स्थलांतर म्हणजे काय What Is Migration

स्थानांतर ही मानवाची एक प्रवृत्ती आहे. मानव नेहमीच बऱ्याचशा गोष्टींसाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करीत असतो. मानवाच्या या हालचालीलाच आपण “स्थलांतर” असे म्हणतो.

आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास स्थलांतर म्हणजे काय? त्याचे प्रकार, परिणाम, कारणे इत्यादी बद्दल माहिती दिली आहे. हा लेख जाणून घेण्यासाठी खालील लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.  

Table of Contents

स्थलांतर म्हणजे काय What Is Migration

स्थलांतरित लोकसंख्या २०% पेक्षा जास्त असलेले देश

जर्मनी१२.३१ % हाँगकाँग ४२.५९%
भारत ३७.८७%ओमान २४.४६ %
सौदी अरेबिया २५.२५% ग्रेट ब्रिटन८.९८%
कुवेत६२.११%अफगाणिस्तान ०.१४%
इस्राईल ०.५२% ब्राझील ०.३४%
बांगलादेश०.७३%अमेरिकेची संयुक्त संस्थाने १२.८१ %

स्थानांतरसंबंधित व्याख्या

स्थलांतर म्हणजे काय

Migration हा लोकसंख्येवर परिणाम करणारा घटक महत्त्वाचा घटक आहे.Migration हे अल्पकाळ, दीर्घकाळ किंवा कायमस्वरूपी असते. उदा. विवाह, शिक्षण, व्यवसाय, बदली, पर्यटन, नैसर्गिक आपत्ती, युद्ध इ. कारणांमुळे लोक Migration करतात. 

ते अनेक प्रकारचे असते. ते कोणत्या प्रकारचे आहे यावारून त्याचा विकासाशी असणारा संबंध ठरतो. उदा. भारतातून अनेक उच्च शिक्षित तरुण मुले-मुली परदेशांत नोकरीसाठी जातात. पैशाची-सुविधांची ज्ञानाची, स्वप्नपूर्तीची माणसाला उब लागते. त्यासाठी माणसं Migration करतात. हे Migration ऐच्छिक असते. जन्मापासून प्रत्येकाला स्वातंत्र्याची आस असते. नाळ तोडून स्वतःचं स्वतंत्र आयुष्य जगण्याची धडपड असते; पण त्याच वेळी मिळालेल्या स्वातंत्र्याची भीती वाटत असते. 

या संबंधित या ठिकाणी एकूण तीन व्याख्या दिलेल्या आहेत.

१) “एखाद्या व्यक्तीने अथवा व्यक्तीसमूहाणे आपले नेहमीचे निवासस्थान सोडून, दुसऱ्या ठिकाणी दीर्घकाळ किंवा कायमस्वरूपी वास्तव्यासाठी जाणे, म्हणजे स्थलांतर होय”.

एखादी व्यक्ती असेल किंवा व्यक्तींचा समूह असेल, जिथे राहत असतात ते आपल्या निवासस्थान सोडून, दुसऱ्या ठिकाणी ते जातात मग ते दीर्घकाळासाठी जात असतील किंवा कायमस्वरूपी जात असतील, अशा या त्यांच्या हालचालीला स्थलांतर असे म्हटले गेले.

२) दुसऱ्या व्याख्या मध्ये यामध्ये थोडासा बदल केला आहे. तरी इथं भौगोलिक आणि राजकीय विभागांचा अंतर्भाव केलेला दिसतो. या व्याख्यानुसार –

“एका भौगोलिक किंवा राजकीय विभागातून दुसऱ्या भौगोलिक किंवा राजकीय विभागात दीर्घकाळ किंवा अल्पकाळ वास्तव्य करण्याच्या, हेतून व्यक्तींची किंवा व्यक्ती समूहाची जी हालचाल होते, त्याला आपण स्थलांतर असे म्हणतो.”

म्हणजे लोक जी हालचाल करतात, ते हालचाल एका भौगोलिक विभागाकडून, दुसऱ्या भौगोलिक विभागाकडे किंवा एका राजकीय विभागाकडून, दुसऱ्या राजकीय विभागाकडे असते. असं या व्याख्येतून आपल्याला अभिप्रेत आहे.

