शतावरी माहिती मराठी Shatavari In Marathi

आयुर्वेदाच्या ऋषीमुनींनी अनेक औषधींचे संशोधन करून, त्यांचे स्वरूप त्यांची पर्यायी नावे, त्यांच्या उत्पत्तीची स्थाने कोणती ? या औषधांचा कोणता भाग घ्यावा ? ही औषधे कशी वापरावी ? याचे फार सविस्तर वर्णन ग्रंथांमध्ये करून ठेवले आहे.

सध्या आधुनिक संशोधनाने या ग्रंथ ज्ञानाला आणखी पुष्टी मिळत आहे. Shatavari जशी आयुर्वेदात प्रसिद्ध आहे, तसेच सध्या आधुनिक संशोधनाने त्याचे अनेक गुण शोधून काढले आहेत आणि त्याचा वापर आधुनिक काळात बऱ्याच सप्लीमेंट्स मध्ये देखील केला जातो.

आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास शतावरी म्हणजे काय या बद्दल माहिती दिली आहे. हि माहिती जाणून घेण्यासाठी खालील लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.

शतावरी माहिती मराठी Shatavari In Marathi

शतावरीची पर्यायी नावे

याची पर्यायी नावे हि फार सुंदर आहेत. त्यातूनही हीचे गुण आणि स्वरूप अशा दोन्हीची आपल्याला माहिती मिळते.

Shatavari म्हणजे काय तर, अनेक मुळे असलेली, नारायणी म्हणजे विष्णूला प्रिय असणारी, अतिशय गुणकारी, शतपदी, सहस्त्रविर्या म्हणजे हजारो गुण असणारी किंवा हजारो उपयोग असणारी, अशी हीची पर्यायी नावे आहेत. याचे लॅटिन नाव आहे अस्परागुस रेसमोसिस.

हे वाचा –

100 ग्रॅम कच्च्या शतावरीमध्ये पोषक घटक असतात :-

सेलेनियम0.0023 मि ग्रा व्हिटॅमिन C5.6 मि ग्रा 
व्हिटॅमिन E1.13 मि ग्रा नियासिन0.978 मि ग्रा 
फोलेट 0.052 मि ग्रा कॅल्शियम 24 मि ग्रा 
व्हिटॅमिन K 0.0416 मि ग्रा कार्बोहायड्रेट 3380 मि ग्रा 
डायटरी फायबर2100 मि ग्रा झिंक0.54 मि.ग्रा 
लोह1.14 मि ग्रामँगनीज 0.158 मि ग्रा 
थियामिन0.143 मि ग्रा प्रोटिन 2200 मि ग्रा 

शतावरी कूठे आढळते व कशी असते ?

शतावरी माहिती मराठी

ही भारतात सर्वत्र आढळतेच, त्यातही उत्तर भारतात याचे प्रमाण अधिक असते. याचे झुडूप अनेक वर्ष टिकणारे, वेलीप्रमाणे वाढणारे, काटेरी असणारे, सदाबहार हिरव्या रंगाचे आणि छोटी टोकदार पाणे असलेले असते.

या झाडाचा महत्वाचा औषधी भाग म्हणजे त्याचे मूळ. एका झुडपाच्या खाली मातीमध्ये, शेकडो मुळे असतात. ती मुळे बोटाप्रमाणे जाड आणि आत मध्ये साल निघाल्यानंतर, शुभ्र पांढऱ्या रंगाची असतात.

शतावरीचे गुण कोणते ?

