सिंहगड किल्ला माहिती मराठी : SINHAGAD FORT INFORMATION IN MARATHI

SINHAGAD FORT INFORMATION IN MARATHI | सिंहगड किल्ला माहिती मराठी – स्वराज्यातील एक महत्त्वाचा किल्ला सिंहगड. हा किल्ला पुण्याच्या नैऋत्येला साधारण २५ किलोमीटर अंतरावर असणारा, समुद्रसपाटीपासून ४४०० फूट उंच आहे. सिंहगड किल्ल्याचे पूर्वीचे नाव कोंढाणा. पूर्वी हा किल्ला आदिलशाहीत होता. सह्याद्रीच्या पूर्व शाखेवर पसरलेला भुलेश्वराच्या रांगेवर हा गड आहे.

दोन पायऱ्या सारख्या दिसणारा खंडकाचा भाग आणि दूरदर्शी उभारलेला उंच मनोरा त्यामुळे पुण्यात कुठूनही तो लक्ष वेधून घेतो. पुरंदर, राजगड, तोरणा, लोहगड, विसापूर, तुंग असा प्रचंड मुलुख या गडावरून दिसतो. आजच्या लेखातून आपण सिंहगड किल्ला पुणे, बद्दल जाणून घेणार आहोत. लेख तुम्ही नक्की वाचा.

Table of Contents

सिंहगड किल्ला माहिती मराठी : SINHAGAD FORT INFORMATION IN MARATHI

नावसिंहगड किल्ला
उंची१३१२ मीटर (४३०४)
प्रकारगिरीदुर्ग
ठिकाणपुणे
जवळचे गावसिंहगड
पर्वत रांगाभुलेश्वर रांग
तालुकाहवेली
किल्ल्यावरील प्रेक्षणीय स्थळेतानाजी मालुसरे स्मारक, राजाराम महाराज स्मारक, कोंढाणेश्वर मंदिर, देव टाके, तानाजी कडा, कल्याण दरवाजा, टिळक बंगला, उदयभान स्मारक

सिंहगड किल्ल्याचे स्थान नकाशा

सिंहगड किल्ल्याचा इतिहास

  • सिंहगड ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचा असलेला किल्ला. या किल्ल्याला पूर्वी कोंढाणा या नावाने ओळखले जायचे. कौंडीण्य ऋषींच्या नावावरून या किल्ल्यास कोंढाणा असे नाव पडले.
  • हा किल्ला पूर्वी महादेव कोळी लोकांच्या अधिकारात होता.हा किल्ला पूर्वीच्या पुण्यनगरचे म्हणजेच आताच्या पुण्याचे मुख्य होते. येथे महादेव कोळी राजा नागनाथ (नागा) नाईक यांच्या यांचे राज्य होते.
  • कोंढाणा हा किल्ला इसवी सन १३३८ मध्ये मोहम्मद बिन तुघलक याने, राजा नागनाथ (नागा) नाईक यांच्याकडून घेऊन स्वतःचे वर्चस्व प्रस्थापित केले.
  • छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजी भोसले यांना, पुण्याचा प्रदेश देण्यात आला. त्यावेळेस आदिलशाहीला वाटले की, छत्रपती शिवाजी महाराज देखील आदिलशाही सत्तेचा स्वीकार करतील, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाही सत्तेचा स्वीकार न करता, स्वतःचे स्वराज्य स्थापन केले. आपले स्वराज्य अजून बळकट बनवण्यासाठी, शिवाजी महाराज अथक प्रयत्न करू लागले.
  • इसवी सन १६४७ मध्ये शिवाजी महाराजांनी युक्तीने कोंढाणा किल्ल्यावर ताबा मिळवला. सिंहगड अर्थात कोंढाणा किल्ल्याचा ताबा आदिलशाहीचा सरदार सिद्धी अंबर याच्याकडे होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी अशी युक्ती केली की, या सिद्धी अंबरला छत्रपती शिवाजी महाराजांनी पटवून दिले की, आम्ही शहाजीराजे भोसले यांचे पुत्र आहोत. हा किल्ला आम्ही चांगल्या रीतीने सांभाळू शकतो, यामुळे सिद्धीने छत्रपती शिवाजी महाराजांवर विश्वास ठेवून, महाराजांच्या हातात कोंढाणा अर्थात सिंहगडा किल्ला सोपवला.
  • आदिलशाहीला हा देशद्रोह वाटला, व त्यामुळे त्यांनी सिद्धी अंबर यांना तुरुंगात टाकले. सिंहगड किल्ला हा पुन्हा त्यांना मिळवायचा होता. यासाठी त्यांनी अनेक योजना आखल्या. शहाजीराजांवर कटकारस्थान करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून, त्यांना आदिलशहाने तुरुंगात टाकले. व शिवाजी महाराजांसमोर अशी अट टाकली की, जर तुम्ही सिंहगड किल्ला त्यांच्या ताब्यात दिला तरच त्यांचे वडील शहाजीराजे यांना सुखरूपपणे सोडण्यात येईल, म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी १६४९ मध्ये आदिलशहाला कोंढाणा हा किल्ला दिला.
  • सिंहगड अर्थात कोंढाणा हा किल्ला १६६२, १६६३ आणि १६६५  या तीन सालांमध्ये मोगलांनी किल्ला मिळवण्यासाठी किल्ल्यावर हल्ले चढवले. काही काळाने शाहिस्तेखान देखील १६६४ मध्ये हा किल्ला मिळवण्यासाठी प्रयत्न करू लागला, यासाठी त्यांनी किल्ल्यावरील लोकांना लाच देऊन किल्ला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचा हा पूर्ण बेत फसला, तो किल्ला मिळवू शकला नाही.
  • १६६५  मध्ये पुरंदराचा तह झाला. या तहामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना मिर्जा राजा जयसिंग यांना सिंहगड हा किल्ला सोपवावा लागला. १६७०  मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी सुभेदार तानाजी मालुसरे यांना सिंहगड किल्ला ताब्यात मिळवण्यासाठी सांगितले. याच दरम्यान तानाजी मालुसरे यांनी कोंढाणा किल्ल्यावर आक्रमण करून १६८९ मध्ये किल्ला स्वराज्यात आणला. व यानंतर संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर परत हा किल्ला मुघलांनी चालाखीने हिसकावला.
SINHAGAD FORT INFORMATION IN MARATHI