३) त्यानंतर तिसरी व्याख्या या व्याख्यामध्ये ही जी हालचाल होते त्या हालचाली मागची कारण सांगितली आहे, त्या कारणांच्या अनुषंगाने ही व्याख्या-  

“व्यक्ती किंवा व्यक्ती समूहाने आपले मूळ निवासस्थान सोडून आर्थिक, सामाजिक, राजकीय, धार्मिक, इत्यादी. कारणांसाठी दुसऱ्या ठिकाणी दीर्घकाळ किंवा कायमस्वरूपी वास्तव्यासाठी जाण्याची ही मानवी क्रिया आहे, तिला पण स्थलांतर असे म्हणतो”.

म्हणजे इथं व्यक्ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी काही काळासाठी किंवा कायमस्वरूपासाठी स्थलांतरीत होतात, त्याच्या मागे आर्थिक, सामाजिक, राजकीय किंवा धार्मिक यासारखी कारणे असतात आणि या अनुषंगाने ही व्याख्या सांगितलेली आहे.

हे वाचा-

स्थलांतर

स्थलांतराचे प्रकार

प्रामुख्याने याचे प्रकार तीन ते चार प्रकार सांगितले जातात.

भौगोलिक विभागावर आधारित स्थलांतराचे प्रकार

भौगोलिक विभागावर आधारित याचे दोन प्रकार पडतात.

१) देशांतर्गत स्थलांतर

लोक एकाच देशात, देशातल्या देशात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी Migrate होतात.

त्यास आपण देशांतर्गतMigration असे म्हणतो. देशांतर्गत याचे देखील दोन प्रकार पडतात.

अ) आंतरराज्यीय स्थलांतर

लोक आपल्या देशात एका राज्यातून दुसऱ्या राज्यात ज्यावेळी Migration करतात, त्यावेळी त्याला आंतरराज्यीय Migration असं म्हटलं जातं.

म्हणजे महाराष्ट्रातून कर्नाटकात किंवा कर्नाटकातून महाराष्ट्रात ज्यावेळी, आपण Migration करतो तेव्हा ते आंतरराज्यीय स्थलांतर असते. तसेच उत्तर प्रदेश बिहार मधून, लोक महाराष्ट्रात येतात. ते देखील आंतरराज्यीय याचे उदाहरण आहे.

ब) राज्याअंतर्गत स्थलांतर

यामध्ये लोक आपल्या राज्यातच एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करीत असतात. या स्थलांतराला राज्याअंतर्गत स्थलांतर म्हटलं जात. म्हणजे कोल्हापुरातून सोलापूर मध्ये किंवा सोलापुरातून कोल्हापूरमध्ये स्थलांतरित केले जाते ते राज्याअंतर्गत वस्ती आहे.

म्हणजे महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात हे स्थलांतर होतं म्हणून, त्याला आपण राज्याअंतर्गत वस्ती असं म्हणतो. याशिवाय तुम्ही सांगली मधून, कोल्हापुरात किंवा इस्लामपुरातून पुणे, कोल्हापुरातून मुंबई अशी जी स्थलांतर होतात ,त्याला आपण राज्याअंतर्गत वस्ती असं म्हणतो.

२) आंतरराष्ट्रीय स्थलांतर
What Is Migration

एका देशातून दुसऱ्या देशात केलं जाणारा स्थलांतर म्हणजे, देशांतर करणे. आंतरराष्ट्रीय स्थलांतरात व दोन प्रकार पडतात.

अ) देशत्यागी स्थलांतर

ज्यावेळी आपण आपला देश सोडून दुसऱ्या देशात जातो, त्यावेळी त्याला आपण देशांतर करणे असे म्हणतो आणि अशी जी भारतातील स्थलांतर आहेत.

ब) देशानूगामी स्थलांतर

व्यक्ती किंवा व्यक्ती समूह जेव्हा बाहेरच्या दुसऱ्या देशातून आपल्या देशात राहिला येतात, त्यावेळी अशा आंतरराष्ट्रीय स्थलांतरास आपण देशांतर करणे असं म्हणतो.