शतावरी
  • शतावरी हि गुरु म्हणजे शीत म्हणजेच थंड गुणाची, पित्त म्हणजे कडवट आणि मधुर रसाची आहे. या कडवट आणि मधुर रसामुळे ती वात आणि पित्त या दोन्ही दोषांचे शमन करते. शरीरातील उष्णता आणि कोरडेपणा कमी करणारे औषध आहे म्हणून आम्लपित्त किंवा पोटात, छातीत जळजळणे, आग होणे, अशा तक्रारीत शतावरीचा खूप फायदा होतो.
  • रसायन हा Shatavari चा सर्वात महत्त्वाचा गुण आहे. रसायन म्हणजे काय तर वार्धक्याचे परिणाम दूर करणारे, तारुण्य टिकवून ठेवणारे औषध. रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा, शुक्र, या सातही धातूंचे पोषण करणारे औषध आहे. जेव्हा ह्या शरीर घटकांचा क्षय होतो, हानी होते किंवा दुर्बलता येते, तेव्हा हीचा योग्य उपयोग केला तर सर्व शरीर घटकांना बलप्राप्ती होते. शरीर घटकांची झीज मुख्यतः वात आणि पित्त वाढल्यामुळे, म्हणजेच उष्णता आणि कोरडेपणा यामुळे आपला प्रवास, धावपळ, नियमित कामे, वाढणारे वय, वेगवेगळ्या आजार या सर्वांमुळे शरीर घटक हळूहळू हळू क्षीण होत जातात, त्यांना पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी रसायन औषधाची योजना आयुर्वेदाने केली आहे. त्यातलेच एक महत्त्वाचे औषध म्हणेज शतावरी.
  • ज्यांना खूप प्रवास असतो, धावपळ असते, त्यामुळे गुडघे दुखतात, नेहमी कंबर दुखते किंवा हाडांची झीज होते, अशा सर्वांनी नियमितपणे शतावरीचे सेवन करायला हवे. Shatavari आधुनिक दृष्ट्या अँटिऑक्सिडंट आहे. शरीरातले जे फ्री रेडीकल्स असतात, त्यामुळे होणारी पेशींची झीज यामुळे कमी होते. आधुनिक दृष्ट्या हीच्या मुळांमध्ये एक नवीन अँटिऑक्सिडंट सापडले आहे. ज्यामुळे तणाव नियंत्रित राहतो आणि शरीराच्या सूक्ष्म पेशींचे बल वाढते.
  • त्याचबरोबर मेध्य आहे, म्हणजेच बुद्धीवर्धक आहे. Shatavari च्या नित्यसेवनामुळे मज्जा धातू किंवा मेंदूची पुष्टी होते. त्यामुळे मेध्य म्हणजे बुद्धीवर्धक गुण दिसतो. म्हणून विद्यार्थी, लहान मुले, वृद्ध व्यक्ती, यांना देखील शतावरी नियमितपणे द्यावी.
  • अग्निपुष्टी करणारी म्हणजेच जठराग्नी वर्धक, ज्यांना भूक लागत नाही, पचन व्यवस्थित होत नाही, त्यांची पचनशक्ती योग्य करणारे हे औषध आहे. अग्नि वर्धक औषध हे बरेचदा उष्ण गुणाची असतात. पण शतावरी हे मृदू औषध आहे. त्यामुळे दुर्बल व्यक्ती, स्त्रिया, मुले, वृद्ध व्यक्ती, यांच्यातील पचनशक्तीला वाढवण्याचे काम Shatavari अगदी हळुवारपणे करते. हि स्निग्ध म्हणजे शरीरातील स्निग्धपणा वाढवणारी, शरीतातील कोरडेपणा दूर करण्यासाठी आवश्यक असलेले सगळे गुण या एकाच औषधात एकवटले आहेत.
