ज्यांना परिचयाची गरज नाही, त्यांच्या अतुलनीय आविष्कारांनी केवळ जगच प्रकाशित केले नाही, तर आधुनिक तंत्रज्ञान युगाचा पायाही घातला, ते म्हणजे इतिहासातील सर्वात महान संशोधकांपैकी एक थॉमस अल्वा एडिसन.
जेव्हा आपण दिवा लावण्याकरिता बटण दाबतो किंवा सिनेमा बघतो, रेडिओ ऐकतो, फोनवर बोलतो, ते केवळ एडिसनने लावलेल्या शोधांमुळेच. थॉमस एडिसन हे एक महान अमेरिकी शास्त्रज्ञ होते. एडिसन यांनी त्यांच्या आयुष्यात एक हजारपेक्षा जास्त शोध लावले आणि आजही त्या शोधांचे पेटंट्स त्यांच्या नावावर आहेत.
परंतु यामध्ये त्यांचा जीवनप्रवास खूप संघर्षमय आहे. या लेखात आपण इतिहासातील या उल्लेखनीय व्यक्तीचे म्हणजेच थोर संशोधक थॉमस अल्वा एडिसन यांचे जीवन चरित्र जाणून घेणार आहोत. हा लेख तुम्ही शेवट पर्यंत वाचा.
थॉमस एडिसन माहीती मराठी | Thomas Edison Information In Marathi
मूळ नाव | थॉमस अल्वा एडिसन |
जन्मतारीख | ११ फेब्रुवारी १८४७ |
जन्मस्थळ | अमेरिका, ओहायो, मिलान |
आईचे नाव | नॅन्सी मॅथ्यूज |
वडिलांचे नाव | सॅम्युअल एडिसन |
पत्नीचे नाव | मेरी स्टील वेल , मीना मिलर |
ओळख | प्रसिद्ध संशोधक |
मृत्यू | १८ ऑक्टोंबर १९३१ |
मृत्यूठिकाण | न्यू जर्सी, वेस्ट ऑरेंज युनायटेड स्टेट |
पेटंट | १०९३ पेटंट |
कोण होते थॉमस एडिसन ?
थॉमस एडिसन यांचे पूर्ण नाव थॉमस अल्वा एडिसन असे आहे. थॉमस हे अमेरिकेचे एक प्रसिद्ध संशोधक व विद्वान होते. त्यांनी फोनोग्राफ व इलेक्ट्रिकल बल्ब सोबत विविध उपकरणे विकसित केली.
ज्या उपकरणांद्वारे जगभरामधील लोकांच्या जीवनमानाच्या राहणीमानामध्ये मोठे बदल घडवून आणले गेले, म्हणून “मेनलो पार्कचा विझार्ड” ओळखले जाणारे व मोठ्या प्रमाणावर उत्पादन आणि अन्वेषणाच्या तत्वावर प्रयोग करणारे थॉमस अल्वा एडिसन हे पहिले संशोधक होते.
त्यांच्या या महान कार्यांमुळे थॉमस एडिसन यांना औद्योगिक प्रयोगशाळा स्थापन करण्याचे श्रेय दिले जाते. लहानपणापासूनच थॉमस हे अतिशय जिज्ञासू व कष्टाळू होते. त्यांची गणनाही जगभरातील महान शोधकांमध्ये केली जाते.
थॉमस एडिसन यांचा जन्म व बालपण
थोर संशोधक, विद्वान थॉमस अल्वा एडिसन यांचा जन्म हा ११ फेब्रुवारी १८४७ रोजी अमेरिकेतील ओहायो या राज्यामधील मिलान या शहरांमध्ये झाला. लहानपणापासूनच थॉमस यांना संशोधन करणे व नवनवीन उपकरणे विकसित करणे, याची आवड होती.
थॉमस अल्वा एडिसन यांच्या आईचे नाव नॅन्सी मॅथ्यूज व वडिलांचे नाव सॅम्युअल एडिसन होते. थॉमस एडिसन यांना सात भावंडे होती. त्या भावंडांपैकी ते सर्वात लहान होते.
अतिशय चतुर, जिज्ञासू असून वयाच्या अवघ्या सहा वर्षापर्यंत त्यांच्या मातेने त्यांना घरीच शिकवले, व फक्त तीन महिन्याचे शिक्षण थॉमस एडिसन यांनी सार्वजनिक शाळेमधून घेतले.
एवढ्या कमी कालावधीमध्ये सार्वजनिक शिक्षण मिळाले असून सुद्धा, एडिसनने ह्यूम, सीअर, बर्टन आणि गिब्बन या महान ग्रंथांचा अभ्यास स्वतःहून पूर्ण केला.
वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी थॉमस एडिसन स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी, एका डॉलरसाठी फळे व वर्तमानपत्रे विकण्याचा व्यवसाय सुद्धा हाताळला. तसेच थॉमस रेल्वेमध्ये पत्रे छापायचे, व वैज्ञानिक प्रयोग सुद्धा करायचे.
थॉमस यांना टेलिग्राम ट्रान्सफॉर्मेशनमध्ये प्रभुत्व मिळाल्यानंतर, वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी यांनी टेलिग्राम वर्कर म्हणून काम केले. कौटुंबिक उदरनिर्वाहासाठी थॉमस यांनी मिळालेला मौल्यवान वेळ प्रयोग व चाचण्यांसाठी वापरला.
थॉमस एडिसन यांचे शिक्षण
थॉमस एडिसन हे अतिशय कमी कालावधीसाठी शाळेमध्ये शिकले. त्यांनी फक्त बारा आठवडे शाळेमध्ये शिक्षण घेतलं. लहानपणी आजारांना ग्रासल्यामुळे एडिसन यांची श्रवणशक्ती अतिशय कमी झाली होती. ते स्पष्ट ऐकूही शकत नव्हते, त्यामुळे एकावेळी कोणता धडा समजू शकेल, इतपत त्यांची श्रवण शक्ती त्यांना साथ देत नव्हती.
लहानपणापासूनच अतिशय जिज्ञासु व कष्टाळू स्वभावाचे असलेले थॉमस, शिक्षकांना विविध प्रश्न विचारून टाकत. त्यांच्या प्रश्नांना कंटाळून त्यांच्या एका शिक्षकांनी त्यांना मंदबुद्धी सुद्धा घोषित केले.
यावेळी ही बातमी थॉमस यांच्या आईंना जाऊन समजली तेव्हा त्यांना फार वाईट वाटले, व त्या क्षणापासून थॉमसच्या आईने त्यांना शाळेमधून काढून टाकले. त्या एक शिक्षिका होत्या. त्यामुळे त्यांनी थॉमस यांना घरी शिक्षणाची ज्ञानगंगा दिली.
थॉमस यांचे वैवाहिक जीवन
थॉमस यांचे वैवाहिक जीवन १८७१ पासून सुरू झाले. थॉमस हे २४ वर्षाचे असताना त्यांचे लग्न सोळा वर्षे मेरी स्टील वेलची झाले. १८८४ मध्ये त्यांची पत्नी मेरी स्टील वेल दीर्घ आजारांमुळे मरण पावली. स्वतःच्या पत्नीच्या मृत्यूनंतर थॉमस यांनी मेनलो पार्क सोडले.
१८८६ मध्ये मीना मिलरशी थॉमस एडिसन यांनी पुनर्विवाह केला व यानंतर त्यांनी लेवेलियन पार्क वेस्ट ऑरेंज या ठिकाणी वास्तव्य करण्यास सुरुवात केली.
- चार्ल्स एडिसन
- थॉमस अल्वा एडिसन जुनिअर
- थेओदोरे मिल्लर एडिसन
- मॅरीओन एस्तेले एडिसन
- विलियम लेस्लेई एडिसन
- मादेलेईने एडिसन
अशी एकूण ६ मुले होती.
थॉमस एडिसन यांची पहिली औद्योगिक प्रयोगशाळा
स्वतःच्या अवघ्या दहाव्या वर्षी एडिसनने पहिली औद्योगिक प्रयोगशाळा बांधली. लहानपणी त्यांच्या आईने थॉमसच्या हातामध्ये पुस्तक दिले, ज्यामध्ये अनेक रासायनिक प्रयोग दिले होते. एडिसनला लहानपणापासूनच पुस्तके वाचण्याचा प्रचंड आवड होती.
स्वतः जवळील असलेला सर्व पैसा थॉमस यांनी रसायनांवर खर्च केला व सर्व प्रयोग त्यांनी करून पाहिले. थॉमस एडिसनचा कोणताही प्रयोग पूर्ण होणार असेल, तर तो प्रयोग पूर्ण करण्यासाठी दिवस रात्र जागून, तो प्रयोग तसाच थॉमस चालू ठेवत असत.
हे काम करतेवेळी ते अन्न पाणी सुद्धा विसरून जात. एवढ्या एकाग्र पद्धतीने थॉमस त्यांचे प्रयोग करत असतात.
