प्रकाश आमटे माहिती मराठी Prakash Amte information in marathi

डॉक्टर प्रकाश बाबा आमटे हे लोकप्रसिद्ध समाजसुधारक असून, थोर व महान कुष्ठरोगी समाजसेवक बाबा आमटे यांचे हे द्वितीय पुत्र आहेत.

२३ डिसेंबर १९७३ पासून डॉक्टर आमटे व त्यांच्या पत्नी डॉक्टर मंदाकिनी आमटे, यांनी गडचिरोली मधील भामरागड तालुक्यातील हेमलकसा या ठिकाणी लोक बिरादरी प्रकल्प या नावाने स्थानिक आदिवासींसाठी दवाखाने सुरु केले आहे. तसेच वन्यजीवांवर उपचार देखील या ठिकाणी केले जातात.

प्रकाश हे गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तसेच मांडीया, गोंड व त्या शेजारील तेलंगणा व मध्य प्रदेश या राज्यांमध्ये सुद्धा लोकबिरादरी प्रकल्प राबवतात.

त्यांच्या पत्नी मंदाकिनी आमटे यांना “कम्युनिटी लीडरशिप” साठी मॅगसेस पुरस्कार प्रदान केला गेला आहे. बिल गेट्स यांनी सुद्धा नोव्हेंबर २०१९ मध्ये “आय.सी.एम.आर.” जीवन गौरव पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केले आहे.

आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास प्रकाश बाबा आमटे यांच्या बद्दल माहिती देणार आहोत. हा लेख तुम्ही सविस्तर वाचा.

Table of Contents

प्रकाश आमटे माहिती मराठी Prakash Amte information in marathi

पूर्ण नाव डॉक्टर प्रकाश बाबा आमटे
जन्मतारीख २६ डिसेंबर १९४८
जन्मस्थळ आनंदवन
आईचे नाव साधना आमटे
वडिलांचे नाव मुरलीधर देवीदास आमटे
मुले दिगंत, अनिकेत, आरती
पत्नी डॉक्टर मंदाकिनी आमटे
कार्य समाजसेवक
आदिवासीसाठी स्थापन केलेली संस्था हेमलकसा

प्रकाश आमटे यांचे प्रारंभिक जीवन

डॉक्टर आमटे यांचा जन्म २६ डिसेंबर १९४८ रोजी झाला. त्यांचे वडील बाबा आमटे यांनी स्थापन केलेले “आनंदवन” या आश्रमात बाबा आमटे यांच्या द्वितीय सुपुत्राचा म्हणजेच प्रकाश यांचा जन्म झाला.

Prakash Amte information in marathi

प्रकाश यांचे वडील म्हणजेच बाबा आमटे हे गांधीवादी तत्त्वाचे समर्थक होते. त्यांच्यावर गांधीजींचा मोठ्या प्रमाणात प्रभाव होता. बाबा आमटे यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य कुष्ठरोग्यांसाठी समर्पित केले.

बाबा आमटे माहिती मराठी 

डॉक्टर प्रकाश आमटे यांचे शिक्षण

आमटे हे नागपुरामध्ये जी.एम.सी. मध्ये दाखल झाले. यानंतर त्यांनी मेडिकल मध्ये पदवी घेतली. व शहरांमध्ये जाऊन, त्यांनी त्यांचा अभ्यासक्रम सुरू केला. १९७४ मध्ये त्यांनी व त्यांच्या वडिलांनी आदिवासी भागांमध्ये जाऊन, आदिवासांची परिस्थिती जाणून घेतली.

यामुळे त्यांनी आदिवासींच्या हितासाठी व माडिया, गोंड, यांसारख्या जातीमध्ये लोककल्याणासाठी काम करण्याचे सुरू केले. यामध्ये त्यांची नवविवाहित पत्नी डॉक्टर मंदाकिनी आमटे यांच्याशी त्यांनी लग्न केले. आपली शहरी प्रथा विसरुन, ते हेमलकसा या ठिकाणी गेलेत.

मंदाकिनी आमटे या सुद्धा एक डॉक्टर होत्या व त्या एका सरकारी रुग्णालयामध्ये कार्यरत होत्या. आपल्या पतीच्या सोबतीने त्यांनी सुद्धा त्यांची नोकरी सोडून, हेमलकसा या ठिकाणी आपल्या नवऱ्यासोबत रवाना झाल्या.

