तारकर्ली बीच संपूर्ण माहिती | TARKARLI BEACH INFORMATION IN MARATHI

तारकर्ली बीच – TARKARLI BEACH INFORMATION IN MARATHI – सिंधुदुर्ग जिल्हा कोकणचा पर्यटन दृष्ट्या एक महत्त्वपूर्ण भाग समजला जातो. या सिंधुदुर्ग जिल्ह्याला वेगवेगळे समुद्रकिनारे, वेगवेगळी प्राचीन देवळे व वेगवेगळ्या प्रकारची असणारी पर्यटन स्थळे यामुळे ओळखले जाते. तारकर्ली हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील मालवण या तालुक्यामध्ये वसलेले एक प्रसिद्ध गाव आहे. तारकर्ली गावाला सुंदर असा समुद्रकिनारा लाभलेला आहे. कोकण विभागाचे तारकर्ली बीच हे क्वीन ऑफ बीच म्हणून ओळखले जाते.

Table of Contents

तारकर्ली बीच संपूर्ण माहिती | TARKARLI BEACH INFORMATION IN MARATHI

गाव – तारकर्ली बीच (tarkarli beach )
तालुका – मालवण
जिल्हा – सिंधुदुर्ग
राज्य – महाराष्ट्र
वैशिष्ट्य –पर्यटन स्थळ
आकर्षण – वॉटर स्पोर्ट्स, स्कुबा डायव्हिंग, समुद्रकिनारा

प्रस्तावना

तारकर्ली बीचला भरपूर प्रमाणामध्ये पर्यटकांची गर्दी असते. हे पर्यटक पांढरी शुभ्र वाळू व निळ्याभोर समुद्राचा आनंद घेण्यासाठी आणि या ठिकाणी असणाऱ्या जलक्रीडा व त्या सहासी खेळांचा अनुभव घेण्यासाठी तारकर्ली मध्ये भेट देत असतात. तारकर्ली हे पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे होम स्टे, रेस्टॉरंट, हॉटेल्स त्यांच्या बजेट नुसार उपलब्ध आहेत.

समुद्रातील बेटावर असलेले पांढरे सीगल पक्षी, खोल समुद्रात उड्या मारत जलविहार करणारे डॉल्फिन मासे. मित्रांनो काय सांगू आणि काय नको असे होऊन जाते. तर आज हाच सर्व निसर्ग आणि यांची संपूर्ण सफर आम्ही तुम्हाला या लेखाद्वारे देण्याचा प्रयत्न केला आहे. तिथे यायचे कसे? कोणकोणती ठिकाणे पाहायची? राहण्याचे ऑप्शन्स काय आहेत? व बरच काही या लेखा मध्ये दिले आहे.

TARKARLI BEACH INFORMATION IN MARATHI
TARKARLI BEACH INFORMATION IN MARATHI

तारकर्ली बीच नकाशा

तारकर्ली बीच येथे पहायची ठिकाणे – PLACES TO VISIT AT TARKARLI BEACH

तारकर्ली म्हणजे कोकणातील एक असे गाव आणि समुद्रकिनारा की जिथे आपण एकदा जाऊन आलो तर त्याच्या निसर्ग सौंदर्याच्या अक्षरशः प्रेमात पडून जातो. मंडळी इथे काय नाही? अथांग निळाशार समुद्र, स्वच्छ पांढऱ्या रेतीचा लांबच लांब पसरलेला समुद्रकिनारा, किनाऱ्याच्या बाजूला उंच उंच सुरुची झाडे, नारळ, सुपारी, काजू आणि आंब्याच्या बागांनी सजलेले हिरवेगार गाव. गावाच्या दुसऱ्या बाजूला समुद्राला येऊन मिळणारी नदी आणि समुद्राचा संगम.