सिंहगड किल्ला भुगोल

सिंहगड किल्ला सह्याद्री पर्वत रांगांमध्ये वसलेला असून, पर्वतरांगांच्या उंच उंच उतारांमुळे शत्रूंपासून किल्ल्याला एक उत्तम संरक्षण देतो, समुद्रसपाटीपासून हा ४४०० फूट म्हणजेच १३१२ मीटर इतका उंच आहे.

सिंहगड किल्ल्याचे बांधकाम

  • सिंहगड किल्ल्याचे बांधकाम हे मजबूत व सुंदर असे आहे. या ठिकाणी किल्ला चढतेवेळी दोन प्रवेशद्वारांपैकी एका प्रवेशद्वारा कडे जाण्यासाठी प्राचीन दगडांपासून, बनवलेल्या पायऱ्या आहेत. त्याचप्रमाणे सिंहगड किल्ल्याच्या उत्तर, पूर्व व आग्नेय दिशेला पुणे आणि कल्याण दरवाजा हे मुख्य दोन प्रवेश दरवाजे बांधण्यात आले आहे.
  • किल्ल्यावर ३५० वर्ष जुने असलेले, तानाजी मालुसरे यांचे स्मारक होते. खोदकामाच्या वेळी किल्ल्याच्या मैदानामध्ये हे स्मारक आढळले. त्याचे नूतनीकरण करून, आता किल्ल्यावर सुशोभित असे तानाजी मालुसरे यांचे स्मारक आहे.
  • त्याचप्रमाणे छत्रपती राजाराम महाराजांची समाधी, दारूभट्टी ,लष्करी शेड, कोंढाणेश्वर देवाचे मंदिर, इत्यादी गोष्टींचे बांधकाम सिंहगड किल्ल्यावर आढळून येते.

सिंहगड किल्ल्याचे पूर्वीचे नाव

सिंहगड या किल्ल्याला पूर्वी कोंढाणा या नावाने ओळखले जात असे.

SINHAGAD FORT

आमचे हे लेख नक्की वाचा👇

सिंहगड किल्ल्याचा व्हिडिओ

सिंहगड किल्ल्यावरील महत्वाचे प्रसंग

बारा मावळ प्रदेशाचे मध्यवर्ती केंद्र असलेला कोंढाणा किल्ला प्रजेच्या स्थैर्यासाठी स्वराज्यात असणे, अत्यंत गरजेचे होते. पुरंदर किल्ल्याप्रमाणे कोंढाणा किल्ल्याचे महत्त्व फार होते. या किल्ल्याचे महत्त्व केवढे होते हे आपल्याला या किल्ल्याच्या पुढील दोन प्रसंगावरून लक्षात येईल,

अ)विजापूरच्या आदिलशाही बादशहाने शहाजीराजांना कैद केल्यावर त्यांच्या सुट्टीसाठी शिवाजी राजांना जे राजकारण करावे लागले, त्या राजकारणात हा किल्ला विजापूरकरास परत द्यावा लागला.

ब)मिर्झाराच्या जयसिंगाने स्वराज्यावर स्वारी केली. त्या प्रसंगी त्याच्याबरोबर झालेल्या तहात जे २३ किल्ले शिवाजीराजांनी मोगलास द्यायचे ठरवले त्यात कोंढाणा किल्ला होता.या दोन्ही गोष्टीवरून या किल्ल्याचे महत्त्व स्वराज्याचे रक्षणासाठी किती मोठे होते हे दिसून येते.