Prakash Amte information in marathi

छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण माहिती मराठी

प्रकाश आमटे यांचे – माणुसकीचे उदाहरण

डॉक्टर आमटे यांना एकदा असा प्रश्न विचारला गेला की, “डॉक्टर तुम्ही आदिवासींच्या आरोग्याच्या कल्याणासाठी काम करतात, तर मग प्राण्यांचे अनाथालय कसं काय तुम्ही सुरू केलं ? यावर डॉक्टर म्हणाले- “एकदा ते ज्यावेळी जंगलातून जात होते, त्यावेळी आदिवासी माकडांची शिकार करून घेऊन जात होते.

त्या मेलेल्या मादीला बिलगुन माकडाचे जिवंत पिल्लू दूध पीत होतं. तोपर्यंत आम्हाला त्यामधलं काहीच माहित नव्हतं की, ही माणसे माकडाचा ही शिकार करून खातात. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये माकड खाण्याची प्रथा नाही.

यावरती डॉक्टर बाबासाहेब आमटे यांचे सुपुत्र प्रकाश म्हणाले, आम्ही पहिल्यांदाच माकडाची शिकार केलेली पाहत होतो, त्या आदिवासी लोकांकडे त्यांनी माकडाचे पिल्लू मागितले, त्यांनी घरात मुलं उपाशी आहेत असे सांगितलं.

Prakash Amte

त्यावर डॉक्टर म्हणाले, “आम्हाला कळून चुकलं की, भूक किती पराकोटीची असू शकते. त्यामुळे डॉक्टरांनी त्या अदिवासांच्या मुलांसाठी खाण्यासाठी, तांदूळ दिले. त्या बदल्यात त्यांनी त्यांच्याकडून ते माकडाचे पिल्लू घेतले.

या प्रेरणेतून आदिवासी करिता हेमलकसा या ठिकाणी प्रकाश व त्यांची पत्नी मंदाकिनी आमटे यांनी दवाखान्याची स्थापना केली. या ठिकाणी ते आदिवासी लोकांवर मोफत उपचार करतात. या व्यतिरिक्त त्यांनी मातृत्व सदन देखील सुरू केले या सदनामध्ये स्वास्थ्य संबंधित संपूर्ण माहिती दिली जाते.