  • याचबरोबर डोळ्यांसाठी अतिशय हितकारक आहे. तर अतिसार, अंगावर किंवा आपल्या अवयवांवर येणारी सूज कमी करणारी, रक्त पित्त उष्णता अशा व्याधीना दूर करणारी आहे. प्रदर म्हणजे पाळीचा दिवसात जास्त त्रास होत असेल, अशा स्त्रियांचा त्रास कमी करणारी, गर्भाशयाच्या स्नायूंना बल देऊन, जे स्त्री विशिष्ट हार्मोन्स आहेत त्यांचे संतुलन साधनारी ही स्त्रियांची मैत्रीण असावी, अशी अतिशय उत्तम औषधी आहे.
  • २०१८  मध्ये झालेल्या फार्मकॉ थेरीपीच्या संशोधनात, ही औषधी हार्मोनल असंतुलन आणि सुधारणा करते असे सिद्ध झाले. बाळंतपणानंतर अंगावरचे स्तन किंवा दूध वाढवण्यासाठी, शतावरी कल्प अर्थातच फार पॉप्युलर आहे. यामुळे अंगावरचे दूध वाढते. बाळाचे पोट भरते. बाळाचे पोषण योग्य झाल्यामुळे, बाळाचे वजन वाढते त्याचा रंग सुधारतो. त्याचबरोबर आईची कंबर दुखी म्हणजे शस्त्रक्रिया किंवा बाळंतपणानंतर आलेला थकवा बाकीच्या तक्रारी दूर करणारी आणि गर्भाशयाचे बल पुन्हा स्थापन करणारी, असे कार्य शतावरी कल्प मुळे होते.
  • छातीत धडधडणे, खूप घाम येणे, उदास वाटणे, पाळी अनियमित होणे, केस गळणे, या रजोनिवृत्त काळातल्या तक्रारीसाठी, ही औषधी उपयुक्त आहे. तीन महिने नियमितपणे या औषधीचे सेवन केल्यास, रजोनिवृत्त काळात होणाऱ्या सगळ्या तक्रारी कमी होतात, असे संशोधनाने सिद्ध केले.
  • त्याचबरोबर ही वृष आहे, म्हणजेच स्त्री पुरुष दोघांची प्रजनन क्षमता वाढवणारी औषधी आहे. ज्या स्त्रियांना गर्भधारणा होण्याचे अडचणी आहेत, अशा स्त्रियांसाठी या औषधीची औषधे वापरली, तर गर्भधारणा होण्यास फायदा होतो आणि गर्भधारणा झाल्यानंतर, ती टिकून राहण्यास मदत होते. त्यामुळे हृदयाची धडधड नियमित होण्यास मदत होते.
  • रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी होऊन, हृदयाच्या स्नायूंना मजबूत बनवण्याचे काम ही औषधी करते. ही औषधी एक अँटी एजिंग औषध आहे. २०१५  मध्ये केलेल्या एका संशोधनात, यामध्ये सेपोनिन नावाचे तत्व सापडले, त्यामुळे त्वचेवरच्या सुरकुत्या कमी होतात आणि त्वचेमधला स्निग्धपणा टिकून राहतो, लवचिकपणा टिकून राहतो, त्यामुळे त्वचेवर होणारे वाढत्या वयाचे परिणाम, सुरकुत्या, निस्तेजपणा कमी होतात.
  • याशिवाय या औषधीने सिद्ध केलेले तूप आणि तीने सिद्ध केलेले तेल हे देखील चिकित्से मध्ये वापरले जाते. ही औषधी सिद्ध तेलाने स्थानिक उपचार म्हणजेच मालिश केल्यास, मांसधातूचा क्षय भरून येतो. नसा मजबूत होतात. त्वचा चांगली होते. लहान मुलांच्या मसाज साठी ही औषधी सिद्ध तेल अतिशय उत्तम आहे. त्याचबरोबर ज्यांना पायात गोळे येतात किंवा त्वचा वृक्ष झाली आहे किंवा वृद्ध व्यक्ती ज्यांच्या हातापायांची ताकद कमी झाली आहे, अशांसाठी ही औषधी स्निग्ध तेलाची मालिश अत्यंत गुणकारी आहे.

