कोलाड संपूर्ण माहिती मराठी | Kolad Information In Marathi

कोलाड संपूर्ण माहिती मराठी | Kolad Information In Marathi – तुम्ही तुमची पावसाळी सहल मजेदार व साहसी बनवण्यास उत्सुक तर असालच नाही का ? अशावेळी तुम्ही पावसाळ्यातील सर्वोत्तम ठिकाण शोधत असताना, महाराष्ट्रातील सुंदर विकेंड डेस्टिनेशन म्हणून कोलाडकडे पाहिले जाते. फोटोशूटसाठी, राहण्यासाठी तसेच उत्साही एडवेंचर ऍक्टिव्हिटीजसाठी इथे विविध प्रकारच्या सोयी उपलब्ध आहेत. आम्ही आमच्या आजच्या लेखातून आपणास कोलाड या प्रसिद्ध प्रेक्षणीय स्थळाबद्दल माहिती दिली आहे. हा लेख तुम्ही नक्की वाचा.

Table of Contents

कोलाड संपूर्ण माहिती मराठी | Kolad Information In Marathi

गाव कोलाड
तालुका रोहा
जिल्हा रायगड
महत्व पर्यटन स्थळ
नदी –कुंडलीका नदी
प्रसिद्ध का आहे रिव्हर राफ्टींग

कोलाड हे ठिकाण महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक आहे. महाराष्ट्रातील बरेच निसर्गप्रेमी पर्यटक आवर्जून या ठिकाणाला भेट देण्यासाठी येत असतात. कोलाड हे महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील एक छोटेसे सुंदर गाव आहे. चारही बाजूंनी सह्याद्री पर्वतरांगांनी वेढलेल्या गावात पावसाळ्यामध्ये खूप गर्दी पाहायला मिळते. त्याचबरोबर या ठिकाणी आजूबाजूला घनदाट सदाहरित जंगल आहेत.

Kolad Information In Marathi

येथील हिरवळ सुंदर वातावरण पाहून मन अगदी थक्क होऊन जाईल. कोलाड हे प्रेक्षणीय स्थळांचा एक खजिनाच आहे, असे जरी म्हटले तरी वावगे ठरणार नाही. गेल्या काही वर्षात कोलाड हे ठिकाण या ठिकाणी असणाऱ्या एडवेंचर उपक्रमासाठी प्रसिद्ध झाले,त्यामुळे महाराष्ट्रा बरोबर भारतातील बरेच पर्यटन आवर्जून या ठिकाणाला भेट देण्यासाठी येत असतात. कोलाड हे बोटिंग सारख्या वॉटरस्पोर्ट ऍक्टिव्हिटीसाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी हायकिंग, कॅम्पिंग, नेचर वॉक, ट्रेकिंग आणि बंजी जंपिंग यासारखे खेळ उपलब्ध आहेत.

कोलाड पर्यटन स्थळ नकाशा

कोलाड रिव्हर राफ्टींग kolad river rafting

रायगड जिल्ह्यामधील निसर्ग संपत्तीने समृद्ध असलेले कोलाड हे एक छोटेसे गाव असून, हे गाव त्याला लाभलेल्या सुंदर व्हाईट वॉटर राफ्टींगसाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी तुम्ही साहसी क्रीडा करू शकता. इथले धबधबे, हिरवागार परिसर, सह्याद्रीचा नयनरम्य नजारा यामुळे हे गाव ओळखले जाते. इथल्या नदीमध्ये विविध प्रकारच्या सहासी वॉटर ऍक्टिव्हिटीज केल्या जातात. जसे की रॅपलिंग आणि कायाकिंग वगैरे.

कोलाडमधील रिव्हर राफ्टींगला व्हाईट वॉटर राफ्टींग असे देखील म्हटले जाते. ही राफ्टिंग कुंडलिका नदीमध्ये केली जाते. कुंडलिका नदी दक्षिणेकडून जलद गतीने वाहणाऱ्या नद्यांपैकी एक समजली जाते.