अमेरिकेतून भारतात किंवा कॅनडा, इंग्लंड यासारख्या देशातून भारतात येतात, राहतात त्यावेळी त्याला देशानूगामी देशांतर करणे असं म्हटलं जातं आणि अशी ही देशत्यागी स्थलांतरापेक्षा खूप कमी प्रमाणात आढळतात.

ग्रामीण व शहरी भागावर आधारित स्थलांतर

ग्रामीण आणि शहरी भागामध्ये राहणीमान, व्यवसाय, वाहतूक, व्यापार, तसेच शिक्षण, आरोग्य, प्रशासन यासारख्या अनेक सुविधांच्या बाबतीत भिन्नता.

त्यानुसार ग्रामीण आणि नागरी भागांमध्ये स्थलांतर होत. अशा प्रकारच्या स्थलांतराचे एकूण चार प्रकार पडतात.

ग्रामीण ते ग्रामीण स्थलांतर

ग्रामीण ते ग्रामीण स्थानांतर म्हणजे एका ग्रामीण भागाकडून किंवा एका खेड्याकडून, दुसऱ्या ग्रामीण भागाकडे, दुसऱ्या खेड्याकडे होणार जे स्थानांतर आहे, ते म्हणजे ग्रामीण व ग्रामीण स्थानांतर होय.

शेती दृष्ट्या कमी विकसित खेड्याकडून, शेती दृष्ट्या जास्त विकसित खेड्याकडे जे ग्रामीण भागात स्थानांतर होतात, त्याला ग्रामीण ते ग्रामीण स्थानांतर असं म्हटलं.

याशिवाय ज्या भागात बागायती शेती असेल किंवा साखर कारखाने, निर्यात खनिजांच्या खाणी आढळून येतात, त्यामुळे रोजगाराच्या संधी निर्माण होत असतील एखाद्या खेड्यामध्ये तर, आजूबाजूच्या ग्रामीण भागातून लोक अशा ठिकाणी वस्ती करतात.

तसेच नैसर्गिक, आर्थिक, सामाजिक, इत्यादी दृष्ट्या प्रतिकूल असणाऱ्या ग्रामीण भागाकडे जवळच्या आजूबाजूच्या खेड्यांकडून लोक स्थानांतर होतात आणि यामुळेच त्याला आपण ग्रामीण ते ग्रामीण स्थानांतर असे म्हणतो.

ग्रामीण ते नागरी स्थलांतर

ग्रामीण ते नागरी स्थानांतर म्हणजे ग्रामीण भागाकडून, खेड्यांकडून शहरांच्याकडे होणार जे स्थानांतर  आहे, ते स्थानांतर म्हणजे ग्रामीण ते नागरी स्थलांतर आणि अशा प्रकारची स्थानांतर ही सगळ्यात जास्त प्रमाणात होत असतं.

आजूबाजूच्या ग्रामीण भागाकडून जवळच्या नागरी भागाकडे लोक अनेक कारणांनी वस्ती करतात. मुळात नागरीकरण आणि औद्योगीकरणांसारख्या गोष्टी घडवून आल्यामुळे, तसेच वाहतूक व दळणवळणाच्या, वैद्यकीय सुविधा अशा अनेक तसेच शहरांमध्ये रोजगाराच्या व व्यापाराच्या संधी निर्माण होतात आणि मानाचा दर्जा वाढतो,

या सगळ्या गोष्टींमुळे ग्रामीण भागातील लोक शहरांच्या कडे आकर्षित होतात आणि साहजिकच त्यामुळे ग्रामीण भागातून शहरी भागाकडे होणारे स्थलांतर मोठ्या प्रमाणात होत असतं. विशेषतः प्रतिकूल परिस्थितीमध्ये जे ग्रामीण भागात लोक राहतात, अशा ग्रामीण भागातून नागरी भागाकडे खूप मोठ्या प्रमाणावर स्थानांतर  होत.

नागरी ते नागरी स्थलांतर

एका नगराकडून किंवा एका शहराकडून दुसऱ्या शहराकडे होणार स्थानांतर म्हणजे नागरी ते नागरी स्थानांतर. छोट्या शहरांच्या पेक्षा मोठ्या शहरांच्या मध्ये रोजगाराच्या उत्तम संधी अधिकच्या असतात.