थॉमस एडिसन यांचे व्यावसायिक करिअर
थॉमस अल्वा एडिसन यांनी वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी थॉमस यांनी कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी रेल्वे स्टेशन जवळील वर्तमानपत्रे विकण्यास सुरुवात केली. हे काम करून जेवढे पैसे शिल्लक राहायचे, त्या पैशांमधून त्यांनी एक छोटी प्रयोगशाळा सुद्धा बांधली.
ज्या प्रयोग शाळेमध्ये थॉमस विविध प्रयोग करत. अशीच कामे करत करत थॉमस यांनी शिल्लक ठेवलेल्या पैशातून प्रयोगशाळेत वापरण्यासाठी विविध रासायनिक साहित्य सुद्धा विकत घेतले. वर्तमानपत्रांचे काम संपवून उरलेल्या काळात थॉमस एडिसन प्रयोग शाळेमध्ये विविध प्रयोग करायचे.
थॉमस यांचा विश्वास होता की जर, एखाद्या व्यक्तीने सुधारण्याच्या मार्गावर सतत प्रयत्न केले, तर तो भविष्यामध्ये काहीतरी नक्कीच मोठे करू शकतो. थोड्या कालावधीनंतर थॉमस यांनी स्वतःचे वृत्तपत्र प्रकाशनाचा व्यवसाय सुरू केला. त्यानंतर थॉमस एडिसन यांनी वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षापर्यंत टेलिफोन ऑपरेटर म्हणून सुद्धा काम केले.
थॉमस एडिसन यांची संशोधनाची सुरुवात
- थॉमस एडिसन यांनी १८६९ रोजी इलेक्ट्रिकल व्होट काउंटर या पहिल्या संशोधनाचे पेटंट स्वतःच्या नावावर घेतले. त्यांना मिळालेली नोकरी सोडून प्रयोगशाळेमध्ये शोध घेण्याचा व संशोधन करण्याचा निर्णय घेऊन एक मोठा आत्मविश्वास स्वतःमध्ये जागवला.
- १८७० ते १८७६ च्या दरम्याने थॉमस यांनी अनेक शोध लावले. एकाच वायरवर चार-सहा वेगवेगळे संदेश दळणवळण करण्यासाठी त्यांनी एक नवीन पद्धत शोधून काढली. तसेच स्टॉक एक्सचेंजसाठी, टेलिग्राम छापण्यासाठी, स्वयंचलन मशीन सुधारले. तसेच बील टेलिफोन उपकरण थॉमस यांनी विकसित केले.
- १८७५ मध्ये सायंटिफिक अमेरिकन या ठिकाणी थॉमस यांनी फोर्स वर एक शोधात्मक लेख प्रकाशित केला. यानंतर १८७८ च्या दरम्याने फोनोग्राफ मशीनचे पेटंट थॉमस यांनी स्वतःच्या नावावर केले. ज्या फोनोग्राफ मशीन मध्ये विविध सुधारणा करून पुढे, २०१० च्या दरम्याने त्याचे सध्याचे स्वरूप फोनोग्राफ मशीनला प्राप्त झाले.
- २१ ऑक्टोबर १८७९ रोजी थॉमस एडिसन यांनी जगाला एक व्हॅक्यूम बल्ब सादर केला. जो चाळीस तासापेक्षा जास्त काळ विजने जळत राहू शकेल. १८८३ च्या दरम्याने थॉमस एडिसन यांनी इफेक्ट शोधला.
- जो नंतर आजच्या रेडिओ वाल्वचा प्रवर्तक आहे असे सिद्ध करण्यात आले. पुढील दहा वर्षांमध्ये थॉमस यांनी विजेची निर्मिती करण्यासाठी वीज निर्मितीची साधने व त्यांची पद्धती यासाठी प्रकाश, उष्णता, आणि वीज या तीन वायर वितरण प्रणालीचा प्रयोग केला.
- भूमिगत केबल बसवण्यासाठी विद्युत तार, रबर, व कापडात गुंडाळण्याची पद्धत याचा शोध थॉमस एडिसन यांनी लावला. डायनॅमो व मोटर मध्ये त्यांनी सुधारणा केल्या. तसेच इलेक्ट्रिक ट्रेन, प्रवासी आणि मालवाहून नेण्यासाठी जहाजाणद्वारे संदेश एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी दळणवळण करण्यासाठी विविध पद्धतींचा शोध थॉमसन यांनी थॉमस यांनी लावला.
- अल्किल संचयक बॅटरीची रचना सुद्धा थॉमस एडिसन यांनी त्यांच्या शोधांद्वारे केली. लोखंड, खनिज, तीव्रतीचा चुंबकीय पद्धतीचा प्रयोग थॉमस यांनी केला.१८९१ च्या दरम्याने मूवी कॅमेराचे पेटंट थॉमस यांनी स्वतःच्या नावावर कोरले. चित्र प्रदर्शित करण्यासाठी किनेस्टोकोपचा शोध थॉमस यांनी लावला.