SINHAGAD FORT

सिंहगड किल्ला आणि तानजी मालुसरे गड आला पण सिंह गेला

  • एके दिवशी जिजाऊ शिवरायांना म्हणाल्या शिवबा समोरचा कोंढाण्यावर मोगलांचे हिरवे निशाण फडकत आहे. हा बळकट किल्ला मोघलांच्या हाती असणे बरे नव्हे, तो परत घे. कोंढाणा आपल्या स्वराज्यात असावा असे शिवरायांना वाटत होते. ते कोंढाण्यावर स्वारी करण्यासाठी सज्ज झाले.
  •  शिवरायांबरोबर बालपणापासून शत्रूची खांडोळी करणाऱ्या तानाजी मालुसरे यांनी आपण असताना महाराज कोंढाण्यावर स्वारी करणार हे पटले नाही. त्यावर तानाजी म्हणाले, महाराज, आम्ही जिवंत असताना आपल्या जीवावरच्या कामगिरीवर आपण जाणार मग आम्ही कशाला ? ते काही नाही, आधी लग्न कोंढाण्याचे मग माझ्या रायबाचे ! मीच कोंढाणा जिंकणार.. मला आशीर्वाद द्या.
  • महाराजांनीही कामगिरी तानाजी मालुसरे यांना दिली. चार दिवसांवर आलेले रायबाचे लग्न रद्द करून, तानाजी मालुसरे आपल्या मावळांसह राजगडावरून खाली उतरले. तो दिवस होता ३ फेब्रुवारी १६७०. गड सोप्पा नव्हता. त्याला जिंकण्याची कामगिरीही सोपी नव्हती. कारण किल्लेदार जातीचा राजपूत होता. राजस्थानातील जोधपूरच्या पिण्या गावात राठोड वंशात त्याचा जन्म झाला होता. मोठा समशेर बहादूर त्याचं नाव होतं.
  • किल्ल्यावर जवळजवळ दीड हजार हत्यारबंद राजपूतांची कडवीशी बंदी होती. तोफा होत्या, बारूद गोळा, बंदुका आणि रसल गच्च भरलेली होती. ऐकून मुकाबला अवघड होता. कठीण होता. पण महाराजांना काहीही करून कोंढाणा हवा होता. तानाजीच्या मदतीला त्याचा प्रत्यक्ष पाठचा भाऊ उभा होता. त्याचं नाव सूर्याजी.
  • गडाचा आकार काहीसा कुऱ्हाडि सारखा होता. पुण्याच्या दिशेला जो दरवाजा होता, त्याला पुणे दरवाजा म्हणत आणि खेड शिवापूरच्या दिशेला तो दरवाजा आहे त्याला म्हणतात कल्याण दरवाजा. या दोन दरवाजाशिवाय गडात फिरायला तिसरी वाट नव्हती. गडाच्या सर्वांगाला खोल खोल उभे सरळ कडे होते. तटबंदी अगदी पक्की होती.
  • तानाजी व त्याच्यासोबतचे मावळे माळेवरुन सळसळ चढत वर गेले. तेवढ्यात गडावरच्या शिपायांना चाहूल लागली. कोणीतरी गडावर शिरले आहे, असे त्यांना संशय आला आणि गडावर एकदम भयंकर आरडाओरडा उसळला.
  • तानाजीने व त्याच्या मावळ्यांनी एकदम वीरश्रीने हर हर महादेव म्हणून, शत्रूची कापाकाप करण्यास सुरुवात केली. किल्ल्यावर एकच भयानक कल्लोळ उसळला. असंख्य मशाली पेटल्या रजपुतांची दाणादाण उडाली. किल्लेदार उदयभानला ताबडतोब या अचानक आलेला हल्ल्याची खबर मिळाली. तो योद्धा आश्चर्याने व संतापाने बेभान होऊन ढाल तरवाल घेऊन लढाई करण्यास आला.
  • तिकडे कल्याण दरवाजाजवळ सूर्याजी आपल्या मावळ्यां सोबत थांबला होता. तो गडाचा दरवाजा उघडण्याची वाट पाहत होता. आणि कोणीतरी आतून दरवाजा उघडला. आता तर सूर्याजी ही तानाजीच्या मदतीला आले. उदयभान बेभान होऊन लढत होता. आजवर इतकी सावधगिरी ठेवून कडक बंदोबस्त करूनही हे मराठे गडात घुसलेच कसे?
  • तानाजी, सूर्याजींनी तर कमालीची तोडणी लावली होती. आपल्यापेक्षा शत्रू तिप्पट आहे, त्याची त्यांना जाणीव होती. शत्रूचे सैन्य अफाट असूनही मावळे लढत होते.
  •  तानाजी आणि उदयभान हे दोघेही भडकलेल्या आगीप्रमाणे कमालीच्या शौर्याने लढत होते. आणि त्या वादळी युद्धात जुंजणाऱ्या या पिसाळलेल्या दोन सिंहांची अचानक समोरासमोर गाठ पडली. जणू दोन प्रचंडगिरी शिखरे एकमेकांवर कडाडून कोसळली. तलवारींचे भयंकर घाव एकमेकांवर थडकू लागले. दोघेही जबरदस्त ज्योती होते.
  • एकाला गड घ्यायचा होता, आणि दुसऱ्याला तो घेऊ द्यायचा नव्हता. दोघांनाही एकमेकांचे प्राण हवे होते. मोगलशाहीची आणि शिवशाहीची कोंढाणा किल्ल्यासाठी अटीतटीची झुंज लागली होती. इतर मावळ्यांची लढाई चालली होती. सूर्याजीही लढत होता. तेवढ्यात तानाजीच्या ढालीवर उदयभानचा एक घाव असा कडकडून कोसळला, की तानाजीची ढालच खाडकन तुटली.
  • उदयभान आसुसला. तानाजीने आपल्या कमरेचा शेला डाव्या हातावर गुंडाळून, उदयभानचे घाव आपल्या त्या डाव्या हातावर झेलायला सुरुवात केली. आणि स्वतःही त्यांनी उदयभानावर त्याच भयंकर पंजाने घाव घालायला सुरुवात केली. की जणू विजा कोसळू लागल्या. तोच आक्रोश उठला, दोघेही तुकडे होऊन जमीनीवर कोसळले.
  • तानाजी पडला. मावळ्यांची चढाई जोरात चालू होती. पण सुभेदार पडले आता कसे व्हायचे ? जिंकत आणलेला डाव हातचा सुटला. मावळ्यात एकच आणि पळापळ सुरू झाली. सूर्याजी दचकला. काय झालं तरी काय? तानाजी सुभेदार पडले. सख्खा भाऊ पडला. हे सूर्याजीला कळले
  • काय झाले त्याच्या काळजात त्यावेळी त्याचे त्याला ठावे. भाऊ पडला आणि म्हणूनच हाय खाऊन मावळे पळतायत, हे त्यांनी पाहिले. आणि तो चवताळला. तो तसाच धावला. पळत्या मावळ्यांच्या पुढे अडसरासारखा आडवा झाला. आणि त्यांनी मावळ्यांना रोखले. त्यांनी त्यांची अस्सल मराठीतून हजेरी घेतली. तुमचा सुभेदार इथे मरून पडला असताना, तुम्ही पळून जातात, नामर्द  सारखे पळून जाण्यापेक्षा, लढा. लढून मरा. तुमचा सरकार पडला म्हणून काय झाले
  • सगळे मावळे पुन्हा उलटले आणि किल्लेवाल्यांवर तुटून पडले. तानाजी पडेपर्यंत जवळजवळ ५०० राजपूत ठार झाले होते. पण हा आकडा फुगत चालला. हजाराच्या वर एकूण गडकरी मेले आणि उरलेल्यांना पळता भुई थोडी झाली. अनेक राजपूत कड्यावरून पडून मेले. आणि किल्ला काबीज झाला. कोंढाणा किल्ल्यावर भगवा झेंडा फडकला.
  • गड फत्ते झाला. पहाटे तीनच्या सुमारास गड मावळ्यांच्या ताब्यात आला. तो दिवस होता ४ फेब्रुवारी १६७०. स्वराज्याचे भगवे निशाण गडावर फडकले. सेनापती मृत्यूमुखी पडला तरी शिवरायांचे मावळे स्वराज्याचे रक्षणासाठी मागे आले नाही. गवताच्या गंजी पेटवून कोंढाणा जिंकण्याची वार्ता राजगडावर शिवाजी महाराज व जिजाऊंना देण्यात आली.
SINHAGAD FORT