०१) तारकर्ली समुद्रकिनारा -TARKARLI BEACH

TARKARLI BEACH
TARKARLI BEACH

हा समुद्रकिनारा हा कोकण विभागातील सुरक्षित समुद्रकिनारा आहे. आजूबाजूला असणारी नारळापोफळीची झाडे आणि येथील टुमदार घरे आपलं लक्ष वेधून घेतात. पांढऱ्या शुभ्र वाळूत फेरफटका मारणे अतिशय अल्हाददायक आहे.

तारकर्ली – देवबाग ही गावे म्हणजे मुख्य मालवण तालुक्याच्या ठिकाणापासून दक्षिणेकडे निघालेली चिंचोळी पट्टी आहे. या प्रदेशाच्या पूर्वेला कर्ली नदी आणि पश्चिमेला अरबी अथांग अरबी समुद्र आहे. तिन्ही बाजूने पाण्याने वेढलेली ही गावे म्हणजे निसर्गाचे एक अप्रतिम वरदानच आहे

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणपासून फक्त ७ किलोमीटर अंतरावर खूपच स्वच्छ व सुंदर असा समुद्रकिनारा आणि खाडीच्या मेळातून तयार झालेले अलौकिक सौंदर्य तारकर्लीला बघायला मिळते. विस्तीर्ण असा स्वच्छ आणि सुंदर असा समुद्रकिनारा, पायांना कोमल स्पर्श करणारी चमकदार मऊ वाळू, कोवळे उन. स्वर्ग म्हणतात तो हाच. तारकर्ली समुद्रकिनार्‍यावर गेल्यानंतर या स्वर्गाचा अनुभव येतो. अतिशय सुंदर असा समुद्रकिनारा नारळाची, बांबूची, सुपारीची झाडे पाहून मन अगदी आनंदी होते.

०२) संगम पॉईंटDEVBAUG BEACH SANGAM POINT

DEVBAUG BEACH SANGAM POINT
DEVBAUG BEACH SANGAM POINT

कर्ली नदी ही देवबागच्या समुद्राला ज्या ठिकाणी जाऊन मिळते त्या ठिकाणी होणारा संगम. या ठिकाणाला संगम पॉईंट असे म्हणून ओळखले जाते. हे ठिकाण देखील तुम्ही बोटीने सफर करते वेळी नक्की पाहू शकता. जर तुम्ही एखादा मार्गदर्शक सोबत घेतला तर तुम्हाला अधिक या पॉईंट व ईकडच्या प्रेक्षणीय स्थळांबद्दल जास्त माहिती मिळू शकेल.

०३) त्सुनामी आयलँड/बेट – TSUNAMI ISLAND DEVBAUG BEACH

TSUNAMI ISLAND DEVBAUG
TSUNAMI ISLAND DEVBAUG

कर्ली खाडी मध्ये असलेल्या या बेटाला त्सुनामी आयलँड – TSUNAMI ISLAND DEVBAUG BEACH – असे म्हणतात. पर्यटकांसाठी व या ठिकाणी स्थायिक असलेल्या लोकांसाठी सुद्धा मनसोक्त जलक्रीडा करण्यासाठी आणि साहसी खेळांसाठी प्रसिद्ध असलेले बेट आहे. या ठिकाणी पर्यटक हे पॅराग्लायडिंग, जेट्सकी, बनाना बोट राईड, आणि अशा अनेक प्रकारच्या जलक्रीडा येथे करू शकतात व हे त्सुनामी आयलँड पर्यटकांच्या आनंदामध्ये अजून भर घालण्याचे काम करते. इकडे येणारे पर्यटक हे नक्कीच कोकणातील स्वर्गाचा सुखद अनुभव घेऊन जातात.