आर्थिक प्राप्तीच्या अपेक्षा आणि या सगळ्या गोष्टींच्यामुळे, छोट्या शहरातून लोक मोठ्या शहराकडे स्थलांतरित होतात, याला नागरी ते नागरी स्थानांतर असं म्हटलं गेलं.

नागरी ते ग्रामीण स्थलांतर

शहरांच्या कडून ग्रामीण भागाकडे खेड्यांकडे होणारी स्थानांतर साहजिकच अतिशय कमी प्रमाणात होतात. नागरी भागामध्ये जी वाढती लोकसंख्या, प्रदूषणाच्या समस्या आहेत, राहत्या जागेचे प्रश्न आहेत, वाहतुकीची कोंडीची समस्या आहे, असुरक्षितता निर्माण होते.

शहरी भागातील अशा स्थानांतरांना आपण नागरी ते ग्रामीण स्थानांतर असे म्हणतो. याशिवाय ग्रामीण भागात अनेक उद्योगधंदे जसे साखर कारखाने, कागद निर्मितीचे कारखाने, दूध प्रकल्प होतात. यासारख्या उद्योगधंद्यांच्यामुळे रोजगाराच्या संधी निर्माण होतात.

स्थलांतराच्या प्रवृत्तीवर आधारित स्थलांतराचे प्रकार

स्थानांतराच्या प्रवृत्तीवर आधारित स्थलांतराचे प्रकार यामध्ये दोन प्रकार पडतात.

१) स्वेच्छा स्थलांतर

म्हणजे लोक ज्यावेळी स्वतःच्या इच्छेने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थानांतर करतात, त्यावेळी त्याला आपण स्वेच्छा, वॉलेटरी मायग्रेशन असं म्हणतो.

प्रामुख्याने सगळी आर्थिक स्थानांतर म्हणजे आर्थिक प्राप्तीच्या उद्देशाने केली जाणारी जी आर्थिक स्थानांतर आहेत, ही सगळी स्वेच्छा स्थलांतर असतात. प्राचीनकाळी युरोपियन लोकांनी सोन्याच्या शोधासाठी उत्तरा अमेरिका आफ्रिका व ऑस्ट्रेलिया खंडात केलेली स्थानांतर ही देखील स्वेच्छा स्थानांतर आहेत.

आज देखील नोकरीच्या निमित्ताने, व्यापाराच्या निमित्ताने, उद्योगाच्या निमित्ताने, स्थानांतर होतात ती सगळी स्वेच्छा स्थानांतर आहे.

२) सक्तीचे स्थलांतर

ज्यावेळी लोकांना स्वतःच्या इच्छेविरुद्ध, शक्तीने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थानांतर करावं लागतं, अशाना आपण सक्तीचे स्थानांतर असे म्हणतो.

आणि अशा स्थानांतरामागे राजकीय धार्मिक किंवा वार्षिक मतभेद असू शकतात तर गोवा मुक्ती संग्रामाच्या पोर्तुगीजांच्या अत्याचारामुळे दमन मधील कोळी समाजाला डहाणूला स्थानांतर करावे लागले होते.

तसेच १९७० मध्ये लोकांना तेथील राजकीय अत्याचारामुळे, स्थानांतर करावे लागले. अशी ज्यावेळी इच्छेच्या विरुद्धची स्थानांतर होतात, त्याला आपण सक्तीचे स्थलांतर म्हणतो.

स्थलांतराची कारणे

 Migration

एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात माणूस स्थानांतर करताना, त्यामध्ये वेगवेगळी कारणे असतात. त्यात काही आर्थिक तर काही सामाजिक कारणे असू शकतात. ती खालील प्रमाणे ;

प्राकृतिक

नैसर्गिक आपत्ती जसे की, पूर, दुष्काळ, भूकंप, ज्वालामुखी, उद्रेक, वादळे, यामुळे देखील मनुष्य स्थानांतर करतात.

आर्थिक

रोजगाराच्या शोधात, राहणीमान उंचावण्यासाठी, व्यवसायासाठी, लोक वस्ती करतात.

