THOSEGHAR WATERFALL INFORMATION IN MARATHI : ठोसेघर धबधबा मराठी माहिती :- पावसाळा म्हटलं की डोळ्यासमोर येते ती हिरवा शालू नेसलेली धरती, बेभान होऊन डोंगरकड्यावरून कोसळणारे पांढरे शुभ्र धबधबे, रंगीबेरंगी फुलांनी नटलेली हिरवीगार पठारे, दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या, धुक्याच्या ढगांचा उंच हिरव्यागार टेकड्यांशी चाललेला लपाछपीचा खेळ आणि गवताच्या पात्यांवर टप टप नाचणारे टपोरे पाण्याचे थेंब. जर हे सगळं आपल्याला एकाच ठिकाणी अनुभवायचं असेल तर पावसात साताऱ्या सारखे दुसरे ठिकाण नाही. इथे अजिंक्यतारा किल्ला, कास पठार, ठोसेघर धबधबा, भांबवली धबधबा अशी पावसाळी पर्यटनासाठी अप्रतिम ठिकाणे आहेत. पावसाळ्यात इथे भेट दिल्यास या निसर्गसौंदर्याचा आनंद लुटताना आपण बेभान होतो. रंगीबेरंगी रानफुले लक्ष वेधून घेतात. खळाळणाऱ्या धबधब्यांना नवसंजीवनी आलेली असते.
ठोसेघर धबधबा मराठी माहिती : THOSEGHAR WATERFALL INFORMATION IN MARATHI
चला तर मग, आज आपण जाणून घेऊ साताऱ्यातील या अप्रतिम धबधब्याची संपूर्ण माहिती (ठोसेघर धबधबा मराठी माहिती) आजच्या या लेखातून…
ठोसेघर धबधबा नकाशा
ठोसेघर धबधबा पत्ता
नाव | ठोसेघर धबधबा |
ठिकाण | ठोसेघर |
जिल्हा | सातारा, महाराष्ट्र |
पर्यटन वेळ | मॉन्सून |
ऊंची | 150 ते 180 मीटर |
कधी असतो | हंगामी – पावसाळा |
ठोसेघर धबधबा सातारा | THOSEGHAR WATERFALL SATARA
हा धबधबा हा सातारा जिल्ह्यामध्ये असून, साताऱ्यापासून 26 किलोमीटर अंतरावर आहे. हा धबधबा पावसाळ्यात पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरतो. या ठिकाणी दरवर्षी मॉन्सूनमध्ये अर्थात जुलै ऑगस्ट महिन्यात धबधबा बहरायला सुरुवात होते. या धबधब्याचे पाणी अतिशय स्वच्छ, पांढरे व अति उंचावरून वाहत असते. व यामुळे या धबधब्याचे वेगळे रूप पर्यटकांना बघायला मिळते. यावेळी निसर्गाचा असलेला सहवास, त्या ठिकाणची असणारी वनराई त्यामधून वाहणारा हा thoseghar waterfall पाहणे म्हणजे एक अलौकिक अनुभव ठरतो.
या ठिकाणी दोन धबधबे असून एक लहान धबधबा आहे तो ११० मीटर उंचीवरून कोसळतो आणि दुसरा साधारण ३५० मीटर उंचावरून कोसळतो. हा धबधबा भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा उंच धबधबा ठरतो. पश्चिम घाटातील निसर्गाचा मोठा अविष्कार या दृष्टिकोनातून या धबधब्याकडे बघितले जाते.
प्रवेशद्वारपासून एन्ट्री केल्यानंतर प्रथमच आपल्याला निसर्ग माहिती केंद्र असा हा चांगला उपक्रम पाहायला मिळतो, अशा या प्रोजेक्टसाठी सातारा वनविभागाचे विशेष आभार मानले पाहिजेत. कारण या ठिकाणी सातारा जिल्ह्यातील महत्त्वाच्या नैसर्गिक ठिकाणांची माहिती प्रोजेक्टरद्वारे लोकांपर्यंत पोहोचवली जाते. पावसाळ्यात येथे अनेक लहान-मोठे धबधबे उगम पावत असतात. हा धबधबा बघण्यासाठी खाली दरीत एक भव्य व मजबूत असा निरीक्षण मनोरा बांधलेला असून, डावीकडे सुमारे २०० मीटर उंचीचा आणि उजवीकडे छोट्या धबधब्याच्या तीन वेगवेगळ्या धारा दिसतात.
निसर्गाचा एवढा सुंदर व विलोभनीय अविष्कार पाहण्यासाठी ठोसेघर धबधब्याला पर्यटकांची मोठी झुंबड उडालेली असते. धबधब्याच्या पाठीमागे गुहा आहे व या गुहेमध्ये जाऊन धबधब्याचे जवळून अगदी निरीक्षण करता येते व मनसोक्त आनंद लुटता येतो.
