विनायक मेटे यांची माहिती | Vinayak Mete Information In Marathi

विनायक मेटे हे भारतीय राजकारण क्षेत्रामधील शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख नेते होते. तसेच ते शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष व माजी आमदार सुद्धा होते. स्वर्गीय विनायकरावजी मेटे साहेबांनी मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्र पिंजून काढला, रस्त्यावरील लढाई असो की न्यायालयीन लढाई मेटे साहेबांनी निकराने लढली आणि आरक्षणाच्या लढ्याची ज्योत कायम शेवटच्या श्वासापर्यंत तेवत ठेवली. सोबतच विधिमंडळातील प्रत्येक अधिवेशनात मराठा आरक्षणासाठी अभ्यासपूर्ण मांडणी करून समाजाची विदारक परिस्थीती सरकार समोर मांडली. दुर्दैवाने नियतीने घात केला आणि समाजासाठी लढणारा लढवय्या धारातीर्थी पडला.

महाराष्ट्रातील मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर झालेल्या कार अपघातामध्ये विनायक मेटे यांचे आकस्मित रित्या निधन झाले. मुंबईपासून साधारणतः ७० किलोमीटर अंतरावरील खापोली शहराजवळ मुंबई पुणे एक्सप्रेसवर मेटेंचा अपघात झाला.

आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास राजकारणी व शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांच्या बद्दल माहिती दिलेली आहे. ही माहिती व हा लेख जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत नक्की वाचा.

Table of Contents

विनायक मेटे यांची माहिती : Vinayak Mete Information In Marathi

बीडच्या मातीतच राजकारणाची मुळं आहेत. त्यातून विनायक मेटे नावाचा नेता तयार झाला होता. मराठा समाजाच्या प्रश्नावर पोटतिडकीने बोलणारा, आरक्षणासाठी आंदोलनं उभारणारा, अनेक वर्षे समाजाचे प्रश्न लावून धरणारा एखादाच असा नेता होत असतो. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून विनायक मेटेंनी स्वतःचं अस्तित्व सिद्ध करून दाखवलं. एक सर्वसामान्य घरातून आलेला पोरगा ५ वेळा परिषदेवर आमदार होतो ही साधी गोष्ट नाही.

नाव विनायक मेटे
जन्म तारीख ३० जून १९७०
जन्म स्थळ बीड महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
धर्म हिंदु
व्यवसाय राजकीय नेता
पक्ष शिवसंग्राम पक्ष
ओळख शिवसंग्राम पक्ष नेता
मृत्यू १४ ऑगस्ट २०२२
मृत्यू ठिकाण नवी मुंबई , महाराष्ट्र
मृत्युचे कारण रस्ता अपघात
VINAYAK METE INFORMATION INMARATHI
VINAYAK METE

कोण आहेत विनायक मेटे ?

विनायक मेटे हे प्रमुख राजकारणी होते. तसेच महाराष्ट्रामधील एक प्रमुख मराठा नेते म्हणून, विनायक मेटे यांच्याकडे पाहिले जायचे. विनायक मेटे यांनी सलग पाच वेळा विधान परिषदेचे सदस्यत्व भूषविले, तसेच मुंबई मधील समुद्रामध्ये बांधल्या जाणाऱ्या शिवस्मारक समितीचे ते प्रमुख अध्यक्ष होते. तसेच शिवसंग्राम पक्षाचे नेते म्हणून विनायक मेटे यांची ओळख होती. दि.०३ जून २०१६ मध्ये महाराष्ट्र विधान परिषदेवर बिनविरोधी निवड झाल्या कारणाने विनायक मेटे यांना अधिक प्रसिद्धी प्राप्त झाली.

विनायक मेटे यांचा अल्पपरिचय

  • विनायक मेटे यांचा जन्म ३० जून १९७० रोजी झाला.
  • बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील राजेगाव ते रहिवासी.
  • शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनातील प्रमुख नेते.
  • शिवस्मारक समितीचे अध्यक्ष होते.
  • सलग पाच टर्म विधान परिषद सदस्य

विनायक मेटे यांचा जन्म व सुरुवातीचे जीवन

विनायक तुकाराम मेटे यांचा जन्म दिनांक ३० जून १९७० मध्ये बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील राजेगाव या गावामध्ये झाला. व्यवसायकारणाने विनायक मेटे यांनी मुंबई गाठली. यावेळी त्यांचा मराठा महासंघाशी चांगला संबंध आला, यातूनच त्यांनी सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य करण्यास सुरुवात केली.