सामाजिक

बऱ्याच वेळा लोकांना सक्तीने स्थानांतर करावे लागते. सामाजिक समस्यांना तोंड देण्यापेक्षा, ती जागा सोडून जाण्याचा निर्णय लोक घेतात.

एखाद्या विशिष्ट गटाच्या लोकांना स्थानांतर करायला भाग पाडले जाऊ शकते. भेदभाव, शिक्षण, आरोग्य, वैद्यकीय सुविधा, विवाह, या कारणासाठी देखील स्थानांतर होऊ शकते.

राजकीय

कधी कधी एखाद्या देशात युद्ध किंवा राजकीयदृष्ट्या समस्या उद्भवू शकतात. अशा परिस्थितीत त्या देशातील लोक तो देश सोडून, दुसऱ्या देशात आश्रय घेतात.

जोपर्यंत एखाद्या ठिकाणी मानवाच्या सर्वसामान्य आर्थिक, शारीरिक, मानसिक, गरजा भागतात. तोपर्यंत तो तेथेच राहतो. परंतु जेव्हा त्याला तेथील वास्तव्य अशक्य होते, अशा वेळेस तो त्या ठिकाणापासून दूर जातो.

मानवाला मूळ वास्तव्यापासून दूर जाण्यास प्रवृत्त करणाऱ्या घटकांना अपकर्षण म्हणतात. उदाहरणार्थ. रोजगाराच्या संधी कमी होणे, युद्ध, दुष्काळ, प्रदूषित पाणी किंवा हवा, इत्यादी अपकर्षण घटक आहेत.

या उलट जेव्हा काही कारणांमुळे, एखाद्या क्षेत्राकडे व्यक्ती आकर्षित होतात, अशा कारणांना आकर्षक घटक म्हणतात. उदाहरणार्थ. शिक्षण, रोजगाराच्या संधी उपलब्ध होणे, इत्यादी.

स्थलांतराचे परिणाम

लोकसंख्येमध्ये बदल

लोकसंख्येमध्ये बदल होतो. ज्या ठिकाणाहून लोकसंख्या स्थानांतर होते, त्या ठिकाणाला निर्गमन प्रदेश असं म्हटलं जातं.

तर ज्या ठिकाणी लोकसंख्या स्थानांतर होऊन येते, त्या ठिकाणाला आगमन प्रदेश असं म्हणतात.

लोकसंख्येच्या स्थानांतरामुळे आगमन प्रदेशात लोकसंख्या वाढते, तर निर्गमन प्रदेशातील लोकसंख्या कमी होते आणि याच अनुषंगाने लोकसंख्येमध्ये बदल होतात.

लोकसंख्येच्या लिंग रचनेत बदल

लोकसंख्येच्या लिंग रचनेत बदल होतो. लोकसंख्येचे जे स्थानांतर आहे, त्या स्थानांतरामध्ये प्रामुख्याने पुरुष लोकसंख्येचे स्थानांतर खूप मोठ्या प्रमाणात होत असते.

बरीचशी स्थानांतर ही आर्थिक स्थानांतर असतात. त्यामुळे पुरुष लोकसंख्या याच्या बाबतीत आघाडीवर असते आणि त्यामुळेच पुरुष लोकसंख्येचे स्थानांतर जास्त असल्यामुळे, लिंग रचनेत आपोआप बदल होतो.

आगमन प्रदेशात पुरुषांची संख्या वाढते तर, निर्गमन प्रदेशात स्त्रियांची संख्या वाढते आणि साहजिकच यामुळे त्या त्या प्रदेशातील लिंग रचनेत बदल होत जातो.

लोकसंख्येच्या वय रचनेत बदल

लोकसंख्येच्या वय रचनेत देखील बदल होतो.याचे प्रमाण हे तरुण लोकसंख्येत जास्त असते आणि त्यामुळेच ज्या ठिकाणी लोक स्थानांतरित होऊन येतात.

म्हणजे आगमन प्रदेशात तरुण लोकसंख्येचे प्रमाण वाढतं तर, निर्गमन प्रदेशातील वृद्ध व लहान मुलांचे प्रमाण जास्त होतं. परिणामी लोकसंख्येच्या वय रचने देखील बदल होत असतो.