०४) संध्याकाळचा सूर्यास्त – SUNSET AT TARKARLI BEACH

TARKARLI BEACH
TARKARLI BEACH

संध्याकाळच्या वेळी हे समुद्रकिनारे म्हणजे स्वर्गच, बीचवरची पांढरीशुभ्र रेती, संध्याकाळच्या सोनेरी प्रकाशात चमकत असते. सूर्यदेव अस्ताला जात असते वेळी त्यांच्यामधून येणारे जी सोनेरी किरणे व शितल किरणे ही समुद्राच्या पाण्यावर ज्यावेळी पडतात व त्यामुळे समुद्रांच्या पाण्याला येणारे ते सोनेरी तेज बघून मन उत्साहाने भरून जाते येते. तुम्ही या बीच वर भेट द्यायला येत असाल तर या ठिकाणचा सूर्यास्ता चा अनुभव तुम्हाला एक सुखद अनुभूती देईल.

किनाऱ्यावर असलेले हिरवेगार देखावे, सुर्यास्त् व सूर्योदय या दोन्हींचे अनोखे अनुभव सौंदर्य निसर्गाने येथे उधळले आहे. येथे वास्तव्य करून येथील निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्यासाठी खूप छान होटेल आणि रिसॉर्ट आपल्या सेवेसाठी आहेत. येथील निळे समुद्र किनारे एवढे सुंदर, नितळ आणि स्वच्छ आहेत की पाण्याचा तळ ही अगदी साध्या डोळ्यांनी बघता येतो. निळेशार पाणी आणि क्षितिजापर्यंत पसरलेला विस्तीर्ण असा समुद्र किनारा रोजच्या ताणतणावापासून दूर ठेवत एक वेगळी च मनशांती, एक वेगळा अनुभव येतो.

तारकर्ली – देवबाग हॉटेल बूकिंग

०५) तारकर्ली वॉटर स्पोर्ट्स – TARKARLI WATER SPORTS

TARKARLI WATER SPORTS
TARKARLI WATER SPORTS

या किनाऱ्या वर वर जर तुम्हाला स्कुबा डायविंग, ऍक्टिव्हिटीज करायच्या असतील तर तारकर्ली स्कूबा डायविंग सेंटर हा सर्वोत्तम पर्याय आहे . त्याचबरोबर पॅराग्लायडिंग, जेट्सकी, बनाना बोट राईड आणि वॉटर स्पोर्ट्स करावयाचे असल्यास त्सुनामी बेट हा पर्याय आहे.

शहरातील रोजच्या गर्दीपासून खूप दूर शांत, निवांत, एकांतात वेळ घालवण्यासाठी तारकर्ली येथे अवश्य भेट द्यावी. बीच रिसॉर्ट निवास, बोटीतून सफर, बनाना राईड, जेट स्की, स्कूबा डायव्हिंगचा अप्रतिम अनुभवदेखील येथे घेता येतो.

०६) तारकर्ली डॉल्फिन सफर – TARKARLI DOLPHIN TOUR

TARKARLI DOLPHIN TOUR
TARKARLI DOLPHIN TOUR

इथल्या समुद्रामध्ये सकाळच्या वेळी बोटीने सफर करतेवेळी ज्यावेळी तुम्ही खोल समुद्रात जाता त्या ठिकाणी तुम्हाला जलविहार करणारे डॉल्फिन झुंडीने दिसतात. या ठिकाणी पाण्यामध्ये उड्या मारणारे डॉल्फिन्स बघणं खूप आल्हादायक व अविस्मरणीय स्मृती आहे. हे दृश्य पाहून मन अगदी मोहन जाते त्यामुळे जर तुम्ही कधी या समुद्रावर भेट द्यायला येत असाल तर नक्कीच तुम्ही या डॉल्फिन पॉईंट ला जाऊ शकता.

०७) महापुरुष मंदिर आणि विठ्ठल मंदिर – MAHAPURUSH MANDIR DEVBAG

MAHAPURUSH MANDIR DEVBAG
MAHAPURUSH MANDIR DEVBAG

गावामध्ये असलेल्या स्थानिक मंदिरांपैकी महापुरुष मंदिर आणि विठ्ठल मंदिर ही गावात दोन छोटी मंदिरे आहेत. गावातील मच्छीमार समाज या दोन्ही मंदिरात वार्षिक उत्सव मोठ्या थाटामाटाने साजरे करतात.