थॉमस एडिसन यांचे युद्ध शास्त्रातील योगदान
विश्वास झालेल्या पहिल्या महायुद्ध दरम्यान थॉमस एडिसन यांनी नौदल सल्लागार मंडळाचे अध्यक्ष स्थान भूषवले. त्यानंतर त्याने ४० युद्ध उपयुक्त गोष्टींचा शोध लावला. पनामा पॅसिफिक प्रदर्शनाने २१ ऑक्टोबर १९१५ रोजी “थॉमस एडिसन डे” आयोजित करून जगाच्या कल्याणासाठी सर्वाधिक शोध लावणाऱ्या थॉमस एडिसन यांचा महानगौरव करण्यात आला.
१९२७ मध्ये एडिसन यांची राष्ट्रीय विज्ञान अकादमी मध्ये सदस्य म्हणून निवड करण्यात आली. व २१ ऑक्टोबर १९२९ रोजी अध्यक्ष दुसरे यांनी एडिसन यांचे विशेष पाहुणे म्हणून स्वागत केले.
थॉमस एडिसन यांचा लाईट बल्बचा शोध
थॉमस एडिसन यांनी पहिल्या दिव्याच्या शोधासाठी तंत्रज्ञान घरांमध्ये आणण्यास सुरुवात केली. इंग्लिश संशोधक हम्फ्री डेव्हीने १८०० च्या शतकाच्या प्रारंभी पहिला इलेक्ट्रॉनिक आर्क यांचा शोध लावल्यानंतर थॉमस एडिसन यांना व्यावसायिक दृष्ट्या व्यावहारिक कार्यक्षम इनॅन्डेन्सेंट लाईट बल्ब परिपूर्ण करण्याचे काम सोपवण्यात आले .
१८७९ मध्ये वुडवर्ल्ड आणि इनॅन्डेन्सेंट पेटंट विकत घेतल्यानंतर, एडिसनने त्यामध्ये सुधारणा केल्या व लाईट बल्ब च्या सुधारित आवृत्तीचे पॅटर्न त्यांनी स्वतःच्या नावावरती घेतले. जानेवारी १८८० मध्ये थॉमस एडिसन यांनी एलुमिनेटिंग कंपनीची स्थापना केली. ही कंपनी जरी थॉमस एडिसन यांच्या मालकीची नसली तरी सुद्धा ती नंतर जनरल इलेक्ट्रिक बनली.
१०९३ पेटंट आहेत, जे त्यांनी केलेल्या कष्टाचे प्रतिबिंब आहे. आज संपूर्ण विश्व थॉमस यांनी शोधलेल्या गोष्टींचे कौतुक करते. इलेक्ट्रिकल बल्बचा शोध हा थॉमस यांचा सर्वात महान शोध म्हणून समजला जातो. इलेक्ट्रिकल बल्बचा शोध लावण्यासाठी, थॉमस यांनी खूप मेहनत घेतली.
बल्ब बनवण्यासाठी थॉमस हे दहा हजार हून अधिक वेळा अपयशी ठरले, त्यावर ते म्हणालेत मी कधीही अयशस्वी झालो नाही, उलट मला दहा हजार विविध मार्ग बल्ब बनवण्याच्या हेतूने सापडले. जे माझ्यासाठी कार्य करत नव्हते.
थॉमस एडिसन यांनी बांधलेली मेनलो पार्क प्रयोगशाळा ( १८७६ – १८८६)
१८७६ च्या दरम्याने थॉमस एडिसन यांनी स्थापन केलेली औद्योगिक संशोधन प्रयोगशाळा एडिसन यांची एक मुख्य संशोधनाची नवकल्पना होती. ही प्रयोगशाळा मेनलो पार्क रॅरिटर्न टाउनशिप या ठिकाणी बांधली गेली.
एडिसनने ज्यावेळी बोली लावली होती, त्यावेळी त्यांनी शोधलेल्या फ्लेक्स टेलिग्राम वेस्टर्न युनियन ला दहा हजार डॉलरला विकले गेले. क्वाड्रप्लेक्स टेलिग्राफ हे थॉमस एडिसन यांचे सर्वात मोठे आर्थिक यश समजले जाते.
यानंतर प्रयोगशाळा मध्ये सतत नवीन शोध लावण्यासाठी व नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी थॉमस एडिसन यांची प्रसिद्धी जगभर झाली. या प्रयोगशाळेमध्ये निर्माण झालेल्या बहुतेक संशोधनाचे श्रेय कायदेशीर रित्या थॉमस एडिसन यांना दिले जाते.