सिंहगड किल्ल्यावरील प्रेक्षणीय स्थळे

दारूचे कोठार

किल्ल्यामध्ये प्रवेश केल्यानंतर किल्ल्याच्या उजव्या बाजूला असणाऱ्या दगडी इमारतीला दारूचे कोठार म्हणून ओळखले जायचे.

टिळक बंगला

रामलाल नंदराम यांच्याकडून या ठिकाणी जागा खरेदी करून, या जागेवर बंगल्याची निर्मिती करण्यात आली. या बंगल्यामध्ये लोकमान्य टिळक येत असत व त्यामुळे या बंगल्याला टिळक बंगला असे नाव पडले. इसवी सन १९१५ साली महात्मा गांधी व लोकमान्य टिळक यांची टिळक बंगल्यावर भेट झाली होती.

कोंढाणेश्वर मंदिर

हे मंदिर शंकराला समर्पित असून यादव कुळांचे हे कुलदैवत होते. या ठिकाणी सध्या पिंडी व सांब आहे.

देवटाके

गडावर पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून, देवटाके बांधण्यात आले.पुण्याच्या मुक्कामी असताना गांधीजी या टाकीचे पाणी मागवत.

श्री अमृतेश्वर भैरव मंदिर

कोंढाणेश्वराच्या मंदिरावरून थोडे पुढे गेल्यावर डावीकडे हे अमृतेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. भैरव हे कोळ्यांचे दैवत. पूर्वी गडावर कोळ्यांची वस्ती होती. मंदिरात भैरव व भैरवी अशा दोन मूर्ती असून, भैरवाच्या हातात राक्षसाचे मुंडके आहे.