१९९५ मध्ये पहिल्या युती सरकारच्या काळामध्ये नेते विधान परिषदेवर पहिल्यांदा संधी त्यांना प्राप्त झाली. त्या काळातच मेटे यांनी महाराष्ट्र लोकविकास पार्टी या पक्षाची स्थापना केली. ते एक राजकारणी असून शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख नेते होते.

२०१६ मध्ये बिनविरोधी उमेदवार म्हणून, त्यांची महाराष्ट्र विधान परिषदेवर नियुक्ती करण्यात आली. ते सर्वप्रथम शिवसेना – भाजप युती सरकारच्या काळामध्ये आमदार झाले. त्यानंतर सलग पाच वेळा ते विधान परिषद मध्ये, सदस्यत्व स्थान भूषवत होते. यानंतर २०१४ पर्यंत विनायक मेटे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य होते.

विनायक मेटे यांची कौटुंबिक माहिती

वडिलांचे नाव तुकाराम मेटे
वैवाहिक स्थिती विवाहित
पत्नीचे नाव ज्योती मेटे
पत्य मुलगा आशुतोष व मुलगी आकांक्षा

विनायक मेटे याने पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यांनी बी.ए मध्ये पदवी प्राप्त केली होती. त्यांच्या पत्नीचे नाव डॉक्टर ज्योती आनंदराव लाटकर (ज्योती विनायक मेटे), असे आहे. त्या नाशिक या ठिकाणी धर्मादाय कार्यालयामध्ये सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत आहेत.

विनायक मेटे यांना दोन भाऊ आहेत. ज्यांचे नाव त्र्यंबक तुकाराम मेटे व राम हरी तुकाराम मेटे असे आहे. राम हरी तुकाराम मेटे हे बीड जिल्ह्यातील राजेगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच होते. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे केजचे तालुकाध्यक्ष म्हणून काम सुद्धा त्यांनी पाहिले. यानंतर शिवसंग्राम युवक आघाडीचे ते जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. विनायक मेटे यांच्या बहिणी वैशाली रामहरी मेटे यांनी केज पंचायत समितीच्या सभापती म्हणून सुद्धा कार्य पाहिले आहे.

विनायक मेटे यांची माहिती

विनायक मेटे यांचे वैयक्तिक जीवन

विनायक मेटे यांच्या पत्नीचे नाव ज्योती मेटे आहे. त्या व्यवसायाने डॉक्टर आहेत. विनायक मेटे व ज्योती मेटे यांना आशुतोष व आकांक्षा ही अपत्ये आहेत.

विनायक मेटे यांचे वर्णन

वजन०५ फूट १० इंच
उंची७१ किलो
केसांचा रंगकाळा
डोळ्यांचा रंगकाळा

विनायक मेटे यांचा राजकीय प्रवास

  • १९८६ मध्ये विनायक मेटे हे अखिल भारतीय मराठा महासंघाचा कार्यकर्ता म्हणून काम पाहत होते. यानंतर १९८७ दरम्याने पिंपरी चिंचवड या ठिकाणी झालेल्या अखिल भारतीय मराठा महासंघाच्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये मेटे यांनी महाराष्ट्राचे जनसंपर्क प्रमुख म्हणून कार्य पाहिले.
  • १९९४ मध्ये परभणी येथे झालेल्या अखिल भारतीय मराठा महासंघाच्या राज्यकार्य बैठकीमध्ये मेटे यांची अखिल भारतीय मराठा महासंघाच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली होती.
  • १९९५ मध्ये विनायक मेटे यांनी मराठा लोकविकास मंचची स्थापना केली. त्यानंतर त्यांनी नवमहाराष्ट्र विकास पार्टीची स्थापना १९९८ मध्ये केली.
  • राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा विनायक मेटे यांनी चांगले कार्य केले. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून १९९९ मध्ये विनायक मेटे यांची नियुक्ती करण्यात आली.
  • २००२ मध्ये विनायक मेटे यांनी त्यांचा स्वतंत्र पक्ष शिवसंग्रामची स्थापना केली.