तुकडोजी महाराज माहिती मराठी 

डॉक्टर प्रकाश आमटे यांचे कार्य

 • प्रकाश व त्यांची पत्नी डॉक्टर मंदाकिनी आमटे हे दोन्ही दांपत्ये डॉक्टर आहेत. त्यांचे वडील बाबा आमटे यांच्या परंपरेला अधिक प्रेमाने जोपासत. ती परंपरा पुढे नेत आहे. यासाठी ते आदिवासींच्या सेवार्थ आपले पूर्ण जीवन केंद्रित करून आहेत.
 • बाबा आमटे यांनी महाराष्ट्रामधील गडचिरोली जिल्ह्यामधील हेमलकसा या ठिकाणी लोकबिरादरी प्रकल्पाची स्थापना केली होती, व यासाठी त्यांनी स्थानिक आदिवासींच्या विकासाकरिता व आरोग्या करिता मोफत उपचार केले होते.
 • विशेषता बाबांनी कुष्ठरोग्यांवरील रुग्णांसाठी कार्य केले. व त्याकरिता त्यांनी आनंदवनाची स्थापना केली. बाबांच्या निधनानंतर त्यांच्या पश्चात त्यांचे पुत्र डॉक्टर आमटे त्यांचे कार्यपुढे चालवत आहेत.
 • यासाठी डॉक्टर आमटे व त्यांच्या पत्नी मंदाकिनी आमटे या हेमलकसा या ठिकाणी राहण्यास आल्या, त्यावेळी त्यांच्याजवळ मुबलक प्रमाणात राहण्याची सोय उपलब्ध नव्हती.
 • दरवाजा नसलेली एक छोटी झोपडी बांधून, त्या खोलीमध्ये ते दोघं दांपत्य राहू लागले. तेव्हा त्या ठिकाणी वीज सोयी सुद्धा उपलब्ध नव्हत्या, स्वतःचे असेखाजगी आयुष्य जगता येईल, अशी देखील त्या ठिकाणी परिस्थिती नव्हती.
 • आदिवासी, गोंड, माडीयासमुदाया करता, डॉक्टर दांपत्याने आरोग्याची व योग्य शिक्षण देण्याची जबाबदारी स्वतःवर उचलली.
 • सुरुवातीच्या काळात त्यांना ह्या गोष्टी अशक्य व प्रचंड कठीण वाटत होत्या परंतु दृढ निश्चयाने व विश्वासाने त्यांनी त्या गोष्टी संपादन करून, आदिवासी लोकांची सेवा करत करत त्यांच्या मनामध्ये एक वेगळी जागा निर्माण केली.
 • गडचिरोली जिल्ह्यामधील हेमलकसा या ठिकाणी त्यांनी, १९७५ साली स्विझरलँडच्या आर्थिक मदतीने एक छोटासा दवाखाना स्थापन केला. या दवाखान्यामध्ये औषधांची चांगली सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.
 • यामुळे डॉक्टर आमटे व डॉक्टर मंदाकिनी आमटे यांना या ठिकाणी आदिवासी लोकांवर शस्त्रक्रिया करणे सुद्धा शक्य होऊ लागले.
प्रकाश आमटे
 • हेमलकसा रुग्णालयामध्ये त्यानंतर डॉक्टरांनी मलेरिया, क्षयरोग, दाह, यासोबत भाजलेल्या रुग्णांवर सुद्धा यशस्वीरित्या उपचार केले. याशिवाय साप, विंचू, यांच्या दंशाने मरणाच्या अवस्थेत आलेल्या रुग्णांवर देखील डॉक्टरांनी उपचार केले.
 • या सर्व परिस्थिती पाहता, आदिवासी लोकांचा विश्वास त्या दोन्ही डॉक्टर दांपत्यावर वाढू लागला, व मोठ्या संख्येने रुग्ण मोफत उपचार घेण्याकरिता प्रकाश आमटे यांच्याकडे जाऊ लागले.
 • डॉक्टर आमटे व डॉक्टर मंदाकिनी आमटे यांनी आदिवासी लोकांच्या शिक्षणाकरिता मोठे कार्य केले आहे.
 • या दोन्ही आमटे दांपत्यांनी आदिवासींना त्यांच्या अधिकाऱ्यांची जाणीव करून दिली. याव्यतिरिक्त लालची, भ्रष्ट, वन अधिकाऱ्यांना त्यांनी त्या भागातून हाकलून दिले.
 • १९७६ मध्ये प्रकाश व डॉक्टर मंदाकिनी आमटे यांनी आदिवासी लोकांसाठी शाळेची स्थापना केली. सुरुवातीच्या काळात आदिवासी लोक आपल्या मुलांना या शाळेमध्ये पाठवण्यास तयार होत नव्हते, परंतु पुढे पुढे मुलं शाळेमध्ये शिक्षणासाठी येऊ लागले.
 • या ठिकाणी आदिवासी मुलांना शिक्षणासोबत रोजगार कसा प्राप्त करता येईल यादेखील साठी त्यांनी त्यांना प्रशिक्षित केले.