कल्याण दरवाजा

हा दरवाजा गडाच्या पश्चिमेस आहे. पूर्वीच्या काळी इथे हत्ती व माहूत अशी शिल्पे होती.

सुभेदार तानाजी मालुसरे स्मारक

सिंहगड किल्ल्यावर ज्या तानाजींनी फक्त पाचशे मावळे घेऊन कोंढाणा किल्ला स्वराज्यात परत आणला, स्वतःच्या प्राण्यांचे बलिदान दिले, अशा सिंहासारख्या व्यक्तिमत्व असणाऱ्या तानाजी मालुसरेंचे स्मारक देखील सिंहगड किल्ल्यावर बघण्यासारखे आहे. दरवर्षी या ठिकाणी नवमीस सुभेदार तानाजी मालुसरे यांचा स्मृतिदिन साजरा केला जातो.

राजाराम महाराज स्मारक

छत्रपती शिवाजी महाराजांचे मुलगा राजाराम महाराज यांचे देखील स्मारक सिंहगड किल्ल्यावर आहे.

उदयभान स्मारक

गडावर उदयभान स्मारक देखील आहे.

SINHAGAD FORT

सिंहगड किल्ला ट्रेक

सिंहगड किल्ल्याचा ट्रेक हा साधारणतः एक ते दीड तासाचा आहे. हा ट्रेक अतिशय सोपा असून नवशिके देखील हा ट्रेक सोयीस्कररित्या चढू शकता. समुद्रसपाटीपासून सिंहगड किल्ल्याची उंची ४४०० फूट इतकी आहे.

सिंहगड किल्ला ट्रेक चढाई पातळी

सिंहगड किल्ला ट्रेक अर्थात कोंढाणा किल्ल्याची चढाई पातळी ही सोपी ते मध्यम असून, नवशिक्यांसाठी तशी सोईस्कर आहे. कोंढाणा हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील किल्ला असून १३१२ मीटर इतका उंच आहे. सिंहगड गावाच्या पायथ्यापासून या किल्ल्याचे ट्रेकिंग सुरू होते.

सिंहगड किल्ला ट्रेकसाठी कोणत्या गोष्टी सोबत ठेवाव्यात

  • फर्स्ट एड किट.
  • ओळखीचे प्रमाणपत्र.
  • टोपी, स्कार्फ व सनग्लासेस.
  • मुबलक दोन ते तीन लिटर पाणी.
  • एनर्जी ड्रिंक.
  • जास्त कॅलरीचे खाद्यपदार्थ जसे शेंगदाणे ड्रायफ्रूट इत्यादी.
  • सेफ्टी पिन, शिट्टी (अत्यावश्यक वेळी)
  • ज्यादा कपड्यांचे जोड.
  • स्वेटर जर्किन जॅकेट.
  • पावसाच्या काळामध्ये जर तुम्ही ट्रेकिंग करत असाल तर त्यावेळी तुमच्या इलेक्ट्रॉनिक गोष्टी झाकून ठेवण्यासाठी प्लास्टिक शीट.
  • सन स्क्रीन.
  • ट्रेकिंग पोल.

सिंहगड किल्ला ट्रेकिंगसाठी घ्यावयाची काळजी

  • ट्रेकिंग कठीण असून नवशिक्षित ट्रेकिंगप्रेमींनी हा गड पावसाळ्यात ट्रेक करू नये.
  • किल्ल्याची उंची जास्त असल्याकारणाने पावसाळ्यामध्ये शक्यतो ट्रेकिंग करणे टाळावे कारण पायवाट ही निसरडी झालेली असते.
  • चप्पलांचा वापर करू नये, पकड चांगल्या असणाऱ्या बुटांचा वापर करावा.
  • टॉर्च व ज्यादा बॅटरी सोबत ठेवावी.
  • हवामानाचा अंदाज घेत ट्रेकिंग साठी जावे.
  • आपण ज्या ठिकाणी ट्रेकिंगला जात आहोत त्या ठिकाणी परिसर स्वच्छ ठेवावा.
  • प्लास्टिक बॉटल, कचरा, कागद खाद्यपदार्थ पर्यावरणात टाकू नये.

सिंहगड किल्ला ट्रेक साठी सर्वोत्तम महिना (Best month for Sinhagad fort trek)

पावसाळा आणि हिवाळा पर्यंतच सह्याद्रीचे सौंदर्य हे खुलून निघते. या काळामध्ये अर्थात जुलै ते फेब्रुवारीच्या दरम्याने तुम्ही किल्ल्याचे ट्रेकिंग करू शकता.

SINHAGAD FORT

सिंहगड किल्ल्याजवळील प्रेक्षणीय स्थळे

पु.ल. देशपांडे उद्यान  

पु.ल. देशपांडे उद्यान हे पुणे जिल्ह्यातील सिंहगड रोडवर असलेले एक उद्यान आहे. या उद्यानाची रचना जपानी पद्धतीने केलेली आहे. पु.ल. देशपांडे उद्यान हे एकूण दहा एकर परिसरामध्ये विस्तारलेले आहे. या उद्यानात फिरताना हिरवळ, पाण्याचे झरे, टेकड्या इत्यादी गोष्टींचा आनंद घेता येतो.