ठोसेघर धबधबा सातारा ते मुख्य शहर अंतर
- महाबळेश्वरपासून ७७ किलोमीटर
- पुण्यापासून १४० किलोमीटर
- मुंबईपासून २९० किलोमीटर
ठोसेघर धबधबा येथे कसे जायचे?
ठोसेघर धबधबा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यात आहे.
रस्तेसेवा :-
ठोसेघर धबधबा रस्त्याने चांगला जोडला गेला आहे. पुणे आणि मुंबईच्या जवळच्या शहरांमधून कार किंवा सार्वजनिक वाहतुकीने सहज पोहोचता येते. पुणे ते सातारा नियमित बससेवा उपलब्ध आहे. सातारा येथून ठोसेघर धबधब्यापर्यंत जाण्यासाठी बस आणि रिक्षा उपलब्ध आहेत.
रेल्वेसेवा :-
सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन सातारा येथे आहे, जे धबधब्यापासून सुमारे २० किमी अंतरावर आहे. तिथून, धबधब्यापर्यंत जाण्यासाठी तुम्ही टॅक्सी घेऊ शकता किंवा स्थानिक बस घेऊ शकता.
विमानसेवा :-
सर्वात जवळचे विमानतळ पुण्यात आहे, जे ठोसेघर धबधब्यापासून अंदाजे १२० किमी अंतरावर आहे. विमानतळावरून तुम्ही पुणे रेल्वे स्थानकापर्यंत टॅक्सी घेऊ शकता. तिथून तुम्ही बस किवा ऑटोने सताऱ्यापर्यंत येऊन मग ठोसेघर कडे जाऊ शकता.
आमचा हे लेख देखील नक्की वाचा 👇
ठोसेघर धबधबा सातारा, पाहण्यासाठी सर्वोत्तम महिना
जुलै ते नोवेंबर पर्यन्त धबधबा ओसंडून वाहत असतो. त्यामुळे या जलप्रपाताचे अजस्र रूप पहायचे असल्यास, नोवेंबर पर्यन्त भेट देणे उत्तम.
ठोसेघर धबधबा पाहण्यासाठी वेळ
सकाळी ०९ ते संध्याकाळी ०६ पर्यंत हा धबधबा पाहण्यासाठी चालू असतो.
ठोसेघर धबधबा प्रवेश शुल्क
ठोसेघरचा धबधबा पाहण्यासाठी प्रतिव्यक्ती ५० रु एवढी प्रवेश फी आहे.
ठोसेघर धबधब्याच्या जवळील प्रेक्षणीय स्थळे
अजिंक्यतारा किल्ला
- सातारा ते अंतर – ०४ किलोमीटर
- प्रकार – गिरीदुर्ग
- चढाई श्रेणी – मध्यम
सातारा जिल्ह्यातील अजिंक्यतारा हा प्रतापगडापासून सुरू झालेल्या बामणोली पर्वतरांगेवर वसलेला आहे. अठराव्या शतकात मराठा साम्राज्याची चौथी राजधानी म्हणून अजिंक्यतारा किल्ल्याकडे पाहिले जायचे. हा गिरीदुर्ग चार हजार चारशे फूट उंचीवर असून याचा विस्तार ६०० मीटर आहे. येथे महाराणी ताराबाई राजवाडा, मंगळाई देवीचे मंदिर, साततळे, हनुमान मंदिर आणि महादेव मंदिर ही स्थाने किल्ल्यावर पाहायला मिळतात. जॉगर्स, ट्रेकर्स आणि इतिहासप्रेमींसाठी हा किल्ला आवडीचे ठिकाण आहे.
कास तलाव
सातारा मधील कास तलाव हे पर्यटनासाठी आकर्षक ठिकाण आहे. सातारा शहरा पासून पश्चिमेला साधारण बावीस किलोमीटर अंतरावर हा तलाव आहे. इसवी सन १८५५ साली ब्रिटिशांनी हा तलाव बांधला. तीन बाजूंना असणाऱ्या डोंगराचा आधार घेत चैथ्या बाजूला छोटीशी भिंत बांधून कास तलाव करण्यात आला आहे. वजराई धबधबा व उरमोडी नदीचे उगमस्थान कास तलाव आहे. या ठिकाणाला भेट देण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक येत असतात. कास पठाराच्या अगदी जवळच असणारे हे ठिकाण पर्यटकांसाठी लोकप्रिय बनले आहे.