 • हेमलकसा या ठिकाणी आदिवासी शाळेमध्ये मुलांना शेतीविषयक, फळ भाज्यांच्या उत्पादनाविषयी, प्रशिक्षण दिले जात होते. त्या व्यतिरिक्त आदिवासी बांधवांना वनाच्या संरक्षणास संबंधित जागरूक करण्यासाठी डॉक्टर आमटे व डॉक्टर मंदाकिनी आमटे यांनी अमूल्य भूमिका पार पाडली आहे.
 • या शाळेमधून शिक्षण घेतलेले बहुतांश विद्यार्थी आज डॉक्टर, वकील, अधिकारी, शिक्षक, या नावाने नावाजले आहेत. व आपले आयुष्य अगदी चांगल्या रीतीने व्यतीत करत आहेत.
 • या सर्वांचे श्रेय या दोन्ही डॉक्टर दाम्पत्यांना जाते. डॉक्टर प्रकाश आमटे यांनी प्राण्यांकरिता एक प्राणी संग्रहालय देखील स्थापित केले आहे. या ठिकाणी अनाथ झालेल्या लहान प्राण्यांना ठेवले जाते.
 • प्राण्यांचे हे निवासस्थान डॉक्टर आमटे यांनी घरी त्यांच्या अंगणामध्ये तयार केले आहे. या ठिकाणी अस्वल, बिबट्या, मगर, यासारखी ६० पेक्षा अधिक जातीची जनावर अगदी आनंदाने राहतात.
 • डॉक्टर आमटे या प्राण्यांना स्वतः त्यांच्या हाताने अन्न पाणी देतात. प्राणीसंग्रहालयामधील या प्राण्यांना राहण्यासाठी अधिक मोठे पिंजरे, करण्याच्या सरकारच्या सूचनेनुसार नवा मास्टर प्लॅन केंद्राकडे संमतीसाठी पाठवण्यात सुद्धा आला आहे.
 • यासाठी दहा कोटी इतका खर्च येणार असून, टप्प्याटप्प्याने प्राणी संग्रहालय बांधण्यात येणार आहेत.
 • केंद्रीय झू ऑथॉरिटीचा अजून एक आक्षेप आहे. तो म्हणजे जंगली प्राण्यांना हाताळण्याविषयी. जंगली प्राण्यांना हाताळणं व आमटे प्राणीसंग्रहालया मधील प्राण्यांचे फोटो, आमटे यांनी सोशल मीडिया, वेबसाईट, वर्तमानपत्र, वापरणं हे २००९ च्या अधिनियमांचे उल्लंघन आहे. असं सेंट्रल ऑथॉरिटी म्हणणं आहे.
 • या ठिकाणी सर्व प्राणी हे अनाथ असून, लहान पिल्ले आहेत. ज्यांनी त्यांची आई बघितली नाही, माणसांमुळे या प्राण्यांची आई मरण पावली. जंगलामधील शिकार कसे करणे ? स्वतःला संकटातून कसे वाचवणे ? यासारखे यांचे प्रशिक्षण प्राण्यांच्या आई त्यांना देत असते.
 • प्राण्यांना त्यांच्या आई गमावल्यामुळे, त्यांच्यावर तेवढे संस्कार व प्रेम त्यांना मिळणे, हे गरजेचे आहे. म्हणून प्राण्यांवर प्राण्यांवर प्रेम केले, असे त्यांनी याबद्दल स्पष्टीकरण दिले आहे.
 • ज्यावेळी त्यांना कायद्याच्या नियमांचे उल्लंघन झाले, याविषयी विचारले गेले, त्यावेळी ते म्हणाले, “जखमी प्राण्यांवर उपचार करा. आणि त्यांना जंगलात सोडून द्या. असा रेस्क्यू सेंटरचा कायदा सांगतो. पण हे अनाथालय आहे, आणि अनाथालय प्राण्यांच्या गरजेनुसार, कायदा भारतात अस्तित्वात नाही, असं त्यांनी सांगितले.
 • पण यापुढे नवीन दाखल होणाऱ्या प्राण्यांना हात लावणार नाही, असे सुद्धा ते म्हणाले. या अनाथालय  प्राणी संग्रहालयामध्ये, बिबट्या, तरस, हरणांच्या पाच प्रजाती, निलगाय, अस्वल, मगरी, साळींदर, कोल्हे, घुबड घोरपड, मोर, साप, असे जवळपास १०० प्राणी पक्षी आहेत.
 • आदिवासी गावांमधील व भारतात विविध सहली या या ठिकाणी हे प्राणी संग्रहालय बघण्यासाठी येतात.
 • मॅगसेस पुरस्कार सन्मानित बाबा आमटे यांचे द्वितीय सुपुत्र डॉक्टर आमटे, यांनी नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये जी.एम.सी. पदवी प्राप्त केली. ज्या ठिकाणी त्यांना त्यांची पत्नी मंदाकिनी भेटली ते दोघेही त्यांच्या पदव्युत्तर शिक्षणासाठी, जी.एम.सी. मध्ये होते.
 • बाबा आमटे यांच्यासोबत डॉक्टर आमटे व डॉक्टर मंदाकिनी आमटे, यांनी कुष्ठरोग्यांचा कलंक व भीतीवर मात करण्यासाठी अमूल्य मदत केलेली आहे.