जन्म व मृत्यू दरात बदल

जन्म व मृत्यू दरात बदल होतो. लोकसंख्येच्या लिंगरचनेत तसेच वयोरचनेत बदल होतोच, त्याबरोबर देखील जन्म व मृत्यू दरात देखील बदल होतो.

आगमन प्रदेशात जी लोकसंख्या स्थानांतरित होते, त्याच्यामध्ये आपण आत्ताच म्हटल्याप्रमाणे तरुण लोकसंख्येचे प्रमाण जास्त असते आणि तरुण लोकसंख्या म्हणजेच जी लोकसंख्या प्रजननक्षम आहे अशी लोकसंख्या आणि त्यामुळे आगमन प्रदेशात अशा प्रजननक्षम लोकसंख्येत वाढ होते आणि परिणामी अशा ठिकाणी जन्मदर जास्त आढळतो.

या उलट निर्गमन प्रदेशात जिथून तरुण लोकसंख्या बाहेर पडते, त्या ठिकाणी मात्र वृद्धांचे प्रमाण जास्त वाढतात आणि वृद्धांचे प्रमाण जास्त असल्यामुळे, सहाजिकच मृत्यू दरात देखील वाढ होते.

लोकसंख्या व साधन संपत्ती यांच्या गुणोत्तरात बदल

लोकसंख्या व साधन संपत्ती यांच्या गुणोत्तरात देखील बदल होतो. स्थानांतरामुळे लोकसंख्येत एकतर वाढ होते किंवा घट होते. परिणामी लोकसंख्या व साधन संपत्ती यांच्या गुणोत्तरात बदल होत असतो.

आगमन प्रदेशात ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकसंख्येचे स्थानांतर होत, त्या ठिकाणी उपलब्ध असलेल्या साधनसंपत्ती वर अतिरिक्तता निर्माण होतो आणि मग परिणामी अनेक समस्या निर्माण होतात.

मजूर पुरवठा व मजुरांचे वेतन

स्थानांतरामुळे मजुरांच्या पुरवठ्यात देखील बदल होतो. आगमन प्रदेशात स्थानांतरित होऊन आलेल्या मजुरांच्यामुळे त्या ठिकाणी मजुरांचा पुरवठा वाढतो आणि मजुरांचा पुरवठा वाढल्यामुळे साहजिकच मजुरांच्या वेतनात घट होते. मजुरांची मागणी आणि पुरवठा हे संतुलन बिघडतं.

मागणी जितकी असते, त्याच्यापेक्षा जास्त मजुरांची उपलब्ध असल्यामुळे, साहजिकच त्यामुळे मजुरांचे वेतन कमी होतं. स्थानिक मजुरांना स्थानांतरित मजुरांशी स्पर्धा करावी लागते.

या उलट निर्गमन प्रदेशात मात्र मजुरांची संख्या घटते, त्या ठिकाणी मजूर लोकसंख्या मिळत नाही. त्यामुळे साहजिकच मागणी असून देखील मजुरांचा पुरवठा कमी असल्यामुळे, मजुरांच्या वेतनात निर्गमन प्रदेशात वाढ झालेली दिसते.

सामाजिक संघर्ष

सामाजिक परिस्थितीशी आगमन प्रदेशात स्थानांतरितांचा एक गट तेथील सामाजिक परिस्थितीशी जुळवून घेऊ शकत नाही.

आणि स्थानिक परिस्थितीशी समायोजन न झाल्यामुळे, अशा ठिकाणी अनेक समस्या निर्माण होतात आणि बऱ्याचदा अशा स्थानांतरित घटकांचे स्थानिक लोकसंख्येची सामाजिक संघर्ष निर्माण होतात.

धार्मिक वाद

त्याचबरोबर काही वेळा धार्मिक वाद देखील निर्माण होतात. स्थानांतरित लोकसंख्येचे स्थानिक लोकसंख्येबरोबर जसं सामाजिक संघर्षात वाढ होऊ लागते.