लाल महाल

पुणे जिल्ह्यातील लाल महाल हे एक प्रसिद्ध स्मारक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजी भोसले यांनी आपली पत्नी जिजाबाई आणि मुलासाठी लाल महालाची स्थापना केली होती. लाल महाल हा पुणे शहरातील मध्यभागी स्थित आहे.

सारसबाग

 सारसबाग पुणे शहरात स्वारगेट जवळ स्थित आहे. बागेमध्ये असणारे हिरवेगार, टवटवीत गवत आणि व्यायामासाठी असणारा पदाचारी मार्ग हा मनमोहक आहे. सारसबाग येथे फुलराणी नावाची एक छोटीशी रेल्वे गाडी आहे, जी लहान मुलांना खूप आकर्षित करते.

खडकवासला धरण

पुणे शहराला पाणीपुरवठा करणारे हे धरण पुण्यापासून अवघ्या १५ किलोमीटर एवढे अंतरावर सिंहगड किल्ल्याच्या रस्त्यावर सहलीसाठी एक उत्तम पर्याय आहे.

शिवनेरी किल्ला

शिवनेरी किल्ला पुणे जिल्ह्यातील जुन्नर या शहरात आहे. महाराष्ट्राचे दैवत शिवछत्रपती यांचे हे जन्मस्थान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मामुळे शिवनेरी किल्ल्यास महाराष्ट्राच्या इतिहासात एक वेगळे स्थान प्राप्त झालेले आहे. शिवनेरी किल्ल्यावर शिवाई देवीचे छोटेसे मंदिर व जिजाबाई व बाल शिवाजी यांच्या प्रतिमा आहेत.

शनिवार वाडा

पहिला बाजीराव पेशवा यांनी १७३६ मध्ये बांधलेला तेरा खोल्याचा भव्य राजवाडा म्हणजेच शनिवारवाडा. हा पुण्याच्या संस्कृतीचे प्रतीक आहे. १९२८ मध्ये आगीमुळे हा नष्ट झाला.

राजीव गांधी प्राणी संग्रहालय

हे प्राणी संग्रहालय पुण्यात भारतीय विद्यापीठ पुणे सातारा महामार्ग कात्रज येथे आहे. या प्राणिसंग्रहात सर्व जातीचे साप सरपटणारे प्राणी संरक्षण दिलेले आहे कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालय हे महाराष्ट्रातील एक प्रमुख संग्रहालय मानले जाते. या प्राणी संग्रहालय मध्ये विविध प्रकारचे साप, मगर, कासव, वाघ, सिंह बिबट्या, हरण, काळवीट, गवा, साळींदर, गिधाड असे अनेक प्रकारचे प्राणी व पक्षी बघायला मिळतील.

लोणावळा

हे थंड हवेचे ठिकाण असून येथिल परिसर हा निसर्गरम्य आहे. लोणावळा येथील भुशी धरण व लोणावळा हे बघण्यासारखे आहे.

SINHAGAD FORT

सिंहगड किल्ल्याची वैशिष्ट्ये

  • सिंहगड किल्ला हा एक गिरीदुर्ग प्रकारातील किल्ला असून, समुद्रसपाटीपासून १३१२ मीटर इतका उंच आहे.
  • किल्ल्यावर देवटाके, लष्करी शेड, छत्रपती राजाराम महाराज यांची समाधी इत्यादी प्रेक्षणीय स्थळे आहेत.
  • ३५० वर्ष जुने तानाजी मालुसरे यांचे स्मारक किल्ल्याच्या आवारात कुठेतरी गाडले गेले होते, नंतर खोदकामाच्या दरम्याने त्याचे नूतनीकरण करून जीर्णोद्धार केला गेला.
  • किल्ल्याच्या माथ्यावरून आजूबाजूची असलेली विलोभनीय दृश्य, तसेच तोरणा किल्ला, रायगड किल्ला, तुंग इत्यादी किल्ल्यांची झलक पाहायला मिळते.
  • सिंहगड किल्ल्याचे पूर्वीचे नाव कोंढाणा असे होते.

सिंहगड किल्ल्याची इतर माहिती

मुंबई ते सिंहगड किल्ला अंतर व त्यासाठी लागणारा कालावधी

मुंबई ते सिंहगड किल्ला हे अंतर साधारणतः १८० किलोमीटर इतके असून, प्रवासासाठी अंदाजे ३ तास लागू शकतात.

पुणे ते सिंहगड किल्ला अंतर व त्यासाठी लागणारा कालावधी –

पुणे ते सिंहगड किल्ला हे अंतर साधारणतः ३० किलोमीटर इतके असून, प्रवासासाठी अंदाजे १ तास लागू शकतो.

सिंहगड किल्ला पाहण्यासाठी कालावधी

सिंहगड किल्ला व त्या जवळील प्रेक्षणीय स्थळे एक्सप्लोर करण्यासाठी, साधारणतः तुम्हाला दोन ते तीन दिवस लागू शकतात.

