ताम्हिणी घाट माहिती मराठी : TAMHINI GHAT INFORMATION IN MARATHI LANGUAGE

ताम्हिणी घाट माहिती मराठी : TAMHINI GHAT INFORMATION IN MARATHI LANGUAGE – हे ठिकाण महाराष्ट्रातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय ठिकाणांपैकी एक आहे. निसर्ग सौंदर्याने नटलेल्या सुंदर अशा ठिकाणाला संपूर्ण भारत देशातून पर्यटक भेट देण्यासाठी येत असतात. महाराष्ट्रातील जवळजवळ प्रत्येक व्यक्तीच्या ताम्हिणी घाट परिचयाचा असेलच. सह्याद्री पर्वतरांगाच्या पश्चिम घाटांमध्ये वसलेले निसर्गरम्य ठिकाण म्हणजेच ताम्हिणी घाट. पावसाळ्यामध्ये या घाटाचे सौंदर्य अप्रतिम असते.

Table of Contents

ताम्हिणी घाट माहिती मराठी – TAMHINI GHAT INFORMATION IN MARATHI LANGUAGE

महाराष्ट्रातील बरेच निसर्गप्रेमी पर्यटक आपल्या सहलीचा घाटामध्ये मनमुराद आनंद घेत असतात. ताम्हिणी घाटला जाण्यासाठी मुंबई – गोवा या महामार्गाने जावे लागते. ताम्हिणी घाटात अनेक निसर्गरम्य ठिकाणे आहेत, जी पाहिल्यानंतर मन अगदी प्रसन्न होऊन जाईल. मित्रांनो या घाटामध्ये असलेल्या मुळशी धरणाचा देखावा हा अगदी पाहण्यासारखा आहे. जर तुम्हालाही निसर्गाचे खरे सौंदर्य अनुभवायचे असेल, तर नक्की या घाटाला भेट द्या.

प्रस्तावना

ताम्हिणी घाट पुणे शहराच्या पश्चिमेला असून, पिरंगुट आणि पौड गावाच्या मार्गाने घाटात जाता येते. ताम्हिणी मार्गावर निवे गावापासून दोन किलोमीटर अंतरावर उजव्या बाजूला एक रस्ता कुंडलिका व्हॅलीला जातो. हे ठिकाण पावसाळ्यात अत्यंत विलोभनीय आहे. कुंडलिका व्हॅली पासून माघारी दोन किलोमीटर आल्यावर, पुढे घाट साधारण ७ ते ८ किलोमीटर अंतरावर आहे. या घाटात पावसाळ्यात सुंदर धबधबे दिसतात.

TAMHINI GHAT INFORMATION IN MARATHI LANGUAGE

ताम्हिणी घाट कुठे आहे ?

ताम्हिणी घाट, पुणे, महाराष्ट्र. पश्चिम घाट पर्वत रांगांच्या शिखरावर वसलेला, हा घाट त्याच्या सभोवतालच्या निसर्गरम्य धबधबे, तलाव आणि घनदाट जंगलांसाठी प्रसिद्ध आहे. ऑक्टोबर ते नोव्हेंबर हा दौरा करण्यासाठी सर्वोत्तम वेळ आहे. मुळशी ते ताम्हिणीला जोडण्यासाठी ताम्हिणी रस्ता घाट सह्याद्री पर्वतरांगा कापून पुण्यातून कोकणात जाणारा मार्ग बनवतो. रस्ता आता खूप चांगला आणि नव्याने टाकण्यात आला आहे.

ताम्हिणी घाट माहिती कोष्टक

स्थळ ताम्हिणी घाट
भौगोलिक क्षेत्र पश्चिम घाट
मुंबई पासून अंतर मुंबईपासून १४० किलोमीटर
पुणे पासून अंतर पुण्यापासून ७० किलोमीटर
रस्ता पुणे – गोवा महामार्ग
पर्यटन स्थळे देवकुंड धबधबा, मुळशी धरण, कुंडलिका व्हॅली, कैलासगड किल्ला
घाटाची लांबी १५ किलोमीटर
Tamhini Ghat Information In Marathi

ताम्हिणी घाट इतिहास

पाली गावापासून घाट हा ४० किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे. हा घाट हा एक डोंगराळ घाट असून, हा घाट मुळशी व ताम्हिणी नावाच्या गावामध्ये स्थित आहे. पुण्यामधून कोकण मध्ये दळणवळणासाठी अतिरिक्त प्रवास मार्गांची गरज भासत असल्याकारणाने या दृष्टिकोनातून पर्वतरांगा छेदून या घाटाची निर्मिती करण्यात आली. हा घाट हा साधारणतः १५ किलोमीटर एवढ्या अंतरापर्यंत विस्तारला आहे. या घाटाचे सौंदर्य हे त्याच्या आजूबाजूच्या असलेल्या धबधब्यांनी, नाल्यांनी व आजूबाजूच्या विहंगम दृश्यामुळे परिपूर्ण आहे.