जरी अनेक कर्मचाऱ्यांनी थॉमस यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन विकसित केले असले तरी, त्यांच्या कर्मचाऱ्यांना सामान्यतः संशोधन आयोजित करताना थॉमस यांच्या सूचनेचे पालन करण्यास सांगितले गेले होते. व या कारणाने शोध लावलेल्या प्रत्येक गोष्टीचे श्रेय थॉमस एडिसन यांना दिले जाते.
थॉमस एडिसन यांच्या लहानपणा संबंधित गाजलेली कथा
थॉमस अल्वा एडिसन हे प्राथमिक शाळेत शिकत असतानाच्या दिवसात एका शिक्षकाने थॉमस यांना एक पेपर दिला, व तो पेपर घेऊन त्यांना त्यांच्या आईला द्यायला सांगितले. ज्यावेळी थॉमस एडिसन ने तो पेपर आपल्या आईला दिला.
तेव्हा त्यांची आई एक सुशिक्षित डच कुटुंबामध्ये स्त्री होती. तो पेपर वाचताना हुंदक्या देत देत रडली. आईला असे रडताना पाहून थॉमस एडिसन ने आईला प्रश्न केला की, “तू का रडत आहेस ?” त्यावर आई म्हणाली की, “ हे आनंदाचे अश्रू आहे.
यामध्ये असे लिहिले आहे की, तुमचा मुलगा हा फार हुशार आहे. आणि आमची शाळा खालच्या दर्जाची आहे. येथील शिक्षक फारसे शिकलेले नाही. त्यामुळे आम्ही त्याला योग्य शिक्षण देऊ शकत नाही. आता तुम्ही त्याला शिकवा.
एडिसनला या गोष्टीमुळे फार आनंद झाला. आणि त्याने घरीच आईकडून शिक्षण घेण्यास सुरुवात केली. बरीच वर्षे उलटून गेल्यानंतर, प्राप्त झालेल्या शिक्षणाद्वारे थॉमस प्रस्थापित शास्त्रज्ञ बनले. आई त्यांना सोडून या जगातून निघून गेली.
व एके दिवशी घरी काही जुन्या आठवणी शोधत असताना, त्यांना त्यांच्या आईच्या कपाटामधून ज्या शिक्षकांनी जे आईला पत्र देण्यास दिले होते ते सापडले. ते पत्र वाचताना, एडिसनच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. कारण त्या पत्रामध्ये आईने सांगितलेले तसे काहीच लिहिले नव्हते.
त्यामध्ये असे लिहिले होते की, “तुमचा मुलगा बौद्धिक दृष्ट्या कमकुवत आहे. त्यामुळे त्याला आता शाळेमध्ये पाठवू नका. एडिसनने आपल्या डायरीमध्ये असे लिहिले की, त्यांची आई एक महान स्त्री आहे. जिने बौद्धिक दृष्ट्या कमकुवत मुलाला शतकामधील महान वैज्ञानिक बनवले.
थॉमस एडिसन यांचे निधन
थॉमस एडिसन यांना वारंवार टेनिटसचा त्रास होत असताना, सुद्धा त्यांनी थोडे मनोरंजन, सतत कठोर परिश्रम व प्रचंड संयम, आश्चर्यकारक स्मरणशक्ती आणि अद्वितीय कल्पनाशक्ती यांद्वारे इतके यश संपादन केले कि ते एक प्रसिद्ध व थोर संशोधक म्हणून संबोधले जातात.
त्यांनी स्वतःचे आयुष्य हे प्रयोगशाळेसाठी झोकून दिले. त्यांनी आणखी गंभीर प्रयोगांसाठी दुसऱ्या प्रयोग शाळेमध्ये प्रवेश करणे, हा स्वतःचा मृत्यू आहे, असे समजले. “मी माझे आयुष्याचे काम पूर्ण केले आहे. आता मी दुसऱ्या प्रयोगासाठी तयार आहे.” असे म्हणत, “१८ ऑक्टोंबर १९३१ “ रोजी अशा महान व ज्ञानी संशोधकाचा मृत्यू झाला.