तर तसं धार्मिक वाद हे उग्ररूप धारण करतात आणि यातून काही वेळा धार्मिक दंगली सुद्धा घडवून येऊ शकतात.

स्थलांतराचे लोकसंख्येवर होणारे परिणाम

लोकसंख्या अभ्यासात आपण अनेक घटकांचा विचार केला आहे. लोकसंख्येचे वितरण व घनता या दोन घटकांवर स्थानांतराचा परिणाम होतो. लोकसंख्येचे स्थलांतर, हे दोन प्रदेशांत दरम्यान होत असते. त्यातील एक प्रदेश “देणारा” तर, दुसरा प्रदेश “घेणारा” असतो.

प्रदेशातील लोकसंख्येला स्थायिक होण्यासाठी निवास, पाणीपुरवठा, वाहतूक, आरोग्य, शिक्षण, मनोरंजन, अशा विविध सोयी सुविधा आवश्यक असतात. स्थलांतरामुळे “देणाऱ्या” प्रदेशातील अशा सोयीसुविधा वापराविना किंवा कमी वापरल्या जातात व त्यावर झालेला खर्च अनावश्यक होतो. कारण तेथील लोकसंख्या कमी झालेली असते.

अशा प्रदेशात लिंग गुणोत्तर तसेच वयोरचनेतही मोठे प्रमाणात बदल घडतात. उदाहरणार्थ. केरळ राज्यातील कार्यकारी वयोगटातील बहुसंख्या पुरुष रोजगार निमित्त परगावी प्रदेशात जातात, या राज्यात त्यामुळे पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण जास्त आहे.

(१०८४ जनगणना २०११) येथील लोकसंख्येच्या वयो रचनेचा विचार करता, बालक व वृद्ध वयोगटातही लोकसंख्या जास्त आढळते.

याउलट “घेणाऱ्या” प्रदेशात उपरोक्त सोयी सुविधांवर मोठ्या प्रमाणात ताण निर्माण होतो. लोकसंख्येच्या तुलनेत निवास, पाणीपुरवठा, वाहतुकीय, सर्व सोयी अपुऱ्या पडतात. याचा सर्वात मोठा फटका सदर प्रदेशातील व सीमावरती भागातील शेतीवर होतो. निवासाच्या सोयीसाठी मोठ्या प्रमाणावर शेती, योग्य जमीन, बिगर शेतीसाठी वापरली जाते.

घराच्या किमती प्रचंड वाढ होते. निवासांच्या कमतरतेमुळे, झोपडपट्ट्यांची वाढ होते. सार्वजनिक सुविधांवर प्रचंड ताण येतो. अशा शहरात आर्थिक विषमताही मोठ्या प्रमाणावर वाढीस लागते, गुन्हेगारीचे हे प्रमाण वाढते.

“घेणाऱ्या” प्रदेशात पुरुषांचे प्रमाण स्त्रियांपेक्षा जास्त असते. उदाहरणार्थ. मुंबई, पुणे लोकसंख्येचे प्रमाण इतर गटांच्या तुलनेत जास्त असते. नवनवीन कल्पना, विचारांची अशा प्रदेशात मोठ्या प्रमाणात देवाण-घेवाण होते.

त्यामुळे सर्जनशीलता, नवनवीन शोध, हे या प्रदेशाचे आणखीन एक वैशिष्ट्य असते. नवीन तंत्रांचा उदय आणि वापर अशा प्रदेशात होताना दिसतो. सर्वप्रथम प्रदेशात विकासही मोठ्या प्रमाणावर होत असतो. विशेषतः आर्थिक विकास.