ताम्हिणी घाट हवामान

या घाटाचे स्थान पश्चिम घाट डोंगररांगांत असल्याने इथे भरपूर पाऊस पडतो. पावसाळ्यानंतर हिवाळ्यात इथे तापमान ११ अंश ते १२७ अंश इतके असते. उन्हाळ्यात मात्र या ठिकाणचे तपमान सरासरी ४० अंश ओलांडू शकते. हिवाळा हंगाम (डिसेंबर ते फेब्रुवारी) देखील भेट देण्यासाठी एक उत्तम वेळ आहे.

उन्हाळा – उन्हाळ्यामध्ये घाटाचे तापमान हे साधारणतः ४३ डिग्री सेल्सिअस इथपर्यंत असते.

पावसाळा- पावसाळ्यामध्ये घाट अतिशय आल्हाददायक व विलोभनीय असून या ठिकाणी हवामान हे थंड व तजेलदार असते. वार्षिक पर्जन्यमान हे साधारणतः ६४९९ मिलिमीटर एवढे असते.

हिवाळा – हिवाळ्याच्या काळात घाटाचे हवामान हे रात्रीच्या वेळी कमी असून साधारणतः ११ डिग्री सेल्सिअस पर्यंत असते. परंतु सकाळच्या वेळी ताम्हिणी घाटाचे हवामान हे साधारणतः २७ डिग्री सेल्सिअस पर्यंत असते.

ताम्हिणी घाट पर्यटनसाठी सर्वोत्तम महिना

घाट एक्सप्लोर करण्यासाठी मान्सूनचा कालावधी अर्थात जून ते सप्टेंबर हा महिना सर्वोत्तम महिना म्हणून समजला जातो. यावेळी पावसाळ्याच्या समृद्ध वातावरणामुळे हा घाट अतिशय सुंदर व विहंगम दृश्य यांनी खुलून निघतो. तुम्ही देखील या कालावधीमध्ये घाटाची मजा व सुखद अनुभव घेऊ शकता.

ताम्हिणी घाट आणि पावसाळा

पावसाळ्याच्या काळामध्ये हा घाट अविस्मरणीय असा अनुभव देऊन जातो. घाट हा अतिशय विकसित केलेला घाट असून त्याचे रस्ते हे अतिशय सुंदर बनवले आहे. यामुळे या ठिकाणी घाटाचा आनंद घेण्यात अजून जास्त मजा येते.

नक्की वाचा👉 चिंचोटी धबधबा

ताम्हिणी घाट नकाशा

ताम्हिणी घाट अंतर

  • मुंबई ते घाट अंतर व आवश्यक कालावधी – मुंबई ते Tamhini ghat हे अंतर साधारणता १४४ किलोमीटर एवढे असून, साधारणतः ४ तास एवढा कालावधी लागू शकतो.
  • पुणे ते घाट अंतर व आवश्यक कालावधी – पुणे ते Tamhini ghat अंतर हे साधारणतः ५४ किलोमीटर असून, त्यासाठी लागणारा कालावधी हा २ तास आहे.
ताम्हिणी घाट पर्यटन

ताम्हिणी घाट पर्यटन कालावधी

घाट व त्या जवळील प्रेक्षणीय स्थळे बघण्यासाठी साधारणतः तुम्हाला २ ते ३ दिवस लागू शकतात.

ताम्हिणी घाट का प्रसिद्ध आहे?

अप्रतिम निसर्ग – हा घाट हा कोलाड आणि या बॅकवॉटरमधला भाग आहे. त्यात विविध प्रकारचे हिरवे मखमली गालिचे, वाहणारे नाले, खाली वाकलेले गडद राखाडी ढग आणि अधूनमधून येणारे धबधबे. हे उत्स्फूर्त धबधबे लांबून पर्यटकांना आकर्षित करतात.

सुंदर धबधबे – या घाटातून मुळशी धरणाच्या बॅकवॉटरकडे जाणारा रस्ता जो पळसे येथील धबधब्याकडे जातो. या धबधब्यावर आजकाल गर्दी होत आहे. याच घाटाच्या जवळ आपल्याला देवकुंड धबधबा पाहायला मिळतो. या धबधब्याचे सौंदर्य अप्रतिम आहे. हा धबधबा पाहण्यासाठी देखील पर्यटकांची खूप मोठ्या प्रमाणात गर्दी असते. खरोखरच या घाटाचे सौंदर्य शब्दात सांगणे कठीण आहे.

पावसाळी पर्यटन – पावसाळ्यात हा संपूर्ण भाग लोकप्रिय ठिकाण बनतो. पावसाळ्यात हे ठिकाण अनेक धबधबे आणि ओढ्यांसह हिरव्यागार रंगात बदलते. मनमोहक निसर्ग, आल्हाददायक हवामान आणि धुके असलेले वातावरण यामुळे पश्चिम घाटातील पावसाळ्याची जादू पाहणाऱ्यांसाठी हा घाट हे एक अप्रतिम ठिकाण बनले आहे.

जैव विविधता – आता या घाटाला दुर्मिळ वनौषधी, वैविध्यपूर्ण पक्षी, कीटक आणि बिबट्यासह इतर वन्यप्राण्यांच्या वास्तव्यामुळे अभयारण्याचा दर्जा मिळणार आहे. अभयारण्याचा प्रस्ताव पुणे वन विभागाने तयार केला आहे आणि येत्या राज्यस्तरीय वन्यजीव मंडळाच्या बैठकीत ‘अभयारण्य’ यावर शिक्कामोर्तब होणार आहे.