पाच वेळा विधान परिषद सदसत्व

  • विनायक राव मेटे हे शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख नेते होते. यांचा जन्म ३० जून १९७० मध्ये एका सामान्य कुटुंबात बीड जिल्ह्यात झाला. विनायक राव मेटे यांना राजकारणामध्ये प्रचंड आवड असल्याकारणाने, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यांची मोठ्या प्रमाणात वाढ झाली. शिवसंग्राम पक्षाचे नेते म्हणून विनायक मेटे यांची ओळख प्रसिद्ध झाली.
  • मेटे यांनी पाच वेळा विधानपरिषद सदस्यत्व पटकावण्याचा अविश्वासनीय रेकॉर्ड मोडला. स्वातंत्र्यलढा व संयुक्त महाराष्ट्र चळवळ यांचा विनायक मेटे यांच्या विचारांवर सखोलरीत्या परिणाम झाला होता.
  • २०१६ मध्ये विनायक मेटे भाजपाच्या कोट्यातून बिनविरोधी आमदार म्हणून जिंकून आले होते.

महाराष्ट्र लोकविकास पक्षाची स्थापना

  • बीड जिल्ह्यामधील केज तालुक्यातील राजेगाव या ठिकाणचे विनायक मेटे हे मूळचे रहिवाशी. त्यांनी त्यांच्या करिअरसाठी मुंबई गाठली. याचवेळी त्यांचा मराठा महासंघाशी चांगला संबंध आला व यातूनच त्यांना समाजाची सेवा करण्याची प्रेरणा प्राप्त झाली.
  • पहिल्या युती सरकारच्या काळामध्ये, १९९५ मध्ये विधान परिषदेवर विनायक मेटे यांना मोठी संधी चालून आली होती. याच दरम्यान विनायक मेटे यांनी महाराष्ट्र लोकविकास पार्टी या पक्षाची स्थापना करून, त्या पक्षाचे ते प्रमुख बनले.
VINAYAK METE WITH ANNA HAJARE

विधान परिषदेची तिसरी टर्मही पूर्ण

  • विनायक मेटे हे प्रसिद्धीस आल्यावर, काही काळातच राष्ट्रवादीचे प्रमुख अध्यक्ष व नेते शरद पवार यांच्यासोबत त्यांचे चांगले संबंध बनले. शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यानंतर, विनायक मेटे यांनी आपला पक्ष राष्ट्रवादीमध्ये विलीन करून, राष्ट्रवादीसोबत युती केली.
  • यानंतर विनायक मेटे यांना राष्ट्रवादी पक्षाचे उपाध्यक्ष म्हणून, नियुक्त करण्यात आले. उपाध्यक्ष पदासोबतच विनायक मेटे यांना दोन वेळा विधान परिषदेवर संधी चालून आली, परंतु मागच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी विनायक मेटे यांनी भाजपसोबत आघाडी केली, म्हणून पक्षांतरामुळे विनायक मेटे यांचे विधान परिषद सदस्यत्व रद्द करण्यात आले.
  • त्यानंतर भाजपने त्यांना पुन्हा विधान परिषदेवर संधी दिली. यानंतर त्यांनी विधान परिषदेची तिसरी टर्म सुद्धा अगदी यशस्वीरित्या पूर्ण केली. त्यानंतर ते चौथ्या वेळेस विधान परिषदेचे सदस्य म्हणून काम पाहू लागले.