कुंडलिका नदी ही नदी कोलाडचे प्रमुख आकर्षण असून, रिव्हर राफ्टींग सोबत, रिव्हर झिपलाईन, क्रॉसिंग, कॅनोइंग इत्यादी साहसी ऍक्टिव्हिटीज केल्या जातात. कोलाड रिव्हर राफ्टिंग साजे गावामधून चालू होते. साजे गावाच्या जवळूनच कुंडलिका नदी वाहते.

kolad river rafting
Kolad Information In Marathi

रिव्हर राफ्टींग बद्दल काही महत्त्वाचे मुद्दे

  • कोलाड मधील रिव्हर राफ्टींग वर्षभर चालू असते.
  • रिव्हर राफ्टिंग साठी बुकिंग आधीच करणे गरजेचे आहे.
  • तुम्ही राफ्टिंगसाठी बुकिंग ही त्याच दिवशी करत असाल तर त्यासाठी परवानगी नाही.
  • बुकिंग प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर रिव्हर राफ्टिंगसाठी योग्य त्या पत्त्याचे किंवा गुगल मॅपचे अनुसरण करावे.
  • वय मर्यादा १५+रिव्हर राफ्टिंग साठी गरजेची आहे.
  • वजनाची मर्यादा – ४० ते ११० किलो .
  • रिव्हर ड्राफ्टिंगच्या दरम्याने १.५ ते २ तासात जवळपास ११ ते १२ किलोमीटर अंतर कापले जाते.
  • कोलाडच्या एडवेंचर पॅकेज मध्ये उत्तम प्रकारच्या सहा उपक्रमांचा समावेश आहे.

चिंचोटी धबधबा

कोलाड जवळील प्रेक्षणीय स्थळे – place to visit in kolad

भिरा धरण

भिरा धरण

भिरा धरण हे कोलाड जवळील अतिशय सुंदर प्रेक्षणीय स्थळ असून हे धरण कोलाड पासून साधारणतः ३० किलोमीटर अंतरावर  आहे. हे एक प्रसिद्ध पिकनिक स्पॉट तसेच फोटोग्राफीसाठी व बोटिंग सारख्या ऍक्टिव्हिटीसाठी प्रसिद्ध आहे.

देवकुंड धबधबा

देवकुंड धबधबा

देवकुंड धबधबा हा कोलाड पासून साधारणतः ३० किलोमीटर अंतरावर स्थित असून, हा एक सुंदर व अप्रतिम धबधबा आहे. देवकुंड धबधबा त्याच्या आजूबाजूला असलेल्या सुंदर परिसरामुळे व हिरव्यागार झाडांनी वेढलेला आहे. असे म्हणतात की पूर्वी या कुंडामध्ये देव स्नान करायला येत यामुळे या धबधब्याला देवकुंड धबधबा असे नाव मिळाले.

प्लस व्हॅली पॉईंट

प्लस व्हॅली पॉईंट

कोलाड जवळील प्लस व्हॅली पॉईंट हा साधारणतः ४५ किलोमीटर अंतरावर असणारा सुंदर पॉईंट असून, ह्याचा ट्रेक हा साधारणतः मध्यम आहे. हा पॉईंट विलोभनीय दृश्यांसाठी ओळखला जातो.

ताम्हिणी घाट

ताम्हिणी घाट

ताम्हिणी घाट हे त्याच्या सुंदर धबधब्यामुळे, आजूबाजूच्या हिरव्यागार परिसरामुळे प्रसिद्ध आहे. हा घाट कोलाड पासून साधारणतः ३७ किलोमीटर अंतरावर स्थित आहे. ताम्हिणी घाटाच्या आजूबाजूला विविध प्रेक्षणीय स्थळे आहेत व या स्थळांचा तुम्ही मनमुराद आनंद घेऊ शकता.