गिर्यारोहण आणि ट्रेकिंग – ताम्हिणी येथे साहसी पर्यटक गिर्यारोहण आणि ट्रेकिंगसाठी भेट देतात. डोंगराळ आणि नयनरम्यपरिसर सर्वत्र ट्रेकर्स आणि हायकर्सना आकर्षित करतात. विविध ट्रेकिंग मार्ग,सरसगड आणि सुधागड यांसारख्या किल्ल्यांकडे जाणारे मार्ग, आजूबाजूच्या लँडस्केप्सचे विहंगम दृश्ये देतात, थ्रिल आणि एक्सप्लोरेशनचा घटक जोडतात.

रिव्हर राफ्टींग – कोलाड रिव्हर राफ्टींग आणि लवासा वॉटर स्पोर्ट ऍक्टिव्हिटी सेंटर येथे हौशी पर्यटक ऑक्टोबर ते एप्रिलपर्यंत या खेळांचा आनंद घेऊ शकतात.

वीकएंड गेटवे – हा घाट शहरी जीवनातील धावपळीपासून आराम मिळवण्यासाठी शहरी रहिवाशांसाठी वीकेंड गेटवे बनला आहे. हे निसर्गाच्या सान्निध्यात असलेले पर्यटन स्थल मनाला एक नवी उभारी देते. इथे आल्हाददायक हवामानाचा आनंद घेऊ शकतात आणि नैसर्गिक आकर्षणे एक्सप्लोर करू शकतात.

सोयी सुविधा – येथे येणाऱ्या पर्यटकांना या ठिकाणी सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध असल्याने, नेहमीच मोठ्या संख्येने पर्यटक या ठिकाणी येत असतात.

ताम्हिणी घाटावर कसे जायचे? 

रस्ते मार्ग –

ताम्हिणी हा पुणे व मुंबईपासून रस्त्यांनी जोडलेला असल्यामुळे, तुम्ही कॅब किंवा टॅक्सी व तुमच्या वैयक्तिक गाडीने भेट देऊ शकता. पण जर तुम्हा ताम्हिणी घाटाचे सौंदर्य जवळून पहावयाचे असल्यास बाईकने या घाटांमध्ये राईड करणे हा एक उत्तम पर्याय आहे.

  • पुण्यापासून : घाट पुणे शहरापासून जवळ आहे. त्यामुळे पुणे शहरातून प्रवास सुरू करा.
  • वाहतुकीचा मार्ग निवडा: घाटावर जाण्यासाठी तुमच्याकडे वेगवेगळे पर्याय आहेत:
  • कार : घाटापर्यंत खाजगी वाहनाने जाणे हा सोपा पर्याय आहे. पुण्यापासून अंदाजे ६० किलोमीटर अंतर असून गूगल मॅप प्रमाणे गेल्यास अंदाजे २ तास लागू शकतात.
  • सार्वजनिक वाहतुकीद्वारे: जर तुम्हाला सार्वजनिक वाहतुकीने जायचे असेल, तर पुण्याहून घाटापर्यंत बसने जाण्याचा पर्याय वापरा. बसचे वेळापत्रक आणि मार्गांसाठी पुणे महानगरपालिका (PMC) किंवा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) यांचे वेळापत्रक पाहून घ्या. अन्यथा तुम्ही शेअर टॅक्सींची निवड करू शकता किंवा पुण्याहून घाटापर्यंत पोहोचण्यासाठी खाजगी वाहन भाड्याने घेऊ शकता.

पुणे ते ताम्हिणी घाट मार्ग: पुणे ते घाट हा मार्ग खालीलप्रमाणे आहे:

  • पुण्याहून चांदणी चौकाकडे जावे.
  • चांदणी चौकातून, मुळशी धरणाकडे जाणारा पौंड रस्ता घ्यावा
  • मुळशी धरण ओलांडल्यावर पिरंगुट नावाच्या जंक्शनवर पोहोचता येते. या जंक्शनवर डावीकडे वळण घ्यावे.
  • याच रस्त्याने गेल्यावर लवकरच तुम्ही ताम्हिणी घाटाच्या वळणदार रस्त्यावर पोहोचतो. रस्त्यावरील चिन्हांचा वापर करावा किंवा आवश्यकतेनुसार दिशानिर्देश विचारा.

रेल्वे मार्ग –

मुंबई किंवा पुण्यापासून घाटापर्यंत जाण्यासाठी थेट रेल्वेचा संपर्क नाही. मात्र तुम्ही कर्जत या रेल्वे स्थानकावर उतरून ट्रेनने खोपोली रेल्वे स्थानकापर्यंत जाऊ शकता. नंतर तेथून तुम्ही टॅक्सी किंवा ऑटो बुक करून घाटापर्यंत जाऊ शकता.

हवाई मार्ग –

जर तुम्ही मुंबईवरून येथे विमानाने यायचा पर्याय निवडत असाल तर इथे कोणतेही एअरपोर्ट नाही. यासाठी तुम्हाला मुंबई एअरपोर्ट वरून किंवा जर तुम्ही पुण्यावरून येत असाल तर पुणे एअरपोर्टवरून घाटाला भेट देऊ शकता.