डॉक्टर प्रकाश आमटे यांचा लोकबिरादरी प्रकल्प

गडचिरोली जिल्ह्यामधील भामरागड तसेच हेमलकसा यांसारख्या विविध जंगलात, बहुसंख्य माडीया, गोंड, आदिवासी लोकांच्या प्रगतीसाठी, लोकबिरादरी प्रकल्प हा कार्यक्रम डॉक्टर आमटे व त्यांच्या पत्नी डॉक्टर मंदाकिनी आमटे यांनी १९७३ मध्ये सुरू केला.

लोकबिरादरी प्रकल्प दवाखाना, हॉस्पिटल्स, तसेच आश्रम शाळा निवासी शाळा, जखमी वन्य प्राण्यांसाठी, आमटेंचे वन्यजीव उद्यान, अनाथाश्रम या प्रकल्पाचा एक भाग आहे. हा प्रकल्प दरवर्षी सुमारे ४० हजार लोकांना मोफत आरोग्य सेवा देतो.

लोकबिरादरी प्रकल्प आश्रम शाळेमध्ये सहाशेहून अधिक शिक्षण घेत आहे. महाराष्ट्र राज्यामधील गडचिरोली जिल्ह्यातील मांडिया, गोंडा, मधील लोकबिरादरी प्रकल्प व शेजारील आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये तसेच गोंडा अधिवासांसाठी आमटे यांच्या प्रयत्नांमुळे व अमूल्य कार्यामुळे त्यांना प्रसिद्धी प्राप्त झाली आहे.

डॉक्टर प्रकाश आमटे यांचे ग्रंथलेखन

डॉक्टर आमटे यांनी दोन आत्मचरित्र लिहिली आहेत. ज्यामध्ये रानमित्र आणि प्रकाशवाटा जे दोन्ही मूळतः मराठी भाषेमध्ये लिहिले होते.

त्यानंतर त्या दोन्ही आत्मचरित्रांची पुनर्रचना गुजराती कन्नड संस्कृत इंग्रजी इत्यादींमध्ये झाली आहे.

डॉक्टर प्रकाश आमटे प्रसिद्ध का आहेत ?

प्रकाश हे समाज कल्याणासाठी निस्वार्थ समर्पणासाठी व कुष्ठरोग पुनर्वसन क्षेत्रात त्यांच्या महत्त्वाच्या कार्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी त्यांच्या आयुष्यामधील अधिक काळ हा कुष्ठरोगी रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांना स्वावलंबन व सन्मान वाढवणारे, शाश्वत समुदाय निर्माण करण्यासाठी, महत्त्वाचे कार्य केले आहे.

डॉक्टर आमटे यांच्या कार्याचा अनेक लोकांच्या जीवनावर अतिशय सखोल परिणाम झाला आहे. विशेषतः उपेक्षित व कमी सेवा असलेल्या लोकांच्या जीवनावर, डॉक्टर आमटे त्यांच्या दयाळू व सामाजिक कार्यासाठी ओळखले जातात.

त्यांनी संपूर्ण भारत व त्यापलीकडे लोकांकडून व्यापक आदर व प्रशंसा प्राप्त केली आहे. डॉक्टर बाबा आमटे यांचे सुपुत्र प्रकाश यांना त्यांच्या कार्याबद्दल आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यता प्राप्त झाली असून, समाजामधील त्यांच्या योगदानासाठी त्यांना विविध पुरस्काराने गौरवित करण्यात आले आहे.

जगात सकारात्मक बदल घडवण्यासाठी, आकांक्षा बाळगणाऱ्या अनेक लोकांसाठी डॉक्टर प्रकाश आमटे हे प्रेरणास्थान आहेत. आणि त्यांचा वारसा, समाजसेवक, आणि कार्यकर्त्यांच्या भावी पिढ्यांना महत्त्वाची प्रेरणा देत आहे.

प्रकाश आमटे यांच्यावर चित्रपट

डॉक्टर आमटे यांच्या जीवनावर आधारित व त्यांच्या कार्यांवर आधारित “डॉक्टर प्रकाश आमटे – द रियल हिरो” या नावाचा चित्रपट १० ऑक्टोंबर २०१४ रोजी प्रदर्शित करण्यात आला.