थॉमस एडिसन यांचे शोध
- तप्त झाल्यावर प्रकाशमान होणारा बल्ब
- ग्रामोफोन
- किनेटोस्कोप
- चित्रपट कॅमेरा
- फोनोग्राफ सिलेंडर
- इलेक्ट्रिक पेन
- माइमियोग्राफ (मिमियोग्राफ)
- Tasimeter
- Vitascope (विटास्कोप)
- फोनोमोटर
- इलेक्ट्रिक पॉवर वितरण
- कार्बन मायक्रोफोन
- व्हॅक्यूम डायोड
- चतुर्भुज तार
- किनेटोग्राफ
- रिचार्जेबल बॅटरी
थॉमस एडिसन यांचे विचार
- जर आपण शक्य ते सर्व केले तर, आपण खरोखरच आश्चर्यचकित होऊ.
- नेहमी व्यस्त असण्याचा अर्थ प्रत्यक्षात काम आहे असे नाही.
- मला एक पूर्ण समाधानी व्यक्ती दाखवा, आणि मी तुम्हाला एक अयशस्वी व्यक्ती दाखविन.
- शोध लावण्यासाठी आपल्याला चांगली कल्पनाशक्ती आणि कचऱ्याचा ढीग आवश्यक आहे.
- आयुष्यात अनेक यशस्वी माणसे अशी असतात, ज्यांनी हार पत्करल्यावर आपण यशाच्या किती जवळ आहोत हे कळलेच नाही.
- आम्हाला कोणत्याही गोष्टीबद्दल एक टक्का पैकी दशलक्षवंश देखील माहित नाही.
- पाच टक्के लोक विचार करतात, दहा टक्के लोकांना वाटते की ते विचार करतात, आणि उर्वरित ८५ % लोक विचार करण्यापेक्षा मरतात.
- जगाला कशाची गरज आहे, ते मी प्रथम शोधतो. मग मी त्या दिशेने जातो. आणि शोधण्याचा प्रयत्न करतो.
- आम्ही वीज इतकी स्वस्त करू की, फक्त श्रीमंत लोकच मेणबत्ती जाळतील.
- त्या कामात मला माझा सर्वात मोठा आनंद आणि माझा मोबदला मिळतो. ज्याला संपूर्ण जग यश म्हणते.
- जवळजवळ प्रत्येक व्यक्ती जो कल्पना विकसित करतो, तो अशक्य वाटेपर्यंत त्यावर कार्य करतो आणि नंतर तो निराश होतो.
- धीर धरा. मी व्यवसायात अनेक मंदी पाहिली आहे. अमेरिका त्यांच्यापासून नेहमीच अधिक शक्तिशाली आणि समृद्ध बनली आहे. आपल्या पूर्वजांप्रमाणे शूर व्हा. श्रद्धा ठेवा. पुढे जा.
- मला या गोष्टीचा अभिमान आहे की, मी कधीच मारण्यासाठी हत्यारांचा शोध लावला नाही.
- जेव्हा मला खात्री असते की, एक परिणाम साध्य करण्यायोग्य आहे, तेव्हा मी पुढे जातो. आणि जोपर्यंत मला तो मिळत नाही, तोपर्यंत मी चाचणी घेतो.
थॉमस एडिसन यांच्याबद्दल महत्त्वाची तथ्ये
- एडिसन यांचा जन्म मिलान, ओहायो येथे 1847 मध्ये झाला होता, ते सात मुलांपैकी सर्वात लहान होता.
- थॉमस एडिसन यांनी बालपणापासून अतिशय खडतर प्रयत्न केले. त्यांचे बालपण हे अतिशय कठीण प्रसंगातून गेले. यामुळे त्यांच्या आईंनी थॉमस एडिसन यांना शाळेमध्ये शिक्षण न देता घरीच शिकवले.
- वयाच्या 12 व्या वर्षी एडिसनने पोर्ट ह्युरॉन आणि डेट्रॉईट, मिशिगन दरम्यान धावणाऱ्या ट्रेनमध्ये वर्तमानपत्रे आणि स्नॅक्स विकण्यास सुरुवात केली.
- लहानपणी, एडिसनला गरीब विद्यार्थी मानले जात होते आणि त्याच्या आईने त्याला होमस्कूल केले होते.
- एडिसन हे विज्ञान आणि अभियांत्रिकीमध्ये स्वयं-शिकवले गेले होते आणि वैज्ञानिक ग्रंथ उत्कटपणे वाचण्यासाठी ओळखले जात होते.
- एडिसनने दोनदा लग्न केले होते आणि त्याला सहा मुले होती.
- एडिसनला श्रवणशक्ती कमी झाली, ज्याचे श्रेय त्याने एका ट्रेनच्या घटनेला दिले जेथे त्याला कंडक्टरने कानात मारले होते.
- १८९६ मध्ये न्यूयॉर्क शहरांमध्ये झालेल्या पोस्टर अँड बिलच्या म्युझिक हॉलमध्ये मोशन पिक्चर प्रोजेक्ट करणारे थॉमस एडिसन हे सर्वप्रथम संशोधक बनले.