पुणे शहराला गोवा महामार्गावरील ठिकाणांशी जोडणाऱ्या घाटातून राज्याच्या बसेस आहेत. मुंबईहून मुंबई-गोवा महामार्गाने, ताम्हिणी घाटाने कोलाडला पोहोचता येते आणि कुंडलिका नदीवरील पूल ओलांडल्यानंतर मुळशी धरणाच्या बॅकवॉटरमार्गे पुण्याकडे जाणारे डावे वळण आहे.

रात्री प्रवासासाठी ताम्हिणी घाट सुरक्षित आहे का ?

tamhini ghat is not safe at night travel. = घाट रास्ता हा रात्रीच्या वेळी निर्जन असतो आणि हा जंगलातून जारा वळणदार घाट रस्ता असल्याने काही त्रास झाल्यास त्वरित मदत उपलब्ध होऊ शकत नाही.

ताम्हिणी घाटाजवळील प्रेक्षणीय स्थळे 

१. मुळशी धरण

mulshi dam

मुळशी धरण हे पाहण्यासाठी अत्यंत सुंदर व विलोभनीय आहे. पावसाच्या काळात या ठिकाणचे वातावरण हे अतिशय सुंदर व विलोभनीय होऊन जाते. या ठिकाणी कॅम्पिंग करणे, बोट रायडिंग, करणे इत्यादी आनंद तुम्ही घेऊ शकता. तुमच्या परिवारांसोबत किंवा मित्र परिवारासोबत या ठिकाणी वेळ घालवण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे.

२. कुंडलिका व्हॅली

कुंडलिका व्हॅली

घाटाच्या थोडसं पुढे आल्यानंतर सगळ्यात पहिलं प्रेक्षणीय स्थळ जे लागतं ते म्हणजे कुंडलिका व्हॅली. या व्हॅलीची विहंगम दृश्य व आल्हादाय वातावरण मन अगदी मोहन टाकते. या व्हॅलीचे दृश्य जणू काही स्वर्गासारखेच भासते. या ठिकाणी फोटोशूट करणे, किंवा प्री-वेडिंगसाठी, हे एक उत्तम ठिकाण म्हटले तरी हरकत नाही. कुंडलिका व्हॅलीला विजीट करण्यासाठी जर तुम्ही बाईक किंवा तुमच्या पर्सनल कारने विजिट करत असाल तर कुंडलिका व्हॅलीच्या जवळच पार्किंग एरिया सुद्धा उपलब्ध आहे.

३. अंदरबन जंगल ट्रेक

अंदरबन जंगल ट्रेक

कुंडलिका व्हॅलीच्या थोडासा पुढे गेल्यानंतर तुम्हाला अंदरबन जंगल ट्रेक  लागतो. हा ट्रेक साधारणतः चार ते पाच तासांचा असू शकतो. हा ट्रेक सुरक्षित तितका सोपा आहे. हा ट्रेक तुम्ही तुमच्या मित्रपरिवारांसोबत किंवा परिवारासोबत अतिशय सोप्या पद्धतीने पूर्ण करू शकता. पावसाळ्याच्या काळामध्ये या ठिकाणी ट्रेकिंग साठी येणे व या ठिकाणचा निसर्गरम्य परिसराचा आनंद घेणे ही एक वेगळीच मजा असते.

४. कैलासगड किल्ला

कैलासगड किल्ला

अंदरबन जंगल ट्रेकच्या थोडासा पुढे गेल्यानंतर तुम्हाला कैलास गड हा किल्ला लागतो. या किल्ल्याचा ट्रेक देखील अतिशय सोपा असून, त्याच्या माथ्यावर गेल्यानंतर त्याच्या आजूबाजूचा परिसर हा अतिशय सुंदर व डोळ्यात टिपून घेण्यासारखा आहे.

५. प्लस व्हॅली पॉईंट

प्लस व्हॅली पॉईंट

हल्लीच्या काळामध्ये कमी वेळातच प्रसिद्ध झालेला, प्लस व्हॅली पॉईंट हे देखील प्रेक्षणीय स्थळ घाटाच्या अगदी जवळ आहे.

टिप – प्लस व्हॅली पॉईंट किंवा कोणत्याही धबधब्याला भेट देतेवेळी, पाण्याचा रंग सफेद मधून चॉकलेटी किंवा कॉफी कलर मध्ये बदलल्यास, त्या ठिकाणी जास्त पाण्यात उतरण्याचा व अंघोळीचा मोह टाळावा. कारण पावसाळ्याच्या पाण्यामुळे पाण्याची खोली व प्रवाह अतिवेगाने होत असतो. त्यामुळे स्वतःची सुरक्षितता सुद्धा बाळगावी.

६. ताम्हिणी घाट व्ह्यू पॉईंट

tamhini ghat valley

या व्ह्यू पॉईंटवर उभे राहून तुम्ही ताम्हणी घाटच्या व्हॅलीचे व या ठिकाणील धबधब्याचे सुंदररित्या निरीक्षण करू शकता. व या मनमोहक नजाऱ्याचा आनंद घेऊ शकता. या पॉईंटवरून तुम्हाला घाटा मधील सौंदर्यता व विहंगाम दृश्य यांचा सुंदर अनुभव घेता येईल.