आमचे हे लेख सुद्धा वाचा. 👇

तारकर्ली माहिती व्हिडिओ – TARKARLI INFORMATION VIDEO

तारकर्ली जवळील इतर प्रेक्षणीय स्थळे – PLACES TO VISIT NESR TARKARLI BEACH

०१) गणेश मंदिर

श्री ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगावकर यांनी या मंदिराची बांधणी केली. सोन्याने नटलेल्या देव गणपती बाप्पाचं मंदिर अशी या मंदिराची ओळख आहे. हे मंदिर अतिशय प्रसिद्ध व नवसाला पावणारा देव म्हणून ओळखले जाते. या ठिकाणचं वातावरण हे अतिशय प्रसन्न व अल्हाहादायक आहे. मित्रहो तुम्ही जर  या ठिकाणी ट्रीप काढण्याचा प्लॅन करत असाल, तर तुम्ही नक्कीच या देवळाला भेट देऊ शकता.

०२) सिंधुदुर्ग किल्ला

मालवण गावामधील प्रसिद्ध व पर्यटनाच्या दृष्टीने सर्वप्रथम असणारा सिंधुदुर्ग किल्ला हा श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या बांधण्यातील आहे. हा इसवी सन १६६४ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधून घेतला आहे. या किल्ल्याची बांधणी पर्यटकांना अतिशय मोहून टाकते. समुद्राचे चारही बाजूला असलेले पाणी आणि त्या पाण्याच्या वेढ्यामध्ये असलेला हा किल्ला व त्याची सुंदरता पर्यटकांना खूप भुरळ घालते. या सिंधुदुर्ग किल्ल्यावर सुद्धा तुम्ही नक्कीच भेट देऊ शकता .

०३) चिवला बीच

सिंधुदुर्ग किल्ल्याच्या उत्तरेस असलेला हा समुद्रकिनारा इंग्रजी C आकाराचा असून या किनाऱ्यावर शंख शिंपल्यांची बरीच पुळण दिसते. त्याचबरोबर या किल्ल्याच्या उजव्या बाजूला सर्जेकोट किल्ला आहे.

०४) दांडी बीच

मालवण किल्ल्याच्या डाव्या बाजूला दांडी बीच असून या किनारी वॉटर स्पोर्ट, स्कुबा डायविंग या गोष्टी सुद्धा होतात. पर्यटकांची इथेही हंगामामध्ये बरीच गर्दी असते

०५) वायरी बीच

मालवण पासून तारकर्ली पर्यंत किनारपट्टीने जाताना या दोन गावांच्या मध्ये वायरी बीच आहे. हे सुद्धा शांत आणि प्रेक्षणीय आहे

०६) रॉक गार्डन

मालवण बंदर आणि चिवला बीच यांच्यामध्ये असलेले रॉक गार्डन हे लहान मुलांसाठी तसेच मोठ्यांसाठी आकर्षणाचे केंद्र बनले आहे. इथून सूर्यास्ताचा अप्रतिम देखावा संध्याकाळी अनुभवण्यासाठी पर्यटकांची गर्दी होते

०७) ओझर मठ

मालवण पासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावर ओझर मठ आहे. या मठातील शांतता, थंडावा आणि येथील मंदिर आपल्याला एक वेगळीच अनुभूती देते

०८) मालवण मार्केट

मालवणी मेवा, सुके मासे, आंबे, काजू ,कोकम आगळ, वेगवेगळ्या प्रकारची सरबते आणि स्थानिक वस्तूंची बाजारपेठ म्हणून मालवण मार्केट ला पाहिले जाते. छोटेसे पण अतिशय विविधतेने नटलेले हे मार्केट पर्यटकांचे आकर्षण बिंदू आहे

०९) सर्जेकोट किल्ला

मालवण मधील सिंधुदुर्ग किल्ल्याच्या उत्तरेला असलेला हा किल्ला सुद्धा आपल्याला इतिहासाची साक्ष देतो.