- एडिसन हा इलेक्ट्रिक लाइट बल्बचा शोध लावण्यासाठी प्रसिद्ध आहे, जो त्याने 1879 मध्ये विकसित केला होता.
- 1869 मध्ये, एडिसन न्यूयॉर्क शहरात गेला आणि टेलीग्राफ ऑपरेटर म्हणून काम करू लागला.
- थॉमस एडिसन यांचे निकोला टेस्लाशी कट्टर वैर होते.
- एडिसनचा पहिला शोध स्टॉक टिकर मशीनचा होता, जो त्याने 1869 मध्ये टेलिग्राफ ऑपरेटर म्हणून काम करत असताना विकसित केला होता.
- एडिसन एक यशस्वी व्यापारी होता आणि त्याने 1890 मध्ये एडिसन जनरल इलेक्ट्रिक कंपनी (नंतर जनरल इलेक्ट्रिक म्हणून ओळखली जाते) ची स्थापना केली.
- एडिसन एक विपुल संशोधक होता आणि मोशन पिक्चर कॅमेरा, अल्कलाइन स्टोरेज बॅटरी आणि डिक्टेटिंग मशीनसह त्याच्या शोधांसाठी 1,000 हून अधिक पेटंट्स त्याच्याकडे आहेत.
- त्यांच्या जिवंतपणे थॉमस एडिसन यांना १०९३ यु.एस पेटंट मिळाले आहेत.
- एडिसन हे हेन्री फोर्डचा जवळचा मित्र होता आणि या दोघांनी अनेकदा प्रकल्पांवर एकत्र काम केले.
- 1877 मध्ये, एडिसनने फोनोग्राफचा शोध लावला, जे ध्वनी रेकॉर्डिंग आणि प्ले करण्यास सक्षम असलेले पहिले उपकरण होते.
- पहिल्या वीज वितरण प्रणालीच्या विकासासाठी देखील एडिसन जबाबदार होता, ज्याने घरे आणि व्यवसायांना वीज पुरवठा करण्याची परवानगी दिली.
- थॉमस यांचा मृत्यू १८ ऑक्टोंबर १९३१ रोजी न्यू जर्सी वेस्ट ऑरेंज युनायटेड स्टेट या ठिकाणी झाला.
- एडिसनचे 18 ऑक्टोबर 1931 रोजी वयाच्या 84 व्या वर्षी निधन झाले.
थॉमस एडिसन यांचा सन्मान व पुरस्कार
- तिसरा फ्रेंच प्रजासत्ताकाचे अध्यक्ष ज्यूस ग्रेव्ही यांनी थॉमस एडिसन यांचे परराष्ट्रमंत्री यांच्या शिफारशीवरून व पोस्टमन्त्रयांच्या सबमिशन सोबत थॉमस एडिसन यांना “लीजन ऑफ ओनर” चे सदस्य बनवले. १० नोव्हेंबर १८८१ च्या ड्रिकी द्वारे थॉमस एडिसन यांना एक अधिकारी म्हणून नाव देण्यात आले. व १८१९ मध्ये लष्करात शेव्हेलीयर आणि १८८९ मध्ये कमांडर म्हणून थॉमस एडिसन यांना नाव देण्यात आले.
- १८८७ मध्ये थॉमस एडिसन यांनी मॅट्यूची पदक जिंकले, व १८९० मध्ये ते रॉयल्स विदेश अकादमी ऑफ सायन्ससन सदस्य म्हणून निवडले गेले.
- फिलाडेफिया सिटी कौन्सिलने १८८९ रोजी थॉमस यांना जॉन स्कॉट पदक देऊन सन्मानित केले.
- १८८९ रोजी थॉमस यांना संस्थेचे “एडवर्ड लॉंग स्ट्रेथ पदक” देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच १९०४ च्या दरम्याने लुईस परचेस एक्सपोझिशन वर्ल्ड फेअर मध्ये त्यांना सन्माननीय सल्लागार अभियंता म्हणून सन्मान दिला गेला.
- १९०८ दरम्यान थॉमस एडिसन यांना अमेरिकन असोसिएशन ऑफ इंजीनियरिंग सोसायटी “जॉन फ्रेट्झ पदक” देऊन सन्मानित करण्यात आले.
- १९१५ मध्ये एडिसन यांना उद्योगाच्या पायाभरणी मध्ये व मानव जातीच्या जनकल्याणासाठी योगदान देणाऱ्या शोधासाठी फ्रँकलिन संस्थेचे “फ्रँकलिन पदक” देऊन सन्मानित करण्यात आले.