या चित्रपटांमध्ये नाना पाटेकर यांनी डॉक्टर आमटे यांची भूमिका साकारली आहे. सोनाली कुलकर्णी हिने डॉ मंदाकिनी आमटे हिने साकारली आहे. मोहन आगाशे, तेजश्री प्रधान, यासोबत दोनशे गोंड आदिवासी कलावंतांच्या भूमिका या चित्रपटांमध्ये साकारल्या गेल्या आहेत.

हा चित्रपट हिंदी तथा मराठी अशा दोन्ही भाषिकेमध्ये प्रदर्शित झाला आहे. याशिवाय डॉक्टर आमटे यांच्या जीवनावर आधारित हेमलकसा नावाच्या एक हिंदी चित्रपट सुद्धा प्रदर्शित झाला. हा चित्रपट ऑस्कर पुरस्कारासाठी निवडला जाऊ शकतो.

डॉक्टर प्रकाश आमटे यांची पुस्तके

 • रानमित्र ( २०१३ )
 • प्रकाश वाटा ( २०१३ )

डॉक्टर प्रकाश आमटे यांचे आत्मचरित्र

प्रकाश वाटा डॉक्टर आमटे यांचे आत्मचरित्र आदिवासींना मुख्य प्रवाहात आणावं, त्यांची पिळवणूक थांबावी. आणि त्यांना माणूस म्हणून जगण्याची संधी मिळवून द्यावी, असं बाबांच्या मनात होतं.

या कामाची जबाबदारी मी घेतली आणि सर्वांनी मिळून ती पार पाडली, बाबांचे हे स्वप्न हेमलकसात प्रत्यक्षात कसं उतरत आहे, त्याची ही गोष्ट म्हटली तर माझ्याही जीवनाची गोष्ट असं प्रकाश सांगतात. मॅगसेसे पारितोषिक विजेते डॉक्टर प्रकाश, यांनी साकार झालेल्या स्वप्नांची ही गोष्ट प्रकाश वाटा मध्ये शब्दबद्ध केली आहे.

आनंदवनातले दिवस, त्या बाहेरच जग, हेमलकसा येथील आव्हानात्मक चित्र, पुस्तकाच्या प्रारंभी उभे राहत. कसोटीचे प्रसंग आणि जीवावरचे प्रसंग थरारून टाकतात. चार दशक सुरू असलेल्या निस्वार्थ कामाची ही ओळख सस्मरणीय ठरते. तुम्हाला अतिशय प्रेरणाप्रदान करणार हे पुस्तक तरुणांनी एकदा तरी नक्की वाचावं असं आहे.

प्रकाश आमटे याचं हेमलकसा

शून्यातून विश्व उभे करणे म्हणजे काय आहे? आमटे परिवाराकडून शिकावं. बाबा आमटेनी कुष्ठरोग्यांसाठी आनंदवन सुरू केलं, तर त्यांचा मुलगा डॉक्टर प्रकाश यांनी अगदी कोणतीही साधनसामग्री नसताना झाडाझुडपांच्या जंगलात, हेमलकसा उभारले.

त्यांच्या कार्याचे वर्णन एका वाक्य जरी केल असले, तरीही शब्दात सामावू शकणार नाही. इतकं अफाट कर्तृत्व प्रकाश याचं आहे.

प्रकाश आमटे यांची कॅन्सरवर मात

डॉक्टर प्रकाश यांनी आदिवासींच्या शिक्षणासाठी आणि आरोग्यासाठी स्वतःला झोपून दिलं. मात्र याच आमटे परिवाराला सध्या एका संकटाचा सामना करावा लागतोय, अलीकडेच बातमी आली – डॉक्टर प्रकाश आमटे यांना ल्युकेमिया आजार असल्याचा समोर आला.

डॉक्टर प्रकाश पुण्यातल्या बीजे मेडिकल कॉलेजच्या, कॉमन लोकेशन साठी आलेले, त्याच दरम्यान त्यांना खोकल्याचा आणि तापाचा त्रास व्हायला लागला, त्यानंतर त्यांना दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आणि तपासण्यांमधून याची सुरुवात असल्याचा समोर आलं.

