊन येत असाल, तर समुद्रकिनाऱ्याजवळ गाडी पार्क करावी लागेल, किल्ल्यावर पार्किंग करण्यासाठी जागा उपलब्ध नाही.

सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाण्यासाठी योग्य महिना (BEST TIME TO VISIT SINDHUDURG FORT)

सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट देण्यासाठी सगळ्यात उत्तम महिना असेल तर ऑक्टोबर ते मार्च. हा हिवाळा सीजन असतो, यामध्ये तापमान हे कमी प्रमाणात असल्यामुळे जास्त प्रमाणात ऊन नसते. इकडचे तापमान हे साधारणतः २० ते २८ डिग्री सेल्सियस असते व यामुळे अधिक उन्हाचा त्रास होत नाही व सिंधुदुर्ग किल्ल्याचा आनंद, आस्वाद आपण पुरेपूर लुटू शकता.

वेळ :- जानेवारी ते डिसेंबर या महिन्यांमध्ये सकाळी ८ ते संध्याकाळी ६ दरम्यान किल्ला पाहण्यासाठी चालू असतो. परंतु पावसाच्या वेळी किल्ल्यावर जाण्यासाठी मनाई असते.

कोटी देवांची अब्जावधी मंदिरे असताना पण एकही मंदिर नसताना जे अब्जावधींच्या हृदयावर अधिराज्य करतात त्या शिवशंभू छत्रपती महाराजांना कोटी कोटी नमन.

सिंधुदुर्ग किल्ला व्हिडिओ (VIDEO OF SINDHUDURG FORT)

MALVAN FORT INFORMATION IN MARATHI

FAQ

सिंधुदुर्ग किल्ला का प्रसिद्ध आहे?

सिंधुदुर्ग किल्ला मालवण पासून सुमारे अर्धा मैल समुद्रात आहे. या किल्ल्याला नैसर्गिक सौंदर्य प्राप्त आहे. किल्ल्याच्या आजूबाजूस अथांग अरबी समुद्र असून तो किल्ल्याला एक अनोखे व अलौकिक सौंदर्य प्राप्त करून देतो. छत्रपती शिवरायांनी बांधलेला हा किल्ला मराठा आरमाराचे प्रमुख केंद्र होता.

महाराजांनी मालवणजवळ कोणता सागरी किल्ला बांधला?

सिंधुदुर्ग  हा मालवणजवळ महाराजांनी बांधलेला सागरी किल्ला आहे . तसेच त्याच्या आजूबाजूला राजकोट आणि सर्जेकोट किल्ले देखील आहेत

सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट देण्यासाठी उत्तम महिना कोणता ?

ऑक्टोंबर ते मे महिन्यामध्ये आपण सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट देऊ शकता .

किल्ला बघण्याची वेळ काय आहे ?

सकाळी ८ ते संद्याकाळी ६ दरम्यान किल्ला पाहण्यासाठी चालू असतो .

शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ला का बांधला?

छत्रपती शिवाजी महाराजांनी जंजिऱ्याचा सिद्दी, मुंबईचे इंग्रज, गोव्याचे पोर्तुगीज अश्या परकीय शत्रू च्या बंदोबस्तासाठी या किल्ल्याची निर्मिती झाली तसेच स्वराज्याचे आरमार बळकट करण्यासाठी हा किल्ला बांधला गेला.

सिंधुदुर्ग किल्ल्याची इतर कोणती नावे आहेत?

मालवण किल्ला
फोर्ट ऑगस्टस

फोटो गॅलरी (SINDHUDURG FORT PICS GALLERY)

सिंधुदुर्ग किल्ल्याच्या अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा

निष्कर्ष

छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या मालवण मधील सिंधुदुर्ग किल्ल्याबद्दल आपणास या लेखाद्वारे माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. हा लेख (MALVAN FORT INFORMATION IN MARATHI) तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा, पण यामध्ये अजून काही गोष्टी वाढवायच्या असतील तर ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

धन्यवाद.

संदर्भ

5 thoughts on “सिंधुदुर्ग किल्ला माहिती मराठी : SINDHUDURG FORT INFORMATION IN MARATHI”

Leave a comment