घोसाळगड किल्ला

घोसाळगड किल्ला

कोलाडपासून हा किल्ला साधारणतः २२ किलोमीटर इतक्या अंतरावर असून त्याच्या अद्भुत कोरीव कामांमुळे व रचनेमुळे तो प्रसिद्ध आहे. मुख्यतः या किल्ल्याच्या वास्तुकला आणि रचनेसाठी हा किल्ला ओळखला जातो. हा किल्ला खरोखरच इतिहास प्रेमींसाठी एक उत्तम असे पर्यटन केंद्र आहे. या किल्ल्याची रचना पर्यटकांना मोठ्या संख्येने आकर्षित करते. किल्ल्याच्या आवारात दोन मंदिरे, दर्गा भांडार तसेच कोठडी दिसून येते

सुतारवाडी तलाव

सुंदर परिसर आणि मनमोहक वातावरण असलेले हे एक प्राचीन तलाव आहे पक्षी निरीक्षक आणि निसर्गप्रेमींसाठी या सरोवराचा एक परिपूर्ण ठिकाण म्हणून उल्लेख करणे चुकीचे ठरत नाही.

कोलाडला भेट देण्यासाठी सर्वोत्तम महिना

उन्हाळा – उन्हाळ्याच्या वेळी अतिप्रकर उन्हामुळे कोलाड मधील प्रेक्षणीय स्थळे एक्सप्लोर करणे व त्या ठिकाणी रिव्हर राफ्टींगचा आनंद घेणे तितकेसे आनंददायी नसते.

पावसाळा – कोलाड मधील प्रेक्षणीय स्थळे व पावसाळ्याचा आनंद घेण्यासाठी जून ते सप्टेंबर हा उत्तम कालावधी समजला जातो. यावेळी तुम्ही योग्यरीत्या रिव्हर राफ्टिंगचा अनुभव घेऊ शकता. त्याचबरोबर आजूबाजूचा हिरवागार निसर्गरम्य परिसर पाहू शकता. पावसाळ्याच्या काळात या ठिकाणी धबधब्यांमध्ये नवसंजीवनी येते व आजूबाजूचा परिसर हा अतिशय सुंदर व डोळ्यांमध्ये टिपून घेण्यासारखा असतो.

हिवाळा – कोलाड मधील प्रेक्षणीय स्थळे एक्सप्लोर करण्यासाठी व रिव्हर राफ्टींगचा अनुभव घेण्यासाठी तुम्ही हिवाळ्यामध्ये अर्थात ऑक्टोंबर ते फेब च्या दरम्याने भेट देऊ शकता.

मुख्य शहर ते कोलाड अंतर व आवश्यक कालावधी 

मुंबई ते कोलाड अंतर व आवश्यक कालावधी

मुंबई ते कोलाड हे अंतर साधारणतः १२० km एवढे असून प्रवासाठी साधारणतः १.५ ते २ तास लागू शकतात.

पुणे ते कोलाड अंतर व आवश्यक कालावधी 

पुणे ते कोलाड अंतर साधारणतः ११० km एवढे असून प्रवासाठी साधारणतः ३ तास लागू शकतात.

कालावधी /दिवस – कोलाड जवळील प्रेक्षणीय स्थळांना भेट देण्यासाठी तुम्हाला साधारणतः एक ते दोन दिवस पुरेसे आहे

कोलाड मधील हवामान – Kolad Information In Marathi

पावसाळा – पावसाळ्याच्या काळामध्ये कोलाड मधील हवामान हे आल्हादायक व सुखकर असते. यावेळी साधारणतः२५०० मिलिमीटर ते ५००० हजार मिलिमीटर पर्यंत पाऊस पडतो. व यावेळी या ठिकाणी वातावरण हे दमट असते.

उन्हाळा – उन्हाळ्याच्या काळात कोलाड मधील वातावरण हे उष्ण असते. व या ठिकाणी टेंपरेचर हे साधारणतः ४० डिग्री सेल्सिअसच्या आसपास जाते.

हिवाळा – हिवाळ्यामध्ये या ठिकाणील हवामान हे मध्यम असून वातावरणामध्ये थंड व कोरडेपणा जाणवतो. व यावेळी साधारणतः २८ डिग्री सेल्सिअस पर्यंत हवामान असते.