आणि आजचे अपडेट्स म्हणजे त्यांना हॉस्पिटल मधून डिस्चार्ज देण्यात आलाय, पुढचे उपचार पुण्यातच होणार असून, आठ ते दहा दिवसांमध्ये केमोथेरपी सुरू केली जाईल, अशी माहिती प्रकाश यांच्या मुलाने म्हणजेच अनिकेत आमटे यांनी आपल्या सोशल मीडियावरून दिली आहे.

प्रकाश आमटे यांना मिळालेले पुरस्कार

 • १९९५ – मध्ये मोनॅकोच्या प्रिन्सिपॅलिटीने प्रकाश आणि मंदाकिनी आमटे यांच्या सन्मानार्थ टपाल तिकीट जारी केले.
 • १९८४ – महाराष्ट्र सरकार, भारताचा आदिवासी सेवक पुरस्कार
 • २००८ – साली आमटे दाम्पत्याला त्यांच्या सामाजिक दातृत्वाकरीता, ‘मॅगसेसे’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
 • १९८४ – मध्ये आदिवासी सेवक पुरस्कार, महाराष्ट्र सरकार, इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे डॉ. एम.जे. जोशी आय.एम.ए.भूषण’ पुरस्कार
 • २००९ – गॉडफ्रे फिलिप्स जीवनगौरव पुरस्कार
 • २००२ – पद्मश्री पुरस्कार, भारत सरकार
 • २००८ – मॅगसेसे पुरस्कार
 • २०१४  – मदर तेरेसा पुरस्कार
 • श्रीमंत मालोजीराजे स्मृति पुरस्कार
 • २०१२ – लोकमान्य टिळक पुरस्कार
 • २०१७ – पिंपरी (पुणे) येथील संस्कार प्रतिष्टानतफे श्री स्वामी विवेकानंद जीवनगौरव पुरस्कार
 • २०१९ – बिल गेट्स यांनी ICMR चा जीवनगौरव पुरस्कार प्रदान केला.

FAQ

१. प्रकाश आमटे यांच्या पत्नीचे नाव काय आहे?

प्रकाश बाबा आमटे यांच्या पत्नीचे नाव डॉक्टर मंदाकिनी आमटे अस आहे.

२. डॉक्टर प्रकाश आमटे यांच्या वडिलांचे नाव काय?

डॉक्टर प्रकाश आमटे यांच्या वडिलांचे नाव बाबा आमटे अस होते,बाबा आमटे हे एक थोर समाज सेवक होते त्यांनी कुष्ठरोगांसाठी महत्वाचे कार्य केले आहे.

३. डॉक्टर प्रकाश आमटे यांचे शिक्षण किती झाले आहे?

प्रकाश बाबा आमटे हे नागपुरामध्ये जी.एम.सी. मध्ये दाखल झाले. यानंतर त्यांनी मेडिकल मध्ये पदवी घेतली. व शहरांमध्ये जाऊन, त्यांनी त्यांचा अभ्यासक्रम सुरू केला.

४. प्रकाश आमटे कुठे राहतात?

डॉक्टर प्रकाश आमटे व त्यांच्या पत्नी मंदाकिनी आमटे या हेमलकसा या ठिकाणी राहण्यास आल्या, त्यावेळी त्यांच्याजवळ मुबलक प्रमाणात राहण्याची सोय उपलब्ध नव्हती. दरवाजा नसलेली एक छोटी झोपडी बांधून, त्या खोलीमध्ये ते दोघं दांपत्य राहू लागले.

५. आनंदवनात शाळा किती साली सुरू झाली?

२३ डिसेंबर १९७३ पासून डॉक्टर प्रकाश आमटे व त्यांच्या पत्नी डॉक्टर मंदाकिनी आमटे, ह्या गडचिरोली मधील भामरागड तालुक्यातील हेमलकसा या ठिकाणी लोक बिरादरी प्रकल्प सुरु केले.

निष्कर्ष

मित्रहो, आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणस डॉक्टर प्रकाश बाबा आमटे यांच्या बद्दल माहिती दिली आहे. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. लेख आवडल्यास तुमच्या इतर मित्रपरिवारांसोबत नक्की शेयर करा. धन्यवाद.

Leave a comment