सिंहगड किल्ल्यावर खाण्याची सुविधा

  • सिंहगड किल्ल्यावर झुणका भाकरी, पिठलं भाकरी, भजी, दही, ताक, लिंबू पाणी यांसारख्या दुकानांचे छोटे छोटे स्टॉल आहेत.
  • हंगामाच्या वेळी विविध प्रकारची फळे, जसे चिंच, पेरू व इतर बऱ्याच गोष्टी गडावर उपलब्ध असतात.

सिंहगड किल्ला उघडण्याची वेळ व प्रवेश शुल्क

  • सिंहगड हा किल्ला पर्यटनासाठी वर्षाचे बाराही महिने खुला असतो. सकाळी ५ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत तुम्ही किल्ल्याला भेट देऊ शकता.
  • सिंहगड किल्ल्याच्या माथ्यावर जाण्यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जात नाही. पण किल्ल्याच्या आवारामध्ये पार्किंग एरिया असल्यामुळे, तुमची खाजगी वाहने या ठिकाणी पार्क करत असाल, तर प्रती दुचाकी २० रुपये आणि प्रती चार चाकी ५० रुपये शुल्क आकारले जाते.

सिंहगड किल्ल्याला भेट देण्याची सर्वोत्तम वेळ

सिंहगड किल्ल्याला भेट देण्यासाठी पावसाळा व हिवाळा या ऋतूंमध्ये जाऊ शकता. जास्त पावसाळ्यामध्ये किल्ल्याला भेट देणे टाळावे. तसेच हिवाळा व पावसाळ्याच्या काळामध्ये किल्ल्यावरील दृश्ये ही हिरवीगार व अल्लाह दायक असतात.

सिंहगड येथील हवामान

सिंहगड किल्ला जवळील प्रदेशात सरासरी वार्षिक तापमान हे २४ डिग्री सेल्सियस इतके असते.

सिंहगड किल्ला येथे कसे जाल ?

सिंहगड किल्लाला भेट देण्यासाठी तुम्ही तीन पर्यायांचा वापर करू शकता. रस्ते मार्ग, रेल्वे मार्ग, किंवा हवाई मार्ग ते खालील प्रमाणे.

रस्ते मार्ग – सिंहगड किल्ल्याला जाण्यासाठी तुम्ही रस्ते मार्ग निवडू शकता. यासाठी तुम्ही स्वतःच्या वैयक्तिक वाहनाने किंवा बस बुक करून, सिंहगड किल्ला एक्सप्लोर करू शकता.

रेल्वे मार्ग – सिंहगड किल्ल्याला भेट देण्यासाठी सर्वात जवळचे रेल्वे स्थानक, पुणे रेल्वे स्थानक आहे. या रेल्वे स्थानकावर उतरून तुम्ही पीएमटी बस तसेच, कॅब, ऑटो बुक करून, पुणे रेल्वे स्थानकापासून साधारणतः १५  ते २० मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या सिंहगड किल्ल्याला भेट देऊ शकता.

हवाई मार्ग – सिंहगड किल्ल्याला भेट देण्यासाठी तुम्ही हवाई मार्ग निवडत असाल, तर पुणे हे सर्वात जवळचे विमानतळ आहे. या विमानतळावर उतरून तुम्ही ऑटो, कॅब, बसने किंवा गाडीने सिंहगड किल्ल्याला भेट देऊ शकता.

सिंहगड किल्ला

सिंहगड किल्ला जवळ राहण्याची सोय

सिंहगड किल्ल्याजवळ तुम्ही बजेटनुसार योग्य ते रूम घेऊन राहू शकता. रूम मध्ये विनामूल्य वायफाय, विनामूल्य पार्किंग, तसेच नाश्त्याची व योग्य प्रकारे जेवण खाण्याची सोय केली जाते. त्यापैकीच काही हॉटेल्स खालील प्रमाणे-

  • एम.टी.डी.सी. सिंहगड
  • हॉटेल सिंहगड व्हॅली
  • सिंहगड फार्म्स अँड रिसॉर्ट
  • हॉटेल सिंहगड
  • कोंढाणा गेस्ट हाऊस
  • किल्ले सिंहगडचा निसर्ग रिसॉर्ट

FAQ

सिंहगड किल्ल्या जवळील प्रेक्षणीय स्थळे कोणती?

पु.ल. देशपांडे उद्यान  
लाल महाल
सारसबाग
खडकवासला धरण
शिवनेरी किल्ला-
राजीव गांधी प्राणी संग्रहालय
सारसबाग
खडकवासला धरण
लोणावळा

सिंहगड किल्ल्याची वैशिष्ट्ये कोणती ?

कोंढाणा या नावाने ओळखला जाणारा सिंहगड हा किल्ला पुण्यातील एक सुप्रसिद्ध व लोकप्रिय किल्ला आहे. हा किल्ला हवेली तालुक्यातील डोणेज या गावात आहे. हे गाव पुण्यापासून ३५  ते ४० किलोमीटर एवढे अंतरावर आहे.