शतावरीचे सेवन करताना कोणती काळजी घ्याल ?

Shatavari In Marathi
  • ही वेगवेगळ्या स्वरूपात वापरली जाते म्हणजे शतावरीचे सुप फार लोकप्रिय आहेत. हि अग्नीदीपण म्हणजे भूक वाढवणारी, पचन करणारी असल्यामुळे, जेवणापूर्वी ताज्या मुळांचे सूप घेतले तर, भूक वाढते. शतावरी चूर्ण, किंवा तीच्या गोळ्या, तीचा रस, शतावरी कल्प, अशा वेगवेगळ्या स्वरूपात आपण ही औषधी नियमित सेवन करू शकतो.
  • लहान मुले, गर्भिणी, अशक्त, दुर्बल लोक, वृद्ध लोक, यांच्यासाठी तिचा कल्प हा उत्तम पर्याय आहे दुधामध्ये कोण कोण बोर्नविटा, प्रोटीन किंवा पावडर टाकून घेण्या ऐवजी कल्प नियमित घेतला तर, त्याचे अनेक फायदे मिळतात.
  • ताज्या मुळांपासून बनवलेला कल्प अधिक उपयुक्त असतो. पण असा कल्प केवळ वैद्य आपल्या पेशंटसाठी थोड्या प्रमाणात बनवू शकतात.
  • कंपन्यांमध्ये जो कल्प बनतो, तो या औषधीच्या सुकलेल्या मुळे आणि भरपूर साखर घालून जनरली बनवला जातो. त्यामुळे शक्यतो आपल्या जवळच्या वैद्यांकडून त्यांनी स्वतः बनवलेला कल्प मिळाला, तर तो अधिक उत्तम. पण ज्यांना डायबिटीस आहे, वजन खूप वाढते, किंवा साखर नकोय, अशा लोकांनी याचे चूर्ण घ्यावे.
  • हे चूर्ण कसे घ्यावे तर, एक चमचा चूर्ण, एक कप पाणी, एक कप दूध, हे उकळून घ्यावे. एक कप शिल्लक राहील, तेव्हा गाळून घ्यावा. शिरपात घ्यावा. हाच शिरपात शतावरीच्या काड्या, दूध आणि पाण्यात उकळून देखील बनवू शकतो.

शतावरीचा स्त्रियांच्या आरोग्यासाठी उपयोग

Shatavari

आपल्यातील बऱ्याच जणांना हा कल्प, या आयुर्वेदिक औषधी बद्दल माहिती असेल. ती प्रेग्नेंसी आणि डिलिव्हरी नंतर घेतली जाते, हेही माहिती असेल.

परंतु कल्पचा उपयोग हा एवढा पुरताच मर्यादित नसून, स्त्रीच्या आयुष्यातील प्रत्येक टप्प्यांमध्ये तीचा खूप फायदा होऊ शकतो. म्हणूनच तीला “क्वीन ऑफ हर्ब्स” म्हणजेच “वनस्पतींची राणी” असे संबोधले जाते.

बहुगुणी ही औषधी स्त्रियांची खास मैत्रीण आहे. ही एक आयुर्वेदिक औषधी असून, शत म्हणजे शंभर मुळ्या तिला असतात. तसेच ही शंभर आरोग्य समस्यांवर गुणकारी देखील असते. हि वात, पित्त कमी करणारी व किंचित कफ वाढवणारी असते.

यामध्ये विटामिन ए, इ, के, विटामिन बी६, फोलेट, आयर्न, कॅल्शियम आणि सगळ्यात महत्वाचं अँटिऑक्सिडंट. एवढे सगळे महत्वाचे घटक असतात. आपले फ्री रॅडिकल्स पासून संरक्षण होते. वातावरणातील फ्री रॅडिकल्स मुळे आपल्याला खूप आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागते, तर कल्प त्याच्यापासून आपलं रक्षण करते.

मासिक पाळी येण्याचा काळ

कल्प बनवताना, त्याच्यामध्ये साखर घातली जाते. गोळ्या किंवा स्वरस हे देखील मार्केटमध्ये अवेलेबल आहे. परंतु कल्प हे सगळ्यात जुन व नावाजलेल फोर्मेशन आहे.

सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा टप्पा आहे तो म्हणजे मासिक पाळी येण्याचा काळ. साधारणतः १२ ते १४ व्या वर्षी मुलींना मासिक पाळी सुरू होते आणि अशावेळी तिला खूप मानसिक आणि शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागते.