बीड जिल्ह्यात मोठा जनसंपर्क उभा केला

  • विनायक मेटे यांनी ज्यावेळी शिवसंग्राम पक्षाची स्थापना केली, या पक्षाच्या स्थापनेनंतर मेटे यांनी महाराष्ट्र राज्यासोबत बीड जिल्ह्यातील सर्वात मोठा जनसंपर्क उभा केला. मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये, कोणतीही घटना ही असल्यास, तिचा थेट संपर्क हा विनायक मेटे यांच्याशी जोडला जायचा.
  • मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनामधील विनायक मेटे हे महाराष्ट्रामधील प्रमुख नेत्यांपैकी एक होते. अरबी समुद्रामधील शिवस्मारक समितीचे अध्यक्ष स्थान विनायक मेटे यांनी भूषवले. पहिल्यांदा शिवसेना – भाजप युती सरकारच्या काळात, आमदारपद पटकावल्यानंतर विनायक मेटे यांनी सलग पाच वेळा विधानपरिषद सदस्य स्थान भूषवले.
  • मराठा आरक्षणासाठी झालेल्या आंदोलनात जीव गमवावा लागलेल्या तरुणांच्या कुटूंबियांना शासकीय नोकरी मिळावी, त्यांचं योग्य पुनर्वसन व्हावं तसेच आंदोलन करताना दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावे यासाठी त्यांनी प्रयत्न केले. शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, कामगार, गरीब लोकांना त्यांचे हक्क आणि न्याय मिळवून देण्यासाठी ते कायम लढत राहिले.
  • राजकीयदृष्ट्या सक्रीय असल्यामुळे मराठा समाज सधन आहे, असा समज सामान्य माणसामध्ये रूजला होता. अशावेळी ज्यांनी मराठा समाजातील वास्तव समोर आणलं, त्या समाजातील सामान्य माणसाला न्याय मिळवून दिला, त्याच्या विकासासाठी लढा दिला ते नेते म्हणजे विनायक मेटे. मराठा समाजाचं आंदोलन यशस्वीपणे उभं करण्याचं श्रेय मेटेंना जातं.

अनेक मोठ्या निर्णयांचे साक्षीदार

  • विनायक मेटे हे विविध मोठ्या निर्णयांचे साक्षीदार होते. महाराष्ट्र राज्यामधील मुस्लिम आरक्षण, मराठा आरक्षण, स्पर्धा परीक्षेसाठी उमेदवारांचे वय वाढविणे अशा अनेक सामाजिक विषयांसाठी मेटे यांनी अतिशय जबाबदारीने पुढाकार घेऊन ह्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केला.
  • त्यांच्या मराठवाडा लोकविकास मंचतर्फे, राज्यात मोठं काम करणाऱ्या मराठवाड्यातील नामांकित व्यक्तींना मराठवाडा भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराचे मानकरी दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख, दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे, दिवंगत गोपीभाई श्रॉफ, इत्यादींचा सन्मान करण्यात आला होता.
 आमदार विनायक मेटे

विनायक मेटे यांचा अपघात

माजी आमदार विनायक मेटे (५९) हे मराठा समाजाच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी बीडहून मुंबईला जात असताना रविवारी सकाळी १४ ऑगस्ट २०२२ रोजी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर झालेल्या अपघातात मृत्यू झाला.

खालापूर टोल प्लाझाजवळील माडप बोगद्याजवळ पहाटे पाचच्या सुमारास हा अपघात झाला. अपघाताच्या वेळी मेटे यांची एसयूव्ही सहा लेन एक्स्प्रेस वेच्या दुसऱ्या क्रमांकावर होती. मेटे यांच्यासोबत असलेले एकनाथ कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रकने लेन बदलल्याने चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले.

कारची डाव्या बाजूने ट्रकला धडक बसली. ही धडक एवढी होती की वाहनाच्या डाव्या बाजूचे संपूर्ण नुकसान झाले. या घटनेत कदम यांना किरकोळ दुखापत झाली, तर मेटे यांचा पोलीस अंगरक्षक गंभीर जखमी झाला.

पनवेलजवळील एमजीएम रुग्णालयात मेटे यांची तपासणी करणाऱ्या डॉक्टरांनी मीडियाला सांगितले की, मेटे यांना रुग्णालयात आणण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी सांगितले की मेटे यांना सकाळी 6.20 वाजता आणण्यात आले होते.