कास पठार
कास पठार हे संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय पठार म्हणून ओळखले जाते. हे पठार सातारा शहरापासून पासून २२ किलोमीटर अंतरावर आहे. कास पठारावर आपल्याला हिवाळ्यात वेगवेगळ्या वनस्पती आणि फुलांचा आनंद घेता येतो. इथे उमलणाऱ्या विविध , रंगीबेरंगी फुलांमुळे या ठिकाणाला व्हॅली ऑफ फ्लॉवर्स असेही मानले जाते.
चार भिंती – हुतात्मा स्मारक
चार भिंती हे सातारा जिल्ह्यातील एक ऐतिहासिक स्थान साताऱ्यापासून २ किलोमीटर आहे. या ऐतिहासिक ठिकाणाचे बांधकाम छत्रपती प्रतापसिंह महाराजांनी १८३० च्या दरम्यान केले. या जागेला नजारा बंगला असेही म्हटले जाते दसरा उत्सवाच्या दिवशी छत्रपतींच्या कुटुंबातील स्त्रियांना शहरातील नजारा व्यवस्थित दिसावा म्हणून याचे बांधकाम केले गेले. त्याचप्रमाणे हे ठिकाण हल्लेखोरंपासून नजर ठेवण्यासाठी बांधण्यात आले होते.
१८५७ च्या उठावात ब्रिटिश राजवटी विरुद्ध भाग घेतलेल्या स्वातंत्र्यसैनिकांना ही वास्तू समर्पित आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाई, लोकमान्य टिळक यांच्यासारख्या प्रसिद्ध सेनानींच्या नावाने येथे स्मारक उभारण्यात आले. या ठिकाणावरून सातारा शहराचे अप्रतिम दृश्य पाहता येते. इतिहास प्रेमींनी या ठिकाणाला नक्की भेट द्यावी
नटराज मंदिर
भगवान शंकरांना समर्पित असलेले हे अप्रतिम शिवमंदिर राष्ट्रीय महामार्ग 44 च्या बाजूलाच आहे. सातारा शहरापासून हे ठिकाण २ किलोमीटर अंतरावर आहे. या मंदिरात असलेली नटराज स्वरूपातील शिवमुर्ती आणि मंदिराचे अप्रतिम बांधकाम आपले लक्ष वेधून घेते.
सज्जनगड
सातारा शहरापासून १६ किलोमीटर अंतरावर असलेला सज्जनगड किल्ला इतिहास प्रेमींसाठी आवडीचे ठिकाण आहे. या गडावर श्री. समर्थ रामदास स्वामींची समाधी आहे. पहाटे पाच ते रात्री नऊ पर्यंत भाविक आणि पर्यटक गडावर जाऊ शकतात. या गडावर दुपारी आणि सायंकाळी भक्तांना मोफत प्रसाद दिला जातो.
वाजराई वॉटरफॉल
वाजराई हा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे. या धबधब्याची ऊंची जवळपास १८४० फूट आहे. उरमोडी नदी ही या धबधब्याचे उगम स्थान आहे. या धबधब्यापासून ५ किलोमीटर अंतरावर कास पठार आहे. हा धबधबा बारमाही वाहत असतो.
श्री छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय
हे संग्रहालय, सातारा संग्रहालय म्हणून ही लोकप्रिय आहे. हे संग्रहालय मराठा संस्कृती आणि महान राज्यकर्ते यांचे स्मरण ठेवण्यासाठी बांधण्यात आले आहे. आपण इथे शिवकालीन इतिहासातील वस्तु पाहू शकतो. या संग्रहालयाची रचना अश्या प्रकारे करण्यात आली आहे की, यामधून १७ व्या व १८ व्या शतकातील संस्कृतीचे दर्शन घडते. हे संग्रहालय दोन भागात विभागले आहे.
- १ प्रदर्शित वस्तु
- २ मराठा कला दालन
कोयना डॅम
सातारा शहरापासून जवळपास ७५ किलोमीटर अंतरावर असलेले कोयना धरण, हे महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध आणि सर्वात मोठे धरण आहे. सातारा जिल्ह्यामध्ये हे ठिकाण लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. स्वातंत्र्यानंतर हे धरण बांधले गेले, तसेच या धरणाला शिवसागर धरण म्हणूनही ओळखले जाते. कोयना धरण महाराष्ट्रातील पश्चिमेला पाणी पुरवते तसेच आसपासच्या परिसराला जलविद्युत पुरवठा करते.
लिंगमळा धबधबा
लिंगमळा हा साताऱ्यातील, महाबळेश्वर मधील एक धबधबा आहे. परिसर आणि शांत वातावरणासाठी ओळखला जाणारा हा धबधबा जवळपास ६०० फूट उंच असलेल्या कड्यावरून खाली कोसळतो. तुमचा साताऱ्याला जाण्याचा योग आला तर नक्की या धबधब्याला भेट द्या.