७. देवकुंड धबधबा (TAMHINI GHAT WATERFALL )

देवकुंड धबधबा

महाराष्ट्रामध्ये असे भरपूर सुंदर व विलोभनीय धबधबे आहेत, पण देवकुंड हा असा एक धबधबा आहे जो की कमी काळामध्ये लोकप्रिय पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्धीस आला. हा एक सुंदर धबधबा असून त्याच्या आजूबाजूचा परिसर हा अतिशय भन्नाट आहे. देवकुंड धबधब्याचा ट्रेक हा मध्यम प्रकाराचा असून यासाठी तुम्हाला एक दिवस पुरेसा आहे.

८. सीक्रेट धबधबा (TAMHINI GHAT WATERFALL 2)

secret waterfall tamhini

हा सुद्धा एक असा धबधबा आहे जो अतिशय कमी वेळामध्ये प्रसिद्धीस आला. या धबधब्याला सीक्रेट कुंड देखील म्हटले जाते.

९. कोलाड रिव्हर राफ्टींग

कोलाड रिव्हर राफ्टींग

कोलाड मध्ये अंदाजे दोन तासाच्या बोट ड्राफ्टिंगसाठी तुमच्याकडून १००० ते १५०० हजार रुपये आकारले जातात.

१०. ताम्हिणी घाट मार्ग

ताम्हिणी घाट मार्ग

खास करून बाईक रायडरसाठी हा घाट मार्ग हा एक आवडीचा विषय आहे. बाईकने या घाटातून राईड करताना आजूबाजूचा निसर्गरम्य परिसर व धबधबे तुम्ही बाईकने फिरून एन्जॉय करू शकता.

११. बल्लाळेश्वर मंदिर

बल्लाळेश्वर मंदिर

ताम्हिणी जवळच पाली हे गाव असून, या ठिकाणी बल्लाळेश्वर गणपती बाप्पाचे मंदिर असून, हे एक प्रमुख व प्राचीन मंदिर आहे.

१२. ताम्हिणी घाट धबधबा

ताम्हिणी घाट धबधबा

हा धबधबा बघण्यासाठी थोडीफार ट्रेकिंग करावी लागेल, ट्रेकिंग करून ज्यावेळी तुम्ही धबधब्याच्या माथ्याशी पोहोचता त्यावेळी या धबधब्याच्या विहिंगम दृश्याचा अनुभव घेण्याची मजा ही काही वेगळीच मिळते.

ताम्हिणी घाट जवळ करण्यासारख्या गोष्टी

ताम्हिणी घाट हा एक उत्तम सहासी ऍक्टिव्हिटी साठी व नेचर ट्रेलस् च्या दृष्टिकोनातून साहसी पर्यटन प्रेमीसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. ताम्हिणी घाटाजवळ तुम्ही खालील गोष्टी करू शकता,

१. ट्रेकिंग tamhini ghat trek

ताम्हिणी घाट विविध प्रकारच्या किल्ल्यांच्या ट्रेकिंगसाठी, तसेच कॅम्पिंगसाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी तुम्ही विविध प्रकारच्या निसर्गरम्य व विलोभनीय दृश्यांचा अनुभव घेत, कॅम्पिंग तसेच tamhini ghat trek करू शकता.

  • १. कोरीगड किल्ला ट्रेकिंग
  • २. सुधागड किल्ला ट्रेकिंग
  • ३. तिकोना किल्ला ट्रेकिंग
  • ४. मुळशी धरण कॅम्पिंग
  • ५. वरसगाव तलाव कॅम्पिंग
  • ६. ताम्हिणी घाटाच्या जवळ असलेल्या अंधरबन या जंगलामध्ये तुम्ही विविध प्रकारच्या पक्षांचे, वन्यजीवांचे निरीक्षण करून, तुमचा ट्रेक सुरू करू शकता.

२. रिव्हर राफ्टींग

ताम्हिणी घाटाच्या जवळ तुम्ही रिव्हर राफ्टींग, बोटिंग इत्यादीं तसेच विविध वॉटर स्पोर्ट ऍक्टिव्हिटीजचा आनंद घेऊ शकता.

  • कोलाड रिव्हर राफ्टींग
  • लवासा वॉटर स्पोर्ट ऍक्टिव्हिटी

३. फोटोशूट/पिकनिक स्पॉट

ताम्हिणी घाटाजवळ पावसाळ्याच्या काळात वातावरण हे अतिशय सुंदर व हिरवळीने नटून गेलेले असते. या हे ठिकाणी पिकनिक स्पॉट किंवा फोटोशूटसाठी हे ठिकाण योग्य ठरेल.