- १९२० मध्ये युनायटेड स्टेट्स नेव्ही विभागाने थॉमसन यांना “नेव्ही डिस्टिंग्वीश्ड सर्विस मेडल” देऊन सन्मानित करण्यात आले. व १९२७ च्या दरम्यान राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे थॉमस एडिसन यांना सदस्यत्व प्राप्त झाले.
- २९ मे १९२८ रोजी थॉमस एडिसन यांना काँग्रेसचे सुवर्णपदक दिले गेले.
- २००८ मध्ये थॉमस एडिसन यांचा न्यू जर्सी हॉल ऑफ फेम मध्ये समावेश करण्यात आला.
- २०१० च्या दरम्याने थॉमस एडिसन यांना “टेक्नॉलॉजी ग्रॅमी पुरस्कार” मिळाला. व २०११ मध्ये एडिसनला उद्योजक वॉक ऑफ फेम मध्ये सामील करण्यात आले, व यानंतर फ्लोरीडाचे गव्हर्नर आणि कॅबिनेट यांनी “ग्रेट फ्लोरेडियर” म्हणून थॉमस एडिसन यांना नाव दिले.
थाॅमस अल्वा एडिसनवरील मराठी पुस्तके
- थॉमस अल्वा एडिसन (चरित्र, लेखक – अनिल गोडबोले)
- एडिसन चरित्र (ह.अ. भावे)
- थॉमस आल्वा एडिसन (मदन पाटील)
- एडिसनची आगळी कहाणी (बाल कादंबरी, लेखक – सुधाकर भालेराव)
थॉमस एडिसन यांचा व्हिडिओ
FAQ
१. एडिसन यांच्या नावावर किती पेटंट्स आहेत?
१८९६ मध्ये न्यूयॉर्क शहरांमध्ये झालेल्या पोस्टर अँड बिलच्या म्युझिक हॉलमध्ये मोशन पिक्चर प्रोजेक्ट करणारे थॉमस एडिसन हे सर्वप्रथम संशोधक बनले. थॉमस एडिसन यांना १०९३ यु.एस पेटंट मिळाले आहेत.
२. थॉमस एडिसन लाइट बल्बचा शोध कधी लागला?
१८७९ मध्ये वुडवर्ल्ड आणि इनॅन्डेन्सेंट पेटंट विकत घेतल्यानंतर, एडिसनने त्यामध्ये सुधारणा केल्या व लाईट बल्ब च्या सुधारित आवृत्तीचे पॅटर्न त्यांनी स्वतःच्या नावावरती घेतले.
३. विजेच्या बल्बचा शोध कोणी लावला?
इलेक्ट्रिकल बल्बचा शोध हा थॉमस यांचा सर्वात महान शोध म्हणून समजला जातो. इलेक्ट्रिकल बल्बचा शोध लावण्यासाठी, थॉमस यांनी खूप मेहनत घेतली.
४. थॉमस एडिसनचा जन्म आणि मृत्यू केव्हा झाला?
थोर संशोधक, विद्वान थॉमस अल्वा एडिसन यांचा जन्म हा ११ फेब्रुवारी १८४७ रोजी अमेरिकेतील ओहायो या राज्यामधील मिलान या शहरांमध्ये झाला.
थॉमस यांचा मृत्यू १८ ऑक्टोंबर १९३१ रोजी न्यू जर्सी वेस्ट ऑरेंज युनायटेड स्टेट या ठिकाणी झाला.
५. थॉमस एडिसन यांना किती पुरस्कार मिळाले?
एडवर्ड लाँगस्ट्रेथ मेडल, जॉन स्कॉट लेगसी मेडल, रमफोर्ड प्राइज, अल्बर्ट मेडल, कॉंग्रेशनल गोल्ड मेडल, मॅट्युची मेडल, डिस्टिंग्युइश सर्व्हिस मेडल, फ्रँकलिन मेडल आणि जॉन फ्रिट्झ मेडल यांचा समावेश आहे. एडिसन यांना मरणोत्तर १९७७ मध्ये ग्रॅमी विश्वस्त पुरस्कार आणि २०१० मध्ये तांत्रिक ग्रॅमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
निष्कर्ष
मित्रहो, आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणस थॉमस एडिसन यांच्याबद्दल माहिती दिली आहे. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. लेख आवडल्यास तुमच्या इतर मित्रपरिवारारांसोबत नक्की शेयर करा. धन्यवाद.
खूप छान माहिती
अधिक माहितीसाठी
https://www.maharashtra86.in/