कोलाड मधील बोलल्या जाणाऱ्या भाषा

  • मराठी
  • हिंदी
  • इंग्रजी

कोलाडमधील सोयी – सुविधा

  • कोलाड मध्ये जर तुम्ही पर्यटनासाठी येत असाल, तर या ठिकाणी तुम्हाला तुमच्या बजेटनुसार हॉटेल्स, कॉटेजेस होमस्टे आणि रिव्हर साईड कॅम्पिंगच्या सुविधा उपलब्ध आहेत.
  • अत्यावश्यक वेळेमध्ये दवाखाने सुद्धा कोलाड मध्ये उपलब्ध आहे.
  • साधारणतः १ किलोमीटर अंतरावर कोलाडचे पोस्ट ऑफिस आहे.
  • अत्यावश्यक कामांसाठी पोलीस स्टेशन देखील साधारणतः २ किलोमीटर अंतरावर आहे.

कोलाडमधील खाद्यपदार्थ

रायगड जिल्ह्यातील कोलाड हे गाव त्याच्या महाराष्ट्रीयन जेवणासाठी प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर जर कोण चायनीज प्रेमी असेल, किंवा पंजाबी व साउथ इंडियन पदार्थ खायचे शौकीन असतील, तर त्यांना सुद्धा सुविधा कोलाड मधील रेस्टॉरंट मध्ये उपलब्ध आहेत.

कोलाडमध्ये राहण्याची सोय

कोलाड मध्ये तुमच्या बजेटनुसार कॉटेजेस, रिसॉर्ट, हॉटेल्स इत्यादी सोयी उपलब्ध आहेत. त्याचबरोबर तुम्ही तलावाच्या साईटला कॅम्पिंग करून सुद्धा राहू शकता. खालील काही हॉटेल्स व रिसॉर्टची नावे आहेत या ठिकाणी देखील तुम्ही पूर्व बुकिंग करून राहण्याची सोय करू शकता.

१. द रुद्र रिसॉर्ट

हे रिसॉर्ट कोलाड पासून साधारणतः ७.३ किलोमीटर अंतरावर आहे. हे रिसॉर्ट तुम्हाला आउटडोर स्विमिंग पूल, विनामूल्य पार्किंग एरिया, जिमखाना व सुंदर असे गार्डन इत्यादी सोयी सुविधा पुरवते.

२. झोस्टेल कोलाड

हे हॉटेल कोलाड पासून साधारणतः २.५ किलोमीटर अंतरावर असून, या हॉटेलमध्ये तुम्हाला रेस्टॉरंट, मिनी बार गार्डन एरिया, विनामूल्य वायफाय इत्यादी सोयी सुविधा दिल्या जातात.

३. स्टर्लिंग नेचर ट्रेलस कुंडलिका कोलाड

हे हॉटेल कोलाड पासून साधारणतः ७.७ किलोमीटर अंतरावर आहे. या ठिकाणी तुम्हाला आउटडोअर स्विमिंग पूल, वॉटर स्पोर्ट ऍक्टिव्हिटीज, कुंडलिका राफ्टींग कॅम्पिंग इत्यादी सोयी सुविधा पुरविल्या जातात.

४. सॅफ्रॉन स्टे मेदोरी, कोलाड

हे हॉटेल साधारणतः ५ किलोमीटर इतके अंतरावरती आहे. या ठिकाणी तुम्हाला आउटडोर स्विमिंग पूल, गार्डन, रिव्हर राफ्टींग, कॅम्पिंग, फ्री वायफाय  इत्यादी सोयी सुविधा दिल्या जातात.

५. इको स्टे ग्रीन पॅराडाईज विला

हा विला कोलाड पासून साधारणतः १०.६ किलोमीटर इतक्या अंतरावर असून, या ठिकाणी तुम्हाला आउटडोर स्विमिंग पूल, गार्डन एरिया, रेस्टॉरंट सोयी सुविधा दिल्या जातात.

कोलाडला कसे जाल?

कोलाडला येण्यासाठी तुम्ही तीन पर्यायांचा वापर करू शकता.

१.रस्ते मार्ग – कोलाडला जाण्यासाठी तुम्ही मुंबई किंवा पुणे वरून डायरेक्ट कॅब बुक करून येऊ शकता. ज्याचे कमीत कमी ६०० ते १००० दरम्याने एका दिवसाचे चार्जेस आहे.