स्थलांतराचा लोकसंख्येवर होणारा सकारात्मक व नकारात्मक परिणाम

सकारात्मक परिणामनकारात्मक परिणाम
आंतरराष्ट्रीय स्थानांतर स्थानांतरित लोकांना रोजगार उपलब्ध होतो. त्यांचा आर्थिक दर्जा सुधारतो.साधनसंपत्तीवर ताण येतो. कधी कधी त्यांना मायदेशी परत पाठवले जाऊ शकते.
देशांतर्गत स्थानांतर विविध संस्कृती व प्रथा यांची ओळख होते. विचार व कल्पना यांचा विस्तार होतो.स्थानिक व स्थलांतरित यांच्यात, वार्षिक, धार्मिक, जातीय, भाषिक, तेढ निर्माण होऊन संघर्ष निर्माण होतो.
ग्रामीण ते नागरी स्थलांतरराहणीमानाचा दर्जा उंचावतो. रोजगार संधी उपलब्ध होतात. देणाऱ्या प्रदेशातील पर्यावरण सुरक्षित राहते. कार्यशील लोकसंख्येत वाढ होते.स्थानांतरित लोकसंख्येला देण्यासाठी पायाभूत सुविधा देणे कठीण होते. निधी नसतो. झोपडपट्टी निर्माण होतात.
नागरी ते ग्रामीण स्थानांतर नागरिकरणाच्या समस्येपासून मुक्तता होते. उदाहरणार्थ. लोक प्रदूषण व गर्दीरहित प्रदेश, आर्थिक बचत होते.ग्रामीण भागातील सुविधांवर ताण येतो. लोकसंख्येत वाढ होते. साधनसंपत्तीवर ताण येतो.
ग्रामीण ते ग्रामीण स्थानांतर दुष्काळाच्या संकटातून सुटका होते. इतरांच्या स्थानांतरामुळे लोकांना रोजगार उपलब्ध होतो.स्थानांतरित लोकांची संख्या वाढल्याने, कमी वेतनावर कामगार नेमले जातात.
नागरी ते नागरी स्थानांतर विविध सांस्कृतिक मुल्ये जोपासली जातात. परिपक्व समाजाची निर्मिती होते. नवीन वर्षाची निर्मिती होते.शहरांची अनिर्बंध वाढ होते. नगराचे रूपांतर महानगरात होते. नैसर्गिक साधन संपत्तीचा अयोग्य वापर होतो. विविध प्रकारचे प्रदूषण निर्माण होते.
हंगामी अस्थायी स्थानांतर वर्षभर रोजगार मिळतो. उदरनिर्वाह भागवला जातो. आर्थिक विकास साधला जातो.जीवनात स्थिरता प्राप्त होत नाही. अपूर्ण सोयी व अस्वच्छ जीवन जगावे लागते. शिक्षणापासून मुले वंचित होतात. रोजगाराला प्राधान्य दिले जाते.

FAQ

१. स्थलांतर थोडक्यात माहिती काय आहे?

ही मानवाची एक प्रवृत्ती आहे. मानव नेहमीच बऱ्याचशा गोष्टींसाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करीत असतो. मानवाच्या या हालचालीलाच आपण “स्थलांतर” असे म्हणतो.

२. स्थलांतराचा ग्रामीण ते नागरी स्थलांतरावर कोणते सकारात्मक परिणाम होतो ?

राहणीमानाचा दर्जा उंचावतो. रोजगार संधी उपलब्ध होतात. देणाऱ्या प्रदेशातील पर्यावरण सुरक्षित राहते. कार्यशील लोकसंख्येत वाढ होते.

लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी का स्थलांतर करतात?

व्यक्ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी काही काळासाठी किंवा कायमस्वरूपासाठी स्थानांतरीत होतात, त्याच्या मागे आर्थिक, सामाजिक, राजकीय किंवा धार्मिक यासारखी कारणे असतात.

स्थलांतराची कारणे आणि परिणाम काय आहेत?

लोक आर्थिक, सामाजिक, राजकीय किंवा धार्मिक यासारख्या कारणामुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात. त्यांच्या या स्थानांतरामुळे त्यांनी मागे सोडलेली जागा आणि त्यांचे नवीन राहण्याचे ठिकाण या दोन्हींवर परिणाम होऊ शकतात. हे परिणाम आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि लोकसंख्याशास्त्रीय असू शकतात.

निष्कर्ष

मित्रहो, आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास स्थलांतर म्हणजे काय ? या बद्दल माहिती दिली आहे. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. लेख आवडल्यास तुमच्या इतर मित्र परीवारां सोबत नक्की शेयर करा. धन्यवाद.

1 thought on “स्थलांतर म्हणजे काय What Is Migration”

Leave a comment