शारीरिक बदल होतात तसेच मासिक पाळीच्या ही तक्रारी असतात. जसे की अतिरक्तस्राव होणे, अनियमित्ता होत राहणे, त्यामुळे तिला खूप तणावातून जात असते. अशावेळी कल्प घ्यायला सुरुवात केली तर, तिचा हा काळ अगदी सुखकर होऊ शकतो.

पी.एम.एस

पी.एम.एस म्हणजे साधारणतः पाळीच्या दिवशी स्त्रियांना पायांना गोळे येणे, कंबर दुखणे, हे तर त्रास होतातच त्याचबरोबर मानसिक स्वास्थ्य बिघडते, झोप न लागणे, हे सगळे बदल त्याच्या हार्मोन्स असंतुलन झाल्यामुळे होत असतात.

आणि अशावेळी जर कल्प नियमित सुरू केला तर, पीएमएस हळूहळू कमी होऊन कायमचा नाहीसा देखील होतो. कारण कल्पमध्ये हॅपी हार्मोन्स सिक्रिट करण्याची क्षमता असते. त्यामुळे याचा कल्प प्रत्येक स्त्रीने जरून सुरु करावा.

रजोनिवृती

रजोनिवृती म्हणजे मासिकपाळी जाण्याचा काळ, मासिकपाळी अशी एका दिवसात जात नाही तर, जाण्यापूर्वी एक ते दोन वर्ष व गेल्यानंतर एक ते दोन वर्ष हा टोटल चार ते पाच वर्षाचा काळ हा त्या स्त्रीसाठी आव्हानात्मक असा असतो.

कारण खूप सारे शारीरिक आणि मानसिक बदल तिच्यात होत असतात. त्यामुळे चिडचिडेपणा, तान तणाव, नैराश्य या सगळ्या गोष्टींना स्त्रीला सामोरे जावे लागते तर, अशावेळी या औषधीचा कल्प सुरू केला तर, हे त्रास तिला काही प्रमाणात कमी होऊ शकतात.

गर्भाशयाला पोषक

ही गर्भाशयाला पोषक असणारी वनस्पती आहे. त्यामुळे प्रजनन क्षमता देखील वाढते.

ज्यांना मासिक पाळीच्या तक्रारी आहे, पीसीओडी आहे, अशांमध्ये कल्प खूप फायद्याचा ठरतो आणि त्यामुळे स्त्रीची प्रजनन क्षमता वाढते व त्या स्त्रीला लवकर मूल होण्यास मदत होते.

प्रेग्नेंसी

गर्भाशयाला बल देणारी आहे. त्यामुळे पहिल्या महिन्यापासून ते नवव्या महिन्यापर्यंत हा कल्प आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेण्यास काहीही हरकत नाही.

त्यामुळे मातेचे पोषण होण्यास मदत होते व बाळाला सुद्धा अत्यंत फायद्याचे ठरते.

डिलिव्हरी नंतर

याचा सगळ्यात महत्त्वाचा उपयोग म्हणजेच स्तन निर्मिती. बाळ पहिले सहा महिने फक्त आईच्या दुधावर अवलंबून असतं.

अशावेळी तिला दूध व्यवस्थित येणे, गरजेचे असते. पण जर तिला काही शारीरिक आजार असतील आणि काही मानसिक तणावातून ती जात असेल, तर दुग्ध निर्मिती कमी होते आणि परिणामी बाळाच पोषण देखील कमी होतं.

अशावेळी जर तिने डिलिव्हरी पासून ते एक वर्षभरापर्यंत हा कल्प घेतला तर, तिला या समस्येला सामोरे जावे लागत नाही आणि ती आनंदाने बाळाच संगोपन करू शकते.

अँटी एजिंग

वाढत्या वयाबरोबर चेहऱ्यावर सुरकुत्या येणे, फाईन लाईन्स येणे, डार्क सर्कल येणे, या सर्वांमध्ये याचा कल्प अत्यंत फायद्याचा ठरतो.