२. रेल्वे मार्ग – कोलाडला जाण्यासाठी लोणावळा स्टेशन वरून तुम्ही कॅब बुक करून कोलाडला येऊ शकता.

३.हवाई मार्ग – कोलाड मध्ये विमानतळ सुविधा उपलब्ध नाही. पुण्यावरून जर तुम्ही कोलाड ला येत असाल तर पुणे विमानतळ हे सगळ्यात जवळचे विमानतळ आहे, व जर तुम्ही मुंबईवरून कोलाड ला येत असाल तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे सगळ्यात जवळचे विमानतळ आहे.

  • लोणावळ्यापासून 80 ते 92 किलोमीटर आहे.
  • लवासापासून ताम्हिणी रोड मार्गे 129 किलोमीटर
  • पुण्यापासून ताम्हिणी घाट रस्त्याने 113 किलोमीटर आहे.

FAQ

कोलाड का प्रसिद्ध आहे ?

कोलाड मध्ये केली जाणारी रिव्हर राफ्टींग ही पर्यटकांना भुरळ घालते व या ठिकाणी असणारे प्रेक्षणीय स्थळ एक्सप्लोर करण्यासाठी कोलाड हे प्रेक्षणीय स्थळ या दृष्टिकोनातून बघितले जाते. व यामुळे यास प्रसिद्धी मिळाली आहे.

रिवर राफ्टींग थोडक्यात वर्णन.

कोलाड मधील रिव्हर राफ्टींग वर्षभर चालू असते. रिव्हर राफ्टिंग साठी बुकिंग आधीच करणे गरजेचे आहे. तुम्ही राफ्टिंगसाठी बुकिंग ही त्याच दिवशी करत असाल तर त्यासाठी परवानगी नाही.बुकिंग प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर रिव्हर राफ्टिंगसाठी योग्य त्या पत्त्याचे किंवा गुगल मॅप चे अनुसरण करावे.वय मर्यादा १५+रिव्हर राफ्टिंग साठी गरजेची आहे.

कोलाड मधील दोन प्रेक्षणीय स्थळांची माहिती.

प्लस व्हॅली पॉईंट –
कोलाड जवळील प्लस व्हॅली पॉईंट हा साधारणतः ४५ किलोमीटर अंतरावर असणारा सुंदर पॉईंट असून, ह्याचा ट्रेक हा साधारणतः मध्यम आहे. हा पॉईंट विलोभनीय दृश्यांसाठी ओळखला जातो.
ताम्हिणी घाट –
ताम्हिणी घाट हे त्याच्या सुंदर धबधब्यामुळे, आजूबाजूच्या हिरव्यागार परिसरामुळे प्रसिद्ध आहे. हा घाट कोलाड पासून साधारणतः ३७ किलोमीटर अंतरावर स्थित आहे. ताम्हिणी घाटाच्या आजूबाजूला विविध प्रेक्षणीय स्थळे आहेत व या स्थळांचा तुम्ही मनमुराद आनंद घेऊ शकता.

कोलाड हे गाव कोणत्या जिल्ह्यात येते?

कोलाड हे गाव रायगड जिल्ह्यामध्ये येते.

मुंबई ते कोलाड हे अंतर किती आहे? व त्यासाठी लागणारा आवश्यक कालावधी किती?

मुंबई ते कोलाड हे अंतर साधारणतः १२० km एवढे असून प्रवासाठी साधारणतः १.५ ते २ तास लागू शकतात.

कोलाड जवळ कोणते शहर आहे?

मुंबईपासून कोलाड हे सुमारे 110 किलोमीटर अंतरावर असलेले महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील एक छोटेसे सुंदर गाव आहे.

 निष्कर्ष

आम्ही आमच्या लेखातून आपणास कोलाड व त्या जवळील प्रेक्षणीय स्थळांची माहिती दिली आहे. तसेच कोलाड मधील प्रसिद्ध रिव्हर राफ्टींगची देखील माहिती दिली आहे. हा लेख तुम्ही नक्की वाचा व कमेंट करून आम्हास नक्की कळवा.

धन्यवाद.

Gallery

Leave a comment