ताम्हिणी घाट एक्सप्लोर करण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स

ताम्हिणी घाट एक्सप्लोर करण्यासाठी खालील महत्त्वाच्या गोष्टी तुमच्यासोबत असणे गरजेचे आहे ;

  • गरम व उबदार कपडे जसे की स्वेटर, जॅकेट, जर्किन इत्यादी.
  • पावसाळ्याच्या काळामध्ये रेनकोट छत्री देखील सोबत ठेवावी.
  • पावसाळ्याच्या काळामध्ये घाट एक्सप्लोर करताना चप्पलचा वापर करू नये, कारण चप्पल घसरण्याची शक्यता जास्त असते, त्यामुळे तुम्ही चांगल्या दर्जाचे बूट वापरणे सोयीचे ठरते.
  • घाट एक्सप्लोर करतेवेळी स्वतःसोबत काही खाण्याच्या गोष्टी जसे की बिस्कीट, केक, चॉकलेट व पाण्याच्या बॉटल्स ठेवाव्यात. जेणेकरून गरजेच्या वेळी या गोष्टींचा वापर करू शकता.
  • मेडिकल किट्स अर्थात फर्स्ट एड बॉक्स सोबत ठेवावा. जेणेकरून काही इजा झाल्यास तुम्ही प्रथमोपचार घेऊ शकता.
  • योग्य ते कपडे परिधान करावे व जादा कपड्यांचे व बुटांचे जोड सोबत ठेवावे.

ताम्हिणी घाट एक्सप्लोर करतेवेळी काही मजेशीर स्ट्रीट फूड

  • १. भाजलेला मका – पावसाळ्याच्या काळामध्ये ताम्हिणी घाट एक्सप्लोर करतेवेळी भाजलेला भुट्टा खात खात व त्या ठिकाणचे विहंगम दृश्य अनुभवण्याची मजा ही काही वेगळीच असते. त्यामुळे घाट एक्सप्लोर करताना भाजलेला मका खाण्याचा अनुभव तुम्ही देखील नक्कीच घ्या.
  • २. कांदा भजी –पावसाळ्याच्या रिमझिम रिमझिम, संततधारेतून बरसणाऱ्या थेंबांनी ज्यावेळी सृष्टीमध्ये तजेलदारपणा येतो व वातावरण अगदी अल्हाददायक होऊन जाते. यावेळी परिसर जवळून न्याहाळण्यासाठी आपण बाहेर फिरतो. त्यावेळी त्या ठिकाणची कांदा भजी खाण्यात एक वेगळीच मजा असते. मित्रहो तुम्ही देखील ताम्हिणी घाट एक्सप्लोर करतेवेळी कांदा भजीची चव नक्कीच चाखावी.
  • ३. पकोडा – घाटातील पकोडा हे देखील स्ट्रीट फूड एकदम मस्त व प्रसिद्ध आहे. याचा देखील तुम्ही मनसोक्त आनंद घेऊन संपूर्ण ताम्हिणी घाट एक्सप्लोर करू शकता.

ताम्हिणी घाटाजवळ राहण्याची सोय

त्यापैकी काही पर्याय खालील प्रमाणे –

होमस्टे: तुमच्या बजेटनुसार बजेट फ्रेंडली होम स्टे, देखील घाटाच्या जवळ उपलब्ध आहेत.

निसर्ग शिबिरे आणि तंबू निवास :त्यापैकी काही हॉटेल्स हे धबधब्याच्या तसेच, व्ह्यू पॉईंटच्या जवळ असल्यामुळे, तुमचा ट्रेकिंगचा प्रवास अतिशय सुखदायक व जास्त वेळ न घालवता तुम्ही ट्रेकिंग करू शकता.

रिसॉर्ट्स आणि हॉटेल्स: ताम्हिणी घाटाच्या जवळ रस्त्याच्या कडेला लागून हॉटेल्स व रिसॉर्ट सोयी सुविधा उपलब्ध आहेत. तसेच काही अप्रतिम रिसॉर्ट्स खाली नमूद केली आहेत.

अतिथीगृहे आणि विश्रामगृहे : परवडणारी अतिथीगृहे आणि विश्रामगृहे शेजारच्या मुळशी आणि ताम्हिणी सारख्या गावामध्ये आहेत. या निवासस्थानांमध्ये आरामदायी मुक्कामासाठी थोड्याफार मूलभूत सुविधा उपलब्ध आहेत. ऑनलाइन ट्रॅव्हल पोर्टल आणि स्थानिक पर्यटन कार्यालये या तुम्हाला उपलब्ध गेस्टहाऊस आणि लॉजची माहिती देऊ शकतात.

१. अँकर अ बायोटिक रिसॉर्ट

हे रीसॉर्ट ताम्हिणी घाटापासून साधारणतः १.४ किलोमीटर इतक्या अंतरावर आहे. हे हॉटेल निसर्गाच्या कुशीमध्ये वसलेले असून एक ३ स्टार हॉटेल आहे. या रिसॉर्ट मध्ये तुम्हाला जॉगिंग ट्रॅक, एक सुंदर स्विमिंग पूल, गेम रूम्स, रेस्टॉरंट व विविध व्यू पॉइंट उपलब्ध आहे. फ्री वायफाय, पार्किंग एरिया, वातानुकूलित रूम, नाश्ता सुविधा, एअरपोर्ट पिकप आणि ड्रॉप तसेच जिम, स्पा सेंटर इत्यादी सोयी सुविधा या हॉटेलमध्ये उपलब्ध आहेत.