यामध्ये असलेल्या फ्री रॅडिकल्स मुळे, फाईन लाईनपासून सुटका होते.म्हणून छान, सुंदर, तजेलदार त्वचेसाठी आणि कायम चीर तरुण राहण्यासाठी शतावरी स्त्रियांनी घ्यायला हरकत नाही.

प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी

आजच्या काळामध्ये प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हा कल्प जर तुम्ही नियमित घेतला, तर तुमच्या शरीरामध्ये रोगापासून लढण्यासाठी अँटीबॉडी तयार होतात.

आणि तुमची रोग प्रतिकारशक्ती वाढते, त्यामुळे जरी कुठला आजार झाला तर, त्यातून लवकर बऱ्या होण्यासाठी तुम्हाला फायदा होतो.

डिप्रेशन मधून बाहेर पडण्यासाठी

डिप्रेशन हा शब्द आज सगळीकडे वापरला जातो. कारण या समस्याला आपल्या सगळ्यात जास्त सामोरे जावे लागते.

स्त्रीयांना त्यांच्या आयुष्यात कधी ना कधी या कंडीशन मधून जावं लागतं किंवा जावं लागण्याची शक्यता असते. हॅपी हार्मोन्स सिक्रीट करण्यामध्ये शतावरीचा मोठा रोल आहे.

तर जर आपण शतावरी कल्प नियमित घेत राहिलो तर, आपल्याला डिप्रेशनची समस्या सहसा होणार नाही. जर गेलो डिप्रेशनमध्ये तर लवकर बाहेर येण्यासाठी त्याची मदत होईल, त्यामुळे सगळ्यांनी शतावरी कल्प नेहमीत घ्यावे.

मेध्य

शतावरी हे मेध्य आहे. मेध्य म्हणजे स्मृती आणि आकलन शक्ती वाढवणार असं ते रसायन आहे, टॉनिक आहे.

त्यामुळे आपल्याला लहान मुलींना, तसेच मुलांना देखील दोन वर्षाच्या पुढे शतावरी कल्प द्यायला हरकत नाही.

आय टॉनिक

शतावरी कल्प हे आय टॉनिक सुद्धा आहे. आजकाल लहानपणापासूनच मुलांना चष्मा लागतोय तर लहानपणापासुनच आपण त्यांना शतावरी कल्पाचा उपयोग आपण त्यांना करायला दिला तर लहान मुलांना  लवकर चष्मा लागण्याची शक्यता कमी होते.

शतावरीची शेती

शतावरी ही औषधी वनस्पती आहे. तिच्या मुळाना बाजारात चांगली किंमत मिळते. मुंबई, पुणे, मालेगाव, रत्नागिरी, कोल्हापूर, बुलढाणा, नागपूर, अमरावती, अशा अनेक ठिकाणी शतावरीच्या विक्रीसाठी मार्केट आहे. नर्सरी, रोपवाटिका याठिकाणी शतावरीची रोपे मिळतात.

त्यांची लागवड, शेतात रोपण पद्धतीने करावी. नर्सरीतील रोप महाग पडत असेल त,र तुम्ही स्वतः देखील शेतात रोपे तयार करू शकतात.

एक बिघ्यासाठी तीन किलो शतावरी बियाण्याचे रोप तयार करावे आणि त्याचे नंतर बिघ्याभर जमिनीत रोपण करावे. दीड ते दोन महिन्यात शतावरीची रोपे लावण्यासाठी योग्य होतात. शतावरी असलेल्या जमिनीत जास्त पाणी साठू देऊ नये.

शतावरीची मुळे यामुळे सडू लागतात. बिघाभर शतावरी साठी संपूर्ण खर्च जवळपास ५० हजार रुपये एवढा येतो. एका बिघास सुमारे पाच क्विंटल शतावरीचे उत्पन्न येते. योग्य मार्केट शोधले तर, पाच क्विंटल शतावरी सहा ते सात लाखांची निश्चित होते, यात शंकाच नाही.