१०) तळाशील आणि तोंडवळी बीच

मालवणच्या उत्तरेस असलेले तळाशील आणि त्यानंतरचा तोंडवली बीच हे आत्ताच प्रकाश झोतात आलेले समुद्रकिनारे आहेत. हे दोन्ही किनारे अतिशय रुंद आणि जवळपास पाच किलोमीटर लांबीचे असून त्या ठिकाणी पर्यटकांची वर्दळ नसल्यामुळे येथे फिरणे एक वेगळाच आनंद देते.

११) आंगणेवाडी मंदीर

मालवण पासून सुमारे २५ किलोमीटर अंतरावर असणारे आंगणेवाडी मधील भराडी देवीचे मंदिर हे कोणाला माहित नाही ? येथील तीन दिवसाचा उत्सव हा तर संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. आपण जर तारकर्ली देवबागला राहत असाल तर आंगणेवाडीच्या मंदिराला भेट द्यायला विसरू नका.

१२) भोगवे बीच

देवबाग खाडीच्या पलीकडे दिसणारा समुद्रकिनारा म्हणजेच, मगरीच्या आकारासारखी दिसणारी नारळाची झाडे जिथे आहे तो किनारा भोगवे बीच. हा किनारा सुद्धा अतिशय विलोभनीय आणि अप्रतिम आहे.जगभरातील सर्वोत्कृष्ट बीचसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर दिल्या जाणाऱ्या ऑस्कर दर्जाच्या ब्ल्यू फ्लॅग नामांकनासाठी भारतातर्फे आठ सर्वांग सुंदर बीचेसची निवड करण्यात आली होती, यामध्ये महाराष्ट्रातील एकमेव सर्वांग सुंदर बीच म्हणून सिंधुदुर्गातील भोगवे बीचची निवड करण्यात आली आहे. समुद्री पाण्याचा दर्जा, किनाऱ्यावरील स्वच्छता, कनेक्टिव्हिटी, पर्यटकांची सुरक्षितता,पर्यावरण व्यवस्थापन व योग्य माहितीची देवाण-घेवाण या सर्व निकषांवर आधारित ही निवड करण्यात आली आहे.

१३) कर्लीची खाडी

मालवण आणि भोगवे या गावांच्या मध्ये असणारी कर्ली नदी. या कर्ली नदीच्या खाडीत वेगवेगळ्या प्रजातीचे पक्षी आपणास पाहायला मिळतात. त्याचबरोबर कांदळवनांची झाडी आणि पक्षी निरीक्षण आपण या ठिकाणी करू शकतो.

१४) निवती किल्ला

निवती किनारा आणि भोगवे किनारा यांच्यामध्ये असलेल्या उंच डोंगरावर निवती किल्ला आहे. हा किल्ला म्हणजे एक अप्रतिम पॉईंट आहे जिथून मालवण किल्ला आपण पाहू शकतो आणि पलीकडे गोव्यापर्यंतचे समुद्रकिनारे या पॉईंटवरून दिसतात

१५) निवती बीच

निवती बीच हा देखील एक प्रेक्षणीय समुद्रकिनारा आहे या किनाऱ्याच्या बाजूला असणारी पांढरीशुभ्र वाळू व गार गार वारा. खडकांवर आढळणाऱ्या लाटांचा आवाज हे मनाला भुरळ पाडणारे दृश्य व त्याचा अनुभव घेण्यासाठी तुम्ही नक्कीच निवती बीचला भेट देऊ शकता. या ठिकाणी तुम्ही गोल्डन रॉक, निवती किल्ला इत्यादी प्रेक्षणीय स्थळांना सुद्धा भेट देऊ शकता.