२. लेक व्ह्यू रिसॉर्ट, लवासा

हे रिसॉर्ट ताम्हिणी घाटापासून साधारणतः १०.६ किलोमीटर इतक्या अंतरावर असून. एक सुंदर व निसर्गाच्या सानिध्यात असलेले रिसॉर्ट आहे. या रिसॉर्ट मध्ये तुम्हाला फ्री वायफाय, वातानुकूलित रूम, ब्रेकफास्टची सोयी सुविधा, स्विमिंग पूल इत्यादी सोय उपलब्ध आहेत.

३. रेसिडेन्सी लेक रिसॉर्ट आणि स्पा

हे रिसॉर्ट ताम्हिणी घाटापासून साधारणतः ४.१ किलोमीटर इतक्या अंतरावर असून, हे एक ३ स्टार हॉटेल आहे. या रिसॉर्ट मध्ये टेबल टेनिस, आणि बिलियर टेबल, याव्यतिरिक्त पूल, बार आणि रेस्टॉरंटची सुविधा उपलब्ध आहे. हे रिसॉर्ट स्थानिक लोकप्रिय रेस्टॉरंट वेढलेले असून, मुळशी या गावापासून साधारणतः १०० मीटर इतक्या अंतरावर ती आहे. या रिसॉर्ट मध्ये फ्री पार्किंग, फ्री वाय-फाय, नाष्ट्याची सुविधा, स्विमिंग पूल वातानुकूलित रूम, चांगली रूम सर्विस, इत्यादी सोयी सुविधा उपलब्ध आहेत.

४. पोर्टोफिनो

पोर्टोफिनो रीसॉर्ट हे ताम्हिणी घाटापासून अंदाजे ९.१ किलोमीटर अंतरावर असून, हे एक स्वच्छ व निसर्ग सानिध्यामध्ये वेढलेले रिसॉर्ट आहे. यामध्ये तुम्हाला पार्किंगची सुविधा वायफायची सुविधा, नाश्त्याची खाण्याची सुविधा उपलब्ध आहे.

५. लवासा हॉलिडे होम

हे हॉटेल ताम्हिणी घाटापासून साधारणतः ९.४ किलोमीटर इतक्या अंतरावर असून, या हॉटेलमध्ये पार्किंगची सुविधा, वायफायची सुविधा, तसेच विनामूल्य नाश्ता, रूम सर्विस, लेक व्हू पॉईंट, इत्यादी सुविधा उपलब्ध आहे.

६. झोस्टेल कोलाड

हे हॉटेल ताम्हिणी घाटापासून साधारणतः २७.९ किलोमीटर अंतरावर असून या हॉटेलमध्ये पार्किंगची सुविधा मिनी बार वायफायची सुविधा विनामूल्य नाश्ता, वातानुकूलित रूम इत्यादी सोयी सुविधा उपलब्ध आहे.

७. द वॉटर फ्रंट शॉ लवासा

हे हॉटेल ताम्हिणी घाटापासून साधारणतः ९.२ किलोमीटर अंतरावर असून, या हॉटेलमध्ये तुम्हाला विनामूल्य पार्किंग, वायफायची सुविधा, खाण्याची सुविधा व तुमच्या बजेटनुसार विविध सोयी सुविधा उपलब्ध आहेत.

८. लवासा लक्झरी लेक व्ह्यू स्टुडिओ

हे हॉटेल ताम्हिणी घाटापासून अंदाजे ९.३ किलोमीटर अंतरावर असून, या हॉटेलमध्ये तुम्हाला पार्किंगची सुविधा वायफायची सुविधा, खाण्याची सुविधा, वातानुकूलित रूम, स्विमिंग पूल, व्हू पॉईंट सोयी सुविधा उपलब्ध आहेत.

९. लवासा लक्झरी डेक अपार्टमेंट

हे रिसॉर्ट ताम्हिणी घाटापासून अंदाजे ९.४ किलोमीटर एवढ्या अंतरावर असून, या रिसॉर्ट मध्ये पार्किंगची सुविधा वायफायची सुविधा, उत्तम खाण्यापिण्याची सोय उपलब्ध आहे.

१०. इंद्रधनुष्य हिल रिसॉर्ट

हे रिसॉर्ट ताम्हिणी घाटापासून साधारणतः ११.४ किलोमीटर इतक्या अंतरावर असून, या हॉटेलमध्ये विनामूल्य पार्किंग, वायफायची सुविधा, मिनी बार, स्विमिंग पूल, उत्तम दर्जाच्या खाण्याची सोय उपलब्ध आहे.

थोडक्यात पण महत्वाचे – ताम्हिणी घाट अभयारण्य

कोणत्याही ऋतूत रिफ्रेश होण्यासठी निसर्गरम्य ताम्हिणी घाटात जाणार्‍यांची संख्या खूप मोठी आहे. ताम्हिणी ही तेथील वनसंपदा आणि वनजीवांचे संशोधन करणार्‍या निसर्गप्रेमींसाठी एक हक्काची प्रयोगशाळा आहे. त्यामुळेच १९९९ साली ‘ताम्हिणी सुधागड अभयारण्य’ हे घोषित करण्यासाठी वन विभागाने सरकारला प्रस्ताव पाठविला होता. त्यावेळी २२८.२४ स्क्वेअर किलोमीटर हा पुणे आणि रायगड जिल्ह्यातील परिसर आरक्षित करण्याचा विचार होता. मात्र, या परिसरात गावकरी रहात असल्यामुळे त्यांनी अभयारण्याला विरोध केला.