अशा रीतीने तुम्ही शतावरीची शेती करून योग्य मोबदला नफा प्राप्त करू शकता. शतावरीला उत्तम निचऱ्याची, डोंगराळ रेताळ आणि माळरानाची जमीन उत्तम ठरते. समशीतोष्ण, जास्त पाऊस असलेला आणि दुष्काळी भागातही या पिकाची चांगली वाढ होते.

FAQ

१. शतावरीचे झाड कोणते?

ही भारतात सर्वत्र आढळतेच, त्यातही उत्तर भारतात याचे प्रमाण अधिक असते. शतावरीचे झुडूप अनेक वर्ष टिकणारे, वेलीप्रमाणे वाढणारे, काटेरी असणारे, सदाबहार हिरव्या रंगाचे आणि छोटी टोकदार पाणे असलेले असते. या झाडाचा महत्वाचा औषधी भाग म्हणजे त्याचे मूळ. एका झुडपाच्या खाली मातीमध्ये, शेकडो मुळे असतात. ती मुळे बोटाप्रमाणे जाड आणि आत मध्ये साल निघाल्यानंतर, शुभ्र पांढऱ्या रंगाची असतात.

२. शतावरीचे फायदे काय?

शतावरी डोळ्यांसाठी अतिशय हितकारक आहे. तर अतिसार, अंगावर किंवा आपल्या अवयवांवर येणारी सूज कमी करणारी, रक्त पित्त उष्णता अशा व्याधीना दूर करणारी आहे. प्रदर म्हणजे पाळीचा दिवसात जास्त त्रास होत असेल, अशा स्त्रियांचा त्रास कमी करणारी, गर्भाशयाच्या स्नायूंना बल देऊन, जे स्त्री विशिष्ट हार्मोन्स आहेत त्यांचे संतुलन साधनारी ही स्त्रियांची मैत्रीण असावी, अशी अतिशय उत्तम औषधी आहे.
२०१८  मध्ये झालेल्या फार्मकॉ थेरीपीच्या संशोधनात, शतावरी हार्मोनल असंतुलन आणि सुधारणा करते असे सिद्ध झाले. बाळंतपणानंतर अंगावरचे स्तन किंवा दूध वाढवण्यासाठी, शतावरी कल्प अर्थातच फार पॉप्युलर आहे. यामुळे अंगावरचे दूध वाढते. बाळाचे पोट भरते. बाळाचे पोषण योग्य झाल्यामुळे, बाळाचे वजन वाढते त्याचा रंग सुधारतो.
त्याचबरोबर आईची कंबर दुखी म्हणजे शस्त्रक्रिया किंवा बाळंतपणानंतर आलेला थकवा बाकीच्या तक्रारी दूर करणारी आणि गर्भाशयाचे बल पुन्हा स्थापन करणारी, असे कार्य शतावरी कल्प मुळे होते. छातीत धडधडणे, खूप घाम येणे, उदास वाटणे, पाळी अनियमित होणे, केस गळणे, या रजोनिवृत्त काळातल्या तक्रारीसाठी, शतावरी उपयुक्त आहे.

३.शतावरी ही भाजी आहे का?

शतावरी ही औषधी वनस्पती आहे. तिच्या मुळाना बाजारात चांगली किंमत मिळते. मुंबई, पुणे, मालेगाव, रत्नागिरी, कोल्हापूर, बुलढाणा, नागपूर, अमरावती, अशा अनेक ठिकाणी शतावरीच्या विक्रीसाठी मार्केट आहे. नर्सरी, रोपवाटिका याठिकाणी शतावरीची रोपे मिळतात. त्यांची लागवड, शेतात रोपण पद्धतीने करावी. नर्सरीतील रोप महाग पडत असेल त,र तुम्ही स्वतः देखील शेतात रोपे तयार करू शकतात.

निष्कर्ष

मित्रहो, आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास शतावरी म्हणजे काय ? त्याचे उपयोग इत्यादी बद्दल माहिती दिली आहे. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. लेख आवडल्यास तुमच्या इतर मित्र परीवारांसोबत नक्की शेयर करा.धन्यवाद. .

Leave a comment