सिंहगड किल्ल्याचे पूर्वीचे नाव काय होते?

सिंहगड किल्ल्याचे पूर्वीचे नाव कोंढाणा होते

सिंहगड किल्ला व त्या जवळील प्रेक्षणीय स्थळे एक्सप्लोर करण्यासाठी किती कालावधी लागतो ?

सिंहगड किल्ला व त्या जवळील प्रेक्षणीय स्थळे एक्सप्लोर करण्यासाठी, साधारणतः तुम्हाला दोन ते तीन दिवस लागू शकतात

सिंहगड किल्ल्याची समुद्रसपाटीपासून उंची किती मीटर आहे?

सिंहगड किल्ल्याची समुद्रसपाटीपासून उंची १३१२ मीटर आहे.

मुंबई ते सिंहगड किल्ला अंतर व त्यासाठी लागणारा कालावधी किती?

मुंबई ते सिंहगड किल्ला हे अंतर साधारणतः १८० किलोमीटर इतके असून, प्रवासासाठी अंदाजे ३ तास लागू शकतात.

पुणे ते सिंहगड किल्ला हे अंतर किती व साधारणतः किती कालावधी लागू शकतो?

पुणे ते सिंहगड किल्ला हे अंतर साधारणतः ३० किलोमीटर इतके असून, प्रवासासाठी अंदाजे १ तास लागू शकतो.

सिंहगड किल्ल्याला भेट देण्यासाठी रेल्वे मार्गाने कसे जावे ?

सिंहगड किल्ल्याला भेट देण्यासाठी सर्वात जवळचे रेल्वे स्थानक, पुणे रेल्वे स्थानक आहे. या रेल्वे स्थानकावर उतरून तुम्ही पीएमटी बस तसेच, कॅब, ऑटो बुक करून, पुणे रेल्वे स्थानकापासून साधारणतः १५  ते २० मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या सिंहगड किल्ल्याला भेट देऊ शकता.

सिंहगड किल्ला ट्रेक चढाई पातळी कशी आहे ?

सिंहगड किल्ला ट्रेक अर्थात कोंढाणा किल्ल्याची चढाई पातळी ही सोपी ते मध्यम असून, नवीन ट्रेकर्स साठी तशी सोईस्कर आहे.

सिंहगड किल्ल्यावरील प्रेक्षणीय स्थळांचे थोडक्यात वर्णन करा.

दारूचे कोठार – किल्ल्यामध्ये प्रवेश केल्यानंतर किल्ल्याच्या उजव्या बाजूला असणाऱ्या दगडी इमारतीला दारूचे कोठार म्हणून ओळखले जायचे.
टिळक बंगला – रामलाल नंदराम यांच्याकडून या ठिकाणी जागा खरेदी करून, या जागेवरती बंगल्याची निर्मिती करण्यात आली. या बंगल्यामध्ये लोकमान्य टिळक येत असत व त्यामुळे या बंगल्याला टिळक बंगला असे नाव पडले. इसवी सन १९१५ साली महात्मा गांधी व लोकमान्य टिळक यांची याच टिळक बंगल्यावर भेट झाली होती.
कोंढाणेश्वर मंदिर – हे मंदिर शंकराला समर्पित असून यादव कुळांचे हे कुलदैवत होते. या ठिकाणी सध्या पिंडी व सांब आहे.
देवटाके – गडावर पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून, देवटाके बांधण्यात आले.
कल्याण दरवाजा – हा दरवाजा गडाच्या पश्चिमेस आहे.
सुभेदार तानाजी मालुसरे स्मारक – सिंहगड किल्ल्यावर ज्या तानाजींनी फक्त पाचशे मावळे घेऊन कोंढाणा किल्ला स्वराज्यात परत आणला स्वतःच्या प्राण्यांचे बलिदान दिले, अशा सिंहासारख्या व्यक्तिमत्व असणाऱ्या तानाजी मालुसरेंचे स्मारक देखील सिंहगड किल्ल्यावर बघण्यासारखे आहे. दरवर्षी या ठिकाणी नवमीस सुभेदार तानाजी मालुसरे यांचा स्मृतिदिन साजरा केला जातो.
राजाराम महाराज स्मारक – छत्रपती शिवाजी महाराजांचे मुलगा राजाराम महाराज यांचे देखील स्मारक सिंहगड किल्ल्यावर आहे.
उदयभान स्मारक – गडावर उदयभान स्मारक देखील आहे.

निष्कर्ष

मित्रहो, आम्ही आमच्या सिंहगड या लेखामधून सिंहगड किल्ल्याची माहिती, किल्ल्यावरील प्रेक्षणीय स्थळे, सिंहगड किल्ला ट्रेक इत्यादीची माहिती दिली आहे. हा लेख –SINHAGAD FORT INFORMATION IN MARATHI-तुम्ही नक्की वाचा. आणि कसा वाटला ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा.व मित्रपरिवारासोबत नक्की शेयर करा.

धन्यवाद.

Leave a comment