ताम्हिणीच्या मध्यवर्ती भागात जैवविविधता आहे व याला संरक्षण देण्या हेतू वन विभागाने आता नव्याने प्रस्ताव तयार करुन क्षेत्रफळ कमी केले आहे. ‘ताम्हिणी घाटाला महत्त्व पश्चिम घाटातील भीमाशंकर अभयारण्य, कोयना, चांदोली अभयारण्यएवढेच आहे. हा परिसर जैववैविध्याने नटलेला आहे व याला संरक्षण देण्याची गरज आहे. त्यामुळे या परिसरातील गावांना वगळले आहे आणि ३८ स्क्वेअर किलोमीटरचा जो वनाच्छित परिसर आहे त्याचा अभयारण्याच्या नव्या प्रस्तावात समावेश केला आहे.

गावकर्‍यांचा त्यामुळे विरोध होणार नाही,’ असे पुणे विभागाचे मुख्यवनसंरक्षक नितीन काकोडकर म्हणाले. ‘सुधागड वनक्षेत्रही या प्रस्तावात घेतले होते. पण यावेळी ते वगळले असून, सुधागड ताम्हिणी घाट अभयारण्य चा स्वतंत्र प्रस्ताव रोहा वनविभागातर्फे तयार करण्यात येणार आहे. हा प्रस्ताव राज्याच्या वन्यजीव मंडळाकडे पाठविला आहे व त्यांच्या बैठकीत हिरवा कंदील मिळेल,’ असेही त्यांनी सांगितले.

FAQ

मुंबई पासून ताम्हिणी घाट हा किती अंतरावर आहे?

मुंबई ते ताम्हिणी घाट हे अंतर साधारणतः १४४ किलोमीटर एवढे असून अंदाजे प्रवासासाठी ४ तास एवढा कालावधी लागू शकतो.

ताम्हणी घाट जवळील प्रेक्षणीय स्थळे कोणती ?

मुळशी धरण
देवकुंड धबधबा
कुंडलिका व्हॅली
प्लस वाली पॉईंट
ताम्हिणी घाट पॉईंट
ताम्हिणी घाट धबधबा
बल्लाळेश्वर मंदिर.

ताम्हिणी घाट चे थोडक्यात वर्णन करा.

ताम्हिणी घाट पुणे शहराच्या पश्चिमेला असून, पिरंगुट आणिपौड गावाच्या मार्गाने ताम्हणी घाटात जाता येते. ताम्हिणी घाट मार्गावर निवे गावापासून दोन किलोमीटर अंतरावर उजव्या बाजूला एक रस्ता कुंडलिका व्ह्याली  जातो. हे ठिकाण पावसाळ्यात अत्यंत विलोभनीय आहे कुंडलिका व्ह्याली पासून माघारी दोन किलोमीटर आल्यावर, पुढे TAMHINI GHAT साधारण ७ ते ८ किलोमीटर अंतरावर आहे. ताम्हिणी घाटात पावसाळ्यात सुंदर धबधबे दिसतात.

ताम्हिणी घाटला भेट देण्यासाठी उत्तम महिना कोणता?

TAMHINI GHAT एक्सप्लोर करण्यासाठी मान्सूनचा कालावधी अर्थात जून ते सप्टेंबर हा महिना सर्वोत्तम महिना म्हणून समजला जातो. यावेळी पावसाळ्याच्या समृद्ध वातावरणामुळे हा घाट अतिशय सुंदर व विहंगम दृश्य यांनी खुलून निघतो. तुम्ही देखील या कालावधीमध्ये ताम्हिणी घाटाची मजा व सुखद अनुभव घेऊ शकता.

ताम्हिणी घाट मधील हवामान कसे असते ?

उन्हाळा – उन्हाळ्यामध्ये ताम्हिणी घाटाचे हवामान हे साधारणतः ४३ डिग्री सेल्सिअस इथपर्यंत असते.
पावसाळा- पावसाळ्यामध्ये ताम्हणी घाट अतिशय आल्हादायक व विलोभनीय असून या ठिकाणी हवामान हे थंड व तजेलदार असते. त्या ठिकाणी वार्षिक पर्जन्य हे साधारणतः ६४९९ मिलिमीटर एवढे असते.
हिवाळा – हिवाळ्याच्या काळात ताम्हणी घाटाचे हवामान हे रात्रीच्या वेळी कमी असून साधारणतः ११ डिग्री सेल्सिअस पर्यंत असते.

निष्कर्ष

मित्रहो , आजच्या TAMHINI GHAT INFORMATION IN MARATHI LANGUAGE या लेखातून आम्ही आपणास TAMHINI GHAT मधील प्रेक्षणीय स्थळे व ताम्हिणी घाटाबद्दल माहिती दिली आहे. हा लेख नक्की वाचा व कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा.

धन्यवाद.

Leave a comment