तारकर्ली-देवबाग प्रवास – HOW TO REACH TARKARLI BEACH

पुण्यापासून ४३० किलोमीटर अंतरावर असणारे व मुंबईपासून ५५० किलोमीटर असणाऱ्या अंतरावर तारकर्ली देवबाग ही प्रसिद्ध पर्यटन स्थळे वसलेली आहेत. तुम्ही या पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी बस, ट्रेन, किंवा विमानाने येऊ शकता

१ बस

इथे भेट देण्यासाठी तुम्ही तुमच्या प्रायव्हेट बसने किंवा प्रायव्हेट गाडीने मालवण पर्यन्त येऊ शकता, किंवा महाराष्ट्र शासनाच्या असणाऱ्या गाड्या ह्या पुणे, मुंबई ,कोल्हापूर यांसारख्या मोठ्या शहरांमधून धावतात तुम्ही यातून प्रवास करून सुखद व सुलभ रित्यामालवण पर्यन्त येऊ शकता आणि तिथून तारकर्ली देवबाग या ठिकाणी पोहोचू शकता.

२ रेल्वे

जर तुम्ही रेल्वेने येत असाल तर कुडाळ या रेल्वे स्थानकावरून उतरून तुम्ही बसने किंवा ऑटो करून येऊ शकता. बसने कुडाळ पासून तारकर्ली देवबाग पर्यंत साधारणतः ५० ते ६० रुपयाच्या दरम्याने बसची तिकीट असेल, व जर तुम्ही ऑटो करत असाल ७०० ते ८००रुपये पर्यंत भाडं द्यावं लागतं. कुडाळ स्थानकावरून देवबाग तारकर्लीला साधारणतः जाण्यासाठी ३५ ते ४० किलोमीटर एवढा अंतर पार करावे लागते.

३ विमान

मित्रहो जर तुम्ही विमानाद्वारे येण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही चिपी एअरपोर्ट अर्थातच सिंधुदुर्ग विमानतळावर उतरून तिथून ऑटो किंवा बसने या पर्यटन स्थळाला भेट देऊ शकता. यासाठी साधारणतः तुम्हाला ३० ते ३५ किलोमीटर एवढे अंतर पार करावं लागतं.

प्रसिद्ध रानमेवा – LOCAL SPECIALITY

मित्रहो पर्यटनासाठी जर तुम्ही हे पर्यटन स्थळ निवडले असेल तर नक्कीच तुम्ही या पर्यटन स्थळातील प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेऊ इच्छिता, बरोबर ना. या पर्यटन स्थळी वेगवेगळ्या प्रकारचा रानमेवा देखील तुम्ही खाऊन तृप्त होऊ शकता. या ठिकाणी खालील प्रकारचे रानमेवे प्रसिद्ध आहेत.

  • 1. काजू
  • 2. करवंद
  • 3. आंबा
  • 4. फणस
  • 5. कोकम

प्रसिद्ध शाकाहारी व मांसाहारी जेवण – SPECIALITY CUISINE AT TARKARLI BEACH

अ ) शाकाहारी जेवण

शाकाहारी जेवणाच्या थाळीमध्ये मोदक, पुरणपोळी, घावन आणि खोबऱ्याचा गोड रस्सा, आंबोळ्या आणि चटणी हे प्रसिद्ध पदार्थ नक्कीच पाहायला मिळतील.

ब ) मांसाहारी थाळी

कोकणामध्ये नैसर्गिकरित्या संपन्न असणारे बरेच समुद्र किनारे आहेत, त्यामुळे कोकणामध्ये बऱ्याच प्रमाणात मासेमारी हा व्यवसाय चालतो. जर तुम्ही कोकणामध्ये या ठिकाणी भेट देताय, तर या ठिकाणी तुम्हाला मांसाहारी थाळीमध्ये जास्त प्रमाणात सुरमई, पापलेट, बांगडा, सौंदाळे, शिंपल्या, खेकडे, कोलंबी, कालव इत्यादी मच्छीचा समावेश दिसेल. तुम्ही तुमच्या आवडी नुसार तुम्हाला जी थाळी आवडेल ती घेऊन मनसोक्त आनंद लुटू शकता.