विनायक मेटे हे गोपीनाथ मुंडे यांचे अतिशय जवळचे मित्र होते. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये विनायक मेटे यांनी भाजपशी युती केली. यापूर्वी ते राष्ट्रवादीचे प्रमुख समर्थक म्हणून कार्य पाहत होते, विनायक मेटे हे मराठा समाजासाठी काम करणारे प्रसिद्ध व प्रमुख नेते म्हणून ओळखले जात होते. विनायक मेटे यांच्या आकस्मिक निधनामुळे मराठा समाजाला मोठ्या प्रमाणात धक्का बसला.

विनायक मेटे यांचा मृत्यू

विनायक मेटे हे बीडवरून मुंबईला एका मीटिंग निमित्त कारने प्रवास करत असताना, एका दुसऱ्या कारने त्यांच्या कारला धडक दिली. या अपघातात विनायक मेटे प्रचंड जखमी झाले होते. नवी मुंबईतील एका खाजगी रुग्णालयामध्ये त्यांना उपचारासाठी नेण्यात आले. त्यावेळी विनायक मेटे यांना मृत घोषित करण्यात आले. पनवेलच्या एमजीएम रुग्णालयामधील, डॉक्टरांनी असे वक्तव्य केले की विनायक मेटे सकाळी अत्यंत गंभीर अवस्थेमध्ये रुग्णालयामध्ये आले होते व त्यांची नाडी काम करत नव्हती.

विनायक मेटे यांच्या सोशल मीडिया खात्यांची यादी

इंस्टाग्राम खातेvinayakmeteofficial
ट्विटर हँडल@vinayakmete1
ई – मेल metevinayak@gmail.com
फेसबुक पेजVinayakMeteOfficial

FAQ

१. विनायक मेटे यांचा जन्म कधी झाला ?

विनायक तुकाराम मेटे यांचा जन्म दिनांक ३० जून १९७० मध्ये बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील राजेगाव या गावामध्ये झाला.

२. विनायक मेटेंच्या पक्षांचे नाव काय होते ?

२००२ मध्ये विनायक मेटे यांनी त्यांचा स्वतंत्र पक्ष शिवसंग्राम पक्षाची स्थापना केली.

३. कोण होते विनायक मेटे ?

विनायक मेटे हे प्रमुख राजकारणी होते. तसेच महाराष्ट्रामधील एक प्रमुख मराठा नेते म्हणून विनायक मेटे यांच्याकडे पाहिले जायचे. विनायक मेटे यांनी सलग पाच वेळा विधान परिषदेचे सदस्यत्व भूषविले, तसेच मुंबई मधील समुद्रामध्ये बांधल्या जाणाऱ्या शिवस्मारक समितीचे ते प्रमुख अध्यक्ष होते. तसेच शिवसंग्राम पक्षाचे नेते म्हणून विनायक मेटे यांची ओळख होती. दि.०३ जून २०१६ मध्ये महाराष्ट्र विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाल्या कारणाने, विनायक मेटे यांना अधिक प्रसिद्धी प्राप्त झाली.

४. विनायक मेटे यांच्या पत्नीचे नाव काय ?

विनायक मेटे यांच्या पत्नीचे नाव डॉक्टर ज्योती लाटकर मेटे असे आहे. ज्या नाशिक या ठिकाणी धर्मदाय कार्यालयामध्ये सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत आहेत.

५. विनायक मेटेंचा मृत्यू कसा झाला ?

विनायक मेटे हे बीड वरून मुंबईला एका मीटिंग निमित्त कारने प्रवास करत असताना, एका दुसऱ्या कारने त्यांच्या कारला धडक दिल्यामुळे विनायक मेटे कार अपघातामध्ये प्रचंड जखमी झाले होते. त्यातच त्याचे निधन झाले.

६. विनायक मेंटे यांचे निधन कधी झाले ?

महाराष्ट्रातील मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर झालेल्या कार अपघातामध्ये विनायक मेटे यांचे आकस्मिक रित्या दि. १४ ऑगस्ट २०२२ रोजी निधन झाले.

निष्कर्ष

मित्रहो, आजच्या विनायक मेटे यांची माहिती या लेखाद्वारे आम्ही आपणास विनायक मेटे यांच्या बद्दल माहिती दिली आहे. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. लेख आवडल्यास तुमच्या इतर मित्र परीवारांसोबत नक्की शेयर करा, धन्यवाद .

Leave a comment