प्रतापगड किल्ला
प्रतापगड किल्ला हा सातारा जिल्ह्यातील सर्वात लोकप्रिय किल्ला म्हणून ओळखला जातो. जावळीच्या जंगलातील भोरण्याच्या डोंगरावर शिवरायांनी बांधलेला हा दुर्ग समुद्रसपाटीपासून ३५०० फूट उंचीवर आहे. प्रतापगडावर जाण्यासाठी फक्त दोन मार्ग आहेत. त्यापैकी एक मार्ग महाबळेश्वरातून जातो. महाबळेश्वर ते प्रतापगड हे अंतर २१ किलोमीटर आहे. दुसरा मार्ग पोलादपुरातून आहे. पोलादपूर ते प्रतापगड अंतर २० किलोमीटर आहे. हा शिवकालीन गड १६५८ मध्ये बांधून पूर्ण झाला व त्यानंतर १६५९ मध्ये याच्या पायथ्याशी शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध केला व आदिलशाही सत्तेस शह देण्यास सुरुवात केली.
मायणी पक्षी अभयारण्य
- सातारा ते अंतर – ७० किलोमीटर
- प्रकार – पक्षी अभयारण्य
मायणी पक्षी अभयारण्य हे सातारा जिल्ह्यातील एक लोकप्रिय पक्षी अभयारण्य आहे. या अभयारण्यात आपल्याला नवनवीन प्रजातींचे पक्ष्यांचे प्रकार पाहायला मिळतील. हे अभयारण्य जुन्या धरणावर वसलेले आहे इथे नॉर्दन शोव्हेलर, करकोचा, वेगवेगळे किंगफिशर, कूट, ब्राह्मणी बदक असे अनेक पक्षांचे प्रकार आढळतात. स्थलांतरित पक्षांमध्ये पेंटेड स्टॉर्क, स्पून बिल आणि फ्लेमिंगो हे येथील मुख्य आकर्षण आहे. जवळपास नऊ चौरस किलोमीटर आणि सहा गावांमध्ये पसरलेल्या या पक्षी अभयारण्याला पक्षीप्रेमींनी नक्की भेट द्या.
या अभयारण्यात आपल्याला ४०० हून अधिक प्रजातींचे पक्षी पाहायला मिळतील. तसेच येथे जाण्यासाठी आपल्याला पंधरा रुपये तिकीट मोजावे लागेल.
थोडक्यात पण महत्वाचे
धबधब्यावर जाताना मजबूत हायकिंग शूज किंवा बूट घाला.
चांगल्या वाटेवरून प्रवास करा.
धबधब्याजवळ पोस्ट केलेल्या चेतावणी चिन्हे आणि नियमांकडे लक्ष द्या.
धबधब्यावर किंवा त्याभोवती कधीही चढू नका.
धबधब्यातून कधीही उडी मारू नका किंवा तलावात डुबकी मारायला जाऊ नका.
मुलांची आणि पाळीव प्राण्यांची काळजी घ्या.
ठोसेघर धबधब्याच्या जवळील हॉटेल्स
- ०१)कास पठार ड्रीम हाऊस
- ०२)ठोसर येथील हिरवाई धबधबा कृषी पर्यटन (रिसॉर्ट)
- ०३)ठोसेघर धबधबा कृषी पर्यटन केंद्र
- ०४)हॉटेल राजतारा
- ०५)हॉटेल राधिका पॅलेस
FAQ
ठोसेघर धबधबा कुठे आहे?
ठोसेघर धबधबा महाराष्ट्रात साताऱ्याजवळ आहे.
साताऱ्यातील ठोसेघर धबधब्यावर कसे जायचे?
ठोसेघर धबधब्यापर्यंत पोहोचण्याचा उत्तम मार्ग म्हणजे कार
ठोसेघर धबधबा कोणत्या राज्यात आहे?
ठोसेघर धबधबा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यात आहे
साताऱ्यातील ठोसेघर धबधब्याला भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ कोणती?
जुलै ते नोव्हेंबर.
ठोसेघर धबधब्याला जाण्यासाठी प्रवेश शुल्क किती आहे ?
प्रती व्यक्ती ५० रु.
निष्कर्ष
आम्ही आमच्या आजच्या लेखातून आपणास THOSEGHAR WATERFALL INFORMATION IN MARATHI दिली आहे. हा लेख तुम्ही नक्की वाचा आणि कमेंट करून आम्हास नक्की कळवा.
धन्यवाद .