भेट देण्यासाठी उत्तम महिना – BEST TIME TO VISIT TARKARLI BEACH

तारकर्लीला भेट देण्यासाठी सगळ्यात उत्तम महिना असेल तर ऑक्टोबर ते मार्च. हा हिवाळा सीजन असतो, यामध्ये तापमान हे कमी प्रमाणात असल्यामुळे जास्त प्रमाणात ऊन नसते. इकडचे तापमान हे साधारणतः २० ते २८ डिग्री सेल्सियस असते व यामुळे अधिक उन्हाचा त्रास होत नाही व तुम्ही आनंद, आस्वाद आपण पुरेपूर लुटू शकता.

इथे पावसाळा हा जून ते सप्टेंबर असा असतो. पावसाळ्यात वॉटर स्पोर्ट्स, किल्ला बंद असतो. त्यामुळे तारकर्ली देवबागला “सप्टेंबर ते मे” च्या दरम्याने भेट देऊ शकता.

बोलल्या जाणाऱ्या भाषा – LANGUAGES AT TARKARLI BEACH

या ठिकाणी मालवणी आणि मराठी या भाषा बोलल्या जातात.

तारकर्ली स्कुबा डायव्हिंग – TARKARLI SCUBA DIVING

TARKARLI SCUBA DIVING
TARKARLI SCUBA DIVING

संपूर्ण महाराष्ट्रात तारकर्ली येथील स्कुबा डायविंग सेंटर हेच स्कुबा डायविंगसाठी अप्रतिम मानण्यात येते. डॉक्टर सारंग कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून या स्कुबा डायविंग ची सुरुवात झाली. नव्वदच्या दशकात डॉक्टर श्री सारंग कुलकर्णी यांनी येथील समुद्राखालील जैवविविधतेचा अभ्यास केला असता त्यांना येथील मासे, समुद्री प्रवाळ आणि समुद्राखालील इतर गोष्टीमधील वैविध्यता अतिशय अप्रतिम वाटली. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्र शासनाला विनंती करून येथे स्कुबा डायविंग सेंटरची सुरुवात केली.

FAQ

तारकर्ली बीच कोठे आहे?

तारकर्ली हे महाराष्ट्रातील दक्षिण कोकण विभागातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यात कर्ली नदीच्या किनारी वसलेले गांव आहे. या गावाच्या एका बाजूस नदी असून दुसऱ्या बाजूस समुद्र आहे. हे ठिकाण स्वच्छ आणि स्वच्छ वालुकामय समुद्रकिनारा आणि जलक्रीडा, स्कुबा यासाठी प्रसिद्ध आहे.

तारकर्लीला कधी जाणे योग्य आहे?

तारकर्लीला पर्यटनासाठी भेट देण्याचा उत्तम काळ म्हणजे ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च . हा पर्यटन काळ असल्याने या वेळी थोडी गर्दी अपेक्षित असते आणि सर्व जलक्रीडा तसेच स्कुबा पण करता येते. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या काळात मध्यम हवामानाचा अनुभव येतो आणि मार्च पासून उष्णता वाढू लागते.

तारकर्ली जवळ किती समुद्रकिनारे आहेत?

तारकर्ली जवळ तारकर्ली बीच, आचरा बीच, त्सुनामी बेट, देवबाग बीच, भोगवे बीच, चिवला बीच, वेंगुर्ला बीच, निवती बीच, सागरेश्वर बीच, कुणकेश्वर बीच, मोचेमाड बीच, मिठमुंबरी बीच, तोंडवली बीच, तळाशील बीच, कोळंब बीच आणि बरेचसे किनारे आहेत.

निष्कर्ष

आम्ही आमच्या या लेखाद्वारे तारकर्ली-देवबाग या पर्यटन दृष्टीने प्रसिद्ध असणाऱ्या पर्यटन स्थळाची माहिती दिली आहे . हा लेख तुम्ही नक्की वाचा व आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.

धन्यवाद

Leave a comment